Sunday, June 4, 2017

Samas Dahava MuktiChatushtaya समास दहावा मुक्तिचतुष्टय


Dashak Choutha Samas Dahava MuktiChatushtaya 
Samas Dahava MuktiChatushatya is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Mukti. MuktiChatushtaya. There are foru types of Mukti. 1) Salokata 2) Samipata 3) Sarupata 4) SayojyaMukti. 1) Salokata Mukti means the devotee after his death goes to his God’s Loka. Suppose a particular devotee is in devotion of God Vishnu. Then after his death rest to VishnuLoka. 2) Samipata Mukti means Devotee live with the God. 3) Sarupata means devotee gets the rupa of God. These three mukties are not permanent. After the stck of their punya is finished, they are sent to earth again. 4) Sayojya Mukti this is a permanent mukti. Devotee is free from birth-death cycle and he rest with God forever.
समास दहावा मुक्तिचतुष्टय
श्रीराम ॥
मुळी ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरुप अहंकार ।
तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं बोलिला ॥ १ ॥
१) मुळांत ब्रह्म अव्यक्त व आकाररहित आहे. तेथें ही व्यक्त व साकार सृष्टी वगैरे कांही नसतें व नव्हतें. त्या निरागस ब्रह्मामध्यें एक स्फुरण उद्भवले तो अहंकार होय. त्यांतून पंचभूतात्मक सृष्टि निर्माण झाली. ती कशी झाली त्याचा विचार ज्ञानदशकांत म्हणजे आठव्या दशकांत केला आहे.     
तो अहंकार वायोरुप । तयावरी तेजाचें स्वरुप ।ते
तया तेजाच्या आधारें आप। आवर्णोदकदाटलें ॥ २ ॥
२) तें अहंकाराचे स्फुरण वायुसारखे शक्तीरुप असते. त्यातून तेज प्रगटते. व त्या तेजाच्या आधारे सगळीकडे पाणी भरुन गेले.
तया आवर्णोदकाच्या आधारें । धरा धरिली फणिवरें ।
वरती छपन्न कोटी विस्तारें । वसुंधरा हे ॥ ३ ॥
३) त्या पाण्याच्या आधारे शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी उचलून धरली. छपन्न कोटी योजने इतका पृथ्वीचा विस्तार आहे.  
इयेवरी परीघ सप्त सागर । मध्य मेरु माहां थोर । 
अष्ट दिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिला ॥ ४ ॥
४) तिच्या भोवती सात सागरांचा वेढा आहे. मध्यें मोठा प्रचंड मेरु पर्वत आहे. आठ दिशापालकांचा हे सगळे अंतर वेढून आहे.  
तो सुवर्णाचा माहा मेरु । पृथ्वीस तयाचा आधारु ।
चौर्‍यासी सहस्त्र विस्तारु । रुंदी तयाची ॥ ५ ॥
५) तो प्रचंड मेरु पर्वत सोन्याचा आहे. पृथ्वीला तो आधार देतो. चौर्‍यांशी हजार योजने त्याची रुंदी आहे.  
उंच तरी मर्यादेवेगळा । भूमीमधें सहस्त्र सोळा ।
तया भोवता वेष्टित पाळा । लोकालोक पर्वताचा ॥ ६ ॥
६) त्याची उंची मोजणे शक्य नाही. तो भूमीच्या आंत सोळा हजार योजने गेला आहे. रक्षणासाठी त्याच्या भोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे.
तया ऐलिकडे हिमाचळ । जेथें पांडव गळाले सकळ ।
धर्म आणि तमाळनीळ । पुढें गेले ॥ ७ ॥
७) त्याच्या अलीकडे हिमालय आहे. तेथे सर्व पांडव गळून पडले. फक्त धर्म व यमदेव दोघेच पुढे गेले. 
जेथें जावया मार्ग नाहीं । मार्गी पसरले माहा अही ।
सितसुखें सुखावले ते हि । पर्वतरुप भासती ॥ ८ ॥
८) हिमालयांतून जायला वाट नाही. कारण वाटेमध्यें प्रचंड सर्प पसरलेले आहेत. बर्फाच्या थंडपणाने आराम करणारे ते सर्प पर्वतासारखे दिसतात. 
तया ऐलिकडे सेवटीं जाण । बद्रिकाश्रम बद्रिनारायण ।
तेथें माहां तापसी निर्वाण । देहत्यागार्थ जाती ॥ ९ ॥
९) त्याच्या अलीकडे टोकाला बद्रिकाश्रम व बद्रिनारायण आहेत. मोठे मोठे तपस्वी मोक्ष मिळवण्याच्या इच्छेने देह ठेवण्यास तेथे जातात. 
तया ऐलिकडे बद्रिकेदार । पाहोन येती लाहान थोर ।
ऐसा हा अवघा विस्तार । मेरुपर्वताचा ॥ १० ॥
१०) त्याच्या अलीकडे बद्रिकेदार आहे. लहानथोर सगळे तें पाहून येतात. असा हा मेरु पर्वताचा सगळा विस्तार आहे.
तया मेरुपर्वता पाठारीं । तीन श्रृंगे विषमहारी ।
परिवारें राहिले तयावरी । ब्रह्म विष्णु महेश ॥ ११ ॥
११) या मेरुपर्वताच्या पठारावर वाकड्यातिकड्या दिशांना तीन शिखरें आहेत.ब्रह्मा, विष्णु व महेश आपल्या परिवारासह तेथे राहतात.
ब्रह्मश्रृंग तो पर्वताचा । विष्णुश्रृंग तो मर्गजाचा ।
शिवश्रृंग तो स्फटिकाचा । कैळास नाम त्याचें ॥ १२ ॥
१२) ब्रह्मा राहतो तें शिखर साधे दगडाचे आहे. विष्णु राहतो ते शिखर पाचूचे आहे.आणि शंकर राहतो ते शिखर स्फटिकाचे आहे. त्याला कैलास म्हणतात.
वैकुंठ नाम विष्णुश्रृंगाचे । सत्यलोक नाम ब्रह्मश्रृंगाचें ।
अमरावती इंद्राचें । स्थळ खालतें ॥ १३ ॥
१३) वैकुंठ हे विष्णुच्या शिखराचे नांव आहे. ब्रह्मा राहतो त्या शिखराचे नांव सत्यलोक आहे. त्याच्या खाली अमरावती नावाचे इंद्राचे ठिकाण आहे. 
तेथे गण गंधर्व लोकपाळ । तेतिस कोटी देव सकळ ।
चौदा लोक सुवर्णाचळ । वेष्टित राहिले ॥ १४ ॥
१४) तेथें गण, गंधर्व, लोकपाळ, सगळे तेहतीस कोटी देव राहतात. सप्तस्वर्ग व सप्तपाताल असे चौदा लोक मेरुपर्वतावर वसलेले आहेत. 
तेथें कामधेनूचीं खिलांरें । कल्पतरुचीं वनें अपारें ।
अमृताचीं सरोवरें । ठाईं ठाईं उचंबळली ॥ १५ ॥
१५) तेथे कामधेनूंचे मोठे कळप आहेत. कल्पवृक्षांची पुष्कळ वने आहेत. ठिकठिकाणी अमृताने भरलेली सरोवरे उचंबळत असतात.
तेथें उदंड चिंतामणी । हिरे परिसांचिया खाणी ।
तेथें सुवर्णमये धरणी । लखलखायमान ॥ १६ ॥
१६) तेथें खूप चिंतामणी आहेत. हिर्‍यांच्या व परिसांच्या खाणी आहेत. तेथील सोन्याची जमीन लखलखाट करतअसते.
परम रमणीये फांकती किळा । नवरत्नाचिया पाषाणसिळा ।
तेथें अखंड हरुपवेळा । आनंदमये ॥ १७ ॥
१७) तेथें नवरत्नांच्या पाषाणशिला आहेत. त्यांची अतिशय सुंदर प्रभा आजुबाजुला फाकते. तेथे सदासर्वदा आनंद भरलेला असतो.   
तेथें अमृताचीं भोजनें । दिव्य गंधें दिव्य सुमनें ।
अष्टनायका गंधर्वगायनें । निरंतर ॥ १८ ॥
१८) त्या ठिकाणी भोजन अमृताचे असते. दिव्य सुवास असलेली दिव्य फुले असतात. अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन सारखें चालू असते. 
तेथें तारुण्य वोसरेना । रोगव्याधी हि असेना ।
वृधाप्य आणी मरण येना । कदाकाळीं ॥ १९ ॥
१९) तेथें तारुण्य कधींच कमी होत नाही. कोणाला रोग, व्याधी होत नाही. कोणाला म्हातारपण व मरण कधींच येत नाही.
तेथें येकाहूनि येक सुंदर । तेथें येकाहूनि येक चतुर ।
धीर उदार आणी शूर । मर्यादेवेगळे ॥ २० ॥
२०) तेथें एकापेक्षां एक सुंदर असतात. एकापेक्षा एक चतुर असतात. तसेंच ज्यांच्या धैर्याला, औदार्याला आणि शौर्याला कांही सीमा नाही असे लोक असतात.
तेथें दिव्यदेह ज्योतिरुपें । विद्युलतेसारिखीं स्वरुपें ।
तेथें येश कीर्ति प्रतापें । सिमा सांडिली ॥ २१ ॥
२१) तेथील देह दिव्य प्रकाशमय असतात. तेथील रुप विजेप्रमाणें लखलखणारे असते. यश, कीर्ति आणि प्रताप यांना तेथें कांहीं मर्यादा नसते.
ऐसे ते स्वर्गभुवन । सकळ देवांचें वस्तें स्थान ।
तया स्थळाचें महिमान । बोलिजे तितुकें थोडें ॥ २२ ॥
२२) तें स्वर्गभुवन असें आहे. सगळ्या देवांचे ते राहण्याचे ठिकाण आहे. त्या स्थळाचा महिमा सांगावा तेवढा थोडाच होईल. 
येथें ज्या देवाचें भजन करावें । तेथें ते देवलोकीं राहावें ।
स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३ ॥
२३) या जगांत वास्तव्यांत ज्या देवाची उपासना केलेली असते.त्या देवाच्या लोकांत मृत्युनंतर राहावयास मिळते. सलोकता मुक्तीचे लक्षण असे आहे.
लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता ।
स्वरुप चि व्हावें ते स्वरुपता । तिसरी मुक्ती ॥ २४ ॥
२४) देवलोकांत राहावयास मिळणें यास सलोकता म्हणतात. देवाच्या जवळ राहावयास मिळणें यांस समीपता म्हणतात. ही दुसरी मुक्ति होय. देवाचे रुपच आपल्याला यावे ही सरुपता, ही तिसरी मुक्ति होय.       
देवस्वरुप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।
स्वरुपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५ ॥
२५) उपासना करणार्‍यास देवाचें स्वरुप जरी प्राप्त झाले तरी श्रीवत्स कौस्तुभ व लक्ष्मी या गोष्टी त्याला मिळत नाहीत. सरुपता मुक्तीचें लक्षण असें आहे.  
सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरता ढकलून देती ।
आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६ ॥
२६) जोपर्यंत पुण्यसंचय असतो तोपर्यंत स्वर्गांत राहून तेथील सुखें भोगतां येतात. पण पुण्याई संपली की देव जीवाला खाली ढकलून देतात. देव मात्र कायम तेथेंच राहतात. 
म्हणोनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ति ते शाश्वत ।
तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७ ॥
२७) यामुळे तिन्ही मुक्ति नाशवंत आहेत. सायुज्यमुक्ति मात्र शाश्वत आहे. तिचे वर्णन आतां करतो. ते लक्षपूर्वक ऐक. 
ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहितजळेल क्षिती ।
तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८ ॥
२८) कल्पांताच्यावेळीं हें विश्र्व नाश पावते. पर्वतासकट पृथ्वी जळून जाते. त्यावेळी सर्व देव नाहींसे होतात. मग त्या संहारामध्यें पहिल्या तीन मुक्ति कशा टिकणार ?
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्र्चळ । निर्गुण भक्ति तेहि अचळ ।
सायोज्यमुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९ ॥
२९) त्यावेळी निर्गुण परमात्मस्वरुप जसें आहे तसेंच निश्चल राहते. त्या निर्गुणाची भक्तीदेखील तशीच निश्चल राहते. सायुज्यमुक्ति ही अशी आहे.
निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता ।
सायोज्यता म्हणिजे स्वरुपता । निर्गुण भक्ती ॥ ३० ॥
३०) निर्गुण परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी अनन्यपणें विलीन झालें कीं सायुज्यमुक्ति मिळते. स्वस्वरुपांत समरस होणें हीच निर्गुण भक्ति व हीच सायुज्यता समजावी. 
सगुण भक्ति ते चळे । निर्गुण भक्ति ते न चळे ।
हें आवघें प्रांजळ कळे । सद्गुरु केलियां ॥ ३१ ॥
३१) सगुण नाशवंत म्हणुन सगुण भक्ति नाशवंत असते. निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ति कायम टिकते. सद्गुरु केल्यानें हें सगळे स्पष्टपणें समजते. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुक्तिचतुष्टयेनाम समास दहावा ॥
Samas Dahava MuktiChatushtaya
समास दहावा मुक्तिचतुष्टय


Custom Search

Friday, June 2, 2017

Samas Navava AtmaNiedan Bhakti समास नववा आत्मनिवेदनभक्ति


Dashak Choutha Samas Navava AtmaNiedan Bhakti 
Samas Navava AtmaNivedan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. AtmaNivedan Bhakti is Ninth from Navavidha Bhakti. AtmaNivedan means to know that there is no separation inbetween I and God. It is not easy to know unless we think properly. That what we see is not real and what we don’t see that is God or Atma is real.
समास नववा आत्मनिवेदनभक्ति
श्रीराम ॥
मागां जालें निरुपण । आठवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । भक्ति नवमी ॥ १ ॥
१) मागच्या समासांत आठवी भक्ती कशी त्याचे वर्णन केले. आतां सावधपणें नवव्या भक्तीचे वर्णन ऐका.
नवमी निवेदन जाणावें । आत्मनिवेदन करावें ।
तें हि सांगिजेल स्वभावें । प्रांजळ करुनि ॥ २ ॥
२) निवेदनाला नववी भक्ती म्हणतात. आपण सर्वस्वी स्वतःला भगवंताकडे सोपविणे.म्हणजे आत्मनिवेदन. त्याच्या ताब्यांत देणे किंवा स्वतःला देवाच्या हाती सोपविणे.
ऐका निवेदन लक्षण । देवासि वाहावें आपण ।
करावें तत्वविवरण । म्हणिजे कळे ॥ ३ ॥
३) स्वतःला देवाला वाहाणे ही निवेदनाची खूण आहे. तत्वाचा शोध घेतल्यावर जे उरते ते म्हणजेच मी हा देवाला ममत्व सोडून वाहून टाकणे.
मी भक्त ऐसें म्हणावें । आणी विभक्तपणें भजावें ।
हें आवघेंचि जाणावें । विलक्षण ॥ ४ ॥
४) मी भक्त आहे आहे असे एकीकडे म्हणायचे आणी दुसरीकडे वेगळेपणा धरुन भगवंताची भक्ती करायची. यामधिल विरोधाभास विलक्षण वाटतो. 
लक्षण असो विलक्षण । ज्ञान असोन अज्ञान ।
भक्त असोन विभक्तपण । तें हें ऐसें ॥ ५ ॥
५) म्हणजे एकीकडे एखादे लक्षण आहे असे म्हणायचे व दुसरीकडे तें लक्षण नाही असे वागायचे. किंवा एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणायचे व दुसरीकडे तें
ज्ञान नाही असे वागायचे. त्यामुळे लक्षण आहे व लक्षण नाही, किंवा ज्ञान व अज्ञान या गोष्टी एकावेळी असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे एखादा माणुस एकाचवेळी भक्त व विभक्त असू शकत नाही.
भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।
विचारेंविण कांहींच नव्हे । समाधान ॥ ६ ॥
६) भक्त हा भगवंतापासून वेगळा नाही. व जो भगवंतापासून वेगळा आहे तो भक्त नव्हे. परंतु आत्मानात्म विचार केल्याखेरीज या गोष्टी समाधानकारक रीतीने समजणार नाहीत. 
तस्मात विचार करावा । देव कोण तो वोळखावा ।
आपला आपण शोध घ्यावा । अंतर्यामीं ॥ ७ ॥
७) म्हणून विचार करुन देव कोण ते ओळखावे. आपला आपणच आपल्या अंतरी शोध घ्यावा. आणी जाणून घ्यावे. 
मी कोण ऐसा निवाडा । पाहों जातां तत्वझाडा ।
विचार करितां उघडा । आपण नाहीं ॥ ८ ॥
८) मी कोण आहे हा साधा प्रश्ण वाटतो. पण याच्या मागच्या तत्वाचा विचार करायला लागल्यावर जो " मी " आपण समजतो तो खरा " मी "नाही असे समजते. 
तत्वें तत्व जेच्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे ।
आत्मनिवेदन येणें प्रकारें । सहजचि जालें ॥ ९ ॥
९) एका तत्वाने दुसर्‍या तत्वाचे निरसन होत नाही. तेव्हां आपण निराळे उरत नाही. अशारीतीने तत्वनिरसनाने आत्मनिवेदन सहजच होते. 
तत्वरुप सकळ भासे । विवेक पाहातां निरसे ।
प्रकृतिनिरासें आत्मा असे । आपण कैंचा ॥ १० ॥
१०) सगळे दृश्य विश्र्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. त्यांचे विवेकानें विवरण केले तर सर्वांचा निरास होतो. म्हणजे ती शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाहीत.
अशारीतीने दृश्य विश्र्वाचे अथवा प्रकृतीचे निरसन झालें की आत्मस्वरुपच शिल्लक उरते. मग आपला मी वेगळा राहातच नाही.
येक मुख्य परमेश्र्वरु । दुसरी प्रकृति जगदाकारु ।
तिसरा आपण कैंचा चोरु । आणिला मधें ॥ ११ ॥
११) मुख्य मुलतत्वे दोनच आहेत. एक परमेश्र्वर व दुसरी विश्र्वाचा आकार त्या दोघांमध्ये तिसरा " मी " हा चोर येतच नाही. 
ऐसें हें सिद्धचि असतां । नाथिली लागे देहअहंता ।
परंतु विचारें पाहों जातां । कांहींच नसे ॥ १२ ॥
१२) परमात्मा आणी प्रकृती हीं दोन मूलतत्वें स्वतः सिद्ध आहेत. परंतु मुळांत नसलेला आणी या कारणासाठी खोटा असलेला देहाहंकार आपल्याला चिकटतो. तरीपण विचारानें शोध घेतल्यास त्याला कांही आधार नाही असा निश्र्चय होतो.   
पाहातां तत्वविवंचना । पिंडब्रह्मांडतत्वरचना ।
विश्र्वाकारें वेक्ती नाना । तत्वें विस्तारलीं ॥ १३ ॥
१३) व्यक्ति आणि विश्र्व यांमधील तत्वांची रचना शोधून पाहिली, त्याचप्रमाणें तत्वांची मीमांसा करुन पाहिली तर असे आढळते की, या विश्र्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्य वस्तु हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे.  
तत्वें साक्षत्वें वोसरती । साक्षत्व नुरे आत्मप्रचिती ।
आत्मा असे आदिअंतीं । आपण कैंचा ॥ १४ ॥
१४) आपल्या देहासकट या विश्र्वाकडे आपण साक्षित्वाने पाहूं लागलो, म्हणजे केवळ बघणार्‍याची भूमिका ठेवून तिर्‍हाईतपणाने पाहूं लागलो तर ती तत्वें सहज नाहीशी होतात. नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला कीं साक्षीपणाही उरत नाही. विश्र्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता तसाच विश्र्वाच्या शेवटीसुद्धा आत्माच शिल्लक राहतो. हें जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळें अस्तित्व राहातच नाही.   
आत्म एक स्वानंदघन । आणी अहमात्मा हें वचन ।
तरी मग आपण कैंचा भिन्न । उरला तेथें ॥ १५ ॥
१५) आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या आनंदानें तो संपूर्ण भरलेला आहे. आणि मीच तो आत्मा आहे असे श्रुति सांगते. तर " मी " आणखी कोणी निराळा असू शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार खोटा आहे.  
सोहं हंसा हें उत्तर । याचें पाहावें अर्थांतर ।
पाहातां आत्मयाचा विचार । आपण कैंचा तेथें ॥ १६ ॥  
१६) " कोऽहम् " या प्रश्र्णाचे उत्तर " सोऽहम् " " मी कोण " याप्रश्र्णाचे उत्तर " तो मी "आहे. या उत्तरामध्ये असणारा सर्व अर्थ उकलून पहावा. आत्म्याच्या विचारांत शिरले कीं " मी " आणखी कोणी निराळा आहे हे सिद्ध होत नाही.   
आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावें अनन्य ।
अनन्य म्हणिजे नाहीं अन्य । आपण कैंचा तेथें ॥ १७ ॥
१७) सोऽहम् म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे व मलरहित आहे. मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजेमी व तो वेगळे नाही. हें जर खरे तर " मी " कोणी निराळा आहे असे कसे म्हणता येईल. 
आत्मा म्हणिजे तो अद्वैत । जेथे नाहीं द्वैताद्वैत ।
तेथें मीपणाचा हेत । उरेल कैंचा ॥ १८ ॥
१८) आत्मा अद्वैत आहे, अद्वैत म्हणजे द्वैत नाहीं तें, ज्यांत दुसरेपणा नाहीं तें. असें जर आहे तर आणखी वेगळ्या " मी "पणाचे कारण असूंच शकत नाही.  
आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण । जेथें नाहीं गुणागुण ।
निखळ निर्गुण आपण । कोण कैंचा ॥ १९ ॥
१९) आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथें गुण व अवगुण दोन्हीही नाहीत. मानवी बुद्धिला गुणांवाचून वस्तूची कल्पनाच करता येत नाही. म्हणुन सर्व अनात्मवस्तु आपण सगुण म्हणतो. पण आत्मवस्तु मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने आपण तिला निर्गुण म्हणतो.    
त्वंपद तत्पद असिपद । निरसुनि सकळ भेदाभेद ।
वस्तु ठाईंची अभेद । आपण कैंचा ॥ २० ॥
२०) " तत् त्वम् असि " म्हणजे " तूं ते ब्रह्म आहेस " असें उपनिषदांतील स्वानुभवाचे वाक्य आहे. या तिनही पदांच्या पलिकडे असलेल्या आत्मस्वरुपापर्यंत जो पोहोचला, त्याला भेद व अभेद दोन्ही लटके होतात. त्याला मी देह आहे अशी मीपणाची निराळी अवस्था कशी असणार ? म्हणून मीपणाअसत्य आहे.
निरसितां जीवशिवउपाधी । जीवशिवचि कैंचे आधीं ।
स्वरुपीं होतां दृढबुद्धि । आपण कैंचा ॥ २१ ॥
२१) मी जीव आहे व तो शिव आहे. हा विद्याअविद्यांनी निर्माण केलेला भेद आहे. त्या भेदाची उपाधि नाहींशी केली तर आत्मस्वरुपांत जीवशिव असा भेद नाही हे लक्षांत येईल. असा निश्र्चय झाला की मी राहणार नाही.
आपण मिथ्यासाच देव । देव भक्त अनन्यभाव ।
या वचनाचा अभिप्राव । अनुभवीन जाणती ॥ २२ ॥
२२) " मी देह आहे " या भावनेमुळे आपण कोणी निराळे आहोत, स्वतंत्र आहोत, असा जो
आपला दृढ विश्र्वास असतो, तो भ्रम असतो. तो असत्य आहे. एक भगवंत काय तो खरा आहे.
तसेच भक्त व भगवंत दोघे निराळे दिसले तरी ते वेगळे नसतात. दोघे एकमेकाशी अनन्य असतात.
एकरुप असतात. हे जे मी (समर्थ) सांगतो त्याचा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळेल.   
या नाव आत्मनिवेदन । ज्ञानियांचे समाधान ।
नवमे भक्तीचें लक्षण । निरोपिलें ॥ २३ ॥
२३) भक्तानें आपला संपूर्ण मीपणा भगवंताला वाहणें आणि त्याच्याशी संपूर्णपणे एकरुप होऊन जाणें 
यास आत्मनवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदनानेच ज्ञानी पुरुषांना समाधान लाभते. याप्रमाणे नवव्या 
भक्तीचे लक्षण निरोपिले. 
पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश ।
नवविधा भक्तिमधें विशेष । भक्ति नवमी ॥ २४ ॥
२४) ज्याप्रमाणे पंचमहाभूतांमध्यें आकाश, सगळ्या देवांमध्ये जगदिश श्रेष्ठ, त्याचप्रमाणें भक्तीचे जे नऊ प्रकार सांगितले त्यामध्यें नववी म्हणजे आत्मनिवेदन भक्ति सर्वांत श्रेष्ठ भक्ति आहे. 
नवमी भक्ति आत्मनिवेदन । न होतां न चुके जन्ममरण ।
हें वचन सत्य प्रमाण । अन्यथा नव्हे ॥ २५ ॥
२५) नववी भक्ति जी आर्मनिवेदन ती जर साधली नाही तर माणसाचें, भक्ताचे जन्ममरण चुकणार नाही, हे माझे बोलणे अगदी खरे आहे, अनुभवाला धरुन आहे, तें खोटे होणार नाही.   
ऐसी हे नवविधा भक्ती । केल्यां पाविजे सायोज्यमुक्ती ।
सायोज्यमुक्तीस कल्पांतीं । चळण नाहीं ॥ २६ ॥
२६) नवविधा भक्ति ही अशी आहे. ती आचरली तर सायुज्यमुक्ति मिळते. या सबंध विश्र्वाचा
लय झाला तरी सायुज्यमुक्ति अचल राहते. तिच्यामध्यें बदल होत नाही.
तिहीं मुक्तीस आहे चळण । सायोज्यमुक्ती अचळ जाण ।
त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायोज्यमुक्ती चळेना ॥ २७ ॥ 
२७) एकंदर मुक्ति चार आहेत. त्यापैकी पहिल्या तीन मुक्तींमध्ये फरक घडून येतो. सायुज्यमुक्ति मात्र अचल राहते, तिच्यांत फरक पडत नाही. तिन्ही लोकांचा शेवट झाला तरी सायुज्यमुक्तिमध्यें कोणताही फेरबदल होत नाही ती जशीच्या तशीच कायम राहते.
आवघीया चत्वार मुक्ती । वेदशास्त्रें बोलती ।
तयामधें तीन नासती । चौथी ते अविनाश ॥ २८ ॥
२८) वेद व शास्त्रे यांनी एकंदर चार प्रकारच्या मुक्ति वर्णन केल्या आहेता. त्यापैंकी तीन नश्वर आहेत.
अशाश्वत आहेत. पण चौथी मात्र शाश्वत आहे. अविनाशी आहे. 
पहिली मुक्ती ते स्वलोकता । दुसरी ते समीपता । 
तिसरी ते स्वरुपता । चौथी सायोज्यमुक्ती ॥ २९ ॥
२९) पहिली मुक्ति स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरुपता आणि चौथी सायोज्यमुक्ती होय.
ऐसिया चत्वार मुक्ती । भगवद्भजनें प्राणी पावती ।
हेंचि निरुपण प्रांजळ श्रोतीं । सावध पुढें परिसावें ॥ ३० ॥
३०) अशा या चार मुक्ति भगवंताच्या भक्तीनें माणसाला त्या प्राप्त होतात. पुढील समासी हाच 
विषय सांगावयाचा आहे. श्रोत्यांनी ते सावधपणें ऐकावे.  
            इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे        आत्मनिवेदनभक्तिनाम समास नववा ॥
   Samas Navava AtmaNiedan Bhakti
         समास नववा आत्मनिवेदनभक्ति





Custom Search