There are many Stotras in this blog of many Gods. Stotra is a blog for the people who have faith in God. If your are reading a devi stotra then for having more devi storas please click on Title.It's a link. If you recite any of the stotras you like, then results will be good and make your life happy and prosperous.I myself have experienced it and there are many people like me.The stotra is to be recited with full concentration daily.
ShriGangaShtakam ShriGanagashtakam is in Sanskrit. It is a beautiful creation of Param Poojya Shankaracharya. It is stuti of Ganga Mata. Ganga is a very pious river in India. Ganga is Papavinashini, i.e. it removes the sins of a devotee who take a bath in Ganga. People don’t ask for anything when they touches Ganga. Even they don’t desire for Indrapad.
श्रीगङ्गाष्टकम्
भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं
विगतविषयतृष्णः कृष्णमाराधयामि ।
सकलकलुषभङ्गे स्वर्गसोपानसङ्गे
तरलतरतरङ्गे देवि गङ्गे प्रसीद ॥ १ ॥
हिंदीमे अनुवाद
१) हे देवि (गंगे) ! तुम्हारे तीरपर केवल तुम्हाराजलपान करता हुआ, विषय तृष्णासे रहित हो, मै श्रीकृष्णकी आराधना करुं । हे सकल पापविनाशिनी, स्वर्ग-सोपानरुपिणि ! तरलतरङ्गिणी ! देवि गंगे ! मुझपर प्रसन्न हो ।
भगवति भवलीलामौलिमाले तवाम्भः-
कणमणुपरिमाणं प्राणिनो ये सृशन्ति ।
अमरनगरनारीचामरग्राहिणीनां
विगतकलिकलङ्कातङ्कमङ्के लुठन्ति ॥ २ ॥
२) हे भगवति ! तुम महादेवजीके मस्तककी लीलामयी माला हो, जो प्राणी तुम्हारे जलकणके अणुमात्रको भी स्पर्श करते हैं, वे कलिकलङ्कके भयको त्यागकर, देवपुरीकी चँवरधारिणी अप्सराओंकी गोदमें शयन करते हैं ।
पायान्नो गाङ्गमम्भः करिकलभकराक्रान्तरंहस्तरङ्गम् ॥ ४ ॥
४) स्नान करते हुए हाथियोंके कुम्भस्थलसे झरते हुए मदरुपी मदिराकी गन्धके कारण मधुपवृन्द जिससे मतवाले हो रहे हैं, सिद्धोंकी स्त्रियोंके स्तनोंसे बहे हुए कुकुंमके मिलनेसे जो पिंगलवर्ण हो रहा है तथा सायं-प्रातः मुनियोंद्वारा अर्पित कुश और पुष्पोंके समूहसे जो किनारेपर ढका हुआ है, हाथियोंके बच्चोंकी सूँडोंसे जिनकी तरङ्गोंका वेग आक्रान्त हो रहा है, वह गंगाजल हमारा कल्याण करे ।
आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं
पश्र्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम् ।
भूयः शम्भुजटाविभूषणमणिर्जह्नोर्महर्षेरियं
कन्या कल्मषनाशिनी भगवती भागीरथी दृश्यते ॥ ५ ॥
५) जह्नु महर्षिकी कन्या, पापविनाशिनी भगवती भागीरथी, पहले ब्रह्माके कमण्डलुमें जलरुपसे, फिर शेषशायी भगवान्के पवित्र चरणोदक रुपसे और तदपश्र्चात् महादेवजीकी जटाको सुशोभित करनेवाली ( गंगा ) मणिरुपसे दिख रही है ।
शैलेन्द्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी
पारावारविहारिणी भवभयश्रेणीसमुत्सारिणी ।
शेषाहेरनुकारिणी हरशिरोवल्लीदलाकारिणी
काशीप्रान्तविहारिणी विजयते गङ्गा मनोहारिणी ॥ ६ ॥
६) हिमालयसे उतरनेवाली, अपने जलमे गोता लगानेवालोंका उद्धार करनेवाली, समुद्रविहारिणी, संसार-आपदाओंका नाश करनेवाली, शेषनागका अनुकरण करनेवाली, शिवजीके मस्तकपर लताके समान सुशोभित, काशीक्षेत्रमें बहनेवाली, मनोहारिणी गंगा विजयी हो ।
कुतो वीचिर्वीचिस्तव यदि गता लोचनपथं
त्वमापीता पीताम्बरपुरनिवासं वितरसि ।
त्वदुत्सङ्गे गङ्गे पतति यदि कायस्तनुभृतां
तदा मातः शातक्रतवपदलभोऽप्यतिलघुः ॥ ७ ॥
७) यदि तुम्हारी तरंग नेत्रोंके सामने आ जाय, तो फिर संसारकी तरंग कहाँ रह सकती है? तुम तुम्हारा जलपान करनेपर वैकुण्ठलोकमें निवास देती हो, हे गंगे ! जब जीवोंका शरीर तुम्हारी गोदमें छूट जाता है, तो हे माता ! उससमय इन्द्रपदकी प्राप्ति भी अत्यन्त तुच्छ मालूम होती है ।
गङ्गे त्रैलोक्यसारे सकलसुरवधूधौतविस्तीर्णतोये
पूर्णब्रह्मस्वरुपे हरिचरणरजोहारिणी स्वर्गमार्गे ।
प्रायश्र्चित्तं यदि स्यात्तव जलकणिका ब्रह्महत्यादिपापे
कस्त्वां स्तोतुं समर्थस्त्रिजगदधहरे देवि गङ्गे प्रसीद ॥ ८ ॥
८) तीनों लोकोंकी सार, सर्वदेवांगनाएँ जिसमे स्नान करती हैं, ऐसे विस्तृत जलवाली, पूर्ण ब्रह्मस्वरुपिणी, स्वर्ग मार्गमें भगवान्के चरणोंकी धूलि धोनेवाली, हे गंगे ! जब तुम्हारे जलका एक कणमात्र ही ब्रह्महत्यादि पापोंका प्रायश्र्चित्त है तो हे त्रैलोक्यपापनाशिनि ! तुम्हारी स्तुति करनेमें कौन समर्थ है ? हे देवि गंगे ! प्रसन्न हो जाओ ।
मातर्जाह्नवि शम्भुसङ्गवलिते मौलौ निधायाञ्जलिं
त्वत्तीरे वपुषोऽवसानसमये नारायणाङ्घ्रिद्वयम् ।
सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे
भूयाद्भक्तिरविच्युताहरिहराद्वैतात्मिका शाश्र्वती ॥ ९ ॥
९) हे शिवकी संगिनी ! माता गंगे ! शरीर शान्त होनेके समय प्राण प्रयाणके उत्सवमें, तुम्हारे तीरपर, सिर नमाकर हाथ जोडे हुए, आनन्दसे भगवान्के चरणयुगलका स्मरण करते हुए मेरी अविचल भावसे हरि-हरमें अभेदात्मिका नित्य भक्ति बनी रहे ।
GovindDamodar Stotram GovindDamodar Stotram is in Sanskrit. It is a very beautiful creation of P.P. BilvaMagalacharya. He is advicing us to utter the names of God always. It will help us in our happiness, unhappiness or suffering any thye of difficulties in our life.
कृष्णा तदाक्रोशदनन्यनाथा गोविन्द दामोदर माधवेति ॥ १ ॥
१) ज्यावेळी कौरव-पांडवाच्या उपस्थितींत भरलेल्या राजसभेमध्यें दुःशासनानें द्रौपदीचे वस्त्र व केस पकडून ओढत आणले तेव्हां जिचा दुसरा कोणी नाथ (रक्षण करणारा) नाहीं अशा द्रौपदीनें " हे गोविन्द, हे दामोदर, हे माधव (माझे रक्षण कर !) असा मोठा आक्रोश केला.
त्रायस्व मां केशव लोकनाथ गोविन्द दामोदर माधवेति ॥ २ ॥
२) हे श्रीकृष्णा, हे विष्णो, हे मधुकैटभाला मारणार्या, हे भक्तांवर अनुकंपा करणार्या, हे भगवंता, हे मुरारे, हे केशवा, हे लोकेश्र्वर, हे गोविन्द, हे दामोदर, हे माधवा माझे रक्षण कर.
दध्यादिकं मोहवशादवोचद् गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३ ॥
३) ज्यांची चित्तवृत्ती मुरारीच्या चरणकमलांत जडलेली आहे. त्या सर्व गोपकन्या दूध, दही विकण्याच्या इच्छेनें घरांतून निघाल्या पण त्यांचे मन तर मुरारीकडेच होते. त्यामुळें प्रेमानें शुद्ध हरपून त्या " दही घ्या, दूध घ्या " असें ओरडण्याऐवजी जोराजोरांत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असेंच ओरडूं लागल्या.
स्खलद्गिरं वाचयितुं प्रवृत्तो गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६ ॥
६) घरोघरी असलेली गोपी व त्यांचे समूह पाळलेल्या व पिंजर्यांत असलेल्या मैनांकडून त्यांच्या लडखडत्या वाणीनें " गोविंद, दामोदर, माधव " म्हणून घेण्यात दंग होत्या.
८) हातांत लोण्याचा गोळा घेऊन यशोदामातेनें डोळेझाकाझाकीच्या खेळांत दंग असलेल्या व बलरामाचा धाकटा भाऊ असलेल्या श्रीकृष्णाला मुलांच्यामधून पकडून " गोविंद, दामोदर, माधव " असा धावां केला.
सदा मन्दीये रसनेङग्ररङ्गे गोविन्द दामोदर माधवेति ॥ ९ ॥
९) आपल्या तोडांतील राजहंसीसारख्या रसनेला (जीह्वेला) की, जी विचित्र, वर्णमय आभूषणांनी सुंदर दिसते, तीला सांगत असते की तूं सर्वप्रथम " गोविंद, दामोदर, माधव " या नावांचाच उच्चार कर.
सम्बोधयामास मुदा यशोदा गोविन्द दामोदर माधवेति ॥ १० ॥
१०) आपल्या मांडीवर बसून बालगोपालाचे रुप धारण केलेल्या भगवान लक्ष्मीपतींना अर्थात् भगवान विष्णुनां " गोविंद, दामोदर, माधव " जरा माझ्याशी बोल तरी असे म्हणे.
आमर्यदत्पाणितलेन नेत्रे गोविन्द दामोदर माधवेति ॥ १३ ॥
१३) श्रीनन्दनन्दन आपल्याच घरांत हातांतील कंकणांशी खेळत असतांना यशोदेन एका हातांत लोण्याचा गोळा घेऊन हळुच त्याच्या मागे जाऊन त्याचे दोन्हे डोळे आपल्या दुसर्या हातांने झाकले व म्हणू लागली " हे गोविंद, दामोदर, माधव " ( अरे बघ हा लोण्याचा गोळा खा.)
पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति ॥ १४ ॥
१४) वृदावनांतील प्रत्येक घरांतील गोपी वेळ मिळाल्यावर एकत्र जमून त्या मनमोहकाच्या (कृष्णाच्या) गोविंद, दामोदर, माधव या नांवाचा पाठ करत.
मन्दारमूले वदनाबहिरामं बिम्बाधरे पूरितवेणुनादम् ।
गोगोपगोपीजनमध्यसंस्थं गोविन्द दामोदर माधवेति ॥ १५ ॥
१५) ज्याचा चेहरा अतिशय सुंदर आहे, जो आपल्या बिंबासमान लाल ओठांवर बासुरी ठेवून मधुर स्वर काढत आहे, जो कदम्ब वृक्षाखाली गाई, गोप व गोपीनीं वेढलेला आहे त्या भगवंताचे " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असे म्हणून नेहमी स्मरण करावयास हवे.
गायन्ति प्रोच्चैर्दधि मन्थयन्त्यो गोविन्द दामोदर माधवेति ॥ १६ ॥
१६) व्रहवासी स्त्रीया सकाळी लवकर उठून त्या यशोदेच्या मुलाच्या बालक्रीडा आठवत आठवत दही घुसळता घुसळता मोठ्यानें " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या पदाचे गान करतात.
उवाच सत्यं वद हे मुरारे गोविन्द दामोदर माधवेति ॥ १७ ॥
१७) यशोदाने ठेवलेल्या लोण्याच्या गोळ्यावर दृष्टी पडताच लोणी आवडणार्या कृष्णाने त्यांतले कांही लोणी उचलून खाल्ले व कांही आपल्या सवंगड्यांत वाटले. यशोदाने त्याच्यावर संशय घेऊन " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " सरळ सरळ सांग लोण्याचा गोळा कोठे गेला?
गायन्ति गोप्योऽथ सखीसमेता गोविन्द दामोदर माधवेति ॥ १८ ॥
१८) जिच्या हृदयांत कृष्ण प्रेमाचा पूर आला आहे अशी यशोदा घरांत दही घूसळून लोणी काढत असतांना गोपकन्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " यापदाचे गान करत होत्या.
आलोक्य गानं विविधं करोति गोविन्द दामोदर माधवेति ॥ १९ ॥
१९) कधी एके दिवशीं दही घुसळणें थांबवून यशोदा उठली तेव्हां तीची दृष्टी बिछान्यावर बसलेल्या मनमोहक मुकुन्दावर पडली. ती त्याला बघून हर्षभराने " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असें गान करुं लागली.
क्रीडापरं भोजनमज्जनार्थं हितैषिणी स्त्री तनुजं यशोदा ।
आजूहवत् प्रेमपरिप्लुताक्षी गोविन्द दामोदर माधवेति ॥ २० ॥
२०) खेळणे प्रिय असलेला बालमुकुंद बालकांबरोबर खेळत होता. त्याला ना आंघोळीची ना कांही खाण्याची शुद्ध होती. प्रेमळ माता त्याला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " अशा हाका मारुन आंघोळीसाठी व कांही खाण्यासाठी यावयास मोठ्या प्रेमानें बोलवत होती.
सुखं शयानं निलये च विष्णुं देवर्षिमुख्या मुनयः प्रमन्नाः ।
तेनाच्युते तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति ॥ २१ ॥
२१) नारदादी ऋषी घरामध्यें सुखाने झोपलेल्या पुराणपुरुष बाळकृष्णाची " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असे म्हणून आराधना करतात. आणि त्या श्रीअच्युतामध्यें तन्मयता साधतात.
विहाय निद्रामरुणोदये च विधाय कृत्यानि च विप्रमुख्याः ।
वेदावसाने प्रपठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति ॥ २२ ॥
२२) वेदज्ञ ब्राह्मण सकाळी लवकर उठून नित्य कर्मे उरकून वेदपाठाच्या शेवटी नेहमी " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या मधुर नामाचे किर्तन करतात.
राधां जगुः साश्रुविलोचनाभ्यां गोविन्द दामोदर माधवेति ॥ २३ ॥
२३) वृंदावनांतील श्रीवृषभानुकुमारीला वनवारीच्या (कृष्णाच्या) वियोगाने व्याकुळ झालेली बघुन गोप आणि गोपी आपल्या कमलनयनांतून अश्रु ढाळत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असा धावा करुं लागले.
प्राबोधयत् पाणितलेन मन्दं गोविन्द दामोदर माधवेति ॥ २४ ॥
२४) प्रातःकाळी जेव्हां गाई वनांत चरायला गेल्या तेव्हां त्यांचे रक्षण करण्यासाठी बिछान्यावर झोपलेल्या श्रीकृष्णाला प्रेमाने थापडा मारत व वनांत जाण्यासाठी उठवतांना यशोदा " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " उठ व गाईंच्या रक्षणासाठीं वनांत जा. असें सांगू लागली.
प्रवालशोभा इव दीर्घकेशा वाताम्बुपर्णाशनपूतदेहाः ।
मूले तरुणां मुनयः पठन्ति गोविन्द दामोदर माधवेति ॥ २५ ॥
२५) फक्त हवा, पाणी आणि पानें यांचे भक्षण करुन ज्यांची शरीरें पवित्र झाली आहेत तसेच प्रवाळासारख्या लांबलांब शोभून दिसणार्या व थोड्या लालरंग असलेले जटाधारी मुनिजन पवित्र वृक्षांच्या सावलींत बसून " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामांचा पाठ करतात.
एवं ब्रुवाणा विरहातुरा भृशं व्रजस्त्रियः कृष्णविषक्तमानसाः ।
२६) श्रीवनमालीच्या वियोगाने विह्वळ झालेल्या व्रजकन्या त्याच्याबद्दल (वनमालीबद्दल) निरनिराळ्या गोष्टी सांगून लोकलज्जेला तिलांजली देऊन मोठमोठ्याने " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असें म्हणत रडूं लागल्या.
आनन्दकन्द व्रजचन्द्र कृष्ण गोविन्द दामोदर माधवेति ॥ २७ ॥
२७) गोपी राधिका एखाद्या दिवशी मण्यांच्या पिंजर्यांत असलेल्या पाळीव पोपटाला हे आनन्दकन्द, हे व्रजचन्द्र, हे कृष्ण, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावांनी बोलवू लागली.
उवाच माता चिबुकं गृहीत्वा गोविन्द दामोदर माधवेति ॥ २८ ॥
२८) कमळासारखे डोळे असलेल्या कृष्णाला एखाद्या गोपबालेची वेणी गाईच्या बछड्याच्या शेपटाला बांधतांना बघून त्याला पकडून माझ्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असे म्हणू लागली.
आकारयामासुरनन्तमाद्यं गोविन्द दामोदर माधवेति ॥ २९ ॥
२९) प्रातःकाळ झाल्यावर सर्व ग्वालबाल मंडळी हातांत वेताची काठी घेऊन गाईंना चरावयास निघाली तेव्हां आपल्या प्रिय आदिपुरुष कृष्णाला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणून हाका मारु लागले.
जलाशये कालियमर्दनाय यदा कदम्बादपतन्मुरारिः ।
गोपाङ्गनाश्र्चरक्रुशुरेत्य गोपा गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३० ॥
३०) कालियानागाला मारण्यासाठी जेव्हां कन्हैयाने कदम्बवृक्षावरुन पाण्यांत उडी मारली तेव्हां गोपी आणि गोप " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणून रडू लागले.
तदा स पौरर्जयतीत्यभाषि गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३१ ॥
३१) ज्यावेळी श्रीकृष्णाने अक्रूराबरोबर कंसाच्या धनुरोत्सवांसाठी मथुरेमध्यें प्रवेश केला तेव्हां सर्व पुरवासी जनांनी " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " तझा जय होवो. असा घोष केला.
३३) यशोदेचा पुत्र कृष्णाला कालिया नागाने जखडले आहे हे समजल्यावर गोपीबाला सुन्न होऊन रस्त्यावर लोळत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणून रडू लागल्या.
३४) अक्रूराच्या रथावर चढून मथुरेला जाणार्या कृष्णाला बघून गोपी त्याच्या होणार्या वियोगानें " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " आम्हाला सोडून कोठे चाललास म्हणू लागल्या?
३५) श्रीराधा कृष्णाच्या वियोगाने कमलवनांत फुलांच्या शय्येवर झोपून आपल्या पूर्ण उमललेल्या कमळासमान डोळ्यांतून अश्रु ढाळीत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणत रडूं लागली.
३६) आई-वडिल अशा सर्वांनी वेढलेली राधा घरांत प्रवेश करुन विलाप करु लागली कीं, हे विश्र्वनाथ, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " माझे रक्षण करा. माझे रक्षण करा.
३७) रात्रीच्यावेळी एका गोपीकन्येला असे वाटलें की वनमाळी वृदावनांत यावेळी आहेत. मग काय ती लगेचच तिकडे गेली पण त्या निर्जन वनांत वनमाळी न दिसल्यानें भयानें कांपत ती " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणूं लागली.
ते निश्र्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३८ ॥
३८) (वनांत अगर कोठेंच वनमालीला न शोधता ) जे लोक आपल्याच घरी सुखाने शय्येवर पडून " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या भगवान विष्णुंच्या पवित्र नामांचा नेहमी जप करतात, ते निश्र्चितच भगवानांशी तन्मय होतात.
३९) कमललोचनी राधाला कृष्णाच्या वियोगानें दुःखीत झालेली पाहून कोणी गोपी आपल्या कमळासारख्या डोळ्यांतून अश्रु वाहात वाहात " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणू लागली.
आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४० ॥
४०) हे निरनिराळ्या रसांचा स्वाद घेणार्या जीभे तुला गोड पदार्थ अधिक प्रीय असतात. म्हणून मी तुला एक फार चांगली व सुंदर गोष्ट सांगतो. तूं निरंतर " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "या मधुर नामांचा जप कर.
४१) मोठे मोठे वेदज्ञ विद्वान, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामालाच मोठमोठ्या दुर्धर व्याधी नाहीसा करणारा वैद्य आणि संसारांतील आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक या तीन्ही तापाचे अत्यंत प्रभावी बीज मानतात.
४२) आपले पिता दशरथ यांच्या आज्ञेनुसार बन्धु लक्ष्मण व पत्नी सीता यांच्यासह निबिड वनांत वनवास भोगण्या निघाले तेव्हां माता कौसल्या " हे राम, हे रघुनन्दन, हे राघव असा विलाप करुं लागली.
४३) जेव्हां राक्षसराज रावण पंचवटीतून सीतेला एकटी बघून रथांतून पळवून नेत होता तेव्हा रामाशिवाय जिचा दुसरा कोणी स्वामी नाही अशी सीता हे राम, हे रघुनन्दन, हे राघव " मला वाचवां असे म्हणून रडू लागली.
४४) रावणाच्या रथामध्यें बसलेली रामाच्या वियोगाने दुःखी झालेली सीता प्रभु श्रीरामचन्द्रांचे ध्यान करत " हे राम, हे रघुनन्दन, हे राघव " माझे रक्षण करा. असे म्हणू लागली.
४५) जेव्हां रावणाच्या रथांतून सीता समुद्र मध्यापर्यंत पोहोचली तेव्हां हे विष्णो ! हे रघुकुलपते ! हे देवतांना सुख व राक्षसांना दुःख देणार्या हे राम, हे रघुनन्दन, हे राघव " मला प्रसन्न व्हा.
४६) पाणी पीत असलेल्या हत्तीराजाचा पाय जेव्हां मगरीनें धरला व सर्व इतर हत्ती बन्धुंचा दुरावा झाला, तेव्हा गजराजाने मोठ्या अधीरतेने व अनन्यभावाने " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावानें भगवंतांचा धांवा केला.
४७) आपला पुरोहीत शंखमुनि याच्यासह राजा हंसध्वजाने आपला मुलगा सुध्नवा याला तापलेल्या तेलांत उडी मारतांना व " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामांचा जप करतांना पाहिले.
४८) ( एके दिवशी द्रौपदीचे जेवण झाल्यावर शिष्यांसह अवेळी येऊन दुर्वास ऋषीनी भोजनाची व्यवस्था करण्यास द्रौपदीस सांगितलें. ते तीने मान्य तर केलें ) पण त्याची पुर्तता व्हावी म्हणून द्रौपदीनें आपल्या अंतःकरणांत स्थित असलेल्या श्रीकृष्णाला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " अशी साद घातली.
ध्येयः सदा योगिभिरप्रमेयश्र्चिन्ताहरश्र्चिन्ताहरश्र्चिन्तितपारिजातः ।
४९) योग्यांनासुद्ध जे अगम्य आहेत, जे सर्व चिंतांचे हरण करतात, जे मनांत असलेल्या सर्व वस्तु कल्पवृक्षाप्रमाणें देणारे आहेत, त्यांच्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "या नामांचे नेहमी स्मरण केले पाहिजे.
करावलम्बं मम देहि विष्णो गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५० ॥
५०) जो मोहरुपी अन्धकाराने व्याप्त झालेला आहे, जो विशयांच्या ज्वलांनी तप्त अशा कूपांत पडला आहे, अशा मला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " आपल्या हातांचा आधार द्या.
त्वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते ।
५१) हे जीभे ! मी तुझ्याजवळ एकाच गोष्टीची याचना करतो, ती तूं मला दे. जेव्हा दण्डपाणी यमराज या शरीराचा नाश करण्यासाठी येतील तेव्हां अत्यंत प्रेमानें गद्गद् स्वरांत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामांचे उच्चारण करत रहा.
५२) हे जिह्वे ! हे रसज्ञे ! संसाररुपी बंधनांतून मुक्त होण्यासाठी तूं नेहमी " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या मंत्राचा जप करत रहा. तो सोपा व सुन्दर आहे. त्याचाजप व्यास, वसिष्ठ आदि ऋषींनीही केला आहे.
५३) हे जिह्वे ! तूं जिरंतर " गोपाल, वंशीधर, रुपसिन्धो, लोकेश, नारायण, दीनबन्धो, हे गोविंद, हे दामोदर, हे माधव या नावांचे मोठ्या आवाजांत किर्तन करत रहा.
५४) हे जिह्वे ! तूं नेहमी श्रीकृष्णाच्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या मनोहर, मधुर नामांचे जी भक्तांच्या सर्व संकटांची निवृत्ती करणारी आहेत ती नामें भजत रहा.
गोविन्द गोविन्द हरे मुरारे गोविन्द गोविन्द मुकुन्द कृष्ण ।
५५) हे जिह्वे ! गोविन्द, गोविन्द, हरे मुरारे, गोविन्द, गोविन्द, मुकुंद, कृष्ण, गोविन्द, गोविन्द, रथाङ्गपाणे, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावांचा सदा जप करत रहा.
५७) दुःशासनाच्या अविचारी बोलण्याने व्यथित झालेली व हरणीसारखी भयभीत झालेली द्रौपदी सबहेत प्रवेश करत मनांतल्या मनांत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " हा जप करत होती.
५९) हे जिह्वे ! तू श्रीनाथ, सर्वेश्र्वर, श्रीविष्णुस्वरुप, श्रीदेवकीनन्दन, असुरनिकन्दन, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे निरंतर सेवन करत रहा.
गोपीपते कंसरिपो मुकुन्द लक्ष्मीपते केशव वासुदेव ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६० ॥
६०) हे जिह्वे ! तू गोपीपते, कंसरिपो, मुकुन्द, लक्ष्मीपते, केशव, वासुदेव, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे निरंतर सेवन करत रहा.
६१) जे व्रजराज व्रजाङ्गनांना आनन्दित करणारे आहेत, ज्यांनी गाईंना चरण्यासाठी वनांत नेले आहे, त्या मुरारीच्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे सेवन करत रहा.
प्राणेश विश्र्वम्भर कैटभारे वैकुण्ठ नारायण चक्रपाणे ।
६३) हे हरे, हे मुरारे, हे मधुसूदन, हे पुराणपुरुषोत्तम, हे रावणारे, हे सीतापते श्रीराम, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे तू नित्य पान करत रहा.
६४) हे जिह्वे ! श्रीयदुकुलनाथ, गिरिधर, कमलनयन, गौ, गोप, आणि गोपीयांना सुख देणार्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे तू निरंतर सेवन करीत रहा.
६५) ज्यांनी पृथ्वीचा भार उतरण्यासाठी सुंदर बालकाचे रुप धारण केले आहे, आणि आपली क्रीडा/ लीला आनंदमयी करण्याच्या निमित्याने शेष नागाला भाऊ बनविले आहे, अश्या नटनागराच्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावांचे तू सदा पान करत रहा.
६६) जो पूतना, बकासुर, अघासुर, आणि धेनुकासुर आदि राक्षसांचा शत्रु आहे आणि केशी व तृणावर्त यांना मारणारा आहे त्या असुरारि मुरारीच्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नांवांचे हे जिह्वे तू निरंतर सेवन करत रहा.
६८) हे प्रल्हादाची बाधा हरण करणार्या दयाळु नृसिंहा, नारायणा, अनन्त, हरे, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे पान हे जिह्वे तू निरंतर करत रहा.
६९) हे जिह्वे ! ज्यांनी मनुष्यरुप धारण करुन राम अवतार घेतला आणि आपल्या प्रबल पराक्रमाने सर्व राजांना दास बनवले तू त्या नीलाम्बुज श्यामसुन्दर श्रीरामाच्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे सदा सेवन करत रहा.
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।
७०) हे जिह्वे तूं मात्र श्रीकृष्ण, गोविंद, हरे, मुरारे, हे नाथ, नारायण, वासुदेव, तसेच " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे सदा सेवन करत रहा.
वक्तुं समर्थोऽपि न वक्ति कश्र्चिदहो जनानां व्यसनाभिमुख्यम् ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ७१ ॥
७१) अहो मनुष्याची विषयलोलुपता किती आश्र्चर्यकारक आहे बघा बोलण्याची शक्ति असूनही त्याच्या तोंडून देवाचे नांव येत नाही. तरी हे जिह्वे तूं मात्र " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे सदा सेवन करत रहा.
Snri VishnorShtaVinshatiNam Stotram Snri VishnorShtaVinshatiNam Stotram These are 18 Eighteen pious names of God Vishnu. Arjuna asked ShriKeishna please tell me very pious names of God Vishnu out of his thousand names. this stora recited /listen makes the devotee sinless and bless him with fulfilling many wishes.
श्रीविष्णोरष्टाविंशतिनाम स्तोत्रम्
अर्जुन उवाच
किं नु नाम सहस्राणि जपते च पुनः पुनः ।
यानि नामानि दिव्यानि तानि चाचक्ष्व केशव ॥ १ ॥
१) अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले कीं,
हे केशवा मनुष्य वारंवार एक हजार नावांचा जप कां करतो? त्यापैकी जी पुण्यवान नावे आहेत ती मला सांगा.
श्रीभगवानुवाच
मत्स्यं कूर्मं वराहं च वामनं च जनार्दनम् ।
गोविन्दं पुण्डरीकाक्षं माधवं मधुसूदनम् ॥ २ ॥
पद्मनाभं सहस्राक्षं वनमालिं हलायुधम् ।
गोवर्धनं हृषीकेशं वैकुण्ठं पुरुषोत्तमम् ॥ ३ ॥
विश्र्वरुपं वासुदेवं रामं नारायणं हरिम् ।
दामोदरं श्रीधरं च वेदाङ्गं गरुडध्वजम् ॥ ४ ॥
अनन्तं कृष्णगोपालं जपतो नास्ति पातकम् ।
गवां कोटिप्रदानस्य अश्र्वमेधशतस्य च ॥ ५ ॥
कन्यादानसहस्राणां फलं प्रापोन्ति मानवः ।
अमायां वा पौर्णमास्यामेकादश्यां तथैव च ॥ ६ ॥
सन्ध्याकाले स्मरेन्ननित्यं प्रातःकाले तथैव च ।
मध्याह्ने च जपन्नित्यं सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ७ ॥
२ ते ७) श्रीभगवान म्हणाले,
अर्जुना, मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविन्द, पुण्डरिकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, हृषीकेश, वैकुण्ठ, पुरुषोत्तम, विश्र्वरुप, वासुदेव, राम, नारायण, हरि, दामोदर, श्रीधर, वेदाङ्ग, गरुडध्वज, अनन्त आणि कृष्णगोपाल या नावांचा जप करणार्या माणसाच्या पापांचा नाश होतो. त्याला एक कोटी गोदान केल्याचे, शंभर अश्र्वमेध यज्ञ केल्याचे आणि एक हजार कन्यादान केल्याचे फळ मिळते. अमावास्या, पौर्णिमा तसेच एकादशीला आणि प्रत्येक दिवशी सायंकाळीं, प्रातःकाळी व मध्याह्न काळी या नावांचा जप करणार्या माणसाच्या सर्व पापांचा नाश होतो.