Tuesday, December 10, 2013

Gurucharitra Adhyay 35 Part 1/3 गुरुचरित्र अध्याय ३५ भाग १/३


Gurucharitra Adhyay 35
Gurucharitra Adhyay 35 is in Marathi. This Adhyay describes Somawar Vrata. Name of this Adhyay is Simantini Aakhyanam.
गुरुचरित्र अध्याय ३५ भाग (१) पहिला
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः 
नामधारक सिद्धासी । विनवीतसे परियेसीं ।
रुद्राध्याय विस्तारेसीं । दंपतीतें सांगितला ॥ १ ॥
पुढें काय वर्तलें । विस्तारुनि सांगा वहिले ।
मन माझें वेधलें । गुरुचरित्र ऐकावया ॥ २ ॥
सिद्ध म्हणे ऐक ताता । अपूर्व असे पुढें कथा ।
तेचि जाणा पतिव्रता । श्रीगुरुतें विनवीत ॥ ३ ॥
कर जोडोनि श्रीगुरुसी । विनवीतसे भकतीसीं । 
आम्हां गति पुढें कैसी । कवणेपरि असावें ॥ ४ ॥
याकारणें आपणासी । एखादा मंत्र उपदेशी ।
जेणें राहे जीवासी । चरणस्मरण सनातन ॥ ५ ॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । स्त्रियांतें काय उपदेशी ।
पतिभक्ति करावी हर्षी । उपदेश स्त्रियांतें देऊ नये ॥ ६ 
देता उपदेश स्त्रियांसी । विघ्न असे मंत्रासी ।
पूर्वी शुक्राचार्यासी । घडले असे परियेसा ॥ ७ ॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरुवचन । विनवीतसे कर जोडून ।
स्त्रिया केवीं मंत्रहीन । शुक्राचार्या केवीं झालें ॥ ८ ॥
विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसीं ।
म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेंकरुनियां ॥ ९ ॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा परियेसी ।
युद्ध देवदैत्यांसी । सदा होतसे अवधारीं ॥ १० ॥
दैत्यसैन्य पडे रणीं । शुक्र करी संजीवनी । 
समस्त सैन्य उठवूनि । पुनरपि पाठवी युद्धासी ॥ ११ ॥
इंद्र वज्रेंकरुनि मारी । शुक्र अमृत-जप करी ।
सवेंचि येती निशाचरी । देवसैन्य मारावया ॥ १२ ॥  
ऐसें होतां एके दिवसीं । इंद्र गेला कैलासासी ।  
सांगे स्थिति शिवासी । शुक्राचार्याची मंत्रकरणी ॥ १३ ॥
कोपोनियां ईश्र्वर । नंदीस सांगे उत्तर ।
जावोनियां वेगवक्त्र । शुक्राचार्या धरुनि आणिं ॥ १४ ॥
स्वामीवचन ऐकोनि । नंदी गेला ठाकोनि ।
शुक्र होता तपध्यानीं । मुखें धरिला नंदीने देखा ॥ १५ 
घेऊनि गेला शिवापाशी । आकांत दैत्यदलासी ।
ईश्र्वरें ग्रासिलें तयासी । अगस्त्य-सिंधूपरी देखा ॥ १६ ॥
ऐसा किती दिवसवरी । होता शुक्र शिवाचे उदरीं ।
निघूनि गेला मूत्रद्वारीं । विसर पडे शंकरासी ॥ १७ ॥
पूर्वी होतें शुक्र नांव । ईश्र्वर-उदरीं जाहला उद्भव ।
नाम पावला ' भार्गव ' । पुनरपि अमृतमंत्र जपे ॥ १८ 

इंद्र मनीं विचारी । पुरोहितासी पाचारी ।
कैसा मंत्र शुक्र करी । अमृतसंजीवनी दैत्यांसी ॥ १९ ॥
यासी करावया विघ्न एक । तूं पुरोहित विवेक ।
बुद्धि-विचार अधिक । बृहस्पति गुरुराया ॥ २० ॥
पाहे पां दैत्यदैव कैसें । शुक्रासारिखा गुरु विशेषें ।
देतो जीवासी भरंवसे । दैत्य येती युद्धासी ॥ २१ ॥
तैसा नव्हेस तूं आम्हांसी । आमुतें कां गा उपेक्षिसी ।
देवगुरु तूं म्हणविसी । बुद्धि विचारीं शीघ्र आतां ॥ २२ 

तूं पूज्य समस्त देवांसी । जरी तूं आम्हां कृपा करिसी ।
शुक्राचार्य काय विशेषीं । तुजसमान नव्हे जांण ॥ २३ ॥
ऐसें नानापरी देख । इंद्र अमरनायक । 
पूजा केली उपचारिक । बृहस्पति संतोषला ॥ २४ ॥
गुरु म्हणे इंद्रासी । यासी उपाव करावा ऐसी । 
षट्कर्ण करितां मंत्रासी । सामर्थ्य राहील शुक्राचें ॥ २५ 
एखादा पाठवावा शुक्रापाशीं । विद्यार्थी होऊन कपटवेषीं 
मंत्र शिकेल परियेसीं । विघ्न होईल म्हणोनि ॥ २६ ॥
आपुला पुत्र कच असे । त्यातें पाठवूं विद्याभ्यासें ।
मंत्र शिकेल कैसा असे । ऐसा निर्धार केला देखा ॥ २७ ॥ 
कचातें बृहस्पति । सांगतसे बुद्धि प्रीतीं ।
तुवां जावें शुक्राप्रती । विद्यार्थिरुप धरोनियां ॥ २८ ॥
आमुची निंदा तेथें करीं । मनोभावें सेवा करीं ।
संजीवनी कवणेपरी । मंत्र शिकें पुत्रराया ॥ २९ ॥
निरोप घेऊनि पितयाचा । आणि इंद्रादि समस्त देवांचा 
शुक्राप्रती गेला कचा । विद्यार्थिरुप धरोनि ॥ ३० ॥
नमन करुनि सांष्टांगीं । उभा राहिला करुणांगीं ।
शुक्र पुसतसे वेगीं । कवण कोठोनि आलासी ॥ ३१ ॥
बोले आपण द्विजकुमर । ऐकिली तुझी कीर्ति थोर ।
विद्याभ्यासीन मनोहर । म्हणोन आलों सेवेसी ॥ ३२ ॥
सेवक होईन तुमचे चरणीं । धरुनि आलों अंतःकरणीं ।
तूं भक्तवत्सलशिरोमणि । अनाथाचा प्रतिपालक ॥ ३३ 
ऐसें करुणावचनें देखा । विनवीतसे कच निका ।
जवळी उभी शुक्रकन्यका । करुणें पितयासी विनवीतसे ॥ ३४ ॥
शुक्रासी म्हणे देवयानी । ब्राह्मण भला दिसे नयनीं ।
यातें तुम्हीं शिष्य करुनि । विद्याभ्यास सांगावा ॥। ३५ 
कच सुंदर सुलक्षण । जैसा दिसे मदन कामन ।
देवयानी करी चिंतन । ऐसा पति व्हावा मज ॥ ३६ ॥
ऐसी वासना धरुनी मनीं । पितयातें विनवी नमुनी ।
शिष्य केला कच सगुणी । शुक्राचार्य कृपा करी ॥ ३७ ॥
ऐसा विद्याभ्यास करितां । दैत्यकुळ दुःखिता । 
देवगण आले आतां । कपटवेष म्हणती त्यासी ॥ ३८ ॥
शिकूनियां विद्येसी । शिकवील जाऊनि देवांसी ।
कुडें होईल आम्हांसी । म्हणोनि चिंतिती मनामध्यें ॥ 
३९ ॥
काळ क्रमितां एके दिवसीं । कचातें पाठविलें समिधांसी 
दैत्य जाती साह्यासी । समिधेनिमित्त रानांत ॥ ४० ॥
रानीं जाऊनि कचासी । दैत्यें मारिलें द्वेषीं ।
समिधा घेवोनियां घरासी । दैत्य आपण येते झाले ॥ ४१ 
शुक्राचार्याची कन्या । नाम तिचें देवयानी म्हणोनियां ।
पितयासी विनवी नमूनियां । कच न दिसे कोठें आणा ॥ ४२ ॥
कच आलियावांचून । भोजन ज करी आपण ।
ऐसें करीतसे निर्वाण । शुक्राचार्य चिंतीतसे ॥ ४३ ॥
ज्ञानें पाहे मानसीं । मृत्यु झाला असे त्यासी ।
मंत्र जपूनि संजीवनीसी । त्वरित घरासी आणिला ॥ ४४ 
आणिक होतां बहुत दिवस । दैत्य करिती अतिद्वेष ।
गेला होता वनास । पुनरपि वधिती तयासी ॥ ४५ ॥
मागुती वाचेल म्हणोनि । चूर्ण करिती छेदोनि ।
दाही दिशा टाकोनि । आले घरा पुनरपि ॥ ४६ ॥
दिवस गेला अस्तमानीं । पुसतसे देवयानी ।
कच न दिसे म्हणोनि । पितयातें विनवीतसे ॥ ४७ ॥
कच माझा प्राणसखा । नाणिसी जरी घेईन विखा ।
दाखवी मज याचे मुखा । म्हणोनि प्रलाप करीतसे ॥ ४८ 
कन्येवरी ममत्व बहुत । म्हणोनि शुक्र ज्ञानें पहात ।
छिन्नविच्छिन्न केले म्हणत । मंत्र जपला संजीवनी ॥ ४९ ॥
ऐसें मंत्राचें सामर्थ्य । कच आला घरा त्वरित ।
देवयानी संतोष करीत । पिता आलिंगी कन्येसी ॥ ५० 
दैत्य-शिष्य विचार करिती । कांहीं केलिया न मरे 
म्हणती ।
गुरुकन्येसी असे प्रीति । म्हणूनि गुरु वांचवितो ॥ ५१ ॥
आतां उपाय करुं यासी । येईल उदईक एकादशी ।
मारुनि मिळवूं पानकेसी । गुरुमुखीं पाजवूं ॥ ५२ ॥
ऐसी निगुती करुनि । आली एकादशी दिनीं ।
कचातें बाहेर नेवोनि । मारिते जहाले दैत्य-शिष्य ॥ ५३ 
पानक करिती गुरुसी । त्यांत मिळविती समरसीं ।
स्निग्धा मिळवूनि बहुवसी । शुक्रगुरुसी देते झाले ॥ ५४ 
मागुती पुसे देवयानी । पितयातें विनवूनि ।
सखा आणीं म्हणोनि । अति रुदना करीतसे ॥ ५५ ॥
शुक्र पहातसे ज्ञानी । न दिसे कच त्रिभुवनीं ।
खेद करीतसे देवयानी । कन्यामोह असे बहुत ॥ ५६ ॥
विचार करितां सर्वां ठायीं । दिसों लागला आपुले देही ।
संदेह पडला शुक्रा पाहीं । कैसें करुं म्हणतसे ॥ ५७ ॥
कन्येसी म्हणे शुक्र देखा । कच नये आतां ऐका ।
माझे उदरीं असे निका । केवीं काढूं तयासी ॥ ५८ ॥
यासी काढितां आपणासी । मृत्यु होईल परियेसी ।
काय अभिलाष असे त्यासी । म्हणोनि कन्येसी पुसतसे ॥ ५९ ॥
पितयासी विनवी देवयानी । अभिलाष होता माझे मनीं 
भार्या होईन त्यासी म्हणोनि । दोघें असतों तुजपाशीं ॥ ६० ॥
येणें व्हावें माझा पति । होतां संकल्प माझे चित्तीं । 
जरी न आणिसी माझा पति । प्राण त्यजीन म्हणतसे ॥ ६१ ॥
संदेह पडला शुक्रासी । बोधिता झाला कन्येसी ।
त्यासी आणितां आपणासी । मृत्यु होईल अवधारीं ॥ ६२ 
कन्या म्हणे पितयासी । समस्तां तूं वांचविसी ।
आपुला प्राण जाईल म्हणसी । अति आश्र्चर्य म्हणतसे ॥ ६३ ॥
शुक्र म्हणे देवयानी । मंत्र असे संजीवनी । 
मजवांचूनि नेणें कोणी । मातें कोण उठविल ॥ ६४ ॥
मंत्र सांगो नये कवणा । षट्कर्ण करितां जाईल गुणा ।
कचाकरितां आपुला प्राण । जाईल म्हणे शुक्र देखा ॥ 
६५ ॥
न ऐके कन्या देवयानी । पित्याचे चरण धरुनि । 
विनवीतसे कर जोडोनि । मंत्र आपणासी शिकवावा ॥ 
६६ ॥
कचासी तूं मंत्र करी । मृत्यु येईल तुज जरी ।
मंत्र करुनि तुम्हां जागृत करीं । म्हणोनि चरणीं लागली ॥ ६७ ॥
शुक्र म्हणे कन्येसी । मंत्र सांगूं नये स्त्रियांसी ।
दोष असे परियेसीं । वेदशास्त्रीं असंख्यांत ॥ ६८ ॥
स्त्रियांसी मंत्र पतिभक्ति । जपूं नये मंत्रयुक्ति ।
सांगतां दोष आम्हां घडती । मंत्रसत्व जाईल ॥ ६९ ॥
पित्यासी म्हणे देवयानी । सुखें असा मंत्र जपोनि ।
त्यजीन आपुला प्राण म्हणोनि । आली मूर्छना तयेवेळीं ॥ ७० ॥
शुक्राची कन्येवरी प्रीति । उठवोनि तिसी आलिंगिती ।
मंत्र तिसी सांगती । संजीवनी अवधारा ॥ ७१ ॥
कच आपुल्या पोटीं होता । तोही होय ऐकता । 
मंत्र जहाला षट्कर्णता । मग जपिला कचानिमित्यें ॥ ७२ ॥
शुक्राचे पोटांतुनी । कच निघाला फुटोनि ।
मंत्र जपोनि देवयानी । पितयातें उठविलें ॥ ७३ ॥
तीन वेळां मंत्र जपतां । कचें पाठ केला तत्त्वता ।
संतोष करी मनीं बहुता । कार्य साधलें म्हणोनि ॥ ७४ 
शुक्राचार्यासी नमूनि । कच विनवी कर जोडूनि ।
दैत्यद्वेषें मरतों म्हणोनि । निरोप द्यावा आपणासी ॥ ७५ ॥
स्वामीधर्में विद्या शिकलों । जें जें मनींचे लाधलों ।
तुझे कृपें पूर्ण जहालों । म्हणोनि चरणीं लागला ॥ ७६ 
शुक्राचार्ये हर्षोनि । निरोप दिधला संतोषोनि ।
पालव धरी देवयानी । आपुला पति होई म्हणे ॥ ७७ ॥
तूंतें मारिलें दैत्यें सकळी । प्राण आणविले आपण ।
विद्या शिकलासि पित्याजवळी । अवश्य वरावें म्हणतसे ॥ ७८ ॥
कच म्हणे ऐक बाळे । गुरुकन्या भगिनी बोले । 
तुवां आमुतें वांचविलें । माता होसी निर्धारीं ॥ ७९ ॥
वरितां दोष आपणासी । दूषण करिती समस्त ऋषि ।
बहीण तूं आमुची होसी । म्हणोनि विनवी तयेवेळीं ॥ 
८० ॥
देवयानी कोपोनियां । शाप दिधला तत्क्षणीं तया ।
वृथा होय तुझी विद्या । समस्त विसरसी तात्काळी ॥ ८१ ॥
माझे अंतःकरणींची आशा । तुंवा केली दुराशा ।
विद्या नये तुज लवलेश । म्हणूनि शाप देतसे ॥ ८२ ॥
कच म्हणे तियेसी । वायां शापिलें आम्हांसी ।
पुरुष होईल तुज ऐसी । ब्रह्मकुळाव्यतिरिक्त ॥ ८३ ॥
तुझा पिता ब्रह्मज्ञानी । जाणे अमृतसंजीवनी ।
तुज शिकविल्या-गुणीं । पुढें मंत्र न चाले जाण ॥ ८४ ॥
ऐसा शाप देऊनि । कच गेला निघोनि ।
संतोष झाला इंद्रभुवनीं । दैत्यजीवनी नव्हेचि ॥ ८५ ॥
शुक्राचा संजीवनी मंत्र । कामा नये जाहला अपात्र ।
स्त्रियांसी न सांगावा मंत्र । म्हणोनि श्रीगुरु निरुपती ॥ ८६ ॥
स्त्रियांसी कारण पतिसेवा । याचि कारणें मंत्र न द्यावा 
व्रतोपास करावा । गुरु-पुरुष निरोपें ॥ ८७ ॥
सावित्री विनवी श्रीगुरुसी । व्रतें आचरलीं बहुवसी ।
तुझे वाक्यें आम्हांसी । एखादें व्रत निरोपावें ॥ ८८ ॥
तूं तारक विश्र्वासी । तुजवांचूनि नेणों आणिकासी ।
तूंचि तारक आम्हांसी । व्रत तुझी चरणसेवा ॥ ८९ ॥
भक्ति राहे तुझिया चरणीं । ऐसा निरोप द्यावा मुनि ।
म्हणूनि लागली चरणीं । कृपा करीं म्हणोनियां ॥ ९० ॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । सांगेन व्रत तुज ऐसी ।
स्थिर होय अहेवपणासी । राज्य पावे तुझा पति ॥ ९१ 
दंपती विनवी स्वामियासी । वाक्य कारण आम्हांसी ।
जैसा कांहीं निरोप देसी । तेणेंपरी रहाटों स्वामिया ॥ ९२ 
जो गुरुचें वाक्य न करी । तोचि पडे रौरवघोरीं ।
तुझे वाक्य आम्हां तारी । म्हणोनि चरणीं लागती ॥ ९३ 
भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । सांगता जहाला अतिप्रीत । 
विश्र्व तारावया समर्थ । व्रत तिसी सांगतसे ॥ ९४ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरु सांगती अतिकवतुका ।
ऐकताति दंपतीं निका । अतिप्रीतीकरुनियां ॥ ९५ ॥
श्रीगुरु म्हणती तयांसी । सांगेन व्रत इतिहासीं ।
ऋषि पुसती सूतासी । व्रत बरवें निरोपावें ॥ ९६ ॥
सूत म्हणे ऋषेश्र्वरां । सांगतो व्रत मनोहरा ।
स्त्री अथवा पुरुषवरा । व्रत असे अवधारा ॥ ९७ ॥
नित्यानंद असे शांत । निर्विकल्प निरामय वस्त ।
ऐसा ईश्र्वर अर्चा त्वरित । सकळाभीष्ट पाविजे ॥ ९८ ॥
विरक्त अथवा मदनरत । विषयातुर आसक्त । 
जे पूजिती पूर्ण भक्त । त्यांसी ईश्र्वर प्रसन्न ॥ ९९ ॥
संसार मायासागरांत । भुंजताति जन समस्त ।
एखादे समयी श्रीगुरुभक्त । शिवव्रत आचरिती ॥ १०० ॥ 
  त्याणें पावतील पैलपार । ऐसें बोलती वेदशास्त्र ।
स्वर्गापवर्गा अधिकार । त्यासी होती परियेसा ॥ १०१ ॥
विशेष असे व्रत एक । सोमवार महासुख । 
ईश्र्वरार्चन करावें ऐक । सकाळभीष्ट पाविजे ॥ १०२ ॥
नक्तभोजन उपवास । जितेंद्रिय करावें विशेष ।        वैदिक-लौकिक मार्गीं सुरस । विधिपूर्वक पूजावें ॥ १०३ 
गृहस्थादि ब्रह्मचारीं । सुवासिनीं कन्याकुमारीं ।
भ्रताराविण विधवा जरी । व्रत करावें अवधारा ॥ १०४ ॥
याचें पूर्वील आख्यान । सांगता असे अतिगहन ।
एकचित्तें परिसा जन । ऋषिस्तोम सकळिक ॥ १०५ ॥
स्कंदपुराणींची कथा । सर्व साध्य ऐकतां ।
पूर्वकाळीं आर्यावर्ता । राजा एक अवधारा ॥ १०६ ॥
' चित्रवर्मा ' नाम त्यासी । धर्मात्मा परियेंसी ।
धर्ममार्ग आचरे हर्षीं । अधर्मियाते शिक्षा करी ॥ १०७ ॥
अखिल पुण्य त्याणें केले । सकळ संपदे वाढविलें ।
समस्त वैरी जिंकिले । पराक्रमी महा शौरी ॥ १०८ ॥
सहपत्या धर्म करिती । पुत्रकाम्यें शिवा पूजिती ।
ऐसे किती काळ क्रमिती । कन्या जाहली तयांसी ॥ १०९ 
अतिसुंदर सुलक्षणी । जैसी पार्वती स्वरुपिणी ।
तेज फांके सूर्यकिरणी । अतिलावण्यस्वरुपीं ॥ ११० ॥
वर्तावया जातकासी । बोलाविले सकळ ज्योतिषी ।
द्विज मिळोनि अपारेसीं । जातक वर्तविती अवधारा ॥ १११ ॥
म्हणती कन्या सुलक्षण । नाम ' सीमंतिनी ' जाण ।
उमेसारखें मांगल्यपण । दमयंती-रुप होय ॥ ११२ ॥
भागीरथीसम कीर्तीसी । लक्ष्मी गुणें परियेसीं ।

ज्ञानें देवमातेसरसी । जानकी एवढी पतिव्रता ॥ ११३ ॥
Gurucharitra Adhyay 35 
गुरुचरित्र अध्याय ३५


Custom Search

No comments: