SunderKanda Part 1
शान्तं
शाश्र्वतमप्रमेयमनघं निर्वाणशान्तिप्रदं
ब्रह्माशम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं
वेदान्तवेद्यं विभुम् ।
रामाख्यं
जगदीश्र्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं
वन्देऽहं
करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम् ॥ १ ॥
शांत,
सनातन, अप्रमेय, निष्पाप, मोक्षरुप परमशांती देणारे, ब्रह्मदेव, महादेव व शेष
यांनी निरंतर सेविलेले, वेदान्ताने जाणता येणारे, सर्वव्यापक, सर्व देवांमध्ये
श्रेष्ठ असलेले, मायेमुळे मनुष्यरुपात दिसणारे, सर्व पापांचे हरण करणारे, करुणरची
खाण, रघुकुळातील श्रेष्ठ व राजांमध्ये शिरोमणी असलेले आणि ज्यांना श्रीराम असे
म्हटले जाते, अशा त्या जगदीश्वरांना मी वंदन करतो. ॥ १ ॥
नान्या
स्पृहा रघुपते हृदयेऽस्मदीये
सत्यं वदामि
च भवानखिलान्तरात्मा ॥
भक्तिं
प्रयच्छ रघुपुङ्गव निर्भरां मे
कामादिदोषरहितं
कुरु मानसं च ॥ २ ॥
हे रघुनाथ,
मी सत्य सांगतो आणि तुम्ही सर्वांचे अंतरात्मा असल्यामुळे सर्व जाणता की,
माझ्यामनात कोणतीही इच्छा नाही. हे रघुकुलश्रेष्ठ, आपली प्रगाढ भक्ती मला द्या व
माझे मन कामादी दोषांपासून रहित करा. ॥ २ ॥
अतुलितबलधामं
हेमशैलाभदेहं
दनुजवनकृशानुं
ज्ञानिनामग्रगण्यम् ।
सकलगुणनिधानं
वानराणामधीशं
रघुपतिप्रियभक्तं
वातजातं नमामि ॥ ३ ॥
अतुलनीय
बळाचे धाम, सुमेरु सुवर्ण पर्वताप्रमाणे कांतियुक्त देहधारी, दैत्यरुप वनाचा नाश
करण्यासाठीअग्निरुप, ज्ञानी पुरुषांमध्येअग्रगण्य, सर्व गुणांचे निधान, वानरांचा
स्वामी आणि श्रीरघुनाथांचा आवडता भक्तअसलेल्या पवनपुत्र हनुमानाला मी नमस्कार
करतो. ॥ ३ ॥
जमवंत के बचन सुहाए । सुनि हनुमंत हृदय अति भाए ॥
तब लगि मोहि परिखेहु तुम्ह भाई । सहि दुख कंद मूल फल खाई ॥
जांबवंताचे सुंदर बोलणे हनुमानाला खूप आवडले. तो म्हणाला, ‘
मित्रा, तुम्ही सर्वजण दुःख सहन करुन कंद, मुळे व फळे खाऊन माझी तोपर्यंत वाट
पाहा. ॥ १ ॥
जब लगि आवौं सीतहि देखी । होइहि काजु मोहि हरष बिसेषी ॥
यह कहि नाइ सबन्हि कहुँ माथा । चलेउ हरषि हियँ धरि रघुनाथा ॥
जोपर्यंत मी सीतेला पाहून परत येत नाही. हे काम निश्चिपणे
होणार, कारण मला मनातून फार आनंद वाटत आहे. ‘ असे म्हणून सर्वांना नमस्कार करीत व
हृदयामध्ये प्रभू श्रीरामांना धारण करुन हनुमान आनंदाने निघाला. ॥ २ ॥
सिंधु तीर एक भूधर सुंदर । कौतुक कूदि चढ़ेउ ता ऊपर ॥
बार बार रघुबीर सँभारी । तरकेउ पवनतनय बल भारी ॥
समुद्रकाठी एक पर्वत होता. हनुमान मजेने उडी मारुन त्यावर
चढला आणि वारंवार श्रीरामांचे स्मरण करीत अत्यंत बलवान असलेल्या हनुमानाने त्या
पर्वतावरुन मोठ्या वेगाने उड्डाण केले. ॥ ३ ॥
जेहिं गिरि चरन देइ हनुमंता । चलेउ सो गा पाताल तुरंता ॥
जिमि अमोघ रघुपति कर बाना । एही भॉंति चलेउ हनुमाना ॥
हनुमानाने ज्या पर्वतावरुन उडी घेतली, तो पर्वत तत्काळ खचून
पाताळात गेला. ज्याप्रमाणे श्रीरामांचा अमोघ बाण वेगाने जावा, त्याप्रमाणे हनुमान
वेगाने निघाला. ॥ ४ ॥
जलनिधि रघुपति दूत बिचारी । तैं मैनाक होहि श्रमहारी ॥
हनुमान हा रघुनाथांचा दूत आहे, असे समजून समुद्र मैनाक पर्वताला म्हणाला, ‘ हे मैनाका, तू याचा श्रम-परिहार कर.’ ॥ ५ ॥
दोहा—हनूमान तेहि परसा कर पुनि कीन्ह प्रनाम ।
राम काजु कीन्हें बिनु मोहि कहॉं बिश्राम ॥ १ ॥
हनुमानाने त्याला स्पर्श करुन प्रणाम केला
आणि म्हटले, ‘ प्रभू श्रीरामांचे काम केल्याविना मला विश्रांती कुठली ? ‘ ॥ १ ॥
जात पवनसुत देवन्ह देखा । जानैं कहुँ बल बुद्धि
बिसेषा ॥
सुरस नाम अहिन्ह कै माता । पठइन्हि आइ कही तेहिं
बाता ॥
पवनकुमार जात असल्याचे देवांना दिसले.
त्यांनी त्याच्या बल व बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी सर्पांची आई सुरसा हिला
पाठविले. ती येऊन हनुमानाला म्हणाली, ॥ १ ॥
आजु सुरन्ह मोहि दीन्ह अहारा । सुनत बचन कह
पवनकुमरा ॥
राम काजु करि फिरी मैं आवौं । सीता कइ सुधि
प्रभुहि सुनावौं ॥
‘ आज देवांनी मला तुझ्या रुपाने भोजन दिले
आहे. ‘ हे ऐकून हनुमान म्हणाला, ‘ श्रीरामांचे कार्य पूर्ण करुन मी परत येईन व
सीतेची वार्ता प्रभूंना सांगेन, ॥ २ ॥
तब तव बदन पैठिहउँ आई । सत्य कहउँ मोहि जान दे
माई ॥
कवनेहुँ जतन देइ नहिं जाना । ग्रससि न मोहि कहेउ
हनुमाना ॥
मग मी तुझ्या तोंडात शिरेन, तेव्हा तू मला
खा. हे माते ! सत्य सांगतो. आता मला जाऊ दे. ‘ काही केल्या सुरसेने त्याला जाऊ
दिले नाही, तेव्हा तो म्हणाला, ‘ मला खाऊन का टाकीत नाहीस ? ‘ ॥ ३ ॥
जोजन भरि तेहिं बदनु पसारा । कपि तनु कीन्ह दुगुन
बिस्तारा ॥
सोरह जोजन मुख तेहिं ठयऊ । तुरत पवनसुत बत्तिस
भयऊ ॥
तिने आपले तोंड एक योजनाएवढे पसरले. तेव्हा
हनुमंताने आपले शरीर त्याच्या दुप्पट मोठे केले. तिने सोळा योजनांएवढे मोठे तोंड
पसरले, तेव्हा हनुमान तत्काळ बत्तीस योजनांएवढा मोठा झाला. ॥ ४ ॥
जस जस सुरसा बदनु बढ़ावा । तासु दून कपि रुप
देखावा ॥
सत जोजन तेहिं आनन कीन्हा । अति लघु रुप पवनसुत
लीन्हा ॥
सुरसा आपले तोंड जसजसे मोठे करीत होती, तसतसे
हनुमानही त्याच्या दुप्पट आपले रुप दाखवीत होता. जेव्हा तिने आपले तोंड शंभर योजने
मोठे केले, तेव्हा हनुमानाने ताबडतोब अत्यंत छोटे रुप घेतले. ॥ ५ ॥
बदन पइठि पुनि बाहेर आवा । मागा बिदा ताहि सिरु
नावा ॥
मोहि सुरन्ह जेहि लागि पठावा । बुधि बल मरमु तोर
मैं पावा ॥
तो तिच्या तोंडात शिरुन पटकन बाहेर आला आणि त्याने
नमस्कार करुन निरोप मागितला. तेव्हा ती म्हणाली, ‘
देवांनी ज्यासाठी मला पाठविले होते, ते तुझ्या बुद्धि-
सामर्थ्याचे रहस्य मला समजले. ‘ ॥ ६ ॥
No comments:
Post a Comment