Sunday, November 27, 2011

Shri Khanderayachi Aarati

Shri Khanderayachi Aarati 

Shri Khanderayachi Aarati is in Marathi. It is a very nice creation of Das Narahari. The aarati is in 4 stanzas. The meaning of it in short can be described as under. He says that JejurGad parvat (mountain) is like a shiva-linga. It is a second Kailas on this earth. By nature its construction is very beautiful. God Shiva resides here. Khanderay is God Shiva’s incarnation. He had killed demon Mallari. Demon Mani was very cruel and he was troubling rushies, people and gods also. Gods were also frightened of him. Shri Khanderay (Khandoba) appeared on this earth on the day of Champa Shasti. Then he killed demons Mani and demon Mallri. He killed them with beating them with Khadga (a weapon). However when demons asked for blessings Khandoba blessed them and allowed them to be at his feet. After killing demons Mani and Malla, Mallri (Khandoba) for the protection of rushies and gods reside at Jejuri as per their request. Mhalasa is his wife; is also with him. Now Das (Devotee) Narahari is asking for the blessings by God Khandoba. 
श्री खंडेरायाची आरती 

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार I
 मृत्युलोकी दुसरे कैलासशिखर I
 नानापरिंची रचना रचिली अपार I 
तये स्थळी नांदे स्वामी शंकर II १ II 
जय देव जय देव जय शिवा मार्तंडा I 
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा I 
जय देव जय देव I धृ. I
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला I
देवगण गंधर्व कांपती त्याला II २ II 
जय देव जय देव जय शिवा मार्तंडा I 
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा I 
जय देव जय देव I धृ. I 
चंपाषष्टी दिवशी अवतार धरिसी I 
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी I
चरणी पृष्टी खड्गे वर्मी स्थापिसी I 
अंतीं वर देऊनि त्या मुक्तीतें देसी II ३ II 
जय देव जय देव जय शिवा मार्तंडा I 
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा I 
जय देव जय देव I धृ. I 
मणिमल्लदैत्य मर्दुनि मल्लारी I 
देवा संकट पडतां राहे जेजुरीं I 
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी I 
देवा ठाव मागे दास नरहरी II ४ II 
 जय देव जय देव जय शिवा मार्तंडा I 
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा I 
जय देव जय देव I धृ. I

Shri Khanderayachi AaratiCustom Search

Saturday, November 26, 2011

Khandobache Navaratra खंडोबाचे नवरात्र

Khandobache Navaratra

Khandoba is KulDaivat of Maharashtra. Mainly khandoba’s (Mallari-Martand) devotees and temples are found in Maharashtra and Karanatak. Navaratra of Khandoba is celebrated from Margashirsha shukla Pratipada to Margashirsha shukla Shasti. This is year it is to be celebrated from 26th November 2011 to 30th November 2011. It is actually festival of six days that is shadrotsav however it is called as navaraatra. Khandoba is incarnation of God Shiva. Margashirsha shukla Shasti means Champa Shasti. Champa Shasti is the day when God Shiva appeared as Khandoba to kill demons Mani and Malla. These demons were very cruel and troubling rushies, munies, devotees and even gods also. Navaratra celebration: devotees worship khandoba on all these six days early in the morning. On all six days Nandadeep (Holy lamp) is kept burning in front of Khandoba’s Idol. Bel (holy leaf), Davana (holy small flowers) and Zendu flowers which are liked by Khandoba are offered at the time of worship. Bhandara is very important while worshiping Khandoba. Bhandara means powder of turmeric. On the day of Champa Shasti and for performing Kuldharma many families offer Rodaga (made up wheat flour), Thombara (made from flour of grains of cereal plant or jawar and then curd and salt is added in.), onion with its leaf, bringal bharit and garlic as a prasadam. Many devotees are on fast for all five days then on the sixth day i.e. on Champa Shasti they take their normal food along with prasadam. Aarati is also sung after worship on all six days. Divti and Budhali (special type of lamps) are used for aarati.


Khanderay Stotras and links. 
ShriMalahari Dhyanam 
Shri Malhari-Mhalasakant PratahSmaranam 
Shri Mallari Hrudaya 
Shri Khanderay AshtottarShatNam Stotram 
Khanderaiyachi Aarati

खंडोबाचे नवरात्र

 नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I
 म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II
 मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं I 
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् II 
 श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.
 मुख्यत्वेकरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. 
खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेंत भंडारा फार महत्वाचा आहे. 
भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. 
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
खंडोबाची पांच प्रतिके: १) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. २) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. ३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात. ४) मूर्ति: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. ५) टांक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.
खंडोबा हि देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे. 
काही सौम्य नवस: १) मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. २) दीपमाळा बांधणे. ३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. ४) पायऱ्या बांधणे. ओवरी बांधणे. ५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. ६) पाण्याच्या कावडी घालणे. ७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. ८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.) ९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. १०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे. ११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.
दिन विशेष: रविवार हा खंडोबाचा मानण्यांत आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने: महाराष्ट्र: १) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी 2) निमगाव ३) पाली-पेंबर सातारा ४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद) ५) शेंगुड (अहमदनगर) ६) सातारे (औरंगाबाद) ७) माळेगाव कर्नाटक: १) मैलारपूर-पेंबर (बिदर) २) मंगसूल्ली (बेळगाव) ३) मैलारलिंग (धारवाड) ४) देवरगुडू (धारवाड) ५) मण्मैलार (बल्ळारी).
बरीचशी माहिती श्रीखंडोबा विशेषांक १९७८ "प्रसाद" या मासिकामधून साभार घेतली आहे.
खंडोबाची आरती, ध्यान, हृदय, प्रातःस्मरण,आणि अष्टोत्तरशत नाम

खंडोबाचे नवरात्र भाग २
खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. 
खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, 
तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत , मार्तंडभैरव, किंवा  (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. 
स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा
वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले.
हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा 
असे म्हणू लागले. 
खंडोबाची वेशभुषा: साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर,
डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो. 
प्रमुख भक्ती: बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय. 
हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व 
" येळकोट येळकोट जय मल्हार "  हा गजर करतात. 
याचा अर्थ असा लावतात, की ' हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.  
खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो.
मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. 
देवस्थाने : महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत.
मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी एकंदर प्रमुख अशी अकरा स्थाने आहेत. 
१) जेजुरी (पुणे) २) शेबुड (अहमदनगर) ३) निमगाव दावडी (पुणे)
४) सातारे (औरंगाबाद) ५) पाली-पेंबर (सातारा) ६) मंगसुळी (बेळगांव) ७) मैलारलिंग (धारवाड) ८) मैलार देवगुड्ड (धारवाड)
९) मण्णमैलार (बल्लारी ) १०) मैलापुर-पेंबर (बिदर) ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद).
१) जेजुरी हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत. 
२) नळदुर्ग: नळदुर्ग हे गांव सोलापूरच्या ईशान्येस साधारण ३० मैलावर आहे. असे सांगतात की या ठिकाणी खंडोबाची तीन स्थाने आहेत. शके १५३६ मध्ये एक स्थान किल्ल्यांत होते. असे कागदपत्रांत आहे.
नळदुर्ग गावाच्या उत्तरेस दोनएक मैलांवर दोन स्थाने जवळ जवळच आहेत. अहिल्याबाईने बांधलेले देवालय आज प्रसिद्ध आहे. सुमारे तीन मैलांवर अणदूर गांवी खंडोबा वसतीस असतो असे भक्त मानतात.   
३) पाली: पाली हे गाव सातारा-कोल्हापूर रस्त्यावर सातार्‍यापासून १५ मैलावर आहे. सातारा तालुक्यांतील अतीत या गावाजवळ ते ५ मैलावर कर्‍हाड तालुक्यांत आहे. या मंदिर्‍याओवरींत एक शिलालेख आहे. हे देवस्थान शके १६९४ मध्ये चैत्र वद्य १३, गुरुवार या दिवशी श्री. गणेश खंडो व श्री महिपत खंडो पारगावकर यांनी बांधले.
४) मंगसुळी: मंगसुळीचे हे देवस्थान बेळगांव जिल्ह्यांत अथणी तालुक्यांत आहे. येथे अश्विन महिन्यांत मोठी यात्रा भरते आणि अश्र्विन शुद्ध द्वादशीस भंडारा होतो. या ठिकाणी वाघ्या साखळदंड तोडतो. व त्यावरुन भविष्यही वर्तविले जाते.
५) सातारे: हे गांव औरंगाबाद स्टेशनपासून २ मैलांवर आहे. येथे चंपाषष्ठीला फार मोठी यात्रा भरते.
६) मैलारलिंग: हे स्थान धारवाडपासून सुमारे २ मैलावर आहे. उंच टेकडीवरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे.
७) देवरगुड्ड: पुणे-बंगलोर मार्गावर पुण्यापासून साधारणपणे ४०० मैलावर देवरगड्ड हे स्टेशन आहे. तेथून डोंगरावरील हे देवस्थान ४ मैलावर आहे. हे देवस्थान चुन्या-मातीचे आहे. मंदिराची शिखरे खुजी वाटतात. या देवस्थानास शके १६३८ ते १७६७ पर्यंत अनेक देणग्या मिळाल्याचे शिलालेख व कागदपत्रे आहेत.  
खंडोबा अवतार चरित्रातील प्रमुख खंडोबा क्षेत्र
श्री क्षेत्र जेजुरी
जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे.श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला
म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले.
या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिसर भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते. 

श्री क्षेत्र पाली
खंडोबा म्हाळसा यांची विवाह भुमी साक्षात खंडोबा म्हाळसा येथे विवाहबद्ध झाले, सातारा जिल्ह्यात तारळी नदी काठी वसलेला निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो, आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह येथे संपन्न होतो, मुळात या गावचे नाव राजापुर येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती तिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा येथे लिंगरूपाने प्रगट झाले तिच्या नावावरूनच या गावास पाल अथवा पाली हे नाव प्राप्त झाले
श्री क्षेत्र नळदुर्ग / अणदूर
नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील १०.२५ महिने व नळदुर्ग येथे १.७५ महिने वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. श्री खंडोबा व बाणाई यांचा विवाह येथेच संपन्न झाला, येथील नळराजाची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले, उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन ५८ किमी व सोलापूर पासुन ४८ किमी अंतरावर नळदुर्ग आहे, नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो, मंदिरांची झालेली स्थलांतरे, यात्रांचे बदलेल्या जागा व अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.
श्री क्षेत्र मृणमैलार
खंडोबा कर्नाटक मध्ये मैलार या नावाने ओळखला जातो. हे गाव येथील मैलार मंदिरा साठी प्रसिद्ध असल्याने या गावास मैलार हेच नाव प्राप्त झाले आहे. या गावास मृणमैलार या नावानेही ओळखले जाते. येथील मंदिरातील मैलाराची मुर्ती माती पासुन बनवलेली आहे अशी लोक श्रद्धा आहे या मुळे मृणमैलार असेही म्हणतात. हा परिसर खंडोबा व मणि मल्ल दैत्य युद्ध भुमि आहे व याच ठिकाणी मार्तंड भैरवने मणि मल्ला चा वध केला व लिंग रूपाने वास केला येथे ऋषीमुनी नी मातीच्या मैलाराची मुर्ती बनवली तीच ही मुर्ती असल्याचे स्थानिक लोक सांगतात. मृणमैलार कर्नाटक राज्यातील बल्लारी जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या हाडगल्ली पासुन ४० किमी अंतरावर आहे. गुंतल व राष्ट्रीय महामार्ग क्रं ९ वरील राणीबेनुर येथून ३४ किमी आहे.
श्री क्षेत्र देवरगुड्डा
देवरगुड्डा हे कर्नाटकातील मधील गाव मैलार मंदिरासाठी म्हणजेच खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या गावाचे मुळनाव गुडगुड्डापूर म्हणजेच टेकडीवरील गाव पण येथील मंदिरामुळे देवाचे टेकडी वरील गाव म्हणून देवरगुड्डा झाले. खंडोबाने ज्या मणि मल्ल राक्षसांचा वध केला त्या राक्षसांचे राजधानीचे हे गाव त्यांचे मृत्यू समयीचे विनंती वरून देवाने त्यांचे प्रेतासन करून येथे वास केला अशी जनश्रुती आहे. टेकडीवर वसलेले हे गाव सुंदर आहे देवरगुड्डा कर्नाटक राज्यात असुन राष्ट्रीय महामार्ग ९ वर धारवाड कडून बंगलोर कडे जाताना मोतीबेनुर गावाचे पुढे ९ किमी अंतरावर रस्त्याचे पुर्व बाजुस देवरगुड्डा कडे जाण्यासाठी कमान दिसते येथून ८ किमी अंतरावर देवरगुड्डा आहे राणीबेनुर - गुंतल रस्त्यावर देवरगुड्डा असल्याने या मार्गावरून ही येथे पोहचता येते.
श्री क्षेत्र आदिमैलार
आदिमैलार हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार या नावाने ओळखला जातो, खंडोबा विषयक आद्य ग्रंथ ' मल्हारी महात्म्य ' याची ही जन्म भुमि या ग्रंथात शेवटी या क्षेत्राचे वर्णन करण्यात आलेले आहे. ज्या ऋषी मुळे शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांची ही तपोभूमी या मुळे या क्षेत्रास आदिमैलार म्हटले जाते आदिमैलार कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बिदर पासुन २० किमी अंतरावर आहे हे मंदिर सपाटीवर असुन गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते. मंदिरास प्रशस्थ आवार असुन कोटाचे पुर्वद्वार भव्य आहे 

खंडोबाची उपासना:  खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसविणार्‍याने स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. 
खंडोबाची पूजा: खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी. 
कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करतांना सुगंधि फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत.  पूजा करतांना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. 
पत्री : पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी. 
देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत.  देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. 
देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.
देवाजवळ अखंड तेला-तूपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात.  
सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.
महानैवेद्य: सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य , वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. 
खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. 
कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. 
चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. तळी भरणे-उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. 
वारी मागणे.
काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. जेवावयास ब्राह्मण, वाघ्या-मुरळीस बोलावतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ' वारी खंडोबाची ' म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.
वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात. ताम्हण घेऊन पाच घरी ' वारी खंडोबाची ' म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे.  
दान-धर्म: या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.      
दिवटी-बुधले: दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी. 
व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. 
लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत. 
खंडोबाचे नवरात्र भाग ३
खंडोबाचे षड्रात्र उत्सव म्हणजे काय? घटस्थापना कशी करावी ?
॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥
चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. 
आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ,आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.
साहित्य:
कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य अमावस्येच्या दिवशीच जमवुन ठेवावे. 
प्रतिपदेला प्रात:काली उठुन स्नानादि आटोपुन सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षालित करुन देवघर स्वछ करुन घ्यावे. चंदन पाट किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकुन कुळाचाराप्रमाने माती; अथवा भंडार पात्रामधे पाण्याचा कलश ठेऊन त्यावर नागवेलीची पाने नारळ ठेवुन विधीवत् घटस्थापना करावी.घटाच्या डाव्या बाजुस जोड पानावर म्हाळसा देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी. व उजव्या बाजुस जोडपानावर बानु देवीच्या प्रित्यर्थ सुपारी पुजन करावे.
नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षड्रात्र उत्सवातही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलीत करावी परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
1. षड्रात्र उत्सवात देव खंडेरायाच्या घटासमोर सहा दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवासमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.
2. मंत्र महोदधि (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की, दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:।
अर्थ - तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा.
3. अखंड ज्योत संपूर्ण सहा दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.
4. अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.
सहा दिवस घटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांगाव्यात. मंत्र जप जागरण , भजन , गायन करावे.चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पुरणावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत भाकरीचे रोडगे असा नैवेद्य दाखवावा. तळीभंडार करुन घटोत्थापन करावे.
या सहा दिवसात मार्तंड भैरव स्तोत्राचे , मल्हारी विजय ग्रंथांचे वाचन करावे.


            Khandobache Navaratra


Custom Search

Monday, November 14, 2011

Tulsi Stuti तुलसी स्तुतिः

Bhagwan ShriHari

Tulsi Stuti

 Tulsi Stuti or Tulsi praise is in Sanskrit. Bhagwan Narayan had said that this Stuti is done by Bhagwan ShriHari. First Bhagwan ShriHari performed pooja of Devi Tulsi and then he praised Devi Tulsi. He said: Wise people call a place as ‘Vrinda Van‘where Vrinda (Tulsi) and other Vrinda type trees grow together. I worship my beloved Tulsi who is famous by the name “Vrinda”. She appeared in Vrindavan in very old times. Hence she is called as Vrindavani. I worship Devi Vrindavani. She is being worshiped among many trees. Hence she is called as “Vishwapoojita”. Thus I worship her who is being worshiped by many in the world. Devi Tulsi has made the entire world pious by her presence; I worship Such “Vishwapawani” (Devi Tulsi) and remember her. Even we worship Gods with many flowers they get pleased when they are offered Tulsi patra (leaf of Holy Tulsi). Hence Devi Tulsi is called as “Pushpasara”. In deep sorrow I worship her to bless me with the Darshan. Devotee becomes happy when he finds Tulsi patra. Thus she makes all devotees happy and she has been called and famous as “Nandini” by them. I request her to bless me now. She can’t be compared in the whole world (meaning of the word “tulana”). As such she has become by the name “Tulsi”. I bow to her. That very pious Devi Tulsi is inseparable from God Shrikrishna as such she is famous as “Krishnajivani’. I request such Devi Tulsi to protect my life. 
तुलसी स्तुतिः
 नारायण उवाच
 अन्तर्हितायां तस्यां च गत्वा च तुलसीवनम् I
 हरिः सम्पूज्य तुष्टाव तुलसीं विरहातुरः II १ II 
श्रीभगवानुवाच 
वृन्दारूपाश्च वृक्षाश्च यदैकत्र भवन्ति च I 
विदुर्बुधास्तेन वृन्दां मत्प्रियां तां भजाम्यहम् II २ II 
पुरा बभूव या देवी त्वादौ वृन्दावने वने I 
तेन वृन्दावनी ख्याता सौभाग्यां तां भजाम्यहम् II 3 II 
असंख्येषु च विश्वेषु पूजिता या निरन्तरम् I 
तेन विश्वपूजिताख्यां जगत्पूज्यां भजाम्यहम् II ४ II 
असंख्यानि च विश्वानि पवित्राणि यया सदा I 
तां विश्वपावनीं देवीं विरहेण स्मराम्यहम् II ५ II 
देवा न तुष्टाः पुष्पाणां समूहेन यया विना I 
तां पुष्पसारां शुद्धां च द्रष्टुमिच्छामि शोकतः II ६ II 
विश्वे यत्प्राप्तिमात्रेण भक्तानन्दो भवेद् ध्रुवम् I 
नन्दिनी तेन विख्याता सा प्रीता भवताद्धि मे II ७ II 
यस्या देव्यास्तुला नास्ति विश्वेषु निखिलेषु च I 
तुलसी तेन विख्याता तां यामि शरणं प्रियाम् II ८ II 
कृष्णजीवनरुपा या शश्वत्प्रियतमा सती I 
तेन कृष्णजीवनीति मम रक्षतु जीवनम् II ९ II 
II इति श्रीब्रह्मवैवर्ते प्रकृतिखण्डे तुलसी स्तुतिः श्रीतुलसिमातां समर्पणमस्तु II
Tulsi Stutihi
Narayana Uvacha (said)
antarhitaayaam tasyaam cha gatvaa cha tulsivanam I
harihi sampoojya tushtava tulasim virahaaturaha II 1 II
Shri Bhagwanuvacha (shri Bhagwan said)
Vrundaaroopaashcha vrukshaashcha yadaikatra bhavanti cha I
vidurbudhasten matpriyaam taam bhjaamyaham II 2 II
pura babhuva yaa devi tvaadou vrundaavane vane I
ten vrundaavani khyaataa soubhaagyaam taam bhjaamyaham II 3 II
asamkhyeshu cha vishveshu poojitaa yaa nirantaram I
ten vishvapoojitaakhyaam jagatpoojyaam bhjaamyaham II 4 II 
asamkhyani cha vishvaani pavitraani yayaa sadaa I
taam vishvapaavanim devim virahena smaraamyaham II 5 II
deva na tushtaahaa pushanaam samoohena yayaa vinaa I
taam pushpasaaraam shuddhaam cha drashtumichchhami shokataha II 6 II
vishve yatpraaptimaatrena bhaktaanando bhaved dhruvam I
nandini tena vikhyaataa saa pritaa bhavataaddhi me II 7 II
yasyaa devyaastulaa naasti vishveshu nikhileshu cha I
tulsi ten vikhyaataa taam yaami sharanam priyaam II 8 II
krishnajivanarupaa yaa shashvatpriyatamaa sati I
ten krushnajivaniti mama rakshatu jivanam II 9 II

II iti shri brahma vaivarte prakruti khande tulsi stutihi tulasimaataam samarpanmstu II

तुलसी स्तुती मराठी अर्थ:

 नारायण म्हणाले,
 हे मुने! तुलसी अंतर्धान झाल्यावर भगवान श्रीहरि तिच्या विरहाने व्याकुळ होऊन वृन्दावनांत जाऊन त्यांनी तुलसीची पूजा तिची स्तुती केली. 
श्रीभगवान श्रीहरि म्हणाले, 
जेव्हा वृंदा (तुलसी) रूपी वृक्ष तसेच दुसरे वृक्ष एकत्र असतात तेव्हा त्या वृक्ष समुदायाला, वनाला ज्ञानी लोक वृंदा म्हणतात. अशा "वृंदा" नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रिय तुलसीची मी उपासना करतो. जी देवी प्राचीनकाळी वृंदावनात प्रकट झाली होती, ज्यामुळे तिला "वृंदावनी" म्हणतात; त्या सौभाग्यवती देवीची मी उपासना करतो. जी पुष्कळ वृक्षामध्ये लोकांकडून पूजली जाते, ज्यामुळे तिचे नाव "विश्वपूजिता" पडले आहे, त्या जगात पूज्य देवीची मी उपासना करतो. जीने नेहमी अनंत विश्वांना पावन केले आहे त्या "विश्वपावनी" देवीचे विरहाने व्याकुळ होऊन मी स्मरण करतो. अन्य पुष्पे अर्पण करून सुद्धा देवता तुलसीदल अर्पण केल्याशिवाय प्रसन्न होत नाहीत अशा "पुष्पसारा" पुष्पांमध्ये सारभूत असलेल्या अशा शुद्धस्वरूपिणी तुलसी देवीचे शोकाने व्याकुळ झालेला मी दर्शन करू इच्छितो. संसारात जिच्या प्राप्तीने भक्त आनंदित होतात त्या "नंदिनी"ने, भगवती तुलासीने माझ्यावर प्रसन्न व्हावे. ज्या देवीची संपूर्ण विश्वांत तुलना होऊ शकत नाही म्हणून ती "तुलसी" नावाने प्रसिद्ध आहे, त्या माझ्या प्रियेला मी शरण जातो. जी साध्वी तुलसी वृंदारूपाने भगवान श्रीकृष्णांची जीवनस्वरूपा आहे आणि त्यांची नेहमी प्रियतमा असल्याने "कृष्णजीवनी" नावाने विख्यात आहे, ती देवी तुलसी माझ्या जीवनाचे रक्षण करो. 
Tulsi StutiCustom Search

Sunday, November 13, 2011

Tulasichi Aarati श्री तुळसीची आरती

Tulasichi Aarati 

Tulasichi Aarati is in Marathi. It is a beautiful creation of Gosavi. The Aarati is having 3 stanzas. In the first stanza Gosavi says that Tulsi Devi your leaves are bigger than TriBhuvan (Swarga, Pruthavi and Patala). There is God Brahma in the roots, in the stem that is middle part God Vishnu and in the front God Shiva is always present and everywhere in the leaves and branches all the holy tirthas (holy Places) are resting. All men and women are always worshiping you. When we take your darshan all our sins are destroyed and we become sinless. In the second stanza he says to the Tulasi Devi that her shadow is very cool and it is occupying the entire Pruthavi Lok. Manjiries (The flowers of Tulasi) are liked by God Vishnu. God Vishnu remains hungry without your leave. While worshiping God Vishnu if we forget to give him Tulasi leave, he remains hungry, i.e. Tulasi leave is must for God Vishnu’s Worship. Tulasi Devi has a special celebration in Kartik Mas (Kartik Month). Gosavi further says to Devi Tulasi that whosoever recites Achyut, Madhav, Keshav, Pitambardhari whiles worshiping you, you give him wealth, son and makes him happy. I also request you to please help me and fulfill my wishes. Make me happy.

श्री तुळसीची आरती

 जय देवी जय देवी जय माये तुळसी I
 निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
 जय देवी जय देवी II धृ. II 
ब्रह्मा केवळ मुळीं मध्ये तो शौरी I 
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारी I
 सेवा करिती भावे सकळही नरनारी I
 दर्शनामात्रे पापे हरती निर्धारी II
जय देवी जय देवी जय माये तुळसी I
 निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
 जय देवी जय देवी II १ II
 शीतळ छाया भूतळव्यापक तू कैसी I
 मंजिरीची बहु आवड कमळारमणासी I
 तव दल विरहित विष्णू राहे उपवासी I
 विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी I
 जय देवी जय देवी जय माये तुळसी I
 निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
 जय देवी जय देवी II २ II 
अच्युत माधव केशव पीतांबरधारी I
 तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी I
 त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी I
 गोसावी सुत विनवी मजला तू तारी I 
जय देवी जय देवी जय माये तुळसी I
 निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
 जय देवी जय देवी II ३ II

मराठी अर्थ:

हे माते तुळसी ! तुझा जयजयकार असो. तुझ्या एका पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. तुझ्या मूळी ब्रह्मदेवांचा, तर मध्ये विष्णूंचा आणि अग्री शंकरांचा वास आहे. शाखा शाखामध्ये सर्व तीर्थे आहेत. सर्व लोक तुझी मनोभावे पूजा करतात. तुझ्या दर्शनानेच त्यांची पापे नाहीशी होतात. हे माते तुळसी ! तुझा जय जयकार असो. तुझ्या एका पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. II १ II या भूतळाला तुझ्या शितळ छायेने व्यापून टाकले आहे. तुझी मंजिरी श्रीविष्णुंची अत्यंत आवडती आहे. तुझ्या पानाशिवाय श्रीविष्णू उपाशी असतो. अत्यंत शुभ कार्तिक महिन्यांत तुझा विशेष महिमा असतो. हे माते तुळसी ! तुझा जयजयकार असो. तुझ्या एका पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. II २ II अच्युत, माधव, केशव, पितांबरधारी अशी तुझ्या पूजनाच्यावेळी जो नावे उच्चारतो त्याला तू संतति आणि संपत्ति देतेस. हा गोसावी सुत तुला विनंती करत आहे कि, या भवसागरांत तू मला तार. माझे रक्षण कर. हे माते तुळसी ! तुझा जयजयकार असो. तुझ्या एका पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. II ३ IITulasichi AaratiCustom Search

Friday, November 11, 2011

Tulsi Kavacham

Tulsi Kavacham 

 In many families after Tulsi Vivah, it is a custom to recite Tulsi Kavacham. Tulsi Kavacham is in Sanskrit and it is from Brahmanda Purana. Tarakasur was a very cruel demon and he had defeated Gods. He had been given blessing by God Brahma. According to the blessings Tarakasur had become immortal because he had no fear and death from Gods, human or Goddesses in the war. So his defeat and death was impossible. Thus Gods, Humans and everybody in the Trilokas was very much afraid of Demon Tarakasur. Hence the job of defeating was assigned to Kartikswamy, son of God Shiva. Tulsi Kavacham was given to Kartikswamy by God Shiva. Because of this Kavacham Kartikswamy defeated demon Tarakasur and killed him in the war against him. Kartikswamy was sannysi hence he was chose to defeat Tarakasur. This Kavacham is very pious. There are many benefits we receive by reciting this kavacham in the morning every day. It is an Amrut for us. Those who are poor become wealthy. Those who want a son are blessed by Son. Those who are suffering from disease they are cured and become healthy. Ladies who are barren are blessed with a child (an issue). All our good wishes are fulfilled. Thus we receive many blessings by Devi Tulsi and God GopalKrishna.


तुलसी कवचम् 


श्री गणेशाय नमः II 
अस्य श्री तुलसीकवच स्तोत्रमंत्रस्य I 
श्री महादेव ऋषिः I अनुष्टुप्छन्दः I 
श्रीतुलसी देवता I मन ईप्सितकामनासिद्धयर्थं जपे विनियोगः I
 तुलसी श्रीमहादेवि नमः पंकजधारिणी I
 शिरो मे तुलसी पातु भालं पातु यशस्विनी II १ II 
दृशौ मे पद्मनयना श्रीसखी श्रवणे मम I
 घ्राणं पातु सुगंधा मे मुखं च सुमुखी मम II २ II
 जिव्हां मे पातु शुभदा कंठं विद्यामयी मम I
 स्कंधौ कह्वारिणी पातु हृदयं विष्णुवल्लभा II ३ II 
पुण्यदा मे पातु मध्यं नाभि सौभाग्यदायिनी I
 कटिं कुंडलिनी पातु ऊरू नारदवंदिता II ४ II 
जननी जानुनी पातु जंघे सकलवंदिता I
 नारायणप्रिया पादौ सर्वांगं सर्वरक्षिणी II ५ II
 संकटे विषमे दुर्गे भये वादे महाहवे I
 नित्यं हि संध्ययोः पातु तुलसी सर्वतः सदा II ६ II 
 इतीदं परमं गुह्यं तुलस्याः कवचामृतम् I
 मर्त्यानाममृतार्थाय भीतानामभयाय च II ७ II
 मोक्षाय च मुमुक्षूणां ध्यायिनां ध्यानयोगकृत् I
 वशाय वश्यकामानां विद्यायै वेदवादिनाम् II ८ II
 द्रविणाय दरिद्राण पापिनां पापशांतये II ९ II 
अन्नाय क्षुधितानां च स्वर्गाय स्वर्गमिच्छताम् I
 पशव्यं पशुकामानां पुत्रदं पुत्रकांक्षिणाम् II १० II
 राज्यायभ्रष्टराज्यानामशांतानां च शांतये I
 भक्त्यर्थं विष्णुभक्तानां विष्णौ सर्वांतरात्मनि II ११ II
 जाप्यं त्रिवर्गसिध्यर्थं गृहस्थेन विशेषतः I 
उद्यन्तं चण्डकिरणमुपस्थाय कृतांजलिः II १२ II 
तुलसीकानने तिष्टन्नासीनौ वा जपेदिदम् I
 सर्वान्कामानवाप्नोति तथैव मम संनिधिम् II १३ II
 मम प्रियकरं नित्यं हरिभक्तिविवर्धनम् I
 या स्यान्मृतप्रजा नारी तस्या अंगं प्रमार्जयेत् II १४ II
 सा पुत्रं लभते दीर्घजीविनं चाप्यरोगिणम् I
 वंध्याया मार्जयेदंगं कुशैर्मंत्रेण साधकः II १५ II
 साSपिसंवत्सरादेव गर्भं धत्ते मनोहरम् I 
अश्वत्थेराजवश्यार्थी जपेदग्नेः सुरुपभाक II १६ II 
पलाशमूले विद्यार्थी तेजोर्थ्यभिमुखो रवेः I
 कन्यार्थी चंडिकागेहे शत्रुहत्यै गृहे मम II १७ II
 श्रीकामो विष्णुगेहे च उद्याने स्त्री वशा भवेत् I
 किमत्र बहुनोक्तेन शृणु सैन्येश तत्त्वतः II १८ II
 यं यं काममभिध्यायेत्त तं प्राप्नोत्यसंशयम् I 
 मम गेहगतस्त्वं तु तारकस्य वधेच्छया II १९ II 
जपन् स्तोत्रं च कवचं तुलसीगतमानसः I
 मण्डलात्तारकं हंता भविष्यसि न संशयः II २० II
 II इति श्रीब्रह्मांडपुराणे तुलसीमाहात्म्ये तुलसीकवचं नाम स्तोत्रं श्रीतुलसी देवीं समर्पणमस्तु II


तुलसीकवचं मराठी अर्थ: 

तारकासुराचा युद्धांत पराभव करून त्याचा वध कार्तिक स्वामीच करू शकत होता. म्हणून देवानी कार्तिक स्वामीला तारकासूराशी युद्ध करण्याची विनंती केली होती. कार्तिक स्वामी हा शंकर-पार्वतीचा मुलगा म्हणून हे तुलसी कवच शंकराने कार्तिक स्वामीला सांगितलेले आहे. श्रीगणेशाला नमस्कार असो. या तुलसीकवचस्तोत्र मंत्राचे महादेव हे ऋषी आहेत. ह्याचा छन्द अनुष्टुप् आहे. देवता तुलसी आहे. मनांतील सर्व इप्सित कामना पूर्ण व्हाव्या म्हणून या जपाचा विनियोग सांगितला आहे. तुलसी महादेवी हातांत कमळ असलेल्या तुला माझा नमस्कार. माझ्या डोक्याचे तुलसी रक्षण करो तर माझ्या कपाळाचे यशस्विनी रक्षण करो. पद्मनयना माझ्या दृष्टीचे आणि श्रीसखी माझ्या कानांचे रक्षण करो. सुगंधा माझ्या नाकाचे आणि सुमुखी माझ्या मुखाचे रक्षण करो. जिभेचे शुभदा तर विद्यामयी माझ्या कंठाचे रक्षण करो. माझ्या खांद्यांचे कह्वारिणी तर हृदयाचे विष्णुवल्लभा रक्षण करो. माझ्या मध्यंगाचे पुण्यदा तर नाभीचे सौभाग्यदायिनी रक्षण करो. माझ्या कटीचे कुंडलिनी तर ऊराचे नारदवंदिता रक्षण करो. माझ्या गुडघ्यांचे जननी तर जंघांचे सकलवंदिता रक्षण करो. माझ्या पायांचे नारायणप्रिया तर सर्वांगाचे सर्वरक्षिणी रक्षण करो. संकटांत, विषम परिस्थितींत, गडावर, भयांत, भांडणांत, अरण्यांत व संधीकाळी नेहमी तुलसी माझे रक्षण करो. हे अतिशय गुप्त असे तुलसी कवच आहे. मर्त्य लोकांसाठी अमृत तर भितर्यासाठी अभय देणारे आहे. मोक्षाची इच्छा असणार्यांसाठी मोक्षदायी तर ध्यान करणार्यांसाठी ध्यान योगांत यश देणारे आहे. वश करण्याची इच्छा असणार्यानसाठी वशदायी तर विद्येची इच्छा असणार्यानसाठी वेदांचे ज्ञान देणारे आहे. दरिद्री लोकांना द्रव्य देणारे तर पापी लोकांचे पाप नष्ट करणारे आहे. भुकी लोकांना अन्न देणारे, स्वर्गाची इच्छा असणार्यांसाठी स्वर्ग सुख देणारे आहे. पशूंची इच्छा असणार्यांसाठी पशु देणारे तर पुत्राची इच्छा असणार्यांसाठी पुत्र देणारे आहे. राज्यभ्रष्ट राजांना राज्य देणारे तर शांतीची इच्छा असणार्यांसाठी शांती देणारे आहे. विष्णुभक्तांना सर्वांच्या अंतरात असलेल्या विष्णुची भक्ती देणारे आहे. ह्याचा सूर्योदयी नमस्कार करून केलेला जप गृहस्थाना विशेष फलदायी आहे. तुलसीवनांत राहून किंवा बसून केलेला जप सर्व कामना पुरती करणारा असा माझ्याजवळ केल्यासारखाच आहे. माझे नेहमी चांगले करणारा व हरिभक्ती वाढविणारा आहे. ज्या स्त्रीची अपत्ये मेली आहेत तिच्या अंगावर या कवचाने मार्जन केल्यावर तिला निरोगी व दीर्घायू पुत्राची प्राप्ती होते. वंध्या स्त्रीलासुद्धा या कवचाने कुश/दर्भ द्वारे सर्वांगावर मार्जन केल्यावर एका वर्षांत सुंदर गर्भधारणा होते. अश्वमेध राज्याची इच्छा असणार्यांसाठी अग्नी जवळ बसून केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. पलाश वृक्ष संनिध विद्यार्थ्याने जप करावा तर तेजाची इच्छा असणार्यांसाठी सूर्यासमोर केलेला जप फलदायी होतो. कन्येची इच्छा असणार्यांसाठी चंडिका गेहे (देवळांत) केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. शत्रुंचा नाश करण्याची इच्छा असणार्यांसाठी माझ्या (श्री शंकरांच्या) देवळांत बसून केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. धनाची अपेक्षा असणार्याने विष्णु मंदिरांत तर स्त्रीची इच्छा असणार्याने उद्यानात बसून केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. जे जे इच्छा असेल ते ते तुला प्राप्त होईल. माझ्याकडे तू तारकासुराचा वध करण्याच्या इच्छेने आला आहेस या तुलसीकवच मंत्राच्या जपाने तू या मंडळावर तारकासुराचा वध करणारा म्हणून प्रसिद्ध होशील यांत संशय नाही. अशा रीतीने हे ब्रह्मांड पुराणांतील तुलसीमहात्म्यांत आलेले तुलसीकवच नावाचे स्तोत्र तुलसीमातेला समर्पण करू.
Tulsi Kavacham and Tulsi Vivah

Tulsi Kavacham

Custom Search

Saturday, November 5, 2011

Tulasi Vivaha and Tulasi Namashtak Stotra

Tulsi Blessed By Bhagwan Hari


Tulasi Vivaha and Tulasi Namashtak Stotra 

Tulasi Vivaha means marriage of Tulasi. Tulasi was a gopi in golok. Devi Bhagavati Radha became unpleased with her and she cursed Tulasi. Then God Shrikrishna blessed her and told her that while you are on pruthavi lok because of your Tapasya, God Brahma will bless you and you will marry Shri Hari who is the incarnation of me only. Because of the cursing Tulasi had to take birth on the Pruthavi Lok. It is a custom to celebrate this Tulasi Vivaha i.e. marriage of Tulasi with God Hari (God Vishnu) in the month of Kartik Shukla Paksha. It is celebrated on Kartik Shukla Dwadashi. This year we will be celebrating it on 7th November 2011 on Monday. However there are some other opinions about the day of celebration. Some people say that it can be celebrated on Kartik Shukla Navami (9), Dashmi (10) or Ekadashi (11). Others say that it can be celebrated on any day from Kartik Shukla Ekadashi to Kartik Shukla Pournima. Some others say that it can be celebrated on any tithi (day) in Kartik Shukla Paksha when there is a Nakshatra suitable for marriage. We have to perform Dhyana of Tulasi Devi. We have to assume that Tulasi Bush is Devi Tulasi. Then we have to worship (perform pooja) of Devi Tulasi with Shodoshopacharas i.e. with all required things for the pooja which includes Ghee, Dhoopa, Deep, Sindoor, Chandan, flowers, Naivedya (prasadam) and many other things. Then we have to recite/listen Devi Tulasi Namashtak followed by Aarti and finally the celebration of her marriage with God Vishnu. Afterwards Tulasi Was asked to live on PruthaviLok as a Tulsi Bush. We know Tulasi is very useful and it is a medicine in itself which we use many times for curing diseases. Fala ShrutiI: Our sins get vanished. The person who has no son is blessed with son. Man/Woman who had problem about marriage shortly gets married. Those who are suffering from diseases get well and become healthy and happy. Those who have some type of fear get relief from fear and become strong and happy. Thus by the blessings of Devi Tulasi we become happy, wealthy, and healthy and at the end of our life we rest in peace with God Vishnu in Vaikuntha (Vishnu Lok).
तुळशी विवाह व तुळशी माहात्म्य
तुळशी विवाह 
तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून करतात. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिपर्यंत तुलसी विवाह करतात. मुख्यतः द्वादशीस तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे. 
विवाहाची वेळ:  विवाहाची वेळ ही गोधूळी ( गाई चरुन घरी येण्याची वेळ ) म्हणजे सायंकाळची असते.  
विवाहाची तयारी: तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करतात. वृंदावनास रंग लावून त्यावर  स्वस्तिक काढतात. राधा-दामोदर प्रसनन असें लिहीतात. वृंदावनांतील तुळशींत चिंचा, आवळे ठेवतात. ऊस खोचून ठेवतात. ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे.  
वृंदावनाभोवती मांडव घालावा. केळीचे गाभे, आंब्याच्या डहाळ्या, टाळे, फुलांच्या माळा वगैरे लावाव्या. वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी घालावी. 
पूजा साहित्य : हळकुंडे, विड्याची पानें, सुपार्‍या, खोबर्‍याच्या वाट्या, हळद-कुंकू,  इत्यादि पूजा साहित्य. नारळ, पंचा, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, निरनिराळी फळे, लाह्या, बत्तासे आदि. 
पूजा विधी 
श्रीमन् महागणपतये नमः असा मंत्र म्हणून 
तुलसीसहित श्रीगोपालकृष्ण प्रीत्यर्थं विवाहोत्सांगध्यानावहनादि षोडशोपचार पूजनं करिष्ये " 
असे म्हणून कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी.  
ध्यान करावे व खालील श्र्लोक म्हणावा. 
ध्यानाचा श्र्लोक:
शान्ताकारम् भुजगसहयनम् पद्मनाभं सुरेशं ।
विश्र्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् । 
लक्ष्मीकान्तं कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकैकनाथम् ।
यानंतर गोपालकृष्ण ताम्हनांत घेऊन तुलसी व गोपालकृष्णाची पूजा करावी. यानंतर खालीलप्रमाणें तुलसीची प्रार्थना करावी.
तुलसीची प्रार्थना
दिव्यरुपधरा देवी दिव्याभरणभूषिता ।
पद्मकल्हारवदना वरामया चतुर्भुजा ॥ १ ॥
शुभाशुभ परित्यागी दिव्यगंधानुलेपना ।
श्यामा विशालवदना नीलकुंचिताभूर्धजा ॥ २ ॥
स्फुरत्कुंडलसंयुक्ता पूर्णचंद्रनिभानना ।
केयुहारविलसद् रत्नमाला विषोज्ज्वला ॥ ३ ॥
हे ध्यनमंत्र म्हणतांना एका भांड्यांत दूध घेऊन तुलसी वृंदावनांत त्याची धार धरुन तीन प्रदक्षिणा घालाव्या.
यानंतर गोविंदा गोविंदा असा त्रिवार नामघोष करावा. 
देवपूजेंतील बाळकृष्णाची मूर्ती आणून देवाचे तोंड तुलसी वृंदावनाकडे करावे. जमलेल्यानां अक्षदा वाटाव्यात. 
तुलसी व बालकृष्ण यांच्यामध्यें अंतःर्पट धरुन मंगलाष्टके म्हणावीत. विवाहाच्यावेळीं जशी म्हणतात तशी सुरवात व तसा शेवट करावा. 
मंगलाष्टके
१) स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्र्वरं सिद]धिदं ॥
बल्लाळो मुरुदं विनायकमहं चिंतामणिं स्थेवरं ॥
लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्र्वरं ओझरं ॥
ग्रामो रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम् ॥
२) लक्ष्मीःकौस्तुभपारिजातकसुरा धन्वंतरिश्र्चंद्रमा ॥
गावःकामदुधाःसुरेश्र्वरगजो रंभादिदेवांगनाः अश्र्वः ।
सप्तमुखो विषं हरिधनुःशंखोऽमृतं चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मंगलम् ॥
३) कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षःस्थले कौस्तुभं ।
नासाग्रे वर मौक्तिकं करतले वेणुःकरे कंकणम् ।
सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठेच मुक्तावली ।
गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम् ॥
४) गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयूमहेंद्रतनया चर्मण्वती वेदिका ।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता च या गंडकी ।
पूर्णाः पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वंतु वो मंगलम् ॥
५) रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं ।
रामेचित्तलयः सदा भवतु मे कुर्यात् सदा मंगलम् ॥
६) कंठे यस्य विराजते हि गरलं शीर्षे च मंदाकिनी ।
वामांके गिरिजाननं कटितटे शार्दूलचर्मांबरम् ।
माया यस्य रुणद्धि विश्र्वमखिलं तस्मै नमः शंभवे । 
संस्थाणुः स्थिर भक्तियोग सुलभः कुर्यात् सदा मंगलम् ॥
७) मोठे दोंद कटीं फणींद्र बरवा भाळीं शशी शोभतो ।
हस्ती अंकुश लड्डु पद्म परशू दंती हिरा झळकतो ।
पायी पैंजण घागरी रुणझुणी प्रेमें बरा नाचतो ।
ऐसा देव गणेश तो वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ॥
८) श्रीवत्सांकित भूषणें तुळशिची आपाद माळा रुळे।
माथां रत्नकिरीट कौस्तुभ गळां सूर्यप्रभे ना तुळे ।
केयुरांगद कुंडले सुरचना चौहस्तकीं आयुधें ।
लक्ष्मीयुक्त मुरारि तो वधुवरां कुर्वन्तु वो मंगलम् ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव 
ताराबलं चन्द्रबलं तदेव 
विद्याबलं दाोवबलं तदेव 
लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि
सुमुहूर्त सावधान -सावधान 
   
नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षदा टाकून टाळ्या वाजवाव्या. वाद्ये वाजवावी. 
पूजा करणाराने एक फुलांची माल गोपालकृष्णाला व दुसरी फुलांची माळ तुलसीला घालावी. नंतर तुलसी व  श्रीकृश्णाची आरती करावी. व प्रार्थना करावी. 
प्रसीदं मम देवेशी कृपया परया सदा ।
अभिष्ट कार्यसिद्धिंच कुरु मे माधवप्रिये ॥
देवैसह निर्मिता पूर्व अर्चितासि मुनीश्र्वरैः ।
नमो नमस्ते तुलसि पापहरं हरप्रिये ॥
सुवासिनींना तुलसीला हळदकुंकू वाहून ओटी भरावी. दीप लावावा व म्हणावे 
अखंड सौभाग्य वृद्धये तुलसी विवाहांगत्वेन ।
राधाकार्तिक दामोदर देवताप्रीत्यर्थ दीपज्वालनं करिष्ये ॥
व उदक सोडून आरती करावी. ब्राह्मणास गंधफूल विडा दक्षिणा द्यावी. लाह्या, बत्तासे, उसाचे कर्वे वगैरे प्रसाद वाटावा. 
नंतर कन्यादान विधी म्हणून म्हणावे.
देवीं कनकसंपन्ना कनकाभरणौर्युताम् । 
दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजिगीषया ।
मया संवर्धितां यथाशक्त्यालंकृतां इमां तुलसीं देवीं ।
दामोदराय श्रीधराय वराय तुभ्यमहं संप्रददे ॥
असे यजमानाने म्हणावे.  नंतर प्रार्थना करावी.
उत्तिष्ठोतिष्ठ गोविंद उतिष्ठ गरुडध्वज ।
उतिष्ठ कमलाकन्त वासुदेव नमोऽस्तुते ॥
अशा रीतीनें तुळशीविवाह संपन्न करावा. 

तुलसीची रोजची उपासना
रोज पाणी घालून नैवेद्य दाखवून तुळसीदल भक्षण करुन म्हणतात
तुळशी श्रीसखी शुभे पापहरिणी पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायण मनःप्रिये ॥
तुळसीला प्रदक्षिणा घालावाव्यात. प्रत्येल पावलागणिक अश्र्वमेघ यज्ञाचे फळ मिळते. 
तुलसीचा गायत्री मंत्र
श्रीतूलस्यै विद्महे । विष्णुप्रियायै धीमहि ।
तन्नो अमृता प्रचोदयात् ॥
तुळशीमाला
कार्तिक महिन्यांत तुलशीची माल परिधान करतात.
तुळशीकाष्ठसम्भूते माले कृष्णजनप्रिये ।
बिभर्मिं त्वामहं कण्ठे कुरुमां कृष्णवल्लभम् ॥
अर्थ 
हे माले, तू तुळशीकाष्ठची बनलेली असून वैष्णवाना प्रिय आहेस. मी तुला कंठी धारण करतो. मी कृष्णाला प्रिय होईन असे कर.
तुळशीची व्रते 
तुळशीपत्र लक्षपूजा (व्रत)
हे एक व्रत आहे. एकलक्ष तुळसीपत्रे वाहुन विष्णुची पूजा करायची. या पूजेंत पहिल्या दिवशी जितकी तुळशीपत्रें वाहीली असतील तितकीच पुढे प्रत्येक दिवशी घेऊन लक्ष संख्या पुरी करावयाची. तुळशीपत्रें स्वच्छ असावीत. किडकी, अस्वच्छ, फाटलेली असू नयेत. जितकी तुलशीदले रोज वाहिली असतील तितक्याच वातीनीं आरती करावी.
तुळशी लक्ष प्रदक्षिणा ( व्रत ) 
चातुर्मासांत तुळशीला लक्ष प्रदक्षिणा घालण्याचे व्रत असते. रोज प्रदक्षिणा घालून झाल्यावर तुळशीची आराधना करताना खालीलप्रमाणें म्हणतात.    
हे तुळशी, तूं श्यामवर्ण, कमललोचन, प्रसन्न, चतुर्भुज, दोन्ही हातांत पद्म व कमल धारण करणारी, दोन हात वरदव अभय मुद्रेत असलेली, किरीट, हार, केयूर, कुंडल अलंकारांनी शोभणारी शुभ्रवस्त्रा व पद्मासनस्था अशी आहेस. तुला मी नमस्कार करतो. तूं मला प्रसन्न होऊन वरदान दे.  

ह्यांतील बरीचशी माहीती तुळशी विवाह व तुळशी माहात्म्य या पुस्तकांतून साभार घेतली आहे. 


तुलसी नामाष्टक 

वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी I 
पुष्पसारा नन्दिनी च तुलसी कृष्णजीवनी II १ II 
एतन्नामाष्टकं चैव स्तोत्रं नामार्थसंयुतम् I 
यः पठेत् तां च सम्पूज्य सोSश्वमेधफ़लमं लभेत् II २ II 
II इति श्री ब्रह्मवैवर्ते प्रकृतिखण्डे तुलसी नामाष्टकम् देवी तुलसिं समर्पणमस्तु II 
तुलसी नामाष्टक मराठी अर्थ:
वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळस आणि कृष्णजीवनी ही देवी तुलसीची आठ नावे आहेत. हे देवी तुलसीच्या आठ नावांचे स्तोत्र आहे. जो मनुष्य तुलसीची पूजा करून या नामाष्टकाचा पाठ करतो त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते.
Tulasi Vivaha and Tulasi Namashtak Stotra 


Custom Search