Monday, November 14, 2022

SunderKanda Part 8 Doha 19 to Doha 21 सुंदरकाण्ड भाग ८ दोहा १९ ते दोहा २१

 

SunderKanda Part 8 
ShriRamCharitManas 
Doha 19 to Doha 21 
सुंदरकाण्ड भाग ८ 
श्रीरामचरितमानस 
दोहा १९ ते दोहा २१

दोहा – ब्रह्म अस्त्र तेहि सॉंधा कपि मन कीन्ह बिचार ।

जौं न ब्रह्मसर मानउँ महिमा मिटइ अपार ॥ १९ ॥

शेवटी त्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. हनुमानाने मनात विचार केला की, जर मी ब्रह्मास्त्राचा मान ठेवला नाही, तर त्याचा अपार महिमा नष्ट होईल. ॥ १९ ॥

ब्रह्मबान कपि कहुँ तेहिं मारा । परतिहुँ बार कटकु संघारा ॥

तेहिं देखा कपि मुरुछित भयऊ । नागपास बॉंधेसि लै गयऊ ॥

मेघनादाने हनुमानाला ब्रह्मबाण मारला. तो लागताच हनुमान वृक्षावरुन खाली पडला. परंतु खाली पडतानाही त्याने बरीचशी सेना मारुन टाकली. मेगहनादाने जेव्हा पाहिले की, हनुमान मूर्छित झाला आहे, तेव्हा तो त्याला नागपाशाने बांधून घेऊन गेला. ॥ १ ॥

जासु नाम जपि सुनहु भवानी । भव बंधन काटहिं नर ग्यानी ॥

तासु दूत कि बंध तरु आवा । प्रभु कारज लगि कपिहिं बँधावा ॥

शिव म्हणतात, ‘ हे भवानी, ज्यांचे नाम जपून विवेकी मनुष्य जन्म-मरणाची बंधने तोडून टाकतो, त्याचा दूत कधी बंधनात सापडेल काय ? परंतु प्रभुंच्या कार्यासाठी हनुमानाने स्वतःला बांधून घेतले. ॥ २ ॥

कपि बंधन सुनि निसिचर धाए । कौतुक लागि सभॉं सब आए ॥

दसमुख सभा दीखि कपि जाई । कहि न जाइ कछु अति प्रभुताई ॥

वानराला बांधल्याचे ऐकून राक्षस धावले, आणि गंमत पाहण्यास सर्वजण सभेत आले. हनुमानाने जाऊन रावणाची सभा पाहिली. तिचे ऐश्र्वर्य अवर्णनीय होते. ॥ ३ ॥

कर जोरें सुर दिसिप बिनीता । भृकुटि बिलोकत सकल सभीता ॥

देखि प्रताप न कपि मन संका । जिमि अहिगन महुँ गरुड़ असंका ॥

देव व दिकपाल हात जोडून मोठ्या नम्रतेने भयभीत होऊन रावणाच्या इशार्‍यांकडे पाहात होते. त्याचा असा प्रताप पाहूनही हनुमानाच्या मनाला जराही भीती वाटली नाही. तो सापांच्या समूहात गरुड निर्भयपणे उभा असतो , त्याप्रमाणे उभा होता. ॥ ४ ॥

दोहा—कपिहि बिलोकि दसानन बिहसा कहि दुर्बाद ।

सुत बध सुरति कीन्हि पुनि उपजा हृदयँ बिषाद ॥ २० ॥

हनुमानाला पाहाताच रावणाने अपशब्द बोलून त्याचा उपहास केला. मग पुत्रवधाची आठवण झाली. तेव्हा त्याच्या मनात विषाद उत्पन्न झाला. ॥ २० ॥

कह लंकेस कवन तैं कीसा । केहि कें बल घालेहि बन खीसा ॥

की धौं श्रवन सुनेहि नहिं मोही । देखउँ अति असंक सठ तोही ॥

लंकापती रावण म्हणाला, ‘ अरे वानरा ! तूं कोण आहेस ? कुणाच्या जोरावर तू वन उजाड करुन नष्ट केलेस ? तू कधी माझे नांव व कीर्ती कानानी ऐकली नाहीस काय ? अरे नीचा ! मला तर तू निर्भय दिसत आहेस. ॥ १ ॥

मारे निसिचर केहिं अपराधा । कहु सठ तोहि न प्रान कइ बाधा ॥

सुनु रावन ब्रह्मांड निकाया । पाइ जासु बल बिरचति माया ॥

कोणत्या अपराधाबद्दल तूं राक्षसांना मारलेस ? अरे मूर्खा, सांग. तुला प्राण जाण्याची भीती वाटत नाही काय ? ‘ हनुमान म्हणाला, ‘ अरे रावणा, ऐकून घे. ज्यांच्या जोरावर माया ही संपूर्ण ब्रह्मांडांच्या समूहांची निर्मिती करते, ॥ २ ॥

जाकें बल बिरंचि हरि ईसा । पालत सृजत हरत दससीसा ॥

जा बल सीस धरत सहसानन । अंडकोस समेत गिरि कानन ॥

ज्यांच्या बळाने हे दशमुखा ! ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे सृष्टीचे सृजन, पालन व संहार करतात, ज्यांच्या बळावर सहस्रमुखी शेष पर्वत व वनासहित समस्त ब्रह्मांडाला शिरावर धारण करतो, ॥ ३ ॥

धरइ जो बिबिध देह सुरत्राता । तुम्ह से सठन सिखावनु दाता ॥

हर कोदंड कठिन जेहिं भंजा । तेहि समेत नृप दल मद गंजा ॥

जे देवांच्या रक्षणासाठी नाना प्रकारचे देह धारण करतात आणि जे तुझ्यासारख्या मूर्खाला धडा शिकविणारे आहेत, ज्यांनी शिवांचे धनुष्य मोडून टाकले आणि त्यासरशी राजांच्या समाजाचा गर्व चूर्ण करुन टाकला, ॥ ४ ॥

खर दूषन त्रिसिरा अरु बाली । बधे सकल अतुलित बलसाली ॥

ज्यांनी अतुलनीय बलवान अशा खर, दूषण, त्रिशिरा व वालीला मारले, ॥ ५ ॥        

दोहा—जाके बल लवलेस तें जितेहु चराचर झारि ।

तासु दूत मैं जा करि हरि आनेहु प्रिय नारि ॥ २१ ॥

ज्यांच्या लेशमात्र बळावर तू संपूर्ण चराचर जगताला जिंकून घेतलेस आणि ज्यांच्या प्रिय पत्नीला हरण करुन तू घेऊन आलास, त्यांचाच मी दूत आहे. ॥ २१ ॥

जानउँ मैं तुम्हारि प्रभुताई । सहसबाहु सन परी लराई ॥

समर बालि सन करि जसु पावा । सुनि कपि बचन बिहसि बिहरावा ॥

तुझी महती मला चांगली ठाऊक आहे. सहस्त्रबाहूशी तुझी लढाई झाली होती आणि वालीशी युद्ध करुन तू कीर्ती मिळविली होतीस.’ हनुमानाचे हे बोलणे ऐकून रावणाने हसून तिकडे दुर्लक्ष केले. ॥ १ ॥

खायउँ फल प्रभु लागी भूँखा । कपि सुभाव तें तोरेउँ रुखा ॥

सब कें देह परम प्रिय स्वामी । मारहिं मोहि कुमारग गामी ॥

हे राक्षसराजा !, मला भूक लागली होती, म्हणून मी फळे खाल्ली आणि वानराच्या स्वभावाप्रमाणे मी वृक्ष मोडले. अरे निशाचरांच्या मालका, देह हा सर्वांनाच प्रिय आहे. कुमार्गावर जाणारे दुष्ट राक्षस जेव्हा मला मारु लागले, ॥ २ ॥

जिन्ह मोहि मारा ते मैं मारे । तेहि पर बॉंधेउँ तनयँ तुम्हारे ॥

मोहि न कछु बॉंधे कइ लाजा । कीन्ह चहउँ निज प्रभु कर काजा ॥

तेव्हा मीही त्यांना मारले. मग तुझ्या पुत्राने मला बांधून घातले. परंतु बंधनात पडल्याची मला लाज वाटत नाही, कारण मी आपल्या प्रभूचे काम करु इच्छितो. ॥ ३ ॥

बिनती करउँ जोरि कर रावन । सुनहु मान तजि मोर सिखावन ॥

देखहु तुम्ह निज कुलहि बिचारी । भ्रम तजि भजहु भगत भय हारी ॥

हे रावणा, मी हात जोडून तुला विनंती करतो. तू अभिमान सोडून माझे म्हणणे ऐक. तू आपल्या पवित्र कुळाचा विचार करुन बघ. आणि भ्रम सोडून भक्तभयहारी भगवंतांना भज. ॥ ४ ॥

जाकें डर अति काल डेराई । जो सुर असुर चराचर खाई ॥

तासों बयरु कबहुँ नहिं कीजै । मोरे कहें जानकी दीजै ॥

देव, राक्षस आणि संपूर्ण चराचर यांना जो खाऊन टाकतो,

 तो कालसुद्धा ज्यांना घाबरतो, त्यांच्याशी कदापि वैर करु

 नकोस आणि माझ्या सांगण्याप्रमाणे जानकीला परत

 देऊन टाक. ॥ ५ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment