Tuesday, December 30, 2014

DeviMahatmya Adhyay 7 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (७) सातवा


DeviMahatmya Adhyay 7 
DeviMahatmya Adhyay 7 is in Marathi. It is translation of Durga SaptaShati Adhyay 7 which is in Sanskrit. Translation is very nicely done by Shri Rambaba Vernekar. Goddess Saraswati was very angry as Chand and Munda came for war. Kali was creation of anger of Goddess and came out from the body of Goddess. She was black in color. Kali killed very dangerous demons Chanda and Munda. The demons were with a very large army of dangerous demons but many were killed by Goddess and Kali. After she killed Chand and Munda, She was blessed with the name Chamunda by Goddess Saraswati.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (७) सातवा
श्रीगणेशाय नमः । श्रीदेवै नमः ।
मेधा ऋषि म्हणे सुरथा । ऐकें जगदंबेची कथा । 
एकाग्रचित्तें नृपनाथा । श्रवण भावें करावें ॥ १ ॥
मार्कंडेय सांगे शिष्यासी । सूत वदला शौनकासी ।
तेंचि मी सांगतों तुजसी । यथामतीकरुनियां ॥ २ ॥
पूर्वाध्यायाचे अंती जाण । शुंभ निशुंभ दोघेजण ।
चंड-मुंडांतें आज्ञापून । पाठविते जाहले ॥ ३ ॥
आज्ञा होतांचि दैत्यांलागुनी । असंख्यांत भरलें गगनीं ।
चतुरंग सेना घेऊनि । चंड मुंड निघाले ॥ ४ ॥
वाजी वारण रथ पदाती । सेनासमुद्र लोटला क्षितीं ।
गर्जना परिसोनि देवजाती । भयभीत जाहल्या ॥ ५ ॥
वाद्यें वाजती अनेक । दैत्य गर्जती भयानक ।
गगनांतूनि कितीएक । हिमाचलीं उतरती ॥ ६ ॥
अनेक शस्त्रें घेतलीं हातीं । नग्न शस्त्रें झगमगती ।
ऐसियापरी वीर धांवती । लक्षांचे लक्ष तेधवां ॥ ७ ॥
क्रोधायमान जो प्रचंड । म्हणोनि नाम असे चंड ।
शत्रूतें करी खंडविखंड । म्हणोनि मुंड म्हणती तया ॥ ८ ॥
ते जाऊनि पर्वतावरी । विलोकिती त्याचे शिखरीं ।
देवी बैसली सिंहावरी । किंचित् हास्य करीतसे ॥ ९ ॥
अष्टभुजा बाण मुसळ । शंख चक्र घेतला शूळ ।
कार्मुक घंटा आणि लांगल । अष्टायुधें शोभती ॥ १० ॥
ऐसे पाहूनि देवीप्रती । उद्योग करिते जाहले किती ।
देवीसी न्यावें निश्र्चितीं । शुंभाजवळी एकदां ॥ ११ ॥
ओढोनि धनुष्य लावले शर । कित्येक धांवले खङ्गधर ।
जाती तिच्या समीप असुर । हलकल्लोळ मांडिला ॥ १२ ॥
एक म्हणती धरा धरा । कोणी म्हणती मारा मारा ।
कांहीं धांवले करुनि त्वरा । शस्त्रें टाकिती तिजवरी ॥ १३ ॥
वृक्ष पाषाण झुगारिती । तिच्या अंगावरी पडती ।
पुष्पप्राय ते लागती । न गणी त्यांते जगदंबा ॥ १४ ॥
तेव्हां भवानी कोप करी । मारुं भावी सकळ वैरी ।
क्रोधेंकरुनि ते अवसरीं । तिचें मुख काळें जाहलें ॥ १५ ॥
मषीसारखे काळें वदन । भृकुटी कराल दिसे जाण । 
तेव्हां तिच्या कपाळापासून । ' काली ' उत्पन्न जाहली ॥ १६ ॥
त्या कालीचें वदन कराल । करीं खङ्ग पाश अति चंचल ।
गळां नरमाळा केवळ । भयंकर शोभतसे ॥ १७ ॥
विचित्र खट्वांग जिचे करी । जी व्याघ्राचें चर्म पांघरी ।
शुष्कमांस अतिभयंकरी । मेधाऐसा रव जिचा ॥ १८ ॥
महा विस्तारलें वदन । जिव्हा लळलळित भीषण ।
निमग्न जिचे आरक्त नयन । क्रोधायमान सर्वदा ॥ १९ ॥
हांक मारितां क्रोधावेशा । नादें भरल्या दाही दिशा ।
मग वेगें करित प्रवेशा । असुरसैन्यामाझारी ॥ २० ॥
असुरांचे सैन्य सकळ । भक्षिती जाहली उतावेळ । 
घंटेसहित गज तत्काळ । शतावधि भक्षिले ॥ २१ ॥
अंकुश महात वीर सकळ । त्यांसहित हत्तींचा मेळ ।
एकाचि हस्तें घेऊनि तत्काळ । मुखीं घाली आपुल्या ॥ २२ ॥
मुखीं घालोनि चावी सत्वर । अश्र्वांसहित भक्षिले वीर ।
सारथ्यांसहित रथ अपार । भक्षिती जाहली ते काळीं ॥ २३ ॥
इच्छामात्रें मुख पसरी । सैन्य घातले मुखांतरीं ।
केशांतें धरुनि झडकरी । कितीएक ते भक्षिले ॥ २४ ॥
ग्रीवेतें धरुनि कितीएक । मुखीं घालोनि चाविले देख ।
पादें रगडोनि अनेक । मारिती जाहली क्षणार्धें ॥ २५ ॥
उरेंकरोनि कित्येकांसी । काली मारिती जाहली असुरांसी ।
त्यांची शस्त्रास्त्रें वेगेंसी । भक्षण केली सर्वही ॥ २६ ॥
असुरांचें तें सैन्य सर्व । मारिदेतां वीरांहीं टाकिले गर्व ।
सहस्त्र लक्ष अर्व खर्व । असंख्यांत भक्षिले ॥ २७ ॥
खङ्गानें कितीएक मारिले । कित्येक खट्वांगे ताडिले ।
कांहीं दंताग्रें विनाशिले । सैन्य मर्दिले सर्वही ॥ २८ ॥
ऐसें देखोनि धांवला चंड । शरवर्षाव करी प्रचंड ।
इतुक्यांत येऊनिही मुंड । चक्रें टाकिलीं असंख्य ॥ २९ ॥
कालीनें विक्राळ मुख पसरोन । चक्रें गिळिलीं सर्वही जाण ।
तिचे मुखीं शोभायमान । कैसी दिसतीं जाहलीं ॥ ३० ॥
जैसीं सूर्याचीं बिंबे अनेक । धनोदरीं शोभती देख ।
पुनः कालीनें पसरुनि मुख । प्रचंड हांक मारिली ॥ ३१ ॥
पसरट मुख अतिविशाळ । दाढा जिव्हा बहु विक्राळ ।
सिंहातें उडवूनि तत्काळ । चंडावरी धांविन्नली ॥ ३२ ॥
केशीं धरुनियां सत्वर । खङ्गे छेदिलें त्याचे शिर ।
मुंड धांवला यानंतर । चंड पडला देखोनी ॥ ३३ ॥
मुंडातेंही खङ्ग मारोन । भूमीसी पाडिला न लागतां क्षण ।
तेव्हां जें कांहीं उरलें सैन्य । तें दाही दिशा पळाले ॥ ३४ ॥
असुरदळीं हाहाकार । तेव्हा जाहला प्रलय थोर ।
असो चंड-मुंडांचीं शिरें सत्वर । घेऊनि काली पातली ॥ ३५ ॥
देवीच्या जवळी येऊनि । प्रचंड अट्टहासेंकरुनी ।
देवीकारणें ते क्षणी । काय बोलती जाहली ॥ ३६ ॥
म्यां तुझे हे चंड मुंड । पशु मारिले प्रचंड ।
युद्धयज्ञीं आतां वितंड । शुंभ-निशुंभां मारिसी तूं ॥ ३७ ॥
ऋषि म्हणे सुरथालागूनि । ती चंड-मुंडांचीं शिरें पाहुनी ।
तया कालीप्रती तत्क्षणीं । देवी बोलती जाहली ॥ ३८ ॥
तूं चंड-मुंडांतें मारुनी । त्यांच्या शिरांतें घेऊनी ।
येती जाहलीस म्हणोनी । ' चामुंडा ' हें नाम तुझें ॥ ३९ ॥
या तिहीं लोकांचे ठायीं । तूं चामुंडा नामें पाहीं ।
विख्यात होऊनि तुज सर्वही । आराधितील निश्र्चयें ॥ ४० ॥
ऐसा प्राप्त होतां वर । कालीसी आनंद होऊनि थोर ।
स्वयं मुखें जयजयकार । करिती जाहली ते काळीं ॥ ४१ ॥
असो या प्रकारेंकरुन । देवीनें कालीतें करुनि उत्पन्न ।
चंड-मुंडांचें करविलें हनन । हेंचि कथन केलें तुम्हां ॥ ४२ ॥
आतां पुढील अध्यायीं निरुपण । रक्तबीजाचें करील हनन ।
तें चरित्र अतिरसाळ जाण । श्रोतेजन परिसा हो ॥ ४३ ॥
मूळश्र्लोकांचा सर्व अर्थ । येथें वर्णिला यथार्थ । 
प्राप्त होय इच्छितार्थ । याच्या श्रवणपठणें पैं ॥ ४४ ॥
भक्तिविनम्र देह करुन । जे सदा करिती देवीस्मरण ।
त्यांच्या सर्व आपदा निरसून । जाती क्षणमात्र न लागतां ॥ ४५ ॥
ऐसें व्यासाचें हें वचन । येथें संशय घेईल कोण ।
परी पाहिजे भक्ति निर्वाण । अनन्यभावेंकरुनियां ॥ ४६ ॥
स्मरणमात्रें संकट जाय । मग चरित्रें कैचा अपजय ।
श्रवण-पठणें होय जय । भाव धरावा आवडीं ॥ ४७ ॥
देवीनें जैसे बोलविले । तैसेचि येथें वर्णन केलें ।
सज्जनीं पाहिजे परिसिले । कृपा करुनि सर्वदा ॥ ४८ ॥
त्या देवीकारणें नमस्कार । आमुचे असोत वारंवार ।
देवीच हा ग्रंथ करणार । निमित्त राम द्विज जाणा ॥ ४९ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने सप्तमोऽध्यायः ॥
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥
Devi Mahatmya Adhyay 7 
Shri Ganeshay namaha II Shri Devyai namaha II 
Medha rushi mhane suratha I Aike Jagdambechi katha I 
aikagrachitte nrupanatha I shravana bhave karave II 1 II 
Markandeya sange shishyasi I Sut Vadala Shounakasi I 
tenchi sangato tujasi I yathamati kruniya II 2 II 
poorvadhyaayaache anti jan I shumbha nishumbha doghejana I 
chand mundate adnyapoon I pathavite jahle II 3 II 
Aadnya hotachi daityalagun I asamkhyat bharale gagani I 
chaturanga sena gheuni I chanda munda nighale II 4 II 
vaji varan ratha padati I senasamudra lotala kshiti I 
garjana parisoni devajati I bhayabhit jahlya II 5 II 
vadye vajati anek I daitya garjati bhayanak I 
gaganantuni kitiaek I himachali utarati II 6 II 
anek shastre ghetali hati I nagna shastre zagamagati I 
aisiyapari veer dhavati I lkshaache laksha tedhava II 7 II 
krodyayman jo prachanda I mhanoni nam ase chanda I 
shatrunte kari khandvikhand I mhanoni munda mhanati tayala II 8 II 
te jauni parvatavari I vilokiti tyache shikhari I 
devi baisali sinhavari I kinchit hasya karitase II 9 II 
astabhuja bana musal I shankha chakra ghetala trishool I 
karmuk ghanta aani langal I ashtayudhe shobhati II 10 II 
aise pahuni deviprati I udyog karite jahale kiti I 
devisi nyave nischiti I shunbhajavali ekada II 11 II 
odhoni dhanushya lavile shar I kityek dhavale khadgadhar I 
jati tichya samip asur I halakllol mandila II 12 II 
eka mhanati dhara dhara I koni mhanati mara mara I 
kahi dhavale kruni tvara I shastre takiti tijvari II 13 II 
vruksha pashana zugariti I tichya angavari padati I 
pushpapray te lagati I na gani tyante jagadamba II 14 II 
tevha bhavani kop kari I maru bhavi sakal vairi I 
krodekaruni te avasari I tiche mukha kale jahle II 15 II 
mashisarakhe kale vadan I bhrukkuti krala dise jana I 
tevnha tichya kapalapasun I kali utapanna jahali II 16 II 
tya kaliche vadan karal I kari khadga pasha ati chanchal I 
gala naramala keval I bhayankar shobhatase II 17 II 
vichitra khatvanga jiche kari I ji vyaghrache charma panghari I 
shukshamansa ati bhayankari I medha eaisa rava jicha II 18 II 
maha vistarale vadan I jivha lalalalit bhishan I 
nimgana jiche aarakta nayan I krodhayman satvada II 19 II 
hanka marita krodhavesha I nade bharalya dahi disha I 
maga vege karit praveshaa I asursainya mazari II 20 II 
asuranche sainya sakal I bhakshiti jahali utavel I 
ghantesahit gaja ttakal I shatavadhi bhakshile II 21 II 
ankusha mahat veer sakal I tyansahit hastincha mela I 
ekachi haste gheuni ttakal I mukhi ghali aapulya II 22 II 
mukhi ghaloni chavi stvar I ashvansahit bhakshile veer I 
sarthyansahit ratha apar I bhakshiti zali te kali II 23 II 
 ichaamatre mukh pasari I sainya ghatale mukhantari I 
keshante dharuni zadakari I kitieka te bhakshile II 24 II 
grevete dharuni kitieka I mukhi ghaloni chavile dekha I 
pade ragadoni anek I mariti jahali kshanardhe II 25 II 
urekaroni kityekansi I kali mariti jahali asuransi I 
tyanchi shastrastre vegesi I bhakshan keli sarvhi II 26 II 
asuranche te sainya sarva I marita viranhi takile garva I 
sahasra laksha arva kharva I asankhyant bhakshile II 27 II 
khadgane kitieka marile I kityekkhatvange tadile I 
kanhi dantgre vinashile I sainya mardile sarvahi II 28 II 
aiese dekhoni dhavala chanda I sharavarshava kari prachanda I 
etukyantahi yeuni munda I chakre takili asankhya II 29 II 
kaline vikrala mukha pasaron I chakre gilili sarvahi jana I 
tiche mukhi shobhayman I kaisi disati jahali II 30 II 
jaisi suryachi bimbe anek I ghanodari shobhati dekha I 
punaha kaline pasarunimukha I prachanda haanka maarili II 31 II 
pasarat mukha ativishaala I daadhaa jivhaa bahu vikrala I 
sinhate udavooni tatkaala I chandaavari dhaavinali II 32 II 
keshi dharuniyaa satvara I khadge chedile tyache shira I 
munda dhavalaa yaanatara I chanda padalaa dhekhoni II 33 II 
mundaatenhi khadga maaron I bhumisi paadilaa na lagataa kshana I 
tenvhaa je kaahiurale sainya I ten daahi dishaa palaale II 34 II 
asurdali haahaakaara I tenhaa jaahalaa pralaya thora I 
aso chanda mundaachi shire satvar I gheooni kaali paatali II 35 II 
devichyaa javali yeuna I prachanda attahasekaruni I 
devikaarane te kshani I kaaya bolati jaahali II 36 II 
myaa tuze he chanda munda I pashu maarile pachanda I 
yudhayadni aataa vitanda I shumbha nishumbhaa maarisi too II 37 II 
rushi mhane surathalaaguni I ti chanda mundachi shire paahuni I 
tayaa kaaliprati tatkshani I devi bolati jahali II 38 II 
too chanda mundate maaruni I tyachya shiraate gheuni I 
yeti jaahalis mhanoni I chamunda he nam tuze II 39 II 
yaa tihi lokaanche taayi I too chaamundaa naame paahi I 
vikhyaata houni tuja sarvahi I aaraadhitila nischaye II 40 II 
aisaa praapta hotaa vara I kaalisi aananda houni thora I 
svayan mukhe jayajayakaara I kariti jaahali te kaali II 41 II 
aso yaa prakaarekarun I devine kaalite karuni utpanna I 
chanda mundaache karavile hanana I henchi kathana kele tumhaa II 42 II 
aataa pudhila adhyaayi nirupana I raktabijaache karila hanana I 
 te haritra atirasaala jaana I shrotejana parisaa ho II 43 II 
moola shlokanchaa sarva artha I yethe varnilaa yathaartha I 
praapta hoya icchitaartha I yaachyaa shravanapathane pai II 44 II 
bhaktivinamra deha karun I je sadaa kariti devismaran I 
tyanchya sarva aapadaa nirasoon I jaato kshanamaatra na laagataa II 45 II 
aise vyaasaache he vacana I yethe sanshaya gheila kona I 
pari paahije bhakti nirvaana I ananyabhaavekaruniyaa II 46 II 
smaranmaatre sankat jaaya I maga charitre kaichaa apajaya I 
shravana pathane hoya jaya I bhaava dharaavaa aavadi II 47 II 
devine jaise bolavile I taisechi yethe varnana kele I 
sajjani paahije parisile I krupaa karuni sarvadaa II 48 II 
tyaa devikaarane namaskaar I aamuche asota vaaramvaara I 
devichaa haa grantha karanaara I nimitta raama dvija jaanaa II 49 II 
II iti shrimaarkandeya puraane saavarnike manvantare 
devibhagavatimaahaatmye mahaasarasvatyaakhyaane 
chandamundavadha naama saptmodhyaayaha II 
II shrijagadambaarpanamastu II
Meaning in short of the Adhyay 7 
The holy story of Goddess Mahalaxmi is being told by Medha Rushi to king Surath. Demon king Shumbha sent his caption Chanda and Munda on the battlefield to fight with Goddess Mahalaxmi and to kill her or bring alive to Shumbha. Chanda and Munda came with a large army. Goddess was sitting on a lion. She was holding Ban, Musal, Shankha, Chakra, Shool, Dhanus, Ghanta and Langal weapons in her hands. Demons started the war with a very furious attack. they were making tremendous noice. Goddess became very angry and Goddess Kali was created by her from her forehead. Kali was black and holding many weapons in her hands. She was wearing a graland of the heads of demons around her neck. She was wearing tigers skin around her body. Her voice was very loud which was making fear in the minds of demons. She was very tall and strong. She entered in the army of demons; killed many demons along with elephants and horses by putting them in her large mouth. Finally she killed Captions Chand and Munda and brought their heads to the Goddess Mahalaxmi. Goddess blessed her and told her that people will call her by the name Chamunda, since she killed Chanda and Munda. Devotees who will read this chapter all their troubles will be vanished and all their desires will be fulfilled by the blessings of Goddess Chamunda.

DeviMahatmya Adhyay 7 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (७) सातवा


Custom Search

Friday, December 26, 2014

DeviMahatmya Adhyay 6 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (६) सहावा


DeviMahatmya Adhyay 6 
DeviMahatmya Adhyay 6 is in Marathi. It is translation of Durga SaptaShati Adhyay 6 which is in Sanskrit, very nicely done by Shri Rambaba Vernekar. Goddess Saraswati killed very dangerous demon Doomralochan. Doomralochan was with a very large army of dangerous demons but many were killed by Goddess and Lion.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (६) सहावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
मेधा म्हणे सुरथासी । मार्कंडेय सांगे शिष्यासी ।
सूत सांगे शौनकासी । पुढील कथा श्रवण करा ॥ १ ॥
सिंहावलोकनेकरुन । पहा मागील अनुसंधान ।
महासरस्वतीनें प्रतिज्ञावचन । दूता सांगोन आज्ञापिले ॥ २ ॥
ऐकोनि देविच्या वाक्यासी । दूत क्रोधावला मानसीं ।
त्वरें येऊनि शुंभापाशीं । सांगता जाहला विस्तारें ॥ ३ ॥
म्हणे मी देवीपाशीं निश्र्चित । तुमचा महिमा वर्णिला बहुत । 
परी ती तुंम्हां नाहीं मानीत । युद्धावीण सर्वथा ॥ ४ ॥
ऐकोनि दूताचें वचन । दैत्यराज क्रोधावला दारुण ।
सेनापती धूम्रलोचन । यासी बोलता जाहला ॥ ५ ॥
शुंभ म्हणे धूम्रलोचना । घेऊनियां आपुली सेना ।
आणावी ती दुष्ट ललना । केशाकर्षणेंकरुनी ॥ ६ ॥
बळें टाका विव्हळ करुनी । तिचा पाठीराखा आलिया कोणी ।
त्यातेंही तत्काल वधावें शस्त्रांनी । देव अथवा गंधर्व ॥ ७ ॥
इंद्र अग्नि यम कुबेर । यक्ष किन्नर विद्याधर ।
पाठिराखा असेल साचार । तरी त्याचाही वध करावा ॥ ८ ॥
मेधा म्हणे सुरथालागून । ऐसा शुंभे आज्ञापिला जाण ।
तेव्हां तो धूम्रलोचन । त्वरेंकरुन निघाला ॥ ९ ॥
घेऊनि साठ सहस्त्र असुर । तो धूम्रलोचन महाक्रूर ।
हिमवंत पर्वत थोर । येता जाहला तयापरी ॥ १० ॥
पालाणोनि सर्व दळ । तो पर्वत वेढिला सकळ ।
तैं एकचि जाहला हलकल्लोळ । देव पाहती अंबरी ॥ ११ ॥
गुप्तरुपें तेथें राहून । इंद्रादि सर्व देवगण ।
जगदंबेचें कौतुक पूर्ण । पाहते जाहले ते काळीं ॥ १२ ॥
देवीसन्मुख धूम्रलोचन । येऊनि अट्टहास शब्द करुन ।
उच्चस्वरें देवीलागून । बोलतां जाहला तेधवां ॥ १३ ॥
म्हणे हो तूं लावण्यराशी । चालावें शुंभनिशुंभांपासीं ।
जरी प्रीतीनें तूं न येसी । तरी बळेंचि नेईन मी ॥ १४ ॥
केशाकर्षणेंकरुन । तूंते ओढूनि नेईन ।
आपुला स्वामी दाखवीन । तुजलागीं सुंदरी ॥ १५ ॥
तेव्हां जगदंबा बोले त्याला । दैत्येश्र्वरानें धाडिलें तुजला ।
बळवंत दिसतोसी भला । सैन्य घेऊनि आलासी ॥ १६ ॥
जरी बळेंकरुनि नेशील । तरी ही स्त्री काय करील । 
ऐसी चंडिका तये वेळ । ऋषि म्हणे बोलिली ॥ १७ ॥
ऐकोनि चंडिकेच्या बोला । धूम्रलोचन तेव्हां धांवला ।
तंव देवीनें भस्म केला । हुंकारमात्रेकरुनी ॥ १८ ॥
देवीच्या हुंकारेंकरुन । भस्म होतां धूम्रलोचन ।
असुरसैन्य कोपायमान । होतें जाहलें तें काळीं ॥ १९ ॥
साठ सहस्त्र असुर । भयंकर महाक्रूर । 
धांवते जाहले देवीवर । अट्टहासेंकरुनियां ॥ २० ॥
मारा मारा कोणी म्हणती । मेधाऐसी गर्जना करिती ।
कोणी वृक्ष पाषाण टाकिती । देवीवरी अतिक्रोधें ॥ २१ ॥
शस्त्रें टाकिते जाहले बहुत । देवीवरी असुर धांवत ।
यावरी चंडिका काय करीत । क्रोध पावूनि ते काळीं ॥ २२ ॥
धनुष्या जोडोनि तीव्र शर । निवारिला शस्त्रनिकर । 
वृक्ष पाषाण थोर थोर । छेदूनियां पाडिले ॥ २३ ॥
शक्तिपरशुपट्टीशांही । खंडविखंड करुनि सर्वही ।
असुरसैन्य पाडिलें पाहीं भूमीवरी तेधवां ॥ २४ ॥
तंव देवीवाहन अतुर्बळी । सिंह पिंजारी रोमावळी ।
गर्जना करुनि निराळीं । उरलियांतें मारीतसे ॥ २५ ॥
तेणें करप्रहारें देख । असुर मारिले कित्येक ।
पुच्छप्रहारें अनेक । मारुनि टाकिता जाहला ॥ २६ ॥
मुखें आणि वेगेंकरुन । तैसेचि अधरें घेतले प्राण ।
नखेंकरुनि उत्पाटण । करिता जाहला असुरांचे ॥ २७ ॥
मारुनि तलप्रहारासी । छेदिता होय असुरशिरांसी ।
छिन्नभिन्न अवयवांसी । करुनि रक्त प्राशीतसे ॥ २८ ॥
ऐसें सिंहाचें महाबळ । क्षया नेले असुर सकळ ।
हें श्रवण करोनि तत्काळ । शुंभ कोपातें पावला ॥ २९ ॥
देवीने वधिला धूम्रलोचन । केवळ हुंकारमात्रेकरुन । 
टाकिलें सर्व सैन्य मारुन । एकही क्षण न लागतां ॥ ३० ॥
ऐसें शुंभ-निशुंभीं ऐकूनी । क्रोधें संतप्त जाहले मनीं ।
रागें ओष्टपुटें चावूनी । विचार करिते जाहले ॥ ३१ ॥
चंड मुंड महाअसुर । त्यांते आज्ञापी शुंभासुर । 
तुम्ही सैन्य घेऊनि अपार । सिद्ध व्हावें आतांचि ॥ ३२ ॥
आणि हिमाचळीं जाऊन । देवीचे करा केषाकर्षण ।
ओढोनि आणावी बांधोन । मजपाशीं ये काळीं ॥ ३३ ॥
जरी युद्धाचे ठायीं जाण । तुम्हांसी संशय होईल पूर्ण ।
तरी त्याचि ठायी मारुन । टाकावी ही ममाज्ञा ॥ ३४ ॥
सर्वानीं शस्त्रास्त्रेंकरुनी । मारुनि टाकावी भवानी ।
माझा संशय कांहीं मनीं । धरुं नये सर्वथा ॥ ३५ ॥
करावें सिंहाचे हनन । जो असे देवीवाहन ।
तुम्ही सैन्यासहित जाण । देवी एकटी ते काय ॥ ३६ ॥
सिंहपशूचा बडिवार । कायसा तुम्हांहूनि थोर ।
तुम्ही देवादिकांसी अनिवार । क्षणें सिंह मारावा ॥ ३७ ॥
देवीसी मारिलिया स्पष्ट । सिंह वधिला असतां दुष्ट ।
आम्ही तुम्हांवरी संतुष्ट । होऊं हें जाणा निर्धारें ॥ ३८ ॥
ती धरिली अथवा मारिली तेथें । परी बांधोनि आणा तिज येथें ।
आम्ही पाहूं अंबिकेतें । कैसी स्त्री आहे ती ॥ ३९ ॥
धूम्रलोचन महावीर । हुंकारें मारिला जिनें सत्वर ।
तिचा देह कैसा दुर्धर । पाहूं आम्ही कौतुकें ॥ ४० ॥
श्रोती व्हावें सावधान । आतां पुढील अध्यायीं जाण ।
चंड-मुंडाचे हनन । तुम्हां सांगेन निर्धारे ॥ ४१ ॥
श्र्लोकश्र्लोकाचा अर्थ । येथें वर्णिला यथार्थ ।
श्रवण करितां होय स्वार्थ । सर्व पुरुषार्थ साधती ॥ ४२ ॥
तैसेचि भावें पठण करिता । सर्व सिद्धि होय तत्त्वतां ।
अंती पावे सायुज्यता । यासी संशय नसे पैं ॥ ४३ ॥
हें महासरस्वतीचें आख्यान । सुरथा सांगे मेधा ब्राह्मण ।
तीच कथा देवी आपण । राममुखे निरुपी ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने षष्ठोऽध्यायः ॥
DeviMahatmya Adhyay 6 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (६) सहावा
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥


Custom Search

Wednesday, December 24, 2014

DeviMahatmya Adhyay 5 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (5) पांचवा


DeviMahatmya Adhyay 5 
DeviMahatmya Adhyay 5 is in Sanskrit. Name of this Adhyay is devyavtarDootSamvadNirupanam. It means that Devi avatar namely Mahasaraswati is described in this adhyay and then discussion between Goddess Mahasaraswati and doot of demon king Shumbha is described in this adhyay.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (5) पांचवा
श्रीगणेशाय नमः ॥ 
मेधा म्हणे सुरथराजा । मार्कंडेय सांगे शिष्यवर्गा ।
सूत बोले शौनकादि आचार्या । सावधान परिसावें ॥ १ ॥
आतां महासरस्वतीआख्यान । सांगतो मी तुम्हांलागून ।
हा तिसरा अवतार पूर्ण । नव अध्याय जाणिजे ॥ २ ॥
हें भगवतीचरित्र निश्र्चित । श्रोत्या-वक्त्यांसी करी पुनीत ।
अधिकाधिक तृष्णा वाढत । याच्या श्रवण-पठनाची ॥ ३ ॥
असो पूर्वी शुंभ-निशुंभ असुर । दोघे दायाद महाक्रूर ।
देवांचे शत्रु अनिवार । पराक्रमी जाहले ॥ ४ ॥
संग्रामीं शोभतो म्हणोन । शुंभ ऐसें नामाभिधान ।
त्याहूनि जो अत्यंत शोभायमान । निशुंभ म्हणती तयासी ॥ ५ ॥
ते कामरुपी दोघे असुर । त्याहीं त्रैलोक्य जिंकिलें सत्वर ।
जिंकोनियां देवनिकर । यज्ञभाग घेतले ॥ ६ ॥
दोघांनीं करुनियां शौर्य । घेतलें देवांचें सकल ऐश्र्वर्य ।
तेव्हां संग्रामीं सांडोनि धैर्य । देव पळते जाहले ॥ ७ ॥
इंद्र वायु यम कुबेर । धायीं केले सर्व जर्जर ।
कुबेराचे निधि सत्वर । हिरोनियां आणिले ॥ ८ ॥
सांडोनि ऐश्र्वर्याची आशा । देव पळाले दशदिशां ।
प्राप्त जाहली दुःखदशा । कोणासी ती सांगावी ॥ ९ ॥
प्रतापी ते दोघे असुर । सूर्याचा घेतला अधिकार । 
दोघे सूर्य होऊनि सत्वर । प्रकाशिलें त्रैलोक्या ॥ १० ॥
दोघे चंद्र होऊनि निश्र्चितीं । त्रैलोक्यीं पाडिली चंद्रकांती ।
शुक्ल कृष्ण पक्षस्थिती । करिते जाहले निजांगे ॥ ११ ॥
वायूचा अधिकार चालविला । तैसाचि पर्जन्यही पाडिला ।
यथाकाळीं वर्षो लागला । जनइच्छेकरुनियां ॥ १२ ॥
अग्नीचें कर्म चालविले । त्रैलोक्याचें राज्य घेतलें ।
दिक्पाळ ते पळोनि गेले । अधिकार सांडोनियां ॥ १३ ॥
वरुणाचा घेऊनि अधिकार । सप्त समुद्र केले आज्ञाधर ।
काळाचाही दंड सत्वर । हिरावूनि घेतला ॥ १४ ॥
ऐसें राज्य करितां दैत्यपाळ । कांहीं निघोनि गेला काळ ।
तेव्हां देव मिळोनि सकळ । स्मरते जाहले देवीतें ॥ १५ ॥
तिनें पूर्वी आम्हां वर दिधला । तुम्ही स्मराल जेव्हां मला ।
संकटीं पावेन तुम्हांला । दुःख नाशीन तत्क्षणीं ॥ १६ ॥
देवीचा वर आणोनि मनीं । मग सर्वाहीं विचार करोनि ।
हिमपर्वतालागोनी । येते जाहले ते काळीं ॥ १७ ॥
सर्व बद्धांजली होऊन । करिते जाहले साष्टांग नमन ।
अष्टभावांते पावोन । स्तवन करिती देवीचें ॥ १८ ॥
कंप रोम वैवर्ण्य स्वेद । स्तंभ रोदन कंठ गद्गद ।
नृत्य-गायनादि आनंद । अष्टही भाव जाणिजे ॥ १९ ॥
पाद जानु उत कर शिर । हीं भूमीसी लावूनि सत्वर ।
मन दृष्टीसीं स्वरुपीं धर । मंत्र वाचेनें वदावा ॥ २० ॥  ऐसें साष्टांग नमस्कार । करुनि देवीसी अपार ।
स्तविते जाहले सुरवर । बद्धांजलि होऊनियां ॥ २१ ॥
पूर्वी म्हणोनि दिव्य मंत्र । मग आरंभिते जाहले स्तोत्र ।
त्याचि मंत्राचा अर्थ पवित्र । प्रथम तुम्हांसी सांगतो ॥ २ २ ॥
मंत्र भावार्थ-
देव होऊनि नम्र बहुत । अनन्यभावें स्तवन करीत ।
म्हणती नमूं देवी तुजप्रत । महादेवी तुज नमो ॥ २३ ॥
तैसेंचि शिवें तूतें जाण । सतत असो आमुचें नमन ।
नमो प्रकृति भद्रे तुजलागून । सर्वनामे नमो नमः ॥ २४ ॥
हा मंत्र प्रथम योजून । करितां षोडशोपचारें पूजन ।
श्रीजगदंबा होय प्रसन्न । भक्तांकारणें संतोषे ॥ २५ ॥
अथवा जे हिरण्यसूक्त । त्याच्या प्रतिमंत्रे निश्र्चित ।
यथाविधि जे पूजा करीत । षोडश उपचार अर्पूनी ॥ २६ ॥
तयांसी देवी प्रसन्न होत । मानसीं इच्छिलें तें तें देत ।
साधती चारही पुरुषार्थ । ऋद्धि सिद्धि सर्वही ॥ २७ ॥
ऐसें मंत्रसिद्धिफल सांगोन । आतां त्याचा स्पष्टार्थ वदेन ।
ती सर्वांतें प्रकाशक म्हणोन । देवी म्हणती तिजलागीं ॥ २८ ॥
सर्व देवांहूनि वरिष्ठ । वास्तव महादेवी नाम श्रेष्ठ ।
शिवाची पत्नी असे स्पष्ट । शिवा नाम म्हणोनी ॥ २९ ॥
ही सर्वांतें उत्पन्न करीत । म्हणोनि प्रकृतिनाम निश्र्चित ।
भद्र म्हणजे कल्याण होत । भद्रा नामेंकरुनी ॥ ३० ॥
तुझ्या या सर्व नामेंकरुन । तुजकारणें आमुचें नमन ।
प्रतिनाममंत्र जपोन । नमस्कार असो सर्वदा ॥ ३१ ॥
मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ । आतां स्तोत्राचा ऐका भावार्थ ।
श्रवणपठणें कृतार्थ । श्रोत्यावक्त्यांसी करी जो ॥ ३२ ॥
स्तोत्रार्थः
रौद्रा नित्या गौरी धात्री । ज्योत्स्ना चंद्ररुपिणी सर्वत्री ।
सुखा कल्याणजनयित्री । ऋद्धि सिद्धि तुज नमो ॥ ३३ ॥
निर्ऋति पर्वतशोभा शर्वाणी । दुर्गा दुर्गपारा सारा भवानी ।
ख्याती कृष्णा धूमा सर्वकारिणी । अतिसौम्या तुज नमो ॥ ३४ ॥
अतिरौद्रा जगत्प्रतिष्ठा । देवी कृति सर्ववरिष्ठा ।
तुज नमो तूं सर्वश्रेष्ठा । प्रतिनामीं तुज नमो ॥ ३५ ॥
सर्व भूतांचे ठायीं जाण । जी विष्णुमाया म्हणती पूर्ण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ३६ ॥
जी सर्व भूतांचे ठायीं । चेतना ऐसें म्हणती पाहीं ।
तिजकारणें लवलाहीं । नमस्कार असोत सर्वदा ॥ ३७ ॥
जी जगदंबा सर्व भूतीं । बुद्धिरुपें असे निश्र्चितीं ।
तिजकारणें नमस्कृती । प्रतिमंत्रीं असो कीं ॥ ३८ ॥
जी सर्व भूतीं निरंतर । निद्रारुपें राहिली स्थिर ।
तिजकारणें नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ३९ ॥
जी चंडिका सर्व भूतीं । क्षुधारुपें जाहली राहती ।
त्या देवीकारणें निश्र्चितीं । नमस्कार आमुचे सर्वदा ॥ ४० ॥
जी सर्व भूतांचे ठायीं जाण । छायारुपें राहिली आपण ।
त्या देवीप्रती नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ४१ ॥
जी सर्व भूतीं पाहें । शक्तिरुपें राहिली आहे ।
तिजकारणें नमस्कार हे । आमुचे असोत सर्वदा ॥ ४२ ॥
सर्व भूतीं जी चंडिका । तृष्णारुपें असे देखा ।
तिजकारणें असोत कां । नमस्कार आमुचे सर्वदा ॥ ४३ ॥
जी राहिली सर्व भूतीं । रुप धरोनियां क्षांती ।
नमस्कार अनेक तिजप्रती । आमुचे असोत सर्वदा ॥ ४४ ॥
जीं सर्व भूतीं सतत । जातिरुपें स्थिर वर्तत ।
तीतें आमुचे निश्र्चित । नमस्कार असोत सर्बदा ॥ ४५ ॥
जी सर्व भूतमात्रीं जाण । लज्जारुपें राहिली आपण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ४६ ॥
जी सर्व भूतांचे ठायीं । शांतिरुपें असे पाहीं ।
तिजकारणें सर्वदाही । नमस्कार असोत आमुचे ॥ ४७ ॥
सर्व भूतीं निरंतर । जी श्रद्धारुपें असे स्थिर ।
त्या देवीसी नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ४८ ॥
जी सर्व भूतीं समान । कांतिरुपें असे जाण ।
त्या देवी भगवतीतें नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ४९ ॥
जी लक्ष्मीरुपें राहिली । सर्व भूतांचे ठायीं संचरली ।
त्या देवीसी असो वहिली । नमस्कृति आमुची सर्वदा ॥ ५० ॥
जी सर्व भूतीं चराचर । वृत्तिरुपें असे स्थिर ।
तिजकारणेम नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ५१ ॥
जी सर्व भूतांचे ठायीं जाण । स्मृतिरुपें राहिली आपण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचे असो सर्वदा ॥ ५२ ॥
जी सकल भूतीं सतत । दयारुपें असे वसत ।
त्या देवीसी निश्र्चित । नमन असो सर्वदा ॥ ५३ ॥ 
जी सर्व भूतीं पाहें । तुष्टिरुपें राहिली आहे ।
त्या देवीसी लवलाहें । नमस्कृति आमुची ॥ ५४ ॥
जीं सर्व भूती स्थिर । राहे मातृरुपें निरंतर ।
तिजकारणे नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ५५ ॥
जी सर्व भूतीं आपण । भ्रांतिरुपें राहिली पूर्ण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचे असो सर्वदा ॥ ५६ ॥
सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री । भूतव्याप्त देवी जनयित्री ।
चितिरुपें व्यापिली सर्वत्रीं । तिजप्रति नमो नमः ॥ ५७ ॥
अभीष्ठा संश्रयेंकरुन । पूर्वी देवांनीं स्तविली जाण ।
तैसीचि इंद्रानें सर्वदिनीं पूर्ण । सेविली ती शुभ करो ॥ ५८ ॥
ती शुभहेतु ईश्र्वरी जाण । करो आमुचें शुभ कल्याण ।
सर्व आपदांचें निरसन । करो क्षण न लागतां ॥ ५९ ॥
आतां दैत्यतापेंकरुन । तप्त होऊनि केलें नमन ।
तरी येचि क्षणीं येऊन । सर्व दुःखें निवारीं ॥ ६० ॥
मेधा ऋषि म्हणे सुरथा । देव ऐसें स्तवीत असतां ।
जान्हवीस्नाना तत्वतां । पार्वती तेथें पातली ॥ ६१ ॥
ती बोलती झाली सुरांते । तुम्ही येथें स्तवितां कोणातें ।
तों तिच्या देहापासूनि त्वरितें । स्त्री एक उत्पन्न जाहली ॥ ६२ ॥
तीच महासरस्वती जाण । पार्वतीच्या देहापासून । 
अवतार तिसरा घेऊन । बोलती जाहली तियेतें ॥ ६३ ॥
म्हणे पार्वती ऐक निश्र्चिती । देव हे माझें स्तवन करिती ।
शुंभनिशुंभांनी रणक्षितीं । पराभविलें म्हणोनियां ॥ ६४ ॥
शरीरकोशापासूनि जाहली । म्हणोनि ' कौशिकी ' नाम पावली ।
तिहीं लोकीं गाइयेली । शिवा म्हणोनि सर्वथा ॥ ६५ ॥
ऐसी कौशिकी होतां उत्पन्न । पार्वती जाहली कृष्णवर्ण ।
यास्तव ' कालिका ' नाम पावून । हिमपर्वती राहिली ॥ ६६ ॥
त्यानंतर महासरस्वती । दिव्य रुप जाहली धरिती ।
त्रैलोक्यीं दुजी स्त्री निश्र्चितीं । तैसी नाहीं पाहतां ॥ ६७ ॥
ती रतीहूनि मनोहर । कोटिगुणें असे सुंदर ।
तेव्हां चंड मुंड महाअसुर । पाहते जाहले तियेतें ॥ ६८ ॥
शुंभ-निशुंभांचे श्रेष्ठ । जे भृत्य असती महावरिष्ठ ।
देवीतें पाहूनियां स्पष्ट । सांगते जाहले शुंभासी ॥ ६९ ॥
राजा अत्यंत सुंदर । स्त्रीरत्न असे मनोहर ।
हिमवंत पर्वत थोर । तयावरी पाहिलें ॥ ७० ॥
जिच्या स्वरुपाची कांती । दाही दिशां पडली दीप्ती ।
हिमवंत पर्वत निश्र्चितीं । शोभविला तियेनें ॥ ७१ ॥
कोणाची ती आहे कोण । हें न कळे वर्तमान । 
ऐसें सुंदर स्त्रीरत्न । दुजें नाहीं त्रैलोक्यीं ॥ ७२ ॥
ती कोण आहे हे जाणोन । अवश्यमेव करावें ग्रहण ।
त्या स्त्रीरत्नावांचूनि जाण । सर्वही रत्नें व्यर्थ तुझी ॥ ७३ ॥
जीं रत्नें त्रैलोक्यीं असती । मणिगजाश्र्वादि निश्र्चितीं ।
तीं सर्व तुझे गृहीं शोभती । सांप्रतकाळीं दैत्येंदा ॥ ७४ ॥
आणिलें त्वां इंद्रापासून । ऐरावत हें गजरत्न ।
पारिजातक तरुही जाण । उच्चैःश्रवा हव तैसा ॥ ७५ ॥
ब्रह्मदेवाच्रें अत्युद्भुत । विमानरत्न आणिलें येथ ।
हंसयुक्त जें कां तिष्ठत । तवांगणी दैत्येंद्रा ॥ ७६ ॥
जिंकोनि त्वां कुबेराला । महापद्मनिधि आणिला ।
किंजल्किनी अम्लानमाला । तुज दिधली समुद्रें ॥ ७७ ॥
पंकजमाला शोभिवंत । जी कधींच नाहीं सुकत ।
सदा राहे टवटवीत । ती गळां घातली आपुल्या ॥ ७८ ॥
वरुणाचें छत्र हें जाण । तुझे गृहीं असे आपण ।
सर्वदा ज्यापासून सुवर्ण- । वृष्टि होत असे कीं ॥ ७९ ॥
दक्षप्रजापतीचा उत्कृष्ट । रथांमध्ये जो रथ श्रेष्ठ ।
तुज प्राप्त जाहला स्पष्ट । जो वरिष्ठ सर्वांहूनी ॥ ८० ॥
मृत्यूची उत्क्रांति देणार । ऐसी आणिली त्वां शक्ति दुस्तर ।
वरुणाचा पाश सत्वर । तव बंधूनें आणिला ॥ ८१ ॥
नाना रत्नजाति अपार । समुद्रीं निघाले त्यांचे निकर ।
निशुंभें आणोनि सत्वर । आपुल्या गृहीं सांठविल्या ॥ ८२ ॥
शुद्ध आणि नित्यनूतन । अग्नीऐसें तेजायमान । 
वस्त्रद्वय हें तुजलागून । अग्नि देता जाहला ॥ ८३ ॥
या प्रकारें त्वां दैत्यवरा । सर्व रत्नें आणिलीं घरा ।
स्त्रीरत्नांमध्यें ही सुंदरा । घरा कां हो नाणिसी ॥ ८४ ॥
मेधा म्हणे सुरथाप्रती । त्या चंड-मुंडांची वचनोक्ती ।
शुंभें ऐकोनि निश्र्चितीं । काय करिता जाहला ॥ ८५ ॥
सुग्रीव नामें महाअसुर । सर्व दूतांमध्यें चतुर ।
त्यातें पाठविता होय सत्वर । बोधोनि आणाया तिजलागीं ॥ ८६ ॥
शुंभ म्हणे सुग्रीवालागून । त्वां हिमपर्वतीं जाऊन ।
ऐसें ऐसें बोल कीं वचन । जेणें वश होय आम्हां ती ॥ ८७ ॥
या माझ्या वचनेंकरुन । त्वां तीस बोधिलें असतां जाण ।
स्वयमेव प्रीती धरुन । मजजवळी येईल ती ॥ ८८ ॥
या प्रकारें वचनोत्तरीं । त्वां कार्य करावें सत्वरीं ।
ऐसें बोलोनि तो झडकरी । पाठविला रायानें ॥ ८९ ॥
तों शोभिवंत हिमपर्वत । सुग्रीव तेथें गेला त्वरित ।
जेथें देवी होती निश्र्चित । तेथे सवेंचि पातला ॥ ९० ॥
नम्र मंजुळ मधुर वाणी । बोलता जाहला देवीलागुनी ।
म्हणे ऐक तूं कल्याणी । दूत मी येथें आलों असे ॥ ९१ ॥      
त्रैलोक्याचा चराचर । जो सर्व दैत्यांचा ईश्र्वर ।
शुंभनामा राजेश्र्वर । त्याचा दूत असें मी ॥ ९२ ॥
तेणें पाठविलें पाहीं । यास्तव पातलों या ठायीं ।
तुझ्यासमीप लवलाहीं । त्याचें वाक्य सांगतो ॥ ९३ ॥
तो जें बोलिला असे वचन । तें मी सांगतों तुजलागून ।
देवयोनीचे ठायीं जाण । माझी आज्ञा सर्वत्रीं ॥ ९४ ॥
ब्रह्मादिक जे सुरवर । ते माझे असती किंकर ।
समस्त माझे आज्ञाधर । मम वचनें वर्तती ॥ ९५ ॥
म्यां सकळ देव जिंकिले । त्रैलोक्य आपुलेंसें केले ।
देव माझे स्वाधीन जाहले । यज्ञभाग मी सेवीं ॥ ९६ ॥
या त्रैलोक्याचे ठायीं जाण । जें जें असे श्रेष्ठ रत्न ।
तें तें माझे गृहीं येऊन । शोभतें जाहले सर्वही ॥ ९७ ॥
पहा गजरत्न ऐरावतच । सर्व जगांत श्रेष्ठ निश्र्चित ।
देव मिळोनियां समस्त । उच्चैःश्रवा अर्पिला ॥ ९८ ॥
तैशींच देवगंधर्वाचे ठायीं । सर्प-दानव-देवगृहीं ।
जीं वस्तुरत्नें सर्वही । तीं माझीच असती निर्धारें ॥ ९९ ॥
सर्व रत्नांमध्यें वरिष्ठ । तूं स्त्रीरत्न अससी श्रेष्ठ । 
ऐसें आम्ही मानितों स्पष्ट । तरी आतां एक करीं ॥ १०० ॥
रत्नभोक्ते आम्ही बरवे । यास्तव त्वां आम्हांसी वरावें ।
आम्ही तुजलागीं सेवावे । हेंचि एक योग्य जनीं ॥ १०१ ॥
मातें अथवा बंधु निशुंभातें । तुजसी योग्य सेवनातें ।
आम्हांवांचूनि त्रैलोक्यातें । तुज योग्य कोणी असेना ॥ १०२ ॥
आम्ही पराक्रमी दोघेजण । तूं चंचलापांगी योग्य रत्न ।
माझ्या परिग्रहेंकरुन । सर्व ऐश्र्वर्य पावसी ॥ १०३ ॥
ऐसेम जाणोनि विचार करीं । मजलागीं येऊनि वरीं ।
तूं पट्टमहिषी निर्धारी । प्राणेश्र्वरी होसील ॥ १०४ ॥
मेधा म्हणे सुरथा जाण । दूताचें ऐकोनि भाषण ।
दुर्गा भगवती हांसोन । गंभीर शब्दें वदतसे ॥ १०५ ॥
जियेच्या इच्छामात्रेंकरुन । ब्रह्मादिक जाहले उत्पन्न ।
उत्पत्ति संहार पालन । धारण करी जगाचे ॥ १०६ ॥
ती जगन्माता भगवती । बोलती जाहली दूताप्रती ।
तूं सत्य बोललासी निश्र्चिती । किंचित मिथ्या नसे कीं ॥ १०७ ॥
त्रैलोक्याचा राजेश्र्वर । तो शुंभ दैत्यपति असे थोर ।
तैसाचि त्याचा बंधु साचार । दोघे समर्थ असती ते ॥ १०८ ॥
परंतु जरी हें मजसी । पूर्वीच समजते वेगेसीं ।
तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी । करुनि गुंतले नसतें कीं ॥ १०९ ॥
पूर्वी अल्पबुद्धी करुन । प्रतिज्ञा मी केली जाण ।
दूता सांगते तुजलागून । उपाय येथें सुचेना ॥ ११० ॥
जो मज युद्धीं जिंकील सत्वर । तोचि करिन निश्र्चयें वर ।
ऐसिया प्रतिज्ञेसी साचार । मिथ्या कैसे करावें ॥ १११ ॥
तस्मात् ते येथे येऊन । शुंभ निशुंभ दोघेजण ।
शीघ्र युद्धीं मज जिंकोन । पणिग्रहण करोत कां ॥ ११२ ॥
दूत बोले चंडिकेतें । व्यर्थ गर्व करिसी त्यांते ।
मजपुढें एकही वाक्यातें । बोलूं नको देवी तूं ॥ ११३ ॥
या त्रैलोक्यामाझारी । शुंभ-निशुंभांचे समरी ।
युद्ध करी ऐसा केसरी । समर्थ कोणी असेना ॥ ११४ ॥
शुंभ-निशुंभांचे सेवक । त्यांचे पुढें राहूं सन्मुख ।
ऐसी शक्ति नाही देख । इंद्रादिकांसी सर्वथा ॥ ११५ ॥
हें काय तुज सांगावें पुन्हां । तूं तंव स्त्री एकटी जाणा ।
इंद्रादि सर्व देवगणां । दैत्य संग्राम दुस्तर ॥ ११६ ॥
शुंभ-निशुंभांच्या सन्मुख । तूं स्त्री कैसी राहसील देख ।
आतांचि मद्वाक्याचें सुख । मानोनि चाल शुभांगी ॥ ११७ ॥
आतांचि मानेंकरुनि जावें । हें आम्हांसी दिसते बरवें ।
केशाकर्षण करुनि घ्यावें । मग यावें कशाला ॥ ११८ ॥
केशआकर्षणेंकरुन । गेलिया गौरव नसे जाण ।
थोर मरणाहुनि अपमान । ऐसें सर्व ज्ञाते बोलती ॥ ११९ ॥
देवी म्हणे दूतालागून । खराचि बळी शुंभ जाण ।
तैसाचि निशुंभही बळवान । परी काय करुं प्रतिज्ञेसी ॥ १२० ॥
पूर्वी विचार न करितां । प्रतिज्ञा केली म्यां तत्वतां ।
जें होणार तें होवो आतां । दूता जाऊनि सांगें तूं ॥ १२१ ॥
माझ्या प्रतिज्ञेचें निरुपण । जें हें सर्व युद्धकारण ।
आदरे सांगिजे दैत्यालागून । तो जें युक्त तैसें करो ॥ १२२ ॥
श्रोते हो व्हावें सावधान । आतां पुढील अध्यायीं जाण ।
धूम्रलोचनाचें हनन । तुम्हांलागीं कथन करुं ॥ १२३ ॥
गातां ऐकतां हा अध्याय । नाश पावती सर्व अपाय ।
मानसीं इच्छिलें प्राप्त होय । धन-सुत-दारादि सर्वही ॥ १२४ ॥
विद्यार्थियासी विद्याप्राप्ती । रोगियासी आरोग्यस्थिती ।
मुमुक्षूसी मोक्ष निश्र्चितीं । प्राप्त याचेनि होतसे ॥ १२५ ॥
हें महासरस्वतीचें आख्यान । करिता जाहलो तुज कथन ।
तृतीयअवतार उत्पत्ति जाण । दूतसंवादही निरुपिला ॥ १२६ ॥
देवीनें जैसें बोलविलें । तैसेचि येथें वर्णन केलें ।
सज्जनी पाहिजे परिसिलें । कृपा करुनि सर्वदा ॥ १२७ ॥
श्रीभगवतीसी नमस्कार । माझे असोत निरंतर । 
तीच हा ग्रंथ करणार । निमित्त राम निर्धारे ॥ १२८ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने देव्यवतारदूतसंवादनिरुपणं नाम पंचमोऽध्यायः ॥ 

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 5 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (5) पांचवा




Custom Search