Tuesday, June 8, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 27श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड २७

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 27 
Doha 155 to 160 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २७ 
दोहा १५५ ते १६०

दोहा--राम राम कहि राम कहि राम राम कहि राम ।

तनु परिहरि रघुबर बिरहँ राऊ गयउ सुरधाम ॥ १५५ ॥

राम-राम म्हणत पुन्हा राम म्हणत, पुनश्र्च राम-राम म्हणत आणि पुन्हा राम म्हणत श्रीरामांच्या विरहामुळे शरीराचा त्याग करुन महाराज देवलोकी निघून गेले. ॥ १५५ ॥

जिअन मरन फलु दसरथ पावा । अंड अनेक अमल जसु छावा ॥

जिअत राम बिधु बदनु निहारा । राम बिरह करि मरनु सँवारा ॥

जगण्याचे व मरण्याचे फल दशरथांना मिळाले. त्यांची

 निर्मल कीर्ती अनेक ब्रह्मांडांमध्ये पसरली. जिवात जीव

 असताना त्यांनी श्रीरामांचे चंद्रासमान मुख पाहिले आणि

 श्रीरामांच्या विरहाच्या निमित्ताने आपले मरण सार्थ केले.

 ॥ १ ॥

सोक बिकल सब रोवहिं रानी । रुपु सीलु बलु तेजु बखानी ॥

करहिं बिलाप अनेक प्रकारा । परहिं भूमितल बारहिं बारा ॥

सर्व राण्या शोकामुळे व्याकूळ होऊन रडू लागल्या. राजाचे रुप, शील, बल आणि तेज यांचे वर्णन करीत करीत त्या अनेक प्रकारे विलाप करीत होत्या व जमिनीवर वारंवार लोळण घेत होत्या. ॥ २ ॥

बिलपहिं बिकल दास अरु दासी । घर घर रुदनु करहिं

 पुरबासी ॥

अँथयउ आज भानुकुल भानू । धरम अवधि गुन रुप

 निधानु ॥

दास-दासी व्याकूळ होऊन विलाप करीत होत्या आणि नगरातील लोक घरोघरी रडत होते. ते म्हणत होते की, ' आज धर्माची परिसीमा, गुण व रुपाचे भांडार असलेल्या सूर्यकुलाचा सूर्य मावळला. ॥ ३ ॥

गारीं सकल कैकइहि देहीं । नयन बिहीन कीन्ह जग जेहीं ॥

एहि बिधि बिलपत रैनि बिहानी । आए सकल महामुनि

 ग्यानी ॥

सर्वजण कैकेयीला शिव्या देत होते. ' तिने संपूर्ण जगाला डोळ्यंविना आंधळे करुन टाकले.' अशा प्रकारे विलाप करीत रात्र निघून गेली. प्रातःकाळी सर्व मोठमोठे ज्ञानी मुनी आले. ॥ ४ ॥

दोहा--तब बसिष्ठ मुनि समय सम कहि अनेक इतिहास ।

सोक नेवारेउ सबहि कर निज बिग्यान प्रकास ॥ १५६ ॥

तेव्हा वसिष्ठांनी प्रसंगानुकूल पूर्वीच्या अनेक गोष्टी सांगून

 आपल्या विज्ञानाच्या प्रकाशाने सर्वांचे दुःख निवारण

 केले. ॥ १५६ ॥

तेल नावँ भरि नृप तनु राखा । दूत बोलाइ बहुरि अस भाषा

 ॥

धावहु बेगि भरत पहिं जाहू । नृप सुधि कतहुँ कहहु जनि

 काहू ॥

वसिष्ठांनी दोणीमध्ये तेल भरुन राजाचा देह त्यामध्ये ठेवविला, नंतर दूतांना बोलावून त्यांना सांगुतले की, ' तुम्ही लवकर धावत भरताकडे जा. मात्र राजांच्या मृत्यूची वार्ता कुणालाही सांगू नका. ॥ १ ॥     

एतनेइ कहेहु भरत सन जाई । गुर बोलाइ पठयउ दोउ

 भाई ॥

सुनि मुनि आयसु धावन धाए । चले बेग बर बाजि लजाए

 ॥

जाऊन भरताला एवढेच सांगा की, दोघा भावांना गुरुजींनी बोलावले आहे.' मुनींची आज्ञा होताच दूत दौडू लागले. ते उत्तम प्रकारच्या घोड्यांनाही आपल्या धावण्याच्या गतीने लाजवीत होते. ॥ २ ॥

अनरथु अवध अरंभेउ जब तें । कुसगुन होहिं भरत कहुँ

 तब तें ॥

देखहिं राति भयानक सपना । जागि करहिं कटु कोटि

 कलपना ॥

जेव्हा अयोध्येमध्ये अनर्थ सुरु झाले, तेव्हापासून भरताला अपशकुन होऊ लागले. रात्री त्याला भयंकर स्वप्ने पडत होती आणि जागे झाल्यावर मनात अनेक तर्‍हेचे वाईट वाईट विचार येत होते. ॥ ३ ॥

बिप्र जेवॉंइ देहिं दिन दाना । सिव अभिषेक करहिं बिधि

 नाना ॥

मागहिं हृदयँ महेस मनाई । कुसल मातु पितु परिजन भाईं

 ॥

अनिष्टाच्या शांतीसाठी तो दररोज ब्राह्मणांना भोजन घालून दानें देत होता. अनेक प्रकारांनी रुद्राभिषेक करीत होता. मनामध्ये श्रीमहादेवांना आळवून माता-पिता, कुटुंबीय व भाऊ यांची खुशाली मागत होता. ॥ ४ ॥

दोहा--एहि बिधि सोचत भरत मन धावन पहुँचे आइ ।

गुर अनुसासन श्रवन सुनि चले गनेसु मनाइ ॥ १५७ ॥

अशा प्रकारे भरत मनात काळजी करीत होता.

 एवढ्यातच दूत पोहोचले गुरुंची आज्ञा ऐकताच भरत

 श्रीगणेशाची प्रार्थना करीत निघाला. ॥ १५७ ॥

चले समीर बेग हय हॉंके । नाघत सरित सैल बन बॉंके ॥

हृदयँ सोचु बड़ कछु न सोहाई । अस जानहिं जियँ जाउँ

 उड़ाई ॥

हवेच्या वेगाने धावणार्‍या घोड्यांना दौडवीत ते बिकट नद्या, पर्वत व जंगले ओलांडत निघाले. त्यांच्या मनात मोठी काळजी वाटत होती, काही सुचत नव्हते. मनात विचार येत होता की, उडून अयोध्येला पोहोचावे. ॥ १ ॥

एक निमेष बरष सम जाई । एहि बिधि भरत नगर

 निअराई ॥

असगुन होहिं नगर पैठारा । रटहिं कुभॉंति कुखेत करारा

 ॥

एक एक क्षण वर्षाप्रमाणे जात होता. अशाप्रकारे भरत

 नगराजवळ पोहोचला. नगरात प्रवेश करताना अपशकुन

 होऊ लागले. कावळे डावीकडे बसून कर्कशपणे काव

 काव करीत होते. ॥ २ ॥

खर सिआर बोलहिं प्रतिकूला । सुनि सुनि होइ भरत मन

 सूला ॥

श्रीहत सर सरिता बन बागा । नगरु बिसेषि भयावनु लागा

 ॥

गाढवे व कोल्हे विचित्र आवाज काढत होते. हे सर्व ऐकून भरताचे मन कासावीस झाले होते. तलाव, नद्या, वने, बगीचे हे सर्व कळाहीन झाले होते. नगर फार भयंकर वाटत होते. ॥ ३ ॥

खग मृग हय गय जाहिं न जोए । राम बियोग कुरोग

 बिगोए ॥

नगर नारि नर निपट दुखारी । मनहुँ सबन्हि सब संपति

 हारी ॥

श्रीरामांच्या वियोगरुपी वाईट रोगाने त्रासलेले पशु-पक्षी, हत्ती-घोडे यांना पाहावत नव्हते. नगरातील स्त्री-पुरुष अत्यंत दुःखी झाले होते. जणू सर्वजण आपली सर्व संपत्ती गमावून बसले होते. ॥ ४ ॥

दोहा--पुरजन मिलहिं न कहहिं कछु गवँहिं जोहारहिं

 जाहिं ।

भरत कुसल पूँछि न सकहिं भय बिषाद मन माहिं ॥ १५८

 ॥

नगरातील लोक भेटत होते, परंतु काही बोलत नव्हते. गुपचूप प्रणाम करुन जात होते. भरतसुद्धा कुणाला खुशाली विचारत नव्हता. कारण त्याच्या मनात भय व विषाद भरला होता. ॥ १५८ ॥

हाट बाट नहिं जाइ निहारी । जनु पुर दहँ दिसि लागि

 दवारी ॥

आवत सुत सुनि कैकयनंदिनि । हरषी रबिकुल जलरुह

 चंदिनि ॥

बाजार व रस्ते पाहावत नव्हते, जणू दाही दिशांना वणवा लागला असावा. पुत्र येत असल्याचे ऐकून सूर्यकुलरुपी कमलाला कोमेजून टाकणारे चांदणे बनलेली कैकेयी फार आनंदित झाली. ॥ १ ॥

सजि आरती मुदित उठि धाई । द्वारेहिं भेंटि भवन लेइ

 आई ॥

भरत दुखित परिवारु निहारा । मानहुँ तुहिन बनज बनु

 मारा ॥

ती आरती सजवून आनंदाने धावली आणि दरवाजाजवळ भेटताच भरताला महालात घेऊन गेली. भरताला सर्व परिवार दुःखात असलेला दिसला, जणू कमल-वनाला दवाने करपून टाकावे. ॥ २ ॥

कैकेई हरषित एहि भॉंती । मनहुँ मुदित दव लाइ किराती

 ॥

सुतहि ससोच देखि मनु मारें । पूँछति नैहर कुसल हमारें

 ॥

एक कैकेयीच अशी आनंदित दिसत होती की, जणू जंगलाला आग लावून भिल्लिणीला आनंद वाटावा. भरताला काळजीत पडलेला पाहून ती विचारु लागली की, ' आमच्या माहेरी सर्व खुशाल आहेत ना ? ' ॥ ३ ॥

सकल कुसल कहि भरत सुनाई । पूँछी निज कुल कुसल

 भलाई ॥

कहु कहँ तात कहॉं सब माता । कहँ सिय राम लखन प्रिय

 भ्राता ॥

भरताने सर्व खुशाली सांगितली. मग आपल्या कुळाचे क्षेम विचारले. भरत म्हणाला की, ' बाबा कुठे आहेत ? माझ्या सर्व माता कुठे आहेत ? सीता व माझे प्रिय भाऊ राम-लक्ष्मण कुठे आहेत ? ' ॥ ४ ॥

दोहा--सुनि सुत बचन सनेहमय कपट नीर भरि नैन ।

भरत श्रवन मन सूल सम पापिनि बोली बैन ॥ १५९ ॥

पुत्राचे प्रेमल उद्गार ऐकून नेत्रांमध्ये खोटे पाणी आणत पापिणी कैकेयी भरताच्या कानात मनाला शूळाप्रमाणे बोचणारे शब्द बोलली, ॥ १५९ ॥

तात बात मैं सकल सँवारी । भै मंथरा सहाय बिचारी ॥

कछुक काज बिधि बीच बिगारेउ । भूपति सुरपति पुर पगु

 धारेउ ॥

' बाळा ! मी सर्व गोष्टी बरोबर जमवल्या होत्या. बिचार्‍या मंथरेने मदतही केली, परंतु विधात्याने मध्येच थोडा खोडा घातला. त्यामुळे राजा देवलोकी निघून गेले.' ॥ १ ॥

सुनत भरतु भए बिबस बिषादा । जनु सहमेउ करि केहरि नादा ॥

तात तात हा तात पुकारी । परे भूमितल ब्याकुल भारी ॥

हे ऐकताच दुःखामुळे भरताची दशा दयनीय झाली, जणू सिंहाची गर्जना ऐकून हत्ती घाबरुन गेला. तो ' बाबा, बाबा, अहो बाबा ! ' असे म्हणत अत्यंत व्याकूळ होऊन जमिनीवर पडला. ॥ २ ॥

चलत न देखन पायउँ तोही । तात न रामहि सौंपेहु मोही ॥

बहुरि धीर धरि उठे सँभारी । कहु पितु मरन हेतु महतारी

 ॥

आणि विलाप करीत म्हणू लागला की, ' अहो बाबा ! मी तुम्हांला अंतःकाळी पाहूही शकलो नाही. तुम्ही मला श्रीरामांच्या हाती सोपवूनही गेला नाहीत. ' मग धीर धरुन तो स्वतःला सावरत उठला आणि म्हणाला, ' आई ! बाबांच्या मृत्युचे कारण तर सांग.' ॥ ३ ॥

सुनि सुत बचन कहति कैकेई । मरमु पॉंछि जनु माहुर देई

 ॥

आदिहु तें सब आपनि करनी । कुटिल कठोर मुदित मन

 बरनी ॥

पुत्राचे बोलणे ऐकून कैकेयी सांगू लागली, जणू मर्मस्थानी चिरुन ती त्यात विष भरत होती. कुटिल व कठोर कैकेयीने आपले सर्व कृत्य प्रारंभापासून शेवटपर्यंत प्रसन्नपणें सांगितले. ॥ ४ ॥

दोहा--भरतहि बिसरेउ पितु मरन सुनत राम बन गौनु ।

हेतु अपनपउ जानि जियँ थकित रहे धरि मौनु ॥ १६० ॥

श्रीरामचंद्रांचे वनात जाणे ऐकून भरत पित्याचे मरण विसरुन गेला आणि मनात या सर्व अनर्थाचे कारण आपण आहोत, असे समजून अवाक् व सुन्न झाला. ॥ १६० ॥

बिकल बिलोकि सुतहि समुझावति । मनहुँ जरे पर लोनु

 लगावति ॥

तात राउ नहिं सोचै जोगू । बिढ़इ सुकृत जसु कीन्हेउ भोगू

 ॥

मुलगा व्याकूळ झालेला पाहून कैकेयी त्याला समजावू लागली, जणू भाजल्या जागी मीठ चोळू लागली. ती म्हणाली, ' बाळा ! राजांसाठी काळजी करण्याचे कारण नाही. त्यांनी पुण्य आणि कीर्ती मिळवून त्याचा पुरेपूर भोग घेतला आहे. ॥ १ ॥

जीवत सकल जनम फल पाए । अंत अमरपति सदन

 सिधाए ॥

अस अनुमानि सोच परिहरहू । सहित समाज राज पुर करहू ॥

जीवनामध्ये त्यांनी जन्म घेतल्याचे संपूर्ण फळ मिळविले आहे आणि शेवटी ते इंद्रलोकी गेले. असा विचार करुन चिंता सोडून दे व परिवारासह अयोध्येचे राज्य कर.' ॥ २ ॥

सुनि सुठि सहमेउ राजकुमारू । पाकें छत जनु लाग

 अँगारू ॥

धीरज धरि भरि लेहिं उसासा । पापिनि सबहि भॉंति कुल

 नासा ॥

हे ऐकून राजकुमार भरताला मोठा धक्का बसला. जणू पिकलेल्या जखमेला विस्तवाचा चटका बसला. त्याने मन घट्ट करुन मोठा उसासा टाकत म्हटले की, ' पापिणी, तू सर्व तर्‍हेने कुळाचा नाश केलास. ॥ ३ ॥      

जौं पै कुरुचि रही अति तोही । जनमत काहे न मारे मोही

 ॥

पेड़ काटि तैं पालउ सींचा । मीन जिअन निति बारि

 उलीचा ॥

जर तुझी अशी दुष्ट इच्छा होती, तर जन्म घेताच मला मारुन का टाकले नाहीस ? तू वृक्ष तोडून पानांना पाणी घातलेस, माशाने जिवंत राहावे, म्हणून पाणी फेकून दिलेस. माझे हित करण्याऐवजी उलट अहित केलेस. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment