Saturday, January 16, 2021

Shri RamCharitManas Part 75 श्रीरामचरितमानस भाग ७५

 

Shri RamCharitManas Part 75 
Doha 338 to 341 
श्रीरामचरितमानस भाग ७५ 
दोहा ३३८ ते ३४१

श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—प्रेमबिबस परिवारु सबु जानि सुलगन नरेस ।

कुअँरि चढ़ाईं पालकिन्ह सुमिरे सिद्धि गनेस ॥ ३३८ ॥

संपूर्ण परिवार प्रेमाने व्याकूळ झाला होता. राजांनी सुंदर मुहूर्त पाहून सिद्धींसह श्रीगणेशाचे स्मरण करुन कन्यांना पालख्यांमध्ये बसविले. ॥ ३३८ ॥

बहुबिधि भूप सुता समुझाईं । नारिधरमु कुलरीति सिखाईं ॥

दासीं दास दिए बहुतेरे । सुचि सेवक जे प्रिय सिय केरे ॥

राजांनी मुलींची अनेक प्रकारे समजूत घालून त्यांना स्त्रीधर्म व कुळाचार शिकविले. तसेच सीतेच्या विश्र्वासातील तिला प्रिय असणारे अनेक दासी-दास दिले. ॥ १ ॥

 सीय चलत ब्याकुल पुरबासी । होहिं सगुन सुभ मंगल रासी ॥

भूसुर सचिव समेत समाजा । संग चले पहुँचावन राजा ॥

सीता निघाली, तेव्हा मिथिलावासी व्याकूळ झाले. मंगल-शकून होऊ लागले. ब्राह्मण व मंत्री यांच्या समूहासह राजा जनक त्यांना पोहोचविण्यासाठी निघाले. ॥ २ ॥

समय बिलोकि बाजने बाजे । रथ गज बाजि बरातिन्ह साजे ॥

दसरथ बिप्र बोलि सब लीन्हे । दान मान परिपूजन कीन्हे ॥

वेळ पाहून वाद्ये वाजू लागली. वर्‍हाडी मंडळींनी रथ, हत्ती आणि घोडे सज्ज केले. राजा दशरथांनी सर्व ब्राह्मण लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना दान देऊन सन्मानित केले. ॥ ३ ॥

चरन सरोज धूरि धरि सीसा । मुदित महीपति पाइ असीसा ॥

सुमिरि गजानन कीन्ह पयाना । मंगलमूल सगुन भए नाना ॥

त्यांच्या चरण-कमलांची धूळ माथी धरुन आणि आशीर्वाद प्राप्त करुन राजांना आनंद वाटला आणि श्रीगणेशाचे स्मरण करुन त्यांनी प्रस्थान केले. त्यावेळी अनेक मंगल शकून झाले. ॥ ४ ॥

दोहा—सुर प्रसून बरषहिं हरषि करहिं अपछरा गान ।

चले अवधपति अवधपुर मुदित बजाइ निसान ॥ ३३९ ॥

देव आनंदित होऊन फुले उधळू लागले आणि अप्सरा गाऊ लागल्या. अयोध्यापती दशरथ नगारे वाजवून आनंदाने अयोध्येला निघाले. ॥ ३३९ ॥

नृप करि बिनय महाजन फेरे । सादर सकल मागने टेरे ॥

भूषन बसन बाजि गज दीन्हे । प्रेम पोषि ठाढ़े सब कीन्हे ॥

राजा दशरथांनी सर्व प्रतिष्ठित मंडळींना विनंती करुन परत पाठविले आणि सर्व याचकांना आदराने बोलाविले. त्यांना दागिने-कपडे, हत्ती-घोडे दिले आणि प्रेमाने वागून सर्वांना संपन्न व बलशाली केले. ॥ १ ॥

बार बार बिरिदावलि भाषी । फिरे सकल रामहि उर राखी ॥

बहुरि बहुरि कोसलपति कहहीं । जनकु प्रेमबस फिरै न चहहीं ॥

ते सर्व वारंवार राजांच्या कुलकीर्तीची वाखाणणी करीत श्रीरामचंद्रांना हृदयी धरुन परतले. कोशलाधीश राजा दशरथ परत जाण्यासाठी वारंवार सांगत होते, परंतु राजा जनक प्रेमवश झाल्यामुळे परतू इच्छित नव्हते. ॥ २ ॥

पुनि कह भूपति बचन सुहाए । फिरिअ महीस दूरि बड़ि आए ॥

राउ बहोरि उतरि भए ठाढ़े । प्रेम प्रबाह बिलोचन बाढ़े ॥

मग दशरथ म्हणाले, ‘ हे राजन, फार दूरवर आलात, आता परत जा.’ राजा दशरथ रथातून उतरुन उभे राहिले. त्यांच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. ॥ ३ ॥             

तब बिदेह बोले कर जोरी । बचन सनेह सुधॉं जनु बोरी ॥ 

करौं कवन बिधि बिनय बनाई । महाराज मोहि दीन्हि बड़ाई ॥

तेव्हा राजा जनक हात जोडून प्रेमरुपी अमृतात ओथंबलेले शब्द बोलले, ‘ मी आपल्याला कसे सांगू ? हे महाराज, तुम्ही मला मोठी थोरवी दिली आहे. ‘ ॥ ४ ॥

दोहा—कोसलपति समधी सजन सनमाने सब भॉंति ।

मिलनि परसपर बिनय अति प्रीति न हृदयँ समाति ॥ ३४० ॥

अयोध्यानाथ दशरथांनी आपल्या व्याह्यांना सर्व प्रकारे सन्मानित केले. त्यांच्या परस्पर भेटीमध्ये अत्यंत नम्रता होती आणि हृदयात न मावणारे प्रेम होते. ॥ ३४० ॥

मुनि मंडलिहि जनक सिरु नावा । आसिरबादु सबहि सन पावा ॥

सादर पुनि भेंटे जानाता । रुप सील गुन निधि सब भ्राता ॥

जनकांनी मुनींच्या पुढे मस्तक नमविले आणि सर्वांचे आशीर्वाद प्राप्त केले. नंतर आदराने ते रुप, शील व गुण संपन्न आपल्या जावयांना भेटले. ॥ १ ॥

जोरि पंकरुह पानि सुहाए । बोले बचन प्रेम जनु जाए ॥

राम करौं केहि भॉंति प्रसंसा । मुनि महेस मन मानस हंसा ॥

आणि सुंदर कर-कमल जोडून प्रेमोत्पन्न शब्द बोलले, ‘ हे राम, मी कशा प्रकारे तुमची स्तुती करु ? तुम्ही मुनींच्या आणि महादेवांच्या मनरुपी मानस सरोवरातील हंस आहात. ॥ २ ॥

करहिं जोग जोगी जेहि लागी । कोहु मोहु ममता मदु त्यागी ॥

ब्यापकु ब्रह्मु अलखु अबिनासी । चिदानंदु निरगुन गुनरासी ॥

योगिजन क्रोध, मोह, ममता आणि मद यांचा त्याग करुन ज्यांच्यासाठी योगसाधन करतात, जे सर्वव्यापक, ब्रह्म, अव्यक्त, अविनाशी, चिदानंद, निर्गुण आणि गुणांचे निधान आहेत. ॥ ३ ॥

मन समेत जेहि जान न बानी । तरकि न सकहिं सकल अनुमानी ॥

महिमा निगमु नेति कहि कहई । जो तिहुँ काल एकरस रहई ॥

मनासह वाणी ज्यांना जाणत नाही आणि सर्वजण ज्यांच्याविषयी फक्त अनुमानच करतात, कोणताही तर्क करु शकत नाहीत, ज्यांचा महिमा वेद ‘ नेति नेति ‘ म्हणून वर्णन करतात आणि जे सच्चिदानंद तिन्ही कालांमध्ये एकरस, सर्वदा आणि सर्वथा निर्विकार असतात; ॥ ४ ॥

दोहा—नयन बिषय मो कहुँ भयउ सो समस्त सुख मूल ।

सबइ लाभु जग जीव कहँ भएँ ईसु अनुकूल ॥ ३४१ ॥

तेच सर्व सुखांचे मूळ असलेले तुम्ही माझ्या नेत्रांना दिसू शकला. ईश्र्वर अनुकूल असल्यावर जगात जिवाला लाभच लाभ मिळतो. ॥ ३४१ ॥      

सबहि भॉंति मोहि दीन्हि बड़ाई । निज जन जानि लीन्ह अपनाई ॥

होहिं सहस दस सारद सेषा । करहिं कलप कोटिक भरि लेखा ॥

तुम्ही मला सर्व प्रकारे मोठेपण दिले आणि आपला समजून आपला बनविले. जरी दहा हजार सरस्वती व शेष असलेले आणि ते  कोट्यावधी कल्पांपर्यंत गणना करीत राहिले, ॥ १ ॥

मोर भाग्य राउर गुन गाथा । कहि न सिराहिं सुनहु रघुनाथा ॥

मैं कछु कहउँ एक बल मोरें । तुम्ह रीझहु सनेह सुठि थोरें ॥

तरीही हे रघुनाथा, माझे सद्भाग्य आणि तुमच्या गुणांची कथा पूर्ण होऊ शकत नाही. मी जे काही सांगत आहे, ते फक्त एवढ्याच एका बळावर की, तुम्ही अत्यंत थोड्याशा प्रेमाने प्रसन्न होता. ॥ २ ॥

बार बार मागउँ कर जोरें । मनु परिहरै चरन जनि भोरे ॥

सुनि बर बचन प्रेम जनु पोषे । पूरनकाम रामु परितोषे ॥

मी वारंवार हात जोडून हे मागतो की, माझ्या मनाने चुकूनही तुमचे चरण सोडू नयेत.’ जनकांची ही श्रेष्ठ प्रेमपूर्ण वचने ऐकून पूर्णकाम श्रीराम संतुष्ट झाले. ॥ ३ ॥

करि बर बिनय ससुर सनमाने । पितु कौसिक बसिष्ठ सम जाने ॥

बिनती बहुरि भरत सन कीन्ही । मिलि सप्रेम पुनि आसिष दीन्ही ॥

त्यांनी सुंदर शब्दांत विनंती करुन पिता दशरथ, गुरु 

विश्र्वामित्र व कुलगुरु वसिष्ठांसमान मानून श्वशुर जनक

 यांचा सन्मान केला. नंतर जनकांनी भरताला तसेच

 सांगितले आणि प्रेमाने भेटून त्याला आशीर्वाद दिले. ॥ ४

 ॥



Custom Search

No comments:

Post a Comment