Tuesday, December 31, 2019

Kahani Somavatichi कहाणी सोमवतीची


Kahani Somavatichi 
Kahani Somavatichi is in Marathi. It describes the importance of Somavati Amavasya Vrata. It is to be performe by Ladies to have a lnng everlasting Soubhagya. On the day of Somwar when there falls Amavasya, ladies getup early in the morning. Take a bath and Go to the Pimpal Tree. prays and perform pooja of God Vishnu. Then make 108 pradakshinas of that Pimpal Tree. Call a Brahman and a married Lady for meal in her house on that day. Offer them many valuable things and dakshina. They keep Mouna Vrata on the day. All the wishes get fulfilled and long and ever lasting married life is assured.
कहाणी सोमवतीची
आटपाट नगर होते. तेथे एक गरिब ब्राह्मण राहात होता. त्याला एक मुलगी व सात मुलगे होते. त्याच्या पत्नीचे नांव धनवंती तर मुलीचे नांव गुणवंती असे होते. त्याच्या घरी एका परंपरेप्रमाणे आलेल्या ब्राह्मणाची पूजाकरुन सगळ्यांनी त्याला भिक्षा घालण्यालून नमस्कार करण्याची प्रथा होती. 
एके दिवशी सूर्यदेवासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगल्यांनी त्याची पूजा केली. सातही सुनांनी त्याला भिक्षा घातली. नमस्कार केला. ब्राह्मणाने त्यांना आशिर्वाद दिला. संपत्ती वाढो, संतती वाढो, तुमचे सौभाग्य अक्षयी राहो. धनवंतीने आपल्या मुलीलाही सांगितले की, तू भिक्षा घाल. गुणवंतीने त्या ब्राह्मणाला भिक्षा घातली. नमस्कार केला. त्याने तिला आशिर्वाद दिला, धर्मिणी हो. गुणवंतीने आईला सांगितले की, त्या ब्राह्मणाने वहिनींना जसा आशिर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली चल पाहू, तू परत भिक्षा घाल. मुलीने परत भिक्षा घातली. नमस्कार केला. ब्राह्मणाने आशिर्वाद दिला. धर्मिणी हो ! तेव्हां  धनवंतीने विचारले हीला असा आशिर्वाद कां दिला ? ब्राह्मण म्हणाला हिला लग्नांत वैधव्य येणार आहे. 
धनवंतीने ब्राह्मणाचे पाय धरले व म्हणाली जो " अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. " माझ्या एकुलत्या एक मुलीचे असे होऊ नये, म्हणून कांही उपाय सांगा.    
ब्राह्मणाला तीची दया आली. तो म्हणाला बाई तुम्ही रडू नका. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. साता समुद्रा पलीकडे एका बेटावर सोमा नावाची एक परटीण तीच्या कुटुंबासह राहते. तिला तुमच्या मुलीच्या लग्नाला बोलवा. म्हणजे तुमच्या मुलीवर येऊ पहाणार वैधव्य टळेल. लग्न झाला की सोमाची चांगली बोळवण करा.
धनवंतीने ही गोष्ट आपल्या नवर्‍याला सांगितली. कोणीतरी सोमा परटीणाला जाऊन आणल पाहिजे. त्याने आपल्या सातही मुला बोलावले व सांगितले की, बहीणीच्या सौभाग्यासाठी साता  समुद्रापलीकडे जाऊन सोमा परटीणीला घेऊन यायला कोण तयार आहे. परंतु सातही मुलांपैकी कोणीही तयार झाला नाही. ते म्हणु लागले की, तुमची माया गुणवंतीवर- आपल्या मुलीवरच आहे आमच्यावर नाही.. झाले धनवंतीला वाईट वाटले व ती रडू लागली. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, तू कांही काळजी करु नकोस व रडू नकोस.न  मी गुणवंतीबरोबर जाऊन सोमा परटीणीला घेऊन येतो. आपल्याला मुलगे असून आपण निपुत्रिकच आहोत.
सर्वांत धाकट्या मुलास वाईट वाटले. तो म्हणाला बाबा आपण असे म्हणू नका. मी सोमाला आणायला जातो. असे बोलून तो गुणवंतीबरोबर आई-वडिलांना नमस्कार करुन गुणवंतीबरोबर निघाला. 
जाता जाता समुद्र आला. वार्‍याचा सोसाटा चालू झाला. समुद्रावर मोठ मोठ्या लाटा उसळू लागल्या. पलीकडे कसे जावे समजेना. जवळ कांही खायला नाही, प्यायला नाही. सारे त्रिभुवन दिसू लागले. भगवंताचे स्मरण केले, देवा, देवा आता तूच या संकटांतून सोडव. असा देवाचा धावा केला. तिथे एक वडाचे झाड होते. त्याच्याखाली जाऊन दोघे बसली. सारा दिवस उपवास घडला. त्या झाडावर गृद्ध पक्षांचे एक घरटे होते. त्या घरट्यांत त्यांची पिल्ले होती. संध्याकाळी गृद्ध पक्षी घरी आले. पिलांना चारा देऊ लागले. पिल्ले कांही चारा खाईनात. त्यांनी आपल्या आई-बापाला सांगितले. आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत. ते झाडाखाली उपाशी बसले आहेत. त्यांना टाकून आम्ही चारा खाणाार नाही. गृद्धपक्षी झाडावरुन खाली आले. ते ब्राह्मणाला विचारु लागले. तुम्ही दोघे असे काळजींत कां आहात ? तुमच काय काम असेल ते आम्हाला सांगा. आम्ही ते करु. उपाशी राहू नका. आम्ही कांही फळे देतो. ती खा. ब्राह्मणाला आनंद झाला. त्याने देवाचे आभार मानले. त्या गृद्धपक्ष्यांना त्याने त्यांचा हेतु सांगितला. पक्षी म्हणाले तुम्ही काळजी करु नका. उद्या उजाडल्यावर आम्ही तुम्हाला घेऊन जातो. सोमा परटीणीच्या घरी नेऊन सोडतो. मग बहिण-भावानेग फळे खाल्ली व झाडाखाली झोपी गेली.
उजाडल्यावर पक्षी आले. बहिण-भावाला पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडले. मग ते निघून गेले. बहिण-भावाने एकमेकांशी काही ठरवले. रोज पःहाटे ते उठू लागले, सोमा परटिणीचे अंगण झाडू लागले, शेण आणून अंगण सारवू लागले, असे करता करता बरेच दिवस होऊन गेले. एके दिवशी सोमापरटिणीने आपल्या मुलांना व सुनेला विचारले, रोज सकाळी उठून अंगण झाडून कोण सारवून ठेवते. ते म्हणाले आम्ही नाही. 
मग सोमाने दुसर्‍या दिवशी रात्री पहारा केला. तेव्हा चौथ्या प्रहरी ब्राह्मणची मुलगी व मुलगा अंगण झाडतांना व सारवतांना दिसले. सोमाने त्यांना जवळ बोलावले व विचारले की तुम्ही कोण आहात व हे कां करत आहात? त्यांनी तीला सर्व हकिगत सांगितली. तेव्हा सोमा म्हणाली तुम्हा ब्राह्मणांकडून परटांनी सेवा घ्यावी हे पाप आहे. तेव्हा मुलाने सांगितले की या माझ्या बहिणीच्या लग्नास तुम्ही यावे म्हणून आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहोत. तुम्ही लग्नास आलात तर हिचे वैधव्य टळेल. तेव्हा सोमा म्हणाली चला मी येते. घरांत जाऊन मुला-सुनांना सांगितले मी या मुलीच्या लग्नास जात आहे. लग्न झाल्यावर येईन. तोपर्यंत आपल्या घरांत किंवा सोयर्‍यांच्या घरी कोणी मेल तरी त्याच दहन करुं नका. असे सांगून ती गेली. समुद्राच्या पलीकडे मुलगा व मुलीला पार करविले. स्वतः आकाशमार्गाने समुद्र पार करुन आली. ब्राह्मणाच्या घरी ते सर्व पोहोचले. ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला सोमा परटीण लग्नास आली म्हणून फार आनंद झाला. मग भावांनी बहिणीला योग्य असा नवरा शोधला मोठ्या आनंदांत लग्न झाले. अचानक नवरा धाडकन मंडपांतच पडला. दुःखाची अवकळा सगळीकडे पसरली. तेव्हा सोमा परटीणीने नवर्‍या मुलीजवळ येऊन सांगितले. मुली घाबरु नकोस मी तुला माझे सोमवतीचे पुण्य देते तुझा नवरा जिवंत होऊल. मग सोमाने हाती उदक घेऊन संकल्प करुन आपले पुण्य गुणवंतीस (नवर्‍या मुलीस) दिले. तसा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. 
मग दोन दिवसांनी सोमा परटीण घरी निघाली. सर्वांनी मोठ्या थाटाने तिची बोळवण केली. इकडे सोमाच्या घरी काय घडले होते? अगोदर तिचा मुलगा मरण पावला होता. नंतर नवरा मरण पावला. मग जावईसुद्धा मेला. सोमा आपल्या घराची वाट चालतच होती. मार्गावर एके दिवशी सोमवती अंवस पडली. त्या दिवशी एक म्हातारी तिला भेटली. तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता. ती सोमाला म्हणाली एवढा भारा खाली उतर. आपण दोघी बरोबर जाऊं. सोमा म्हणाली आज सोमवती अवंस आहे. मला नेम आहे. धर्म आहे. मला कापसाला शिवायचे नाही. पुढे जाता जाता ती एका नदीच्या काठी आली. तिथे पिंपळाचे झाड दिसले. तीने नदीवर स्नान केले. श्रीविष्णूची पूजा केली. तिच्याजवळ काही नव्हते म्हणून एकशे आठ वाळूचे खडे घेतले व पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या. या एवढ्या पुण्याने काय झाले? सोमा परटीणीच्या घरी मरण पावलेले, तिचा मुलगा, नवरा व जावई जिवंत झाले. 
मग सोमा परटीण मजल दर मजल करत घरी पोहोचली. घरी आल्यावर तिच्या सुनांनी तिला संगितले सासुबाई, सासुबाई तुम्ही लग्नाला गेल्यानंतर घरांतील सर्व मेले होते. त्यांना आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसेच ठेवले होते. तुमची वाट बघत बसलो होतो. आता तुम्ही येण्या अगोदरच सर्व जिवंत झाले. हा चमत्कार कशाने झाला? मी माझे सोमवतीचे पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिले, तिचा नवरा जिवंत झाला. माझे सर्व पुण्य संपले म्हणुन इथे माझ्या घरी असे अशुभ घडले. मी येत असतांना मला सोमवती अवंस पडली, मी परत व्रत केले. कापसाला शिवले नाही. मुळ्याला शिवले नाही. नदीवर अंघोळ करुन श्रीविष्णुची पूजा केली आणि पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या. या व्रताच्या पुण्याने माझी मेलेली माणसे परत जिवंत झाली. तुम्हीही ह्या व्ताचे आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य येणार नाही. संतत संपत अक्षयी राहील. 

तेव्हां सुनांनी विचारले, हे व्रत कसे करावे ? तशी सोमा म्हणाली, सोमवती अवसेला सकाळी लवकर उठावे. स्नान करावे. मुक्याने म्हणजे कांही न बोलता वस्त्र नेसावे. पिंपळाच्या पारावर जावे. श्रीविष्णुची पूजा करावी. श्रीमंतांनी हिरे, माणके घ्यावी, पोवळी घ्यावी, सोन्या-रुप्याची भांडी घ्यावी, गरीबांनी आपल्या ऐपतीप्रमाणे सर्व घ्यावे. चांगली पुष्पे, फळे घ्यावी. हे सर्व एकशे आठ घ्यावे. तितक्याच प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात. आपण घेतलेले सर्व ब्राह्मणाला दान द्यावे. सवाष्ण-ब्राह्मण जेवू घालावे. आपण मुक्याने जेवावे. असे व्रत केल्यास वैधव्य येत नाही.इच्छित  फळ मिळते. संतत संपत्ती वाढते. तशीच आपलीही वाढो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.



Custom Search

Saturday, December 28, 2019

Rudrashtak Stotra, रुद्राष्टक स्तोत्र


Rudrashtak Stotra 
Rudrashtak Stotra is in Sanskrit. It is recited at the time of performing God Shiva’s Pooja. This stotra is in 8 stanzas. It is very devotional and praise of God Shiva. 
रुद्राष्टक स्तोत्र 
नमामीशमीशान निर्वाणरुपं । 
विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरुपं ।
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं । 
चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् ॥ १ ॥
निराकमोंकारमूलं तुरीयं । 
गिराग्यानगोतीतमीशं गिरीशं । 
करालं महाकाल कालं कृपालं । 
गुणागार संसारपारं नतोऽहम् ॥ २ ॥
तुषाराद्रिसंकाशगौरं गभीरं । 
मनोभूत कोटिप्रभा श्रीशरीरं ।
स्फुरन्मौलिकल्लोलिनी न्यासगंगा । 
लसद्वालबालेन्दु कंठंभुजगं ॥ ३ ॥
चलत्कुण्डलंभु सुनेत्रं विशालं । 
प्रसन्नाननं नीलकंठं दयालं ।
मृगाधीश चर्माम्बरं मुण्डमालं । 
प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि ॥ ४ ॥
प्रचंडं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं । 
अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशं ।
त्रयःशूल निर्मूलनं शूलपाणिं । 
भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् ॥ ५ ॥    
कलातीत कल्याण कल्पान्तकारी । 
सदासज्जनानंददाता पुरारी ।
चिदानंदसंदोह मोहपहारी । 
प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी ॥ ६ ॥ 
न यावद् उमानाथ पादारविंदं । 
भजंतीहलोके परेवानराणां ।
न तावत्सुखंशान्तिसंतापनाशं । 
प्रसीद प्रभो सर्वभूतादि वासम् ॥ ७ ॥
न जानामि योगं जपं नैव पूजां । 
नतोऽहं सदासर्वदा शंभु तुभ्यम् ।
जराजन्मदुःखौघ तातप्यमानं । 
प्रभो पाहि आपन्नमामीश शंभो ॥ ८ ॥  
रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये ।
ये पठंति नरा भक्त्या तेषां शंभुः प्रसीदति ॥ 
ॐ नमः शिवाय । 
Rudrashtak Stotra, 
रुद्राष्टक स्तोत्र 



Custom Search

Tuesday, December 10, 2019

Kahani Somwarchi कहाणी सोमवारची खुलभर दुधाची


Kahani Somwarchi 
This is a story of Somwar(Monday), which belogs to God Shiva. This is all about the Love of God Shiva kids,animals and hole community.
कहाणी सोमवारची खुलभर दुधाची
ऐका परमेश्र्वरा, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनांत आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा,असे होते. पण हे घडावे कसे. अशी त्याला काळजी वाटत असे. प्रधानाने राजाला युक्ती सांगितली.व गावांत राजाच्या अनुद्येने दंवडी पिटली, की, गावांतील सर्वांनी आपल्या घरचे सर्व दुध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या मंदिरांत पूजेस यावे. 
सर्व गावकर्‍यांना मोठा धाक पडला. ते घाबरुन गेले. सोमवारी घरांतील लहान मुलांनाही दूध दिले नाही. चासरांनाही दूध पिऊ दिले नाही. घरांतील सर्व दूध महादेवाच्या मंदिरी नेले. गावांतील सर्व दूध देवाच्या गाभार्‍यांत पडले तरी गाभारा भरला नाही. 
गावांत एक म्हातारी बाई होती. तिने आपल्या घरांतील सर्व कामकाज आटोपले. मुलाबाळांना खाऊ घातले. लेकी-सुनांना न्हाऊ घातले. गाई-वासरांना चारा दिला. त्यांचा आत्मा तृप्त केला. आपल्या जीवाच सार्थक व्हावे म्हणून गंध-फूल घेतले, चार तांदळाचे दाणे घेतले, दोन बेलाची पानें घेतली आणि खुलभर दूध घेतले व महादेवाच्या देवळांत आली. मनोभावे देवाची पूजा केली, नमस्कार केला. थोडे दूध नैवेद्यास ठेवले. जय महादेवा ! नंदिकेश्र्वरा ! राजाने सर्व गावांतील दूध तुझ्या गाभार्‍यांत घातले. पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्याही खुलभर दुधाने भरणार नाही. पण मी भावभक्तीने आणलेले दूध तुला अर्पण करते. असे म्हणून शिल्लक राहिलेले दूध गाभारी अर्पण केले व माघारी फिरली. 
म्हातारी गेल्यावर देवळांत चमत्कार घडला.  देवाचा गाभारा दूधाने भरुन गेला. हे देवळांतील गुरवाने पाहीले व राजाला कळविले. पण त्यांना कांही समजेना की गाभारा कसा भरला. दुसर्‍या सोमवारी राजाने देवळांत शिपाई बसविले. याही सोमवारी गाभारा दुधाने भरला. पण कसा भरला हे कांही समजेले नाही. पुढे तिसर्‍या सोमवारी राजा स्वतः देवळांत बसला. म्हातारी पूजा करुन दूध अर्पण करुन जाऊ लागताच गाभारा दुधाने भरला. राजाने शिपायांकरवी म्हातारीस पकडले. ती घाबुन गेली. पण राजाने तीला अभयवचन दिले व गाभारा कसा भरला हे विचारले. म्हातारी म्हणाली, तुझ्या आज्ञेने काय झाले ? वासरांचे, मुलांचे आत्मे तळ[पले. त्यांना दूध मिळाले नाही. मोठ्या माणसांनीही हाय हाय केले. ते देवास आवडत नाही. म्हणून देवाचा गाभारा भरला नाही. मी मात्र घरच्या गाईना चारा, वासरांना दूध पिऊ दिले, मुलांना दूध दिले व मग उरलेले दूध घेऊन देवाची पूजा करुन त्याला अर्पण केले. हे देवाला आवडले म्हणून माझ्या खुलभर दूधाने देवाचा गाभारा भरला. 
आता पुढच्या सोमवारी गावांतील सर्व मुला-वासरांना दुध पाजून मग उरलेले दूध देवास अर्पण करण्यासाठी देवळांत आणावे अशी गावांतील लोकांना दवंडी पिटून माहीती द्यावी. म्हणजे देव आणलेल्या दूधाने संतुष्ट होईल. व गाभारा भरेल. 
राजाने त्याप्रमाणे केले.

चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली. मुलाबाळांना, गाईवासरांना दूध पाजून आलेले दूध देवाला वाहिले. हात जोडून देवची प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतो, तर काय देवाचा गाभारा दुधाने भरुन आलेला दिसला. राजाला आनंद झाला. त्याने म्हतारी मोठे इनाम दिले. लेकी-सुनांसह ती मोठ्या सुखासमाधानांत राहू लागली. तसेच तुम्ही आम्ही महादेवाच्या कृपाशर्वादाने राहू या. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.          

Custom Search

Saturday, December 7, 2019

ShriShivLilamrut Adhyay 14 श्रीशिवलिलामृत अध्याय चौदावा


ShriShivaLilamrut Adhyay 14 
ShriShivaLilamrut Adhyay 14 This Adhyay 14 Starts with the God Ganesh and Kartik Swami's Playing and quarreling and whole family enjoying the same. Goddess Parvati and God Shiva trying to involving into it and enjoying the fun. Then the story goes on when God and Goddess playing Saripat in which Goddess wins. God Shiva gets upset and went into the forest for meditation. Then Goddess starts searching God Shiva by acting as a Bhilin. Further there starts a story of Shriyal and Changuna, who were great devotees of God Shiva.
श्रीशिवलिलामृत अध्याय चौदावा
श्रीगणेशाय नमः ॥
भस्मासुरहरणा भाललोचना । भार्गववरदा भस्मलेपना ।
भक्तवत्सला भवभयहरणा । भेदातीता भूताधिपते ॥ १ ॥
भवानीवरा भक्ततारका । भोगिभूषणा भूतपालका ।
भाविकरक्षका भवभयहारका । भक्तरक्षका भवशोषणा ॥ २ ॥
त्रितापशमना त्रिदोषहारका । त्रिगुणातीता त्रिपुरांतका ।
त्रिभुवनजनका त्र्यंबका । त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या ॥ ३ ॥
तुझ्या कृपाबळें समस्त । त्रयोदश अध्यायपर्यंत ।
कथिलें शिवलीलामृत । आतां कळसाध्याय चौदावा ॥ ४ ॥
तेराव्या अध्यायीं शिवगौरीलग्न । सांगितलें स्वामीकार्तिकाचें जनन ।
यावरी शौनकादिकांलागून । सूत सांगे नैमिषारण्यीं ॥ ५ ॥
सिंहावलोकनें तत्त्वतां । परिसा गजास्यषडास्यांची कथा ।
दोघेही धाकुटे असतां । जगदंबा खेळवी प्रीतीनें ॥ ६ ॥
गजतुंड ओसंगा घेऊन । विश्र्वजननी देत स्तनपान ।
शुंडादंडेंकरुन । दुग्ध ओढीत गजास्य ॥ ७॥
अंबेच्या पृष्ठीवरी प्रीतीं । शुंडा फिरवीत गणपती ।
शुंडेंत पाय सांठवूनि षण्मुखाप्रती । बोलतसे तेधवां ॥ ८ ॥
म्हणे हें घेईं कां अमृत । ब्रह्मादिकां जें अप्राप्त ।
स्कंद बोले क्रोधयुक्त । उच्छिष्ट तुझें न घें मी ॥ ९ ॥
षडानन म्हणे चराचरजननी । लंबनासिक मजलागूनी ।
उच्छिष्ट दुग्ध देतो पाहें लोचनीं । सांग मृडानी कांहीं यातें ॥ १० ॥
शुंडेसी धरुनियां खालें । पाडूं काय ये वेळे ।
माते याचे नासिक विशाळ आगळें । कां हो ऐसें केलें तुवां ॥ ११ ॥
इंद्र चंद्र मित्र निर्जर । मूर्ति प्रसवलीस मनोहर ।
परी हा लंबनासिक कर्ण थोर । दंत एक बाहेर दिसतसे ॥ १२ ॥
ऐसा कां प्रसवलीस बाळ । ऐकतां हांसे पयःफेनधवल ।
धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ । तिसीही हास्य नाटोपे ॥ १३ ॥
स्कंद म्हणे जननी पाहीं । यासी उतरी मज स्तनपान देईं ।
मग जगदंबेनें लवलाहीं । विघ्नेशा खालीं बैसविलें ॥ १४ ॥
षण्मुख आडवा घेवोनी । स्तन जीं घाली त्याच्या वदनीं ।
पांचही मुखे आक्रंदोनी । रडों लागलीं तेधवां ॥ १५ ॥
तें देखोनि गणनाथ । पोट धरोनि गदगदां हांसत ।
म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत । हांक फोडीत आक्रोशे ॥ १६ ॥
एक स्तन घातला याचे वदनीं । आणीक पांच आणसी कोठूनी ।
ऐसें ऐकत पिनाकपाणी । काय हांसोनि बोलत ॥ १७ ॥
काय म्हणतो गजवदन । ऐसा कां प्रसवलीस नंदन ।
यावरी अपर्णा सुहास्यवदन । प्रतिउत्तर देतसे ॥ १८ ॥
म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन । तुम्ही पंचमुख हा षणमुख पूर्ण ॥ १९ ॥
यावरी षण्मुख आणि गणपती । लीलाकौतुकें दोघे क्रीडती ।
विनोदें कलह करिती । अंतरीं प्रीती अखंड ॥ २० ॥
दोघेही तडतां ऐकोनी । धांवोनि आली जगत्त्रयजननी ।
वक्रतुंडासी हृदयीं धरोनी । म्हणे बाळका काय झालें ॥ २१ ॥
तंव तो म्हणे स्कंदें येवोन । अंबे धरिले माझे कर्ण ।
बोलिला एक कठिण वचन । तुझें नयन सान कां रे ॥ २२ ॥
जगदंबा  मग हांसोन । अग्निसंभूताप्रति बोले वचन ।
गजवदनासी कठीण भाषण । ऐसें कैसें बोललासी ॥ २३ ॥
स्कंद म्हणे तर्जनी उचलोन । येणें मोजिले माझें द्वादश नयन ।
यावरी हैमवती हांसोन । एकदंताप्रति बोलत ॥ २४ ॥
म्हणे हें तुवा अनुचित केलें । कुमाराचे नयन कां मोजिले ।
यावरी गजानन बोले । ऐक माते अन्याय याचा ॥ २५ ॥
माझी शुंडा लंबायमान । येणें मोजिली चवंगे घालून ।
अन्याय हा थोर त्रिभुवनाहून । करी ताडण अंबे यासी ॥ २६ ॥
यावरी स्वामी कार्तिक बोलत । अंबे येणें माझे मोजिले हस्त ।
यावरी करिमुख बोलत । मैनाकभगिनी ऐक पां ॥ २७ ॥
याचा अन्याय एक सांगेन । ऐकतां तूं यासी करिसील ताडण ।
नगात्मजा आणि त्रिलोचन । सावधान होऊन ऐकती ॥ २८ ॥
इभमुख म्हणे भेडसावून । मज बोलिला हा न साहवे वचन ।
तुझें पोट कां थोर पूर्ण । मोदक बहू भक्षिले ॥ २९ ॥
ऐसें ऐकतां मृडानी । दोघांसी हृदयीं धरी प्रीतीकरुनी ।
दोघांसी प्रियवस्तु देऊनी । समजाविलें तेधवां ॥ ३० ॥
यावरी मदनांतक पाहे । सिंहासनीं बैसला आनंदमय ।
जगदंबा मुखाकडे पाहे । हास्यवदन करुनियां ॥ ३१ ॥
यावरी विरुपाक्ष बोलत । कां हो हास्य आलें अकस्मात ।
यावरी त्रैलोक्यमाता म्हणत । नवल एक दिसतसे ॥ ३२ ॥
तुमच्या जटामुकुटांत । ललनाकृति काय दिसत ।
तुमची करणीं अद्भुत । पद्मजबिडौजां समजेना ॥ ३३ ॥                
कैलासपति म्हणे इभगमने । हरिमध्ये मृगशावकनयने ।
मस्तकीं जळ धरिलें वरानने । बिंबाधरे पिकस्वरे ॥ ३४ ॥
यावरी चातुर्यसरोवरमराळी । हेरंबजननी म्हणे कपाळमाळी । 
जळांतरीं स्रीचे वदन ये वेळीं । दिसतें मज भालनेत्रा ॥ ३५ ॥
यावरी बोले कैलासराज । विद्रुमाधरे मुख नव्हे तें वारिज ।
शोभायमान सतेज । टवटवीत दिसतसे ॥ ३६ ॥
यावरी सजलजलदवर्णा । स्कंदमाता म्हणे पंचदशनयना । 
कुरळेकेश व्याघ्रचर्मवसना । कृष्णवर्ण दिसताती ॥ ३७ ॥
यावरी बोले पंचवदन । कमळें मिलिंद घे सुगंध बैसोन ।
नसतेंचि पुससी छंद घेवोन । रमारमणसहोदरी ॥ ३८ ॥
यावरी बोले भुजंगत्रिवेणी । कमळासी भोंवया कां खट्वांगपाणी ।
तुमच्या मायेची विचित्र करणी । आम्नाय श्रुती नेणती ॥ ३९ ॥
यावरी बोलेहिमनग जामात । भृकुट्या नव्हे पाहें त्वरित ।
सलिललहरी तळपत । दृष्टि तरळली तुझी कां हो ॥ ४० ॥
यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी । बोले कंबुकंठीं कमंडलुस्तनीं ।
म्हणे कैरवासम नेत्र पिनाकपाणी । कां हो दिसती आकर्ण ते ॥ ४१ ॥
यावरी शफरीध्वजदहन बोलत । कमळाभोंवते नीर बहुत ।
नेत्र नव्हेत मीन तळपत । हंसगमने निरखीं बरें ॥ ४२ ॥
जे अनंतगुण परिपूर्ण वेल्हाळ । त्रिपुरहरसुंदरीं बोले प्रेमळ ।
म्हणे राजीवा स्तनयुगुळ । कमंडलुऐसे दिसती कां ॥ ४३ ॥
यावरी बोले त्रिशूळपाणी । ऐकें वसुधाधरनंदिनी ।
स्तन नव्हेती दोन्ही । विलोकोनि पाहें बरें ॥ ४४ ॥
गंगार्‍हदाचे दोन्हीं तीरीं । चक्रवाकें बैसलीं साजिरीं । 
दुर्गा म्हणे मदनारी । बहुत साहित्य पुरवीतसां ॥ ४५ ॥
एकाचें अनेक करुन । दाविलें हें त्रिभुवन ।
तुमचे मौनेंचि धरावे चरण । बोलतां अप्रमाण न म्हणावें ॥ ४६ ॥
मग मांडूनियां सारिपाट । खेळती दाक्षायणी नीळकंठ ।
ज्यांचे खेळ ऐकतां वरिष्ठ । भक्त होती त्रिजगतीं ॥ ४७ ॥
दोघें खेळतां आनंदघन । तों आला कमलोद्भव नंदन ।
ब्रह्मवीणा वाजवून । करी स्तवन अपार ॥ ४८ ॥
मग क्षण एक स्वस्थ होऊनी । खेळ विलोकी नारदमुनी ।
म्हणे पण केल्यावांचूनी । रंग न ये खेळातें ॥ ४९ ॥
दोघांसी मानलें तें बहुत । मग पण करुनियां खेळत ।
जिंकील त्यासी एक वस्त । आपुली द्यावी निर्धार हा ॥ ५० ॥
तों प्रथम डाव तेचि क्षणीं । जिंकिती झाली मेनकानंदिनी ।
व्याघ्रांबर घेतलें हिरोनी । नारदमुनि हांसतसे ॥ ५१ ॥
दुजाही डाव जिंकितां भवानी । घेतलें गजचर्म हिरोनी ।
एकामागें एक तेचि क्षणीं । दहाही आयुधें घेतलीं ॥ ५२ ॥
जो तो डाव जिंकी भवानी । सर्व भूषणें घेतलीं  हिरोनी ।
शेवटीं कौपीनही सांडोनी । शंकर झाला दिगंबर ॥ ५३ ॥
सुरभिपुत्र जिंकिला । तोही देवीनें आपुला केला ।
नारद गदगदां हांसिन्नला । काय बोलिला शिवासी ॥ ५४ ॥
म्हणे स्रीने जिंकिलें पण करुन । गेला तुझ्या महिमा पूर्ण ।
सृष्टि अवघी मायाधीन । तूं निर्गुण निर्विकार ॥ ५५ ॥
चराचर आहे मायाधीन । तुज इणें दिधलें सगुणपण ।
येरवीं तूं अव्यक्त पूर्ण । तुज कोण पुसत होतें ॥ ५६ ॥
एवं तूं मायाधीन झालासी पूर्ण । आतां भक्तांसी कैसे दाविसी वदन ।
ऐसें ऐकतां भाललोचन । गेला रुसून घोर वन ॥ ५७ ॥
इतुकें कृत्य करुन । गेला तेथूनि ब्रह्मानंदन ।
शंकरें सर्वसंग टाकून । निरंजनीं वास केला ॥ ५८ ॥
शोधितां न पडे कोणासी ठायीं । योगी ध्याती सर्वदा हृदयीं ।
न कळे मूळाग्र कोठें कांहीं । जाति कुळ नसेचि ॥ ५९ ॥
नामरुपगुणातीत । गोत्र वर्ण आश्रम विरहित ।
चहूं देहांसी अतीत । कोणा अंत न कळेचि ॥ ६० ॥
असो जगदंबा सख्या घेऊनियां । वनासी चालिली शोधावया ।
गिरिकंदरीं मठ गुहा शोधूनियां । भागली बहुत जगदंबा ॥ ६१ ॥
सर्वही तीर्थें शोधिलीं सवेग । बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग ।
जो शोधितां अष्टांगयोग । योगियां ठायीं पडे ना ॥ ६२ ॥
पंचाग्निसाधन धूम्रपान । जटाधारी नग्न मौन ।
एकीं सदा झांकिले नयन । एक गगन विलोकिती ॥ ६३ ॥
एक उभेचि निरंतर । एक घेती वायूचा आहार । 
त्यांसही पुसतां श्रीशंकर । कोठें आहे न बोलती ॥ ६४ ॥
एक करिती सदा यज्ञ । एक करिती हिंसा बलिदान ।
परी तेही धुरें डोळें भरुन । कष्टी होती सर्वदा ॥ ६५ ॥
एक चौसष्ट कळा दाविती । एक चौदा विद्या मिरविती ।
एक वादविवााद निगुती । करितां बहुत भागले ॥ ६६ ॥
एक सांगती पुराण । एक नाचती उड्या घेऊन ।
लोकांसी सांगती उपदेशज्ञान । परी उमारमण दुरावला ॥ ६७ ॥
एक नाशिती कुश मृत्तिका उदक । म्हणती आम्ही इतुकेनि पावन देख ।
त्यांसही पुसतां कैलासनायक । न पडे ठायीं तत्त्वतां ॥ ६८ ॥
जे आदिमाया विश्र्वजननी । अनंतशक्तींची स्वामिनी ।
ते श्रमली नाना साधनीं । इतरांची कहाणी काय तेथें ॥ ६९ ॥
ठायीं पडावया शिवस्वरुप । क्षिराब्धिजापति करी तप ।
मधवा द्रुहिण करिती साक्षेप । निशिदिनीं याचिलागीं ॥ ७० ॥
ऋग्वेद स्थापितकर्म । यजुर्वेद बोले ज्ञान निःसीम ।
उपासनामार्ग उत्तम । अथर्वण स्थापितसे ॥ ७१ ॥
सामवेद सांगे गायन । न्यायशास्त्रीं भेद गहन ।
म्हणती ईश्र्वर समर्थ जीव सान । त्यांचे पद न पावती ते ॥ ७२ ॥
मीमांसक स्थापिती कर्ममार्ग । सांख्य प्रकृतिपुरुषविभाग ।
पातंजली सांगती योग । शब्दविभाग व्याकरणी ॥ ७३ ॥
सर्व निरसुनि उरलें उत्तम । वेदांती म्हणती तेंचि ब्रह्म ।
तो शिव ब्रह्मानंद परम । वेदशास्त्रां अगम्य जो ॥ ७४ ॥
त्या शिवाचें नाम घेवोनी । जगदंबा वाहे घोर वनीं ।
सकळ अभिमान टाकूनी । वल्लभा मी शरण तूतें ॥ ७५ ॥
सकळ तत्त्वें शोधितां साचार । शेवटीं होय साक्षात्कार ।
तैसा हिमाचळीं त्रिपुरहर । विलोकिला जगदंबेनें ॥ ७६ ॥
तो स्वात्ममुखीं झाला तल्लीन । झांकिले असती पंचदश नयन ।
देवी म्हणे श्र्वशुरगृहीं येऊन । रहिवास केला असे ॥ ७७ ॥
अपर्णा मनीं विचारी । याचि रुपें जवळी जाऊं जरी ।
तरी मजवरी ये अवसरीं । क्रोधायमान होईल ॥ ७८ ॥
मग भिल्लीचा वेष धरुन । मयुरपिच्छांचे केलें वसन ।
अनुपम वेष धरुन । मुरहरभगिनी चालिली ॥ ७९ ॥
अनंतकमळभवांडमाळा । त्रिभुवनसुंदरी गुंफी हेळा ।
तिनें स्मरहर मोहिला । नृत्यगायनकरुनियां ॥ ८० ॥
अनंत शक्ती भोंवत्या विराजती । विमानीं अष्टनायिका तन्मय होती ।
किन्नर गंधर्व आश्र्चर्य करिती । गायनरीती ऐकूनियां ॥ ८१ ॥
वैरभाव वनचरें विसरती । आहार त्यजिला तन्मय होती ।
नद्यांचे जलप्रवाह खुंटती । पक्षी विसरती देहभाव ॥ ८२ ॥
निश्र्चळ झाला पवन । विधुकुरंग गेला वेधोन ।
कुंभिनीभार सांडोन । फणिपति वरी येऊं पाहे ॥ ८३ ॥
आंगींचा सुटला दिव्य आमोद । देव पाहती होवोनि षट्पद ।
नृत्य करितां भाव विविध । दावी नाना प्रकारींचे ॥ ८४ ॥
शीतलत्व दाहकत्व सांडून । वाटे ताटंक झाले विधुचंडकिरण ।
देवललना म्हणती ओंवाळून । इजवरुन जावें समस्तीं ॥ ८५ ॥
आदिजननीचें अपार लाघव । नेणती शक्रादि कमलोद्भव ।
दिव्य हिरेखाणींचें वैभव । दंततेजें झांकिलें ॥ ८६ ॥
दंतपंक्तींचा झळकतां रंग । खडे ते हिरे होती सुरंग ।
तनूचा सुगंध अभंग । नभ भेदूनि वरी जाय ॥ ८७ ॥
पदमुद्रा जेथें उमटत । सुवासकमळें तेथें उगवत ।
जेथींच्या परागासी वेधोनि वसंत। प्रदक्षिणा करी प्रीतीनें ॥ ८८ ॥
अनंतविद्युल्लता कल्लोळ । तैसें स्वरुपतेज निर्मळ ।
नेत्र उघडोनि जाश्र्वनीळ । पाहता झाला तेधवां ॥ ८९ ॥
पायीं पैंजण नूपुरें रुणझुणती । त्यांतक्षुद्रघंटा रसाळ गर्जती ।
करींची कंकणें झणत्कारती । नृत्यगतीसरसींच ॥ ९० ॥
भ्रूलताचाप चढवूनी । कामशत्रु विंधिला नयनकटाक्षबाणीं ।
मनकुरंग पाडिला धरणीं । सुरवरां करणी न कळेचि ॥ ९१ ॥
दिव्य स्वरुप विलोकितां पूर्ण । पंचबाणें व्यापिला पंचवदन ।
तप ध्यान विसरुन । वृत्तांत पुसे तियेतें ॥ ९२ ॥
म्हणे तूं नारी कोठील कोण । कामानळ शांतवीं वर्षोनि घन ।
तुझें स्वरुपलावण्य । त्रिभुवनांत ऐसें दुजें नाहीं ॥ ९३ ॥
तुझा वदनइंदु विलोकून । चकोर झाले माझे नयन ।
आतां वरीं मजलागून । तुजअधीन मी झालों ॥ ९४ ॥
यावरी बोले भिल्लिणी । उमेऐसी ललना टाकूनी ।
कां बैसलासी घोर वनीं । कैलासभुवन त्यजोनियां ॥ ९५ ॥
मी तो परनारी निश्र्चित । न वरीं न घडे कदा सुरत । 
तुवां मन जिंकिलें नाहीं यथार्थ । तरी तपस्वी कैसा तूं ॥ ९६ ॥
यावरी बोले पिनाकपाणी । मी दुर्गेवरी आलों रुसोनी ।
तिचें मुख न पाहें परतोनी । नाम स्वप्नीं न घेंचि ॥ ९७ ॥
यावरी भिल्लिणी बोलत। पति माझा रागिष्ट अत्यंत ।
हें त्रिभुवन जाळील क्षणांत । अणुमात्र गोष्ट कळताचि ॥ ९८ ॥
यावरी बोले जगन्नाथ । ती बहुकाळाची कठिण अत्यंत ।
दक्षयागीं उडी घालीत । क्रोध अद्भुत तियेचा ॥ ९९ ॥
पुढें गेली पर्वताचे पोटी । मागुती तिसी वरीं मी धूर्जटी ।
परी ती कौटाळीण मोठी । अतिकपटी मी जाणे ॥ १०० ॥
भिल्लिणी म्हणे ऐकिलें कानीं । तूं कपटीं आहेस तिजहूनी ।
शिरीं ठेविली स्वर्धुनी । भोळी भवानी अत्यंत ॥ १०१ ॥
दुर्गेऐसी पट्टराणी । टाकूनि कां हिंडसी वनीं ।
परललना देखोनि नयनीं । गळां येवोनि पडो पाहसी ॥ १०२ ॥
मागुती बोले कैलासनाथ । क्षणांत सृष्टी घडामोड करीत ।
शुंभनिशुंभादि दैत्य । युद्ध करुनि मर्दिले तिणे ॥ १०३ ॥ 
ती जरी येथें आली धांवोन । उदंड प्रार्थना केली पूर्ण ।
तरी मी नव जाय परतोन । कैलासासी निश्र्चयें ॥ १०४ ॥
तिसीं न करी संभाषण । तूंचि वरीं मी झालों तुजआधीन ।
जिकडे नेशील तिकडे येईन । वचनाधीन तुझ्या मी ॥ १०५ ॥
यावरी बोले गोरटी । भवानी बैसली तुझ्या पाठीं ।
दोन वेळां वरिला धूर्जटी । तिची गति हे केली ॥ १०६ ॥
मग माझा पाड काय तुज । केव्हां टाकोनि जाशील न कळे मज ।
द्यूतीं पण खेळतां सहज । तुझें त्वांचि हारविलें ॥ १०७ ॥
न बोलेचि मदनदहन । भिल्लिणी मागुती करी नृत्य गायन ।
मग उठिला पंचदशनयन । तिसी आलिंगन द्यावया ॥ १०८ ॥
अंबा चालिली सत्वर । दीर्घशब्दें बोले त्रिपुरहर ।
मुखशशी दावीं सुंदर । भाक घेईं पैं माझी ॥ १०९ ॥
तूं मज माळ घालीं येऊन । मी न जाय तुज टाकोन ।
मग जगदंबा बोले हांसोन । यावें भुवना माझिया ॥ ११० ॥
मग मी तुमची होईन कामिनी । अवश्य बोले खट्वांगपाणी ।
मदनांतक वेधोनी । कैलासासी नेला तेधवां ॥ १११ ॥
सिंहासनीं बैसवून । षोडशोपचारें केलें पूजन ।
देवीनें दृढ धरिले चरण । कंठीं माळ घातली ॥ ११२ ॥
देवी आपुलें स्वरुप प्रगट करी । तटस्थ पाहे त्रिपुरारी ।
मग हांसती परस्परीं । एकमेकां पाहोनी ॥ ११३ ॥
शिव म्हणे धन्य भवानी । त्वांचि आणिलें मज समजावोनी ।
सूत शौनकादिकांलागोनी । कथा सांगे विचित्र ॥ ११४ ॥
करीं वीणा घेऊनि ब्रह्मसुत । शिवाजवळी आला अकस्मात ।
म्हणे हे विश्र्वंभरा विश्र्वनाथा । तुझे भक्त देखिले बहू ॥ ११५ ॥
परी कांतिनगरीं श्रियाळ । धीर गंभीर उदार सुशीळ ।
कीर्तीनें भरलें दिग्मंडळ । सात्त्विक केवळ क्षमावंत ॥ ११६ ॥
तेणें घातलें अन्नसत्र । झालीं वर्षें दहा सहस्र । 
इच्छाभोजन दान पवित्र । अतीतांप्रति देतसे ॥ ११७ ॥
अवनीं जे अगम्य वस्त । भोजनीं मागीतली अकस्मात ।
ती प्रयत्नें आणोनि परवीत । शिवभक्त थोर तो ॥ ११८ ॥
ऐसे नारद सांगतां वर्तमान । त्याच्या गृहाप्रति पंचवदन ।
कुश्र्चळ अतीतवेषे धरुन । येता झाला ते समयीं ॥ ११९ ॥
आंगणीं उभा ठाकला येऊन । परम कोपी जेवीं दावाग्न ।
दुष्ट वचन बोले कठिण । रुपही संपूर्ण कुश्र्चळचि ॥ १२० ॥
म्हणे मज देईं इच्छाभोजन । नातरी जातों सत्त्व घेवोन ।
श्रियाळ चांगुणा येवोन । पाय धरिती सद्भावें ॥ १२१ ॥
आणोनि बैसविला आसनीं । त्याचीं क्रोद्धवचनें सोसूनी ।
षोडशोपचारें पूजा करोनी । कर जोडोनि ठाकती पुढें ॥ १२२ ॥
मागा स्वामी इच्छाभोजन । येरु म्हणे नरमांस देईं आणोन । 
तूं चोर हेर आणिसी धरुन । त्याचें मांस न घें मी ॥ १२३ ॥
धरुनि माझा उद्देश । विकत आणिसील मनुष्य ।
तें न घें मी निःशेष । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १२४ ॥
चांगुणा म्हणे कर जोडून । मी आपुलें मांस देतें करीं भोजन ।
श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण । माझें मांस देतों मी ॥ १२५ ॥
येरु म्हणे तुम्ही पवित्र तत्त्वतां । परी सर्व याचकांचे मातापिता ।       
तुम्हां दोघांसी भक्षितां । अन्नसत्र खंडेल ॥ १२६ ॥
तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ । पांच वर्षांचा चिलया बाळ ।
बत्तीसलक्षणी वेल्हाळ । तो मज देईं भोजना ॥ १२७ ॥
ऐसें ऐकतां वचन । मायामोहजाळ दूर करुन ।
म्हणती अवश्य जा घेवोन । मग सदाशिव बोलत ॥ १२८ ॥
मी काय आहें वृक व्याघ्र रीस । भक्षूं तव पुत्राचें मांस ।
उबग न मानूनि विशेष । पकवूनि घालीं मज आतां ॥ १२९ ॥
मायामोह धरुन । कोणी करील जरी रुदन ।
तरी मी जाईन उठोन । सत्त्व घेवोन तुमचें ॥ १३० ॥
अवश्य म्हणोनि पतिव्रता । उभी ठाकोनि बाहे निजसुता ।
म्हणे बाळा चिलया गुणवंता । खेळावया कोठें गेलासी ॥ १३१ ॥
तुजलागीं खोळंबला अतीत। बाळा माझ्या येईं धांवत ।
ऐसें ऐकतां अकस्मात । बाळ आला धांवोनी ॥ १३२ ॥
अतीतासी करुनि नमन । मातापितयांचे धरी चरण ।
माता म्हणे तुझे पिशीतदान ।अतीत मागतो राजसा ॥ १३३ ॥
बाळ बोले स्नेहेंकरुन । हा देह म्यां केला शिवार्पण ।
अतीत होतां तृप्त पूर्ण । उमारमण संतोषला ॥ १३४ ॥
ऐसें ऐकतां झडकरी । बाळ घेतला कडियेवरी ।
पाकशाळेभीतरीं । घेवोनि गेली वशावया ॥ १३५ ॥
चिलयासी चुंबन देऊन । हृदयीं धरिला प्रीतीकरुन ।
बाळ म्हणे पुढती घेईन । तुझ्या उदरा जननीये ॥ १३६ ॥
मायाजाळ सर्व सोडून । मन केलें वज्राहूनि कठिण ।
चिलयाचें शिर छेदून । काढिलें मांस आंगींचें ॥ १३७ ॥
आपणांसी पुत्र नाहीं म्हणोनियां । शिरकमळ ठेंविलें पहावया ।
शरीराचा पाक करुनियां । उठवी भोजना अतीतातें ॥ १३८ ॥
अतींद्रियद्रष्टा श्रीशंकर । अनंत ब्रह्मांडांचा समाचार ।
सर्व ठाऊक सूत्रधार । कळलें शिर ठेविलें तें ॥ १३९ ॥  
उठोनि चालिला तात्काळ । धांवती चांगुणा श्रियाळ ।
येरु म्हणे कळलें सकळ । शिरकमळ ठेविलें ॥ १४० ॥
सर्व गात्रांत शिर प्रधान । तेंचि कैसें ठेविलें वंचून ।
तंव तीं दोघें धरिती चरण । तेंही पकवून घालितों ॥ १४१ ॥
क्षोभ न धरावा अंतरीं । नेणतपणें चुकलों जरी ।
तरी सर्वज्ञा तूं क्षमा करीं । सत्त्व आमुचें राखावें ॥ १४२ ॥  
मग बैसला आसनीं येऊन । म्हणे शिर येईं बाहेर घेऊन ।
उखळांत घालूनि कांडण । मजदेखतां करीं आतां ॥ १४३ ॥
अश्रु आलिया तुझ्या नयनीं । कीं कष्टी झालिया अंतःकरणीं ।
तरी पुत्र गेला सत्त्वासी हानी । करुन जाईन तुमच्या ॥ १४४ ॥
अवश्य म्हणे नृपललना । शिर आणोनि करी कांडणा ।
सत्त्व पाहे कैलासराणा । अंतरीं सद्गद होऊनी ॥ १४५ ॥
निजसत्त्वाचें उखळ । धरिलें धैर्याचें करीं मुसळ ।
कांडीत बैसली वेल्हाळ । निर्धार अचळ धरुनियां ॥ १४६ ॥
अतीतम्हणेपरम मंगळ । गीत गाय रसिक सुढाळ ।
खंती करितां पयःफेनधवल । दुरावेल जाण पां ॥ १४७ ॥
ते सद्भावसरोवरविलासिनी । कोमलहृदय नृपकामिनी ।
कीं निश्र्चळ गंगा भरुनी । जात मर्यादा धरुनियां ॥ १४८ ॥
तिचें पाहतां निजवदन । काळवंडला रोहिणीरमण ।
मृगशावाक्षी गुणनिधान । उपमा नाहीं स्वरुपातें ॥ १४९ ॥
म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा । सुलक्षणा सुशाला नृपकिशोरा ।
सुहास्यवदना राजीवनेत्रा । येवोनि उदरा धन्य केलें ॥ १५० ॥
तूं सुकुमार परम गुणवंता । माझे निष्ठुर घाव लागती माथां ।
तुजविण परदेशी आतां । दुबळी भणंग झालें मी ॥ १५१ ॥
कुचक मंडलीं अतिसुंदरा । कुंचकीबाहेर फुटल्या दुग्धधारा ।
कीं भूमिलिंगासी एकसरा । गळत्या लाविल्या तियेनें ॥ १५२ ॥
म्हणे अतीत जेवोनि अवधारीं । जाऊं दे राजद्वाराबाहेरी ।
देह त्यागीन ये अवसरीं । यावरी धीर न धरवे पैं ॥ १५३ ॥
कैलासपंथ लक्षून । सखया एकला जातोसी मज टाकून ।
तुझे संगतीं मी येईन । उभा राहें क्षणभरी ॥ १५४ ॥
तूं मोक्षद्वीपाचें केणें भरुन । जासी कैलासराजपेठ लक्षून ।
तुझे संगतीं मी उद्धरेन । मज टाकूनि जाऊं नको ॥ १५५ ॥
उदकाविण जैसा मीन । तैसी मी तान्हया तुजविण ।
माझें हृदय निर्दय कठिण । लोकांत वदन केवीं दावूं ॥ १५६ ॥
तुझी माउली मी म्हणतां । लाज वाटे रे गुणवंता ।
तुवां आपुली सार्थकता । करुनि गेलासी शिवपदा ॥ १५७ ॥
त्रिभुवन शोधितां सकळ । तुजऐसा न दिसे बाळ ।
मग तें पकवूनि तात्काळ । उठा म्हणे अतीतातें ॥ १५८ ॥
अतीत म्हणे अवनीपती । उठा तुम्ही यजमान मााझे पंक्ती ।
ऐसें ऐकतां श्रियाळनृपती । झाला चित्तीं संकोचित ॥ १५९ ॥
चांगुणा म्हणे नृपनाथा । सत्त्व राखावें सत्वर आतां ।
विन्मुख जाऊं न द्यावें अतीता । मनीं चिंता न धरावी ॥ १६० ॥
नव मास वाहिला म्यां उदरांत । तुम्हांसी जड नव्हे चौप्रहरांत ।
पोटींचा पोटीं घालितां सुत । चिंता काय नृपश्रेष्ठा ॥ १६१ ॥
राव बैसला पंक्तीसी । ताट वाढोनि आणिलें वेगेंसी ।
अतीत म्हणे चांगुणेसी । तूंही येई सवेग ॥ १६२ ॥
अवश्य म्हणोनि झडकरी । येवोनि बैसली नृपसुंदरी ।
यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरीं । अन्न न घ्यावें सर्वथा ॥ १६३ ॥
निपुत्रिकांचें न पहावें वदन । मग तेथें कोण घेईल अन्न ।
दीपेंविण शून्य सदन । पुत्राविण तेवीं तुम्ही ॥ १६४ ॥
नासिकेवांचोनि वदन । कीं वृक्ष जैसा फळाविण ।
कीं बुबुळाविण जैसे नयन । शून्य सदन तुमचें तेवी ॥ १६५ ॥
तंव तीं दोघें बोलती सद्गदित । एक होता तो अर्पिला सुत।
चांगुणा म्हणें गेलें सत्त्व । अतीत विन्मुख जाईल आतां ॥ १६६ ॥
एक बाळ जो दिधला भोजनासी । आतां महाराजा सत्त्व किती पाहासी ।
ऐसें बोलतां चांगुणेसी । अद्भुत गहिंवर दाटला ॥ १६७ ॥
म्हणे सत्त्वही बुडालें सकळ । वृथा गेलें माझें बाळ ।
मग कंठ मोकळा करुनि ते स्नेहाळ । हांक फोडी चांगुणा ॥ १६८ ॥
नयनीं चालिल्या प्रेमाश्रुधारा । म्हणे अहा शिव कर्पूरगौरा । 
दीर्घस्वरें बाहे उमावरा । पाव सत्वरीं या आकांतीं ॥ १६९ ॥
अहा झाले वंशखंडण । न देखों पुढती पुत्र वदन ।
ऐसें ऐकतां अतीताचेनयन ।  स्रवों लागलें प्रेमभरें ॥ १७० ॥
बाहेर फुटली मात । वळसां होत नगरांत ।
लोक दुःखें वक्षस्थळ पिटीत । राजकिशोर आठवूनि ॥ १७१ ॥
विमानीं दाटले सुरवर । म्हणती धन्य पतिव्रता सत्त्वधीर ।
ईस प्रसन्न होवोनि श्रीशंकर । काय देईल तें न कळेचि ॥ १७२ ॥
अतीत म्हणे चांगुणेसी । जें प्रिय असेल तुझे मानसीं ।
तें मजसी माग सद्गुणराशी । यावरी सती काय बोले ॥ १७३ ॥
मज निपुत्रिक म्हणतील लोक । हा धुवोनि काढी कलंक ।
ऐसें ऐकतां कैलासनायक । बोलवीं म्हणे पुत्रासी ॥ १७४ ॥
सत्य मानूनि अतीतवचना । दीर्घ हांक फोडीत चांगुणा ।
म्हणे चिलया गुणनिधाना । येईं स्नेहाळ धांवोनी ॥ १७५ ॥
अतीत तुजविण न घे ग्रास । कोठें गुंतलासी खेळावयास ।
माझें तान्हें तूं पाडस । सत्त्व राखें येवोनियां ॥ १७६ ॥
तूं न येसी जरी धांवोन । तरी माझा जाऊं पाहे प्राण ।
दशदिशा विलोकून । चांगुणा पाहे तेधवां ॥ १७७ ॥
मागुती हांक फोडी वेल्हाळ  । तों जैसें उगवे मित्रमंडळ ।
तैसा धांवतचि आला बाळ । पाहे श्रियाळ स्नेहभरें ॥ १७८ ॥
अतीतस्वरुप टाकून । शिव प्रगटला निजरुप पूर्ण । 
दशहस्त पंचवदन । दीनोद्धारण जगद्गुरु ॥ १७९ ॥
चिलया शिवें हृदयीं धरिला । निजअंकावरी बैसविला ।
श्रियाळचांगुणा ते वेळां । पायांवरी लोळती ॥ १८० ॥
सुरवर सुमनें वर्षती अपार । दुंदुभिनादें कोंदलें अंबर ।
आनंदमय झालें नगर । धांवती लोक पहावया ॥ १८१ ॥
शिवें आणविलें दिव्य विमान । श्रियाळचांगुणा दिव्यरुप होऊन ।
चिलयासी सिंहासनीं स्थापून । छत्र धरिलें तयावरी ॥ १८२ ॥
सचिवांसी निरवोनि राज्यभार । विमानीं बैसलीं सत्वर । 
निजपदीं जगदुद्धार । श्रीशंकर स्थापी तयां ॥ १८३ ॥
कांतिनगरीं सौख्य अगाध । त्रिभुवनीं न माये आनंद ।
श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद । अभंग न विटे कालत्रयीं ॥ १८४ ॥
शिवलीलामृत ग्रंथ । झाला चतुर्दश अध्यायपर्यंत ।
चौदा भुवनांचें सार यथार्थ । चौदा अध्याय निर्मिलें ॥ १८५ ॥
कीं चौदा विद्यांचें सार । चौदा गांठींचा अनंत परिकर ।
कीं चौदा पदें निरंतर । गयावर्जन घडे हें ॥ १८६ ॥
कीं चतुर्दश रत्नांचा प्रकाश । येथेंचि झाला एकरस ।
कीं चौदा चक्रें निःशेष । प्रिय चौदाही लोकांतें ॥ १८७ ॥
कीं चौदा कांडे वेद । कीं चौदा कोहळीं द्रव्य प्रसिद्ध ।
कीं चौदा कोठड्या शुद्ध । शिवमंदिर निर्मिलें ॥ १८८ ॥
श्रवण पठण लेखन । निदिध्यास अनुमोदन ।
परम प्रीतीं करितां ग्रंथरक्षण । फल समान सर्वांसीं ॥ १८९ ॥
इतुक्यांसही शिव होऊनि माउली । करील निजांगाची साउली ।
आयुरारोग्य ऐश्र्वर्य सकळी । ग्रंथश्रवणें प्राप्त होय ॥ १९० ॥
आधि व्याधि जाय निरसोन । वंध्याही पावे पुत्रसंतान ।
ग्रामा गेला बहुत दिन । पिता बंधु भेटेल ॥ १९१ ॥
घरीं संपत्ति दाटे बहुत । ऋणमोचन होय त्वरित ।
शत्रुक्षय यथार्थ । दक्षिणमुखें वाचितां ॥ १९२ ॥
शत आवर्तनें करितां भक्तियुक्त । पोटीं होय शिभक्त सुत ।
ज्याच्या घरीं असेल हा ग्रंथ । पिशाच भूत न रिघे तेथें ॥ १९३ ॥
त्रिमास करितां नित्य आवर्तन । सर्व संकटें जाती निरसोन ।
भावें प्रचीत पहावी वाचोन । नाहीं कारण अभाविकांचें ॥ १९४ ॥
सोमवारीं ग्रंथ पुजून । अथवा प्रदोषकाळ शिवरात्रि लक्षून ।
शुचिर्भूत होऊनि करावें शयन । स्वप्नीं प्रगटोन शिव सांगे ॥ १९५ ॥
जें जें पडेल संकट । तें तें निवारील नीलकंठ ।
चौदा अध्यायांचें फळ वरिष्ठ । वेगळालें लिहिलें असे ॥ १९६ ॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । दाशार्हरायाचें आख्यान ।
कलावतीनें पति उद्धरिला पूर्ण । हेंचि कथन निर्धारें ॥ १९७ ॥
द्वितीयाध्यायीं निरुपण । शिवरात्रिकर्मविपाककथन ।
तिसर्‍यांत गौतम कथा सांगोन । कल्माषपाद उद्धरिला ॥ १९८ ॥
चौथ्यात महाकाळलिंगार्चन । गोपबाळ गेला उद्धरुन ।
पांचव्यांत उमेनें पुत्र पाळून । राज्यीं स्थापिला शिवप्रसादें ॥ १९९ ॥
सहावा अध्याय अतिरसिक । सीमंतिनी आख्यान पुण्यकारक।
सातवा आठवा सुरस कौतुक । भद्रायुरायाचें कथन पैं ॥ २०० ॥
नवमांत वामदेवाचें आख्यान सुरस । दुर्जयराजा झाला राक्षस ।
जन्मदुःखें कथिलीं बहुवस । अतीसुरस अध्याय तो ॥ २०१ ॥
दहाव्यांत शारदा आख्यान । अकराव्यांत रुद्राक्षमहिमा पूर्ण ।
महानंदा गेली उद्धरोन । भद्रसेन राव तरला ॥ २०२ ।
बाराव्यांत विदुरबहुलोद्धार । विष्णु नें मर्दिला भस्मासूर ।
तेराव्या अध्यायांत समग्र । शिवगौरीविवाह पैं ॥ २०३ ॥
चौदाव्यांत शिवअपर्णाविनोद । गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध ।
पुढें श्रियाळचरित्र अगाध । चौदावा अध्याय संपूर्ण हा ॥ २०४ ॥
श्रीधरस्वामी ब्रह्मानंद । आनंदसांप्रदाय परम अगाध ।
क्षीरसागरीं गोविंद । आधीं उपदेशी कमलोद्भवा ॥ २०५ ॥
तेथूनी अत्रिऋषि प्रसिद्ध । पुढें पूर्णब्रह्म दत्तात्रेय अगाध ।
त्यापासूनि सदानंद । रामानंदयती तेथोनि ॥ २०६ ॥
तेथोनि अमलानंद गंभीर । मग ब्रह्मानंद उदार ।
त्यावरी कल्याणीं राहणार । सहजानंद यतींद्र पैं ॥ २०७ ॥
तेथूनि पूर्णानंद यती शुद्ध । त्यापासाव पितामह दत्तानंद ।
पिता तोचि सद्गुरु प्रसिद्ध । ब्रह्मानंद यतींद्र जो ॥ २०८ ॥
पंढरीहूनि चारी योजनें दूरी । नैऋत्यकोणीं नाझरें नगरी ।
तेथील देशलेखक निर्धारीं । पूर्वाश्रमीं ब्रह्मानंद ॥ २०९ ॥
पुढें पंढरीसी येऊन । केलें तेथें संन्यासग्रहण ।
तेथेंचि समाधिस्थ होऊन । अक्षय वस्ती केली पैं ॥ २१० ॥
तो ब्रह्मानंद माझा पिता । सावित्री नामें माझी माता ।
वंदूनि त्या उभयतां । शिवलीलामृत ग्रंथ संपविला ॥ २११ ॥
शके सोळाशें चाळीस। विलंबीनाम संवत्सरास ।
शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास । रविवारीं ग्रंथ संपविला ॥ २१२ ॥
ब्रह्मकमंडोच्या तीरीं । द्वादशमती नाम नगरी ।
आद्यंत ग्रंथ निर्धारीं । तेथेंचि झाला जाणिजे ॥ २१३ ॥
शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत । चतुर्दश अध्यायापर्यंत ।
जय जय शंकर उमानाथ । तुजप्रीत्यर्थ हो कां सदा ॥ २१४ ॥
अपर्णाजीवना कर्पूरगौरा । ब्रह्मानंदा जगदुद्धारा ।
श्रीधरहृदयाब्जभ्रमरा । अक्षय अभंगा दयानिधे ॥ २१५ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
सदा परिसोत सज्जन अखंड । चतुर्दशाध्याय गोड हा ॥ २१६ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥   
॥ इति श्रीशिवलीलामृत समाप्त ॥
ShriShivLilamrut Adhyay 14
  श्रीशिवलिलामृत अध्याय चौदावा


Custom Search