Doha 204 to 206
श्रीरामचरितमानस भाग ३९
दोहा २०४ ते २०६
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--कोसलपुर बासी नर नारि बृद्ध अरु बाला ।
प्रानहु ते प्रिय लागत सब कहुँ राम कृपाला ॥ २०४ ॥
कोसलपुरातील रहिवासी स्त्री-पुरुष, आबाल-वृद्ध सर्वांना कृपाळू रामचंद्र प्राणांहूनही प्रिय वाटत. ॥ २०४ ॥
बंधु सखा सँग लेहिं बोलाई । बन मृगया नित खेलहिं जाई ॥
पावन मृग मारहिं जियँ जानी । दिन प्रति नृपहि देखावहिं आनी ॥
श्रीराम भावांना व इष्ट मित्रांना बोलावून बरोबर घेत आणि नित्य वनात शिकारीस जात. मनाला पवित्र वाटत, त्या मृगांना मारुन आणून रोज राजा दशरथांना दाखवीत असत. ॥ १ ॥
जे मृग राम बान के मारे । ते तनु तजि सुरलोक सिधारे ॥
अनुज सखा सँग भोजन करहिं । मातु पिता अग्या अनुसरहीं ॥
जे मृग श्रीरामांच्या बाणाने मारले जात, ते देह सोडून देवलोकी जात. श्रीराम आपले धाकटे भाऊ व मित्रांसह भोजन करीत आणि माता-पित्यांच्या आज्ञेचे पालन करीत असत. ॥ २ ॥
जेहि बिधि सुखी होहिं पुर लोगा । करहिं कृपानिधि सोइ संजोगा ॥
बेद पुरान सुनहिं मन लाई । आपु कहहिं अनुजन्ह समुझाई ॥
नगरीतील लोकांना आनंद व्हावा, असेच योगायोग कृपानिधान श्रीराम जुळवून आणत असत. ते लक्षपूर्वक वेद-पुराणे ऐकत आणि मग स्वतः धाकट्या भावांना समजावून देत. ॥ ३ ॥
प्रातकाल उठि कै रघुनाथा । मातु पिता गुरु नावहिं माथा ॥
आयसु मागि करहिं पुर काजा । देखि चरित हरषइ मन राजा ॥
श्रीरघुनाथ प्रातःकाळी उठून माता-पिता आणि गुरु यांच्या पाया पडत आणि त्यांची आज्ञा घेऊन नगरातील कामे करीत असत. त्यांचे चरित्र पाहून महाराज दशरथ मनात खूप आनंदित होत असत. ॥ ४ ॥
दोहा--ब्यापक अकल अनीह अज निर्गुन नाम न रुप ।
भगत हेतु नाना बिधि करत चरित्र अनूप ॥ २०५ ॥
जे व्यापक, अखंड, इच्छारहित, अजन्मा व निर्गुण आहेत, तसेच ज्यांना नाव नाही, रुप नाही, तेच भगवान भक्तांसाठी नाना प्रकारच्या अलौकिक लीला करीत. ॥ २०५ ॥
यह सब चरित कहा मैं गाई । आगिलि कथा सुनहु मन लाई ॥
बिस्मामित्र महामुनि ग्यानी । बसहिं बिपिन सुभ आश्रम जानी ॥
हे सर्व चरित्र मी वर्णन करुन सांगितले. आता पुढील कथा लक्ष देऊन ऐका. ज्ञानी महामुनी विश्रामित्र वनामध्ये पवित्र स्थानी आश्रम करुन राहात होते. ॥ १ ॥
जहँ जप जग्य जोग मुनि करहीं । अति मारीच सुबाहुहि डरहीं ॥
देखत जग्य निसाचर धावहिं । करहिं उपद्रव मुनि दुख पावहिं ॥
तेथे ते जप, यज्ञ आणि योगसाधना करीत असत. परंतु मारीच व सुबाहू राक्षस यांना ते फार घाबरत असत. यज्ञ पाहताच राक्षस धावून येत व उपद्रव देत असत. त्यामुळे मुनींना फार त्रास होई. ॥ २ ॥
गाधितनय मन चिंता ब्यापी । हरि बिनु मरहिं न निसिचर पापी ॥
तब मुनिबर मन कीन्ह बिचारा । प्रभु अवतरेउ हरन महि भारा ॥
गाधी-पुत्र विश्र्वामित्रांच्या मनात काळजी वाटत होती. हे पापी राक्षस भगवंतांच्याशिवाय कुणाकडूनही मारले जाणार नाहीत. तेव्हा श्रेष्ठ मुनींनी मनात विचार केला की, प्रभूंनी पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी अवतार घेतला आहे. ॥ ३ ॥
एहूँ मिस देखौं पद जाई । करि बिनती आनौं दोउ भाई ॥
ग्यान बिराग सकल गुन अयना । सो प्रभु मैं देखब भरि नयना ॥
तेव्हा या निमित्ताने जाऊन मी प्रभूंच्या चरणांचे दर्शन घेईन आणि विनंती करुन दोन्ही भावांना येथे घेऊन येईन. अहाहा, ते ज्ञान, वैराग्य आणि सर्व गुणांचे धाम आहेत, त्या प्रभूंना मी डोळे भरुन पाहीन. ॥ ४ ॥
दोहा--बहुबिधि करत मनोरथ जात लागि नहिं बार ।
करि मज्जन सरऊ जल गए भूप दरबार ॥ २०६ ॥
अशा प्रकारचे अनेक मनोरथ करीत त्यांना जाण्यास वेळ लागला नाही, शरयू नदीच्या जलामध्ये स्नान करुन ते दशरथ राजांच्या दरबारात पोहोचले. ॥ २०६ ॥
मुनि आगमन सुना जब राजा । मिलन गयउ लै बिप्र समाजा ॥
करि दंडवत मुनिहि सनमानी । निज आसन बैठारेन्हि आनी ॥
राजांनी जेव्हा मुनींच्या आगमनाची वार्ता ऐकली, तेव्हा ते ब्राह्मण वृंदाला सोबत घेऊन त्यांना भेटण्यास गेले आणि दंडवत घालून मुनींचा सन्मान करीत त्यांना आणून त्यांनी आसनावर बसविले. ॥ १ ॥
चरन पखारि कीन्हि अति पूजा । मो सम आजु धन्य नहिं दूजा ॥
बिबिध भॉंति भोजन करवावा । मुनिबर हृदयँ हरष अति पावा ॥
राजांनी त्यांचे चरण प्रक्षालन करुन त्यांची चांगल्या प्रकारे पूजा केली आणि म्हटले, ' माझ्यासारखा धन्य आज दुसरा कोणीही नाही.' नंतर त्यांना अनेक प्रकारचे भोजन वाढले. त्यामुळे श्रेष्ठ मुनींच्या मनाला खूप संतोष झाला. ॥ २ ॥
पुनि चरननि मेले सुत चारी । राम देखि मुनि देह बिसारी ॥
भए मगन देखत मुख सोभा । जनु चकोर पूरन ससि लोभा ॥
नंतर राजांनी चारी पुत्रांना मुनींच्या चरणांवर घातले. श्रीरामचंद्रांना पाहून मुनींचे देहभान हरपले. ते श्रीरामांच्या मुखाची शोभा पाहताच असे गुंग होऊन गेले की, जणू चकोर पूर्ण चंद्रमा पाहून मोहून जातो. ॥ ३ ॥
तब मन हरषि बचन कह राऊ । मुनि अस कृपा न कीन्हिहु काऊ ॥
केहि कारन आगमन तुम्हारा । कहहु सो करत न लावउँ बारा ॥
तेव्हा राजांनी आनंदाने म्हटले, ' हे मुनी, अशाप्रकारे ( दर्शन देण्याची ) कृपा तुम्ही कधी केली नाही. आज तुमचे कशासाठी शुभागमन झाले आहे ? सांगा, ते पूर्ण करण्यास मी वेळ लावणार नाही. ' ॥ ४ ॥
असुर समूह सतावहिं मोही । मैं जाचन आयउँ नृप तोही ॥
अनुज समेत देहु रघुनाथा । निसिचर बध मैं होब सनाथा ॥
( मुनी म्हणाले, ) ' हे राजा, राक्षसांचे समुदाय मला फार त्रास देतात. यासाठी मी तुमच्याकडे काही मागण्यास आलो आहे. धाकट्या भावासह श्रीरघुनाथांना माझ्याकडे सोपवा. राक्षस मारले गेल्यावर मी सुरक्षित होईन. ॥ ५ ॥
Custom Search
No comments:
Post a Comment