Monday, December 5, 2011

Shri Gurucharitra Mahatmya श्रीगुरुचरित्र महात्म्य

Shri Gurucharitra Mahatmya 


 Gurucharitra is a pious and holy Grantham (Book) in Marathi. This Grantham consists of total 52 chapters. This is written by Saraswati Gangadhar. It has arisen from the conversation between Guru Siddha and disciple Namadharak. Many Gurudev Datta devotees perform parayana (read it in seven days) many times during the year. Concentration, devotion and faith on this Grantham results in removing all difficulties, sorrow, poverty and bless devotees with peace, happiness and all sorts of wealth after performing the parayana. 
 The parayana is to be performed in seven days in following manner. 
Take a bath to clean and purify your body. 
Perform worship/pooja of the God to purify your mind. 
Bow to the God and elderly people in your family. 
Starting day and time of reading must be good. 
Reading place must be the same for all seven days.
If you are reading it for specific purpose, then say it and tell it to God Dattatreya before starting reading. 
Reader needs to be facing towards East or North while reading Gurucharitra. 
Devotee needs to keep picture of God Dattatreya in front of him. 
Holy lamp to be kept burning by using ghee. 
Day One: Read adhyay from 1st to 7th 
Day Two: Read adhyay from 8th to 18th 
Day Three: Read adhyay from 19th to 28th 
Day Four: Read adhyay from 29th to 34th 
Day Five: Read adhyay from 35th to 37th 
Day Six: Read adhyay from 38th to 43rd 
Day Seven: Read adhyay from 44th to 52nd. Sometimes the parayana of all 52 adhyayas is not possible; hence devotees perform parayana of a particular adhyaya for a specific reason as advised by Guru. 
Following Adhyayas are read for specific reasons.
Adhyaya 1 for getting a sadguru. 
Adhyaya 2 to receive blessing from Guru. 
Adhyaya 4 this adhyaya is God Dattatreya birth day adhyaya. 
Adhyaya 13 is for removing disease and obtaining good health. 
Adhyaya 14 is for removing all difficulties from life.
Adhyaya 18 is for removing poverty and acquiring wealth. 
Adhyaya 20 and 21 is for the good health of children.
Adhyaya 39 is to have santati (issue). 
Thus there is very importance of Gurucharitra in everybody’s life. Many devotees have obtained health, Wealth, happiness and peace in their life by performing parayana of Gurucharitra. 


श्रीगुरुचरित्र महात्म्य 


श्रीगुरुचरित्र हा एक अतिशय प्रासादिक असा मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ श्रीगुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे करत असतात. पारायण करणाराची श्रीगुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि विश्वास त्याच्यावरील सर्व संकटांचा नाश करून त्याला सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख तर देतेच पण त्याची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते. गुरुचरित्र हे शिष्य नामधारक व गुरु सिद्ध यांच्या संवादाचे भक्तिपूर्ण प्रकटीकरण आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे. 
गुरुचरित्राचे अध्याय: गुरुचरित्राचे एकंदर बावन्न अध्याय आहेत. 
पारायणाच्या पद्धती: पारायण हे सामान्य भक्त सात दिवसांचे करतात. तरी एक दिवसाचे किंवा तीन दिवसांचे पारायण करणारेहि काही भक्त आहेत. शुभ दिवशी, शुभ वेळी पारायण सुरु करावे. दत्तजयंतीच्या आधी दत्त जन्मापर्यंत पारायणासाठी दिवस शुद्धी बघण्याची आवशकता नसते. या वर्षी असे पारायण ३ डिसेंबर २०११ला सुरु करून १०डिसेंबर २०११ ला दत्तजयंतीच्या दिवशी पुरे करता येईल. 
पारायणासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे, अष्टगंध, हीना अत्तर, रांगोळी, तीन पाट, नारळ पारायणाची पूर्वतयारी: पारायणाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. आंघोळ करून संध्यादि व देवांची पूजा करावी. देवाला व घरांतील वडिलधार्‍यांना नमस्कार करावा. पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून, रांगोळी घालून तीन पाट अगर आसने मांडावीत. दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे. वाचणार्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे. आपल्या समोर चौरंगावर श्री गुरुदेव दत्तांची तजबीर ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर गुरुचरित्राची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे.तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे. सातही दिवस वाचनाची जागा एकच असावी. पारायण कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरवात करावी. वाचन मोठ्यानेच करावे मनांत करू नये. पारायण चालू असताना फोन/मोबाईल बंद ठेवावा. कोठच्याही प्रकारचे बोलणे पारायण चालू असताना करू नये. वाचन सुरु असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. वाचनांत एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे. काही विशिष्ट परिस्थितींत एकेका अध्यायाचे पारायण करण्याचीही प्रथा आहे.
प्रत्येक दिवशी अध्यायांचे वाचन:
पहिल्या दिवशी: १ ते  ७ अध्याय 
दुसर्या दिवशी:   ८ ते १८ अध्याय
तिसर्या दिवशी: १९ ते २८ अध्याय 
चौथ्या दिवशी: २९ ते ३४ अध्याय 
पाचव्या दिवशी: ३५ ते ३७ अध्याय 
सहाव्या दिवशी: ३८ ते ४३ अध्याय 
सातव्या दिवशी: ४४ ते ५२ अध्याय 
अशा प्रकारे सात दिवसांचे पारायण करावे. प्रत्येक दिवशी वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे. काहीतरी खावे. दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री भूमीवर शयन करावे. ब्रह्मचर्याचे पालन पारायण चालू असताना करावे. सात दिवस पारायण झाल्यावर अनुष्ठान म्हणून ब्राह्मण सुवासिनीला भोजन-दक्षिणा द्यावी. जेवणांत पुरणपोळी व घेवड्याची भाजी अवश्य करावी. अशा रीतीने पारायण पुरे करावे. 
अध्यायांचे महत्व: संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे अशक्य असेल तेव्हां आपल्या अडचणीनुसार फक्त विशिष्ट अध्यायाचेच पारायण करण्याचीही प्रथा आहे. 
अध्याय १ : सद्गुरू प्राप्तीसाठी वाचावा. 
अध्याय २: श्रीगुरुकृपा व्हावी म्हणून वाचावा. 
अध्याय ४: श्रीदत्त जन्माचा अध्याय. 
अध्याय १३: उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी व रोग मुक्तीसाठी वाचावा. 
अध्याय १४: प्रापंचिक अडीअडचणी दूर व्हाव्यांत म्हणून वाचावा. 
अध्याय १८: दारिद्र्य दूर व्हावे म्हणून वाचावा. 
अध्याय २० व २१ : संततीच्या आरोग्यासाठी म्हणून वाचावा. 
अध्याय ३९ : संतती प्राप्तीसाठी म्हणून वाचावा. 
अध्याय ३९ चे पारायण करण्याआधी श्लोक म्हणावा. 
नमस्ते योगिराजेंद्र दत्तात्रेयदयानिधे I 
षष्ठीवर्ष वयस्कायाः वंध्यायाः पुत्रदानवान् II 
तद्वन्मेयि कृपाकृत्वा श्रीशंभक्तं चिरायुषं I 
देहि मे तनयं दत्त त्वामहं शरणागतः II 
श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती टेंबे स्वामीमहाराज यांनी श्रीगुरूचरित्रावर संस्कृतमध्ये द्विसाहस्री, श्रीगुरुसंहिता हे ग्रंथ आणि त्रिशति गुरुचरित्र काव्य लिहिले आहेत. त्यांनी मराठीमध्ये सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. 
पारायणाचे लाभ: गुरुचरित्र पारायणामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यांपासून मुक्तता, रोगापासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे,पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरुप्राप्ती, जीवनांत शांती आणि अंती मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात. 
अशा रीतीने श्रीगुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनांत आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा आहे. अशा या श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने दत्तभक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनांत सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना.


गुरुचरित्र पारायण (Links)
गुरुचरित्र सर्व अध्याय लिखीत गुरुचरित्र आरतीसह  
फक्त Audio Links खालिलप्रमाणे
दिवस पहिला अध्याय १ ते ७
दिवस दुसरा   अध्याय ८ ते १८
दिवस तिसरा  अध्याय १९ ते २८
दिवस चौथा    अध्याय २९ ते ३४ 
दिवस पांचवा  अध्याय ३५ ते ३७
दिवस सहावा  अध्याय ३८ ते ४३
दिवस सातवा  अध्याय ४४ ते ५२
Shri Gurucharitra Mahatmya




Custom Search

8 comments:

Aditya Patwardhan said...

Thanks a lot for this info. 🙏🙂

Unknown said...

Gurucharitra striyani wachawe kay? Mazi parayanachi iccha aahe

Unknown said...

Shripad rajam sharanam prapadye, Digambara digambara Shripad valhabha digambara, shri swami samarth jai jai swami shri samarth. 🙏🙏🙏🙏🙏

Unknown said...

Yes please do read

bloggers world said...

Which adhyay is to get good Wife

Unknown said...

संकल्प सोडण्याची पद्धत कृपया सांगावे..तसेच एक दिवसीय पारायण फल दायी ठरते ?

bloggers world said...

Vivaha sathi kuthla adhyay tase ch tharavik samasyesathi sangnyat alela adhyay kiti divas mhanava

Unknown said...

Pitru pakshat vachan Kari shakato ka?