Showing posts with label Shri Gurucharitra. Show all posts
Showing posts with label Shri Gurucharitra. Show all posts

Wednesday, July 15, 2015

Gurucharitra Adhyay 36 Part 2/5 श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ भाग २/५


Gurucharitra Adhyay 36 
Gurucharitra Adhyay 36 is in Marathi. This Adhyay describes many things which are required to do by a Brahmin. It describe the importance of Gayatri Mantra, How to perform Sabdhya, what should be the daily routine of a Brahmin and so on. Name of this Adhyay is AanhikNirupanam.
श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ भाग २/५ 
आचार आम्ही आतां करीत । तेणें संशय मनीं होत ।
ब्रह्मऋषि तूं विख्यात । तुझा उपदेश आम्हां व्हावा ॥ १११ ॥
गुरुमुखाविणें मंत्र । ग्राह्य नव्हे, तो अपवित्र ।
आम्हां गुरु तूं पवित्र । आचार सर्व सांगावा ॥ ११२ ॥
पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार परियेसीं ।
जेणें होय अप्रयासीं । सर्व सिद्धिपावती ॥ ११३ ॥
ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि । 
मग ध्याव्या मूर्ती तिन्ही । ब्रह्मा-विष्णु-महेश्र्वर ॥ ११४ ॥
मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह ।
सनत्कुमार-सनक-सनंदन सह । सनातन स्मरावे तये वेळीं ॥ ११५ ॥
सह नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी ऐका ।
सप्त समुद्र असती देखा । स्मरावें सप्त पर्वतां ॥ ११६ ॥
सप्त ऋषींतें स्मरोनि । सप्त द्वीपें सप्त भुवनीं ।
समस्त नामकरणें घेऊनि । मग म्हणावें " प्रातःस्मरामि " ॥ ११७ ॥
मग उठावें शयनस्थानीं । आचमन करोनि दोनी ।
मूत्रशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावें ॥ ११८ ॥
पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमन तुम्हांसी ।
सांगतसें विस्तारेसीं । जे जे समयीं करणें असे ॥ ११९ ॥
स्नानपूर्व अपर दोनी । उदक पितां येणेंचि गुणीं ।
निजतां उठतां समयीं दोनी । आचमनें करावी ॥ १२० ॥
भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया, शिंकलिया दोनी ।
लघुशंका शौचीं दोनी । आचमन करावें ॥ १२१ ॥
अघोवायुशब्द झालिया । वोखटें कांहीं दृष्टीं देखिलिया ।
दोन्ही वेळां आचमनूनियां । शुचि होय परियेसा ॥ १२२ ॥
जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारीं ।
स्पर्शावें चक्षु श्रोत्रीं । येणें पवित्र परियेसा ॥ १२३ ॥
ब्राह्मणाचे उजवे कानीं । सप्त देवता असती निर्गुणी ।
त्यांसी स्पर्शितां तत्क्षणीं । आचमनफळ असे देखा ॥ १२४ ॥
(श्र्लोक)  अर्ग्निरापश्र्च वेदाश्र्च वरुणार्केदुवायवः ।
विप्रस्य दक्षिणे कर्णे । नित्यं तिष्ठंति देवताः ॥१२५ ॥
(टिका) त्या देवतांचीं नावें ऐका । सांगेन ऋषि सकळिका ।
अग्नि आप वरुणार्का । वायु वेद चंद्र असती ॥ १२६ ॥
लघुशंकाऽचमन करोनी । तूष्णीं स्नान सुमनीं ।
बैसावे शुचि-आसनीं । अरुणोदय होय तंव ॥ १२७ ॥
गायत्रीजपाव्यतिरिक्त । वरकड जपावें आगमोक्त ।
मग होतां अरुणोदित । बहिर्भूमीसी जाइजे ॥ १२८ ॥
यज्ञोपवीत कानीं ठेवोनि । नैऋत्य दिशे जाऊनि ।
डोई पालव घेवोनि । अधोमुखीं बैसावें ॥ १२९ ॥
दिवसा बैसावें उत्तरमुखी । रात्रीं बैसावें दक्षिणमुखी ।
मौन असावें अति विवेकीं । चहूंकडे पाहूं नये ॥ १३० ॥
सूर्तचंद्रनक्षत्रांसी । पाहूं नये नदी आकाशीं ।
स्त्रीजन लोक परियेसीं । पाहूं नये कवणातें ॥ १३१ ॥
जो ब्राह्मण उभा मुती । त्याची ऐका कवण गति ।
त्याचे अंगीं रोम किती । तितुके दिवस नरकीं पडे ॥ १३२ ॥
शोचाविणें कांस घाली जरी । कांस न सोडितां लघुशंका करी ।
त्यासी होय यमपुरी । नरक भोगी अवधारा ॥ १३३ ॥   
अगत्य घडे उदकावीण । करुनियां गंगास्मरण ।
मृत्तिकेनें शौच करणें । भक्षणादि वर्जावें ॥ १३४ ॥
बहिर्भूमि बैसावयासी । ठाव कैसा परियेसीं ।
ऐका तत्पर सर्व ऋषी । म्हणे पराशर ऋषेश्र्वर ॥ १३५ ॥
न बैसावें भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी ।
हिरवें पान करावें दूरी । वाळल्या पर्णी बैसावें ॥ १३६ ॥
मलविसर्जन करुनि । उठावें ऐका ब्रह्मा धरुनि ।
जळपात्रापाशीं जाऊनि । शौच करावें परियेसा ॥ १३७ ॥
मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका नाणावी तुम्हीं ऐशी ।
वारुळ मूषकगृह परियेसीं । नदीमधील आणूं नये ॥ १३८ ॥
ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती । 
देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥ १३९ ॥
वापी-कूप-तडागांत । मृत्तिका आणिता पुण्य बहुत ।
उदक करीं घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्वावी शौचासी ॥ १४० ॥
आंवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानीं एक लावावें ।
अपानद्वारीं पांच स्वभावें । एकैक हस्तासी तीन सप्त ॥ १४१ ॥
एकैक पायासी सात गोळीं । मृत्तिका लावावी सकळीं ।
आणिक सांगेन समय काळीं । ऋषि समस्त परियेसा ॥ १४२ ॥
मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण ।
बहिर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥ १४३ ॥
मृत्तिकाशौच करावें । तोंवरी मौन आसावें ।
कोणीकडे न पहावें । नेम करावा येणेंपरी ॥ १४४ ॥
आणिक प्रकार असे एक । करावया नेम प्रमाणिक ।
जितुकें करी गृहस्थ देख । द्विगुण करावें ब्रह्मचारीं ॥ १४५ ॥
त्रिगुण करावें वानप्रस्थें । चतुर्गुण यतीं समस्तें ।
न्यूनाधिक न करा परतें । धर्मसिद्धि होय देखा ॥ १४६ ॥
येणें प्रकारें करा दिवसीं । रात्रीं याच्या अर्धेंसीं ।
संकटसमयीं तदर्धेंसीं । मार्गस्थ अर्ध त्याहुनी ॥ १४७ ॥
व्रतबंध झालिया ब्राह्मणास । हेचि आचार परियेस ।
चारी वर्णा हाचि उपदेश । शौचविधि बोलिला ॥ १४८ ॥
शौच केलियाउपरी । चूळ भरावे परिकरी । 
ब्राह्मण आठ वेळां भरी । क्षत्री सहा परियेसा ॥ १४९ ॥
वैश्य चार, शूद्र दोन वेळां । येणेंविधि भरा चुळा । 
समस्त ऐका ऋषिकुळा । म्हणे पराशर ऋषि ॥ १५० ॥
चूळ भरावें आठ वेळां । आचम्यावें तीन वेळां ।
शुद्धस्थानीं बैसून निर्मळा । कुळदैवत स्मरावें ॥ १५१ ॥
तूष्णीं आचमन करावें । नाम न घेतां वीस ठाव आतळावे ।       
पुनः आचमन करावें । त्याचें विधान सांगेन ॥ १५२ ॥
विप्रदक्षिणतळहातीं । पांच तीर्थें विख्या असती ।
जें बोलिली असे स्मृति । तेंही आतां सांगेन ॥ १५३ ॥
अंगुष्ठमूळ-तळहातेसीं । ' ब्राह्मतीर्थ ' 'अग्नितीर्थ ' परियेसीं ।
अंगुष्ठतर्जनी-मध्यदेशीं । ' पितृतीर्थ ' असे जाण ॥ १५४ ॥
चतुरंगतळवेवरी । ' देवतीर्थ ' असे निर्धारीं ।
कनिष्ठिकामागोत्तरीं । ' ऋषितीर्थ ' असे जाणा ॥ १५५ ॥
तर्पण देव-पितृ-ऋषि । जे ते स्थानतीर्थे करा हर्षी । 
आचमन ब्राह्मतीर्थेंसीं । करावें ब्रह्मविद्वजनें ॥ १५६ ॥
ब्राह्मतीर्थें आचमनें तीनी । ' केशव-नारायण-माधव म्हणोनि ।
देवतीर्थें उदक सोडोनि । ' गोविंद ' नाम उच्चारावें ॥ १५७ ॥
' विष्णु-मधुसूदन ' हस्त धुवोनि दोनी । ' त्रिविक्रम-वामन ' गाल स्पर्शोनि ।
बिंबोष्ठीं तळहस्त ठेवोनि । ' श्रीधर ' नाम ऊच्चारावें ॥ १५८ ॥
पुनरपि हस्त ' हृषीकेशी ' । ' पद्मनाभें ' पादस्पर्शी । 
सव्य हस्त पंचागुंलीसीं । ' दामोदरें ' शिरस्थानीं ॥ १५९ ॥
चतुरंगगुलपृष्ठेसीं । ' संकर्षण ' घ्राणेसी ' ।
तर्जनी-आदि अंगुष्ठेसीं । म्हणावा ' वासुदेव प्रद्युम्न ' ॥ १६० ॥  
अंगुष्ठानामिकें ' अनिरुद्ध-पुरुषोत्तम ' नेत्रांसी । श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठकनिष्ठिकेसीं ।
 ' अधोक्षज-नारसिंह ' म्हणा ऐसी । ' अच्युतें ' नाभि, ' जनार्दनें ' हृदयस्पर्श ॥ १६१ ॥
 पंचांगुलीं ' उपेन्द्र ' शिरसीं देखा । ' हरि-श्रीकृष्णें ' भुजांस ऐका  ।
पांच-अंगुलीं विधिपूर्वका । येणेंविधि स्पर्शावें ॥ १६२ ॥
येणेंविधि संध्याकाळीं ।आणिक करावें वेळोवेळीं । 
अशक्य अथवा संकटकाळीं । आहेति विधानें तीं ऐका ॥ १६३ ॥
ब्राह्मतीर्थें तीन वेळां घ्यावें । हस्त प्रक्षाळा गोविंद-नांवें  ।
मुख स्पर्शोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेंविधि ॥ १६४ ॥
विधान आणिक सांगेन । देवतीर्थे उदक घेऊन ।
गोविंदनामें हस्त धुऊन । चक्षुःश्रोत्र स्पर्शावे ॥ १६५ ॥
शूद्रादि ओवळियासी । स्पर्श होतां परियेसीं ।
आचमन करा ऐसी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणातें ॥ १६६ ॥
भिजोनि आलिया पाउसांत । द्विराचमनें होय पुनीत ।
स्नान-भोजनांतीं निश्र्चित । द्विराचमन करावें ॥ १६७ ॥
फळाहार भक्षण करितां । अथवा आपण उदक घेतां ।
आला असेल स्मशान हिंडतां । द्विराचमनें शुद्ध होय ॥ १६८ ॥
आणिक असे एक परी । तूष्णीं आचमन करा निर्धारी ।
उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करावें ॥ १६९ ॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी ।
जे करिती भक्तीसीं । दैन्य कैंचें तया घरीं ॥ १७० ॥
आतां सांगेन विधान । करावयासी दंतधावन ।
समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥ १७१ ॥
न करावें नवमीद्वादशीसी । शनि-अर्क-मंगळवारेसीं ।    
श्राद्धकाळीं विवाहदिवसीं  । करुं नये दंतधावन ॥ १७२ ॥
कंटकवृक्षशाखेसीं ।  ताड-हिंताड-केतकीसीं ।
खर्जूर-नारिकेळ-शाखेसीं । केलिया जन्म चांडाळयोनीं ॥ १७३ ॥
खदिर-करंज-आघाडेसीं । औदुंबर अर्क वट परियेसीं ।
अथवा वृक्ष करवंदेसीं । पुण्य वृक्ष असे ऐका ॥ १७४ ॥  
विप्रा द्वादशांगुळेसीं । नवांगुळें क्षत्रियासी ।
षडांगुळें वैश्यशूद्रांसी । दंतधावन-काष्ट आणावें ॥ १७५ ॥
दंतधावन-काष्टेसी । तोडितां म्हणावें मंत्रासी ।
' आयुःप्रजा ' नाम परियेसीं । म्हणोनि काष्ट तोडावें ॥ १७६ ॥
दंतधावन करोनि ऐसें । काष्ट टाकावें नैऋत्य दिशे ।
चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावें ॥ १७७ ॥
मग करावें प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन ।
तेजोबलआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥ १७८ ॥
प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवत आपणा वश ।
सौभाग्य सुख पुष्टि हर्ष । दरिद्र-चिंता-शोकहरण ॥ १७९ ॥
नित्य केलिया पापनाश । करावें याचि कारणें हर्षें ।
गृहस्थ-वानप्रस्थें विशेंषें । प्रातर्मध्यान्हीं करावें ॥ १८० ॥
यतीं तापसीं संन्यासी । त्रिकाळ करावें परियेसीं ।
ब्रह्मचारीं विधिसीं । एकवेळ करावें ॥ १८१ ॥      
अशक्य संकट जाहलें जरी । अथवा न मिळे निर्मळ वारी ।
स्नान करावयाची परी । सांगेन ऐक ब्राह्मणा ॥ १८२ ॥   
अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावें वायुस्नान ।
मंत्रस्नान करावें विधीनें । ' आपोहिष्ठा ' मंत्रेसीं ॥ १८३ ॥
आणिक स्नानफळें असती । ज्यासी असेल भावभक्ति । 
गुरुदेवता-दर्शनमात्रीं । तीर्थस्नानफळ असे ॥ १८४ ॥
अथवा दर्शन-मातापिता । चरणतीर्थ भक्तीनें घेतां ।
अंगावरी प्रोक्षितां । तीर्थस्नानफळ असे देखा ॥ १८५ ॥ 
अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत ।
किंवा बैसावें गोधुळींत । स्नानफळ असे देखा ॥ १८६ ॥
स्पर्श होतां चांडाळाचा । जलस्नानें होय शुचा ।
स्पर्श होतां शूद्राचा । उपस्नान करावें ॥ १८७ ॥
दृढ असतां देह आपुलें । स्नान मुख्य करावें जलें ।
संधि-विग्रह-सांकडे मांडले । उपस्नान करावें ॥ १८८ ॥
प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसीं ।
अशक्य असेल देहासी । उष्णोदकें करावें ॥ १८९ ॥
स्वभावें पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क ।
पवित्र झालें उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥ १९० ॥
उष्णोदकें स्नान करितां । शीतोदक करा मिश्रिता । 
मध्यें करावें आचमन तत्त्वतां । संकल्प तेथें न म्हणावा ॥ १९१ ॥
घरीं स्नान करितां देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका । 
वस्त्र पिळूं नये ऐका । आपुले हस्तेंकरुनियां ॥ १९२ ॥
पुत्रोत्साहीं संक्रांतीसी । श्राद्धकाळीं मृतदिवसीं । 
न करावें स्नान उष्णोदकेसीं । पौर्णिमा-अमावास्येसी ॥ १९३ ॥
स्नान करितां बांधा शिखा । दर्भहातीं सूर्याभिमुखा ।
मौन स्नान असे मुख्या । कवणासवें न बोलावें ॥ १९४ ॥
' अपोहिष्ठेति ' मंत्रेसीं । गायत्री तीन म्हणा सुरसी ।
येणें मंत्रे स्नानोदकासी । अभिमंत्रावें ब्राह्मणें ॥ १९५ ॥
प्रथम शीतोदक घालूनि । पश्र्चात् उष्णोदक मिळवोनि ।
स्नान करावें प्रतिदिनीं । गृहस्थाश्रमीं घरीं देखा ॥ १९६ ॥
आचमन करुनि आपण । ' देवस्यत्वा ' मंत्र जपोन ।
धूत वस्त्र घेऊन । आणिक मंत्र जपावे ॥ १९७ ॥
' अवधूत ' मंत्र म्हणत । वस्त्र उकलावें त्वरित ।
' उदुत्यं- ' मंत्र म्हणत । वस्त्र सूर्यासी दाखवावें ॥ १९८ ॥
' आवहंतीवितन् ' मंत्रे । वस्त्र नेसावें पवित्र । 
द्विराचमन करावें तत्र । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥ १९९ ॥
आतां मंत्रस्नान करणें । सांगेन त्याचीं विधानें ।
' आपोहिष्ठा ' दि मंत्रानें । प्रोक्षावें आपुले शरीरावरी ॥ २०० ॥
पाद-मूर्ध्नी-हृदयस्थानीं । मूर्ध्नी-हृदय-पाद प्रोक्षोनि । 
हृदय-पाद-शिरस्थानीं । ' आपोहिष्ठा ' दि मंत्रेसीं ॥ २०१ ॥
ऐेसें स्नान करोनि । पुनः आचमन करोनि ।
मानसस्नान विधानीं । करावें ऐका भक्तीनें ॥ २०२ ॥
नारायण-मूर्तीसी । ध्यान करावें भक्तीसीं ।
चतुर्भुजालंकारेसीं । ध्यान केलिया मानसस्नान ॥ २०३ ॥
' अपवित्रः पवित्रो वा-- ' । येणें मंत्रें हरि ध्यावा । 
उदकें शरीर प्रोक्षावें । स्नानफळ असे अवधारा ॥ २०४ ॥
नदीतीरीं असे नरु । अशक्त असे शरीरु ।
स्मरण करुनि नदी निर्धारु । आर्दवस्त्रें अंग पुसावें ॥ २०५ ॥
मंगलस्नानविधान । सांगेन ऐका ब्राह्मण । 
रविवारीं निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥ २०६ ॥
कांतिहानि सोमवारासी । मंगलवारीं मृत्यु परियेसीं ।
लक्ष्मी पावे बुधवारेंसी । धनहानि होय गुरुवारीं ॥ २०७ ॥
शुक्रवारीं पुत्रघात । शनिवारीं अखिल संपत प्राप्त ।
जाणा तुम्हीं निश्र्चित  । मंगलस्नान करावें ॥ २०८ ॥
नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःपूर्वमुखी ।
संध्याकाळीं पश्र्चिममुखी । स्नान करावें अवधारा ॥ २०९ ॥
स्नान करितां नदीसी । अघमर्षण करावें परियेसीं ।
' नमोऽग्नयेऽप्सुमते ' मंत्रासीं । नमस्कारावें नदीतें ॥ २१० ॥
' यदपांक्रूरं ' मंत्रेसीं । उदक लोटावे द्विहस्तेसीं ।
तीन वेळा लोटोनि हषा । ' इमं मे गंगे ' जपावें ॥ २११ ॥
' ऋतं च सत्यं च ' मंत्र जपत । स्नान करावें गंगेंत ।
नदीस्नानविधिख्यात  । करा तुम्ही विप्रवर्ग ॥ २१२ ॥
रोदनांतीं करुनि वांति । मैथुन-दुःस्वप्न-दर्शनांतीं ।
स्नानाविणें शुद्ध न होती । स्नान करावें अवधारा ॥ २१३ ॥
आतां वस्त्राचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
वस्त्र काषाय जाण । नेसूं नये गृहस्थानें ॥ २१४ ॥
रक्तादि वस्त्र जीर्ण  अधौत । नेसूनि जें आचरत ।
तें पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥ २१५ ॥
श्र्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसीं ।
असावें उपवस्त्र बहिर्वासी । ' उपवस्त्र ' म्हणिजे तया ॥ २१६ ॥
धोत्र नेसलिया उपरी । विभूति लावावी परिकरी ।
मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावें ॥ २१७ ॥
भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावा परिकरी ।
द्वारावती मुख्य करीं । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥ २१८ ॥
न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका ।
ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तयां ॥ २१९ ॥
पुष्टिकाम असे ज्यासी । लावावें तेणें अंगुष्ठेसीं ।
ज्यासी काम असे आयुषीं । मध्यांगुलीं लावावें ॥ २२० ॥
Gurucharitra Adhyay 36 
 श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ 


Custom Search

Thursday, October 30, 2014

Gurucharitra Adhyay 35 Part 3/3 श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ भाग ३/३


Gurucharitra Adhyay 35 
Gurucharitra Adhyay 35 is in Marathi. This Adhyay describes Somawar Vrata. Name of this Adhyay is Simantini Aakhyanam.
Gurucharitra Adhyay 35 Part 1/3
श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ भाग २/३
श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ भाग ३/३
आणिक संतोषोनि मागुतीं । वस्त्रें वाहनें अतिप्रीतीं ।
तुरंग दिल्हा मनोगती । सवें देत कुमर आपुला ॥ २२७ 
चंद्रागदकुमरासी । तक्षकें दिधलें अतिहर्षी ।
निरोप दिल्हा मनोगती । सवें देत कुमर आपुला ॥ २२८ 
तक्षकातें नमूनि त्वरित । चंद्रांगद वारुवरी चढत ।
मनोवेगें मार्ग क्रमित । नागकुमर सवें असे ॥ २२९ ॥
जयें स्थानीं बुडाला होता । पावला तेथें क्षण न लागतां 
निघाला बाहेर वारुसहिता । नदीतटीं उभा असे ॥ २३० 
सोमवार असे ते दिवसीं । सीमंतिनी आली स्नानासी 
होत्या सखिया सवेंसी । त्याही मिळोनि नदीतीरीं ॥ २३१ 
सीमंतिनी म्हणे सखियांसी । आश्र्चर्य जाहलें पहा कैसी 
उदकांतुनी निघाला परियेंसी । सवें असे नागकुमर ॥ 
२३२ ॥
राक्षस होईल वेषधारु । रुप धरिलें असे नरु ।
दिसतसे मनोहरु । तुरंगारुढ जाहला असे ॥ २३३ ॥
कैसे पहा वो रुप यासी । जैसा सूर्य प्रकाशी ।
दिव्यमालांबरें कैसी । सुगंध असे परिमळ ॥ २३४ ॥
दश योजनेंपर्यंत । वास येतो अतिप्रीत ।
पूर्वी देखिली असे स्वरुपता । दिसतसे परियेसा ॥ २३५ 
स्थिर स्थिर भीत भीता । पाहे त्याची स्वरुपता । 
आपुला पतीसादृश्य म्हणतां । रुप आठवी तये वेळी ॥ २३६ ॥
राजकुमर पाहे तिसी । म्हणे रुपें माझी वधूऐसी ।
गळसरी न दिसे कंठासी । हार न दिसती मुक्ताफळांचे ॥ २३७ ॥
अवलोकीतसे अंगखूण । न दिसे हळदी करकंकण ।
चिंताव्याकुळ रुपहीन । सादृश्य दिसे प्राणेश्र्वरी ॥ २३८ 
मनीं विचारी मागुता । रुप तिचें आठवीत ।
तुरंगावरुनि उतरत । नदीतीरीं बैसला ॥ २३९ ॥
बोलावोनि सीमंतिनीसी । पुसतसे अतिप्रियेसी ।
तुझा जन्म कवण वंशीं । पुरुष तुझा कवण सांग ॥ 
२४० ॥
कां कोमाइलीस बाळपणीं । दिससी शोकलक्षणी ।
सांगावें आम्हां विस्तारुनि । अति स्नेहें पुसतसे ॥ २४१ 
ऐकोनि सीमंतिनी देखा । आपण न बोलें लाजें ऐका ।
सखियांतें म्हणे विवेका । सांगा आमुचा वृत्तांत ॥ २४२ 
सखिया सांगती तयासी । हिचें नाम सीमंतिनी परियेंसी 
चंद्रांगदाची महिषी । चित्रवर्म्याची हे कन्या ॥ २४३ ॥
इचा पति अतिसुंदर । चंद्रागद नाम थोर । 
जळक्रीडा करितां पार । बुडाला येथें अवधारा ॥ २४४ ॥
तेणें शोक करितां इसी । वैधव्य आलें परियेंसीं ।
दुःख करितां तीन वर्षी । लावण्यपण ऐसें जाहलें ॥ २४५ 
करी सोमवारव्रत । उपवासेंसीं आचरत । 
म्हणोनि आजि स्नानानिमित्त । आली असे नदीसी ॥ २४६ ॥
इच्या श्र्वशुराची स्थिति ऐका । पुत्रशोक करितां दुःखा ।
राज्य हिरतले दायादिका । कारागृहीं घातलें असे ॥ २४७ 
तयाकारणें सीमंतिनी । पूजा करी शूलपाणि ।
सोमवार उपोषणी । म्हणोनि करी परियेसा ॥ २४८ ॥
इतकें सखिया सांगती । मग बोले आपण सीमंती ।
तुम्ही कवण पुसतां आम्हांप्रती । कंदर्परुप तुम्हां असे ॥ २४९ ॥
गंधर्व किंवा तुम्ही देव । किन्नर अथवा सिद्धसाधव ।
नररुप असां मानव । आमुतें पुसतां कवण कार्या ॥ २५० 
स्नेहभावेंकरुनि । पुसतां तुम्ही अति गहनी ।
पूर्वी देखिलें होतें नयनीं । न कळे खूण म्हणतसे ॥ २५१ 
आप्तभाव माझे मनीं । स्वजन ऐसे दिसतां नयनीं ।
नाम कवण सांगा म्हणोनि । आठवीं रुप पतीचें ॥ २५२ 
आठवी पतीचें रुप । करुं लागली अति प्रलाप ।
पडली धरणीं रुदितबाष्प । महादुःख करीतसे ॥ २५३ ॥
स्त्रियेचें दुःख देखोनि । कुमार पाहे तटस्थपणीं ।
मुहूर्त एक सांवरोनि । आपण दुःख करीतसे ॥ २५४ ॥
दुःख करोनि कुमर देखा । प्रक्षाळण केलें आपुल्या मुखा 
उगी राहें म्हणे ऐका । आपुलेम नाम ' सिद्ध ' म्हणे ॥ २५५ ॥
सीमंतिनी करितां शोक । जवळी आला राजकुमरक ।
हातीं धरुनि बाळिका । संबोखी तो प्रेमभावें ॥ २५६ ॥
एकांतीं सांगे तियेसी । म्हणे तुझ्या भ्रतारासी । 
देखिलें आम्हीं दृष्टीसीं । सुखें ऐस परियेसीं ॥ २५७ ॥
तुझे व्रतपुण्येंकरितां । शीघ्र येईल तुझा कांत ।
चिंता न करीं वो तूं आतां । तृतीय दिवशीं दर्शन घडे ॥ २५८ ॥
तुझा पति माझा सखा । माझा प्राण तोचि ऐका ।
संदेह न करीं वो बाळिका । सदाशिवाचे चरणाची आण ॥ २५९ ॥
ऐसें एकांतीं सांगून । प्रगट करुं नको म्हणून ।
दुःख आठवलें ऐकून । सीमंतिनी बाळिकेसी ॥ २६० ॥
सुटली धारा लोचनीं । शतगुण प्रेम नयनीं ।
विचार करीतसे मनीं । हाचि होय माझा पति ॥ २६१ ॥
सारिखें वाटे मुखकमळ । नयन सुंदर अति कोमळ ।
ध्वनि होय बोल चपल । हास्यमुखें बोलतसे ॥ २६२ ॥
मृदु वाक्य माझे पतीसी । तैसाचि बोलतो हर्षी ।
धरितां माझ्या करासी । अति मृदुपण लागलें ॥ २६३ ॥
माझ्या पतीचे लक्षण । मी जाणें सर्वही खूण ।
समस्त आहेति प्रमाण । हाचि होये प्राणनाथ ॥ २६४ ॥
यास देखतां माझे मन । विघरोनि, धारा सुटती नयन ।
नवल म्हणे विचारुन । मागुती अनुमान करीतसे ॥ २६५ 
दैवहीन असें आपण । कैचा येईल पति म्हणोन ।
बुडाला नदींत सिद्ध जाणोन । मागुती भ्रांति कैसी मज ॥ २६६ ॥
मेला पति ये मागुता । न ऐकों कानीं ऐसी कथा ।
स्वप्न देखिलें मीं भ्रांता । काय वसतसे माझे मनीं ॥ 
२६७ ॥
धूर्त होय कीं वेषधारु । राक्षस किंवा यक्ष किन्नरु ।
कपट वेषें आला नरु । म्हणोनि मनीं विचारीत ॥ २६८ 
किंवा होईल माझें व्रत । मुनिपत्नीनें सांगितले म्हणत ।
किंवा प्रसन्न गिरजानाथ । नवल नव्हे म्हणतसे ॥ २६९ 
ज्यासी प्रसन्न शंकर । त्यासी कैचा दुःखविकार ।
चिंतिलें पाविजे निर्धार । ऐसें योजी सीमंतिनी ॥ २७० ॥
ऐसें होतां राजकुमरु । आरुढ जाहलां आपण वारु ।
निरोप मागे प्रीतिकरु । सीमंतिनी नारीसी ॥ २७१ ॥
निघाला अश्र्व मनोवेगीं । पावला नगरा अतीशीघ्री ।
सवें पुत्रवासुगी । पाठवी तया नगरांत ॥ २७२ ॥
तुवां जावोनि वैरियांसी । सांगे इष्टतीं वादियांसी ।
न ऐकतां तुझे बोलासी । संहारीन म्हणावें ॥ २७३ ॥  
ऐसें वचन ऐकोनि । पावला त्वरित राजभुवनीं ।
उभा राहोनि कठोर वचनीं । बोलतसे नगराधिपासी ॥ 
२७४ ॥
चला शीघ्र कुटुंबेसीं । चंद्रागदाचे भेटीसी ।
गेला होता पाताळासी । तक्षकाचे इष्टतीसी जाणा ॥ 
२७५ ॥  
कालिंदीये नदींत । बुडाला वचन प्रख्यात ।
तुम्हीं केला स्वामीघात । राज्य हिरतले इंद्रसेनाचे ॥ 
२७६ ॥
आतां सांगेन तुम्हांसी । चाड असेल प्राणासी ।
शरण जावें शीघ्रेसीं । सिंहासनीं बैसवा इंद्रसेना ॥ २७७ ॥
तक्षकासारिखा मैत्र जाहला । तुमच्या करील अस्थिमाळा 
शीघ्र चला चरणकमळा । चंद्रांगद-दर्शनासी ॥ २७८ ॥
नायकाल जरी माझें वचन । आतांचि घेईन तुमचे प्राण 
तक्षकानें दिल्हें निरोपण । म्हणोनि आलों सांगातें ॥ 
२७९ ॥
ऐसें वचन ऐकोनि । दाईंजे विचारिती मनीं ।  
आपण केली बुद्धि हीन । आतां शरण रिघावें ॥ २८० ॥
जरी करुं बलात्कार । तक्षक करील संहार ।
लोकांत होईल निंदा फार । प्राण जाईल, हानी असे ॥ 
२८१ ॥
ऐसें विचारुनि मानसीं । बाहेर काढिती इंद्रसेनासी ।
नाना वस्त्रें-आभरणेसीं । बैसविती सिंहासनीं ॥ २८२ ।
विनविताति तयासी । अपराध घडले आपणासी । 
प्राण राखावे आम्हांसी । म्हणोनि चरणीं लागती ॥ २८३ 
राया इंद्रसेनासी । तक्षकपुत्र सांगे हर्षी । 
तुमचा कुमर आला परियेसीं । वासुकीभेटीं गेला होता ॥ २८४ ॥
ऐकतां राजा संतोषी । आठविलें दुःख अधिकेंसी ।
मूर्च्छा येऊनि धरणीसी । पत्नीसहित पडियेला ॥ २८५ 
उठवी नागकुमर त्यासी । दुःख विसरा करा हर्षासी ।
येतो पुत्र भेटीसी । म्हणोनि सांगे उल्हासें ॥ २८६ ॥
ऐकोनि राजा अतिहर्षी । बोलावूनि सांगे मंत्रियांसी ।
नगर श्रृंगार करावयासी । निरोप दिला तये वेळीं ॥ २८७ 
ऐसा निरोप देऊन । भेटीसी निघाला आपण ।
समस्त निघाले दायाद अपण । राणीवसादिकरुनियां ॥ २८८ ॥
मंत्री पुरोहित देखा । समस्त निघाले नगरलोक ।
पाहों म्हणती कवतुक । मेला कुमर आला म्हणोनि ॥ २८९ ॥
आनंद झाला सकळिका । राजा मानी महासुखा । 
पाहीन म्हणोनि पुत्रमुखा । शीघ्र जातो अवधारा ॥ २९० 
सवें वाजंत्र्यांचा गजर । नगरलोकां संतोष थोर ।
करिताति जयजयकार । अत्योल्हास करिताति ॥ २९१ ॥
ऐसें जाऊनि पुत्रासी । आलिंगी राजा प्रीतीसीं ।
सद्गदित कंठेसी । नेत्रीं सुटल्या उदकधारा ॥ २९३ ॥
पुत्रासी म्हणे इंद्रसेन । आलासी बाळा माझा प्राण ।
शवपणें होतों तुजवीण । म्हणोनि सांगे दुःख आपुलें ॥ २९४ ॥
मातेसी आलिंगोन । दुःख करी अतिगहन । 
विनवीतसे संबोखोन । आपणानिमित्त कष्टलेति ॥ २९५ 
पुत्र नव्हे मी तुमचा शत्रु । जाऊनि आपुले सुखार्थु ।
दुःख दिधलें तुम्हां बहुत । नेदीच सुख तुम्हांसी ॥ २९६ 
आपण जावोनि पाताळीं । सुखें होतों शेषाजवळीं ।
तुम्ही कष्टलेति अवलीळी । मजनिमित्त अहोरात्रीं ॥ 
२९७ ॥
काष्ठासारखें अंतःकरण । पुत्राचे असे तुम्ही जाण ।
माताजीव जैसें मेण । पुत्रानिमित्त कष्ट बहु ॥ २९८ ॥
मातापितयांचे दुःख । जो नेणें तोचि मूर्ख ।
उत्तीर्ण व्हावया अशक्य । स्तनपान एक घडीचें ॥ २९९ 
मातेवीण देव देखा । नाहीं पुत्रासी विशेषा ।
ऋण उत्तीर्ण नव्हे ऐका । माता म्हणजे भवानी ॥ ३०० 
दुःख करी जननीसी । तोचि जाय यमपुरासी ।
पुत्र नोहे त्याचे वंशीं । सप्तजन्म दरिद्री ॥ ३०१ ॥
ऐसी माता विनवोनि । भेटता जाहला भाऊबहिणी ।
इष्ट सोइरे अखिल जनी । प्रधानादि नगरलोका ॥ ३०२ 
इतुकिया अवसरीं । प्रवेश जाहला नगरपुरीं । 
तंमारंभ केला थोरी । पावले निजमंदिरांत ॥ ३०३ ॥
तक्षकाचे पुत्रासी । वस्त्रें भूषणें अति हर्षी ।
देता जाहला परियेंसीं । इंद्रसेन अतिप्रीती ॥ ३०४ ॥
चंद्रांगद सांगे पितयासी । तक्षकोपकार विस्तारेसीं ।
प्राण वांचविले आम्हांसी । द्रव्य दिधलें अपरिमित ॥ 
३०५ ॥
जीं जीं वस्त्राभरणें । दिधलीं होतीं तक्षकें जाण ।
पित्यासी देवोनि चरण । नमिता झाला पुत्र देखा ॥ ३०६ 
निरोप दिधला नागपुत्रासी । इंद्रसेन करी अतिहर्षी ।
भृत्य पाठविले वेगेसीं । चित्रवर्म-नगरातें ॥ ३०७ ॥
राजा म्हणे तये वेळीं । सून माझी दैवागळी ।
तिचेनि धर्में वांचला बळी । पुत्र माझा अवधारा ॥ ३०८ 
तिणें आराधिला शंकर । अहेवपण तिचें स्थिर ।
म्हणोनि वांचला माझा कुमर । सौभाग्यवंती सून माझी ॥ ३०९ ।
म्हणोनि हेर पाठवा वेगेसीं । वार्ता लिहावी संतोषी ।
चित्रवर्मरायासी । म्हणे राजा इंद्रसेन ॥ ३१० ॥
हेर निघाले झडकरी । पातले चित्रवर्मापुरीं ।
व्यवस्था सांगती कुसरीं । चंद्रांगद-शुभवार्ता ॥ ३११ ॥
ऐकोनि राजा संतोषी देखा । करिता झाला महासुखा ।
दान दिधलें अपार ऐका । वस्त्रें भूषणें हेरांसी ॥ ३१२ ॥
इंद्रसेन राजा देखा । पुनरपि आला वर्‍हाडिका ।
चंद्रांगद पुत्र निका । सवें सकल कलंत्रेसीं ॥ ३१३ ॥
महोत्साह करिती थोर । वर्‍हाड केलें धुरंधर ।
चंद्रांगद प्रीतिकर । सीमंतिनीसी भेटला ॥ ३१४ ॥
पाताळीची अमोल्य वस्तु । प्राणेश्र्वरीसी अर्पित ।
पाजविता झाला अमृत । महानंद प्रवर्तला ॥ ३१५ ॥
कल्पवृक्षफळें देखा । देता जाहला स्वपत्निका ।
अनर्घ्य वस्तु आभरणिका । दश योजनें कांति फाके ॥ ३१६ ॥
ऐशा उत्साहें विवाह केला । आपुले पुरीसी निघाला ।
सीमंतिनीचे दैव भलें । पतिसमागमें जातसे ॥ ३१७ ॥ जावोनि आपुले नगरासी । राज्यीं स्थापिलें पुत्रासी ।
दहा सहस्त्र अब्दें हर्षी । राज्य केलें अवधारा ॥ ३१८ ॥
सीमंतिनीचें व्रत ऐसें । उपवास केलें सोमवारांस ।
पूजा केली गौरीहरास । म्हणोनि पावली इष्टार्थ ॥ ३१९ 
ऐसें विचित्र असे व्रत । म्हणोनि सांगती श्रीगुरुनाथ ।
ऐक सुवासिनी म्हणत । अति प्रीतीकरुनियां ॥ ३२० ॥
ऐसें व्रत करीं वो तूं आतां । अहेवपण अखंडिता ।
होतील तुज कन्या पुत्र बहुता । आमुचें वाक्य अवधारीं ॥ ३२१ ॥
दंपती विनवी श्रीगुरुसी । तुझी चरणसेवा आम्हांसी । 
तेंचि व्रत निर्धारेसीं । आम्हां व्रत कायसे ॥ ३२२ ॥
आमचा तूं प्राणनायक । तुजवांचूनि नेणो आणिक ।
तुझे चरण असती निक । म्हणोनि चरणीं लागलीं ॥ 
३२३ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । आमुचे निरोपें करा ऐसी ।
व्रत आचरा सोमवारेंसी । तेचि सेवा आम्हां पावे ॥ ३२४ 
निरोप घेऊनि श्रीगुरुचे । व्रत करिती सोमवाराचें ।
आलीं माता-पिता त्यांचे ऐसें। भेटी जाहली श्रीगुरुची ॥ ३२५ ॥
ऐकोनि कन्यापुत्रवार्ता । संतोष करिती अत्यंता ।
द्रव्य वेंचिती अपरिमिता । समाराधना ब्राह्मणांसी ॥ 
३२६ ॥   
पूजा करिती श्रीगुरुसी । आनंद अति मानसीं । 
समारंभ बहुवसी । करिती भक्तिपूर्वक ॥ ३२७ ॥
ऐशापरी वंदोनि । श्रीगुरुचा निरोप घेऊनि । 
गेलीं ग्रामा परतोनि । ख्याति झाली चारी राष्ट्रीं ॥ ३२८ 
पुढें तया दंपतीसी । पुत्र पांच शतायुषी ।
झाले ऐका त्वरितेसीं । नामधारक श्रीगुरुचे ॥ ३२९ ॥
प्रतिवर्षीं दर्शनासी । दंपती येती भक्तीसीं ।
ऐसें शिष्य परियेसीं । श्रीगुरुचे अवधारी ॥ ३३० ॥
ऐसें श्रीगुरुचरित्र । सिद्ध सांगे पवित्र ।
नामधारक अतिप्रीत । ऐकतसे अवधारा॥ ३३१ ॥
गंगाधराचा कुमर । सरस्वती विनवी गुरुकिंकर ।
स्वामी माझा पारंपार । नृसिंहसरस्वती ॥ ३३२ ॥
ऐसी ब्रीद कीर्ति देखा । समस्त जन तुम्ही ऐका ।
प्रसन्न होय तात्काळिका । न धरा संदेह मानसीं ॥ ३३३ 
साखर स्वादु म्हणावयासी । उपमा द्यावी कायसी ।
मनगटीं असतां कंकणासी । आरसा काय पहावा ॥ ३३४ 
प्रत्यक्ष पाहतां दृष्टांतेसीं । प्रमाण काय परियेसीं ।
ख्याति असे भूमंडळासी । कीर्ति श्रीगुरुयतीची ॥ ३३५ ॥
ऐका हो जन समस्त । सांगतसे मी हित । 
सेवा करावी श्रीगुरुनाथ । त्वरित होय मनकामना ॥ 
३३६ ॥
अमृताची आरवंटी । घातली असे गोमटी ।
पान करा हो तुम्ही घोटी । धणीवरी सकळिक ॥ ३३७ ॥
श्रीगुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय पतित पावनु ।
नाम ज्याचें कामधेनु । जें जें चिंतिलें पाविजे ॥ ३३८ ॥
ज्याचें चित्त श्रीगुरुचरणीं बैसलें । त्याचें सर्वही कार्य 
साधलें ।
अक्षयपद अनायासें पावलें । श्रीगुरुचे प्रसादें ॥ ३३९ ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ ॥ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे 
सीमंतिनीआख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

Gurucharitra Adhyay 35  
श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ 



Custom Search

Gurucharitra Adhyay 35 Part 2/3 श्रीगुरचरित्र अध्याय ३५ भाग २/३


Gurucharitra Adhyay 35 
Gurucharitra Adhyay 35 is in Marathi. This Adhyay describes Somawar Vrata. Name of this Adhyay is Simantini Aakhyanam.
गुरुचरित्र अध्याय ३५ भाग २/३
सूर्यासारिखी होईल कांति । चंद्रासारिखी मनःशांति । 
दहा सहस्त्र वर्षें ख्याती । पतिसहित राज्य करील ॥ 
११४ ॥
ऐसें जातक वर्तविलें तिसी । राव करी अतिहर्ष । 
अखिल दानें ब्राह्मणांस । देता जाहला आनंदे ॥ ११५ ॥
असतां राजा सभेसी । द्विज एक परियेंसी ।
भय न धरितां वाक्यासी । बोलता जाहला अवधारा ॥ 
११६ ॥
ऐक राया माझें वचन । कन्यालक्षण सांगेन ।
चवदावें वर्षी विधवापण । होय तुझ्या कन्येसी ॥ ११७ 
ऐसें वचन ऐकोनि । राजा पडिला मूर्च्छनीं ।
चिंता करी बहु मनीं । ब्राह्मणवचन परिसतां ॥ ११८ ॥
ऐसें सांगोनि ब्राह्मण । निघोनि गेला तत्क्षण ।
राजयाचें खेचिं अंतःकरण । म्हणे ईश्र्वराधीन सर्व ॥ 
११९ ॥
ऐसें बाळपण क्रमितां । सीमंतिनी वर्षे साता ।
चिंतीत होती मातापिता । वर्‍हाड केवीं करुं म्हणती ॥ 
१२० ॥
चवदावें वर्षीं विधवत्व येणें । म्हणोनि सांगितलें 
ब्राह्मणें ।
तेणें व्याकुळ अंतःकरण । राजा-राजपत्नीचें ॥ १२१ ॥
कन्या खेळें राजांगणा । सवें असती सखी जन ।
बोलतां ऐकिलें वचना । चौदा वर्षी विधवत्व ॥ १२२ ॥ ऐसें ऐकोनियां वचन । कन्या करितसे चिंतन ।
वर्ततां आली एक दिन । तयां घरीं ब्राह्मणस्त्री ॥ १२३ 
याज्ञवल्क्याची पत्नी । नाम तिचें असे मैत्रायणी ।
घरांत आली पवित्रिणी । कन्या लागे चरणासी ॥ १२४ ॥
साष्टांगीं नमोनि । करसंपुट जोडोनि । 
विनवीतसे करुणावचनीं । मातें प्रतिपाळीं म्हणतसे ॥ १२५ ॥
सौभाग्य स्थिर अहेवपण । उपाय सांगे दया करुन ।
चंचळ असे अतःकरण । म्हणूनि चरणा लागली ॥ १२६ 
ऐकोनि कन्येचें वचन । बोले विप्रस्त्री जाण । 
शरण रिघावें उमारमणा । अहेवपण स्थिर होय ॥ १२७ 
कन्या विनवी तियेसी । कैसे सांगे आम्हांसी ।
जननी तूंचि होसी । कैसे व्रत सांगे म्हणे ॥ १२८ ॥
विप्रस्त्री सांगे तियेसी । सोमवार व्रत परियेंसी ।
पूजा करावी शिवासी । उपवासोनि अवधारीं ॥ १२९ ॥
बरवें सुस्नात होवोनि । दिव्य वस्त्र परिधानूनि ।
स्थिर मन करोनि । पूजा करी गौरीहरा ॥ १३० ॥
अभिषेकें पापक्षय । पीठ पूजितां साम्राज्य ।
गंधाक्षता-पुष्पमाल्यें । सौभाग्यसौख्य अखिल पावे ॥ १३१ ॥
सुगंधी होय धूपदानें । कांति पाविजे दीपदानें ।
भोग नैवेद्यअर्पणाने । तांबूलदानें लक्ष्मी स्थिर ॥ १३२ 
चतुर्विध पुरुषार्थ । नमस्कार करितां त्वरित ।
अष्टैश्र्वर्ये नांदत । ईश्र्वरजप केलिया ॥ १३३ ॥
होमें सर्व कोश पूर्ण । समृद्धि स्तविता होय जाण ।
भोजन करवितां ब्राह्मण । सर्वदेव तृप्त होती ॥ १३४ ॥
ऐसें सोमवार व्रत । करी वो तूं कन्ये निश्र्चित ।
भय आलिया, दुरित । परिहरती महा क्लेश ॥ १३५ ॥
गौरिहरपूजा करितां । समस्त दुरितें जाती परता ।
ऐकोनि सीमंतिनी त्वरिता । अंगीकारिलें व्रतदेखा ॥ १३६ 
सोमवाराचिया व्रता । आचरे सीमंतिनी त्वरिता । 
पिता देखोनि चिंतित । विवाहा योग्य म्हणोनि ॥ १३७ 
राजा विचारी मानसीं । वर्‍हाड करावें कन्येसी ।
जैसे प्राप्तव्य असे तिसी । तैसे घडेल म्हणतसे ॥ १३८ 
विचारावया मंत्रियासी । पाठविता जाहला राष्ट्रासी ।
दमयंतीनळवंशी । इंद्रसेन-कुमारक ॥ १३९ ॥
चंद्रागंद वर बरवा । जैसे चंद्र तेज प्रभा ।
बोलाविती विवाहशोभा । कन्या दिधली संतोषें ॥ १४० ॥
राजे भूमांडलिक देखा । समस्त आले वर्‍हाडिका ।
विवाह केला विवेका । महोत्साह नानापरी ॥ १४१ ॥
नाना द्रव्यालंकार । वर्‍हाडिकां दे नृपवर । 
अखिल दानें देकार । विप्रांसी देता झाला देखा ॥ १४२ ॥
पाठवणी केली सकळिकां । जांवई ठेविला कवतुका ।
कन्यास्नेह अनेका । म्हणोनि राहवी राजपुत्रा ॥ १४३ ॥
राजपुत्र श्र्शुरालयीं । स्त्रिया प्रेमें अतिस्नेहीं ।
काळ क्रमितां एके समयीं । जलक्रीडे निघाला ॥ १४४ ॥
कालिंदी म्हणिजे नदीसी । राजपुत्र परियेसीं ।
सर्व दळ समसगमेसीं गेला नदीसी विनोदें ॥ १४५ ॥
राजपुत्र नदींत । सवें निघाले लोक बहुत ।
विनोदें असे पोहत । अतिहर्षें जलक्रीडा ॥ १४६ ॥
पोहतां राजककुमार देखा । बुडाला मध्यें-गंगोदका ।
आकांत झाला सकळिकां । काढा काढा म्हणताति ॥ 
१४७ ॥
सवें सैन्य लोक सकळ । होते नावेकरी प्रबळ ।
उदकीं पाहती तये वेळ । न दिसे कुमर बुडाला ॥ १४८ 
उभय तटाकीं सैन्य । धांवत गेले राजधाना ।
व्यवस्था सांगती पूर्ण । जांवई तुमचा बुडाला ॥ १४९ ॥
कालिंदीये डोहांत । सवें-गड्या राव होता पोहत ।
अदृश्य झाला त्वरित । न दिसे गंगेंत बुडाला ॥ १५० ॥
ऐकोनि राजा पडे धरणीं । मूर्च्छा येऊनि तत्क्षणीं ।
कन्या ऐकतांच श्रवणीं । त्यजूं पाहे प्राण आपुला ॥ १५१ 
राजा कन्येसी संबोखीत । आपण गेला धांवत । 
राजस्त्री असे शोक करीत । कन्यादुःख अतिबहु ॥ १५२ 
सीमंतिनी करी शोका । म्हणे देवा त्रिपुरांतका । 
शरण रिघाल्यें तुज ऐका । मरण कैसें आलें मज ॥ १५३ 
मृत्यु चवदा वर्षी जाणे । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
वृथा झालें गौरीपूजन । तुजसहित सोमवारीं ॥ १५४ ॥
तुझें देणें अढळ सकळां । उपेक्षिलें जाश्र्वनीळा ।
अपकीर्ति तुज केवळा । शरणागता रक्षीं रक्षीं ॥ १५५ ॥
स्मरण करी श्रीगुरुसी । याज्ञवल्क्यपत्नीसी ।
सांगितले व्रत आम्हांसी । अहेवपण म्हणोनि ॥ १५६ ॥
तुझें वाक्य ऐकोनि । पूजा केली शिवभवानी ।
वृथा होतसे माझे मनीं । शीघ्र विनवी शिवासी ॥ १५७ 
ऐसें दुःखें प्रलापीत । सीमंतिनी जाय त्वरित ।
गंगाप्रवेश करीन म्हणत । निघाली वेगें गंगेसी ॥ १५८ 
पिता देखोनि नयनीं । धरावया गेला धांवोनि । 
कन्येतें आलिंगोनि । दुःख करी अत्यंत ॥ १५९ ॥
समस्त मंत्री पुरोहित । सकल सैन्य दुःख करीत ।
बोलाविती नावेकरीयांते । पहा म्हणती गंगेंत ॥ १६० ॥
गंगा समस्त शोधिती । न दिसे कवण गतीं ।
शोक करी सीमंती । राजा संबोखी तियेसी ॥ १६१ ॥
रजकुमाराचे सेवक । करुं लागले बहु दुःख ।
सांगो गेले पुत्र शोक । इंद्रसेनरायासी ॥ १६२ ॥
ऐकोनि इंद्रसेन । दुःख करी अतिगहन ।
भार्येसहित निघोन । आला तया मृत्युस्थळा ॥ १६३ ॥
दोघे राजे मिळोन । प्रलाप करिती रोदनीं ।
हा हा कुमारा म्हणोन । ऊर-शिर पिटिताति ॥ १६४ ॥
' हो पुत्र हो तात ' म्हणत । राजा असे लोळत ।
मंत्री राजकुळ समस्त । नगरलोक दुःख करिती ॥ १६५ 
कोठे गेलासी राजपुत्रा । म्हणोनि सीमंतिनी रडत ।
खिन्न होती समस्त । माता पिता श्र्वशुरादि ॥ १६६ ॥
सीमंतिनी म्हणे पितयासी । प्राण त्यजीन पतिसरसी । 
वांचूनियां संसारासी । काय उपयोग वैधव्यत्वें ॥ १६७ ॥
पुसती सकळ द्विजांसी । करावें सहगमन कैसी ।
विप्र सांगती रायासी । प्रेतावेगळें करुं नये ॥ १६८ ॥
प्रेत विचारावें नदींत । दहन करावें कन्येसहित ।
न दिसे बुडाला गंगेंत । केवीं कराल म्हणताति ॥ १६९ 
आतां इसी ऐसें करणें । प्रेत सांपडे तव राखणें ।
ऐकोनियां द्विजवचन । राजा कन्येसी विनवीत ॥ १७० 
ऐसें व्याकुळ दुःख करिती । मंत्री पुरोहित म्हणती ।
जे जे असेल होणार गति । ब्रह्मादिकां न टळे देखा ॥ १७१ ॥
होणार जाहली देवकरणी । काय कराल दुःख करुनि ।
ऐसें मंत्री संबोखोनि । राजयांते चला म्हणती ॥ १७२ ॥
निघाले राजे उभयतां । मंदिरा पातले दुःख करीत ।
इंद्रसेन अति दुःखित । न विसरे कधीं पुत्रशोक ॥ १७३ 
राजव्यापार सोडूनि । दुःख करी पुत्रचिंतनीं । 
गोत्रजादीं व्यापोनि । राष्ट्र घेतलें सकळिक ॥ १७४ ॥
सहभार्या रायासी । ठेविलें कारागृहासी ।
पुत्रशोक बहु तयासी । राज्यभोगीं चाड नाहीं ॥ १७५ ॥
चित्रवर्मा राजा देखा । कन्या ठेविली ममत्विका । 
प्राण त्यजूं पाहे निका । लोकनिंदा म्हणोनि ॥ १७६ ॥
राजा म्हणे कन्येसी । पुत्र नाहींत आमुच्या वंशी ।
कन्या एक तूं आम्हांसी । पुत्र म्हणूनि प्रतिपाळूं ॥ १७७ 
लोक निंदती आम्हांसी । वैधव्यत्व नाहीं परियेसीं ।
वर्ष एक क्रमीं वो तूं ऐसी । पुढें आचार करीं बाळे ॥१७८ 
पिता-वचन ऐकोनि । करीतसे बहु चिंतन ।
म्हणे देवा शूळपाणि । केवीं मातें गांजिलें ॥ १७९ ॥
ऐसें विचारी मानसीं । व्रत आचरीतसे सुरसीं ।
सोमवार उपवासी । ईश्र्वरपूजा करीतसे ॥ १८० ॥
इतुकें होतां राजकुमर । बुडाला होता गंगापूर ।
गेला जेथें पाताळनगर । वासुकी जेथें राज्य करी ॥ १८१ 
नागलोकींचिया नारी । आल्या होत्या नदीतीरीं ।
राजकुमार आला पूरीं । नदीतटाकीं वहात ॥ १८२ ॥
देखोनियां नागकन्या । काढिती संतोषेंकरुनियां ।
अमृत शिंपिती आणूनियां । जागृत झाला राजकुमर ॥ १८३ ॥
नागकन्या मिळून त्यासी । घेउनि जाती तक्षकापाशीं ।
विचित्र नगर परियेसीं । आश्र्चर्य पाहे राजकुमर ॥ १८४ 
पाहे पाताळनगर-रचना । जैसी शोभा इंद्रभुवना ।
गोपुरें दिसतीं महारत्ना । जैसी विद्दुल्लता लखलखित ॥ १८५ ॥
वज्र-नीळ वैडूर्येसीं । माणिक्य-मुक्ताफळेसीं ।
महारम्य पुरी जैसी । सूर्यकांतीपरी शोभा ॥ १८६ ॥
चंद्रकांतीसरसी भूमि । महाद्वार कपाटहेमी ।
अनेक रत्नें नाहीं उपमी । ऐशा मंदिरीं प्रवेशला ॥ १८७ 
पुढें देखतां सभा थोर । समस्त बैसले सर्पाकार ।
आश्र्चर्य करी राजकुमर । असंख्य सर्प दिसताति ॥ १८८ 
सभेमाजीं अतिशोभित । मध्यें दिसे पन्नगनाथ । 
जैसी सूर्यकांति फांकत । अति उन्नत बैसलासे ॥ १८९ 
अनेक श्र्वेतफणी दिसती । जैशी वीजु असे लखलखती ।
पीतांबर वास ज्योती । रत्नकुंडलमंडित देखा ॥ १९० ॥
अनेकरत्नखचित देखा । मुकुट मिरवती सहस्त्र एका ।
सहस्त्रफणी मिरवे तक्षका । ऐसा सभे बैसलासे ॥ १९१ 
रुपयौवन नागकन्या । नाना आभरणें लेवोनियां ।
अनेक सहस्त्र येवोनियां । सेवा करिती तक्षकाची ॥ १९२ 
ऐसे सभास्थानीं देख । राजा बैसलासे तक्षक । 
देखोनि राजकुमारकें । नमन केलें तये वेळीं ॥ १९३ ॥
तक्षक पुसे नागकन्यांसी । कैचा कुमारक आणिलासी ।
सुलक्षण दिसतो कैसी । कोठें होता म्हणोनियां ॥ १९४ 
नागकन्या म्हणती त्यासी । नेणों नाम याचे वंशासी ।
वहात आला यमुनेसी । घेऊनि आलों तुम्हांजवळी ॥ 
१९५ ॥
तक्षक पुसे कुमारकासी । नाम कवण, राज्यकवण वंशी 
काय कारण आलासी । कवण देशीं वास तुझा ॥ १९६ ॥
सांगे राजकुमर देखा । आम्ही भूमंडळनायका । 
नैषधाराज्याधिपति ऐका । ' नळ ' नामा पुण्यवंत लोकीं ॥ १९७ ॥
त्याचा पुत्र इंद्रसेन । जन्म आमुचा तयापासून ।
चंद्रांगद ' नाम आपणा । गेलों होतों श्र्वशुरगृहा ॥ १९८ 
जलक्रीडा करावयासी । गेलों होतों यमुनेसीं ।
विधिवशें आम्हांसी । बुडालो नदींत वधारा ॥ १९९ ॥
वहात आलों नदींत । नागकन्या मज देखत । 
घेवोनि आल्या तुम्हांपर्यंत । दैव आपुलें साफल्य ॥ २०० 
पूर्वाजित पुण्येसीं । भेटी झाली चरणासी ।
धन्य माझे जीवनासी । कृतार्थ झालों म्हणतसे ॥ २०१ 
करुणावचन ऐकोनि । तक्षक बोले संतोषोनि ।
नको भिऊं म्हणोनि । धैर्य देत तये वेळीं ॥ २०२ ॥
शेष म्हणे कुमर बाळा । तूं दिसतोसी मन-निर्मळा । 
तुमचे घरीम सर्वकाळा । कवण देव पूजीतसां ॥ २०३ ॥
ऐसें ऐकोनि राजकुमर । हर्षें जाहला निर्भर । 
सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर देखा ॥ २०४ 
समस्त देवांचा देव । नाम आहे सदाशिव ।
वामभागीं उमा अपूर्व । त्यातें पूजितों निरंतर ॥ २०५ ॥
ज्याचें रजीं जनित ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपम्या ।
तैसा सदाशिव आम्हां । पूजीतसो सर्वकाळीं ॥ २०६ ॥
ज्याचे सत्वगुणेसीं । विष्णु उपजला परियेसीं ।
प्रतिपाळक लोकांसी । तैशा शिवासी पूजीतसों ॥ २०७ ॥
ज्याच्या तामसापासून । एकादश रुद्रगण । 
उपजले, याचि कारण । प्रलयकर्ता तया नाम ॥ २०८ ॥ 
धाता-विधाता जो आपण । उत्पत्तिस्थितिलय कारण ।
तेजासी तेज असे वायुराकाशीं । तैशा पूजितों शिवासी ॥ २०९ ॥
पृथ्वी-आप-तेजासी । जो पूर्ण असे वायुराकाशीं ।
तैशा पूजितों शिवासी । म्हणे राजकुमर देखा ॥ २१० ॥
सर्व भूतीं असे पूर्ण । चिन्मय आपण निरंजन । 
जो रुपें असे अचिंतन । तैसा ईश्र्वर पूजितों सदा ॥ २११ 
ज्याची कथा वेद जाहले । तक्षक-शेष ज्याचीं कुंडलें ।
त्रिनेत्र असे चंद्र मौळीं । तैसा शंकर पूजीतसों ॥ २१२ ॥
ऐसें ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन ।
राजकुमारा आलिंगोन । तुष्टलों तुष्टलों म्हणतसे ॥ २१३ 
तक्षक म्हणे तये वेळीं । तुज देईन राज्य सकळी ।
तुवां रहावें पाताळीं । अनंत भोग भोगीं आतां ॥ २१४ ॥
माझे लोकीं जें जें रत्न । जें मुख्य असे पवित्र ।
तें देईन समस्त । सुखें ऐस म्हणतसे ॥ २१५ ॥
पाताळ लोकींची रचना परम । पाहे पां अनुपम्य ।
कल्पवृक्षादि मनोरम । आहेत माझ्या नगरांत ॥ २१६ ॥
अमृत न देखती स्वप्नीं कोणी । भरलें असे जैसे पाणी 
तळें बावी पोखरणी । आहेत माझे द्वारीं ॥ २१७ ॥
नाहीं मरणभय येथें । रोगपीडादि समस्त । 
नेणती कोणी स्वप्नावस्थें । ऐसें नगर माझें असे ॥ २१८ 
सुखें ऐस कुमरा म्हणत । तक्षक असे सांगत ।
राजकुमर असे विनवीत । करुणावचनेंकरुनियां ॥ २१९ ॥
राजकुमर विनवी तक्षकासी । एक पुत्र आपण पितयासी 
भार्या वर्ष-चतुर्दशीं । शिवपूजा करीतसे ॥ २२० ॥
नूतन माझे पाणिग्रहण । तेथें असे अंतःकरण ।
पहावे मातापित्याचे चरण । दुःखी असतील मजलागीं ॥ २२१ ॥
आपण बुडालों नदींत । पिता माता दुःख करीत ।
पत्नी म्हणे पति मृत । समस्त जीव त्यजितील ॥ २२२ 
देखिले तुमचे चरण । संतुष्ट जाहले अंतःकरण ।
राखिला तुम्ही माझा प्राण । दर्शन करवावे मातापिता ॥ २२३ ॥
तक्षक झाला संतोषी । नाना रत्नाभरणें त्यासी । 
अमृत पाजवी बहुवसी । आणिक देती स्त्रियेसी ॥ २२४ 
कल्पवृक्षफळें देती । अपूर्व वस्त्राभरणें समस्ती ।
जें अपूर्व असे क्षितीं । ते अमोल्य वस्तु देता जाहला ॥ २२५ ॥
इतुके देवोनि कुमरासी । तक्षक म्हणे परियेसीं ।
जे जे काळी आम्हां स्मरसीं । तुझें कार्य सिद्धि पाववूं ॥ २२६ ॥
Gurucharitra Adhyay 35 
श्रीगुरचरित्र अध्याय ३५


Custom Search