Thursday, September 8, 2016

Shri GajananAshtakam श्रीगजाननाष्टकम्


Shri GajananAshtakam 
Shri GajananAshtakam is in Sanskrit. It is composed by great devotee of God Gajanan from Nasik. It is a praise of God in eight stanzas. The devotee is asking God to remove his troubles/difficulties from his life.
श्रीगजाननाष्टकम्
देवासुरमनुष्याद्यैः कार्यादौ यः स्मृतः सदा ।
विघ्नोपशमनार्थं तं वंदेऽहं विघ्ननायकम् ॥ १ ॥
सौंदर्योदार्यगांभीर्ययुतं यत्कामिनीद्वयम् ।
सिद्धिबुध्यभिदं पार्श्र्वद्वयेराजन् नमामि तम् ॥ २ ॥
यांञ्चा श्रोतुं शूर्पकर्णः सिद्धिं दातुं स सिद्धिकः ।
बुद्धिं दातुं बुद्धियुक्तो यस्तं वंदे गजाननम् ॥ ३ ॥
यत्पिता पंचवक्त्रोभूद्यद्भ्राता स षडाननः ।
स्वयमतद्वैतवदनो यतस्तं नौमि विघ्नपम् ॥ ४ ॥     
भक्तभव्याभवासार्थं सिंदुरो यस्य च प्रियः ।
मोहदैत्यविनाशार्थं सांकुशो यो नमामि तम् ॥ ५ ॥
त्रिपुरध्वंसकाले यः शिवेनापि विचिंतितः ।
तं न स्मरति को भूमौ विघ्नराजं सुरार्चितम् ॥ ६ ॥
यत्स्मृतिर्विघ्नशमनी सर्वसिद्धिविधायिनी ।
तं न स्मरति को मर्त्यो विघ्नराजं गणेश्र्वरम् ॥ ७ ॥
यत्सद्गुणार्णवकणान्वक्तुं शेषोप्यशक्तधीः ।
तत्राहं तु क्रियान्मंदो यतस्तस्मै नमो नमः ॥ ८ ॥
यः प्रातः पठते मर्त्यो गजास्याष्टकमादरात् ।
तस्य विघ्नाः शमं यांति गजवक्त्रप्रसादतः ॥ ९ ॥
॥ इति श्रीगजाननाष्टकम् संपूर्णम् ॥  
स्वैर मराठी अर्थ
१) देव,असुर, मनुष्यअदि कार्यारंभि विघ्नांच्या शमनासाठी ज्याचे स्मरण करतात,   
त्या विघ्ननायकाला मी नमस्कार करतो.
२) सौंदर्य,औदार्य व गांभीर्य यांनी युत जे कामिनी द्वय सिद्धि व बुद्धिरुपी ज्याच्य  पार्श्वभागी विराजमान आहे त्या विघ्नराजाला मी नमस्कार करतो. 
३) सिद्धि हवी असेल त्याला सिद्धि देणारा व बुद्धि हवी असेल त्याला बुद्धि देणारा व शूर्पकर्ण म्हणून ओळखला जाणार्‍या गजाननाला मी नमस्कार करतो.
४) ज्याचा पिता पांच तोंडे असलेला व भाऊ सहा तोंडे असलेला आहे, पण जो स्वतः मात्र एक तोंड असलेला आहे अशा विघ्नपाला मी नमस्कार करतो.
५) सिंदूर ज्याला प्रिय आहे, ज्याने मोहरुपी दैत्याचा नाश करण्यासाठी अंकुश धरला आहे, त्या गजाननाला मी नमस्कार करतो.  
६) त्रिपुराचा वध करण्याआधी शंकराने ज्याचे चिंतन केले व देवांनी ज्याचे पूजन केले आहे त्या विघ्नराजाचे या पृथ्वीवर कोण स्मरण करणार नाही ?
७) ज्याचे स्मरण विघ्नांचा नाश करणारे व सर्व सिद्धि देणारे आहे त्या विघ्नराज गणेश्र्वराचे कोणता माणुस स्मरण करणार नाही ? 
८) ज्याच्या सद्गुणांच्या समुद्रातील कणाचेही वर्णन शेषसुद्धा थकला, तेथे मी क्रियामन्द कसे वर्णन करु शकेन ? मी त्याला नमस्कार करतो.

९) जो हे गजाननाष्टक सकाळी आदराने म्हणतो, त्याची विघ्ने गजवक्त्राच्या प्रसादाने शमन पावतात.     
Shri GajananAshtakam
श्रीगजाननाष्टकम्



Custom Search

No comments:

Post a Comment