Tuesday, December 31, 2013

Surya Kavacha (Marathi) सूर्यकवच (मराठी)


Surya Kavacha (Marathi) 
Surya kavacha is in Marathi. It is a translation of original Sanskrit Surya Kavacha of Yadnyavalkya Rushi. It is a very wonderfully translated by Shri Divakar Anant Ghaisas. We owe him a lot as this is done for all devotees of God Surya. I thank him for this pious stotra.
सूर्यकवच (मराठी) 
॥ सूर्य आत्मा जगतस्तथुष्च ॥ 
श्रीगणेशाय नमः ॥ 
याज्ञवल्क्यप्रणीत । सूर्यकवच संस्कृत । 
तयाचा हा अनुवाद । मराठी ओवींत केलासे ॥ १ ॥ 
अथ ध्यानम् ॥ 
आधी करावें सूर्याचे ध्यान । दिव्य कांति सौभाग्यदान । 
शरीरासी आरोग्य-दान । निज किरणी जो करी ॥ २ ॥ 
मुकुट ज्याचा देदीप्यमान । मकर कुंडले तेज स्फुरण । 
पसरती सहस्र किरण । सूर्यध्यान यापरी ॥ ३ ॥ 
अथ कवचम् ॥ 
भास्कर रक्षो शीर्षासी । अतिद्युति मम ललाटासी । 
दिनमणी तो नेत्रांसी । वासरेश्र्वर कर्णद्वया ॥ ४ ॥ 
धर्मघृणि रक्षो नाकासी । वेदवाहन तो वदनासी । 
मानद रक्षो जिव्हेसी । कंठासी सुरवंदित ॥ ५ ॥ 
प्रभाकर रक्षो खांद्यांसी । जनप्रिय रक्षो वक्षस्थळासी । 
द्वादशात्मा मम पावलांसी । सकलेश्र्वर सर्वांगा ॥ ६ ॥ 
हे सूर्यकवच सद्भावे । भूर्जपत्रावरी लिहावे । 
हातावरी ते बांधावे । तरी सिद्धी लाभती ॥ ७ ॥ 
अभ्यंग स्नान करुनी । म्हणे जो एकाग्र मनी । 
स्वस्थ मने अभ्यासुनी । करील जो चिंतन ॥ ८ ॥ 
तो होईल रोगमुक्त । दीर्घायुष्य तया प्राप्त । 
सुखी आणि तुष्टपुष्ट । याचिया गुणे होईल ॥ ९ ॥ 
याज्ञवल्क्ञांचे जे वचन । अनुवाद तयाचा करुन । 
साधकांसी अर्पणे मन । दिवाकराचे धन्य हो ॥ १० ॥ 
॥ इति श्रीसूर्यकवचं संपूर्णम् ॥ श्रीसूर्यनारायणार्पणमस्तु ॥
श्री दिवाकर अनंत घैसास यांनी भाषांतरींत केलेले हे स्तोत्र त्यांचे आभार मानून भाविकांसाठी प्रस्तुत केले आहे.
Surya Kavacha (Marathi) 
 सूर्यकवच (मराठी)


Custom Search

No comments: