Sunday, August 9, 2020

ShriRamCharit Manas Part 30 श्रीरामचरितमानस भाग ३०

 


ShriRamCharit Manas Part 30
Doha 177 to 179 
श्रीरामचरितमानस भाग ३०
दोहा १७७ ते १७९
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--गए बिभिषन पास पुनि कहेउ पुत्र बर मागु ।
तेहिं मागेउ भगवंत पद कमल अमल अनुरागु ॥ १७७ ॥
नंतर ब्रह्मदेव बिभिषणापाशी गेले आणि म्हणाले, ' पुत्रा, वर माग. ' त्याने भगवंतांच्या चरणकमलांच्या ठायी निर्मळ प्रेम मागितले. ॥ १७७ ॥
तिन्हहि देइ बर ब्रह्म सिधाए । हरषित ते अपने गृह आए ॥
मय तनुजा मंदोदरि नामा । परम सुंदरी नारि ललामा   
त्यांना वर देऊन ब्रह्मदेव गेले आणि ते तीन भाऊ आनंदाने आपल्या घरी परतले. मय या दानवाची परम सुंदर आणि स्त्री-रत्न अशी मंदोदरी नावाची एक कन्या होती. ॥ १ ॥
सोइ मयँ दीन्ही रावनहि आनी । होइहि जातुधानपति जानी ॥
हरषित भयउ नारि भलि पाई । पुनि दोउ बंधु बिआहेसि जाई ॥
मय दानव तिला घेऊन आला. त्याने तिला रावणास अर्पण केले. त्याला माहीत होते की, हा ( रावण ) राक्षसांचा राजा होणार आहे. सुंदर व गुणी स्त्री मिळाल्यामुळे रावण प्रसन्न झाला आणि नंतर त्याने आपल्या दोन्ही भावांचा विवाह केला. ॥ २ ॥
गिरि त्रिकूट एक सिंधु मझारी । बिधि निर्मित दुर्गम अति भारी ॥
सोइ मय दानवँ बहुरि सँवारा । कनक रचित मनिभवन अपारा ॥
समुद्रामध्ये त्रिकुट पर्वतावर ब्रह्मदेवाने तयार केलेला एक प्रशस्त किल्ला होता. ( महान मायावी व निपुण कलाकार असलेल्या ) मय दानवाने तो पुन्हा सजविला. त्यामध्ये रत्ने जडविलेले सोन्याचे असंख्य महाल होते. ॥ ३ ॥
भोगवति जसि अहिकुल बासा । अमरावति जसि सक्रनिवासा ॥
तिन्ह तें अधिक रम्य अति बंका । जग बिख्यात नाम तेहि लंका ॥
नागकुलाला राहाण्यासाठी पाताल लोकात जशी भोगावती पुरी आहे आणि इंद्राला राहाण्यासाठी ( स्वर्गलोकात ) अमरावती आहे, त्यापेक्षा अधिक सुंदर आणि अभेद्य असा तो दुर्ग होता. जगात त्याचे नाव लंका म्हणून प्रसिद्ध झाले. 
दोहा--खाईं सिंधु गभीर अति चारिहुँ दिसि फिरि आव ।
कनक कोट मनिखचित दृढ़ बरनि न जाइ बनाव ॥ १७८ ( क) ॥
त्याच्या चारी बाजूंना समुद्रातील अत्यंत खोल खंदक होते. त्या दुर्गाची रत्नांनी जडविलेली तटबंदी होती. तिच्या कलाकुसरीचे तर वर्णनही करता येणार नाही. ॥ १७८ ( क ) ॥
हरि प्रेरित जेहिं कलप जोइ जातुधानपति होइ ।
सूर प्रतापी अतुलबल दल समेत बस सोइ ॥ १७८ ( ख ) ॥
भगवंतांच्या प्रेरणेने ज्या कल्पामध्ये जो राक्षसांचा राजा असतो, तो शूर, प्रतापी, अतुल बलवान होऊन आपल्या सेनेसह त्या पुरीत राहतो. ॥ १७८ ( ख ) ॥
रहे तहाँ निसिचर भट भारे । ते सब सुरन्ह समर संघारे ॥
अब तहँ रहहिं सक्र के प्रेरे । रच्छक कोटि जच्छपति केरे ॥
प्रथम तेथे मोठमोठे राक्षस योद्धे राहात होते. देवांनी त्या सर्वांना युद्धांत मारुन टाकले. आता इंद्राच्या प्रेरणेने कुबेराचे एक कोटी रसक यक्ष तेथे राहू लागले. ॥ १ ॥
दसमुख कतहुँ खबरि असि पाई । सेन साजि गढ़ घेरेसि जाई ॥
देखि बिकट भट बड़ि कटकाई । जच्छ जीव लै गए पराई ॥
रावणाला जेव्हा ते समजले, तेव्हा त्याने सेना सज्ज करुन किल्ल्याला वेढा घातला. रावणाचे भयानक योद्धे आणि त्यांची प्रचंड सेना पाहून यक्ष प्राण घेऊन पळाले. ॥ २ ॥    
फिरि सब नगर दसानन देखा । गयउ सोच सुख भयउ बिसेषा ॥
सुंदर सहज अगम अनुमानी । कीन्हि तहाँ रावन रजधानी ॥
मग रावणाने चहूकडे फिरुन संपूर्ण नगर पाहिले. त्याची ( स्थानासंबंधीची ) काळजी मिटली आणि त्याला खूप आनंद झाला. ती पुरी स्वाभाविकच सुंदर आणि ( परक्यांसाठी ) दुर्गम आहे, असे पाहून रावणाने ती आपली राजधानी केली. ॥ ३ ॥
जेहि जस जोग बाँटि गृह दीन्हे । सुखी सकल रजनीचर कीन्हे ॥
एक बार कुबेर पर धावा । पुष्पक जान जीति लै आवा ॥ 
योग्यतेप्रमाणे येथील घरे रावणाने राक्षसांना वाटून दिली. ते खूष झाले. एकदा त्याने कुबेरावर चढाई करुन त्याच्याकडून पुष्पक विमान जिंकून आणले. ॥ ४ ॥
दोहा--कौतुकहीं कैलास पुनि लीन्हेसि जाइ उठाइ ।
मनहुँ तौलि निज बाहुबल चला बहुत सुख पाइ ॥ १७९ ॥
नंतर जाऊन त्याने एकदा मजेने कैलास पर्वत उचलला आणि आपल्या भुजांचे बल अजमावून तो आनंदाने तेथून परतला. ॥ १७९ ॥
सुख संपति सुत सेन सहाई । जय प्रताप बल बुद्धि बड़ाई ॥
नित नूतन सब बाढ़त जाई । जिमि प्रतिलाभ लोभ अधिकाई ॥
सुख, संपत्ती, पुत्र, सेना, सहायक, जय, प्रताप, बल, बुद्धी आणि महिमा हे सर्व त्याचे प्रत्येक लाभ मिळाल्यावर, लोभ वाढतो तसे नित्य वृद्धिंगत होत होते. ॥ १ ॥
अतिबल कुंभकरन अस भ्राता । जेहि कहुँ नहिं प्रतिभट जग जाता ॥
करइ पान सोवइ षट मासा । जागत होइ तिहूँ पुर त्रासा ॥
प्रचंड शक्ती असलेला कुंभकर्ण हा त्याचा भाऊ होता. त्याच्या जोडीचा योद्धा जगात कुठेही नव्हता. तो मदिरा पिऊन सहा सहा महिने झोपत असे. तो जागा होताच तिन्ही लोकांमध्ये खळबळ माजायची. ॥ २ ॥
जौं दिन प्रति अहार कर सोई । बिस्व बेगि सब चौपट होई ॥
समर धीर नहिं जाइ बखाना । तेहि सम अमित बीर बलवाना ॥
जर तो दररोज भोजन करता, तर संपूर्ण विश्र्व लवकरच उजाड झाले असते. तो रणधीर असा होता की, ज्याचे वर्णन करणे शक्य नाही. लंकेमध्ये त्याच्यासारखे असंख्य बलवान वीर होते. ॥ ३ ॥
बारिदनाद जेठ सुत तासू । भट महुँ प्रथम लीक जग जासू ॥
जेहि न होइ रन सनमुख कोई । सुरपुर नितहिं परावन होई ॥
मेघनाद रावणाचा वडील मुलगा होता, ज्याचा जगाच्या योद्ध्यांमध्ये पहिला क्रमांक होता. युद्धात त्याची बरोबरी करणारा कोणी नव्हता. स्वर्गातसुद्धा ( त्याच्या भीतीमुळे ) नेहमी तारांबळ उडायची. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment