Wednesday, July 25, 2018

Shri Dattatreya Namaskarashtak श्रीदत्तात्रेय नमस्काराष्टक


Shri Dattatreya Namaskarashtak 
Shri Dattatreya Namaskarashtak is in Marathi. It is very beautiful creation and mainly praises Guru. It is an appreciation of Guru who has done many good things for disciple.
श्रीदत्तात्रेय नमस्काराष्टक
ज्याच्या कृपेचा मज लाभ झाला । 
जन्मान्तरीचा गुरुराज आला ।
श्रीदत्त ऐसा मज बोध केला । 
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ १ ॥
अखंड माझ्या हृदयांत आहे । 
सबाह्यदेहीं परिपूर्ण पाहे ।
टाकूनि मजसी नाहींच गेला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ २ ॥
स्वरुप माझे मज दाखविले ।
देहीच माझे मज हीत केले ।
ऐसा जयाने उपकार केला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ३ ॥ 
संसारव्याळे मज डंकियेलें ।
परमार्थ बोधे विष उतरिले ।
माझ्यावरी हा उपकार केला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ४ ॥
शुकादिकांला सुख प्राप्त झाले ।
तसेंच तू रे मजलागि दिलें ।
माता पिता तूं बंधूहि मजला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ५ ॥  
निजात्मरंगे मज रंगविलें ।
स्वानंदलेणें मज लेववीले ।
बोधोनि ऐसा परिपूर्ण केला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ६ ॥
सुखात्मडोही मज बूडविलें ।
घेवूनि हस्तें सुख दाखवीले ।
विवेक पूर्ता भवताप गेला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ७ ॥
नमस्काराष्टक संपूर्ण ॥
Shri Dattatreya Namaskarashtak
श्रीदत्तात्रेय नमस्काराष्टक


Custom Search

Monday, July 23, 2018

Kaivalyashtakam कैवल्याष्टकम्


Kaivalyashtakam 
KaiyalyaShtakam is in Sanskrit. In this stotra the importance of utterting God's name is described and we have been asked to utter the name of God.
कैवल्याष्टकम्
मधुरं मधुरेभ्योऽपि मङ्गलेभ्योपि मङ्गलम् ।
पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम् ॥ १ ॥
१) केवळ हरिचे नांवच मधुरामध्यें अधिक मधुर, मंगलमयांमध्ये अधिक मंगलमय व सर्व पवित्रांमध्यें अधिक पवित्र आहे.
आब्रह्मस्तम्बपर्यन्तं सर्वं मायामयं जगत् ।
सत्यं सत्यं पुनः सत्यं  हरेर्नामैव केवलम् ॥ २ ॥ 
२) ब्रह्मापासून स्तम्बापर्यंत सर्व संसार मायामय आहे. मी पुनः पुनः सांगतो की केवळ हरिचे नावच सत्य आहे.
स गुरुः स पिता चापि सा माता बान्धवोऽपि सः ।
शिक्षयेच्चेत्सदा स्मर्तुं हरेर्नामैव केवलम् ॥ ३ ॥ 
३) जो नेहमी फक्त हरिनामाचे स्मरण करायला शिकवतो तोच गुरु आहे. तोच पिता, माता व बन्धु आहे. 
नि:श्र्वासे न हि विश्र्वासः कदा रुद्धो भविष्यति ।
कीर्तनीयमतो बाल्याद्धरेर्नामैव केवलम् ॥ ४ ॥
४) श्र्वासाचा कांही भरवसा नाहीं कीं तो कधी थांबेल म्हणून लहान असल्यापासूनच हरिनावाचे किर्तन केलें पाहिजे.
हरिः सदा वसेत्तत्र यत्र भगवता जनाः ।
गायन्ति भक्तिभावेन हरेर्नामैव केवलम् ॥ ५ ॥ 
५) जेथें भक्तजन भक्तिभावानें केवळ हरिनावाचेच गायन करतात, तेथे सर्वदा भगवान हरि स्वतः उपस्थित असतात.
अहो दुःखं महादुःखं दुःखद् दुःखतरं यतः ।
काचार्थं विस्मृतं रत्नं हरेर्नामैव केवलम् ॥ ६ ॥
६) अहो ! फार दुःख आहे, फार कष्ट आहेत, फार मोठा शोकआहे. कारण काच समजून हरिरुपी नाम या रत्नाचा विसर पडला.  
दीयतां दीयतां कर्णो नीयतां नीयतां वचः ।
गीयतां गीयतां नित्यं हरेर्नामैव केवलम् ॥ ७ ॥
७) केवळ एका हरिनामाचेच कानांनीं नेहमी श्रवण करा, वाणीनें उच्चार करा व त्याचेच गायन करा. 
तृणीकृत्य जगत्सर्वं राजते सकलोपरि ।
चिदानन्दमयं शुद्धं हरेर्नामैव केवलम् ॥ ८ ॥ 
८) सर्व जगताला गवतासारखे क्षुद्र करुन केवळ हरिनामच सर्वत्र विराजमान आहे.
इति श्रीकैवल्याष्टकं सम्पूर्णम् ॥
Kaivalyashtakam 
कैवल्याष्टकम्


Custom Search

Friday, July 20, 2018

Durga Stotra (Sanskrit) दुर्गास्तोत्र (संस्कृत)


Durga Stotra (Sanskrit) 
Durga Stotra is from Mahabharat. Bhagwan ShriKrishna advised Arjuna to pray Goddess Durga for her blessings to win the battle with Kourava. In this stotra Arjun is praying Goddess Durga.
दुर्गास्तोत्र (संस्कृत)
संजय उवाच ।
धार्तराष्ट्रबलं दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम् ।
अर्जुनस्य हितार्थाय कृष्णो वचनमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीभगवानुवाच ।
शुचिर्भूत्वा महाबाहो संग्रामाभिमुखे स्थितः ।
पराजयाय शत्रूणां दूर्गास्तोत्रमुदीरय ॥ २ ॥
संजय उवाच ।
एवमुक्तोर्जुनः संख्ये वासुदेवेन धीमता ।
अवतीर्य रथात्पार्थः स्तोत्रमाह कृतांजलिः ॥ ३ ॥
अर्जुन उवाच ।
नमस्ते सिद्धसेनानि आर्ये मंदरवासिनि ।
कुमारि कालिकपालि कपिले कृष्णपिंगले ॥ ४ ॥
भद्रकालि नमस्तुभ्यं महाकालि नमोऽस्तु ते ।
चंडि चंडे नमस्तुभ्यं तारिणि वरवर्णिनि ॥ ५ ॥
कात्यायनि महाभागे करालि विजये जये ।
शिखिपिच्छध्वजधरे नानाभरणभूषिते ॥ ६ ॥
अट्टशूलप्रहरणे खङ्गखेटधारिणि ।
गोपेन्द्रस्यानुजे ज्येष्ठे नंदगोपकुलोद्भवे ॥ ७ ॥
महिषासृक्प्रिये नित्यं कौशिकि पीतवासिनि ।
अट्टाहासे कोकमुखे नमस्तेऽस्तु रणप्रिये  ॥ ८ ॥
उमे शाकंभरि श्र्वेते कृष्णे कैटभनाशिनि ।
हिरण्याक्षि विरुपाक्षि सुधूम्राक्षि नमोऽस्तु ते ॥ ९ ॥
वेदश्रुति महापुण्ये ब्रह्मण्ये जातवेदसि ।
जंबूकटकचैत्येषु नित्यं सन्निहितालये ॥ १० ॥
त्वं ब्रह्मविद्या विद्यानां महानिद्रा च देहिनाम् ।
स्कंदमातर्भगवति दुर्गे कांतारवासिनि ॥ ११ ॥
स्वाहकारः स्वधा चैव कला काष्टा सरस्वती ।
सावित्री वेदमाता च तथा वेदांत उच्यते ॥ १२ ॥
स्तुताऽसि त्वं महादेवि  विशुद्धेनांतरात्मना ।
जयो भवतु मे नित्यं त्वत्प्रसादाद्रणाजिरे ॥ १३ ॥
कान्तारभयदुर्गेषु भक्तानां चालयेषु च ।
नित्यं वससि पाताले युद्धे जयसि दानवान् ॥ १४ ॥
त्वं जृंभनी मोहिनी च माया हृीः श्रीस्तथैव च ।
संध्या प्रभावती चैव सावित्री जननी तथा ॥ १५ ॥
तुष्टिः पुष्टिर्धृतिर्देप्तिश्र्चंद्रादित्यविवर्धिनी ।
भूतिर्भूतिमतां संख्ये वीक्ष्यसे सिद्धचारणैः ॥ १६ ॥
संजय उवाच ।
ततः पार्थस्य विज्ञाय भक्तिं मानववत्सला ।
अंतरिक्षगतोवाच गोविंदस्याग्रतः स्थिता ॥ १७ ॥
देव्युवाच ।
स्वल्पेनैव तु कालेन शत्रून् जेष्यसि पांडव ।
नरस्त्वमसि दुर्धर्ष नारायणसहायवान् ॥ १८ ॥
अजेयस्त्वं रणेऽरीणामपि वज्रभृतः स्वयम् ।
इत्येवमुक्त्वा वरदा क्षणेनांतरधीयत ॥ १९ ॥ 
लब्ध्वा वरं तु कौंतेयो मेने विजयमात्मनः ।
आरुरोह ततः पार्थो रथं परमसंमतम् ॥ २० ॥
कृष्णार्जुनावेकरथौ दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ।
य इदं पठते स्तोत्रं कल्प उत्थाय मानवः ॥ २१ ॥
यक्षरक्षः पिशाचेभ्यो न भयं विद्यते सदा ।
न चापि रिपवस्तेभ्यः सर्पाद्या ये च दंष्ट्रिणः ॥ २२ ॥
न भयं विद्यते तस्य सदा राजकुलादपि ।
विवादे जयमाप्नोति बद्धो मुच्येत बंधनात् ॥ २३ ॥
दुर्गं तरति चावश्यं तथा चोरैर्विमुच्यते ।
संग्रामे विजयेन्नित्यं लक्ष्मी प्राप्नोति केवलाम् ॥ २४ ॥
आरोग्यबलसंपन्नो जीवेद्वर्षशतं तथा ।
एतद् दृष्टं प्रसादात्तु मया व्यासस्य धीमतः ॥ २५ ॥
इति श्रीमन्महाभारते शतसाहस्त्र्यां संहितायां वैयासिक्यां भीष्मपर्वणि भगवद्गीतापर्वणि दुर्गास्तोत्रे त्रयोविंशोऽध्यायः ॥  
 Durga Stotra (Sanskrit)
दुर्गास्तोत्र (संस्कृत)


Custom Search

Tuesday, July 17, 2018

श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रम् चा भाग 3 मुख्य कवच Shri Dattatreya VajraKavacha Stotra Part 3 of 4

Shri Dattateya VajraKavacha Stotram Part 3
This VajraKavacha Stotram is in Sanskrit. This is told to Goddess Parvati by God Shiva for the benefit of the people/devotees of God Dattatreya. I am uploading this Dattateya VajraKavacha Stotram in four parts as it is very long. However every part is important. Hence the devotee of God Dattatreya has to listen and recite all four parts to receive all the benefits described in the last i.e. 4th part (Falashruti).
Part 3 Main Part.
VajraKavacham
Shri Dattatreya, who lives in head (Bramrandra chakra) a lotus having thousand petals, protects my head. I am asking son of Anusuya, who lives in CahandraMandala ; to protect my forehead. Thus a request is made to God Dattatreya to protect eyes, ears, tongue, nose, lips, chicks, mouth, chest, heart, ribs, stomach, hands, shoulders, legs, thighs, thus each and every part of the body. Further a request is also made to God to protect the body from all ten directions i.e. east, west, north, south etc.
Then a devotee is asked to recite a japa “Dram” 108 times. It is assured by God Dattatreya himself that the devotee will have a strong body, healthy, long life, free from a untimely death after reciting this Kavacham with devotion, concentration and faith.
At the end of this 3rd part Goddess Parvati is asking God Shiva; how many times, when and how this kavacham is to be recited by the devotees. Hence in the 4th and last part of this Shri Dattatreya VajraKavacham Stotram, God Shiva is telling how to recite this kavacham and the Falshruti.

श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रम् चा भाग 3
अथ वज्रकवचं II
ओम दत्तात्रेय शिर: पातु सहस्राब्जेषु संस्थितः I
भालं पात्वानसूयेय: चंद्रमंडलमध्यग: II १ II
१) मस्तकांतील सहस्रदलीय कमलांत वास करणारे श्री दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. चंद्रमंडळात राहणारे अनसूयेचे पुत्र श्रीदत्तात्रेय माझ्या कपाळाचे रक्षण करोत.
कुर्च मनोमय: पातु हं क्षं द्विदलपद्मभू: I
ज्योती रूपोSक्षिणी पातु पातु शब्दात्मक: श्रुती II २ II
२) मनोमय असणारे श्रीदत्तात्रेय माझ्या हनुवटीचे रक्षण करोत. हं व क्षं या बिजाक्षरांच्या रूपाने द्विदलकमलांत म्हणजे आज्ञा चक्रांत राहणारे श्रीदत्तात्रेय आमचे रक्षण करोत. ज्योती: स्वरूपधारी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन डोळ्यांचे रक्षण करोत. शब्दरूपी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन कानांचे रक्षण करोत.
नासिकां पातु गंधात्मा मुखं पातु रसात्मक: I
जिव्हां वेदात्मक: पातु दन्तोष्ठौ पातु धार्मिकः II ३ II
कपोलावत्रिभू: पातु पात्वशेषं ममात्मवित् I
स्वरात्मा षोडशाराब्जस्थित:स्वात्माSवताद् गलम् II ४ II
३-४) गंधात्मा म्हणजे सुगंधांत राहणारे श्रीदत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. रसात्मा श्रीदत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत. वेदात्मा श्रीदत्तात्रेय माझ्या जिव्हेचे व धार्मिक श्रीदत्तात्रेय माझ्या दातांचे व ओठांचे रक्षण करोत. अत्री ऋषींपासून उत्पन्न झालेले श्रीदत्तात्रेय माझ्या दोन गालांचे रक्षण करोत. आत्मवेत्ते श्रीदत्तात्रेय सर्व दृष्ट्या माझ्या सर्वांगाचे रक्षण करोत. १६ पाकळ्यांच्या कमलांत राहणारे स्वरूप आत्मा असलेले श्रीदत्तात्रेय माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत.
स्कन्धौ चंद्रानुज: पातु भुजौ पातु कृतादिभूः I
जत्रुणी शत्रुजित् पातु पातु वक्षःस्थलं हरिः II ५ II
कादिठांतद्वादशारपद्मगो मरुदात्मकाः I
योगीश्वरेश्वरः पातु हृदयं हृदयस्थितः II ६ II
५-६) चंद्राचा बंधू असलेले श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करोत. कृतादीयुगांच्या आदी असणारे श्रीदत्तात्रेय माझ्या भूज्यांचे रक्षण करोत. शत्रूंना जिंकणारे श्रीदत्तात्रेय हे माझ्या खांद्याच्या सांध्यांचे रक्षण करोत. हरिरूप श्रीदत्तात्रेय माझ्या छातीचे रक्षण करोत. ककारापासून ठकारापर्यंतच्या बारा पाकळ्यांच्या कमलांत राहणारे श्रीदत्तात्रेय वायुरूपी आहेत ते माझे प्राण रक्षण करोत. योगीश्वरेश्वर श्रीदत्तात्रेय हे हृदयांत राहणारे आहेत. ते माझ्या हृदयाचे रक्षण करोत.
पार्श्वे हरिः पार्श्ववर्ती पातु पार्श्वस्थितः स्मृतः I
हठयोगादियोगज्ञः कुक्षी पातु कृपानिधि: II ७ II
डकारादिफकारान्तदशारसरसीरुहे I
नाभिस्थले वर्तमानो नाभि वन्ह्यात्मकोSवतु II ८ II
वन्हितत्त्वमयो योगी रक्षतान्मणि पूरकम् I
कटिं कटिस्थब्रम्हांड वासुदेवात्मकोSवतु II ९ II
७-८-९) पार्श्ववर्ती म्हणजे बरगड्यांत राहणारे श्रीदत्तात्रेय हे माझ्या बरगड्यांचे रक्षण करोत. हटयोगादि योगांना जाणणारे कृपानिधी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही कुशींचे म्हणजे पोटाचे रक्षण करोत. डकारापासून फकारापर्यंत असलेल्या दहा शब्दांनीयुक्त अशा दहा पाकळ्यांच्या कमलरूप नाभि स्थानात राहणारे अग्निरूपी प्रभू दत्तात्रेय हे माझ्या बेंबीचे रक्षण करोत. अग्नित्तत्वमय योगी श्रीदत्तात्रेय माझ्या मणिपूर चक्राचे रक्षण करोत. कटी स्थानीय ब्रह्मांडमय श्रीवासुदेव प्रभू श्रीदत्तात्रेय माझ्या कंबरेचे रक्षण करोत.
वकारादिळकारान्तषट्पत्रां बुजबोधकाः I
जलतत्त्वमयो योगी स्वाधिष्ठानं ममावतु II १० II
१०) वकारापासून ळकारापर्यंत असलेल्या अशा सहा शब्दांनी अंकित असलेल्या सहा पाकळ्यांच्या कमळास जागे करणाऱ्या जलतत्तवमय योगी श्रीदत्तात्रेय माझ्या स्वाधिष्ठान चक्राचे पालन करोत. ( मला स्वकार्य करण्याची स्फूर्ती देवोत.)
सिद्धासनसमासीन ऊरू सिद्धेश्वरोSवतु I
वादिसांतचतुष्पत्रसरोरुहनिबोधक: II ११ II
मूलाधारमं महीरूपो रक्षताद्विर्यनिग्रही I
पृष्टं च सर्वतः पातु जानुन्यस्तकरांबुजः II १२ II
११-१२) सिद्धासनांत बसणारे व सिद्धांचे नियंते अर्थात् नियामक प्रभू श्रीदत्तात्रेय माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. वकारापासून सकारापर्यंत चार शब्दांनी अंकित असलेल्या चार पाकळ्यांच्या कमळास हे श्रीदत्तात्रेय उमलवितात. पृथ्वीरूपी वीर्य किंवा शुक्राचा निरोध करणाऱ्या अशा श्रीदत्तात्रेयांनी माझ्या मूलाधाराचे रक्षण करावे. गुडघ्यावर हात ठेवून बसलेल्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या पृष्ठभागाचे रक्षण करावे. 
जंघे पात्ववधूतेंद्रः पात्वंघ्री तीर्थपावनः I
सर्वांगं पातु सर्वात्मा रोमाण्यवतु केशवः II १३ II
१३) अवधूतांमध्ये श्रेष्ट श्रीदत्तात्रेय माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करोत. तीर्थानाही पावन करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही पायांचे रक्षण करोत. सर्वस्वरूपी श्रीदत्तात्रेयांनी माझ्या सर्वांगाचे अर्थात् सर्व अवयवांचे रक्षण करावे. केशवस्वरूपी श्रीदत्तात्रेयांनी माझ्या अंगावरील रोमांचे म्हणजे केसांचे रक्षण करावे.
चर्म चर्माम्बर:पातु रक्तं भक्तिप्रियोSवतु I
मांसं मांसकरः पातु मज्जामज्जात्मकोSवतु II १४ II
१४) वाघाचे कातडे पांघरणारे श्रीदत्तात्रेय माझ्या चर्माचे रक्षण करोत. भक्तीप्रिय श्रीदत्तात्रेय माझ्या रक्ताचे रक्षण करोत. मांसल अर्थात पुष्ट हातांच्या श्रीदत्तात्रेयांनी माझे मांस रक्षण करावे. मज्जांचा आत्मा अशा श्रीदत्तात्रेयांनी माझ्या शरीरांतील सर्व नाड्यांचे रक्षण करावे.
अस्थीनिस्तिरधी: पायान्मेधां वेधाः प्रपालयेत् I
शुक्रं सुखकरः पातु चित्तं पातु दृढाकृतिः II१५ II
१५) स्थिर बुद्धिच्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या अस्थींचे रक्षण करावे. सृष्टी उत्पन्न करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या धारणाशक्तीचे रक्षण करावे. सुख देणारे श्रीदत्तात्रेय माझ्या वीर्याचे रक्षण करोत. बळकट शरीर असलेल्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या चित्ताचे रक्षण करावे.
मनोबुद्धिमहंकारं हृषीकेशात्मकोSवतु I
कर्मेंद्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेंद्रियाण्यजः II १६ II
१६) हृषीकेशात्मक श्री दत्तात्रेयांनी माझ्या मनाचे, बुद्धिचे व अहंकाराचे रक्षण करावे. ईशाने अर्थांत परमेश्वराने ( श्री दत्तात्रेयांनी ) माझ्या कर्मेंद्रियांचे रक्षण करावे आणि जन्मरहित असलेल्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या ज्ञानेंद्रियांचे रक्षण करावे.
बंधून् बंधूत्तमः पायाच्छत्रुभ्य: पातु शत्रुजित् I
गृहारामधनक्षेत्रपुत्रादी:छन्करोSवतु II १७ II
१७) जिवलगश्रेष्ट व बंधूश्रेष्ट श्रीदत्तात्रेयांनी आमच्या बांधवांचे रक्षण करावे. शत्रूंना पराभूत करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी शत्रूंपासून आमचे रक्षण करावे. शंकरांनी अर्थांत कल्याण करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी आमचे घर, बाग, बगीचा, शेतीवाडी व पुत्रादिकांचे रक्षण करावे.
भार्यां प्रकृतिवित् पातु पश्वादीन्पातु शांर्गभृत् I
प्राणान्पातु प्रधानज्ञो भक्ष्यादीन्पातु भास्करः II १८ II
१८) त्रिगुणात्मक प्रकृतीचे ज्ञाते श्रीदत्तात्रेय माझ्या पत्नीचे रक्षण करोत. शांर्गधनुर्धारी श्रीदत्तात्रेय माझे गायी, घोडे इत्यादि पशूंचे रक्षण करोत. प्रधानरुपी पुरुषाला जाणणारे श्रीदत्तात्रेय आमच्या पंचप्राणांचे रक्षण करोत. भास्कराने अर्थांत प्रकाशकर्त्या श्रीदत्तात्रेयांनी आमच्या भक्ष्य पदार्थांचे रक्षण करावे.
सुखं चंद्रात्मकः पातु दुःखात् पातु पुरांतकाः I
पशुन्पशुपतिः पातु भूतिं भूतेश्वरो मम II १९ II 
१९) चंद्रात्मक श्रीदत्तात्रेयांनी माझ्या सुखाचे रक्षण करावे. पुरांतकांनी म्हणजे त्रिपुरांतकांनी अर्थांत श्रीशिवशंकर स्वरुपी श्रीदत्तात्रेयांनी दु:खांपासून आमचे रक्षण करावे. पशुपतींनी पशूंचे व भूतेश्वराने अर्थात् पृथ्व्यादिभूतस्वामींनी म्हणजे श्रीदत्तात्रेयांनी माझ्या ऐश्वर्याचे रक्षण करावे.
प्राच्यां विषहरः पातु पात्वाग्नेय्यां मखात्मकः I 
याम्यां धर्मात्मकः पातु नैऋत्यां सर्ववैरीहृत् II २० II
२०) विषनाशक श्रीदत्तात्रेयांनी पूर्व दिशेला माझे रक्षण करावे. यज्ञरूप श्रीदत्तात्रेयांनी आग्नेय दिशेला माझे रक्षण करावे. यमधर्म रूपाने श्रीदत्तात्रेयांनी दक्षिणेला व सर्ववैरिनाशक श्रीदत्तात्रेयांनी नैऋत्येस माझे रक्षण करावे.
वराह: पातु वारुण्यां वायव्यां प्राणदोSवतु I 
कौबेर्यां धनदः पातु पात्वैशान्यां महागुरुः II २१ II 
२१) श्रीदत्तात्रेयांनी वराहरुपाने पश्चिमेला व प्राणदात्या श्रीदत्तात्रेयांनी वायव्यदिशेला माझे रक्षण करावे. उत्तरद्विभागी कुबेररुपाने आणि ईश्यान्य द्विभागी महागुरू शिवरुपाने श्रीदत्तात्रेयांनी माझे रक्षण करावे.
ऊर्ध्वं पातु महासिद्धाः पात्वधस्ताज्जटाधरः I 
रक्षाहीनं तु यत्स्थानं रक्षत्वादीमुनीश्वरः II २२ II 
२२) ऊर्द्वभागी महासिद्धरुपाने व अधोभागी जटाधारी प्रभुरुपाने श्रीदत्तात्रेयांनी आमचे रक्षण करावे. जे स्थान रक्षण करण्याच्या यादींतून राहिले असेल त्याचे रक्षण मुनीश्वरांमध्ये पहिले असलेल्या व अग्रभागी असणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी करावे.
मालामंत्र जपः II हृदयादिन्यासः II 
यानंतर मालामंत्र जप करावा. ओम द्रां १०८ वेळा म्हणावे व हृदयादिन्यास करावेत.
ओम द्रां हृदयाय नमः II ओम द्रीं शिरसे स्वाहा II
ओम द्रूम् शिखायै वषट् II ओम द्रैम् कवचाय हुं II
ओम द्रौं नेत्रत्रयाय वौषट् II ओम अस्त्राय फट् II
एतन्मे वज्रकवचं यः पठेत् शृणुयादपि I 
वज्रकायः चिरंजीवी दत्तात्रेयोSहमब्रुवं II २३ II 
२३) हे माझे वज्रकवच जो पठण करील किंवा श्रवण करील तरीहि तो दृढ शरीरी होईल. तो चिरंजीव होईल व पुष्कळ दिवस जगेल. अल्पायु होणार नाही व अकाली मरणार नाही. हे मी स्वत: श्रीदत्तात्रेय सांगतो आहे.
त्यागी भोगी महायोगी सुखदुःखविवर्जितः I  
सर्वत्रसिद्धसंकल्पो जीवन्मुक्तोSद्य वर्तते II २४ II
२४) हे माझे वज्रकवच जो पठण करील किंवा श्रवण करील तरीहि तो विरक्त होईल. विषयभोक्ता होईल व महान योगी होईल.त्याला सुख-दु:खे असणार नाहीत. त्याचे संकल्प कोठेही सिद्ध अर्थांत् पूर्ण होतील. तो जीवन मुक्तच आहे असे समजा.
इत्युक्वाSन्तर्दधे योगी दत्तात्रेयो दिगंबरः I 
दलादनोSपि तज्जप्त्वा जीवन्मुक्तः स वर्तते II २५ II  
भिल्लो दूरश्रवा नाम तदानीं श्रुतवानिदम् I 
सकृत् श्रवणमात्रेण वज्रांगोSभवदप्यसौ II २६ II 
२५-२६) असे बोलून श्रीदिगंबर योगीराज दत्तप्रभू अंतर्धान पावले. या वज्रकवचाचे पठणजपादि करून श्रीदलादनमुनीही जीवनमुक्त झाले. श्रीदलादनमुनींचे वज्रकवच पठण त्या दूरश्रवा भिल्लाने एकदाचा ऐकून तो वज्रशरीरी झाला.
इत्येतद्वज्रकवचं दत्तात्रेयस्य योगिनः I 
श्रुत्वाशेषं शंभूमुखात् पुनरप्याह पार्वती II २७ II   
कोणी, कोठे व केंव्हा याचा जप करावा? आणि कसा व किती करावा? आणि फलश्रुती
२७) श्रीशंभूदेवांच्या मुखाने श्रीयोगिवर्य दत्तात्रेयांचे हे वज्रकवच पूर्णपणे ऐकून श्रीपार्वतीने त्यांना पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले.
पार्वत्युवाच
एतत्कवचमाहात्म्यं वद विस्तरतो मम ।
कुत्र केन कदा जाप्यं किं यज्जाप्यं कथं कथम् ॥ २८ ॥
पार्वतीने विचारले:
२८) श्रीपार्वतीने विचारले की, हे शिवा ! या कवचाचे माहात्म्य मला विस्ताराने सांगा. कोणी, कोठे व केंव्हा याचा जप करावा? आणि कसा व किती करावा?
Shri Dattateya VajraKavacha Stotram Part 3








Custom Search


Monday, July 16, 2018

Renukechi Aarati रेणुकेची आरती


Renukechi Aarati 
Renukechi Aarati it is composed by Shrimati Saraswatibai Soman in Marathi. It is a beautiful creation of Aarati.
रेणुकेची आरती
जयजयकार प्रेमे करु तव रेणुका माते, रेणुका माते ।
निज भक्तासि अक्षयसुख देशि कृपावंते ॥ ध्रु. ॥
जमदग्नि मुनी तपोनिधींच्या वामांकी वससी ।
अगाध महिमा सांगति शिवप्रभु कार्तीकेयासी ।
विश्र्वाचे तव वैभव अंबे करुणासागरे ।
उपासना तव करिति देवगण नाना उपचारे ।
पराक्रमाचा पुतळा परशूरामाची माता ।
दुष्टां मर्दुनि भारतवर्षा उज्जवल करि आता ॥ १ ॥ ॥ धृव ॥
अनंतरुपें अनंतनामे जगती वावरशी ।
अंतर्यामी जागृति देईं सार्‍या जनतेसी ।
सत्वर करि गे प्रकट पराक्रम स्वाभिमान रक्षीं ।
क्षात्रतेज दशदिाशा उजाळुनि असुरांना भक्षी ।
अनुदिनी चढती कळा देईं जे जशी शुक्ल पक्षी ।
भाग्यचंद्र अक्षय्य रजनिचा सदोदीत रक्षी ॥ २ ॥ धृव. ॥
सत्कीर्तीच्या भरजरि वसना रेखिव काचोळी ।
साज तुझा किति नयनमनोहर शिरि मौत्त्किकजाळी ।
कंठि हार तव नवरत्नांचे (नररत्नांचे) सतत शोभिवंत ।
मिरवी मेखला शौर्याची गे शोभवि कटिप्रांत ।
सुढाळ मौत्त्किक नाकि तुझ्या गे कर्णफुले कानीं ।
बिंदि बिजवरा हस्तभूषणें पैंजण तव चरणी ॥ ३ ॥ ध्रुव. ॥
अलंकारमंडिता परी तू प्रहरणाधारीणी ।
उद्धारिणि आपदाहारिणी सुजना तारीणी ।
मृगमद केशर कुंकुम भाळी चंद्रकोर साजे ।
जयजयकारे मंगलचारे तंतुवाद्य वाजे ।
गाऊ तव स्तुतिस्तोत्र रेणुके नाचू आनंदे ।
विजयोल्हासे धरणी अंबर दुमदुमवू नादे ।॥ ४ ॥ ध्रुव ॥
तपस्विनी मानिनी प्रभावति तेजस्विनि मूर्ती ।
अन्यायाचे पारिपत्य करि अशीच तव कीर्ती ।
यशोनिधी करि भारत आपुला देवांचा हा देश ।
सुसंपन्न सामर्थ्यवान हा मंगलमय आदेश ।
धन्य भारता देव देवता तुझिया क्षेत्रांत ।
सर्व देसी आगळा चंद्रमा जे नक्षत्रांत ॥ ५ ॥ ध्रुव ॥
माते निज कर्णांनी आम्ही मंगल ऐकावे ।
नेत्रांनी शुभ नित्य पाहावे दृढदेही व्हावे ।
सुदृढ अंगे सेवा करु तव जोवरि जीवनप्राण-
सत्कार्यचि आम्ही नित्य करावे हेचि देई वरदान ।
ठेवा आपुल्या पुण्याईचा मेवा मोक्षाचा ।
सरस्वतीसह लाभ घेउ गे तुझ्या प्रसादाचा ॥ ६ ॥ ध्रुव. ॥
Renukechi Aarati 
रेणुकेची आरती






Custom Search

Sunday, July 15, 2018

Bahya Shanti Sukta बाह्य शांती सूक्त


Bahya Shanti Sukta 
It is from Atarva Veda. These are the Ruchas found in Atharv Ved. It is understood that, this is for receiving blessings from our Pitrues. It is required to recite this sukta every day in the morning after bath. It is learned that, This also brings blessings from our Kuldevata.
बाह्य शांती सूक्त
नमो वः पितरो, यच्छिवं तस्मै नमो, पितरो यत् स्योनं तस्मै ।
नमो यः पितरः, स्वधा वः पितरः ॥ १ ॥
नमोऽस्तु ते निर्ऋते, तिग्म-तेजोऽमस्ययान विचृता बन्ध-पाशान् ।
यमो मह्यं पुनरित् त्वां ददाति । तस्मै यमाय नमोऽस्तु मृत्यवे ॥ २ ॥
नमोऽस्वसिताय नमस्तिरश्चिराजये ।
स्वजाय बभ्रवे नमो नमो देव-जनेभ्यः ॥ ३ ॥
नमः शिताय, तक्मने, नमो रुराय शोचिषे कृणोमि ।
यो अन्येद्युरुभयद्युरभ्येति, तृतिय-काय नमोअस्तु तक्मने ॥ ४ ॥
नमस्ते अधिवाकाय, परावाकाय ते नमः ।
सु-मत्यै मृत्यो ते नमो, दुर्मत्यै त इदं नमः ॥ ५ ॥
नमस्ते यातुधानेभ्यो, नमस्ते भेषजेभ्यः ।
नमस्ते मृत्यो मूलेभ्यो, ब्राह्मणेभ्य इदं नमः ॥ ६ ॥
नमो देव-वधेभ्यो, नमो राजवधेभ्यः ।
अथो ये विश्यानां, वधास्तेभ्यो मृत्यो नमोऽस्तु ते ॥ ७ ॥
नमस्तेअस्तु नारदा नुष्ठ विदुषे वशा ।
कतमासां भीम-तमा यामदत्वा पराभवेत् ॥ ८ ॥
नमस्तेअस्तु विद्युते, नमस्ते स्तनयित्नवे । 
नमस्तेअस्त्वश्मने, येना दूडाशे अस्यसि ॥ ९ ॥
नमस्तेअस्त्वायते नमोअस्तु पराय ते ।           
नमस्ते प्राण तिष्ठत, आसीनायोत ते नमः ॥ १० ॥
नमस्तेऽस्त्वायते नमोअस्तु पराय ते ।
नमस्ते रुद्र तिष्ठत, आसीनायोत ते नमः ॥ ११ ॥
नमस्ते जायमानायै, जाताया उत ते नमः ।
वालेभ्यः शफेभ्यो, रुपायाध्न्येध्न्ये नमः ॥ १२ ॥
नमस्ते प्राण-क्रन्दाय, नमस्ते स्तनयित्नवे ।
नमस्ते प्राण-विद्युते, नमस्ते प्राण-वर्षते ॥ १३ ॥
नमस्ते प्राण प्राणते, नमोअस्त्वपानते ।
पराचीनाय ते नमः, प्रतीचीनाय ते नमः, सर्वस्मै त इदं नमः ॥ १४ ॥
नमस्ते राजन् वरुणास्तु मन्यवे, विश्व ह्युग्र निचिकेषि द्रुग्धम् ।
सहस्त्रमन्यान् प्र सुवामि, साकं शतं जीवति शरदस्तवायम् ॥ १५ ॥
नमस्ते रुद्रास्यते, नमः प्रतिहितायै ।
नमो विसृज्य-मानायै, नमो निपतितायै ॥ १६ ॥  
नमस्ते लाङ्गलेभ्यो, नम ईषायुगेभ्यह ।
वीरुत् क्षेत्रिय-नाशन्यप क्षेत्रियमुच्छतु ॥ १७ ॥
नमो गन्धर्वस्य, नमसे नमो भामाय चक्षुषे च कृण्मः ।
विश्वावसो ब्रह्मणा ते नमोऽभि जाया अप्सरसः परेहि ॥ १८ ॥
नमो यमाय, नमोअस्तु मृत्यवे, नमः पितृभ्य उतये नयन्ति ।
उत्पारणस्य यो वेद, तमग्निं पुरो दधेऽस्मा अरिष्टतातये ॥ १९ ॥
नमो रुद्राय, नमोऽस्तु तक्मने, नमो राज्ञे वरुणायं त्विषीमते ।
नमो दिवे, नमः पृथिव्यै, नमः औषधीभ्यः ॥ २० ॥
नमो रुराय च्यवनाय, नोदनाय, धृष्णवे ।
नमः शीताय, पुर्व काम कृत्वने ॥ २१ ॥
नमो वः पितर ऊर्जे, नमो वः पितरो रसाय ॥ २२ ॥
नमो वः पितरो भामाय, नमो वः पितरो मन्यवे ॥ २३ ॥  
नमो वः पितरो यद्-घोरं, तस्मै नमो वः पितरो, 
यत] क्रूरं तस्मै ॥ २४ ॥
हे सूक्त रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्याआधी म्हणतात. दक्षिणेकडे तोंड करुन बसून म्हणावे. तूप व तीळाचे हवन गोवरीच्या तुकड्यावर करतात. कामांत यश. सहकार्य, पितरांचे आशिर्वाद व कुलदेवताही प्रस्न्न होतात.
Bahya Shanti Sukta 
बाह्य शांती सूक्त


Custom Search

Tuesday, July 10, 2018

Shri Renuka Sahasra Nam Stotra श्रीरेणुका सहस्त्रनाम स्तोत्र


Shri Renuka Sahasra Nam Stotra 
Shri Renuka Sahasra Nam Stotra is from Padmpuran. It is in Sanskrit. However it is translated in Marathi by Smt. Saraswati Sane. It is created very nicely for us and easy to understand. This Stotra is very pious. Many people read or listen it in Navaratra. i.e in the month of Aswin.
श्रीरेणुका सहस्त्रनाम स्तोत्र 
श्री गणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीगुरुभ्यो नमः । श्रीरेणुकायै नमः ।
वन्दू प्रथमारंभी गौरीपुत्र । आम्हा जयाचे कृपाछत्र ।
लाभलियावरी पवित्र । ग्रंथ पावन लिहू प्रेमे ॥ १ ॥
शारदामाता जगज्जननी । श्रीसद्गुरु कैवल्यदानी ।
वाडेश्र्वर योगेश्र्वरी कुलस्वामिनी । रेणुकामाता ॥ २ ॥
तूचि माझी सौख्यखाणी । तूचि माझी हृदयवासिनी ।
तूचि माझी गे निर्झरिणी । लेखणी ग्रंथ लेखिका ॥ ३ ॥
आम्ही सर्वस्वी तुझे आधीन । शिवमुखीचे लिहीत वचन ।
जो का स्कंदासही पडला प्रश्र्ण । लोकोपकारा कारणे ॥ ४ ॥
जैसे एका कुपीतुनी अत्तर । दुजीत ओतिता सत्वर ।
गळेल थोडेतरी साचार । सुगंधही जाय हवेमध्ये ॥ ५ ॥
रेणुका सहस्त्रनाम स्तोत्र । वर्णिले पद्मपुराणात ।
ते संस्कृतातूनि मराठीत । आणिता तैसेचि होतसे ॥ ६ ॥
शरण तुजसी आलियावर । न्यून्य ते पूर्ण करिशी तू हा निर्धार ।
धरियेला दृढ आधार । निश्र्चिंतपणें तुझा हो ॥ ७ ॥
प्रास्ताविक
रम्य पर्वत शिखरावर । बैसले स्वानंदे शंकर ।
जे का सकलांसी सुखकर । स्कंद तयांसी वंदीतसे ॥ ८ ॥
म्हणे ताता सर्वेश्र्वरा । जे का कल्याणकारी सर्वत्रा ।
ते रहस्य सांगाहो दातारा । जन उत्कर्षाकारणे ॥ ९ ॥
नाशील सर्व ही संकटे । निवारील घोर अरिष्टे ।
विजय लाभ बल उत्कृष्टे । वांछितार्थ प्राप्त होती ॥ १० ॥
शंकर हर्षे उल्हासे म्हणती । ऐके कार्तिकेया सुमती ।
कथितो अमौल्य रहस्य तुजप्रती । दृढ भरवसा पाहिजे ॥ ११ ॥
स्वभावेचि वेद देव । युगोयुगी क्षीणवीर्य होती सर्व ।
तरी अक्षीणपुण्य उपाय । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १२ ॥
ते हे रेणुकासहस्त्रनाम । महाप्रभावी सर्वोत्तम ।
ज्ञान चात्तुर्य पराक्रम । ज्यांत अमोल भरलासे ॥ १३ ॥
त्रिपुरदाहसमयी विषप्राशनी । मीही स्वये रेणुका ध्यानी ।
रतलो तैसाचि समुद्रमंथनी । श्रीहरीही स्मरत होता ॥ १४ ॥
स्मरे ब्रह्मा सृष्टिकारणे। ध्याता शेष जगती धारणे ।
विनायकही इयेचे स्मरणे । विघ्नहरणा समर्थ झाला ॥ १५ ॥             
अधिक काय सांगू तुजसी पुत्रा । मम आज्ञेने तुझी माता । 
हैमवतीही रेणुकेसी ध्याता । परमानंदे डोलत ॥ १६ ॥
महत्कार्य आरंभिता  । भावे पूजावी रेणुका माता ।
सत्कार्यीं सुयश येईल हाता । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १७ ॥
रेणुकासहस्त्रनाम संकल्प 
स्वस्तिः श्रीरेणुकासहस्त्रनाम स्तोत्र । त्र्यंबक ऋषी रेणुका दैवत ।
अनुष्टुप् छंद प्रकीर्तीत। सर्वकाळ स्मरण करी ॥ १ ॥
सर्वपापक्षयार्थ । श्रीजगदंबा रेणुका प्रीत्यर्थ ।
सर्वअभीष्ट फलप्राप्त्यर्थ । विनियोग बोलिला असे ॥ २ ॥
सर्व इंद्रियांसह व्हावे अर्पण । तयासीच म्हणती आत्मसमर्पण ।
तेचि अंगन्यासाचे प्रकार जाण । हृदयीं सर्व जाणावे ॥ ३ ॥
ॐ नमो रेणुका रामजननी । महापूरनिवासिनी । 
एकवीरा कालरात्री व्यपिनी । आदि अंती एकला ॥ ४ ॥
अथ ध्यानम् 
ध्यायेन्नित्यमपूर्ववेषललितां कंदर्पलावण्यदां 
देवीं देवगणै रुपास्यचरणां कारुण्यरत्नाकराम् ।
लीलाविग्रहिणीं विराजितभुजां सच्चंद्रहासादिभिर्भक्तानंदविघायिनीं 
प्रमुदितां नित्योत्सवां रेणुकाम् ॥ १ ॥
स्तोत्रारंभ
ॐ नमो रेणुका रामजननी । सती जमदग्नी प्रियकरिणी ।
महामाया एकवीरा कालरजनी । महादीप्ती शिवात्मिका ॥ १ ॥
महामोहा सिद्धविद्या । सरस्वती योगिनी सिद्धा ।
चंद्रिका सिद्धलक्ष्मी शुद्धा । कामजननी शिवप्रिया ॥ २ ॥
कामदा मातृका मंत्रसिद्धिदा । महालक्ष्मी योगनिद्रा ।
मातृमंडलवल्लभा मंत्रसिद्धिदा । योगदात्री प्रभावती ॥ ३ ॥ 
चंडिका शुचिस्मिता चंद्रकांती । योगेश्र्वरी योगनिद्रा सूर्यकांती ।
अनादि अनंतास्वरुपा ती । क्रोधरुपा महागती ॥ ४ ॥
श्री मातृकापति हृत्क्रोशा । मनःश्रुतिस्मृति रसना रसा ।
वाचा चक्षू घ्राण त्वचा । चंडहासा महावरा ॥ ५ ॥
रथस्थिता महाशूरा । महाचापा महावीरा ।
चतुर्भुजा बर्हिपत्रा (मोरपीस) । बर्हिपत्रप्रियातनू ॥ ६ ॥
नादलुब्धा नादप्रीया । अमृतजीवनी अक्षया ।
पात्रशालिनी अमृतप्रीया । सिंधुप्राशिनी विराट्तनू ॥ ७ ॥
चंढासधराशूरा । डमरुमालिनी शिरोधरा ।
वरवर्णिनी वरदा वीरा । वेदजननी त्रीमूर्ती ॥ ८ ॥
तपोनिधी वेदविद्या । परा तपोलक्ष्मी सिद्धिदा ।
सात्विकी तपस्विनी परमशुद्धा । रक्तदंतिका रजोगुणी ॥ ९ ॥
शांता एकला रेणुतनया । कामाक्षी ऐंद्री ब्राह्मी माया ।
सत्परायणा महेशजाया । वडवानला वैष्णवी ॥ १० ॥
कौबेरी धनदा याम्या आग्नेयी । नैर्ऋत्यी ईशान्यी वायुमयी ।
समा वारुणी माहेंद्री साममयी । नरवल्लभा नवार्णा ॥ ११ ॥
सर्वऋषींचे ध्येयरुपिणी । भिल्लीवेषधारिणी भिल्लिणी ।
बर्बरी गूढभाषाखाणी । बर्बरालकामंडिता ॥ १२ ॥
गुंजाहारविभूषणी । श्यामामयूरपिच्छाभरणी ।
शृंगिवादनसुरसा प्रियभाषिणी । रेणुदुहिता शिवपूज्या ॥ १३ ॥
शिवा कालिका प्रियंवदा । सृष्टिकर्ती स्थितिकर्ती क्रुद्धा ।
रक्षोघ्नी पृथ्वी स्वाहा स्वधा । नारदसेविता नमो मनू ॥ १४ ॥
दैत्यसंहारकारिणी । चंद्रशेखरा हुंकारभाषिणी ।
फट्कारेंचि शत्रुनाशिनी । वौषट् वषट् रुपात् ॥ १५ ॥
निद्रा जागृती सुषुप्ती । स्वप्ना तुर्या चक्रिणी गती ।       
देही कुंडलिनी जागृती । तूचि सत्राची ज्ञानकळा ॥ १६ ॥
सीता अहल्या अरुंधती । तारा मंदोदरी आदिती ।
भीमा नर्मदा भागीरथी । मही गौतमी कावेरी ॥ १७ ॥
शरयू गोमती चंद्रभागा । त्रिवेणी गंडकी रेवा गंगा ।
मानससरोवरी वेदिका । मणिकर्णिका पुण्यनदी ॥ १८ ॥
दत्तात्रेयनिवासभूमी । हरिद्वारभूमी मातापूरभूमी ।
मातृकास्थानव्याप्तस्वयंभूमी । मातृमंडलमंडिता ॥ १९ ॥
मातृमंडलमध्यगामिनी । मातृमंडलसंपूजिनी ।
कोल्हापुरनिवासिनी । मंदाकिनी भोगावती ॥ २० ॥
इडा पिंगला सुषुम्ना । षट्चक्रदेवता ज्ञानजन्या ।
चंद्रसूर्यगतिज्ञाना । सर्वविद्या तत्त्वज्ञा ॥ २१ ॥
दत्तमाता अनसूया । जमदग्नीश्र्वरप्रीयजाया ।
सर्वरुपा सुखाश्रया । सर्वेश्र्वरी सर्वज्ञा ॥ २२ ॥
पुण्येश्र्वरी पापेश्र्वरी । भोगप्रवर्तिनी कीर्ति भोत्र्की ।
जमदग्नितमोहन्त्री । जमदग्नीसुखैकभू ॥ २३ ॥
कालकामपरशुरामजननी । कविशक्ती कवित्वदायिनी ।
मुक्तिदा ॐकाररुपिणी । ऐंकार रुपिणी वैखरी ॥ २४ ॥
र्‍हींकार अंबा तमोरुपा । कामदायिनी क्लींकाररुपा । 
श्रींकारबीजा अखिलदानरुपा । बीजरुपे नमोस्तु ते ॥ २५ ॥
सर्चबीजा आत्मभूमी । धर्म अर्थ काम मोक्ष दायिनी ।
जमदग्नीसौख्यभूमी । जमदग्नीक्रोधहरा ॥ २६ ॥
जमदग्नीआज्ञाधारिणी । जमदग्नी वामांकवासिनी ।
जीतवीरा वीरजननी । वीरभू वीरसेविता ॥ २७ ॥
वीरदिक्षिता सर्वमंगला । शौर्यदीक्षिता कालकाला ।
कात्यायनिपरिवारा मंगला । निराकारा साकारा ॥ २८ ॥  
अष्टसिद्धिप्रदायिनी । क्रूरग्रहविनाशिनी ।
अक्रूरा सम्मता विषमघ्नी । विषासना विषहंत्री ॥ २९ ॥
अहंकारा कारणाकृती । व्यालाभरणा संतुश्टी ।
व्यालमंडलमंडिता । कांतीकोमलांगा सुंदरी ॥ ३० ॥
अणुरुपा परमाणुरुपा । महापरा सदसद्रूपा ।
र्‍हस्वपरा र्‍हस्वरुपा । दीर्घा परदीर्घा परात्परा ॥ ३१ ॥
अद्वया द्वयरुपा प्रपंचरहिता । स्नेहांजनविवर्जिता । 
निरीहा स्थूलसूक्ष्मा ब्रह्मसुता । परब्रह्मस्वरुपिणी ॥ ३२ ॥
पृथ्वी ब्रह्मस्तुता महानिद्रा । हिरण्यगर्भरुपा योगनिद्रा ।
हरिस्तुता सौख्यनिद्रा । विश्र्वबीजा निरंजना ॥ ३३ ॥  
अतुला ब्रह्मशक्ती ब्रह्मविद्या । कर्मरुपा परिघायुधा ।
श्यामला नारायणी आद्या । महालक्ष्मी सुरस्तुता ॥ ३४ ॥
वाचामनअगोचरा । कल्पनातीता मनोहरा ।
स्वरुपे तिलोत्तमा अप्सरा । विष्णुशक्ति पुण्यकरी ॥ ३५ ॥ 
रक्तबीजवधोद्युक्ता । रक्तचंदनचर्चिता । 
सुरक्तपुष्पाभरणा रक्ता । रक्तद्रंष्ट्रा भयप्रदा ॥ ३६ ॥ 
तीक्ष्णरक्तनखा शुंभहननी । निशुंभप्राणहारिणी ।
महामृत्यू विनाशिनी । कल्पनारहिता आद्यायनी ॥ ३७ ॥
महाशक्ती सुरस्तुता । निष्कला अष्टभुजा अनंता ।
धात्री कौस्तुभा पारिजाता । नानासुमनहारधारिणी ॥ ३८ ॥
नवनागस्वरुपिणी । प्रौढा सिंहगा सिंहगामिनी ।
बालिक त्रिशूळधारिणी । खड्गहस्ता शक्तिरुपा ॥ ३९ ॥  
निधिरुपा समाधिस्था । मुग्धा सुधर्मिणी शिवस्तुता ।
शंखधारिणी चक्रमंडिता । गदाधारिणी पाशधरा ॥ ४० ॥
गणराज महाशक्ती । कृपासिंधू शिवशक्ती ।
हरिप्रिया भुक्तिमुक्ति । मृगारिवरवाहना ॥ ४१ ॥
प्रधाना श्रद्धा देवी गुहाप्रीता । गुहारुपिणी गणेशप्रीता ।
सर्वार्थदायिनी कामप्रीता । लीलागतिलोलुपा ॥ ४२ ॥
चामुंडा चित्रघंटा गुहा स्थिता । विश्र्वयोनी अवनिस्थिता ।
कालचक्रभ्रमभ्रांता । निरंतर श्रमहन्त्री ॥ ४३ ॥
श्रावणी संसारभ्रमनाशिनी । संसार उत्तममतिगामिनी ।
संसारफलसंपन्ना राज्ञी । विश्र्वयोनी विश्र्वमाता ॥ ४४ ॥
माते आरुढसी उच्चासनी । दैत्यदानवघातिनी ।
विमानस्था वरगामिनी । कालचक्रप्रवर्तिनी ॥ ४५ ॥
भव्या चेतना चापिनी । भव्याभव्यविनाशिनी ।
पाशधारिणी कालमृत्युनाशिनी । कालचक्रभ्रमभ्रांता ॥ ४६ ॥
मुकुटेशा वणिक्कन्या । ध्येया क्षीरसागरकन्या ।
उच्चासना सिंहासना । सुखासनी आरुढसी ॥ ४७ ॥
वेदवेदार्थतत्त्वज्ञा । वेदवादिनी श्रुतिज्ञा । 
स्मृतिज्ञा आणि पुराणज्ञा । इतिहासार्थविद्धर्म्या ॥ ४८ ॥   
हिंगुला कालशालिनी श्रेष्ठध्येया । स्तन्यदा स्तन्यधरा शिशुप्रिया ।
वनस्था पार्वती शिवप्रिया । सकलागमदेवता ॥ ४९ ॥ 
सर्वबीजांतरस्थात्री मेनामैनाकभगिनी क्षयहंत्री ।
जलस्था स्थलस्था रिपुहन्त्री । निरातंका अमरप्रिया ॥ ५० ॥
लीलाविग्रहधारिणी । पापअज्ञानविनाशिनी ।
वनदेवता त्रिकालज्ञानी । पापहंत्री पुण्यधी ॥ ५१ ॥  
दृश्या दृष्टी दृश्यविषया । शमस्थिता योगविद्या ।
सांख्यविद्या त्रयीविद्या । सर्वदेव शरीरिणी ॥ ५२ ॥
श्रेष्ठरथसंस्थिता वीररथा । रथनिष्ठा रथस्थिता ।
मधुकैटभहंत्री शांता । नृपवश्यप्रदायिनी ॥ ५३ ॥ 
त्रिपुरसुंदरी पुण्यकीर्ती । स्थावरा जंगमा बलिशक्ती ।
क्षांती बलिप्रिया नष्टहंत्री । जयदेवता वीरश्री ॥ ५४ ॥  
दैत्यसैन्यपराभवकारिणी । महिषासुरविनाशिनी ।
डमरुनादे उल्हासिनी । वीरलक्ष्मी वीरकांता ॥ ५५ ॥
क्षीरसागरशयिनी । शिवदूती सनातनी ।
उद्गीथमर्यादा सामगायिनी । इंद्रादिदेवसंस्तुता ॥ ५६ ॥
विद्युत्शक्ती मेघवाहिनी । समाधी कैवल्यपददायिनी ।
विघ्ना दारिद्र्यवनदाहिनी । चतुरानना गायत्री ॥ ५७ ॥
तुळजा म्हाळसा रती विकराला । पितृशक्ती आत्रेयी कमला ।
अवतारा आध्या सकलकला । रेणुवंशभूषणा ॥ ५८ ॥
हुंकारगर्जिता भाषिणी । धूम्रलोचनविनाशिनी ।
त्रिभुवना सुखदायिनी । एकमूर्ती त्रीनेत्रा ॥ ५९ ॥
चंडमुंड विनाशिनी । पंचवदना बलिमोहिनी ।
प्रसन्ना त्रिलोकानंददायिनी । त्रिधामूर्ती त्रिगुणमयी ॥ ६० ॥
जयंतिका पंचमूर्ती । दशमूर्ती दक्षिणामूर्ती ।
एकमूर्ती अनेकआकृती । बहुविभूती भवानी ॥ ६१ ॥
एकचक्षू अनंताक्षी । विश्र्वपालिनी विश्र्वाक्षी ।
चतुर्विंशतितत्त्वाद्या सर्वसाक्षी । चतुर्विशतितत्त्वज्ञा ॥ ६२ ॥
सोहंहंसा विशेषज्ञानी । जयघंटा जयध्वनी ।
यमघंटा अमृतजीवनी । निर्विशेषा निराकृती ॥ ६३ ॥
पांचजन्यस्फुरत्शक्ती । महाबला हनुमत्शक्ती ।
सेतुशीला तरणशक्ती । रामशक्ती विराट् तनु ॥ ६४ ॥
सेनासागरआक्रमणा । आस्तिकालंका प्रज्वलना ।
प्रीती नरनारायणा । लोकनीती पापहरा ॥ ६५ ॥
विश्र्वबाहु त्रिलिंगिका । दक्षिणा दक्षकन्यका ।
सर्वसुखदायिनी  सौख्या । सदसद्रूपशालिनी ॥ ६६ ॥
प्राची प्रतीची आदिदिशा । प्रकाशमयी स्वप्रकाशा ।
विषमईक्षणा दुर्धर्षा । शिवलिंगप्रतिष्ठात्री ॥ ६७ ॥
शवलिंग प्रतिष्ठात्री । विषयअज्ञाना निवृत्ती ।
सदसदरुपा विश्र्वमूर्ती । द्वय-अद्वयवर्जिता ॥ ६८ ॥
गौरी वृषगा वृषवाहना । कैलासशोभा शशिरविशअग्नि नयना ।
शशिरविअग्नी विग्रहणा । विषमईक्षणा दुर्धर्षा ॥ ६९ ॥
लंकादाहकरी दीप्ती । वैकुंठविलासिनी मूर्ती ।
वैकुंठशोभा कलाकृती । सौभाग्यवरदायिनी ॥ ७० ॥
नभोमूर्ती तमोमूर्ती । अमेयबुद्धी तेजोमूर्ती ॥
सूर्यमूर्ती चंद्रमूर्ती । यजमानशरीरिणी ॥ ७१ ॥
आपमूर्ती  इलामूर्ती । नरनारायणआकृती ।
यज्ञायज्ञकृती यज्ञकृती । अशक्तिहारिणी यागशक्ती ॥ ७२ ॥        
वेदवेदांगपारगा । यज्ञभोक्रत्री यज्ञभागा । 
कृपा विश्र्वेश्र्वरी स्वंगा । विषयअज्ञानावेगळी ॥ ७३ ॥
सुरभी शताक्षी कामदेवता । दशदिशाव्यापिनी अनंता ।
महौषधीरसप्रीता । वैद्यविद्याचिकिच्छा ॥ ७४ ॥
कामाचारप्रिया बलदायिनी । अन्नपूर्णिका रुद्राणी ।
अन्नदायिनी रसदायिनी । रुद्रवदनी रुद्रपूज्या ॥ ७५ ॥
मेघशक्ती महावृष्टी । शिवदा शर्मदा सुवृष्टी ।
भोजनप्रिया शांति तुष्टी । वाच्छाधिककफलप्रदा ॥ ७६ ॥
कामाचारप्रदापंक्ती । पचनक्रिया पाकशक्ती ।
सुपक्वफलदा वांछाशक्ती । अन्नपूर्णा अन्नदा ॥ ७७  ॥
सर्वमंत्रमयी पूर्णा । सर्पसर्वांगभूषणा ।
सर्वलक्षणी संपूर्णा । अवलक्षणनाशिनी ॥ ७८ ॥
सर्वभूतात्मिका कामदा । कृतिकर्मफलप्रदा ।
ध्रुवाटोपा ध्रुवार्थदा । चराचरविभाविनी ॥ ७९ ॥
चराचर गती जेत्री । कृष्णा ब्राह्मणी ब्रह्मशक्ती ।
गुहाशक्ती गणेशशक्ती । सहस्त्रनयना नारसिंही ॥ ८० ॥
लक्षा लक्षधरार्धहारिणी । सर्पमाला वस्त्रधारिणी ।
शेषशक्ती शेषशायिनी । शेषरुपा महामाया ॥ ८१ ॥
वाराही सहस्त्राक्षी कूर्मशक्ती । वराहदंष्ट्रा ध्रुवशक्ती ।
बलबुद्धी कामयुक्ती । चित्तसदना शुभालया ॥ ८२ ॥
कामी कामप्रवर्धिनी । चिद्रूपा आनंददायिनी ।
नादरुपिणी बिंदुरुपिणी । ध्रुवाचारा ध्रुवस्थिता ॥ ८३ ॥
ध्रौव्या आढ्या अग्निहोत्रा । ध्रुवा ध्रुवामयी कुधीहरा ।
नीलग्रीवा ध्रुवाचारा । संगअसंगरागप्रवर्धिनी ॥ ८४ ॥
पवित्रदृष्टी पवित्रकरणी । निःसंगा चतुराश्रमवासिनी ।
ब्रह्मचर्यधर्मपालिनी । यतिधर्मस्फुरत्तनू ॥ ८५ ॥
ऋषिवच्छला संगबहुला । हृदयरुपा कृष्णा बगला ।
मातंगी विष्णुशक्ती विमला । रागीमानसआश्रया ॥ ८६ ॥
चतुर्वर्णपरिपूर्णा । राजदुहिता ब्राह्मणवर्णा ।
वैश्यदुहिता शूद्रकन्या । गृहस्थाश्रमवासिनी ॥ ८७ ॥
ब्रह्मचर्यासेविनी । गृहधर्मनिरुपिणी ।
गृहधर्मविषादघ्नी । कुटुंबवत्सला प्रेमला ॥ ८८ ॥
अखिल जगाची उत्पत्ती । सर्व सृष्टीचे पालन कर्ती ।
स्वरुपी लीलेने मिळवी अंती । ऐसाचि खेळ नित्याचा ॥ ८९ ॥
नानावादी विशेषज्ञानी । धर्मवाद निरुपिणी ॥
निराकारी शून्यवादिनी । नानावादनिरंगता ॥ ९० ॥             
सृष्टिकारिणी क्रियाशक्ती । स्थिति कारिणी छायाशक्ती ।
उपशमरुपिणी ज्ञानशक्ती । अपूर्वशक्तीसंपन्ना ॥ ९१ ॥
नवचंडी सत्यसंकल्पा । कल्पनातिगा निर्विकल्पा ।
क्रियाहेतू आद्या विकल्पा । संकल्पाकल्परुपिणी ॥ ९२ ॥
काशी अयोध्या द्वारका । मथुरा कांची अवंतिका ।
पंढरी पांचाली विशोका । धर्मशक्ती जयध्वजा ॥ ९३ ॥
समा ईक्षणा भुक्ति मुक्ती । विश्र्वदृष्टी धर्मशक्ती ।
चिंतानाशिनी चातुर्ययुक्ती । कृपार्द्रअंगीं कृपाळू ॥ ९४ ॥
कृपाश्रुती कृपाचिंता । अज्ञानकल्पना अनंता ।
महापूरसौंदर्यवर्धिता  । महापूरस्थितिकृती ॥ ९५ ॥
प्रपंचरुपिणी समदृष्टी । कार्यक्षमता देहपुष्टी ।
स्वयमेवअखिलासृष्टी । अयोनिजा काया पुण्यरुपा ॥ ९६ ॥  
भद्रकाली डमरुदर्पिता । डुम डुम डमरु प्रीति वल्गिता ।
भुवनेश्र्वरी वीरवंदिता । महापुरीची महादेवी ॥ ९७ ॥
त्रिपुरा यमाई कोलरुपिणी । शाक्तधर्मप्रवर्तिनी ।
एलांबा रुद्रादिदेवजननी । वटवासिनी भूमिस्था ॥ ९८ ॥
कुंभदर्पहरा विष्णुमाया । शिशुवत्सला झोलाप्रिया ।
मातंगी विष्णुशक्ति शीतला । ब्रह्मादिकांसी वंदनीया ॥ ९९ ॥
प्रेतासननिवासिनी । नीला रुक्मा शंकरजननी ।
त्रिगा वामनशक्ति वाग्वादिनी । हिरण्यगर्भा भूदेवी ॥ १०० ॥  
गरुडगमना ब्रह्मास्त्रा । ब्रह्मभूषिता पाशुपतास्त्रा । 
समरंगणी नानाशस्त्रा । सुकौशल्ये धारिणी ॥ १०१ ॥
नीलकमललोचनी । शंकरार्धशरीरिणी । 
दारुणा भ्रमादिगणरुपिणी । मोहरात्री मोहिनी ॥ १०२ ॥ 
भैरवी भीषणा गरलाशना । कपर्दीसर्वांगभूषणा ।
कपर्दिप्रीया पीतवसना । दीपकक्रीडा उल्हासिनी ॥ १०३ ॥
सावित्री पीता दशवक्त्रा । तीननेत्रा विभूषिता ।
दशांघ्रि वीस बाहु सुशोभिता । नीलबाहू अति उत्तमा ॥ १०४ ॥
स्फूरत दाढा अतिभीषणा । सुगंधा कर्पूरकांतिवदना ।
षड्बीजा नवबीजा नवार्णा । नवाक्षरतनुखगा ॥ १०५ ॥
कामविग्रह ब्रह्मगेया । र्‍हींकारबीजा मुनिध्येया ।
मालामंत्रमयी जप्या । आढ्या नवार्णा द्वादशवर्षा ॥ १०६ ॥
जपविघ्नविनाशिनी । जपमाला जयदायिनी ।
षोडशस्वरी मंत्ररुपिणी । सर्वबीजैकदेवता । १०७ ॥
जपकर्ती जपस्तोत्रा । मंत्रयंत्रफलप्रदा ।
जयदा मंत्रावरणदेवता । यंत्रावरणरुपिणी ॥ १०८ ॥
शमी पद्मिनी पद्मपत्राक्षी । यज्ञांगदेवता सहस्त्राक्षी ।
यज्ञसिद्धी अनंताक्षी । ब्रह्मपदप्रदायिनी ॥ १०९ ॥
सम्मता महिषांतकारिणी । अभिचार उपशमनी ।
सरवानंदविधायिनी । चारी वेद स्वरुपिणी ॥ ११० ॥
ऋग्वेदा यजुर्वेदा सामवेदा । अभिचारप्रीया अथर्ववेदा ।
लेखकस्थितालेखणी प्रसिद्धा । पंचतंत्राधिदेवता ॥ १११ ॥
शांतिमंत्राधिदेवता शमनी । सर्वानंदविधायिनी ।
अथर्वपाठसंपन्ना लेखणी । पद्मावती अभिधागती ॥ ११२ ॥
भूमलेखा वर्णशक्ती । सर्वमंगला सर्वशक्ती ।
चिंतानाशिनी चातुर्यशक्ती । चिंताशोकविनाशिनी ॥ ११३ ॥
शूलेश्र्वरी कुशूलघ्नी । नलकूबरी ऊर्ध्वकेशिनी ।
श्रीधरी विनायकी करालिनी । ज्वालामुखी भूतनायका ॥ ११४ ॥
कामेश्र्वरी कीर्तिकामा । भूतनायका कला कामा ।
कामिनी विजया सर्वकामा । महोत्साहिनी महाबला ॥ ११५ ॥
महाभयनिवारिणी । पीडापापविनाशिनी ।
जगत्प्रतिष्ठा कल्याणी । सहस्त्रभूजनिग्रहा ॥ ११६ ॥
अलकापुरनिवासिनी । प्रभा प्रभाकरी मृडानी ।
काष्ठा शांकरी दुर्गाणी । सप्त अश्र्वरथसंस्थिता ॥ ११७ ॥
संध्या अक्षरा त्रियात्रा । भारती तुर्या अर्धमात्रा ।
वेदगर्भा वेदमाता । हिमाचलक्रीडनी ॥ ११८ ॥
कौशिकी क्षुधा तृष्णा धूम्रा । अंबालिका त्र्यंबका स्वरा ।
रौद्रा पानपात्रकरा । रक्तचामुंडा दुरत्यया ॥ ११९ ॥
चिता स्थिता श्रद्धा वार्ता जांती । शोभावतंसिनी महास्मृती ।
दुर्गपरा सारा ज्याोत्स्ना धृती । छाया तुष्टी तामसी ॥ १२० ॥
तृष्णा श्रद्धा बुद्धी वाणी । सहस्त्रनयना चक्रधारिणी । 
लज्जा महिषासूरमर्दिनी । भद्रा भीमा भगवती ॥ १२१ ॥
नवदुर्गा कात्यायनी । अपराजिता चंद्ररुपिणी ।
महामारी मेघा इंद्राणी । अष्टादशदंडा दोन भुजा ॥ १२२ ॥
भ्रामरी पिंगला पानोन्मत्ता । सर्वत्रहस्तपादउरुयुक्ता ।
सहस्त्रशीर्षा विश्र्वमाता । भक्तानुग्रहकारिणी ॥ १२३ ॥
अखिलललनांची ऐकात्म्यभाविनी । समस्तललनाऐक्यध्वनी ।
प्राणशक्ती अनंतगुणी । घृतदैत्यमारी विश्र्वछाया ॥ १२४ ॥
सप्तद्वीपा अब्धिमेखला । अनंतनयना अनंतमुखा कोमला ।
कामधेनू सर्वकल्याणी नीला । सत्ता सप्ताब्धिसंश्रया ॥ १२५ ॥
नमो शारदा त्र्यंबकासूता । जगजननी रेणुका माता । 
वाडेश्र्वर योगेश्र्वरी कुलदेवता । सर्वसमर्थे सर्वेश्र्वरी ॥ १२६ ॥
फलश्रुती 
शंकर उवाच 
दिव्य रेणुका सहस्त्रनाम । कथिले तुजसी सर्वोत्तम ।
पूर्ण करील सर्व काम । षण्मुखा मज प्रीतीने ॥ १२७ ॥                  
भजतां भुक्तिमुक्तिदायक । विशेष जय लाभकारक ।
याचे समान आणिक । न दिसे कोठें शोधिता ॥ १२८ ॥  
नवसहस्त्र पुरश्र्चरण देख । विजयासाठी विशेष प्रयोग ।
साधेल सत्वर कार्यभाग । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १२९ ॥
विधियुक्त करावे पठण । सांगतेसी होमहवन ।
पुष्प आज्य तीळ चंदन । हळदीकुंकुम मधु पायस ॥ १३० ॥
नानापरीची परिमळे । बहुबीजे द्राक्षे रंभाफळे ।
ऊस नारळ नारुंगे मधुरफळे । आहुती समयी अर्पावी ॥ १३१ ॥
स्वयें करोनि मंगलस्नान । महावस्त्राचे परिधान । 
कपर्दी महादेव पूजोन । घृतदीप दोन लावावे ॥ १३२ ॥
हें स्तोत्र जे पठण करिती । दृढभक्तिने नित्य ऐकती ।
तयांसी सर्व अभीष्ट प्राप्ती । होवोनि दीर्घायु होतील ॥ १३३ ॥
शुक्ल अथवा कृष्णपक्षी । प्रारंभ करावा षष्ठीचे दिवशी ।
साधके विधियुक्त निश्र्चयेसी । अनुष्ठान करावे ॥ १३४ ॥
अश्र्विन शुद्ध प्रतिपदेशी । कलश पूजावा प्रतिवर्षी ।
करावा नवरात्र उत्सवासी । अति आनंदे उल्हासे ॥ १३५ ॥
दोहीकडे घृतदीपक । दक्षिण उत्तरेसी सम्यक ।
नाना उपचारे पक्वान्नादिक । भक्तिभावे अर्पावे ॥ १३६ ॥
कुंकुम आगरु कस्तुरी । चंदनादि नाना प्रकारी ।
ब्राह्मण सुवासिनी कुमारी । प्रेमे आदरे पूजाव्या ॥ १३७ ॥
चतुर्विधे सुग्रास अन्ने । यथाशक्ती दक्षिणा वसने ।
धान्ये आणिक गोदाने । वित्तशाठ्य न करावे ॥ १३८ ॥
वारंवार करावे वंदन । उदयोस्तु म्हणोनी प्रार्थना ।
करपात्री प्रसाद-याचना । अनन्य भक्तीने करावी ॥ १३९ ॥
प्रसाद लाभलियावरी । रेणुका माता हृदयांतरी ।
दृढभक्तिभावे चिंतन करी । पुनः पुन्हा प्रार्थूनिया ॥ १४० ॥
भावे योगिनीवृंद पुजावे । अन्नदाने तोषवावे । 
शृंगादि मंगलवाद्ये भावे । नम्र होउनी आनंदे ॥ १४१ ॥            
लाभलिया प्रसाद आशीर्वचन । सर्वांसह करावे भोजन ।
नानावाद्ये राग गायन । अति उल्हासे भक्तीने ॥ १४२ ॥
दीपोत्सवे हरिकीर्तने । उन्मत्त होउनी डमरु वादने ।
प्रदोष समयी गोदोहन । महोत्सव करावा ॥ १४३ ॥ 
दृष्टीगोचर जे जे काही । जगदंबामय ते ते पाही ।
नृत्य गायने वाद्ये यांही । रात्री जागरण करावे ॥ १४४ ॥
धरणीकंपे आवर्षणे । दुष्ट उत्पाते दूरतिक्रमणे ।
घोर संकटी आयुत आवर्तने । कार्यसिद्धी त्वरित होय ॥ १४५ ॥
निशीथे वा प्रदोषकाळी । शुचिर्भूतपणे देउळी ।
करावा स्तोत्र पाठ वेळोवेळी । नऊ दिवस भक्तीने ॥ १४६ ॥
त्रिवार जप नियम युक्त । सहामास करावे व्रत ।
शुचिर्भूतपणे करिता निश्र्चित । दारिद्र्यार्णव नष्ट होय ॥ १४७ ॥
नामावलीने पूजन होय । प्रतिदिवशी करिता नेम ।
जगन्माता प्रसन्न होऊन । विपुल संपदा देईल ॥ १४८ ॥
अष्टमी नवमी मंगळवारी । नियमयुक्त पठण करी ।
सर्व काम पूर्ण होती निर्धारी । अन्य उपाय काय पुसणे ॥ १४९ ॥
महत्कार्य आरंभिता । भावे पूजावी रेणुका माता ।
कुमारिकांचे पूजन करिता । जयलाभ होय निश्र्चये ॥ १५० ॥
हे स्तोत्र जे पठण करिती । भूत पिशाच्च तेथे न टिकती ।
वैरी वैर करुं न शकती । ऐसा प्रभाव याचा हो ॥ १५१ ॥
भूवरी सागरी गीरी शिखरी । प्रवासासी जातां वनभितरी ।
सुखद  प्रवास होईल निर्धारी । संकट न ये कदापी ॥ १५२ ॥
चित्तासी विषाद कोप झालिया । कलह आगामी दुष्ट स्वप्न पडलिया ।
हरि प्रसादही लाभलिया । आनंदे पठण करावे ॥ १५३ ॥
स-काम अथवा निष्काम पठता । चारी पुरुषार्थ येतील हाता ।
त्रेवर्णिकां अधिकार सर्वथा । श्रवण करावे इतरांनी ॥ १५४ ॥
नारी सौभाग्य वर पावती । कन्या सर्वश्रेष्ठ वर वरिती ।
उदासीना पावेल प्रीती । दांपत्य-सुख पुत्रादिक ॥ १५५ ॥
सुरुपा सुभगा होतील ललना । होतील दृढगर्भवती ललना ।
संतति संपत्ती सर्वमान्या । संसारसुख पावतिल ॥ १५६ ३
ग्रह बालग्रह न बाधती । आयुरारोग्य विद्या संपत्ती ।
पुस्तक पूजन यथाशक्ती । होम-हवन करावे  ॥ १५७ ॥
गर्भिणीने केलिया पठण । होईल गर्भदोष निवारण ।
सुखप्रसव सुलक्षण । अर्भक होय सुखदायी ॥ १५८ ॥
हे सर्वश्रेष्ठ स्तोत्र वाचावे । बहुत जनांसी ऐकवावे ।
नऊ विप्रांसी दान करावे । पुस्तक रेणुका प्रीत्यर्थ ॥ १५९ ॥
पुत्रार्थियांसी पुत्र होती । धनार्थियांसी विपुल श्रीमंती ।
कन्यार्थि सुकन्या पावती । कुलशिलादि मंडिता ॥ १६० ॥ 
विद्यार्थी विद्यावंत होती । कविताप्रियासी कवित्वमती ।
प्रज्ञावंत प्रभावी होती । ग्रंथधारणा समर्थ ॥ १६१ ॥
बंदी बंधमुक्त होती । जड जिव्हेचे स्पष्ट वक्ते होती ।
कामी पूर्णकाम होती । भूपाल वश होती ॥ १६२ ॥
कुष्ठ अपस्मार ज्वररहित । रोगी होतील रोगमुक्त । 
शत्रुसंघामाजी जय प्राप्त । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १६३ ॥
अग्निनारायण शीतल । वीष ते अमृतचि केवळ ।
भावभक्तीने पठणाचे फळ । शस्त्र न लगे अंगासी ॥ १६४ ॥
अंध ते डोळस होती । बहिरे श्रोत्रेंद्रिय पावती ।
मुकेही श्रेष्ठ वक्ते होती । रेणुकाप्रसादे  करुनिया ॥ १६५ ॥
रेणुका ऐसे एकनामपायी । धर्म अर्थ काम मोक्ष दायी ।
सहस्त्रनाम फळ काय न होई । समर्थ सांगा सज्जन हो ॥ १६६ ॥
रेणुकेच्या स्मरणमात्रे शरीरी । वीष न बाधते । 
सर्व पिडांची शांति होते । सुख संपदा पूर्ण लाभे ॥ १६७ ॥    
महाविष्णू लक्ष्मीयुक्त । प्रजापती सावित्री सहित ।
मीही स्वयें भवानी सहित । रेणुकार्चने तृप्त होती ॥ १६८ ॥
पारायण याचे करितां । सर्व यज्ञांचे फळ येईल हाता ।
सांगयोग फळ रेणुका पूजितां । प्राप्त होईल निर्धारे ॥ १६९ ॥
बाहू उंचावूनि सांगतो तुजेसी । कार्तिकेया ऐके वचनासी ।
भावेसेवितां रेणुकेसी । सर्व देव संतोषती ॥ १७० ॥
ऐसे हे पद्मपुराणांत । मायोपाख्यानी शंकर कथित ।
शंकर-षण्मुख संवादांत । रेणुकादेवी प्रस्ताव ॥ १७१ ॥
रेणुकेच्या प्रेरणा प्रभावे । ग्रंथ आरंभिता भक्ति भावे ।
तिनेची पूर्ण केला स्वभावे । म्या काय वदू मंदमती ॥ १७२ ॥
नाहीं पाहिला अधिकार । नाहीं आचार नाही विचार ।
लहान तोंडी घास थोर । घेतला माते क्षमा करी ॥ १७३ ॥
मध्यप्रदेशी धामनोर नगर । बालाजीचे रम्य मंदिर ।
त्याच्या भव्य गच्चीवर । ग्रंथ पूर्ण जाहला ॥ १७४ ॥
स्वस्ति श्री रेणुकासहस्तर नाम स्तोत्र । पठण करिताच चारीपुरुषार्थ ।
ज्ञान चातुर्य बल परमार्थ । प्राप्ती होती ही शिव उक्ती ॥ १७५ ॥
अधिक काही सांगणे नाही । करती करवती अंबाबाई ।
चरणीं आम्हां ठाव देई । सरस्वती शरण असे ॥ १७६ ॥ 

॥ श्रीजगदंबा-रेणुकार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
Shri Renuka Sahasra Nam Stotra
 श्रीरेणुका सहस्त्रनाम स्तोत्र 


Custom Search