Sunday, September 27, 2020

ShriRamcharitmans Part 49 श्रीरामचरितमानस भाग ४९

 

ShriRamcharitmans Part 49 
Doha 234 to 236 
श्रीरामचरितमानस भाग ४९ 
दोहा २३४ ते २३६ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--देखन मिस मृग बिहग तरु फिरइ बहोरि बहोरि ।
निरखि निरखि रघुबीर छबि बाढ़इ प्रीति न थोरि ॥ २३४ ॥
मृग, पक्षी व वृक्ष यांना पाहण्याच्या बहाण्याने सीता वारंवार वळून पाहात होती. श्रीरामांचे सौंदर्य पाहून तिचे प्रेम अधिकच उचंबळले होते. ॥ २३४ ॥
जानि कठिन सिवचाप बिसूरति । चली राखि उर स्यामल मूरति ॥
प्रभु जब जात जानकी जानी । सुख सनेह सोभा गुन खानी ॥
शिव-धनुष्य खूप जड आहे. याची आठवण झाल्यावर सीता खिन्न होऊन पण हृदयात श्रीरामांची सावळी मूर्ती धारण करुन निघाली. प्रभू श्रीरामांनी जेव्हा सुख, स्नेह, शोभा व गुणांची खाण असलेल्या सीतेला जाताना पाहिले, ॥ १ ॥
परम प्रेममय मृदु मसि कीन्ही । चारु चित्त भीतीं लिखि लीन्ही ॥
गई भवानी भवन बहोरी । बंदि चरन बोली कर जोरी ॥
तेव्हा त्यांनी परम प्रेमाच्या कोमल शाईने तिचे स्वरुप आपल्या सुंदर चित्ताच्या पटलावर अंकित केले. सीता पुन्हा भवानीच्या मंदिरात गेली आणि तिच्या चरणी वंदन करुन हात जोडून म्हणाली, ॥ २ ॥
जय जय गिरिबरराज किसोरी । जय महेस मुख चंद चकोरी ॥
जय गजबदन षडानन माता । जगत जननि दामिनि दुति गाता ॥
' हे श्रेष्ठ पर्वतराज हिमालयाच्या कन्ये पार्वती, तुमचा विजय असो, विजय असो. हे महादेवाच्या मुख-चंद्राकडे ( एकटक पाहणार्‍या ) चकोरी, तुमचा विजय असो. हे हत्तीचे मुख असलेल्या गणेशाच्या व षणमुख स्वामी कार्तिकेयाच्या माते, हे जगज्जननी, हे विद्दुतकांतियुक्त शरीराच्या पार्वतीदेवी, तुमचा विजय असो. ॥ ३ ॥
नहिं तव आदि मध्य अवसाना । अमित प्रभाउ बेदु नहिं जाना ॥
भव भव बिभव पराभव कारिनि । बिस्व बिमोहनि स्वबस बिहारिनि ॥
तुम्हांला आदी, मध्य व अंत नाही. तुमचा असीम प्रभाव वेदांनाही माहीत नाही. तुम्ही सृष्टीला उत्पन्न, पालन व नाश करणार्‍या आहात. विश्वाला मोहून टाकणार्‍या आणि स्वतंत्रपणे विहार करणार्‍या आहात. ॥ ४ ॥
दोहा--पतिदेवता सुतीय महुँ मातु प्रथम तव रेखा ।
महिमा अमित न सकहिं कहि सहस सारदा सेष ॥ २३५ ॥
पतीला इष्टदेव मानणार्‍या स्त्रियांमध्ये हे माते, तुमची प्रथम गणना आहे. तुमचा अपार महिमा हजारो सरस्वती आणि शेषनागसुद्धा सांगू शकत नाहीत. ॥ २३५ ॥
सेवत तोहि सुलभ फल चारी । बरदायनी पुरारि पिआरी ॥
देबि पूजि पद कमल तुम्हारे । सुर नर मुनि सब होहिं सुखारे ॥
हे भक्तांना मनोवांछित वर देणार्‍या भवानी ! तुमची सेवा केल्याने चारी पुरुषार्थ सुलभ होतात. हे देवि, तुमच्या चरणकमलांची पूजा केल्याने देव, मनुष्य व मुनी हे सर्व सुखी होतात. ॥ १ ॥
मोर मनोरथु जानहु नीकें । बसहु सदा उर पुर सबही कें ॥
कीन्हेउँ प्रगट न कारन तेहीं । अस कहि चरन गहे बैदेहीं ॥
माझे मनोरथ तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, कारण तुम्ही नेहमी सर्वांच्या हृदयरुपी नगरीमध्ये निवास करता. म्हणून मी ते उघड केले नाही ' असे म्हणत जानकीने देवीचे चरण धरले. ॥ २ ॥
बिनय प्रेम बस भई भवानी । खसी माल मूरति मुसुकानी ॥
सादर सियँ प्रसादु सिर धरेऊ । बोली गौरि हरषु हियँ भरेऊ ॥
गिरिजादेवी सीतेचा विनय आणि प्रेम पाहून प्रसन्न झाली. तिच्या गळ्यातली माळ खाली पडली आणि मूर्तीने स्मित हास्य केले. सीतेने मोठ्या आदराने तो प्रसाद शिरावर धारण केला. गौरीचे मन आनंदाने भरुन गेले आणि ती म्हणाली, ॥ ३ ॥
सुनु सिय सत्य असीस हमारी । पूजिहि मन कामना तुम्हारी ॥
नारद बचन सदा सुचि साचा । सो बरु मिलिहि जाहिं मनु राचा ॥
' हे सीते, मी मनःपूर्वक देत असलेला आशीर्वाद ऐक. तुझी मनोकामना पुर्ण होईल. नारदांचे वचन नित्य पवित्र आणि सत्य असते. ज्याच्यावर तुझे मन अनुरुक्त झाले आहे, तोच वर तुला मिळेल. ॥ ४ ॥
छं.--मनु जाहिं राचेउ मिलिहि सो बरु सहज सुंदर सॉंवरो ।
करुना निधान सुजान सीलु सनेहु जानत रावरो ॥
एहि भाँति गौरि असीस सुनि सिय सहित हियँ हरषीं अली ।
तुलसी भवानिहि पूजि पुनि पुनि मुदित मन मंदिर चली ॥
ज्याच्यावर तुझे मन अनुरक्त झालेले आहे, तोच स्वभावतः सुंदर सावळा वर श्रीराम तुला मिळेल. तो दयेचे भांडार आहे, सर्वज्ञ आहे, तुझे शील व प्रेम जाणणारा आहे. ' अशा प्रकारे श्रीगौरीचा आशीर्वाद ऐकून जानकीसह सर्व सख्यांना मनापासून आनंद झाला. तुलसीदास म्हणतात, भवानीदेवीची वारंवार पूजा करुन सीता प्रसन्न मनाने राजमहालाकडे निघाली.
सो०--जानि गौरि अनुकूल सिय हिय हरषु न जाइ कहि ।
मंजुल मंगल मूल बाम अंग फरकन लगे ॥ २३६ ॥
श्रीगौरी अनुकूल आहे, हे कळल्यामुळे सीतेच्या मनाला जो हर्ष झाला, तो अवर्णनीय होता. कल्याणाचे मूळ असलेले तिचे डावे अंग स्फुरु लागले. ॥ २३६ ॥
हृदयँ सराहत सीय लोनाई । गुर समीप गवने दोउ भाई ॥
राम कहा सबु कौसिक पाहीं । सरल सुभाउ छुअत छल नाहीं ॥
मनामध्ये सीतेच्या लावण्याची वाखाणणी करीत दोन्ही भाऊ गुरुंच्याजवळ आले. श्रीरामचंद्रांनी विश्वामित्रांना सर्व काही सांगून टाकले. कारण त्यांचा स्वभाव सरळ होता आणि कपट त्यांना शिवतसुद्धा नसे. ॥ १ ॥
सुमन पाइ मुनि पूजा कीन्ही । पुनि असीस दुहु भाइन्ह दीन्ही ॥
सुफल मनोरथ होहुँ तुम्हारे । रामु लखनु सुनि भए सुखारे ॥
फुले मिळाल्यावर मुनींनी पूजा केली. नंतर दोन्ही भावांना आशिर्वाद दिला की, ' तुमचे मनोरथ पूर्ण होवोत .' तो ऐकून श्रीरामलक्ष्मणांना आनंद झाला. ॥ २ ॥
करि भोजनु मुनिबर बिग्यानी । लगे कहन कछु कथा पुरानी ॥
बिगत दिवसु गुरु आयसु पाई । संध्या करन चले दोउ भाई ॥
ज्ञानी मुनी विश्वामित्र हे भोजनानंतर काही प्राचीन कथा सांगू लागले. एवढ्यात दिवस मावळला आणि गुरुंच्या आज्ञेने दोघे बंधू संध्या करण्यासाठी गेले. ॥ ३ ॥
प्राची दिसि ससि उयउ सुहावा । सिय मुख सरिस देखि सुखु पावा ॥
बहुरि बिचारु कीन्ह मन माहीं । सीय बदन सम हिमकर नाहीं ॥
इकडे पूर्व दिशेला सुंदर चंद्रमा उदय पावला. तो सीतेच्या मुखा-सारखा पाहून श्रीरामचंद्रांना आनंद झाला. नंतर त्यांच्या मनात विचार आला की, चंद्र हा काही सीतेच्या मुखासारखा नाही. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamcharitmans Part 48 श्रीरामचरितमानस भाग ४८

 

ShriRamcharitmans Part 48 
Doha 231 to 233 
श्रीरामचरितमानस भाग ४८ 
दोहा २३१ ते २३३ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--करत बतकही अनुज सन मन सिय रुप लोभान ।
मुख सरोज मकरंद छबि करइ मधुप इव पान ॥ २३१ ॥
अशा प्रकारे श्रीराम हे लक्ष्मणाशी बोलत होते, परंतु मन सीतेच्या रुपावर भाळले होते व ते सीतेच्या मुखरुपी कमलाचा सौंदर्यरुप मकरंद रस भ्रमराप्रमाणे प्राशन करीत होते. ॥ २३१ ॥
चितवति चकित चहूँ दिसि सीता । कहँ गए नृपकिसोर मनु चिंता ॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी । जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी ॥
सीता चकित होऊन चोहीकडे पाहात होती. तिला हुरहुर लागली होती की, राजकुमार कुठे गेले असावेत ? हरिणाक्षी सीतेची दृष्टी जेथे पडत होती, तेथे जणू श्वेत कमळांच्या पंक्ती फुलत होत्या. ॥ १ ॥
लता ओट तब सखिन्ह लखाए । स्यामल गौर किसोर सुहाए ॥
देखि रुप लोचन ललचाने । हरषे जनु निज निधि पहिचाने ॥
तेव्हा सख्यांनी सीतेला वेलींच्या आड असलेल्या सुंदर श्याम व गौर कुमारांना दाखविले. त्यांचे रुप पाहून सीतेचे नेत्र आसुसले. ते नेत्र इतके प्रसन्न झाले की, जणू त्यांना आपला हरवलेला खजिनाच सापडला. ॥ २ ॥
थके नयन रघुपति छबि देखें । पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें ॥
अधिक सनेहँ देह भै भोरी । सरद ससिहि जनु चितव चकोरी ॥
श्रीरामांचे रुप पाहून सीतेचे नेत्र थक्क झाले. पापण्या हलणे बंद झाले. आत्यंतिक प्रेमामुळे शरीर विव्हळ झाले. जणू शरद ऋतूतील चंद्राला बेहोष होऊन चकोरी पाहात होती. ॥ ३ ॥
लोचन मग रामहि उर आनी । दीन्हे पलक कपाट सयानी ॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी । कहि न सकहिं कछु मन सकुचानी ॥
नेत्रांच्या मार्गाने श्रीरामांना हृदयात आणून जानकीने पापण्यांची दारे बंद करुन घेतली. ( डोळे मिटून ती ध्यान करु लागली. ) सख्यांनी जेव्हा बघितले की, सीता प्रेमात मग्न झाली आहे, तेव्हा त्यांच्या मनात संकोच वाटू लागला. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. ॥ ४ ॥
 दोहा--लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ ।
निकसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाइ ॥ २३२ ॥
त्याचवेळी दोघे भाऊ लतामंडपातून बाहेर पडले. जणू दोन निर्मल चंद्र ढगांचा पडदा सारुन बाहेर आले होते. ॥ २३२ ॥
सोभा सीवँ सुभग दोउ बीरा । नील पीत जलजाभ सरीरा ॥
मोरपंख सिर सोहत नीके । गुच्छ बीच बिच कुसुम कली के ॥
दोघे भाऊ सौंदर्याची परिसीमा होते. त्यांच्या शरीराची कांती निळ्या व पिवळ्या कमळांसारखी होती. शिरावर सुंदर मोरपंख शोभत होते. त्यांच्यामधून फुलांच्या कळ्यांचे गुच्छ लावलेले होते. ॥ १ ॥
भाल तिलक श्रमबिंदु सुहाए । श्रवन सुभग भूषन छबि छाए ॥
बिकट भृकुटि कच घूघरवारे । नव सरोज लोचन रतनारे ॥
माथ्यावर तिलक व धर्मबिंदू शोभून दिसत होते. कानांतील सुंदर भूषणांची शोभा ( गालांवर ) झळकत होती. कमानदार भुवया व कुरळे केस होते. लाल नवकमलांप्रमाणे लालसर नेत्र होते. ॥ २ ॥
चारु चिबुक नासिका कपोला । हास बिलास लेत मनु मोला ॥
मुखछबि कहि न जाइ मोहि पाहीं । जो बिलोकि बहु काम लजाहीं ॥ 
हनुवटी, नाक व गाल फार सुंदर होते आणि त्यांच्या स्मित हास्याची शोभा मन मोहून टाकीत होती. त्या मुखाचे सौंदर्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही. कारण ते पाहून असंख्य कामदेव लज्जित होत होते. ॥ ३ ॥
उर मनि माल कंबु कल गीवा । काम कलभ कर भुज बलसींवा ॥
सुमन समेत बाम कर दोना । सावँर कुअँर सखी सुठि लोना ॥
वक्षःस्थळावर रत्नांच्या माळा रुळत होत्या. शंखासारखा सुंदर गळा होता. कामदेवाच्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे निमुळते होत गेलेले सुकुमार बाहू होते. ते बळाचे परमसीमा होते. ज्यांच्या डाव्या हातात फुलांनी भरलेले द्रोण आहे, हे सखी, तो सावळा कुमार तर फार सुंदर आहे. ' ॥ ४ ॥ 
दोहा--केहरि कटि पट पीत धर सुषमा सील निधान ।
देखि भानुकुलभूषनहि बिसरा सखिन्ह अपान ॥ २३३ ॥
सिंहासारखी ( बारीक व लवचिक ) कटी असणारे, पीतांबर परिधान केलेले, शोभा व शीलाचे भांडार असणारे, सूर्यकुलाचे भूषण, श्रीराम यांना पाहून सख्यासुद्धा भान हरपून गेल्या. ॥ २३३ ॥
धरि धीरजु एक आलि सयानी । सीता सन बोली गहि पानी ॥
बहुरि गौरि कर ध्यान करेहू । भूपकिसोर देखि किन लेहू ॥
एक चतुर सखी मोठ्या धीराने सीतेचा हात धरुन म्हणाली, ' गिरिजादेवीचे ध्यान नंतर कर. यावेळी राजकुमाराला का पाहून घेत नाहीस ? ' ॥ १ ॥
सकुचि सीयँ तब नयन उधारे । सनमुख दोउ रघुसिंघ निहारे ॥
नख सिख देखि राम कै सोभा । सुमिरि पिता पनु मनु अति छोभा ॥
तेव्हा सीतेने लाजून नेत्र उघडले आणि रघुकुलातील ते दोन्ही सिंह आपल्यासमोर उभे ठाकल्याचे तिला दिसून आले. श्रीरामांची नख-शिखांत पाहून आणि नंतर आपल्या पित्याच्या पणाची आठवण येऊन तिचे मन अतिशय हेलावून गेले. ॥ २ ॥
परबस सखिन्ह लखी जब सीता । भयउ गहरु सब कहहिं सभीता ॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली । अस कहि मन बिहसी एक आली ॥
सख्यांनी जेव्हा पाहिले की, सीता प्रेमात बुडाली आहे, तेव्हा त्या बावरुन म्हणू लागल्या, ' फार उशीर झाला. ( आता निघाले पाहिजे ). उद्या पुन्हा येऊ. ' असे म्हणत एक सखी मनात हसली. ॥ ३ ॥
गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी । भयउ बिलंबु मातु भय मानी ॥
धरि बड़ि धीर रामु उर आने । फिरी अपनपउ पितुबस जाने ॥
सखीचे हे गूढ बोलणे ऐकून सीता लाजली. उशीर झाला आहे, असे पाहून तिला आईची भीती वाटली. मोठ्या धैर्याने तिने श्रीरामांना आपल्या अंतःकरणात बसवून आणि ( त्यांचे ध्यान करीत ) आपण आपल्या पित्याच्या अधीन असल्याचे जाणून ती नाइलाजाने परत निघाली. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamcharitmans Part 47, श्रीरामचरितमानस भाग ४७

 

ShriRamcharitmans Part 47  
Doha 228 to 230 
श्रीरामचरितमानस भाग ४७ 
दोहा २२८ ते २३० 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--तासु दसा देखी सखिन्ह पुलक गात जलु नैन ।
कहु कारनु निज हरष कर पूछहिं सब मृदु बैन ॥ २२८ ॥
सख्यांनी तिची दशा पाहिली. तिचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्र सजल झालेले होते. सर्वजणी कोमल स्वरांनी विचारु लागल्या की, ' तुझ्या आनंदाचे कारण काय बरे ! ' ॥ २२८ ॥
देखन बागु कुअँर दुइ आए । बय किसोर सब भाँति सुहाए ॥
स्याम गौर किमि कहौं बखानी । गिरा अनयन नयन बिनु बानी ॥
( ती म्हणाली, ) ' दोन राजकुमार बाग पाहण्यास आले आहेत. ते किशोर वयाचे असून फार सुंदर आहेत. ते सावळ्या व गोर्‍या रंगाचे आहेत. मी त्यांचे सौंदर्य कसे वर्णन करु ? ( कारण ) वाणीला नेत्र नाहीत आणि नेत्रांना वाणी नाही. ' ॥ १ ॥
सुनि हरषीं सब सखीं सयानी । सिय हियँ अति उतकंठा जानी ॥
एक कहइ नृपसुत तेइ आली । सुने जे मुनि सँग आए काली ॥
हे ऐकून आणि सीतेच्या मनातही उत्कंठा दाटलेली पाहून त्या सर्व चतुर सख्याही आनंदून गेल्या. तेव्हा एक सखी म्हणाली, ' हे सखी, काल विश्वामित्र मुनींच्याबरोबर आले आहेत, असे ऐकले होते, तेच हे राजकुमार असावेत. ॥ २ ॥
जिन्ह निज रुप मोहनी डारी । कीन्हे स्वबस नगर नर नारी ॥
बरनत छबि जहँ तहँ सब लोगू । अवसि देखिअहिं देखन जोगू ॥
त्यांनी आपल्या रुपाच्या मोहिनीने नगरातील स्त्री-पुरुषांना वश केले आहे. जिकडे-तिकडे सर्व लोक त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते पाहण्याजोगे आहेत. त्यांना जरुर पाहिले पाहिजे.' ॥ ३ ॥
तासु बचन अति सियहि सोहाने । दरस लागि लोचन अकुलाने ॥
चली अग्र करि प्रिय सखि सोई । प्रीति पुरातन लखइ न कोई ॥
सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आसुसले . त्या प्रिय सखीला पुढे करुन सीता निघाली. शाश्र्वत प्रेम कोणी पाहू शकत नाही. ॥ ४ ॥
दोहा--सुमिरि सीय नारद बचन उपजी प्रीति पुनीत । 
चकित बिलोकति सकल दिसि जनु सिसु मृगी सभीत ॥ २२९ ॥
नारदांचे वचन आठवून सीतेच्या मनात पवित्र प्रेम उपजले. ती चकित होऊन सगळीकडे पाहू लागली. जणू बावरलेली हरिणी इकडे-तिकडे पाहात असावी. ॥ २२९ ॥
कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि । कहत लखन सन रामु हृदयँ गुनि ॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही । मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही ॥
कंकणे, मेखलाांच्या घागर्‍या आणि नूपुरे यांचा ध्वनी कानी येताच श्रीरामचंद्रांच्या मनात विचार येऊन, त्यांनी लक्ष्मणाला म्हतले, ( हा ध्वनी असा येत आहे की, ) ' जणू कामदेवाने विश्व जिंकण्याचा संकल्प करुन दुंदुभी वाजविल्या आहेत. ' ॥ १ ॥
अस कहि फिरि चितए तेहि ओरा । सिय मुख ससि भए नयन चकोरा ॥
भए बिलोचन चारु अचंचल । मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल ॥
असे म्हणून श्रीरामांनी वळून तिकडे पाहिले. सीतेचा मुख-चंद्र पाहण्यासाठी त्यांचे नेत्र चकोर बनले. त्यांचे सुंदर नेत्र स्थिरावले. ( एकटक पाहू लागले. ) जणू ( जनकांचे पूर्वज ) निमी राजाने संकोचाने ( निमी हे सर्वांच्या पापण्यावर निवास करतात, असे मानले जाते. त्यांनी आपली कन्या व जावई यांचा मिलन-प्रसंग पाहणे उचित वाटले नाही, म्हणून ) पापण्यांचा त्याग केला असावा. ( त्यांनी पापण्यांवर राहणे सोडल्यामुळे पापण्या मिटणे थांबले. ॥ २ ॥
देखि सीय सोभा सुखु पावा । हृदयँ सराहत बचनु न आवा ॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई । बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई ॥
सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले. मनात त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली. परंतु मुखातून शब्द फुतला नाही. ( ते सौंदर्य असे अनुपम होते की, ) जणू ब्रह्मदेवांनी आपले संपूर्ण कौशल्य साकार करुन ( सीतेच्या रुपाने ) जगाला प्रकट करुन दाखविले होते. ॥ ३ ॥        
सुंदरता कहुँ सुंदर करई ॥ छबिगृहँ दीपसिखा जनु बरई ॥
सब उपमा कबि रहे जुठारी । केहिं पटतरौं बिदेहकुमारी ॥
सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनविणारे होते. ( असे वाटत होते की, ) जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे. ( आजवर सौंदर्य-भवनामध्ये अंधार होता, ते भवन जणू सीतेच्या सौंदर्यरुपी दीपशिखेमुळे उजळून निघाले, पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले. ) कवींनी सर्व उपमा उष्ट्या करुन टाकल्या आहेत. तेव्हा मी जनकनंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ ? ॥ ४ ॥
दोहा--सिय सोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि ॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि ॥ २३० ॥
( अशा प्रकारे ) मनात सीतेच्या सौंदर्याची वाखाणणी करीत व आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयानुकूल म्हटले, ॥ २३० ॥
तात जनकतनया यह सोई । धनुषजग्य जेहि कारन होई ॥
पूजन गौरि सखीं लै आईं । करत प्रकासु फिरइ फुलवाईं ॥
' हे बंधू जिच्यासाठी धनुष्ययज्ञ होत आहे, तीच ही जनककन्या आहे. सख्या हिला गौरीपूजनासाठी घेऊन आल्या आहेत. ही या फुलबागेला उजळून टाकीत वावरत आहे. ॥ १ ॥
जासु बिलोकि अलौकिक सोभा । सहज पुनीत मोर मनु छोभा ॥
सो सबु कारन जान बिधाता । फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता ॥
तिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावतः पवित्र माझे मन विचलित झाले आहे. त्याचे कारण त्या विधात्यालाच ठाऊक. परंतु हे बंधू ,माझी मंगलदायक उजवी अंगे स्फुरण पावू लागली आहेत. ॥ २ ॥
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ । मनु कुपंथ पगु धरइ न काऊ ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी । जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी ॥
रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे की, त्यांचे मन कधी कुमार्गावर पाऊल टाकीत नाही. मला माझ्या मनाची खात्री आहे की, त्याने ( जागृतीतच काय ) स्वप्नातही पर-स्त्रीवर दृष्टी टाकलेली नाही. ॥ ३ ॥
जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी । नहिं पावहिं परतिय मनु डीठी ॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं । ते नरबर थोरे जग माहीं ॥
रणामध्ये शत्रूंना ज्यांची पाठ दिसत नाही, पर-स्त्री ज्यांचे मन आणि दृष्टी मोहून टाकू शकत नाही, आणि ज्यांच्याकडून याचकाला कधी नकार मिळत नाही, असे श्रेष्ठ पुरुष जगात फार थोडे आहेत. ॥ ४ ॥   



Custom Search

ShriRamcharitmans Part 46 श्रीरामचरितमानस भाग ४६

 

ShriRamcharitmans Part 46  
Doha 225 to 227 
श्रीरामचरितमानस भाग ४६ 
दोहा २२५ ते २२७ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--सभय सप्रेम बिनीत अति सकुच सहित दोउ भाइ ।
गुर पद पंकज नाइ सिर बैठे आयसु पाइ ॥ २२५ ॥
नंतर भय, प्रेम, विनय आणि मोठ्या संकोचाने दोन्ही भावांनी गुरुंच्या चरण-कमलांवर मस्तक ठेवून, त्यांच्या आज्ञेने ते बसले. ॥ २२५ ॥
निसि प्रबेस मुनि आयसु दीन्हा । सबहीं संध्याबंदनु कीन्हा ॥
कहत कथा इतिहास पुरानी । रुचिर रजनि जुग जाम सिरानी ॥
संध्याकाळ होताच मुनींनी आज्ञा केली, तेव्हा सर्वांनी संध्या-वंदन केले. नंतर प्राचीन कथा आणि इतिहास सांगता-सांगता सुंदर रात्रीचे दोन प्रहर निघून गेले. ॥ १ ॥
मुनिबर सयन कीन्हि तब जाई । लगे चरन चापन दोउ भाई ॥
जिन्ह के चरन सरोरुह लागी । करत बिबिध जप जोग बिरागी ॥
तेव्हा मुनिवर्य झोपण्यास गेले. दोन्ही भाऊ त्यांचे पाय चेपू लागले. ज्यांच्या चरण-कमलांच्या ( दर्शनासाठी व स्पर्शासाठी ) वैराग्यशील पुरुषसुद्धा तर्‍हेतर्‍हेचे जप व योगसाधना करतात, ॥ २ ॥
तेइ दोउ बंधु प्रेम जनु जीते । गुर पद कमल पलोटत प्रीते ॥
बार बार मुनि अग्या दीन्ही । रघुबर जाइ सयन तब कीन्ही ॥
तेच दोन्ही बंधू जणू प्रेमाने जिंकले गेल्यामुळे प्रेमपूर्वक गुरुजींची चरण-कमले चेपीत होते. मुनींनी जेव्हा वारंवार सांगितले, तेव्हा श्रीरघुनाथ जाऊन झोपले. ॥ ३ ॥
चापत चरन लखनु उर लाएँ । सभय सप्रेम परम सचु पाएँ ॥
पुनि पुनि प्रभु कह सोवहु ताता । पौढ़े धरि उर पद जलजाता ॥
श्रीरामांचे चरण हृदयीं धरुन भय व प्रेमाने परम सुखाचा अनुभव घेत लक्ष्मण श्रीरामांचे चरण चेपू लागले. प्रभू रामचंद्र वारंवार म्हणत होते की, ' बाबा रे, आता तू झोप. ' तेव्हा लक्ष्मण त्यांचे चरणकमल हृदयी धरुन पहुडला. ॥ ४ ॥
 दोहा--उठे लखनु निसि बिगत सुनि अरुनसिखा धुनि कान ।
गुर तें पहिलेहिं जगतपति जागे रामु सुजान ॥ २२६ ॥
पहाटे कोंबड्याचे आरवणे ऐकून लक्ष्मण उठला. जगताचे स्वामी श्रीरामचंद्रही गुरुंच्या पूर्वी उठले. ॥ २२६ ॥
सकल सौच करि जाइ नहाए । नित्य निबाहि मुनिहि सिर नाए ॥
समय जानि गुर आयसु पाई । लेन प्रसून चले दोउ भाई ॥
प्रातर्विधी झाल्यावर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर ( संध्या-अग्निहोत्रादी ) नित्यकर्म आटोपल्यावर त्यांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवले. पूजेची वेळ झाल्याचे पाहून गुरुंच्या आज्ञेने दोघे बंधू फुले आणण्यासाठी निघाले. ॥ १ ॥
 भूप बागु बर देखेउ जाई । जहँ बसंत रितु रही लोभाई ॥
लागे बिटप मनोहर नाना । बरन बरन बर बेलि बिताना ॥
त्यांनी जाऊन राजा जनकांची बाग पाहिली. तेथे वसंत-ऋतू लुब्ध होऊन राहिला होता. मनाला मोहित करणारे अनेक वृक्ष तेथे होते. रंगी-बेरंगी सुंदर वेलींचे मंडप पसरलेले होते. ॥ २ ॥
 नव पल्लव फल सुमन सुहाए । निज संपति सुर रुख लजाए ॥
चातक कोकिल कीर चकोरा । कूजत बिहग नटत कल मोरा ॥
नवपल्लव, फळे आणि फुले यांनी भरलेले सुंदर वृक्ष आपल्या या ऐश्वर्यामुळे कल्पवृक्षालाही लाजवत होते. चातक, कोकिळा, पोपट, चकोर इत्यादी पक्षी मधुर कूजन करीत होते आणि मोर सुंदर नृत्य करीत होते. ॥ ३ ॥
मध्य बाग सरु सोह सुहावा । मनि सोपान बिचित्र बनावा ॥
बिमल सलिलु सरसिज बहुरंगा । जलखग कूजत गुंजत भृंगा ॥
बागेच्या मधोमध सुंदर सरोवर शोभत होते. त्याला रत्नजडित पायर्‍या विलक्षण पद्धतीने बनविलेल्या होत्या. त्याचे जल निर्मल होते, त्यामध्ये अनेक रंगांची कमळे फुललेली होती. जलपक्षी कलरव करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. ॥ ४ ॥   
दोहा--बागु तड़ागु बिलोकि प्रभु हरषे बंधु समेत ।
परम रम्य आरामु यहु जो रामहि सुख देत ॥ २२७ ॥
बाग व सरोवर पाहून प्रभू श्रीराम व लक्ष्मण दोघे आनंदित झाले. ती बाग खरोखरच अत्यंत रमणीय होती. कारण ( जगाला सुख देणार्‍या ) श्रीरामचंद्रांनाही तिने सुख दिले. ॥ २२७ ॥
चहुँ दिसि चितइ पूँछि मालीगन । लगे लेन दल फूल मुदित मन ॥
तेहि अवसर सीता तहँ आई । गिरिजा पूजन जननि पठाई ॥
चोहीकडे नजर टाकून व माळ्यांना विचारुन ते प्रसन्न चित्ताने पाने-फुले तोडू लागले. त्याचवेळी मातेने गिरिजेची पूजा करण्यासाठी सीतेला पाठविले होते. ती तेथे आली. ॥ १ ॥
संग सखीं सब सुभग सयानीं । गावहिं गीत मनोहर बानीं ॥
सर समीप गिरिजा गृह सोहा । बरनि न जाइ देखि मनु मोहा ॥
तिच्या सोबत सुंदर व चतुर सख्या होत्या. त्या मधुर वाणीने गीत गात होत्या. सरोवराजवळ गिरिजेचे मंदिर शोभून दिसत होते. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करणेच कठीण. ते पाहून मन मोहून जात होते. ॥ २ ॥
मज्जनु करि सर सखिन्ह समेता । गई मुदित मन गौरि निकेता ॥
पूजा कीन्हि अधिक अनुरागा । निज अनुरुप सुभग बरु मागा ॥
सख्यांसह सरोवरात स्नान करुन सीता प्रसन्नतेने गिरिजा-मंदिरात गेली. तिने मोठ्या प्रेमाने पूजा केली आणि आपल्याला योग्य असा सुंदर वर मिळावा, म्हणून प्रार्थना केली. ॥ ३ ॥
एक सखी सिय संगु बिहाई । गई रही देखन फुलवाई ॥
तेहिं दोउ बंधु बिलोके जाई । प्रेम बिबस सीता पहिं आई ॥
एक सखी सीतेला तेथे सोडून बाग पाहायला गेली. तिने त्या दोघा भावांना पाहिले व प्रेम विव्हळ होऊन ती सीतेजवळ आली. ॥ ४ ॥



Custom Search

Monday, September 14, 2020

ShriRamcharitmans Part 45 श्रीरामचरितमानस भाग ४५

 

ShriRamcharitmans Part 45 
Doha 222 to 224 
श्रीरामचरितमानस भाग ४५ 
दोहा २२२ ते २२४ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--नाहिं त हम कहुँ सुनहु सखि इन्ह कर दरसनु दूरि ।
यह संघटु तब होइ जब पुन्य पुराकृत भूरि ॥ २२२ ॥
( हा विवाह झाला नाही तर ) हे सखी, आम्हांला यांचे दुर्लभ दर्शन होणार नाही. आपल्या पूर्वजन्मीचे पुण्य थोर असेल तरच हा योग घडून येईल.' ॥ २२२ ॥
बोली अपर कहेहु सखि नीका । एहिं बिआह अति हित सबही का ॥
कोउ कह संकर चाप कठोरा । ए स्यामल मृदु गात किसोरा ॥
दुसरी सखी म्हणाली, ' हे सखी, तू फार छान बोललीस. हा विवाह होण्यात सर्वांचेच मोठे कल्याण आहे. ' कुणी म्हणाली, ' भगवान शंकरांचे धनुष्य मोठे अवजड आहे आणि हे सावळे राजकुमार सुकुमार बालक आहेत. ॥ १ ॥
 सबु असमंजस अहइ सयानी । यह सुनि अपर कहइ मृदु बानी ॥
सखि इन्ह कहँ कोउ अस कहहीं । बड़ प्रभाउ देखत लघु अहहीं ॥
ए शहाणे ! येथेच सर्व घोळ आहे. ' हे ऐकून दुसरी सखी कोमलपणे म्हणाली की, ' हे सखी, यांच्याविषयी काहीजण म्हणतात की, हे जरी दिसायला लहान वाटले, तरी यांचा प्रभाव फार मोठा आहे. ॥ २ ॥
परसि जासु पद पंकज धूरी । तरी अहल्या कृत अघ भूरी ॥
सो कि रहिहि बिनु सिवधनु तोरें । यह प्रतीति परिहरिअ न भोरें ॥
ज्यांच्या चरणकमलांच्या धुळीच्या स्पर्शामुळे मोठे पाप घडलेली अहल्या तरुन गेली, ते शिवधनुष्य तोडल्याविना राहतील काय ? हा विश्र्वास चुकूनही सोडता कामा नये. ॥ ३ ॥
जेहिं बिरंचि रचि सीय सँवारी । तेहिं स्यामल बरु रचेउ बिचारी ॥
तासु बचन सुनि सब हरषानीं । ऐसेइ होउ कहहिं मृदु बानीं ॥
ज्या विधात्याने मोठ्या चातुर्याने कौशल्यपूर्वक सीतेला निर्माण केले, त्यानेच विचारपूर्वक हा सावळा वरही निर्माण केला आहे. ' तिचे हे बोल ऐकून सर्वजणींना आनंद झाला आणि कोमल शब्दात त्या म्हणू लागल्या की, ' असेच घडो. ' ॥ ४ ॥
दोहा--हियँ हरषहिं बरषहिं सुमन सुमुखि सुलोचनि बृंद ।
जाहिं जहॉं जहँ बंधु दोउ तहँ तहँ परमानंद ॥ २२३ ॥
त्या सुंदर कमलनेत्र स्त्रियांचे समुदाय मनातून आनंदित होऊन फुलांचा वर्षाव करु लागले. दोघे भाऊ जिथे जिथे जात होते, तिथे तिथे मोठा आनंद पसरत होता. ॥ २२३ ॥
पुर पूरब दिसि गे दोउ भाई । जहँ धनुमख हित भूमि बनाई ॥
अति बिस्तार चारु गच ढारी । बिमल बेदिका रुचिर सँवारी ॥
दोघे भाऊ नगराच्या पूर्वेला गेले. तिथे धनुष्य-यज्ञासाठी रंगभूमी बनविली होती. विस्तृत असे बनविलेले पक्के अंगण होते. त्यावर सुंदर व स्वच्छ असा चबुतरा सजविलेला होता. ॥ १ ॥
चहुँ दिसि कंचन मंच बिसाला । रचे जहॉं बैठहिं महिपाला ॥
तेहि पाछें समीप चहुँ पासा । अपर मंच मंडली बिलासा ॥
चोहीकडे सोन्याचे मोठमोठे चबुतरे राजांना बसण्यासाठी उभातले होते. त्यांच्या मागे जवळच चारी बाजूंना दुसर्‍या सज्ज्यांचा गोलाकार वेढा शोभत होता. ॥ २ ॥
कछुक ऊँचि सब भॉंति सुहाई । बैठहिं नगर लोग जहँ जाई ॥
तिन्ह के निकट बिसाल सुहाए । धवल धाम बहुबरन बनाए ॥
तो काहीसा उंच होता आणि सर्व तर्‍हेने सुंदर होता. तेथे नगरातील लोक बसणार होते. त्यांच्याजवळच विशाल व सुंदर अशी बसण्याची ठिकाणे अनेक रंगांनी रंगविलेली होती. ॥ ३ ॥
जहँ बैठें देखहिं सब नारी । जथाजोगु निज कुल अनुहारी ॥
पुर बालक कहि कहि मृदु बचना । सादर प्रभुहि देखावहिं रचना ॥
तेथे आपल्या कुलाच्या योग्यतेप्रमाणे सर्व स्त्रिया यथायोग्य रीतीने बसून पाहू शकणार होत्या. नगरातील मुले गोड गोड बोलून मोठ्या आदराने प्रभू रामचंद्रांना यज्ञशालेची रचना दाखवीत होती. ॥ ४ ॥
दोहा--सब सिसु एहि मिस प्रेमबस परसि मनोहर गात ।
तन पुलकहिं अति हरषु हियँ देखि देखि दोउ भ्रात ॥ २२४ ॥
सर्व मुले या निमित्ताने मोठ्या प्रेमाने श्रीरामांच्या अंगाला स्पर्श करुन रोमांचित होत होती आणि दोन्ही भावांना पाहून त्यांच्या मनाला मोठा आनंद होत होता. ॥ २२४ ॥
 सिसु सब राम प्रेमबस जाने । प्रीति समेत निकेत बखाने ॥
निज निज रुचि सब लोहिं बोलाई । सहित सनेह जाहिं दोउ भाई ॥ 
श्रीरामचंद्रांनी सर्व मुलांचे ते प्रेम पाहून ( यज्ञभूमीच्या ) स्थानांची मनापासून प्रशंसा केली. ( त्यामुळे बालकांचा उत्साह, आनंद आणि प्रेम आणखी वाढले. ) ते सर्वजण आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना बोलवीत होते आणि प्रत्येकाच्या बोलावण्यावर दोघे भाऊ मोठ्या प्रेमाने त्यांच्याकडे जात होते. ॥ १ ॥
राम देखावहिं अनुजहि रचना । कहि मृदु मधुर मनोहर बचना ॥
लव निमेष महुँ भुवन निकाया । रचइ जासु अनुसासन माया ॥
कोमल, मधुर व मनोहर शब्दांनी श्रीराम आपला धाकटा भाऊ लक्ष्मण यास यज्ञशालेची रचना दाखवित होते. ज्यांच्या आज्ञेने माया ही एका निमिषामध्ये ब्रह्मांडांचे समूह निर्माण करते. ॥ २ ॥
 भगति हेतु सोइ दीनदयाला । चितवत चकित धनुष मखसाला ॥
कौतुक देखि चले गुरु पाहीं । जानि बिलंबु त्रास मन माहीं ॥
ते दीनांवर दया करणारे श्रीराम भक्तीमुळे धनुष्ययज्ञशाला चकित होऊन पाहात होते. अशा प्रकारे कौतुकास्पद रचना पाहून ते गुरुंजवळ परत आले. उशीर झाल्याचे वाटून त्यांच्या मनात काहीशी भीती होती. ॥ ३ ॥
जासु त्रास डर कहुँ डर होई । भजन प्रभाउ देखावत सोई ॥
कहि बातें मृदु मधुर सुहाईं । किए बिदा बालक बरिआईं ॥ 
ज्यांच्या भयामुळे भीतीलाही भय वाटते, तेच प्रभू भजनाचा प्रभाव दाखवीत होते. त्यांनी कोमल, मधुर आणि सुंदर गोष्टी सांगून मुलांना आग्रहाने निरोप दिला. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamcharitmans Part 44 श्रीरामचरितमानस भाग ४४

 

ShriRamcharitmans Part 44  
Doha 219 to 221 
श्रीरामचरितमानस भाग ४४ 
दोहा २१९ ते २२१ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--रुचिर चौतनीं सुभग सिर मेचक कुंचित केस ।
नख सिख सुंदर बंधु दोउ सोभ सकल सुदेस ॥ २१९ ॥
मस्तकावर सुंदर चौकोनी टोप्या होत्या. केस काळे व कुरळे होते. दोन्ही भाऊ नखशिखांत सुंदर होते आणि संपूर्ण शोभा जेथे जशी हवी तशी होती. ॥ २१९ ॥
देखन नगरु भूपसुत आए । समाचार पुरबासिन्ह पाए ॥
धाए धाम काम सब त्यागी । मनहुँ रंक निधि लूटन लागी ॥
नगर पाहण्यासाठी दोघे राजकुमार आले आहेत, हे वर्तमान समजताच नगरवासी घरदार व सर्व कामधाम सोडून असे धावले की,जसे दरिद्री लोक खजिना लुटण्यासाठी धावत सुटतात. ॥ १ ॥
निरखि सहज सुंदर दोउ भाई । होहिं सुखी लोचन फल पाई ॥
जुबतीं भवन झरोखन्हि लागीं । निेरखहिं राम रुप अनुरागीं ॥
स्वभावतःच सुंदर असलेल्या दोन्ही भावांना पाहून नगरवासी लोक नेत्रांचे पारणे फिटल्याचे वाटून सुखावले. तरुण स्त्रिया घराच्या खिडक्यांना डोळे लावून प्रेमाने श्रीरामाचंद्रांचे रुप न्याहाळत होत्या. ॥ २ ॥
कहहिं परसपर बचन सप्रीती । सखि इन्ह कोटि काम छबि जीती ॥
सुर नर असुर नाग मुनि माहीं । सोभा असि कहुँ सुनिअति नाहीं ॥
त्या आपसात मोठ्या प्रेमाने बोलत होत्या की, ' हे सखी, यांनी तर कोट्यवधी मदनांचे सौंदर्य लुटून घेतले आहे. देव, मनुष्य, असुर, नाग आणि मुनी यांच्यामध्येही असे सौंदर्य कुणाचे असल्याचे ऐकिवात नाही. ॥ ३ ॥
बिष्नु चारि भुज बिधि मुख चारी । बिकट बेष मुख पंच पुरारी ॥
अपर देउ अस कोउ न आही । यह छबि सखी पटतरिअ जाही ॥
भगवान विष्णूंना चार बाहू आहेत, ब्रह्मदेवांना चार मुखे आहेत, शिवांचा भयानक वेष आहे आणि त्यांना पाच मुखे आहेत. हे सखी, किंबहुना या रुपाला उपमा देण्यासाठी कोणताच देव नाही. ॥ ४ ॥
 दोहा--बय किसोर सुषमा सदन स्याम गौर सुख धाम ।
अंग अंग पर वारिअहिं कोटि कोटि सत काम ॥ २२० ॥
या किशोर अवस्थेमध्ये, हे सौंदर्याचे माहेर असलेले, सावळ्या व गोर्‍या रंगाचे किशोर हे सुखाचे निधान आहेत. यांच्या एकेका अवयवावरुन शतकोटी मदनांना ओवाळून टाकावे. ॥ २२० ॥
कहहु सखी अस को तनुधारी । जो न मोह यह रुप निहारी ॥
कोउ सप्रेम बोली मृदु बानी । जो मैं सुना सो सुनहु सयानी ॥
हे सखी, सांग बरे, असा कोणता देहधारी आहे की, जो हे रुप पाहून मोहून जाणार नाही ? ' तेव्हा दुसरी एक सखी प्रेमाने व कोमल शब्दांनी म्हणाली, ' अग शहाणे, मी जे ऐकले आहे ते ऐक. ॥ १ ॥
ए दोऊ दसरथ के ढोटा । बाल मरालन्हि के कल जोटा ॥
मुनि कौसिक मख के रखवारे । जिन्ह रन अजिर निसाचर मारे ॥
हे दोन्ही राजकुमार महाराज दशरथांचे पुत्र आहेत. ही बाल राजहंसांची सुंदर जोडी आहे. या दोघांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले आहे. यांनी युद्धक्षेत्रामध्ये राक्षसांना मारले आहे. ॥ २ ॥
स्याम गात कल कंज बिलोचन । जो मारीच सुभुज मदु मोचन ॥
कौसल्या सुत सो सुख खानी । नामु रामु धनु सायक पानी ॥
ज्यांचे अंग सावळे असून सुंदर कमलांसारखे नेत्र आहेत, जे मारीच व सुबाहू यांचा मद उतरुन टाकणारे आहेत आणि सौंदर्याची खाण आहेत, ज्यांनी हातांमध्ये धनुष्य-बाण धारण केलेले आहेत, ते हे कौसल्येचे पुत्र होत. त्यांचे नाव राम आहे. ॥ ३ ॥
गौर किसोर बेषु बर काछें । कर सर चाप राम के पाछें ॥
लछिमनु नामु राम लघु भ्राता । सुनु सखि तासु सुमित्रा माता ॥
ज्यांचा रंग गोरा असून किशोर अवस्था आहे, ज्यांनी सुंदर वेश धारण केला आहे. आणि हाती धनुष्य-बाण घेऊन जे श्रीरामांच्या मागे-मागे चालत आहेत, ते रामांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे नाव लक्ष्मण, हे सखी, त्यांची माता सुमित्रा आहे. ॥ ४ ॥
 दोहा--बिप्रकाजु करि बंधु दोउ मग मुनिबधू उधारि ।
आए देखन चापमख सुनि हरषीं सब नारि ॥ २२१ ॥
हे दोघे बंधू ऋषी विश्वामित्रांचे कार्य पूर्ण करुन आणि वाटेमध्ये मुनी गौतमांची पत्नी अहल्या हिचा उद्धार करुन येथे धनुष्य-यज्ञ पाहण्यासाठीआलेले आहेत. ' हे ऐकून सर्व स्त्रियांना आनंद झाला. ॥ २२१ ॥
देखि राम छबि कोउ एक कहई । जोगु जानकिहि यह बरु अहई ॥
जौं सखि इन्हहि देख नरनाहू । पन परिहरि हठि करइ बिबाहू ॥
श्रीरामांचे रुप पाहून कुणी तरी आपल्या सखीला म्हणाली की, ' हा जानकीसाठी योग्य आहे. हे सखी, जर राजांनी यांना पाहिले, तर ते आपली ( धनुष्ययज्ञाची ) प्रतिज्ञा सोडून आग्रहाने यांच्याशीच जानकीचे लग्न लावून टाकतील. ' ॥ १ ॥
कोउ कह ए भूपति पहिचाने । मुनि समेत सादर सनमाने ॥
सखि परंतु पनु राउ न तजई । बिधि बस हठि अबिबेकहि भजई ॥
कुणी म्हणाली की, ' राजांनी यांना ओळखले आहे आणि मुनींच्या सोबतच यांचा आदराने सन्मान केलेला आहे. परंतु हे सखी, राजे आपला पण सोडून देणार नाहीत. ते नशिबावर भरवसा ठेवून हट्टाने हा अविवेक करीत आहेत.' ( आपल्या पणावर दृढ राहण्याचा मूर्खपणा सोडणार नाहीत. ) ॥ २ ॥
कोउ कह जौं भल अहइ बिधाता । सब कहँ सुनिअ उचित फलदाता ॥
तौ जानकिहि मिलिहि बरु एहू । नाहिन आलि इहॉं संदेहू ॥
कोणी म्हणत होती की, ' जर विधाता न्यायी आहे आणि तो सर्वांना उचित फळ देतो, असे म्हणतात. हे सत्य असेल, तर जानकीला हाच वर लाभेल. हे सखी, यात शंका नाही. ॥ ३ ॥
जौं बिधि बस अस बनै सँजोगू । तौ कृतकृत्य होइ सब लोगू ॥
सखि हमरें आरति अति तातें । कबहुँक ए आवहिं एहि नातें ॥
जर दैवयोगाने हे जुळून आले, तर आम्ही सर्व कृतार्थ होऊन जाऊ. हे सखी, या नात्याने ( जानकीपती म्हणून ) हे कधी येथे येतील, ( आणि आम्हांला यांचे दर्शन होईल ), म्हणून मला फार आतुरता लागून राहिली आहे. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamcharitmans Part 43 श्रीरामचरितमानस भाग ४३

 

ShriRamcharitmans Part 43  
Doha 216 to 218 
श्रीरामचरितमानस भाग ४३ 
दोहा २१६ ते २१८ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--रामु लखनु दोउ बंधुबर रुप सील बल धाम ।
मख राखेउ सबु साखि जगु जिते असुर समग्राम ॥ २१६ ॥
राम व लक्ष्मण नावाचे हे दोघे भाऊ रुप, शील आणि बल यांचे आगर आहेत. सर्व जगाला हे कळले आहे की, यांनीच युद्धामध्ये असुरांना जिंकुन माझ्या यज्ञाचे रक्षण केले.' ॥ २१६ ॥   
मुनि तव चरन देखि कह राऊ । कहि न सकउँ निज पुन्य प्रभाऊ ॥
सुंदर स्याम गौर दोउ भ्राता । आनँदहू के आनँद दाता ॥ 
राजे म्हणाले, ' हे मुनिवर ! तुमच्या चरणांचे दर्शन घडले, हा माझा केवढा पुण्य-प्रताप आहे. हे मी सांगू शकत नाही. हे सुंदर श्याम व गौर वर्णाचे दोघे बंधू आनंदालाही आनंद देणारे आहेत. ॥ १ ॥
इन्ह कै प्रीति परसपर पावनि । कहि न जाइ मन भाव सुहावनि ॥
सुनहु नाथ कह मुदित बिदेहू । ब्रह्म जीव इव सहज सनेहू ॥ 
यांचे परस्पर-प्रेम अतिशय पवित्र व सुंदर आहे. मनाला ते खूप आवडते, परंतु बोलून दाखविता येत नाही.' विदेह जनक आनंदाने म्हणाले, ' हे मुनिवर ऐका. ब्रह्म व जीव यांच्यासारखे यांचे स्वाभाविक प्रेम आहे. ' ॥ २ ॥
पुनि पुनि प्रभुहि चितव नरनाहू । पुलक गाता उर अधिक उछाहू ॥
मुनिहि प्रसंसि नाइ पद सीसू । चलेउ लवाइ नगर अवनीसू ॥
राजे वारंवार प्रभूंकडे पाहात होते. प्रेमामुळे त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि मनात उत्साह दाटला होता. मग मुनींची प्रशंसा करीत आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून राजे त्यांना नगरामध्ये घेऊन गेले. ॥ ३ ॥
सुंदर सदनु सुखद सब काला । तहॉं बासु लै दीन्ह भुआला ॥
करि पूजा सब बिधि सेवकाई । गयउ राउ गृह बिदा कराई ॥
सर्वकाळी ( सर्व ऋतूंमध्ये ) सुखदायक असणार्‍या एका सुंदर महालात राजांनी त्यांना उतरविले. नंतर सर्व प्रकारे पूजा-सेवा करुन राजांनी त्यांचा निरोप घेऊन ते आपल्या महालात गेले. ॥ ४ ॥
दोहा--रिषय संग रघुबंस मनि करि भोजनु बिश्रामु ।
बैठे प्रभु भ्राता सहित दिवसु रहा भरि जामु ॥ २१७ ॥
रघुकुल-शिरोमणी प्रभू श्रीरामचंद्रांनी ऋषींच्या बरोबर भोजन केले, विश्रांती घेतली आणि ते लक्ष्मणासोबत बसले. त्यावेळी दिवस एक प्रहर उरला होता. ॥ २१७ ॥
लखन हृदयँ लालसा बिसेषी । जाइ जनकपुर आइअ देखी ॥
प्रभु भय बहुरि मुनिहि सकुचाहीं । प्रगट न कहहिं मनहिं मुसुकाहीं ॥
जनकपूर पाहण्यास जावे, अशी लक्ष्मणाला प्रबळ इच्छा झाली. प्रभू श्रीरामांचे भय वाटत होते आणि मुनींच्यासमोर संकोच वाटत होता. म्हणून तो स्पष्टपणे बोलून न दाखविता तो मनातल्या मनात हसत होता. ॥ १ ॥
राम अनुज मन की गति जानी । भगत बछलता हियँ हुलसानी ॥
परम बिनीत सकुचि मुसुकाई । बोले गुर अनुसासन पाई ॥
( अंतर्यामी ) श्रीरामांनी धाकट्या भावाच्या मनातला विचार ओळखला. त्यांच्या मनात भक्तवत्सलता जागी झाली. त्यांनी गुरुंच्या आज्ञेने मोठ्या विनयपूर्वक पण काहीशा संकोचाने हसत म्हटले, ॥ २ ॥
नाथ लखनु पुरु देखन चहहीं । प्रभु सकोच डर प्रगट न कहहीं ॥
जौं राउर आयसु मैं पावौं । नगर देखाइ तुरत लै आवौं ॥
' हे नाथ, लक्ष्मणाला नगर पाहायचे आहे. परंतु तुमच्या भीतीने व संकोचामुळे तो स्पष्टपणे बोलत नाही, जर तुमची आज्ञा असेल, तर मी त्याला नगर दाखवून लगेच घेऊन येतो. ' ॥ ३ ॥
सुनि मुनीसु कह बचन सप्रीती । कस न राम तुम्ह राखहु नीती ॥
धरम सेतु पालक तुम्ह ताता । प्रेम बिबस सेवक सुखदाता ॥
हे ऐकून मुनीश्वर विश्वामित्र प्रेमाने म्हणाले, ' हे राम, तुम्ही नीति-नियमांचे पालन करणार नाही, असे कसे होईल ? तुम्ही धर्माचे पालन करणारे आणि प्रेमवश होऊन सेवकांना सुख देणारे आहात. ॥ ४ ॥
दोहा--जाइ देखि आवहु नगरु सुख निधान दोउ भाइ ।
करहु सुफल सब के नयन सुंदर बदन देखाइ ॥ २१८ ॥
सुखनिधान तुम्ही दोन्ही बंधू नगर पाहून या. आपले सुंदर मुख दर्शन देऊन सर्व नगरवासीयांचे नेत्र धन्य करा. ॥ २१८ ॥
मुनि पद कमल बंदि दोउ भ्राता । चले लोक लोचन सुख दाता ॥
बालक बृंद देखि अति सोभा । लगे संग लोचन मनु लोभा ॥
सर्व लोकांच्या नेत्रांना सुखावणारे दोन्ही भाऊ मुनींच्या चरण-कमलांना वंदन करुन निघाले. ( वाटेत ) लहान मुलांच्या झुंडी त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांच्या मागून निघाले. त्यांचे नेत्र आणि मन ( त्यांना पाहून ) मोहून गेले होते. ॥ १ ॥
पीत बसन परिकर कटि भाथा । चारु चाप सर सोहत हाथा ॥
तन अनुहरत सुचंदन खोरी । स्यामल गौर मनोहर जोरी ॥
( दोघा भावांनी ) पीतांबर परिधान केले होते. कमरेच्या दुपट्ट्याला भाते बांधले होते. हातांमध्ये सुंदर धनुष्य-बाण शोभत होते. ( श्याम व गौर वर्णांच्या ) शरीरांना शोभेल अशी सुंदर चंदनाची उटी लावली होती. सावळ्या व गोर्‍या रंगाची ती सुंदर जोडी होती. ॥ २ ॥
केहरि कंधर बाहु बिसाला । उर अति रुचिर नागमनि माला ॥
सुभग सोन सरसीरुह लोचन । बदन मयंक तापत्रय मोचन ॥
त्यांची सिंहासारखी पुष्ट मान व विशाल बाहू होते. विशाल छातीवर अत्यंत सुंदर मोत्यांच्या माळा होत्या. त्यांचे सुंदर लाल कमळांसारखे नेत्र होते. त्रिविध तापांपासून मुक्त करणारे चमद्रासारखे मुख होते. ॥ ३ ॥                  
कानन्हि कनक फूल छबि देहीं । चितवत चितहि चोरि जनु लेहीं ॥
चितवनि चारु भृकुटि बर बॉंकी । तिलक रेख सोभा जनु चॉंकी ॥
कानांमध्ये सोन्याची कर्णफुले फार शोभून दिसत होती आणि पाहता क्षणीच ( पाहणार्‍यांचे ) चित्त ते जणू चोरुन घेत होती. त्यांची नजर फार मनोहर आणि भुवया सुंदर कमानदार होत्या. त्यांच्या कपाळावरील तिलक इतका सुंदर होता की, जणू त्या शोभेवर उमटवलेली मोहर ॥ ४ ॥



Custom Search

Dnyaneshwari Adhyay 3 Part 9 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ९

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 9 
Ovya 201 to 225 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ९ 
ओव्या २०१ ते २२५
पतंगा दीपीं अलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण ।
तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ २०१ ॥
२०१) ज्याप्रमाणें दिव्याला आलिंगन देण्यांत पतंगाला अचूक मरण ठेवलें आहे. त्याप्रमाणें विषयाचरणांत अचूक आत्मानाश होतो.
म्हणोनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । 
लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥ २०२ ॥
२०२) म्हणून कोणाहि शहाण्या मनुष्यानें ह्या इंद्रियांचे मौजेनेंदेखील लाड करुं नयेत.
हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याध्रसंसर्ग सिद्धी जाईल ।
सांगें हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ॥ २०३ ॥
२०३) अरे, सापाबरोबर खेळतां येईल काय ? किंवा, वाघाची संगत नीटपणें शेवटास जाईल ? सांग बरें. हालाहल विष प्यालें तर पचेल काय ?   
देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ।
तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥
२०४) पाहा, सहज खेळतां खेळतां जर आग लागली आणि मग जर ती बळावली, जर ती जशी आटोपत नाहीं, त्याप्रमाणें इंद्रियांचे लाड केले, तर तें चांगलें नाहीं. 
एर्‍हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।
कां नाना भोगरचना । मेळवावी ॥ २०५ ॥    
२०५) अर्जुना, सहज विचार करुन पाहिलें तर, या परतंत्र शरीराकरितां नाना प्रकारचे व्यवस्थित भोग कां मिळवावेत ?
 आपण सायासेंकरुनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें ।
उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें का ॥ २०६ ॥
२०६) आपण अतिशय कष्ट करुन, जेवढी म्हणून संपत्ति आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून, रात्रंदिवस या देहाची जोपासना कां करावी ?  
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें ।
तेणें स्वधर्मु सांडूनि देहातें । पोखावें काई ॥ २०७ ॥
२०७) या लोकांत सर्व प्रकारें कष्ट करुन सर्व प्रकारची संपत्ति संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन, या संपत्तीनें या देहाला पुष्ट करावें, हें योग्य आहे काय ?   
मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा ।
ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥
२०८) बरें, हें ( शरीर पाहिलें ) तर पांच भूतांच्या मिलाफानें झालेलें आहे व तें शेवटीं पांच भूतांतच मिळून जाणार; त्या वेळीं आपण केलेले श्रम कोठें शोधून काढावेत ? ( म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा ? )  
म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण ।
यालागीं एथ अंतःकरण । देयावेंना ॥ २०९ ॥
२०९) म्हणून केवळ देहाचें पोषण करणें, हा उघड उघड घात आहे, याकरितां तूं ( असल्या ) देहपोषणाकडे लक्ष देऊं नकोस.
एर्‍हवीं इंद्रियांचियां अर्था- । सारिखा विषयो पोखितां ।
संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥ २१० ॥
२१०) एरवीं इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणें विषय देत गेले, तर मनाला संतोष प्राप्त होईल हें खरें; 
परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु ।
जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ २११ ॥
२११) परंतु तो संतोष म्हणजे बाहेरुन सभ्य दिसणार्‍या चोराच्या संगतीप्रमाणें आहे; तो चोर गांवाची शीव ओलांडली नाहीं तेथपर्यंत क्षणभर गप्प असतो. ( मग पुढें वनांत गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो. )  
बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता ।
परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी ॥ २१२ ॥
२१२) बाबा, वचनागादि विषें गोड आहेत खरीं; पण त्यांच्याविषयीं अंतःकरणांत इच्छा कदाचित् उत्पन्न होईल, ( पण ती उत्पन्न होऊं देऊं नकोस; ) परंतु त्यांच्या परिणामांचा विचार केला तर तीं प्राणघातक आहेत.  
देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे ।
जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥ २१३ ॥
२१३) पाहा, ज्याप्रमाणें गळाला लावलेलें आमिष माशाला भुलवितें, त्याप्रमाणें इंद्रियांच्या ठिकाणीं असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते.    
परी तया,माजी गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये ।
तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ २१४ ॥
२१४) परंतु त्या अभिलाषाखालीं प्राण घेणारा गळ आहे, हें तो आमिषानें झांकला गेला असल्यामुळें ज्याप्रमाणें त्या माशाला कळत नाहीं;  
तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा धरिजेल ।
तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥ २१५ ॥
२१५) तशीच स्थिति या विषयांच्या लालसेनें होईल. जर विषयाांचा अभिलाष धरला, तर क्रोधरुपीं अग्नींत पडावें लागेल.
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी ।
आणी मृगातें बुद्धी । साधावया ॥ २१६ ॥
२१६) जसा पारधी मातण्याच्या हेतुनें हरिणाला चहूंकडून घेरुन माराच्या कचाटींत आणतो;  
एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे ।
पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥ २१७ ॥
२१७) येथें तसाच प्रकार आहे. म्हणून तूं विषयांचा संग धरुं नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत, असे समज.  
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा ।
एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ॥ २१८ ॥
२१८) म्हणून विषयेच्छेला थाराच देऊं नये. या विषयाची मनांतहि आठवण आणूं नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊं देऊं नकोस.
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । 
तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥ २१९ ॥
२१९) पाहा, अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण जरी असला तरी त्याचेंच आचरण केलेलें चांगलें,
येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा ।
परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥
२२०) याहून दुसरा जो परकीयाचा आचार, तो खरोखर दिसावयास चांगला जरी दिसला तरी आचरण करणारानें आपणांस विहित असलेल्या कर्माचेंच आचरण करावें. 
सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वान्नें आहाति बरवीं । 
तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥
२२१) शूद्राच्या घरीं सर्व चांगलीं पक्वानें आहेत, तों ब्राह्मण दरिद्री जरी असला, तरी त्याने कशी सेवन करावींत ? सांग. 
हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे ।
अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥
२२२) अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी ? जें प्राप्त करुन घेणें योग्य नाहीं, त्याची इच्छा कशी करावी ? अथवा विचार कर; इच्छा जरी झाली, तरी त्याचें सेवन करावें काय ?  
तरी लोकांचीं धवराळें । देखोनियां मनोहरें ।
असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवी ॥ २२३ ॥
२२३) दुसर्‍यांचीं सुंदर चुनेगच्ची घरें पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकव्यात ?  
हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली ।
तरी भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २२४ ॥
२२४) हें असूं दे. आपली बायको जरी रुपानें वाईट असली तरी ज्याप्रमाणें तिच्याच बरोबर संसार करावा हे चांगलें; 
तेवीं आवडे सांकडु । आचरतां जरी दुवाडु ।
तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥ २२५ ॥
२२५) त्याप्रमाणें कितीही अडचणींचा प्रसंग आला अथवा आचरावयास त्रास पडला, तरी आपला धर्मच परलोकीं सुख देणार आहे.   



Custom Search

Monday, September 7, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 8 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग 8

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 8  
Ovya 176 t0 200
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ८ 
ओव्या १७६ ते २००
जैसी बहुरुपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं ।
परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥
१७६) बहुरुपी जेव्हां राजाराणीचें सोंग आणतात, त्या वेळीं त्यांच्या मनांत आपण स्त्रीपुरुष आहोंत, अशी कल्पनाहि नसते; तथापि तें जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणें लोकांत करतात; ( त्याप्रमाणें लोकसंग्रहाकरितां निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले, तरी त्यांस कर्माचें बंधन प्राप्त होत नाहीं. ) 
देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुलां माथां घेईजे ।
तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ॥ १७७ ॥
१७७) अर्जुना, पाहा. दुसर्‍याचें ओझें आपण आपल्या शिरावर घेतलें, तर आपण त्या भारानें दडपले जाणार नाहीं का ? सांग. 
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निफजती प्रकृतिधर्में ।
तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
१७८) तसें प्रकृतीच्या गुणानें जीं बरींवाईट कर्में होतात, तीं अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळें, ' मी करतों ' असें म्हणतो.
ऐसा अहंकाराधिरुढ । एकदेशी मूढ ।
तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥
१७९) अशा रीतीनें देहाहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्यास हें गूढ तत्त्वज्ञान उघड करुं नये.  
हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित ।
तें अर्जुना देऊन चित्त । अवधारीं पां ॥ १८० ॥
१८०) हें राहूं दे. अर्जुना, आतां तुला हिताची गोष्ट सांगतों, ती तूं चित्त देऊन ऐक.  
जे तत्त्वज्ञानियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं ।
जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥
१८१) ती अशी कीं, ज्या प्रकृतिच्या गुणांपासून हीं सर्व कर्में उत्पन्न होतात, तिच्याशीं ब्रह्मनिष्ठांचें तादात्म्य नसतें. 
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी ।
साक्षीभूत होउनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥
१८२) ते देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारीं जीं कर्में, त्यांचें उल्लंघन करुन, देहामध्यें उदासीनतेनें राहातात.  
म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती ।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥
१८३) म्हणून सूर्याच्या प्रकाशांत जरी प्राणिमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्यांच्या कर्मानें जसा लिप्त होत नाहीं, तसें हे शरीरधारी जरी असले, तरी ते कर्मबंधाच्या ताब्यांत जात नाहींत.
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे ।
प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥ १८४ ॥
१८४) या जगांत, जो प्रकृतीच्या तावडींत सांपडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मांत बद्ध होतो.
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें ।
तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥
१८५) गुणांच्या योगानें इंद्रियें आपापलें व्यापार करतात. त्या दुसर्‍यांनीं ( गुणांनीं ) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळें आपणाकडे घेतो, ( तो कर्मांत बद्ध होतो. )
 तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं ।
परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरुपीं ॥ १८६ ॥
१८६) तरी सर्व विहित कर्में करुन, तीं मला तूं अर्पण कर; परंतु चित्तवृत्ति मात्र आत्मस्वरुपीं ठेव.
हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था ।
ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसी ॥ १८७ ॥
१८७) हें विहित कर्म, मी त्याचा कर्ता अथवा अमुक कारणाकरितां मी त्या कर्माचें आचरण करीन, असा अभिमान तुझ्या चित्तांत कदाचित येईल, तर तो येऊं देऊं नकोस.
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।
मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥
१८८) तूं केवळ देहासक्त होऊन राहूं नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकालीं उपभोग घे. 
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरुढ पां इये रथीं । 
देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥
१८९) आतां तूं आपल्या हातांत धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदानें वीरवृत्तीचा अंगीकार कर.
जगीं कीर्ति रुढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं ।
यया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ १९० ॥
१९०) या जगांत तूं आपली कीर्ति रुढ कर व आपल्या धर्माचा मान वाढव; आणि पृथ्वीला या दृष्टांच्या ओझ्यापासून सोडव.
आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं ।
एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥ १९१ ॥
१९१) आतां अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगीं युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलूं नकोस. 
हें अनुपरोघ मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे ।
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ १९२ ॥
१९२) अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीनें मान्य करतात आणि विश्र्वासपूर्वक त्याप्रमाणें वागतात, 
तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु ।
म्हनोनि हें निश्र्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥
१९३) ते सर्व कर्में करीत असले तरी, ते कर्मरहित आहेत, असें अर्जुना, तूं समज. म्हणून हें कर्म अवश्य करणीय आहे. 
नातरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी ।
जे हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥
१९४) नाहींतर प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड करुन, जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करुन तें टाकून देतात;
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करुनि देखिती ।
कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥
१९५) जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादरानें पाहातात, किंवा जे वाचाळपणानें ह्यास पुष्पित वाणी म्हणतात;
ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले ।
अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
१९६) ते लोक अविवेकरुपी दारुनें मत्त झाले आहेत व विषयरुपी विषानें व्यापलेले आहेत व अज्ञानरुपी चिखलामध्यें फसलेले आहेत, असें निःसंशय समज. 
देखें शवाचां हातीं दिघलें । जैसें कां रत्न वायां गेलें ।
नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
१९७) पाहा, प्रेताच्या हातांत दिलेलें रत्न ज्याप्रमाणें व्यर्थ जातें अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाहीं; 
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।
मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥
१९८) किंवा, ज्याप्रमाणें चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाहीं; त्याप्रमाणें हा विचार मूर्खांना रुचणार नाहीं. 
तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था ।
तयांसी संभाषण सर्वथा । करावें ना ॥ १९९ ॥
१९९) अर्जुना, याप्रमाणें जे या परमार्थाकडे तोंड फिरविणारे असतील त्यांच्यापाशीं मुळींच भाषाण करुं नये. 
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करुं लागती ।
सांगें पतंग काय साहती । प्रकाशातें ॥ २०० ॥
२००) ते या उपदेशाला तर मानीत नाहींतच आणि उलट त्याची निंदादेखील करुं लागतात; म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करुं शकतील ? 


Custom Search

Friday, September 4, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 7 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ७

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 7 
Ovya 151 t0 175 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ७ 
ओव्या १५१ ते १७५
जे स्वकर्में निष्कामता । अनुसरले पार्था । 
कैवल्य पर तत्त्वतां । पातले जगीं ॥ १५१ ॥
१५१) अर्जुना, जे निष्काम बुद्धीनें स्वधर्माचें आचरण करतात, ते या जगामध्यें तत्त्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोंचतात. 
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख । 
न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥
१५२) पाहा, कर्ममात्राचा मुळींच त्याग न करतां जनकादिकांना मोक्षाचें सुख मिळालें. 
याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था ।
हे आणिकाहि एका अर्था । उपकारेल ॥ १५३ ॥
१५३) अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणीं आस्था असणें जरुर आहे. ही आस्था आणखीहि एका कामाला उपयोगी पडेल. 
जे आचरतां आपणपेयां । देखी लागेल लोका यया ।
तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि ॥ १५४ ॥
१५४) कारण आपण आचरण केलें असतां या लोकांना तो कित्ता होईल; आणि अर्थात् सहजच त्याची कर्मलोपानें होणारी हानि टळेल.
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥
१५५) पाहा, मिळवावयाचें तें ज्यांनीं मिळविलें व म्हणून निरिच्छ झाले, त्यांनादेखील, लोकांना वळण लावण्याकरितां, कर्म करणें प्राप्त आहे.    
मार्गी अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा ।
अज्ञाना प्रकतावा धर्मु तैसा । आचरोनि ॥ १५६ ॥
१५६) रस्त्यानें आंधळ्याच्या बरोबर पुढें चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्या बरोबर चालतो, त्याप्रमाणें अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषानें आपण आचरण करुन धर्म स्पष्ट करुन दाखवावा.
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे ।
तिहीं कवणेपरी जाणिजें । मार्गातें या ॥ १५७ ॥
१५७) अरे, असें जर ( ज्ञानी पुरुषानें ) न केलें तर, अज्ञानी लोकांना काय कळणार आहे ? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकारें समजेल ? 
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥
१५८) या जगांत थोर लोक जें कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असें म्हणतात; आणि इतर सर्वसामान्य लोक त्याचेंच आचरण करतात.   
हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावें ।
विशेषें आचरावें । लागें संतीं ॥ १५९ ॥
१५९) अशी स्थिति असल्यामुळें ( ज्ञानी पुरुषानें ) कर्म सोडणें बरोबर नाही ( इतकेच काय, परंतु ) संतांनीं तर याचें आचरण विशेष काळजीनें केलें पाहिजे.  
आतां आणिकाचिया गोठी । तुज सांगों काई किरीटी ।
देखें मीचि इये राहाटी । वर्तत असें ॥ १६० ॥
१६०) अर्जुना, आतां दुसर्‍याच्या गोष्टी तुला कशाला सांगूं ? हें पाहा, मीसुद्धां याच मार्गानें वागतों.  
काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें ।
आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥ 
१६१) मला कांहीं कमी आहे म्हणून किंवा कांहीं एक इच्छा धरुन मी धर्माचें आचरण करतों, असें म्हणशील,
तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं ।
ऐसी सामुग्री माझां अंगीं । जाणसी तूं ॥ १६२ ॥
१६२) तर पूर्णतेच्या दृष्टीनें पाहिलें असतां, माझ्या तोडीला या जगांत दुसरा कोणीहि नाहीं; अशा तर्‍हेचें सामर्थ्य माझ्या अंगांत आहे, हें तुला माहीत आहे.    
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।
तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥ १६३ ॥
१६३) मीं आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला तो माझा पराक्रम तूं पाहिला आहेस, असा मीदेखील निमूटपणें कर्म करतों.
परी स्वधर्मीं वर्ते कैसा । साकांक्षु कां होय जैसा ।
तयाचि एका उद्देशा-। लागोनियां ॥ १६४ ॥
१६४) परंतु ती कर्मे मी कशीं करतों म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फळाच्या उद्देशानें ज्या दक्षतेनें कर्मे करतो, तितक्याच दक्षतेनें मीहि पण कर्माचरण करतों; पण तें केवळ त्याच एका हेतूनें कीं- 
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ ।
तरी न व्हावें बरळ । म्हनोनियां ॥ १६५ ॥  
१६५) सर्व प्राणीसमूह आमच्या तंत्रानें चालणारा आहे, तेव्हां तो भलतीकडे जाऊं नये म्हणून; 
आम्ही पूर्णकाम होउनी । जरी आत्मस्थिती राहुनी । 
तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ॥ १६६ ॥
१६६) आम्ही निरिच्छ होऊन जर आपल्या स्वरुपस्थितींतच राहिलों, तर ही प्रजा भवसागरांतून कशी पार पडेल ? 
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी ।
ते लौकिक स्थिति आघवी । नासिली होईल ॥ १६७ ॥
१६७) यांनीं आमच्या मार्गाकडे पाहावें आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी; असा प्रकार असल्यामुळें ( आम्ही कर्म टाकून बसलों तर ) ती लोकांची राहाणी सर्वच बिघडेल.   
म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते ।
तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥ १६८ ॥
१६८) म्हणून या लोकांत जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेनें युक्त असेल, त्यानें तर विशेषेंकरुन कर्माचा त्याग करुं नये.
देखें फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा ।
कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥
१६९) पाहा. फलाच्या आशेनें फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेनें कर्माचें आचरण करतो, तितक्याच उत्सुकतेनें फलाशा नसलेल्या लोकांनीहि कर्में केलीं पाहिजेत. 
जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । 
रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥ १७० ॥
१७०) कारण, अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारें नेहमीं जतन करुन ठेवणें योग्य आहे, म्हणून-
मार्गाधारें वर्तावें । विश्र्व हें मोहरें लावावें ।
अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥
१७१) शास्त्रानें सांगितल्याप्रमाणें वागून जगास सरळ मार्गाला लावावें, आणि आपण लोकांमध्यें लोकबाह्य वागूं नये.
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।
म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥
१७२) जें ( तान्हें बालक ) मोठ्या कष्टानें आईच्या अंगावरचें दूध पितें, तें पक्वानें कसें खाईल ? म्हणून अर्जुना, तीं पक्वान्नें ज्याप्रमाणें तान्ह्या मुलांना देऊं नयेत;  
तैशीं कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता ।
न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥ १७३ ॥
१७३) त्याप्रमाणें ज्यांच्या अंगीं कर्मे चांगल्या तर्‍हेनें करण्याची योग्यता नाहीं, त्यांना थट्टेनेंदेखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करुं नये.  
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।
नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥ १७४ ॥
१७४) त्यांस योग्य कर्माची वागणूक लावून देणें हें योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाची स्तुति करावी आणि निष्काम पुरुषांनीहि सत्कर्माचेंच आचरण करुन दाखवावें. 
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगी ।
तो कर्मबंधु आंगीं । वाजेलना ॥ १७५ ॥
१७५) लोककल्याणासाठीं जरी त्यांनीं कर्माचें आचरण केलें तरी कर्माचें बंधन त्यांस प्राप्त होणार नाहीं.



Custom Search

Dnyaneshwari Adhyay 3 Part 6 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ६

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 6 
Ovya 126 to 150 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ६ 
ओव्या १२६ ते १५०
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।
ऐसी आद्य हे कथा । मुरारी सांगे ॥ १२६ ॥
१२६) अर्जुना, अशा रीतीनें वागण्याखेरीज दुसर्‍या तर्‍हेनें वागूं नये; अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णांनीं सांगितली.
जे देहचि आपणपें मानिति । आणि विषयांतें भोग्य म्हणती ।
यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥ १२७ ॥
१२७) आपण देहच आहोंत, असें मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तु आहेत असें समजतात आणि ज्यास यापलीकडे दुसरी कांहींच कल्पना नसते;  
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसांते बरळ ।
अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥
१२८) ते बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ति वगैरे सर्व कांहीं यज्ञाची सामग्री आहे असें न समजतां, त्या सर्व संपत्तिचा केवळ स्वतःसाठीं भोग घेण्यास प्रवृत्त होतात;   
इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । 
ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥
१२९) इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदर्थ ते तयार करतात; ते पापी लोक या पदार्थांच्या रुपानें वस्तुतः पापच सेवन करतात, असे समज.
जे संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें ।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥ १३० ॥
१३०) वास्तविक पाहातां जेवढीं आपली संपत्ति आहे, ती सर्व यज्ञांत उपयोगी पडणारी सामग्री आहे, असें समजावें. मग ती स्वधर्मरुपी यज्ञानें परमेश्र्वराला अर्पण करावी.
हें सांडोनिया मूर्ख । आपणपेंयांलागीं देख ।
निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥
१३१) अशा रीतीनें वागावयाचें टाकून, पाहा, ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरितां नाना प्रकारचीं पक्वानें तयार करितात. 
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । 
तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां ॥ १३२ ॥
ज्या अन्नाच्या योगानें यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्र्वर संतुष्ट होतो, तें हें अन्न कमी योग्यतेचें नाहीं. म्हणून
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरुप जाण ।
जे जीवनहेतु कारण । विश्र्वा यया ॥ १३३ ॥
१३३) तें अन्न सामान्य समजूं नये. अन्न हें ब्रह्मरुप आहे असें समज; कारण कीं अन्न हें सर्व जगाला जगण्याचें साधन आहे.   
अन्नास्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें ।
मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
१३४) हीं सर्वं भूतें अन्नामुळें वाढतात व या अन्नाला पाऊस चोहींकडे उत्पन्न होतो;  
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरुप ॥ १३५ ॥
१३५) तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो; तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरुप ब्रह्म हें कर्माचें मूळ आहे. 
मग वेदांतें परापर । प्रसवतसे अक्षर ।
म्हणऊनि हें चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
१३६) दूर व जवळ असणारें जें ब्रह्म, तें वेदांना उत्पन्न करतें, म्हणून हे स्थावरजंगमात्मक विश्व ब्रह्मांत गोंवलेलें आहे. 
परी कर्माचिये मूर्ती । यज्ञीं अधिवासु श्रुती ।
ऐकें सुभद्रापती । अखंड गा ॥ १३७ ॥
१३७) अर्जुना, ऐका; परंतु मूर्तिमंत कर्मरुप यज्ञामध्यें वेदांचें निरंतर राहाणें आहे. 
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा ।
सांगितली या अध्वरा । लागौनियां ॥ १३८ ॥
१३८) अर्जुना, याप्रमाणें ही मुळांतली परंपरा तुला या यज्ञाकरितां थोडक्यांत सांगितली.
म्हणूनि समूळ हा उचितु । स्वधर्मरुप ऋतु ।
नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥
१३९) म्हणून जो उन्मत्त पुरुष, या लोकांमध्यें उचित अशा स्वधर्मरुप यज्ञाचें पूर्णपणें आचरण करणार नाहीं,
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ।
जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥ 
१४०) जो वाईट आचरण करुन इंद्रियांचे केवळ लाड पुरवितो, तो पापांची राशी असून भूमीला केवळ भार आहे, असें समज.
तें जन्म कर्म सकळ । अर्जुनाअति निष्फळ ।
जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ॥ १४१ ॥
१४१) जसें भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी निरुपगोगी असते, त्याप्रमाणें अर्जुना, त्याना जन्म व कर्म निष्फळ आहे; 
कां गळा स्तन अजेचे । तैसे जियालें देखें तयाचें ।
जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडोचिना ॥ १४२ ॥
१४२) किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचें आचरण होत नाहीं. त्यांचें जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणें निरर्थक आहे, असें समज. 
म्हणोनी ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १४३ ॥  
१४३) म्हणून अर्जुना, ऐक. आपला हा धर्म कोणीहि सोडूं नये, कायावाचामनेंकरुन ह्या एकाचेंच आचरण करावें.
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें ।
मग उचित कां आपुलें । वोसंडावें ॥ १४४ ॥
१४४) अरे, शरीर जरी प्राप्त झालें आहे, तरी तें पूर्वकर्मानुसार मिळालेलें आहे. असें आहे, तर मग आपल्यास विहित असलेलें कर्म आपण कां टाकावें ?    
परिस पां सव्यासाची । मूर्ती लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ १४५ ॥   
१४५) अर्जुना, ऐका. मनुष्यशरीर मिळालें असतां, जें कर्माचा कंटाळा करतात, ते अडाणी आहेत.   
देखें असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।
जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥
१४६) पाहा, जो निरंतर आपल्या स्वरुपांत गढलेला असतो, तोच एक या जगांत देहधर्मानें युक्त असूनहि कर्मानें लिप्त होत नाही.   
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला ।
म्हणोनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥
१४७) कारण कीं, पाहा, तो आत्मज्ञानानें संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो; म्हणून त्याचा कर्माशीं संबंध सहज सुटलेला असतो. 
तृप्ति झालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । 
देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥ १४८ ॥
१४८) पाहा, ज्याप्रमाणें पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणें आत्मानंदाच्या तृप्तींत कर्माची खटपट ( सहजच ) संपते.   
जंववरी  अर्जुना । तो बोध भेटेना मना ।
तंवचि यया साधना । भजावें लागे ॥ १४९ ॥
१४९) अर्जुना, जोंपर्यंत अंतःकरणांत तें ज्ञान उत्पन्न होत नाहीं तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. 
म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु । 
होऊनियां उचितु । स्वधर्में रहातें ॥ १५० ॥
१५०) म्हणून तूं सर्व आसक्ति टाकून देऊन निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणें वाग. 




Custom Search

0 comments
Newer Posts Older Posts Home