Shri Dnyaneshwari Adhyay 4
आजि
श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गितानिधान देखिलें ।
आतां स्वप्नचि
हें तुकलें । साचासरिसें ॥ १ ॥
१) आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला; कारण गीतेसारखा ठेवा त्याला
पाहावयास मिळाला. जसें कांहीं स्वप्नच खरें व्हावें, तसें आतां हें झालें आहे.
आधींचि
विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी ।
आणि
भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥ २ ॥
२)
अगोदरच ही विवेकाची कथा, त्यांत तिचें प्रतिपादन जगांत अत्यंत प्रतापशाली असे
श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्यें श्रेष्ठ असणारा अर्जुन तें ऐकत आहे.
जैसा
पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु ।
तैं भला
जाहला विनोदु । कथेचा इये ॥ ३ ॥
३)
ज्याप्रमाणें पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा
योग यावा, ( त्याप्रमाणें ), या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे.
कैसी आगळिक
दैवाची । जे गंगा वोळली अमृताची ।
हो कां
जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥ ४ ॥
४) काय
दैवाचा जोर पाहा ! ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची; किंवा श्रोत्यांची जपतपादि
अनुष्ठानें ( या कथेच्या रुपानें ) फळास आलीं आहेत.
आतां
इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।
मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५ ॥
५) आतां एकूण एक इंद्रियांनीं श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा;
आणि मग गीता नांवाच्या संवादाचें सुख भोगावें.
हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगे ।
जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥ ६ ॥
६) हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर व कृष्ण आणि अर्जुन हे
दोघे जें कांहीं बोलत होते ती हकीकतच सांग, ( असें श्रोते म्हणाले. )
ते वेळीं संजयों रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला
दैवगुणें ।
जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे ॥ ७ ॥
७) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात, ) त्या वेळीं संजय
धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेंच अर्जुनाचा आश्रय केला. कारण प्रत्यक्ष
भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमानें बोलत आहेत.
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।
जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥ ८॥
८) पिता वसुदेव याला जें सांगितलेंच नाहीं. आई देवकी हिला
जें सांगितलेंच नाहीं, बळिभद्र याला जें सांगितलेंच नाहीं, तें रहस्य अर्जुनाजवळ
श्रीकृष्ण बोलत आहेत.
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । तेही न देखे या प्रेमाचें सुख ।
आणि कृष्णस्नेहाचें पिक । यातेंचि आधी ॥ ९ ॥
९) ( श्रीकृष्णदेवाच्या ) जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी पण
या ( कृष्णाच्या ) प्रेमाचें सुख तिलाहि ( कधीं ) दिसलें नाहीं. कृष्णाच्या
प्रेमाचे सर्व फळ यालाच ( अर्जुनालाच ) आज लाभत आहे.
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा ।
परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥ १० ॥
१०) सनकादिकांच्या ( परमात्मसुखाबद्दलच ) आशा खरोखर खूपच
बळावल्या होत्या; पण त्या इतक्या प्रमाणांत यशाला आल्याच नाहींत.
या जगदीश्र्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम ।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥
११) या जगदीश्र्वराचें प्रेम येथें ( या अर्जुनावर ) अगदीं
निरुपम दिसत आहे. या पार्थानें कसें उत्कृष्ट पुण्य केलें आहे बरें !
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।
मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥
१२) पाहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळें हा कृष्ण, (
वास्तविक ) निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची ( देवांशीं ) एकरुपता मला
चांगलीच पटते.
एर्हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे ।
जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥
१३) नाहीं तर हा योग्यांना सांपडला नाहीं, वेदांच्या
अर्थाला सांपडत नाहीं. ध्यानाचीहि नजर जेथपर्यंत पोंचत नाहीं,
तें हा निजस्वरुप । अनादि निष्कंप ।
परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥ १४ ॥
१४) अशी जी आत्मस्थिति, तद्रुप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच
अचल आहे; पण ( आज या अर्जुनावर ) किती बरें कृपावंत झाला आहे !
हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराची पैलथडी ।
कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥
१५) हा त्रैलोक्यरुप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे;
( पण ) या अर्जुनाच्या प्रेमानें कसा आटोक्यांत आणला आहे !
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ॥ १६ ॥
१६) मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच योग आम्हीं सूर्याला
सांगितला; परंतु ती गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे.
मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी ।
निरुपिली बरवी । मनु प्रती ॥ १७ ॥
१७) मग त्या विवस्वान् सूर्यानें या योगाची संपूर्ण माहिती
वैवस्वत मनूला उत्तम प्रकारें सांगितली.
मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।
ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥ १८ ॥
१८) वैवस्वत मनूनें यांचें स्वतः आचरण केलें आणि मग ( आपला
मुलगा जो ) इक्ष्वाकु त्याला उपदेश केला. अशी ही परंपरा मूळापासून चालत आलेली आहे.
मग आणिकहि या योगातें । राजर्षि जाहले जाणते ।
परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी ॥ १९ ॥
१९) मग आणखीहि ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षि पुढें
होऊन गेले; पण तेव्हांपासून आतां हल्लीं हा कोणाला ठाऊक नाहीं.
जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु ।
म्हणोनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥ २० ॥
२०) कारण प्राण्यांचा सगळा भर विषयवासनेवर ( पडला ) व त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे; म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला.
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि ।
जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥ २१ ॥
२१) आत्मबोधाची आस्था ज्या बुद्धीनें बाळगावयाची ती
आडमार्गाला लागल्यामुळें ( लोकांना ) विषयसुख हेच आत्यंतिक सुख वाटूं लागलें व
देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणें प्रिय झाला.
एर्हवीं तरी खवणेयांचां गांवीं । पाटाउवें काय करावीं ।
सांगें जात्यंधा रवी । काय आथी ॥ २२ ॥
२२) नाहीं तर, नग्न लोकांच्या गावीं उंची वस्त्रें काय
करायचीं ? जन्मांधाला सूर्य काय होय ? सांग, बरें
कां बहिरयांचा आस्थानीं । कवण गीतातें मानी ।
कीं कोल्हेया चांदणीं आवडी उपजे ॥ २३ ॥
२३) किंवा, बहिर्यांच्या सभेंत गाण्याला कोण किंमत देणार ?
किंवा, कोल्ह्याच्या मनांत चांदण्याबद्दल प्रेम कधीं उत्पन्न होईल काय ?
पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते ।
ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ॥ २४ ॥
२४) चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे ,
( निरुपयोगी होतात ) ते कावळे चंद्राला कसे बरें ओळखणार ?
तैसे वैराग्याची
शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती ।
ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्र्वरातें ॥ २५ ॥
२५) त्याप्रमाणें वैराग्यरुपी नगराच्या शिवेचेंही ज्यांनी
कधीं दर्शन घेतलें नाहीं, विवेक कशाला म्हणतात हें ज्यांना माहीत नाही, त्या
मूर्खांना, माझी ईश्र्वराची कशी बरें प्राप्ति होणार ?
I just want the whole world to know about this spell caster I met
ReplyDeletetwo weeks ago, wisdomspiritualtemple@gmail.com I cannot say everything he has done for me my wife
left me 3 years ago left with my kids I was going through online
when I meant this wonderful man's testimony online I decided to
give it a try and my wife is back to me now and we ar1e happily
married again cause is too much to put in writing all I can say is
thank you very much am very happy .and does alot of spell
including Love Spell
Death Spell
Money Spell
Power Spell
Success Spell
Sickness Spell
Pregnancy Spell
Marriage Spell
Job Spell
Protection Spell
Lottery Spell
Court Case Spell
Luck Spell etc. In case you need his help contact him on this email
address wisdomspiritualtemple@gmail.com he is a good man
thanks.whatsapp number +234813 648 2342