Thursday, April 28, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 6 Doha 12 To 14 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ६ दोहा १२ ते १४

ShriRamCharitMana
Aranyakand Part 6 
Doha 12 To 14 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ६ 
दोहा १२ ते १४

दोहा—मुनि समूह महँ बैठे सन्मुख सब की ओर ।

सरद इंदु तन चितवत मानहुँ निकर चकोर ॥ १२ ॥

मुनींच्या समाजामध्ये श्रीरामचंद्र सर्वांच्याकडे मुख करुन बसले. सर्व मुनी त्यांना एकटक पाहू लागले. असे वाटत होते की, जणू चकोर पक्ष्यांचा जमाव शरत्पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहात आहे. ॥ १२ ॥

तब रघुबीर कहा मुनि पाहीं । तुम्ह सन प्रभु दुराव कछु नाहीं ॥

तुम्ह जानहु जेहि कारन आयउँ । ताते तात न कहि समुझायउँ ॥

तेव्हा श्रीरामांनी मुनींना सांगितले की, ‘ हे प्रभो, तुमच्यापासून काही लपून नाही. मी ज्यासाठी आलो आहे, ते तुम्ही जाणताच. म्हणून हे मुनिवर्य ! मी आपल्याला स्पष्टपणे काही सांगितले नाही. ॥ १ ॥

अब सो मंत्र देहु प्रभु मोही । जेहि प्रकार मारौं मुनिद्रोही ॥

मुनि मुसुकाने सुनि प्रभु बानी । पूछेहु नाथ मोहि का जानी ॥

हे मुनिवर्य ! आता तुम्ही मला सल्ला द्या की, कशाप्रकारे मी मुनि-द्रोही राक्षसांना मारु ? ‘ प्रभूंची वाणी ऐकून मुनी हसले आणि म्हणाले,  ‘ हे नाथ, तुम्ही काय म्हणून मला हा प्रश्न विचारलात ? ॥ २ ॥

तुम्हरेइँ भजन प्रभाव अघारी । जानउँ महिमा कछुक तुम्हारी ॥

ऊमरि तरु बिसाल तव माया । फल ब्रह्मांड अनेक निकाया ॥

हे पापांचा नाश करणारे, मी जर तुमच्याच भजनाच्या प्रभावाने तुमचा काही थोडासाच महिमा जाणतो. तुमची माया ही औदुंबराच्या विशाल वृक्षासारखी आहे. अनेक ब्रह्मांडांचे समूह हे त्याचीच फळे आहेत. ॥ ३ ॥

जीव चराचर जंतु समाना । भीतर बसहिं न जानहिं आना ॥

ते फल भच्छक कठिन कराला । तव भयँ डरत सदा सोउ काला ॥

चराचर जीव हे उंबराच्या फळात राहणार्‍या लहान जंतूणप्रमाणे ब्रह्मांडरुपी फळांमध्ये राहतात आणि आपल्या त्या छोट्याशा जगाशिवाय दुसरे काही त्यांना माहीत नसते. त्या फळांना खाऊन टाकणारा कराल काल आहे. तो कालसुद्धा नेहमी तुम्हांला भिऊन असतो. ॥ ४ ॥

ते तुम्ह सकल लोकपति साईं । पूँछेहु मोहि मनुज की नाईं ॥

यह बर मागउँ कृपानिकेता । बसहु हृदयँ श्री अनुज समेता ॥

त्या सर्व लोकपालांचे स्वामी असूनही तुम्ही मला सामान्य मनुष्याप्रमाणे प्रश्न विचारला. मी असा वर मागतो की, तुम्ही सीता व लक्ष्मण यांच्यासह माझ्या हृदयात नित्य निवास करावा. ॥ ५ ॥

अबिरल भगति बिरति सतसंगा । चरन सरोरुह प्रीति अभंगा ॥

जद्यपि ब्रह्म अखंड अनंता । अनुभव गम्य भजहिं जेहि संता ॥

मला प्रगाढ भक्ती, वैराग्य, सत्संग व तुमच्या चरणकमली अतूट प्रेम मिळो. जरी तुम्ही अखंड व अनंत ब्रह्म आहात, अनुभवानेच तुम्हांला जाणता येते आणि संतजन तुमचे भजन करतात, ॥ ६ ॥

अस तव रुप बखानउँ जानउँ । फिरिफिरि सगुन ब्रह्म रति मानउँ ॥

संतत दासन्ह देहु बड़ाई । तातें मोहि पूँछेहु रघुराई ॥

जरी मी तुमचे हे रुप जाणतो आणि त्याचे वर्णनसुद्धा करतो, तरीही पुनःपुन्हा मी सगुण ब्रह्मावरच प्रेम करतो. तुम्ही नेहमी सेवकांना मोठेपण देता, म्हणून हे रघुनाथ, तुम्ही मला हे विचारले. ॥ ७ ॥   

है प्रभु परम मनोहर ठाऊँ । पावन पंचबटी तेहि नाऊँ ॥

दंडक बन पुनीत प्रभु करहू । उग्र साप मुनिबर कर हरहू ॥

हे प्रभो ! एक परम मनोहर व पवित्र स्थान आहे, त्याचे नाव पंचवटी. हे प्रभो, तुम्ही त्या दंडकवनातील पंचवटीस पवित्र करा आणि श्रेष्ठ गौतमऋषींचा कठोर शाप दूर करा. ॥ ८ ॥

बास करहु तहँ रघुकुल राया । कीजे सकल मुनिन्ह पर दाया ॥

चले राम मुनि आयसु पाई । तुरतहिं पंचबटी निअराई ॥

हे रघुकुलाचे स्वामी ! सर्व मुनींच्यावर दया करुन आपण तेथेच निवास करा. ‘ मुनींची आज्ञा मिळाल्यावर श्रीरामचंद्र तेथून निघाले आणि लवकरच पंचवटीजवळ पोहोचले. ॥ ९ ॥

दोहा---गीधराज सैं भेंट भइ बहु बिधि प्रीति बढ़ाइ ।

गोदावरी निकट प्रभु रहे परन गृह छाइ ॥ १३ ॥

तेथे गृधराज जटायु याची भेट झाली. त्याच्यावर खूप प्रेम व्यक्त करुन प्रभू रामचंद्र गोदावरीजवळच्या पंचवटीमध्ये पर्णकुटी बनवून राहू लागले. ॥ १३ ॥

जब ते राम कीन्ह तहँ बासा । सुखी भए मुनि बीती त्रासा ॥

गिरि बन नदीं ताल छबि छाए । दिन दिन प्रति अति होहिं सुहाए ॥

श्रीराम तेथे निवास करु लागले. तेव्हापासून मुनींना आनंद झाला. त्यांची भीती दूर झाली. तेथील पर्वत, वने, नदी व तलावांना शोभा आली. ते सर्व दिवसेंदिवस अधिक शोभिवंत दिसू लागले. ॥ १ ॥

खग मृग बृंद अनंदित रहहीं । मधुप मधुर गुंजत छबि लहहीं ॥

सो बन बरनि न सक अहिराजा । जहॉं प्रगट रघुबीर बिराजा ॥

पक्षी व पशू यांचे समूह आनंदित होऊन राहू लागले. भ्रमर गुंजारव करताना शोभून दिसत होते. जेथे प्रत्यक्ष श्रीराम विराजमान आहेत, त्या वनाचे वर्णन सर्पराज शेषसुद्धा करु शकणार नाही. ॥ २ ॥

एक बार प्रभु सुख आसीना । लछिमन बचन कहे छलहीना ॥

सुर नर मुनि सचराचर साईं । मैं पूछउँ निज प्रभु की नाईं ॥

एकदा प्रभू सुखाने बसले होते. त्यावेळी लक्ष्मण त्यांना सहजपणाने म्हणाला, ‘ हे देवता, मनुष्य, मुनी व चराचराचे स्वामी, मी तुम्हांला आपला स्वामी समजून विचारतो, ॥ ३ ॥

मोहि समुझाइ कहहु सोइ देवा । सब तजि करौं चरन रज सेवा ॥

कहहु ग्यान बिराग अरु माया । कहहु सो भगति करहु जेहिं दाया ॥

हे देव, मला समजावून ती गोष्ट सांगा की, ज्यायोगे सर्व काही सोडून देऊन तुमच्या चरणरजाची मी सेवा करीत राहीन. तसेच ज्ञान, वैराग्य आणि माया यांचे स्वरुप सांगा आणि ज्यामुळेतुम्ही कृपा करता, ती भक्ती मला सांगा. ॥ ४ ॥

दोहा---ईस्वर जीव भेद प्रभु सकल कहौ समुझाइ ।

जातें होइ चरन रति सोक मोह भ्रम जाइ ॥ १४ ॥

हे प्रभो, ईश्रर व जीव यांच्यातील भेदसुद्धा समजावून द्या. त्यामुळे तुमच्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल आणि माझे शोक, मोह आणि भ्रम नष्ट होतील. ॥ १४ ॥

थोरेहि महँ सब कहउँ बुझाई । सुनहु तात मति मन चित लाई ॥

मैं अरु मोर तोर तैं माया । जेहिं बस कीन्हे जीव निकाया ॥

श्रीराम म्हणाले, ‘ हे बंधो ! मी थोडक्यातच तुला सर्व समजावून सांगतो. तू मन, चित्त आणि बुद्धी लावून ऐक. मी आणि माझे, तू आणि तुझे असे मानणे हीच माया होय. तिनेच सर्व जीवांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. ॥ १ ॥

गो गोचर जहँ लगि मन जाई । सो सब माया जानेहु भाई ॥

तेहि कर भेद सुनहु तुम्ह सोऊ । बिद्या अपर अबिद्या दोऊ ॥

हे बंधू, इंद्रिये, विषय आणि जेथवर मन जाते, ती सर्व माया आहे, असे समज. तिचेही विद्या माया आणि अविद्या माया असे दोन भेद आहेत, ते ऐकून घे. ॥ २ ॥

एक दुष्ट अतिसय दुखरुपा । जा बस जीव परा भवकूपा ॥

एक रचइ जग गुन बस जाकें । प्रभु प्रेरित नहिं निज बल ताकें ॥

पहिली अविद्या माया ही दुष्ट आहे आणि अत्यंत दुःखरुप आहे. तिच्या अधीन झाल्यामुळे जीव हा संसाररुपी विहिरीत पडलेला आहे. आणि दुसरी विद्या माया. हीच्या अधीन गुण आहेत. ती जगाची निर्मिती करते. प्रभूच्याद्वारे ती प्रेरित होते. तिला स्वतःचे सामर्थ्य काहीही नाही. ॥ ३ ॥

ग्यान मान जहँ एकउ नाहीं । देख ब्रह्म समान सब माहीं ॥

कहिअ तात सो परम बिरागी । तृन सम सिद्धि तीनि गुन त्यागी ॥

जेथे मान इत्यादी एकही दोष नसतो आणि जो सर्वांठायी

 समान रुपाने ब्रह्म पाहातो, ते ज्ञान होय. हे वत्सा, ज्याने

 सर्व सिद्धींचा आणि तिन्ही गुणांचा कस्पटासारखा त्याग

 केलेला आहे, त्यालाच वैराग्यवान म्हटले पाहिजे. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 5 Doha 10 and 11 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ५ दोहा १० आणि दोहा ११

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 5 
Doha 10 and 11 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ५ 
दोहा १० आणि दोहा ११

दोहा---तब मुनि हृदयँ धीर धरि गहि पद बारहिं बार ।

निज आश्रम प्रभु आनि करि पूजा बिबिध प्रकार ॥ १० ॥

मग मुनींनी मनात धीर धरुन वारंवार प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला. नंतर ते प्रभूंना आपल्या आश्रमात घेऊन गेले व त्यांची त्यांनी अनेक प्रकारे पूजा केली. ॥ १० ॥

कह मुनि प्रभु सुनु बिनती मोरी । अस्तुति करौं कवन बिधि तोरी ॥

महिमा अमित मोरि मति थोरी । रबि सन्मुख खद्योत अँजोरी ॥

मुनी म्हणू लागले, ‘ हे प्रभो, माझी विनंती ऐका. मी कशाप्रकारे तुमची स्तुती करु ? तुमचा महिमा अपार आहे आणि माझी बुद्धी अल्प आहे, जणू सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश. ॥ १ ॥

श्याम तामरस दाम शरीरं । जटा मुकुट परिधन मुनिचीरं ॥

पाणि चाप शर कटि तूणीरं । नौमि निरंतर श्रीरघुबीरं ॥

हे नीलकमलांच्या माळेसारखे सावळे शरीर असलेले, हे जटामुकुट आणि मुनींची वल्कल वस्त्रे नेसलेले, हातांमध्ये धनुष्य-बाण व कटीला भाते बांधलेले श्रीराम, मी तुम्हांला निरंतर नमस्कार करतो. ॥ २ ॥

मोह विपिन घन दहन कृशानुः । संत सरोरुह कानन भानुः ॥

निसिचर करि वरूथ मृगराजः । त्रातु सदा नो भव खग बाजः ॥

जे मोहरुपी दाट वनास जाळणारा अग्नी आहेत, संतरुपी कमल-वनास प्रफुल्लित करणारा सूर्य आहेत, राक्षसरुपी हत्तींच्या कळपास लोळवणारे सिंह आहेत आणि जन्ममृत्युरुपी पक्ष्याला मारणारा बहिरी ससाणा आहेत, ते प्रभू श्रीराम सदा आमचे रक्षण करोत. ॥ ३ ॥

अरुण नयन राजीव सुवेशं । सीता नयन चकोर निशेशं ॥

हर हृदि मानस बाल मरालं । नौमि राम उर बाहु विशालं ॥

हे लाल कमळासारखे नेत्र व सुंदर वेष धारण करणारे, सीतेच्या नेत्ररुपी चकोराचे चंद्र, श्रीशिवांच्या मानसरुप मानससरोवरातील बालहंस, विशाल हृदय व बाहू असलेले हे श्रीरामप्रभू ! मी तुमची स्तुती करतो. ॥ ४ ॥

संशय सर्प ग्रसन उरगादः । शमन सुकर्कश तर्क विषादः ॥

भव भंजन रंजन सुर यूथः । त्रातु सदा नो कृपा वरुथः ॥

जे संशयरुप सर्पाला ग्रासणारे गरुड, जे अत्यंत कठोर तर्काने उत्पन्न होणारा विषाद नाहींसा करणारे, जे जन्मृत्यू नाहीसा करणारे व देवसमुदायाला आनंद देणारे ते कृपानिधान श्रीराम नेहमी आमचे रक्षण करोत. ॥ ५ ॥

निर्गुण सगुण विषम सम रुपं । ज्ञान गिरा गोतीतमनूपं ॥

अमलमखिलमनवद्यमपारं । नौमि राम भंजन महि भारं ॥

हे निर्गुण-सगुण, विषम—समरुप, हे ज्ञान, वाणी आणि इंद्रियांना अतीत, हे अनुपम, निर्मल, दोषरहित, अनंत व पृथ्वीचा भार हरण करणारे श्रीराम, मी तुम्हांला नमस्कार करतो. ॥ ६ ॥

भक्त कल्पपादप आरामः । तर्जन क्रोध लोभ मद कामः ॥

अति नागर भव सागर सेतुः । त्रातु सदा दिनकर कुल केतुः ॥

जे भक्तांसाठी कल्पवृक्षांची उद्याने आहेत, क्रोध, लोभ, मद आणि काम यांना भयभीत करणारे आहेत, अत्यंत चतुर आहेत आणि संसाररुपी समुद्र तरुन जाण्यासाठी सेतुरुप आहेत, ते सूर्यकुलाचा ध्वज असणारे श्रीराम सदा माझे रक्षण करोत. ॥ ७ ॥

अतुलित भुज प्रताप बल धामः । कलि मल विपुल विभंजन नामः ॥

धर्म वर्म नर्मद गुण ग्रामः । संतत शं तनोतु मम रामः ॥

ज्यांच्या भुजांचा प्रताप अतुलनीय आहे, जे बलाचे धाम आहेत, ज्यांचे नाव कलियुगातील फार मोठ्या पापांचा नाश करणारे आहे, जे धर्मरक्षक असून ज्यांचा गुणसमूह आनंद देणारा आहे, ते श्रीराम निरंतर माझ्या कल्याणचा विस्तार करोत. ॥ ८ ॥

जदपि बिरज ब्यापक अबिनासी । सब के हृदयँ निरंतर बासी ॥

तदपि अनुज श्री सहित खरारी । बसतु मनसि मम काननचारी ॥

जरी तुम्ही निर्मल, व्यापक, अविनाशी आणि सर्वांच्या हृदयात निरंतर वास करणारे आहात तरीही हे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसह वनात फिरणारे, याच रुपात तुम्ही माझ्या हृदयात निवास करावा. ॥ ९ ॥

जे जानहिं ते जानहुँ स्वामी । सगुन अगुन उर अंतरजामी ॥

जो कोसलपति राजिव नयना । करउ सो राम हृदय मम अयना ॥

हे स्वामी, तुम्हांला जे सगुण, निर्गुण, अंतर्यामी म्हणून जाणतात, ते तसे जाणोत. माझ्या हृदयात कोसलपती कमलनयन श्रीराम या रुपातच तुम्ही निवास करावा. ॥ १० ॥

अस अभिमान जाइ जनि भोरे । मैं सेवक रघुपति पति मोरे ॥

सुनि मुनि बचन राम मन भाए । बहुरि हरषि मुनिबर उर लाए ॥

मी सेवक आहे आणि श्रीरघुनाथ माझे स्वामी आहेत, असा अभिमान चुकूनही सुटू नये.’ मुनींचे वचन ऐकून श्रीराम मनातून खूप प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी आनंदाने त्या श्रेष्ठ मुनींना हृदयाशी धरले. ॥ ११ ॥

परम प्रसन्न जानु मुनि मोही । जो बर मागहु देउँ सो तोही ॥

मुनि कह मैं बर कबहुँ न जाचा । समुझि न परइ झूठ का साचा ॥

आणि म्हटले, ‘ हे मुनी, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, असे समजा. जो वर मागाल, तो मी तुम्हांला देईन.’ तेव्हा सुतीक्ष्ण म्हणाले, ‘ मी वर तर कधी मागितलाच नाही. मला समजतच नाही की, काय खोटे व काय खरे आहे. मग काय मागू व काय नको ? ॥ १२ ॥

तुम्हहि नीक लागै रघुराई । सो मोहि देहु दास सुखदाई ॥

अबिरल भगति बिरति बिग्याना । होहु सकल गुन ग्यान निधाना ॥

म्हणून हे रघुनाथ, हे दासांना सुख देणारे , जे तुम्हांला चांगले वाटेल, ते मला द्या.’ श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ हे मुनी, तुम्ही प्रगाढ भक्ती, वैराग्य, विज्ञान आणि सर्व गुणांचे व ज्ञानाचे निधान व्हाल.' ॥ १३ ॥

प्रभु जो दीन्ह सो बरु मैं पावा । अब सो देहु मोहि जो भावा ॥

तेव्हा मुनी म्हणाले की, ‘ प्रभूंनी जे वरदान दिले, ते मला मिळाले. आता मला जे चांगले वाटते, ते द्या. ॥ १४ ॥

दोहा—अनुज जानकी सहित प्रभु चाप बान धर राम ।

मम हिय गगन इंदु इव बसहु सदा निहकाम ॥ ११ ॥

हे प्रभो ! हे श्रीराम, लक्ष्मण व सीतेसह धनुष्य-बाण-धारी या रुपात तुम्ही माझ्या हृदयाकाशात चंद्राप्रमाणे नित्य निवास करावा.’ ॥ ११ ॥

एवमस्तु करि रमानिवासा । हरषि चले कुंभज रिषि पासा ॥

बहुत दिवस गुर दरसनु पाएँ । भए मोहि एहिं आश्रम आएँ ॥

‘ तथास्तु ‘ असे म्हणून लक्ष्मीनिवास श्रीरामचंद्र आनंदाने अगस्त्य ऋषींच्याकडे निघाले. मग सुतीक्ष्ण मुनी म्हणाले, ‘ गुरु अगस्ती यांचे दर्शन घेऊन या आश्रमात आल्याला मला पुष्कळ दिवस झाले. ॥ १ ॥

अब प्रभु संग जाउँ गुर पाहीं । तुम्ह कहँ नाथ निहोरा नाहीं ॥

देखि कृपानिधि मुनि चतुराई । लिए संग बिहसे द्वौ भाई ॥

आता मीही हे प्रभू, तुमच्याबरोबर गुरुजींच्या जवळ येतो. हे नाथ, यामध्ये माझा तुमच्यावर काहीही उपकार नाही.’ मुनींचे चातुर्य पाहून कृपानिधी श्रीरामांनी त्यांना आपल्यासोबत घेतले. मग दोघे बंधू हसू लागले. ॥ २ ॥

पंथ कहत निज भगति अनूपा । मुनि आश्रम पहुँचे सुरभूप ॥

तुरत सुतीछन गुर पहिं गयऊ । करि दंडवत कहत अस भयऊ ॥

वाटेत आपल्या अनुपम भक्तीचे वर्णन करीत देवांचे राजराजेश्र्वर श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात पोहोचले. सुतीक्ष्ण त्वरित गुरु अगस्त्यांपाशी गेले आणि दंडवत करुन म्हणू लागले. ॥ ३ ॥

नाथ कोसलाधीस कुमारा । आए मिलन जगत आधारा ॥

राम अनुज समेत बैदेही । निसि दिनु देव जपत हहु जेही ॥

‘ गुरुवर्य, तुम्ही रात्रंदिवस ज्यांचा जप करता ते अयोध्येचे राजे दशरथ यांचे कुमार जगदाधार श्रीरामचंद्र हे लक्ष्मण व सीता यांचे सोबत तुम्हांला भेटायला येत आहेत. ॥ ४ ॥

सुनत अगस्ति तुरत उठि धाए । हरि बिलोकि लोचन जल छाए ॥

मुनि पद कमल परे द्वौ भाई । रिषि अति प्रीति लिए उर लाई ॥

हे ऐकताच अगस्त्य मुनी त्वरित उठून धावले. भगवंतांना पाहताच त्यांच्या नेत्रांतून आनंद आणि प्रेमाचे अश्रू वाहू लागले. दोन्ही बंधूंनी मुनींच्या चरणी लोटांगण घातले. ऋषींनी उठवून मोठ्या प्रेमाने त्यांना हृदयाशी धरले. ॥ ५ ॥   

सादर कुसल पूछि मुनि ग्यानी । आसन बर बैठारे आनी ॥

पुनि करि बहु प्रकार प्रभु पूजा । मोहि सम भाग्यवंत नहिं दूजा ॥

ज्ञानी मुनींनी आदराने क्षेम-कुशल विचारुन त्यांना श्रेष्ठ आसनावर बसविले. नंतर अनेक प्रकारे प्रभूंची पूजा करुन म्हटले, ‘ माझ्यासारखा भाग्यवान असा दुसरा कोणी नाही.’ ॥ ६ ॥

जहँ लगि रहे अपर मुनि बृंदा । हरषे सब बिलोकि सुखकंदा ॥

तेथे जितके इतर मुनिगण होते, ते सर्व आनंदकंद

 श्रीरामांचे दर्शन घेऊन आनंदित झाले. ॥ ७ ॥



Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 4 Doha 7 to 9 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ४ दोहा ७ ते ९

ShriRamCharitManas
Aranyakand Part 4 
Doha 7 to 9 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ४ 
दोहा ७ ते ९

दोहा—देखि राम मुख पंकज मुनिबर लोचन भृंग ।

सादर पान करत अति धन्य जन्म सरभंग ॥ ७ ॥

श्रीरामचंद्रांचे मुखकमल पाहून मुनिश्रेष्ठ शरभंगांचे नेत्ररुपी भ्रमर अत्यंत आदराने त्याचे सौंदर्यपान करु लागले. शरभंगांचा जन्म धन्य होय. ॥ ७ ॥

कह मुनि सुनु रघुबीर कृपाला । संकर मानस राजमराला ॥

जात रहेउँ बिरंचि के धामा । सुनेउँ श्रवन बन ऐहहिं रामा ॥

मुनी म्हणाले, ‘ हे कृपाळू रघुवीर, हे श्रीशंकरांच्या मनरुपी मनाससरोवरातील राजहंस, ऐका. मी ब्रह्मलोकी जात होतो. इतक्यात माझ्या कानी आले की, श्रीराम वनात येणार आहेत. ॥ १ ॥

चितवन पंथ रहेउँ दिन राती । अब प्रभु देखि जुड़ानी छाती ॥

नाथ सकल साधन मैं हीना । कीन्ही कृपा जानि जन दीना ॥

तेव्हापासून रात्रंदिवस मी तुमची वाट पाहात आहे. आज प्रभूंना पाहून मन शांत झाले. हे नाथ, मी कोणतेही साधन केलेले नाही. तरीही तुम्ही आपला दीन सेवक समजून माझ्यावर कृपा केली. ॥ २ ॥

सो कछु देव न मोहि निहोरा । निज पन राखेउ जन मन चोरा ॥

तब लगि रहहु दीन हित लागी । जब लगि मिलौं तुम्हहि तनु त्यागी ॥

हे देवा, हा काही माझ्यावर तुमचा उपकार नाही. हे भक्ताचे हृदय चोरणारे, असे करुन तुम्ही आपल्या ब्रीदाचे पालन केलेत. आता मी शरीर सोडून तुमच्या परमधामात जात नाही, तोपर्यंत या दीन सेवकाच्या कल्याणासाठी येथे थांबा. ‘ ॥ ३ ॥

जोग जग्य जप तप ब्रत कीन्हा । प्रभु कहँ देइ भगति बर लीन्हा ॥

एहि बिधि सर रचि मुनि सरभंगा । बैठे हृदयँ छाड़ि सब संगा ॥

योग, यज्ञ, जप, तप व व्रत इत्यादी जे काही शरभंगांनी केले होते, ते सर्व प्रभूंना अर्पण केले आणि त्याबदली भक्तीचे वरदान घेतले. अशाप्रकारे दुर्लभ भक्ती प्राप्त केल्यावर मुनी शरभंगांनी चिता रचली व मनःपूर्वक सर्व आसक्ती सोडून ते चितेवर बसले. ॥ ४ ॥

दोहा—सीता अनुज समेत प्रभु नील जलद तनु स्याम ॥

मम हियँ बसहु निरंतर सगुनरुप श्रीराम ॥ ८ ॥

ते म्हणाले, ‘ हे नील मेघाप्रमाणे श्याम शरीर असणार्‍या सगुण रुप श्रीराम, सीता व लक्ष्मणासह तुम्ही माझ्या हृदयावर निरंतर निवास करा.’ ॥ ८ ॥

अस कहि जोग अगिनि तनु जारा । राम कृपॉं बैकुंठ सिधारा ॥

ताते मुनि हरि लीन न भयऊ । प्रथमहिं भेद भगति बर लयऊ ॥

असे म्हणून शरभंगांनी योगाग्नीने आपले शरीर भस्म करुन टाकले व ते श्रीरामांच्या कृपेने वैकुंठास गेले. त्यांनी भेद-भक्तीचा वर पूर्वीच घेतला होता, म्हणून ते भगवंतामध्ये लीन झाले नाहीत. ॥ १ ॥  

रिषि निकाय मुनिबर गति देखी । सुखी भए निज हृदयँ बिसेषी ॥

अस्तुति करहिं सकल मुनि बृंदा । जयति प्रनत हित करुना कंदा ॥

ऋषि-समाज मुनिश्रेष्ठ शरभंगांची ती दुर्लभ गती पाहून आपल्या मनातून खूप सुखावला. सर्व मुनिवृदं श्रीरामांची स्तुती करु लागला. ते म्हणत होते, ‘ शरणागतहितकारी करुणाकंद प्रभूंचा विजय असो.’ ॥ २ ॥

पुनि रघुनाथ चले बन आगे । मुनिबर बृंद बिपुल सँग लागे ॥

अस्थि समूह देखि रघुराया । पूछी मुनिन्ह लागि अति दाया ॥

नंतर श्रीरघुनाथ पुढील वनात गेले. श्रेष्ठ मुनींची अनेक मंडळे त्यांच्याबरोबर निघाली. वाटेत एका ठिकाणी हाडांचे ढीग पाहून श्रीरामांना अतिशय दया आली. त्यांनी मुनींना विचारले, ॥ ३ ॥

जानतहूँ पूछिअ कस स्वामी । सबदरसी तुम्ह अंतरजामी ॥

निसिचर निकर सकल मुनि खाए । सुनि रघुबीर नयन जल छाए ॥

मुनी म्हणाले, ‘ हे स्वामी, तुम्ही सर्वदर्शी आणि अतंर्यामी आहात. सर्व जाणत असतानाही आम्हांस कां विचारता ? राक्षसांच्या झुंडींनी सर्व मुनींना खाऊन टाकले, त्यांची ही हाडे आहेत. ‘ हे ऐकताच श्रीरघुवीरांच्या नेत्रंमध्ये करुणेमुळे पाणी आले. ॥ ४ ॥

दोहा---निसिचर हीन करउँ महि भुज उठाइ पन कीन्ह ।

सकल मुनिन्ह के आश्रमन्हि जाइ सुख दीन्ह ॥ ९ ॥

त्यावेळी श्रीरामांनी हात उचलून प्रतिज्ञा केली की, ’ मी पृथ्वीला राक्षसरहित करुन टाकीन. ‘ नंतर त्यानी सर्व मुनींच्या आश्रमांना भेटी देऊन दर्शन व संभाषणाचे त्यांना सुख दिले. ॥ ९ ॥

मुनि अगस्ति कर सिष्य सुजाना । नाम सुतीछन रति भगवाना ॥

मन क्रम बचन राम पद सेवक । सपनेहुँ आन भरोस न देवक ॥

अगस्त्य मुनींचे सुतीक्ष्ण नावाचे एक ज्ञानी शिष्य होते. त्यांना भगवंतांविषयी अत्यंत प्रेम होते. ते काया-वाचा-मनाने श्रीरामांच्या चरणांचे सेवक होते. त्यांना स्वप्नातही इतर कोणत्याही देवाविषयी आदर वाटत नव्हता. ॥ १ ॥

प्रभु आगवनु श्रवन सुनि पावा । करत मनोरथ आतुर धावा ॥

हे बिधि दीनबंधु रघुराया । मी से सठ पर करिहहिं दाया ॥

जेव्हा त्यांनी प्रभूंचे आगमन होत असल्याचे ऐकले, तेव्हा ते अनेक मनोरथ करीत आतुर होऊन धावत निघाले. ते मनात म्हणत होते की, ‘ हे विधात्या, दीनबंधू श्रीरघुनाथ माझ्यासारख्या दुष्टावरही दया करतील काय ? ॥ २ ॥

सहित अनुज मोहि राम गोसाईं । मिलिहहिं निज सेवक की नाईं ॥

मोरे जियँ भरोस दृढ़ नाहीं । भगति बिरति न ग्यान मन माहीं ॥

स्वामी राम हे लक्ष्मणासह मला आपल्या सेवकाप्रमाणे भेटतील काय ? माझ्या मनाला याची खात्री वाटत नाही. कारण माझ्या मनात भक्ती, वैराग्य किंवा ज्ञान यांपैकी काहीही नाही. ॥ ३ ॥

नहिं सतसंग जोग जप जागा । नहिं दृढ़ चरन कमल अनुरागा ॥

एक बानि करुनानिधान की । सो प्रिय जाकें गति न आन की ॥

मी कधी सत्संग, योग, जप किंवा यज्ञसुद्धा केलेला नाही; आणि प्रभूंच्या चरणी माझे दृढ प्रेमही नाही. एक मात्र खरे की, ज्याला कुणाचा आधार नाही, तो प्रभूंना प्रिय असतो, असा दयेचे भांडार असलेल्या प्रभूंचा स्वभाव आहे. ॥ ४ ॥

होइहैं सुफल आजु मम लोचन । देखि बदन पंकज भव मोचन ॥

निर्भर प्रेम मगन मुनि ग्यानी । कहि न जाइ सो दस भवानी ॥

भगवंतांच्या या स्वभावाची आठवण येताच ते आनंदमग्न होऊन म्हणू लागले की, ‘ भवबंधनांतून मुक्त करणारे प्रभूंचे मुखकमल पाहून आज माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. ‘ शिव म्हणतात, ‘ हे भवानी, ज्ञानी मुनी प्रेमामध्ये पूर्णपणे निमग्न झाले. त्यांची ती दशा अवर्णनीय होती. ॥ ५ ॥

दिसि अरु बिदिसि पंथ नहिं सूझा । को मैं चलेउँ कहॉं नहिं बूझा ॥

कबहुँक फिरि पाछें पुनि जाई । कबहुँक नृत्य करइ गुन गाई ॥

त्यांना दिशा किंवा रस्ता हे काहीच कळत नव्हते. आपण कोण आहोत आणि कुठे जात आहोत, हे काहीही कळत नव्हते. ते कधी मागे वळून पुन्हा पुढेचालू लागत आणि कधी प्रभूंचे गुण गात नाचू लागत. ॥ ६ ॥

अबिरल प्रेम भगति मुनि पाई । प्रभु देखैं तरु ओट लुकाई ॥

अतिसय प्रीति देखि रघुबीरा । प्रगटे हृदयँ हरन भव भीरा ॥

मुनींनी प्रगाढ अशी प्रेमभक्ती प्राप्त केली होती. प्रभू श्रीराम वृक्षाआडून लपून भक्तीची ती प्रेमोन्मत्त दशा पाहात होते. मुनींचे अत्यंत प्रेम पाहून भव-भय हरण करणारे श्रीरघुनाथ मुनींच्या हृदयांत प्रगट झाले. ॥ ७ ॥

मुनि मग माझ अचल होइ बैसा । पुलक सरीर पनस फल जैसा ॥

तब रघुनाथ निकट चलि आए । देखि दसा निज जन मन भाए ॥

हृदयात प्रभूंचे दर्शन झाल्याने मुनी रस्त्यामध्येच स्तब्ध बसले. त्यांचे शरीर रोमांच्यामुळे फणसासारखे काटेदार झाले. तेव्हा श्रीरघुनाथ त्यांच्याजवळ आले आणि आपल्या भक्ताची प्रेमदशा पाहून मनाने अत्यंत प्रसन्न झाले. ॥ ८ ॥

मुनिहि राम बहु भॉंति जगावा । जाग न ध्यान जनित सुख पावा ॥

भूप रुप तब राम दुरावा । हृदयँ चतुर्भुज रुप देखावा ॥

श्रीरामांनी त्यांना जागे करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते जागे झाले नाहीत, कारण त्यांना प्रभूंच्या ध्यानाचे सुख लाभत होते. तेव्हा श्रीरामांनी आपले राजरुप लपविले आणि मुनींच्या हृदयात आपले चतुर्भुजरुप प्रकट केले. ॥ ९ ॥

मुनि अकुलाइ उठा तब कैसें । बिकल हीन मनि फनिबर जैसें ॥

आगें देखि राम तन स्यामा । सीता अनुज सहित सुख धामा ॥

आपले इष्ट-स्वरुप अंतर्धान होताच, जसा श्रेष्ठ मणिधर साप मण्याविना व्याकूळ होऊन जातो, तसे मुनी व्याकूळ झाले. मुनींना आपल्या डोळ्यांसमोर सीता व लक्ष्मणासह श्यामसुंदर मूर्ती असलेले सुखधाम श्रीराम दिसले. ॥ १० ॥

परेउ लकुट इव चरनन्हि लागी । प्रेम मगन मुनिबर बड़भागी ॥

भुज बिसाल गहि लिए उठाई । परम प्रीति राखे उर लाई ॥

प्रेमात मग्न झालेल्या त्या भाग्यवान श्रेष्ठ मुनींनी दंडवत करीत श्रीरामांच्या चरणी लोळण घेतली. श्रीरामांनी आपल्या विशाल भुजांनी धरुन त्यांना उठवले आणि मोठ्या प्रेमाने हृदयाशी धरले. ॥ ११ ॥

मुनिहि मिलत अस सोह कृपाला । कनक तरुहि जनु तमाला ॥

राम बदनु बिलोक मुनि ठाड़ा । मानहुँ चित्र माझ लिखि काढ़ा ॥

कृपाळू श्रीरामचंद्र मुनींना भेटताना असे वाटत होते की,

 जणू सोन्याच्या वृक्षाला तमाल वृक्ष मिठि मारत आहे.

 मुनी निस्तब्ध उभे होते आणि एकटक श्रीरामांचे मुख

 न्याहाळत होते; जणू ते चित्र चितारुन बनविले असावे. 

॥ १२ ॥ 

 


Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 3 Sopan 5 and Chanda 6 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ३ सोपान ५ आणि छंद ६

 

ShriRamCharitManas
Aranyakand Part 3 
Sopan 5 and Chanda 6 
श्रीरामचरितमानस
अरण्यकाण्ड भाग ३ 
सोपान ५ आणि छंद ६

सो०---सहज अपावनि नारि पति सेवत सुभ गति लहइ ।

जसु गावत श्रुति चारि अजहुँ तुलसिका हरिहि प्रिय ॥ ५ ( क ) ॥

स्त्री जन्माने अपवित्र आहे. परंतु पतीची सेवा केल्याने ती अनायासच शुभ गती प्राप्त करते. पातिव्रत्य धर्मामुळे तुळस ही आजही भगवंतांना प्रिय आहे आणि चारी वेद तिची कीर्ती गातात. ॥ ५ ( क ) ॥

सुनु सीता तव नाम सुमिरि नारि पतिब्रत करहिं ।

तोहि प्रानप्रिय राम कहिउँ कथा संसार हित ॥ ५ ( ख ) ॥

हे सीते, ऐक. तुझे नाव घेऊनच स्त्रिया पातिव्रत्य धर्माचे पालन करतील. तुला श्रीराम हे प्रांणाहून प्रिय आहेत. ही पातिव्रत्य धर्माची गोष्ट मी जगातील स्त्रियांच्या हितासाठी सांगितली आहे. ‘ ॥ ५ ( ख ) ॥

सुनि जानकी परम सुखु पावा । सादर तासु चरन सिरु नावा ॥

तब मुनि सन कह कृपानिधाना । आयसु होइ जाउँ बन आना ॥

हे ऐकून जानकीला खूप आनंद झाला आणि तिने मोठ्या आदराने अनसूयेच्या चरणी मस्तक ठेवले. मग कृपेची खाण असलेल्या श्रीरामांनी मुनींना सांगितले की, ‘ आज्ञा असेल तर आता मी दुसर्‍या वनांत जातो. ॥ १ ॥

संतत मो पर कृपा करेहू । सेवक जानि तजेहु जनि नेहू ॥

धर्म धुरंधर प्रभु कै बानी । सुनि सप्रेम बोले मुनि ग्यानी ॥

माझ्यावर निरंतर कृपा ठेवा. आणि आपला सेवक मानून माझ्यावरील प्रेम सोडू नका. धर्मधुरंधर प्रभू श्रीरामांचे बोलणे ऐकून ज्ञानी मुनी प्रेमाने म्हणाले, ॥ २ ॥

जासु कृपा अज सिव सनकादी । चहत सकल परमारथ बादी ॥

ते तुम्ह राम अकाम पिआरे । दीन बंधु मृदु बचन उचारे ॥

‘ हे रामा, ब्रह्मदेव, शिव व सनकादिक हे सर्व परमार्थवादी ज्यांची कृपा इच्छितात, ते निष्काम पुरुषांनाही प्रिय आणि दीनांचे बंधू असलेले भगवान तुम्हीच आहात. म्हणून असे गोड शब्द बोलत आहात. ॥ ३ ॥

अब जानी मैं श्री चतुराई । भजी तुम्हहि सब देव बिहाई ॥

जेहि समान अतिसय नहिं कोई । ता कर सील कस न अस होई ॥

आता मला श्रीलक्ष्मीचे चातुर्य समजले की, तिने इतर सर्व देव सोडून तुम्हांलाच का भजले ते. सर्व गोष्टींमध्ये ज्यांच्याहून फार मोठा दुसरा कोणीही नाही, त्याचे शील असे श्रेष्ठ का बरे असणार नाही ? ॥ ४ ॥

केहि बिधि कहौं जाहु अब स्वामी । कहहु नाथ तुम्ह अंतरजामी ॥

अस कहि प्रभु बिलोकि मुनि धीरा । लोचन जल बह पुलक सरीरा ॥

हे स्वामी, मी, कसे म्हणू की ‘ आता जा ‘ हे नाथ, तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्हीच सांगा. ‘ असे म्हणून धीर मुनी प्रभूंच्याकडे पाहू लागले. मुनींच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांचे शरीर रोमांचित झाले. ॥ ५ ॥

छं०- ---तन पुलक निर्भर प्रेम पूरन नयन मुख पंकज दिए ।

मन ग्यान गुन गोतीत प्रभु मैं दीख जप तप का किए ॥

जप जोग धर्म समूह तें नर भगति अनुपम पावई ।

रघुबीर चरित पुनीत निसि दिन दास तुलसी गावई ॥

अत्रिमुनी अत्यंत प्रेमात मग्न होते, त्यांचे शरीर पुलकित होत होते आणि नेत्र श्रीरामांच्या मुखकमलावर लागले होते. ते मनात विचार करीत होते की, मी असे कोणते जप-तप केले होते की, ज्याच्यामुळे मन, ज्ञान, गुण व इंद्रिये यांच्या पलीकडील प्रभूंचे दर्शन मला लाभले. जप, योग आणि धर्म-समूह यांमुळे मनुष्याला अनुपम भक्ती प्राप्त होते. अशा श्रीरघुवीरांचे पवित्र चरित्र तुलसेदास रात्रंदिवस गात आहेत. ॥ ६ ॥

दोहा---कलिमल समन दमन मन राम सुजस सुखमूल ।

सादर सुनहिं जे तिन्ह पर राम रहहिं अनुकूल ॥ ६ (क ) ॥   

श्रीरामचंद्रांची सुंदर कीर्ती कलियुगातील पापांचा नाश करणारी, मनाचे दमन करणारी आणि सुखाचे मूळ आहे. जे लोक ती आदराने ऐकतात, त्यांच्यावर श्रीराम प्रसन्न असतात. ॥ ६ ( क ) ॥

सो०---कठिन काल मल कोस धर्म न ग्यान न जोग जप ।

परिहरि सकल भरोस रामहि भजहिं ते चतुर नर ॥ ६ ( ख ) ॥

हा कठीण कलिकाळ पापांचा खजिना आहे. यात धर्म, ज्ञान, योग व जप योग्य प्रकारे होत नाही. म्हणून या युगात जे लोक इतर सर्वांवरचा विश्वास सोडून श्रीरामांनाच भजतात, तेच धन्य होत. ॥ ६ ( ख ) ॥

मुनि पद कमल नाइ करि सीसा । चले बनहि सुर नर मुनि ईसा ॥

आगें राम अनुज पुनि पाछें । मुनि बर बेष बने अति काछें ॥

मुनींच्या चरणीं नतमस्तक होऊन देव, मनुष्य व मुनींचे स्वामी असलेले श्रीराम पुढील वनाकडे निघाले. पुढे श्रीराम, त्यांच्यामागे लक्ष्मण असे ते दोघेही मुनि-वेषामध्ये फारच शोभून दिसत होते. ॥ १ ॥

उभय बीच श्री सोहइ कैसी । ब्रह्म जीव बिच माया जैसी ॥

सरिता बन गिरि अवघड घाटा । पति पहिचानि देहिं बर बाटा ॥

ज्याप्रमाणे परब्रह्म व जीव यांच्यामध्यें माया असते, त्याप्रमाणे राम-लक्ष्मण यांच्यामध्ये सीता शोभत होती. नदी, वन, पर्वत आणि दुर्गम घाट हे सर्व आपल्या स्वामींना ओळखून चांगल्या प्रकारे वाट देत होते. ॥ २ ॥

जहँ जहँ जाहिं देव रघुराया । करहिं मेघ तहँ तहँ नभ छाया ॥

मिला असुर बिराध मग जाता । आवतहीं रघुबीर निपाता ॥

श्रीरघुनाथ जिथे जिथे जात, तिथे तिथे मेघ आकाशातून सावली धरीत होते. रस्त्यात विराध नावाचा राक्षस भेटला. समोर येताच श्रीरामांनी त्याला ठार मारले. ॥ ३ ॥

तुरतहिं रुचिर रुप तेहिं पावा । देखि दुखी निज धाम पठावा ॥

पुनि आए जहँ मुनि सरभंगा । सुंदर अनुज जानकी संगा ॥

श्रीरामांच्या हातून मृत्यू पावताच विराधाला दिव्य रुप

 प्राप्त झाले. तो दुःखी आहे, असे पाहून प्रभूंनी त्याला

 परमधामाला पाठवून दिले. नंतर लक्ष्मण व सीता यांना

 घेऊन प्रभू शरभंग मुनींच्याकडे गेले. ॥ ४ ॥



Custom Search