Monday, January 4, 2021

Shri RamCharitManas Part 70 श्रीरामचरितमानस भाग ७०

 

Shri RamCharitManas Part 70 
Doha 317 to 322 
श्रीरामचरितमानस भाग ७० 
दोहा ३१७ ते ३२२ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—सजि आरती अनेक बिधि मंगल सकल सँवारि ।

चलीं मुदित परिछनि करन गजगामिनि बर नारि ॥ ३१७ ॥

अनेक प्रकारच्या आरत्या तयार करुन व सर्व मंगलद्रव्ये बरोबर घेऊन गजगामिनी सुंदरी आनंदाने औक्षण करण्यासाठी निघाल्या. ॥ ३१७ ॥

बिधुबदनीं सब सब मृगलोचनि । सब निज तन छबि रति मदु मोचनि ॥

पहिरें बरन बरन बर चीरा । सकल बिभूषन सजें सरीरा ॥

सर्व स्त्रिया चंद्रमुखी आणि मृगनयना होत्या आणि सर्वजणी आपापल्या शरीराच्या लावण्याने रतीचा गर्व हरण करीत होत्या. त्यांनी रंगी बेरंगी सुंदर साड्या परिधान केल्या होत्या आणि शरीरावर सर्व प्रकारचे दागिने घातले होते. ॥ १ ॥

सकल सुमंगल अंग बनाएँ । करहिं गान कलकंठि लजाएँ ॥

कंकन किंकिनि नूपुर बाजहिं । चालि बिलोकि काम गज लाजहिं ॥

सर्व अवयवांना सुंदर मंगल उटणी लावलेल्या त्या ललना कोकिळेला लाजवीत मधुर स्वरांनी गायन करीत होत्या. त्यांची कंकणे, कमरपट्टे व नूपुरे वाजत होती. स्त्रियांची चाल पाहून कामदेवाचा हत्तीही लाजत होता. ॥ २ ॥

बाजहिं बाजने बिबिध प्रकारा । नभ अरु नगर सुमंगलचारा ॥

सची सारदा रमा भवानी । जे सुरतिय सुचि सहज सयानी ॥

अनेक प्रकारची वाद्ये वाजत होती. आकाश व नगर या दोन्ही स्थानी सुंदर मंगल गीते निनादित होती. इंद्राणी, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती आणि स्वभावानेच पवित्र आणि ज्ञानी असलेल्या देवांगना होत्या, ॥ ३ ॥

कपट नारि बर बेष बनाई । मिलीं सकल रनिवासहिं जाई ॥

करहिं गान कल मंगल बानीं । हरष बिबस सब काहुँ न जानीं ॥

त्या सर्वजणी सुंदर स्त्रियांचा करुन अंतःपुरात मिसळून गेल्या

आणि मनोहर वाणीने मंगलगान करुं लागल्या. सर्वजण आनंदात असे बुडून गेले होते की, कुणीही त्यांना ओळखू शकले नाही. ॥ ४ ॥

छं०--को जान केहि आनंद बस सब ब्रह्मु बर परिछन चली ।

कल गान मधुर निसान बरषहिं सुमन सुर सोभा भली ॥

आनंदकंदु बिलोकि दूलहु सकल हियँ हरषित भई ।

अंभोज अंबक अंबु उमगि सुअंग पुलकावलि छई ॥

कोण कुणाला ओळखणार ? आनंदाने बेभान झालेल्या त्या सर्वजणी नवरदेव बनलेल्या प्रत्यक्ष ब्रह्माला ओवाळण्यासाठी निघाल्या. मनोहर गायन चालले होते. नगारे मधुरपणे वाजत होते, देव फुले उधळत होते, फार छान शोभा होती. आनंदकंद नवरदेवाला पाहून सर्व स्त्रिया मनातून आनंदून गेल्या. कमळसारख्या नेत्रांतून त्यांचे प्रेमाश्रू उचंबळून आले आणि सुंदर अंगांवर रोमांच दाटले.

दोहा—जो सुखु भा सिय मातु मन देखि राम बर बेषु ।

सो न सकहिं कहि कलप सत सहस सारदा सेषु ॥ ३१८ ॥

श्रीरामांचा वर-वेष पाहून सीतेची माता सुनयना अशी हरखून गेली की, हजारो सरस्वती व शेष हेसुद्धा शंभर कल्पांमध्ये त्याचे वर्णन करु शकणार नाहीत. ॥ ३१८ ॥

नयन नीरु हटि मंगल जानी । परिछनि करहिं मुदित मन रानी ।

बेद बिहित अरु कुल आचारु । कीन्ह भली बिधि सब ब्यवहारु ॥

ती मंगलवेळ असल्याचे जाणून राण्या डोळ्यांतील पाणी आवरुन प्रसन्न मनाने ओवाळू लागल्या. वेदांमध्ये सांगितलेले आणि कुलाचाराप्रमाणे असलेले सर्व व्यवहार राणीने व्यवस्थितपणे पूर्ण केले. ॥ १ ॥

पंच सबद धुनि मंगल गाना । पट पॉंवडे परहिं बिधि नाना ॥

करि आरती अरधु तिन्ह दीन्हा । राम गमनु मंडप तब कीन्हा ॥

तंत्री, ताल, झांज, नगारे आणि तुतारी या पाच प्रकारच्या वाद्यांचे स्वर, पंचध्वनी, वेदध्वनी, बंदीध्वनी, जयध्वनी, शंखध्वनी आणि हुलूध्वनी आणि मंगलगान चालू होते. नाना प्रकारच्या वस्त्रांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. सुनयना राणीने आरती करुन अर्घ्य दिले, मग श्रीरामांनी मंडपात प्रवेश केला. ॥ २ ॥

दसरथु सहित समाज बिराजे । बिभव बिलोकि लोकपति लाजे ॥

समयँ समयँ सुर बरषहिं फूला । सांति पढ़हिं महिसुर अनुकूला ॥

राजा दशरथ आपल्या मंडळींच्यासह आले. त्यांचे वैभव पाहून लोकपालही लाजले. देव वारंवार फुले उधळत होते आणि ब्राह्मण समयानुकूल शांतीपाठ करीत होते. ॥ ३ ॥

नभ अरु नगर कोलाहल होई । आपनि पर कछु सुनइ न कोई ॥

एहि बिधि रामु मंडपहिं आए । अरधु देइ आसन बैठाए ॥      

आकाशात व नगरात कलकलाट चालला होता. स्वतःचे किंवा दुसर्‍याचे बोलणे कुणालाच ऐकू येत नव्हते. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांनी मंडपामध्ये प्रवेश केला आणि अर्घ्य देऊन त्यांना आसनावर बसविले. ॥ ४ ॥

छं०—बैठारि आसन आरती करि निरखि बरु सुखु पावहीं ॥

मनि बसन भूषन भूरि वारहिं नारि मंगल गावहीं ॥

ब्रह्मादि सुरबर बिप्र बेष बनाइ कौतुक देखहीं ।

अवलोकि रघुकुल कमल रबि छबि सुफल जीवन लेखहीं ॥

श्रीरामांना आसनावर बसवून आरती केलेल्या नवरदेवाला पाहून स्त्रियांना खूप आनंद झाला. त्यांनी भरभरुन रत्ने, वस्त्रे आणि अलंकार त्यांच्यावरुन ओवाळून टाकले. त्या मंगल गीते गाऊ लागल्या. ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव ब्राह्मणाचा वेश धारण करुन हे कौतुक पाहात होते. रघुकुलरुपी कमळाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्रीराम यांचे रुप पाहून त्यांना आपले जीवन सफल झाल्याचे वाटत होते. 

दोहा—नाऊ बारी भाट नट राम निछावरि पाइ ।

मुदित असीसहिं नाइ सिर हरषु न हृदयँ समाइ ॥ ३१९ ॥

न्हावी, द्रोण-पत्रावळींचे विक्रेते, भाट, डोंबारी हे श्रीरामांना आलेली ओवाळणी मिळाल्याने आनंदित होऊन व मस्तक नम्र करुन आशीर्वाद देत होते. त्यांच्या मनात आनंद मावत नव्हता. ॥ ३१९ ॥

मिले जनकु दसरथु अति प्रीतीं । करि बैदिक लौकिक सब रीतीं ॥

मिलत महा दोउ राज बिराजे । उपमा खोजि खोजि कबि लाजे ॥

वैदिक आणि लौकिक असे सर्व रीति-रिवाज करुन राजा जनक व राजा दशरथ मोठ्या प्रेमाने परस्परांना भेटले. दोघा राजांची ती भेट फार शोभून दिसत होती. कविगण त्यांच्यासाठी शोधूनसुद्धा उपमा न मिळाल्याने लाजले, ॥ १ ॥

लही न कतहुँ हारि हियँ मानी । इन्ह सम एइ उपमा उर आनी ॥

सामध देखि देव अनुरागे । सुमन बरषि जसु गावन लागे ॥

जेव्हा कोणतीही उपमा मिळेना, तेव्हा मनातून पराजित होऊन त्यांनी मनात हीच उपमा ठरविली की, यांच्यासारखे हेच होत. व्याह्यांची भेट व परस्पर संबंध पाहून देवांना समाधान वाटले आणि त्यांनी फुले उधळून त्यांची वाखाणणी केली. ॥ २ ॥

जगु बिरंचि उपजावा जब तें । देखे सुने ब्याह बहु तब तें ॥

सकल भॉंति सम साजु समाजू । सम समधी देखे हम आजू ॥

ते म्हणू लागले की, ‘ ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केले, तेव्हापासून आजवर आम्ही अनेक विवाह पाहिले-ऐकले आहेत, परंतु सर्व प्रकारे समान साहित्य-सामुग्री आणि बरोबरीच्या दृष्टीने असे व्याही आजच पाहिले.’ ॥ ३ ॥

देव गिरा सुनि सुंदर सॉंचि । प्रीति अलौकिक दुहु दिसि माची ॥

देत पॉंवड़े अरधु सुहाए । सादर जनकु मंडपहिं ल्याए ॥

देवांची ती अलौकिक सत्य वाणी ऐकून दोन्हीकडे अलौकिक प्रेमानंद झाला. सुंदर पायघड्या आणि अर्घ्य देत जनक दशरथांना आदराने मंडपात घेऊन आले. ॥ ४ ॥

छं०—मंडपु बिलोकि बिचित्र रचनॉं रुचिरतॉं मुनि मन हरे ।

निज पानि जनक सुजान सब कहुँ आनि सिंघासन धरे ॥

कुल इष्ट सरिस बसिष्ट पूजे बिनय करि आसिष लही ।

कौसिकहि पूजत परम प्रीति कि रीति तौ न परै कही ॥

मंडपाची विलक्षण रचना आणि सजावट पाहून मुनींची मनेसुद्धा मोहित झाली. ज्ञानी जनकांनी स्वतः आपल्या हातांनी आणून सर्वांना सिंहासने मांडली. त्यांनी आपल्या कुलदेवतेसारखी वसिष्ठांची पूजा केली आणि विनंती करुन आशीर्वाद प्राप्त केला. विश्र्वामित्रांची पूजा करते वेळी तर जनकांच्या प्रेमाची रीत सांगण्याच्या पलीकडची होती.

दोहा—बामदेव आदिक रिषय पूजे मुदित महीस ।

दिए दिब्य आसन सबहि सब सन लही असीस ॥ ३२० ॥

राजाने वामदेव इत्यादी ऋषींची प्रसन्न चित्ताने पूजा केली. सर्वांना दिव्य आसने दिली आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. ॥ ३२० ॥

बहुरि कीन्हि कोसलपति पूजा । जानि ईस सम भाउ न दूजा ॥

कीन्हि जोरि कर बिनय बड़ाई । कहि निज भाग्य बिभव बहुताई ॥

मग त्यांनी कोशलाधीश राजा दशरथांची पूजा महादेवासमान मानून केली. त्यावेळी कोणतीही इतर भावना नव्हती. त्यानंतर त्यांच्याशी संबंध येत असल्यामुळे आपल्या भाग्याचा व वैभवाचा विस्तार होत असल्याबद्दल प्रशंसा करीत हात जोडून विनंती केली आणि त्यांचा सन्मान केला. ॥ १ ॥

पूजे भूपति सकल बराती । समधी सम सादर सब भॉंती ॥

आसन उचित दिए सब काहू । कहौं काह मुख एक उछाहू ॥

राजा जनकांनी सर्व वर्‍हाडी मंडळींची व्याही दशरथांप्रमाणेच सर्व प्रकारे आदराने पूजन केले आणि सर्वांना यथायोग्य आसने दिली. मी एका मुखाने त्या उत्सवाचे वर्णन कसे करु ? ॥ २ ॥

सकल बरात जनक सनमानी । दान मान बिनती बर बानी ॥

बिधि हरि हरु दिसिपति दिनराऊ । जे जानहिं रघुबीर प्रभाऊ ॥

राजा जनकांनी दान, मान-सन्मान, विनय आणि उत्तम वाणीने सर्व वर्‍हाडाचे स्वागत केले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, दिक्पाल आणि सूर्य हे श्रीरघुनाथांचा प्रभाव जाणत होते. ॥ ३ ॥

कपट बिप्र बर बेष बनाएँ । कौतुक देखहिं अति सचु पाएँ ॥

पूजे जनक देव सम जानें । दिए सुआसन बिनु पहिचानें ॥

ते ब्राह्मणांचा सुंदर वेष घेऊन मोठ्या आनंदाने ती सर्व लीला पाहात होते. जनकांनी त्यांना देवासमान मानून त्यांची पूजा केली आणि ओळख पटली नसताही त्यांना सुंदर आसने दिली. ॥ ४ ॥

छं०—पहिचान को केहि जान सबहि अपान सुधि भोरी भई ।

आनंद कंदु बिलोकि दूलहु उभय दिसि आनँदमई ॥

सुर लखे राम सुजान पूजे मानसिक आसन दए ।

अवलोकि सीलु सुभाउ प्रभु को बिबुध मन प्रमुदित भए ॥

कोण कुणाला ओळखणार ? सर्वांची शुद्ध हरपली होती. आनंदकंद नवरदेवाला पाहून दोन्ही पक्षांकडील स्थिती आनंदमय झाली होती. सर्वज्ञ श्रीरामांनी देवांना ओळखले आणि त्यांची मानसिक पूजा करुन त्यांना मानसिक आसने दिली. प्रभू श्रीरामांचा शील-स्वभाव पाहून देवगण मनातून हरखून गेले.

दोहा—रामचंद्र मुख चंद्र छबि लोचन चारु चकोर ।

करत पान सादर सकल प्रेमु प्रमोदु न थोर ॥ ३२१ ॥

श्रीरामचंद्राच्या मुखरुपी चंद्राच्या सौंदर्याचे पान सर्वांचे सुंदर नेत्ररुपी चकोर आदराने करीत होते. त्याप्रसंगी प्रेम व आनंद यांची कमतरता नव्हती. ॥ ३२१ ॥

समउ बिलोकि बसिष्ठ बोलाए । सादर सतानंदु सुनि आए ॥

 बेगि कुअँरि अब आनहु जाई । चले मुदित मुनि आयसु पाई ॥

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली पाहून वसिष्ठांनी शतानंदांना आदराने बोलाविले. बोलवणे येताच ते आदराने आले. वसिष्ठ म्हणाले, ‘ आता जाऊन राजकुमारीला लवकर घेऊन या.’ मुनींची आज्ञा झाल्यावर ते प्रसन्न ,मनाने निघाले.॥ १ ॥

रानी सुनि उपरोहित बानी । प्रमुदित सखिन्ह समेत सयानी ॥

बिप्र बधू कुलबृद्ध बोलाईं । करि कुलरीति सुमंगल गाईं ॥

बुद्धिमान राणी पुरोहितांचे बोलणे ऐकून सख्यांसह फार आनंदून गेली. ब्राह्मण-स्त्रिया आणि कुळातील वयोवृद्ध स्त्रिया यांना बोलावून राणीने कुलरीतीनुसार सुंदर मंगलगीते गाइली. ॥ २ ॥

नारि बेष जे सुर बर बामा । सकल सुभायँ सुंदरी स्यामा ॥

तिन्हहि देखि सुखु पावहिं नारीं । बिनु पहिचानि प्रानहु ते प्यारीं ॥

श्रेष्ठ देवांगना सुंदर मानवी स्त्रियांचे रुप घेऊन आल्या होत्या. सर्व स्वभावाने सुंदर आणि षोडशीतील तरुणी होत्या. त्यांना पाहून अंतःपुरातील स्त्रियांना आनंद वाटला. ओळख नसतानाही त्या सर्वांना प्राणापेक्षा अधिक प्रिय वाटू लागल्या. ॥ ३ ॥

बार बार सनमानहिं रानी । उमा रमा सारद सम जानी ॥

सीय सँवारि समाजु बनाई । मुदित मंडपहिं चलीं लवाई ॥

त्यांना पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वतीसारख्या मानून राणीने त्यांचा वारंवार सन्मान केला. अंतःपुरातील स्त्रिया व सख्या यांनी सीतेचा साज-शृंगार केला. सख्या तिला बरोबर घेऊन प्रसन्न चित्ताने मंडपाकडे निघाल्या. ॥ ४ ॥

छं०—चलि ल्याइ सीतहि सखीं सादर सजि सुमंगल भामिनीं ।

नवसप्त साजे सुंदरीं सब मत्त कुंजर गामिनीं ॥

कल गान सुनि मुनि ध्यान त्यागहिं काम कोकिल लाजहिं ।

मंजीर नूपुर कलित कंकन ताल गति बर बाजहीं ॥               

सुंदर मांगल्याचा साज चढवून अंतःपुरातील स्त्रिया व सख्या आदराने सीतेला घेऊन निघाल्या. सर्व सुंदरींनी सोळा शृंगार केले होते. त्या गजगामिनीच्या चालीने चालत होत्या. त्यांचे मनोहर गान ऐकून मुनींचेही ध्यान भंग पावे आणि कामदेवाच्या कोकिळाही लज्जित होऊन जात होत्या. नुपूर, पैंजणे आणि सुंदर कंकणे तालासुरावर फार सुंदर वाजत होती. 

दोहा—सोहति बनिता बृंद महुँ सहज सुहावनि सीय ।

छबि ललना गन मध्य जनु सुषमा तिय कमनीय ॥ ३२२ ॥

स्वभावतः सुंदर सीता स्त्रियांच्या मेळाव्यात अशी शोभून दिसत होती की, जणू ती लावण्यमयी ललनांच्यामध्ये प्रत्यक्ष परम मनोहर शोभारुपी स्त्री शोभत होती. ॥ ३२२ ॥

सिय सुंदरता बरनि न जाई । लघु मति बहुत मनोहरताई ॥

आवत दीखि बरातिन्ह सीता । रुप रासि सब भॉंति पुनीता ॥

सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करता येणेच कठीण. कारण बुद्धी फार अल्प आहे आणि मनोहरता फार मोठी. रुपाची खाण आणि सर्वप्रकारे पवित्र सीतेला येताना वर्‍हाडी लोकांनी पाहिले. ॥ १ ॥

सबहि मनहिं मन किए प्रनामा । देखि राम भए पूरनकामा ॥

हरषे दशरथ सुतन्ह समेता । कहि न जाइ उर आनँदु जेता ॥

सर्वांनी तिला मनातल्या मनात प्रणाम केला. श्रीरामचंद्रांना पाहून सर्वजण कृतकृत्य झाले. राजा दशरथ पुत्रांसह हर्षित झाले. त्यांच्या मनात कोंदलेल्या आनंदाबद्दल सांगणेच कठीण होते. ॥ २ ॥

सुर प्रनामु करि बरिसहिं फूला । मुनि असीस धुनि मंगल मूला ॥

गान निसान कोलाहलु भारी । प्रेम प्रमोद मगन नर नारी ॥

देव प्रणाम करुन फुले उधळू लागले. सर्व मांगल्याचे मूळ असलेल्या मुनींच्या आशीर्वादांचा ध्वनी घुमत होता. गाणी आणि नगारे यांचा आवाज दुमदुमत होता. सर्व नर-नारी प्रेम आणि आनंदामध्ये मग्न झाले होते. ॥ ३ ॥

एहि बिधि सीय मंडपहिं आई । प्रमुदित सांति पढ़हिं मुनिराई ॥

तेहि अवसर कर बिधि ब्यवहारु । दुहुँ कुलगुर सब कीन्ह अचारु ॥

अशा प्रकारे सीता मंडपात आली. मुनिराज मोठ्या आनंदाने शांति-पाठ म्हणू लागले. त्या प्रसंगी सर्व रीती, व्यवहार व कुलाचार दोन्ही

कुलगुरुंनी केले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment