Tuesday, December 31, 2013

Surya Kavacha (Marathi) सूर्यकवच (मराठी)


Surya Kavacha (Marathi) 
Surya kavacha is in Marathi. It is a translation of original Sanskrit Surya Kavacha of Yadnyavalkya Rushi. It is a very wonderfully translated by Shri Divakar Anant Ghaisas. We owe him a lot as this is done for all devotees of God Surya. I thank him for this pious stotra.
सूर्यकवच (मराठी) 
॥ सूर्य आत्मा जगतस्तथुष्च ॥ 
श्रीगणेशाय नमः ॥ 
याज्ञवल्क्यप्रणीत । सूर्यकवच संस्कृत । 
तयाचा हा अनुवाद । मराठी ओवींत केलासे ॥ १ ॥ 
अथ ध्यानम् ॥ 
आधी करावें सूर्याचे ध्यान । दिव्य कांति सौभाग्यदान । 
शरीरासी आरोग्य-दान । निज किरणी जो करी ॥ २ ॥ 
मुकुट ज्याचा देदीप्यमान । मकर कुंडले तेज स्फुरण । 
पसरती सहस्र किरण । सूर्यध्यान यापरी ॥ ३ ॥ 
अथ कवचम् ॥ 
भास्कर रक्षो शीर्षासी । अतिद्युति मम ललाटासी । 
दिनमणी तो नेत्रांसी । वासरेश्र्वर कर्णद्वया ॥ ४ ॥ 
धर्मघृणि रक्षो नाकासी । वेदवाहन तो वदनासी । 
मानद रक्षो जिव्हेसी । कंठासी सुरवंदित ॥ ५ ॥ 
प्रभाकर रक्षो खांद्यांसी । जनप्रिय रक्षो वक्षस्थळासी । 
द्वादशात्मा मम पावलांसी । सकलेश्र्वर सर्वांगा ॥ ६ ॥ 
हे सूर्यकवच सद्भावे । भूर्जपत्रावरी लिहावे । 
हातावरी ते बांधावे । तरी सिद्धी लाभती ॥ ७ ॥ 
अभ्यंग स्नान करुनी । म्हणे जो एकाग्र मनी । 
स्वस्थ मने अभ्यासुनी । करील जो चिंतन ॥ ८ ॥ 
तो होईल रोगमुक्त । दीर्घायुष्य तया प्राप्त । 
सुखी आणि तुष्टपुष्ट । याचिया गुणे होईल ॥ ९ ॥ 
याज्ञवल्क्ञांचे जे वचन । अनुवाद तयाचा करुन । 
साधकांसी अर्पणे मन । दिवाकराचे धन्य हो ॥ १० ॥ 
॥ इति श्रीसूर्यकवचं संपूर्णम् ॥ श्रीसूर्यनारायणार्पणमस्तु ॥
श्री दिवाकर अनंत घैसास यांनी भाषांतरींत केलेले हे स्तोत्र त्यांचे आभार मानून भाविकांसाठी प्रस्तुत केले आहे.
Surya Kavacha (Marathi) 
 सूर्यकवच (मराठी)


Custom Search

Monday, December 30, 2013

NarmadAshtakam नर्मदाष्टकम्

NarmadAshtakam 

NarmadAshtakam is in Sanskrit. It is a very beautiful creation of p.p. Adi Shankaracharya. It is a praise of Goddess Narmada maiya. From hundreds of years Narmada maiya is helping Rushies, Munies, Yogis and people for their spiritual development. Maiya also provides life to the people on the bank and also to many fishes, crocodiles and other creatures living in the water and to birds also living in the forests. She is not merely a river for the people in India but really she is a mother to us. Many people and devotees of Narmada Maiya perform Parikrama at least ones in their lifetime to have a divine experience of spirituality present on the banks of Narmada Maiya. The parikrama starts just after end of ChaturMas mainly from or after Tripuri Pournima. Many devotees do this parikrama of about 3500K.m. bare footed. This video is dedicated to all such devotees. 

 नर्मदाष्टकम् 

सबिन्दुसिन्धुसुस्खलत् तरङ्ग भङ्गरञ्जितं द्विषत्सुपापजातजातकारिवारिसंयुतम् । 
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे 
 त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ १ ॥ 
त्वदम्बुलीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकं 
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकम् । 
सुमत्स्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ २ ॥ 
महागभीर नीरपूर पापधूत भूतलं 
ध्वनत्ससमस्त पातकारि दारितापदाचलम् । 
जगल्लये महाभये मृकण्डुसुनूहर्म्यदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ३ ॥ 
गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा 
मृकण्डुसूनुशौनका सुरारिसेविसर्वदा । 
पुनर्भवाब्धि जन्मजंभवाब्धि दुःखवर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ४ ॥ 
अलक्षलक्ष किन्नरामरासुरादिपूजितं 
सुलक्षनीर तीरधीर पक्षिलक्षकूजितम् । 
वसिष्ठसिष्ट पिप्पलादि कर्दमादिशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ५ ॥ 
सनत्कुमार नाचिकेत कश्यपादिषट्पदैः 
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः । 
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ६ ॥ 
अलक्षलक्ष लक्षपापलक्ष सायरसायुधं 
ततस्तु जीवजन्तुतन्तु भुक्तिमुक्तिदायकम् । 
विरश्र्चिविष्णुशङ्कर स्वकीय धामवर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ७ ॥ 
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे 
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे । 
दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ८ ॥ 
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा 
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा । 
सुलभ्य देहदुर्लभं महेंशधाम गौरवम् 
पुनर्भवा न वै नरा विलोकयन्ति रौरवम् ॥ ९ ॥ 
॥ इति श्रीमत् आद्यशङ्कराचार्यविरचितं 
नर्मदाष्टकं सम्पूर्णम् ॥ 
नर्मदाष्टकं मराठी अर्थ: 
१) बिंदूपासून सिंधूपर्यंत अखंड तरंगाकार विनटलेल्या आणि दुष्ट प्रवृत्तीमुळे प्राप्त होणार्‍या जन्मपरंपरेचा नाश करणार्‍या जलाने युक्त अशा तुझ्या चरणकमलांना, कालस्वरुप यमदूतांची भीती हरण करुन रक्षण करणार्‍या देवी नर्मदे, मी नमन करतो. 
२) तुझ्या जलामध्ये विहरणार्‍या दीनदुबळ्या मत्स्यांना, कासवांना आणि जलावर भरारी मारणार्‍या चकवा, घडियाल तसेच हंसआदि पक्षांना दिव्यता प्रदान करणार्‍या, कलियुगांतील महादोषांचा परिहार करणार्‍या सकलतीर्थामध्ये वरिष्ठ अशा तुझ्या पदकमलांना, पुष्कळ मासे, कासवे आणि मगरींच्या समुदायांचे, तसेच चक्रवाक पक्ष्यांचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे मी नमन करतो. 
३) महाप्रचंड पुराने भूतलावरील सारी पापे धुऊन काढणार्‍या आणि घनगंभीर नादाने पातकांच्या राशी आणि पर्वतप्राय संकटे यांचा चक्काचूर करणार्‍या तुझ्या चरणांबुजांना, प्रलयकालीन महाभयाच्यावेळी मार्कण्डेयऋषींना आपल्या ठायी आश्रय देणार्‍या देवी नर्मदे मी नमस्कार करतो. 
४) मार्कण्डेय, शौनक, देवेन्द्र ज्यांचे सदैव सेवन करतात, त्या तुझ्या जलाचे नुसते दर्शन होताच माझे भय कुठल्या कुठे पळून गेले. पुनर्जन्म तसेच संसारसागरांतील दुःखांपासून कवचाप्रमाणे रक्षण करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी नमस्कार करतो. 
५) अगणित किन्नर, देव, आणि असुर ज्यांची पूजा करतात आणि ज्यांच्या तीरावरील लक्षावधी पक्षिगण जलाशय निरखीत धीटपणे अखंड कूजन करीत असतात, त्या तुझ्या चरणकमलांना, मुनीश्रेष्ठ वसिष्ठ, पिप्पलाद, कर्दमप्रभृतींचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी वंदन करतो. 
६) सनत्कुमार, नचिकेत, कश्यप, अत्रि नारदादींनी ज्यांना आपल्या अंतःकरणांत साठविले आहे, त्या तुझ्या सूर्य, चंद्र, अन्तिदेव आणि देवरज इंद्र यांच्या सत्कर्मांना विश्र्वांत प्रतिष्ठित करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पादकमलांना मी नमस्कार करतो. 
७) दृष्टादृष्ट लक्षावधी पातकांच्या राशींचा भेद करणार्‍या, तसेच जीवजंतूंना भोग व मोक्ष देणार्‍या, ब्रह्माविष्णुमहेशांना आपापल्या ठायी सुप्रतिष्ठित करणार्‍या देवी नर्मदे तुझ्या चरणांना मी नमस्कार करतो. 
८) भगवान शंकरांच्या जटेतून निघालेल्या तुझ्या तटावरील किरात, सूत, वाडव, पंडित, शट, नट अशा समस्त जनांच्या मुखी अमृतोपम संजीवक असे नर्मदेचेच नांव ऐकू येते. दुस्तर पापतापांचा नाश करुन सकल जीवांचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे, मी तुझ्या चरणकमलांना नमस्कार करतो. 
९) हे नर्मदाष्टक नेहमी त्रिकाळी जे निरंतर पठण करतात त्यांना कधीही दुर्गति प्राप्त होत नाही. तसेच त्यांना मानवी जन्मांतील अतिदुर्लभ आणि गौरव देणारे महेशधाम प्राप्त झाल्याने ते जन्ममृत्युच्या बंधनांतून मुक्त होतात व रौरवादी नरकाचे दर्शनही त्यांना होत नाही. अशा रीतीने परम पूज्य श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी रचिलेले हे नर्मदाष्टक येथे पुरे झाले.
NarmadAshtakam 
नर्मदाष्टकम्


Custom Search

Friday, December 27, 2013

Shri Gayatri kavacha श्री गायत्री कवच


Shri Gayatri kavacha 
Shri Gayatri Kavacha is in Sanskrit. It has arisen in the conversation in between Brahma Rushi Narad and God Narayan. The kavacha is very pious and it removes all bad sufferings and gives success in the all 16 Kalas and Vidyas. It removes all the sins of devotees who recite\listen the kavacha every day. This kavacha also protects the devotees from all the evil things and their bad effects.
श्री गायत्री कवच
शुचिर्भूत होऊन आसनावर बसावे. ज्याच्यासाठी कवच 
करावयाचे आहे त्याला समोर बसवावे दहा वेळा गायत्री 
जप करावा. ध्यानश्लोकानंतर भस्माने समोरच्या व्यक्तीच्या
अवयवांना स्पर्श करावा. कवच पूर्ण क्षाल्यावर पुन्हा दहा
गायत्री जप करुन आसनावरुन उठावे.
नारद उवाच 
स्वामिन् सर्व जगन्नाथ संशयोऽस्ति मम प्रभो ।
चतुःषष्टिकलाभिज्ञ पातकाद्योगविद्वर ॥ १ ॥
मुच्यते केन पुण्येन ब्रह्मरुपः कथं भवेत् ।
देहश्च देवतारुपो मंत्ररुपो विशेषतः ॥ २ ॥
कर्म तत्  श्रोतुमिच्छामि न्यासं च विधिपूर्वकम् ।
ऋषिछंदोऽधिदेवं च ध्यानं च विधिवत्प्रभो ॥ ३ ॥
नारायण उवाच
पठणात् धारणात्मर्त्यः सर्वपापैः प्रमुच्यते ।
सर्वान्कामानवाप्नोति देवीरुपश्च जायते ॥ ४ ॥
गायत्रीकवचस्यास्य ब्रह्मविष्णुमहेश्वराः ।
ऋषयो ऋग्यजुस्सामाथर्वछंदांसि नारद ॥ ५ ॥
ब्रह्मरुपा देवतोक्ता गायत्री  परमा कला ।
' तत् ' बीजं भर्ग इत्येषा शक्तिरुपा मनीषिभिः ॥ ६ ॥
कीलकं च धियःप्रोक्तं मोक्षार्थे विनियोजयेत् ।
(हाताने या स्थळांना, अवयवांना स्पर्श करावा.)
न्यास
तत्सवितुश्च हृदये वरेण्यं शिरसि न्यसेत् ॥ ७ ॥
भर्गो देवस्य शिखायां कवचे धीमहीति च ।
धियो यो तस्तथा नेत्रे त्वस्त्राय च प्रचोदयात् ॥ ८ ॥
ध्यानम्
मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैः ।
युक्तामिन्दुकलानिबद्धमुकुटां तत्वार्थवर्णात्मिकाम् ॥ 
गायत्री वरदाभयाङकु शकशाशूलं कपालं गुणंम् ।
शंखं चक्रमथारविंद युगुलं हस्तैर्वहन्तीं भजे ॥ ९ ॥
(हातांत भस्म, अक्षर अक्षता घेऊन मंत्राबरोबर त्या त्या
दिशांना टाकाव्यात.)
रक्षा-कवच 
गायत्री पूर्वतः पातु सावित्री पातु दक्षिणे ।
ब्रह्मसंध्या तु मे पश्चादुत्तरायां सरस्वती ॥ १० ॥
पार्वती मे दिशं रक्षेत् पावकीं जलशायिनी ।
यातुधानीं दिशं रक्षेत् यातुधानं भयंकरी ॥ ११ ॥
पावमानीं दिशं रक्षेत् पवमान-विलासिनी ।
दिशं रौद्री च मे पातु रुद्राणी रुद्ररुपिणी ॥ १२ ॥
ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेदधस्तात् वैष्णवी तथा ।
एवं दशदिशो रक्षेत् सर्वांग भुवनेश्वरी ॥ १३ ॥
पदस्पर्श-कवच
तत् पदं पातु मे पादौ जंघे मे सवितुः पदम् ।
रेण्यं कटिदेशे तु नाभिं भर्गस्तथैव च ॥ १४ ॥
देवस्य मे तु हृदये धीमहीति च गल्लयोः ।
धियः पदं च मे नेत्र यः पदं मे ललाटकम् ॥ १५ ॥
न पदं पातु मे मुर्ध्नि शिखायां मे प्रचोदयात् ।
(प्रत्येक अवयवाला भस्म लावावे.)
अक्षरस्पर्श-कवच
तत् पदं पातु मूर्धानं सकारः पातु भालकम् ॥ १६ ॥
चक्षुषी तु विकारार्णः तुकारस्तु कपोलयोः ।
स्कंधरेकास्तु मुखे तथा ॥ १७ ॥
णिकार ऊर्ध्वमोष्ठं तु यंकारस्त्वधरोष्ठकम् ।
आस्यमध्ये भकारार्णो गोंकारश्चुबुके तथा ॥ १८ ॥
देकारः कण्ठदेशे तु वकारः स्कंधदेशकम् ।
स्यकारो दक्षिणं हस्तं धिकारो वामहस्तकम् ॥ १९ ॥
मकारो हृदयं रक्षेत् हिकारः उदरे तथा ।
धिकारो नाभिदेशे तु योकारस्तु कटिं तथा ॥ २० ॥
गुह्यं रक्षतु योकार ऊरु द्वौ नः पदाक्षरम् ।
प्रकारो जानुनी रक्षेत् चोकारो जंघदेशकम् ॥ २१ ॥
दकारोऽगुल्यदेशे तु याकारः पदयुग्मकम् ।
तकार व्यञ्जनं चैव सर्वांगं मे सदाऽवतु ॥ २२ ॥
फलरुपता
इदं तु कवचं दिव्यं बाधाशतविनाशनम् ।
चतुःषष्टिकलाविद्यादायकं मोक्षकारकम् ॥ २३ ॥
मुच्यते सर्वपापेभ्यः परंब्रह्माधिगच्छति ।
पठणाच्छवणाद्वापि गोसहस्त्रफलं लभेत् ॥ २४ ॥ 
(शिल्लक राहिलेले भस्म उत्तरेस फुंकरुन टाकावे.

॥ इति नारद-नारायणसंवादे श्री गायत्री कवचं संपूर्णम् ॥

Shri Gayatri kavacha 
श्री गायत्री कवच


Custom Search

Tuesday, December 24, 2013

Shri SuryaMandalAshtakam श्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम्


Shri SuryaMandalAshtakam 

Shri Surya MandalAshtakam is from AdityaHrudaya. It is a praise of God Surya. It is said in the stotra that SuryaMandal vanishes poverty and sorrow. This mandal of God Surya is tri gunatmakam. Satva, Raj and tama are three gunas found in SuryaMandal. God Brahma, God Vishnu and God Shiva’s virtues are in the SuryaMandal. This Mandal is full of True knowledge. It is destroyers of deceases. It vanish all the sins. This mandal is worshiped by Siddhas, yogis and devotees of God Surya. Any devotee recites this stotra daily would go to Surya Loka and all his sins are destroyed by the blessings of God Surya.


श्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम् 

नमः सवित्रे जगदेकचक्षुषे जगत्प्रसूतिस्थितिनाश हेतवे । 
त्रयीमयाय त्रिगुणात्मधारिणे विरञ्चि नारायण शंकरात्मने ॥ १ ॥ 
यन्मडलं दीप्तिकरं विशालं रत्नप्रभं तीव्रमनादिरुपम् । 
दारिद्र्यदुःखक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ २ ॥ 
यन्मण्डलं देवगणै: सुपूजितं विप्रैः स्तुत्यं भावमुक्तिकोविदम् । 
तं देवदेवं प्रणमामि सूर्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ३ ॥ 
यन्मण्डलं ज्ञानघनं, त्वगम्यं, त्रैलोक्यपूज्यं, त्रिगुणात्मरुपम् । 
समस्ततेजोमयदिव्यरुपं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ४ ॥ 
 यन्मडलं गूढमतिप्रबोधं धर्मस्य वृद्धिं कुरुते जनानाम् । 
यत्सर्वपापक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ५ ॥ 
यन्मडलं व्याधिविनाशदक्षं यदृग्यजु: सामसु सम्प्रगीतम् । 
प्रकाशितं येन च भुर्भुव: स्व: पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ६ ॥ 
यन्मडलं वेदविदो वदन्ति गायन्ति यच्चारणसिद्धसंघाः । 
यद्योगितो योगजुषां च संघाः पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ७ ॥ 
यन्मडलं सर्वजनेषु पूजितं ज्योतिश्च कुर्यादिह मर्त्यलोके । 
यत्कालकल्पक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ८ ॥ 
यन्मडलं विश्वसृजां प्रसिद्धमुत्पत्तिरक्षाप्रलयप्रगल्भम् । 
यस्मिन् जगत् संहरतेऽखिलं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ९ ॥ 
 यन्मडलं सर्वगतस्य विष्णोरात्मा परं धाम विशुद्ध तत्त्वम् । 
सूक्ष्मान्तरैर्योगपथानुगम्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ १० ॥ 
यन्मडलं वेदविदि वदन्ति गायन्ति यच्चारणसिद्धसंघाः । 
यन्मण्डलं वेदविदः स्मरन्ति पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ११ ॥ 
यन्मडलं वेदविदोपगीतं यद्योगिनां योगपथानुगम्यम् । 
तत्सर्ववेदं प्रणमामि सूर्य पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ १२ ॥ 
मण्डलात्मकमिदं पुण्यं यः पठेत् सततं नरः । 
सर्वपापविशुद्धात्मा सूर्यलोके महीयते ॥ १३ ॥ 
॥ इति श्रीमदादित्यहृदये मण्डलात्मकं स्तोत्रं संपूर्णम् ॥

श्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम् मराठी अर्थः 

१) जो जगताचा एकमात्र प्रकाशक आहे, जो या संसाराच्या उत्पत्ति, स्थिति आणि नाशाचे कारण आहे, त्यावेदत्रयी स्वरुपाला सत्व,तम आणि रज या तीन गुणानुसार ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही तीन नावे धारण त्या भगवान सूर्यनारायणाला (माझा) नमस्कार असो. 
२) जो प्रकाशित करणारा, विशाल रत्नांप्रमाणे प्रभावान असणारा, तीव्र, अनादिरुप आणि दारिद्र्य-दुःखाचा नाशक आहे, त्या भगवान सूर्याचे मंडल मला पवित्र करो. 
३) ज्याचे मंडल देवगणांकडून चांगल्या प्रकारे पूजिले जाते, ब्राह्मणांपासून ज्याची स्तुती केली जाते आणि भक्तांना जे मुक्ती देणारे आहे, त्या देवाधिदेव सूर्यभगवानाला मी नमस्कार करतो. त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
४) जो ज्ञानघन, अगम्य, त्रिलोकीपूज्य, त्रिगुणस्वरुप, पूर्णतेजोमय आणि दिव्यरुप आहे, त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
५) जो सूक्ष्मबुद्धिनेच जाणण्यास योग्य आहे आणि संपूर्ण मानवांच्या धर्माची वृद्धि करणारा आहे तसेच जो सर्वांच्या पापांचा नाश करणारा आहे, त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
६) जो रोगांचा नाश करतो, जो ऋक्, यजु आणि साम या तीन वेदांमध्ये सम्यकप्रकारे गायिला गेला आहे, तसेच ज्याने भूः, भुवः आणि स्वः या तीन लोकांना प्रकाशित केले आहे त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
७) वेद जाणणारे लोक ज्याचे वर्णन करतात, चारण आणि सिद्धांचे समुह ज्याचे गायन करतात, योग जाणणारे अणि योगीलोक ज्याचे गुणगान करतात त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
 ८) जो सर्व जनांना पूजनिय आहे, जो मर्त्यलोक प्रकाशित करतो, तसेच जो काल आणि कल्पाच्या क्षयाचे कारण आहे त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
९) जो संसारासृष्टि करणार्‍या ब्रह्मदेवाला ज्ञात आहे, जो संसाराची उत्पत्ति, रक्षण आणि प्रलय करण्यास समर्थ आहे, ज्याच्यामध्ये सर्व जग लीन होते, त्या सूर्यभगवानाचे मला पवित्र करो. 
१०) जो सर्वान्तर्यामी विष्णुभगवानाचा आत्मा तसेच विशुद्ध तत्वाचे परमधाम आहे आणि जो सूक्ष्म बुद्धिवाल्यांकडून योगमार्गाने जाणण्यास योग्य आहे त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
११) वेदांना जाणणारे ज्याचे वर्णन करतात, चारण व सिद्धजन ज्याचे गायन करतात आणि वेदज्ञलोक ज्याचे स्मरण करतात त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
१२) ज्याच्या मंडलाचे वेदवेत्तांकडून गायिले जाते आणि जो योग्यांकडून योगमार्गाने जाणला जातो त्या वेदस्वरुप सूर्य भगवानाला मी नमस्कार करतो. त्या सूर्यभगवानाचे मंडल मला पवित्र करो. 
१३) जो पुरुष या परम पवित्र मण्डलाष्टक स्तोत्राचा नेहमी पाठ करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन सूर्यलोकामध्ये प्रतिष्ठा मिळवितो. 
अशा रितीने आदित्यहृदया मधिल हे मण्डलाष्टक पूर्ण झाले.
Shri SuryaMandalAshtakam 
श्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम्


Custom Search

Saturday, December 21, 2013

Gurucharitra Adhyay 51 गुरुचरित्र अध्याय ५१


Gurucharitra Adhyay 51 
Gurucharitra Adhyay 51 is in Marathi. In this Adhyay ShriGuru has decided now to be in Gangapur secretly. He will not be seen by people though he will be there. His real devotees would be able to see him however others won’t see him. So for all other people he is invisible and gone to his Nijanand (own house). The name of this Adhyay is GuruNijanandgamanam. 
गुरुचरित्र अध्याय ५१ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्योः नमः ॥ 
नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा सांगितली आम्हांसी । 
म्लेंच्छराजानें श्रीगुरुसी । नेलें होतें नगरासी ॥ १ ॥ 
तेथूनि आले गाणगाभुवनासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । 
करुणावचन-अमृतेंसी । श्रीगुरुचरित्र आद्यंत ॥ २ ॥ 
सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । 
ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥ ३ ॥ 
राजाची भेटी घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं । 
योजना करिती आपुल्या मनीं । गौप्य रहावें म्हणोनियां ॥ ४ ॥ 
प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटावयासी । 
उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना याती येतील ॥ ५ ॥ 
म्हणोनि आतां गौप्य व्हावें । लौकिकमतें निघावें । 
पर्वतयात्रा म्हणोनि स्वभावें । निघाले श्रीगुरु परियेसा ॥ ६ ॥ 
गौप्य राहिले गाणगापुरीं । प्रकट दावणें लोकाचारी । 
निघाले स्वामी श्रीपर्वतगिरी । शिष्यांसहित अवधारा ॥ ७ ॥ 
भक्तजन बोळवीत । चिंता करिताति बहुत । 
श्रीगुरु त्यांसी संबोखित । राहविती अतिप्रीतीं ॥ ८ ॥ 
दुःख करिती सकळ जन । लागताति श्रीगुरुचरणा । 
स्वामी आमुतें सोडुन । केवीं जातां यतिराया ॥ ९ ॥ 
तूं भक्तजनांची कामधेनु । होतासी आमुचा निधानु । 
आम्हां बाळकां सोडून । जातां म्हणोन विनविताति ॥ १० ॥ 
नित्य तुझे दर्शनीं । दुरितें जातीं पळोनि । 
जे जे आमुची कामना मनीं । त्वरित पावे स्वामिया ॥ ११ ॥ 
बाळकांते सोडूनि माता । केवीं जाय अव्हेरिता । 
तूंचि आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताति ॥ १२ ॥ 
ऐसें नानापरि विनविती । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति । 
संबोखिती अतिप्रीतीं । न करावी चिंता म्हणोनि ॥ १३ ॥ 
आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं । 
वसों मठीं सदा प्रेमीं । गौप्यरुपें अवधारा ॥ १४ ॥ 
जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांसी प्रत्यक्ष दिसों आम्ही । 
लौकिकमतें आविद्युाधर्मी । जातो श्रीशैल्ययात्रेसि ॥ १५ ॥ 
प्रातःस्नान कृष्णातीरी । पंचनदी-संगम औदुंबरी । 
अनुष्ठान बरवें त्या क्षेत्रीं । माध्याह्नीं येतो भीमातटीं ॥ १६ ॥ 
संगमी स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणी । 
चिंता न करा अंतःकरणी । म्हणोनि सांगती प्रीतिकरें ॥ १७ ॥ 
ऐसें सांगती समस्तांसी । अनुमान न धरा हो मानसीं । 
गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसो आम्ही त्रिवाचा ॥ १८ ॥ 
जे जन भक्ति करिती । त्यांवरी आमुची अतिप्रीती । 
मनःकामना पावे त्वरिती । ध्रुव वाक्य असे आमुचें ॥ १९ ॥ 
अश्र्वत्थ नव्हे हा कल्पवृक्ष । संगमी असे प्रत्यक्ष । 
 जें जें तुमच्या मनीं अपेक्ष । त्वरित साध्य पूजितां ॥ २० ॥ 
कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचे जेथ स्थान । 
 पादुका ठेवितों निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥ २१ ॥ 
विघ्नहर चिंतामणी । त्यांतें करावें अर्चनी । 
चिंतिलें फळ तत्क्षणीं । पावाल तुम्ही अवधारा ॥ २२ ॥ 
समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक । 
अष्टतीर्थे असतीं विशेख । आचरावीं मनोभावें ॥ २३ ॥ 
संतोषकर आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती । 
भक्तजन जें इच्छिती । त्वरित पावे परियेसा ॥ २४ ॥ 
ऐसें सांगोनि तयांसी । निघाले स्वामी श्रीपर्वतासी । 
भक्त परतोनि मठासी । आले चिंतीत मनांत ॥ २५ ॥ 
चिंतीत रिघती मठांत । तेथे दिसती श्रीगुरुनाथ । 
लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रिमूर्ति ॥ २६ ॥ 
यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर । 
सत्य जाणा हो निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥ २७ ॥ 
सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं । 
गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥ २८ ॥ 
दृष्टांत दाखवोनि भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी । 
पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥ २९ ॥ 
शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । 
जाणें असे पैलतीरा । ऐक्य व्हावें मल्लिकार्जुनीं ॥ ३० ॥ 
निरोप देतां श्रीगुरुमूर्ती । आणिलीं पुष्पें सेवंती । 
कमळ कल्हार मालती । कर्दळीपर्ण वेष्टोनि ॥ ३१ ॥ 
आसन केले अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पवित्र । 
श्रीगुरु शिष्यां सांगत । जावें तुम्हीं ग्रामासी ॥ ३२ ॥ 
दुःख करिती सकळी । त्यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी । 
गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न करावा दुजा तुम्हीं ॥ ३३ ॥ 
लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्टांती दिसतों । 
भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥ ३४ ॥ 
ऐेसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथूनि । 
पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥ ३५ ॥ 
' कन्यागतीं ' बृहस्पतीसी । ' बहुधान्य ' नाम संवत्सरेसी । 
सूर्य चाले ' उत्तर-दिगंते ' सी । संक्रांति ' कुंभ ' परियेसा ॥ ३६ ॥ 
' शिशिर ' ऋतु , ' माघ ' मासीं । ' असित पक्ष ' , ' प्रतिपदे ' सी । 
' शुक्रवारीं ' पुण्यदिवशीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥ ३७ ॥ 
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज-मठासी । 
 पावतां खूण तुम्हांसीं । प्रसादपुष्पें पाठवूं ॥ ३८ ॥ 
येतील पुष्पें शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । 
पूजा करावी अखंडिती । लक्ष्मी वसो तुमच्या घरीं ॥ ३९ ॥ 
आणिक सांगेन एक खूण । गायनीं करावें माझें स्मरण । 
त्यांचे घरीं मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥ ४० ॥ 
नित्य जे जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । 
त्यांच्या घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥ ४१ ॥ 
व्याधि नसती त्यांचे घरी । दरिद्र जाय त्वरित दूरी । 
पुत्रपौत्र-श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥ ४२ ॥ 
ऐकती चरित्र माझें जरी । अथवा वाचिती जन निरंतरी । 
लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मानसीं ॥ ४३ ॥ 
ऐसें सांगोनि शिष्यांसी । श्रीगुरु जहाले अदृश्येसी । 
चिंता करिती बहुवसी । अवलोकिताति गंगेंत ॥ ४४ ॥ 
ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं आले नावेकर । 
तेही सांगती विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले म्हणोनि ॥ ४५ ॥ 
शिष्यवर्गाचें मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर । 
होतों आम्हीं पैलतीर । तेथें देखिले मुनीश्र्वरा ॥ ४६ ॥ 
संन्यासी वेष दंड हातीं । नाम ' नृसिंहसरस्वती ' । 
निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगिजे म्हणोनि ॥ ४७ ॥ 
आम्हां सांगितलें मुनीं । आपण जातों कर्दळीवनीं । 
सदा वसो गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥ ४८ ॥ 
भ्रांतपणें दुःख करितां । आम्ही देखिले दृष्टांता । 
जात होतें श्रीगुरुनाथ । सुवर्णपादुका त्यांचे चरणीं ॥ ४९ ॥ 
निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुलाले स्थानासी । 
सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥ ५० ॥ 
प्रसादपुष्पें आलिया । शिष्यें घ्यावीं काढोनियां । 
ऐसें आम्हां सांगोनियां । श्रीगुरु गेले अवधारा ॥ ५१ ॥ 
ऐसें नावेकरी सांगत । प्रसादपुष्पें वाट पहात । 
समस्त राहिले स्थिरचित्त । हर्षे असती निर्भर ॥ ५२ ॥ 
इतुकिया अवसरीं । प्रसादपुष्पें आलीं चारी । 
मुख्य शिष्य प्रीतिकरीं । काढोनि घेती अवधारीं ॥ ५३ ॥ 
नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य ते कोण श्रीगुरुसी । 
विस्तारोनियां आम्हांसी । सांगा पुष्पें कोण लाधले ॥ ५४ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका । 
गाणगापुरीं असतां ऐका । शिष्य गेले आश्रमासी ॥ ५५ ॥ 
आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी । 
त्यांची नामें परियेसीं । सांगेन ऐकें विस्तारें ॥ ५६ ॥ 
कृष्ण-बाळसरस्वती । उपेंन्द्र-माधवसरस्वती । 
पाठविते झाले अतिप्रीतीं । आपण राहिलों समागमें ॥ ५७ ॥ 
गृहस्थधर्मे शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत ।
 त्रिवर्ग आले श्रीपर्वता । आपण होतों चवथावा ॥ ५८ ॥ 
साखरे नाम ' सायंदेव ' । कवीश्र्वर-युग्म पूर्व । 
' नंदी ' नामा, ' नरहरि ' देव । पुष्पें घेतलीं चतुर्वगीं ॥ ५९ ॥ 
श्रीगुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण । 
 तेंचि पुष्प माझें पूजनीं । म्हणोनि पुष्प दाखविलें ॥ ६० ॥ 
ऐसी श्रीगुरुची महिमा । सांगतां असे अनुपम्या । 
थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे ऐकतां ॥ ६१ ॥ 
श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु । 
दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥ ६२ ॥ 
ऐसें श्रीगुरुचें चरित्र । पुस्तक लिहिती जे पवित्र । 
अथवा वाचिती ऐकती श्रोत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥ ६३ ॥ 
धर्म-अर्थ-काम-मोक्ष । त्यासी साध्य होती प्रत्यक्ष । 
महानंद उभयपक्ष । पुत्रपौत्री नांदती ॥ ६४ ॥ 
ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले । 
सकळाभीष्ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥ ६५ ॥ 
म्हणे सरस्वती-गंगाधर । नामधारक लाधला वर । 
लक्ष्मीवंत पुत्र-कुमर । शतायुषी श्रियायुक्त ॥ ६६ ॥ 
श्रीगुरुचरित्र ऐकतां । लाधली सकळाभीष्टता । 
याकारणें ऐका समस्त । श्रीगुरुचरित्र कामधेनु ॥ ६७ ॥ 
अमृताची असे माथणी । स्वीकारावी त्वरित सकळ जनीं । 
धर्मार्थ-काम-मोक्षसाधनीं । हेचि कथा ऐकावी ॥ ६८ ॥ 
पुत्रपौत्रीं ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । 
लक्ष्मी राहे अखंड । श्रवण करी त्या प्राणियां-घरीं ॥ ६९ ॥ 
चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणें परमार्थ । 
श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशी ॥ ७० ॥ 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । 
 कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट लाधे तुम्हां ॥ ७१ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
श्रीगुरुनिजानंदगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥ 
 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 51 
गुरुचरित्र अध्याय ५१


Custom Search

Gurucharitra Adhyay 50 गुरुचरित्र अध्याय ५०


Gurucharitra Adhyay 50 
Gurucharitra Adhyay 50 is in Marathi. In the Ninth Adhyay Guru had blessed a Rajak (Washerman) and assured him that he will give him darshan in his next birth. To fulfil the desire of the rajak who is a Mlencha king in this birth, ShriGuru blesses him and cures him. Name of this Adhyay is Sarvabhoum-Sfotak-Shaman-Aishwarya-Valokanam.
श्रीगुरुचरित्र अध्याय ५० 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । 
पूर्वी रजक-कथानका । तूंतें आपण निरोपिलें ॥ १ ॥ 
त्याणें मागितला वरु । राज्यपद धुरंधरु । 
प्रसन्न झाले त्यासी श्रीगुरु । दिधला वर परियेसा ॥ २ ॥ 
उपजला तो म्लेंच्छयातींत । विदुरानगरीं राज्य करीत । 
पुत्रपौत्रीं अनेक रीतींत । महानंदे परियेसा ॥ ३ ॥ 
ऐसा राजा तो यवन । होता आपण संतोषोन । 
अश्र्व गज अपार धन । पायभारा मिति नाही ॥ ४ ॥ 
आपण तरी यातिहीन । पुण्यवासना अंतःकरण । 
दानधर्म करी जाण । समस्त यातीं एकोभावें ॥ ५ ॥ 
विशेष भक्ति विप्रांवरी । असे पूर्व संस्कारीं । 
असतीं देवालयें भूमिवरी । उपद्रव नेदी तयांसी ॥ ६ ॥ 
त्याचे घरचे पुरोहित । तया रायासी शिकवीत । 
आपण होऊन म्लेंच्छ यात । देवद्विजां निंदावें ॥ ७ ॥ 
त्यातें तुम्ही सेवा करितां । त्याणें अपार दोष प्राप्ता । 
यातिधर्म करणें मुख्यता । पुण्य अपार असे जाणा ॥ ८ ॥ 
मंदमति द्विजयाती । देखा पाषाणपूजा करिती । 
समस्तांते देव म्हणती । काष्ठवृक्षपाषाणासी ॥ ९ ॥ 
धेनूसी म्हणती देव । म्हणती देव अग्नि सूर्य । 
तीर्थयात्रा नदीतोय । समस्तां देव म्हणती देखा ॥ १० ॥ 
ऐसे विप्र मंदमती । निराकारा साकार म्हणती । 
त्यांतें म्लेंच्छ जे भजती । अधोगति पावती ते ॥ ११ ॥ 
ऐसे यवन पुरोहित । रायापुढें सांगती हित । 
ऐकोनि राजा उत्तर देत । कोपेंकरुनि परियेसा ॥ १२ ॥ 
राजा म्हणे पुरोहितांसी । तुम्हीं निरोपिलें आम्हांसी । 
अणुरेणुतृणकाष्ठेंसी । सर्वेश्र्वर पूर्ण असे ॥ १३ ॥ 
समस्त सृष्टि ईश्र्वराची । स्थावर जंगम रचिली साची । 
सर्वत्रासि देव एकचि । तर्कभेद असे मतांचे ॥ १४ ॥ 
समस्त यातींची उत्पत्ति । जाणावी तुम्ही पंचभूतीं । 
पृथ्वी आप तेज वायु रीती । आकाशापासाव परियेसा ॥ १५ ॥ 
समस्तांसी पृथ्वी एक । आणिती मृत्तिका कुलाल लोक । 
नानापरीची करिती ऐक । भांडीं भेद परोपरी ॥ १६ ॥ 
नानापरीच्या धेनु असती । क्षीर एकचि वर्ण दिसे श्र्वेती । 
 सुवर्ण जाणा तयाच रीतीं । परोपरीचे अलंकार ॥ १७ ॥ 
तैसे देह भिन्न जाणा । परमात्मा एकचि पूर्ण । 
जैसा चंद्र एकचि गगनीं । नाना घटीं दिसतसे ॥ १८ ॥ 
दीप असतां एक घरी । लाविती वाती सहस्त्र जरी । 
समस्त होती दिपावरी । भिन्नभाव कोठें असे ॥ १९ ॥ 
एकचि सूत्र आणोनि । नानापरीचें ओविती मणि । 
एकचि सूत्र जाणोनि । न पहावा भाव भिन्न ॥ २० ॥ 
तैशा याति नानापरी । असती जाणा वसुंधरी । 
समस्तांसी एकचि हरि । भिन्न भाव करुं नये ॥ २१ ॥ 
आणिक तुम्ही म्हणाल ऐसें । पूजिती पाषाण देवासरिसे । 
सर्वां ठायीं पूर्ण भासे । विश्र्वात्मा तो एकचि ॥ २२ ॥ 
प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि । म्हणोनि सांगताति प्रसिद्धीं । 
आत्माराम पूजा विधीं । त्यांचे मतीं ऐसें असे ॥ २३ ॥ 
स्थिर नव्हे अंतःकरण । म्हणोनि करिती प्रतिमा खूण । 
नाम ठेवोनि ' नारायण ' । तया नामें पूजिताति ॥ २४ ॥ 
 त्यांते तुम्हीं निंदा करितां । तरी सर्वां ठायीं परिपूर्ण म्हणतां । 
प्रतिष्ठावया आपुल्या मता । द्वेष आम्हीं कां करावा ॥ २५ ॥ 
याकारणें ज्ञानवंतीं । करुं नये निंदास्तुति । 
असती नानापरीच्या याती । आपुले रहाटी रहाटती ॥ २६ ॥ 
ऐशापरी पुरोहितांसी । सांगे राजा विस्तारेंसीं । 
करी पुण्य बहुवसी । विश्र्वास देवद्विजांवरी ॥ २७ ॥ 
राजा देखा येणेंपरी । होता तया विदुरानगरीं । 
पुढें त्याचे मांडीवरी । स्फोटक एक उद्भवला ॥ २८ ॥ 
नानापरीचे वैद्य येती । तया स्फोटका लेप करिती । 
शमन नोहे कवणे रीतीं । महादुःखें कष्टतसे ॥ २९ ॥ 
ऐसें असतां वर्तमानीं । श्रीगुरु होते गाणगाभुवनीं । 
विचार करिती आपुले मनीं । राजा येईल म्हणोनियां ॥ ३० ॥ 
येथें येती म्लेंच्छ लोक । होईल द्विजां उपबाधक । 
प्रकट जाहलों आतां ऐक । येथें आम्हीं असूं नये ॥ ३१ ॥ 
प्रकट जहाली महिमा ख्याति । पहावया येती म्लेंच्छ याति । 
आतां आम्हीं रहावें गुप्ती । लौकिकार्थ परियेसा ॥ ३२ ॥ 
आलें ईश्र्वरनाम संवत्सरु । सिंहराशीं आला असे गुरु । 
गौतमी तीर्थ असे थोरु । यात्राप्रसंगें जावें आता ॥ ३३ ॥ 
म्हणती समस्त शिष्यांसी । करा आयती वेगेंसीं । 
येतो राजा बोलवावयासी । जावें त्वरित गंगेला ॥ ३४ ॥ 
ऐकोनि म्हणती शिष्यजन । विचार करिती आपणांत आपण । 
जरी येईल राजा यवन । केवीं होय म्हणताति ॥ ३५ ॥ 
 ऐसें मनीं विचारिती । काय होईल पहावें म्हणती । 
असे नृसिंहसरस्वती । तोचि रक्षील आम्हांसी ॥ ३६ ॥ 
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते गाणगापुरीं ख्याति । 
राजा यवना जाहली मति । पूर्वसंस्कारें परियेसा ॥ ३७ ॥ 
स्फोटकाच्या दुःखें राजा । अपार कष्टला सहजा । 
नानापरीचीं औषधें निजा । करितां तया न होय बरवें ॥ ३८ ॥ 
मग मनीं विचार करी । स्फोटकें व्यापिलें अपरांपरी । 
वैद्याचेनि नव्हे दूरी । काय करणें म्हणतसे ॥ ३९ ॥ 
बोलावूनि विप्रांसी । पुसे काय उपाव यासी । 
विप्र म्हणती रायासी । सांगो ऐका एकचित्तें ॥ ४० ॥ 
पूर्वजन्म पाप करितां । व्याधिरुप होऊनि पीडितां । 
दानधर्म द्यावें तीर्था । व्याधि जाय परियेसी ॥ ४१ ॥ 
अथवा भल्या सत्पुरुषासी । भजावें आपण भावेंसीं । 
त्याचे दृष्टिसुधारसीं । बरवें होय परियेसा ॥ ४२ ॥ 
सत्पुरुषाचे कृपादृष्टीं । पापें जातीं जन्म साठी । 
मग कैचा रोग पोटीं । स्फोटकादि त्वरित जाय ॥ ४३ ॥ 
ऐकोनियां विप्रवचन । राजा करीतसे नमन । 
मातें तुम्ही न म्हणा यवन । दास आपण विप्रांचा ॥ ४४ ॥ 
पूर्वापार जन्मीं आपण । केली सेवा श्रीगुरुचरण । 
पापास्तव जन्मलों जाण । यवनाचे कुळीं देखा ॥ ४५ ॥ 
 एखादा पूर्ववृत्तांत । मातें निरोपावा त्वरित । 
महानुभावदर्शन होतां । कवणाचा रोग गेला असे ॥ ४६ ॥ 
 रायाचें वचन ऐकोनि । विचार करिती विप्र मनीं । 
सांगू नये इये स्थानीं । एकांतस्थळ पाहिजे ॥ ४७ ॥ 
तुम्ही राजे म्लेंच्छयाती । समस्त तुम्हां निंदा करिती । 
आम्ही असों द्विजयाती । केवीं सांगणें म्हणताति ॥ ४८ ॥ 
विप्रवचन ऐकोन । विनवीतसे तो यवन । 
चाड नाहीं यातीवीण । आपणास तुम्ही उद्धरावें ॥ ४९ ॥ 
ऐसें रायाचें मन । अनुतप्त जहालें असे जाण । 
मग निरोपिती ते ब्राह्मण । तया रायासी परियेसा ॥ ५० ॥ 
विप्र म्हणती रायासी । स्थान बरवें पापविनाशी । 
जावें तुम्ही सहजेसीं । विनोदार्थ परियेसा ॥ ५१ ॥ 
तेथें स्थळ असे बरवें । एकांतस्थान पहावें । 
स्नान करावें मनोभावें । एकचित्तें परियेसा ॥ ५२ ॥ 
ऐकोनिया विप्रवचन । संतोषला राजा आपण । 
निघाला त्वरित तेथोन । पापविनाश तीर्थासी ॥ ५३ ॥ 
समस्तांतें राहवूनि । एकला गेला तयास्थानीं । 
स्नान करितां तत्क्षणीं । आला एक यति तेथें ॥ ५४ ॥ 
राजा देखोनि तयासी । नमन केलें भावेंसीं । 
दावीतसे स्फोटकासी । म्हणे उपशमन केवीं होय ॥ ५५ ॥ 
ऐकोनि तयाचें वचन । सांगता झाला तो विस्तारोन । 
महानुभावाचें होता दर्शन । तुज बरवें होईल ॥ ५६ ॥ 
पूर्वी याचे आख्यान । सांगेन ऐक विस्तारोन । 
एकचित्त करुनि मन । ऐक म्हणती तये वेळी ॥ ५७ ॥ 
अवंती म्हणिजे थोर नगरीं । होता एक दुराचारी । 
जन्मोनियां विप्रउदरीं । अन्योन्य रहाटतसे ॥ ५८ ॥ 
आपण असे मदोन्मत्त । सकळ स्त्रियांसवें रमत । 
संध्यास्नान केले त्यक्त । अन्यमार्गे रहाटतसे ॥ ५९ ॥ 
ऐसा दुराचारीपणें । रहाटत होता तो ब्राह्मण । 
पिंगला म्हणजे वेश्या जाण । तयेसवें वर्तत असे ॥ ६० ॥ 
न करी कर्म संध्यास्नान । रात्रंदिवस वेश्यागमन । 
तिचे घरींचें भक्षी अन्न । येणेंपरी नष्टला असे ॥ ६१ ॥ 
ऐसें असतां वर्तमानीं । ब्राह्मण होता वेश्यासदनीं । 
तेथें आला एक मुनि । ' ऋषभ ' नामा महायोगी ॥ ६२ ॥ 
तया देखोनि दोघेंजण । करिती साष्टांगीं नमन । 
भक्तिभावेंकरुन । घेऊनि आलीं मंदिरांत ॥ ६३ ॥ 
बसों घालिती पीठ बरें । पूजाकरिती षोडशोपचारें । 
अर्घ्यपाद्य देवोनि पुढारें । गंधाक्षता लाविताति ॥ ६४ ॥ 
नानापरिमळ पुष्पजाती । तया योगियासी पूजिती । 
परिमळ द्रव्य अनेक रीतीं । वाहिलें तया योगेश्र्वरा ॥ ६५ ॥ 
चरणतीर्थ धरुन । पान करिती दोघेजण । 
त्यासी करविती भोजन । नानापरी पक्वानेसीं ॥ ६६ ॥ 
करवूनियां भोजन । केलें हस्तप्रक्षालन । 
बरवा पलंग आणोन । देती तया योगियासी ॥ ६७ ॥ 
तयावरी केलें शयन । तांबूल देती आणोन । 
करिती पादसेवन । भक्तिभावें दोघेजण ॥ ६८ ॥ 
निद्रिस्त झाला योगेश्र्वर । दोघें करिती नमस्कार । 
उभें राहोनि चारी प्रहर । सेवा केली भावेंसीं ॥ ६९ ॥ 
उदय झाला दिनकरासी । संतोषला तो तापसी । 
निरोप घेऊनि संतोषी । गेला आपुल्या स्थानासी ॥ ७० ॥ 
ऐसें विप्रें वेश्याघरीं । क्रमिले क्वचित् दिवसवरी । 
प्राय गेली त्याचे शरीरीं । वृद्धाप्य जाहलें तयासी ॥ ७१ ॥ 
पुढें तया विप्रासी । मरण आलें परियेसी । 
पिंगला नाम वेश्येसी । दोघे पंचत्व पावली ॥ ७२ ॥ 
पूर्वकर्मानुबंधेसीं । जन्म झाला राजवंशी । 
 दशार्णवाधिपतीच्या कुशीं । वज्रबाहूचे उदरांत ॥ ७३ ॥ 
तया वज्रबाहूची पत्नी । नाम तिचें असे ' सुमती ' । 
जन्म जाहला तिचे पोटीं । तोचि विप्र परियेसा ॥ ७४ ॥ 
तया वज्रबाहूसी । ज्येष्ठ राणी-गर्भेसी । 
उद्भवला विप्र परियेसीं । राजा समारंभ करीतसे ॥ ७५ ॥ 
देखोनियां तिचे सवतीसी । क्रोध आला बहुवसीं । 
गर्भ झाला सपत्नीसी । म्हणोनि धरिला द्वेष मनीं ॥ ७६ ॥ 
सर्पगरळ आणोनि । दिल्हें सवतीस नानायत्नीं । 
गरळ भेदिलें अतिगहनीं । तया राया-ज्येष्ठस्त्रियेसी ॥ ७७ ॥ 
दैवयोगे न ये मरण । भेदिलें विष महादारुण । 
सर्व शरीरीं झाले व्रण । महाकष्ट भोगीतसे ॥ ७८ ॥ 
ऐशापरी राजपत्नी । झाली प्रसूत बहुकष्टेनीं । 
उपजतां बाळाचे तनीं । सर्वांगी व्रण मातासुतासी ॥ ७९ ॥ 
महाक्लेशीं पीडित । सर्वांगीं स्फोटक बहुत । 
रात्रंदिवस आक्रंदत । कष्टत होती परियेसा ॥ ८० ॥ 
विष व्यापिलें सर्वांगासी । म्हणोनि आक्रंदती दिवानिशीं । 
दुःख करी राजा क्लेशी । म्हणे काय करुं आतां ॥ ८१ ॥ 
देशोदेशींच्या वैद्यांसी । बोलाविती चिकित्सेसी । 
वेंचिती द्रव्य अपारेंसीं । कांही केलिया नव्हे बरवें ॥ ८२ ॥ 
तिथे माता-बाळकांसी । व्रण झाले बहुवसीं । 
निद्रा नाही दिवानिशीं । सर्वांगीं कृमि पडले जाणा ॥ ८३ ॥ 
त्यांते देखोनि रायासी । दुःख झालें बहुवसीं । 
निद्रा नाही दिवानिशीं । त्यांचे कष्ट देखोनियां ॥ ८४ ॥ 
व्यथेंकरुनि मातासुत । शरीर सर्व कृश होत । 
अन्न उदक नवचे क्वचित । क्षीण जाहलीं येणेंपरी ॥ ८५ ॥ 
राजा येऊनि एके दिवशीं । पाहे आपुले स्त्री-सुतासी । 
देखोनियां महाक्लेशी । दुःख करी परियेसा ॥ ८६ ॥ 
म्हणे आतां काय करुं । केवीं करणें प्रतिकारु । 
नाना औषध विचारु । करितां स्वस्थ नव्हेचि ॥ ८७ ॥ 
स्त्रीपुत्रासी ऐशी गति । जिवंत शव झालीं असतीं । 
यांते नव्हे बरवें निश्र्चितीं । केवीं पाहूं म्हणतसे ॥ ८८ ॥ 
आतां यांसी पहावयासी । कंटाळा येतो आम्हांसी । 
बरवें नव्हे सत्य यासी । काय करणें म्हणतसे ॥ ८९ ॥ 
यांतें देखतां आम्हांसी । व्रण लागती देहासी । 
हे असती महादोषी । यांतें त्यजूं म्हणतसे ॥ ९० ॥
Gurucharitra Adhyay 50 
गुरुचरित्र अध्याय ५०


Custom Search