Shri Dnyaneshwari
दिवि सूर्यसहस्रस्य
भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा
स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२ ॥
१२) आकाशामध्यें
सहस्रावधि सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर, ती त्या महात्म्या (
श्रीहरीच्या ) प्रभेसारखी ( कांहींशी ) होईल.
तिये अंगप्रभेचा देवा ।
नवलावो काइसयासारिखा सांगावा ।
कल्पांतीं एकुचि मेळावा ।
द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥
२३७) धृतराष्ट्र राजा,
श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून
सांगावें ? ( पण कांही कल्पना करतं यावी, म्हणून दृष्टान्ताने सांगण्याचा यत्न
करतों.) प्रळयकाळीं बारा सूर्यांचा जो एकदम मिलाफ होतो,
तैसे ते दिव्यसूर्य
सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं ।
तर्ही तया तेजाची थोरी ।
उपमूं न ये ॥ २३८ ॥
२३८) तसे तें हजारों
दिव्य सूर्य जर एकाच वेळेला उगवले, तरी त्या ( विश्र्वरुपाच्या तेजाच्या
प्रभावाच्या उपमेला ते ( सूर्य ) येणार नाहींत.
आघवयाचि विजूंचा मेळावा
कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे ।
तेवींचि दशकुही मेळविजे ।
महातेजांचा ॥ २३९ ॥
२३९) सर्व विजांचा
समुदाय एकत्र केला व प्रलयकाळच्या अग्नीची सर्व साहित्यें गोळा केलीं, तसेंच दहाहि
महातेजें एकत्र मिळविलीं;
तर्ही तिये अंगप्रभेचेनि
पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें ।
आणि तयाऐसें की चोखडें ।
त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥
२४०) तथापि, सर्वांचें
हें एकत्र केलेलें तेज, त्या विश्वरुपाच्या अंगकांतीच्या बरोबरीला कांहीं
अल्पस्वल्प मानानें आलें तर येईल: पण त्यासारखें शुद्ध तर खास असणार नाहीं.
ऐसें महात्मया हरीचें सहज ।
फांकतसे सर्वांगींचें तेज ।
तें मुनिकृपा की मज । दृष्ट
जाहलें ॥ २४१ ॥
२४१) याप्रमाणें
महात्मा जे हरि, त्याचें सर्व अंगीचें तेज ( विश्वरुपाचें तेज ) स्वाभाविक रीतीनें
फांकत होतें हें व्यास मुनींच्या कृपेने महाराज, मला दिसलें.
तत्रैकस्थं जगत् कृत्स्नं
प्रविभक्तमनेकधा ।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे
पाण्डवस्तदा ॥ १३ ॥
१३) त्या वेळीं ( देव,
पितर, मनुष्य इत्यादि ) अनेक ( भिन्न ) रुपांनीं विभाग पावलेलें ( हें ) सर्व जग,
देवाधिदेवांच्या त्या शरीरामध्यें एका ठिकाणीं स्थित, असें अर्जुनानें
पाहिलें.
आणि तिये विश्र्वरुपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें
।
जैसे महोदधीमाजीं बुडबुडे ।
सिनाने दिसती ॥ २४२ ॥
२४२) आणि त्या
विश्वरुपामध्यें एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. ज्याप्रमाणें
महासागरामध्यें बुडबुडे अलग अलग दिसतात;
कां आकाशीं गंधर्वनगर ।
भूतळीं पिपीलिका बांधे घर ।
नाना मेरुवरी सपूर । परमाणु
बैसले ॥ २४३ ॥
२४३) अथवा आकाशांमध्यें
गंधर्वनगर भासावें किंवा जमिनीवर मुंगीनें घर बांधावें अथवा मेरु पर्वतावर सूक्ष्म
परमाणु पसरलेले असावेत.
विश्र्व आघवेंचि तयापरी ।
तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं ।
अर्जुन तिये अवसरीं । देखता
जाहला ॥ २४४ ॥
२४४) त्याप्रमाणें
सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये
( विश्वरुपांत ) त्या
वेळेला अर्जुनानें पाहिलें.
ततः स विस्मयाविष्टो
हृष्टरोमा धनञ्जयः ।
प्रणम्य शिरसा देवं
कृताञ्जलिरभाषत ॥ १४ ॥
१४) तेव्हां तो
आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन देवासमोर नस्तक नमवून, हात जोडून
म्हणाला,
तेथ एक विश्र्व एक आपण ।
ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण ।
तेंही आटोनि गेलें अंतःकरण
। विरालें सहसा ॥ २४५ ॥
२४५) त्या वेळी आपण
विश्वाला पाहणारा एक निराळा व विश्व पाहण्याचा विषय ) एक निराळें, असें थोडेसें
द्वैत होतें, तेंहि नाहीसें झालें व अंतःकरण एकदम ( त्या विश्वरुपात ) विरघळून
गेलें.
आंतुला महानंदा चेइरें
जाहलें । बाहेरि गात्रांचे बळ हारपोनि गेलें ।
आपाद पां गुंतलें ।
पुलकांचलें ॥ २४६ ॥
२४६) अंतःकरणांत
ब्रह्मानंद जागृत झाला. ( त्यामुळें ) बाहेर इंद्रियें ढिलीं पडली आणि मस्तकापासून
पायापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले.
वार्षिये प्रथमदशे ।
वोहळलया शैलाचें सर्वांग जैसें ।
विरुढे कोमलांकुरीं तैसे ।
रोमांच आलें ॥ २४७ ॥
२४७) पावसाळ्याच्या
आरंभीं पर्वताच्या अंगावरुन पाणी वाहून गेल्यावर, त्या पर्वतावर जसे कोवळे गवताचे
अंकुर उत्पन्न होतात, तसे ( अर्जुनाच्या सर्व शरीरावर ) रोमांच आले.
शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु
द्रावो घरी ।
तैसिया स्वेदकणिका शरीरीं ।
दाटलिया ॥ २४८ ॥
२४८) चंद्रकिरणांनीं
स्पर्श केलेला चंद्रकांतमणि जसा पाझरतो, त्याप्रमाणें त्याच्या ( अर्जुनाच्या ) सर्व
अंगावर घामाचें दाट बिंदू आले.
माजीं सापडलेनि अलिकुळें ।
जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे ।
तेवीं आंतुलिया
सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ २४९ ॥
२४९) कमळाच्या
कळीमध्यें भुंग्यांचा समुदाय सांपडल्यामुळें ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे
आदळते, त्याप्रमाणें अंतःकरणांतील सुखाच्या लाटांच्या वेगानें बाहेर त्याचे सर्व
अंग कांपत होतें.
कर्पूर केळीचीं गर्भपुटें ।
उकलतां कापुराचेनि कोंदाटें ।
पुलिका गळती तेवीं थेंबुटें
। नेत्रोनि पडती ॥ २५० ॥
२५०) कापराच्या
विपुलतेनें, कापुरकेळीच्या गाभ्याचीं सोपटें उकलून त्यांतून जसे एकामागून एक असें
कापराचे कण गळतात, त्याप्रमाणें त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रु गळत होते.
ऐसा सात्त्विकांही आठां
भावां । परस्परें वर्ततसे हेवा ।
तेथ ब्रह्मानंदाची जीवा ।
राणीव फावली ॥ २५१ ॥
२५१) याप्रमाणें
अष्टसात्त्विक भावांतदेखील एकमेकांत चढाओढ लागली होती. त्या स्थितीत ( अर्जुनाच्या
) जीवाला ब्रह्मानंदाचें राज्य प्राप्त झाले.
उदयलेनि सुधाकरें । जैसा
भरलाचि समुद्र भरे ।
तैसा वेळोवेळां उर्मीभरें ।
उचंबळत असे ॥ २५२ ॥
२५२) भरलेल्या समुद्रास
चंद्रोदयानें जशा भरत्यांवर भरत्या येतात, त्याप्रमाणें आनंदाच्या लहरीच्या
वेगानें त्याचें अंतःकरण वेळोवेळी उचंबळत होतें.
तैसाचि तया सुखानुभवापाठीं
। केला द्वैताचा सांभाळु दिठी ।
मग उससौनि किरीटी । वास
पाहिली ॥ २५३ ॥
२५३) तसें त्या
सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीनें श्रीकृष्णानें द्वैताचा सांभाळ केला ( म्हणजे
देव व भक्त असें वेगळेपण ठेवलें ) ; म्हणून मग अर्जुनानें दीर्घ श्र्वासोच्छवास
सोडून श्रीकृष्णाकडे पाहिलें.
तेथ बैठला होता जिया सवा ।
तयाचिकडे मस्तक खालविला देवा ।
जोडूनि करसंपुट बरवा ।
बोलतु असे ॥ २५४ ॥
No comments:
Post a Comment