Monday, July 31, 2017

Saraswati Kavacham सरस्वती कवच


Saraswati Kavacham 
Sarawati Kavacham is in Sanskrit. It is from Devi Bhagwat. This Kavacham is for receiving knowledge, health wealth by the blessings of Goddess Saraswati.
सरस्वती कवच
कवचस्यास्य विप्रेन्द्र ऋषिरेव प्रजापतिः ।
स्वयं छन्दश्र्च बृहती देवता शारदाम्बिका ॥ १ ॥
१) या कवचाचे ऋषि स्वतः प्रजापति आहेत. याचा छंद बृहती आहे. देवता शारदाम्बिका आहे. 
सर्वतत्वपरिज्ञानसर्वार्थ साधनेषु च ।
कवितासु च सर्वासु विनियोगः प्रकीर्तितः ॥ २ ॥
२) सर्व तत्वांचे संपूर्ण ज्ञान, सर्व अर्थची साधनें आणि कविता शक्ति यांच्या प्राप्ती करतां याचा विनियोग सांगितला आहे. 
ॐ श्रीं हृीं सरस्वत्यै स्वाहा शिरो मे पातु सर्वतः ।
ॐ श्रीं वाग्देवतायै स्वाहा भालं मे सर्वदाऽवतु ॥ ३ ॥
३) ॐ श्रीं हृीं सरस्वत्यै स्वाहा माझ्या डोक्याचे सर्व बाजूंनी रक्षण करो. ॐ श्रीं वाग्देवतायै स्वाहा माझ्या कपाळाचे सर्वदा रक्षण करो. 
ॐ र्‍हीं सरस्वत्यै स्वाहेति श्रोत्रे पातु निरन्तरम् ।
ॐ श्रीं र्‍हीं भगवत्यै स्वाहा नेत्रयुग्मं सदाऽवतु ॥ ४ ॥
४) ॐ हृीं सरस्वत्यै स्वाहा माझ्या कानांचे रक्षण करो. ॐ श्रीं हृीं भगवत्यै स्वाहा माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. 
ॐ एैं र्‍हीं वाग्वादिन्यै स्वाहा नासां मे सर्वदाऽवतु ।
ॐ र्‍हीं विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा ओष्ठं सदाऽवतु ॥ ५ ॥ 
५) ॐ एैं हृीं वाग्वादिन्यै स्वाहा माझ्या नाकाचे नेहमी रक्षण करो. ॐ हृीं विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा माझ्या ओठांचे नेहमी रक्षण करो. 
ॐ श्रीं र्‍हीं ब्राह्नण्यै स्वाहेति दन्तपंक्तिं सदाऽवतु ।
ॐ ऐमित्येकाक्षरो मन्त्रो मम कण्ठं सदाऽवतु ॥ ६ ॥
६) ॐ श्रीं ब्राह्मण्यै स्वाहा माझ्या दातांचे रक्षण करो. ॐ ऐं हा मंत्र माझ्या कंठाचे नेहमी रक्षण करो. 
ॐ श्री र्‍हीं पातु मे ग्रीवां स्कन्धौ मे ॐ श्रीं सदाऽवतु ।
ॐ विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा वक्षः सदाऽवतु ॥ ७ ॥
७) ॐ श्रीं हृीं माझ्या मानेचे नेहमी रक्षण करो. ॐ श्रीं माझ्या खांद्यांचे नेहमी रक्षण करो. ॐ विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा माझ्या वक्षांचे नेहमी रक्षण करो.   
ॐ र्‍हीं विद्यास्वरुपायै स्वाहा मे पातु नाभिकाम् ।
ॐ र्‍हीं क्लीं वाण्यै स्वाहेति मम हस्तौ सदाऽवतु ॥ ८ ॥
८) ॐ हृीं विद्यास्वरुपायै स्वाहा माझ्या नाभीचे नेहमी रक्षण करो. ॐ हृीं क्लीं वाण्यै स्वाहा माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो.  
ॐ सर्ववर्णात्मिकायै स्वाहा पादयुग्मं सदाऽवतु । 
ॐ वाग्धिष्ठातृदेव्यै स्वाहा सर्वं सदाऽवतु ॥ ९ ॥
९) ॐ सर्ववर्णात्मिकायै स्वाहा माझ्या दोन्ही पायांचे नेहमी रक्षण करो. ॐ वाग्धिष्ठतृदेव्यै स्वाहा माझ्या सर्वांगाचे नेहमी रक्षण करो.  
ॐ सर्वकंठवासिन्यै स्वाहा प्राच्यां सदाऽवतु ।
ॐ सर्वजिह्वाग्रवासिन्यै स्वाहाऽग्निदिशिं रक्षतु सर्वदा ॥ १० ॥
१०) ॐ सर्वकंठवासिन्यै स्वाहा माझे पूर्वेकडून रक्षण करो. ॐ सर्वजिह्वाग्रवासिन्यै स्वाहा माझे आग्नेय दिशेकडून रक्षण करो. 
ॐ ऐं र्‍हीं श्रीं क्लीं सरस्वत्यै बुधजनन्यै स्वाहा ।
सततं मन्त्रराजोऽयं दक्षिणे मां सदाऽवतु ॥ ११ ॥
११) ॐ ऐं हृीं श्रीं क्लीं सरस्वत्यै बुधजनन्यै स्वाहा हा मंत्रराज माझे दक्षिणेला रक्षण करो. 
ॐ ऐं र्‍हीं श्रीं त्र्यक्षरो मन्त्रो नैर्ऋत्यां सर्वदाऽवतु ।
ॐ ऐं जिह्वाग्रवासिन्यै स्वाहा मां वारुणेऽवतु ॥ १२ ॥
१२) ॐ ऐं हृीं श्रीं हा तीन अक्षरी मंत्र माझे नैर्ऋत्येला रक्षण करो. ॐ ऐं जिह्वाग्रवासिन्यै स्वाहा माझे पश्र्चिमेला रक्षण करो.
ॐ सर्वाम्बिकायै स्वाहा वायव्ये मां सदाऽवतु ।
ॐ ऐ श्रीं क्लीं गद्यवासिन्यै स्वाहा मामुत्तरेऽवतु ॥ १३ ॥
१३) ॐ सर्वाम्बिकायै स्वाहा माझे वायव्येला रक्षण करो. ॐ ऐं श्रीं क्लीं गद्यवासिन्यै स्वाहा माझे उत्तरेला रक्षण करो
ॐ ऐं सर्वशास्त्रवासिन्यै स्वाहेशान्यां सदाऽवतु ।
ॐ र्‍हीं सर्वपूजितायै स्वाहा चोर्ध्वं सदाऽवतु ॥ १४ ॥
१४) ॐ ऐं सर्वशास्त्रवासिन्यै स्वाहा माझे ईशान्येला रक्षण करो. ॐ हृीं सर्व पूजितायै स्वाहा माझे उर्ध्वेकडून नेहमी रक्षण करो.   
ॐ र्‍हीं पुस्तकवासिन्यै स्वाहाऽधो मां सदाऽवतु ।
ॐ ग्रन्थबीजम्स्वरुपायै स्वाहा मां सर्वतोऽवतु ॥ १५ ॥
१५) ॐ हृीं पुस्तकवासिन्यै स्वाहा माझे अध (खालची दिशा) दिशेला नेहमी  रक्षण करो. ॐ ग्रंथबीज स्वरुपायै स्वाहा माझे नेहमी सगळीकडे रक्षण करो. 
इति ते कथितं विप्र ब्रह्ममन्त्रौघविग्रहम् ।
इदं विश्रजयं नाम कवचं ब्रह्मरुपकम् ॥ १६ ॥
१६) हे विप्रा, मी तुला हे विश्र्वजय नावाचे कवच सर्व विग्रहासह सांगितले. 
फलप्राप्ती
या कवचाच्या पठणाने सरस्वतीच्या कृपेने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शुचिर्भूत होऊन प्रथम गणपति पूजन नंतर सरस्वतीची पूजा व ध्यान करावे. नंतर "श्रीं हृीं सरस्वत्यै स्वाहा " ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करुन कवच पठनास आरंभ करावा.  
Saraswati Kavacham
सरस्वती कवच


Custom Search

Sunday, July 30, 2017

Samas Tisara Mayodbhav Nirupan समास तिसरा मायोद्भव निरुपण


Dashak Sahava Samas Tisara Mayodbhav Nirupan 
Samas Tisara Mayodbhav Nirupan. It is in Marathi. What we see is created by Maya and it not real, not true. The sky is there before creation of a pot. When pot is created it is also inside the pot and when the pot is broken the sky is still there. Just like that anything that is created by Maya is engulfed by Brahma which is true and real; Brahma is still there before creation and after destruction of anything. Brahma is permanent but it can’t be seen. When we understand this we achieve Moksha. All this is in this Samas Mayodbhav told by Samarth Ramdas.
समास तिसरा मायोद्भव निरुपण
श्रीराम ॥
निर्गुण आत्मा तो निर्मळ । जैसें आकाश अंतराळ ।
घनदाट निर्मळ निश्र्चळ । सदोदित ॥ १ ॥ 
१) गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा निर्मळ आहे. आकाशाची पोकळी सदोदित भरीव, मळरहित व हालचाल नसलेली असते तसेंच आत्मा नेहमी निर्मळ, निश्र्चळ व घनदाट असतो.   
जें खंडलेंचि नाहीं अखंड । जें उदडांहूनि उदंड ।
जें गगनाहूनि वाड । आणि सूक्ष्म ॥ २ ॥
२) तें अखंड आहे. त्याचे तुकडे करता येत नाहीत. तें विशाळाहूनी विशाळ, आकाशाहूनि अधिक व्यापक व सूक्ष्म आहे.  
जें दिसेना ना भासेना । जें उपजेना ना नासेना ।
जें येयना ना जायना । परब्रह्म तें ॥ ३ ॥
३) तें दिसत नाही तसेंच भासत नाही. ते उत्पन्न होत नाही कां नाश पावत नाही. तें कोठेंहीं जात वा येत नाही. असे ते परब्रह्म आहे.
जें चळेना ना ढळेना । जें तुटेना ना फुटेना ।
जें रचेना ना खचेना । परब्रह्म तें ॥ ४ ॥
४) चळणें व ढळणें म्हणजे हे बदल होण्याचे दृश्याचे गुणधर्म त्यांत नाहीत. तें तुटत नाही वा फुटत नाही. त्याचे खचणें नाही वा त्याची रचना करणें शक्य नाही. असें तें परब्रह्म आहे. 
जें सन्मुखचि सर्वकाळ । जें निःकळंक आणि निखल ।
सर्वांतर आकाशपाताळ । व्यापूनि असे ॥ ५ ॥
५) तें सर्व ठिकाणी असते. तें समोरच असते. तें निःकलंक व निखळ शुद्ध आहे. आकाशपाताळ व्यापून असें तें सर्वांच्या अंतर्यामी असते.  
अविनाश तें ब्रह्म निर्गुण । नासे ते माया सगुण ।
सगुण आणि निर्गुण । कालवलें ॥ ६ ॥
६) कधीं नाश न होणारे तें ब्रह्म निर्गुणी आहे. जे नाशिवंत आहे ती माया आहे. म्हणजे हे आपल्या देहासगट दृश्य विश्र्व, हे सगुण आहे. मायेमधें सगुण व निर्गुण यांचे मिश्रण असते.  
या कर्दमाचा विचार । करुं जाणती योगेश्र्वर ।
जैसें क्षीर आणि नीर । राजहंस निवडिती ॥ ७ ॥
७) या सगुण व निर्गुण या मिश्रणाची बरोबर विचार करण्याची पद्धत थोर ज्ञानी पुरुष जाणतात. निर्गुण तेवढेंच सेवन करतात. जसेंकी राजहंस दूध व पाणी यांच्या मिश्रणांतून दूध वेगळे करुन तेवढेंच पीतो.   
जड सबळ पंचभूतिक । त्यामधें आत्मा व्यापक ।
तो नित्यानित्यविवेक । पाहातां कळे ॥ ८ ॥     
८) पंचमहाभूतांपासून जें जें निर्माण होते तें सर्व जड असते. त्यांत आत्मा अंतर्यामी व्यापून असतो. शाश्वत व अशाश्वत काय हें विवेक केल्यानें समजते.  
उसांमध्ये घेईजे रस । येर तें सांडिजे बाकस ।
तैसा जगामध्यें जगदीश । विवेकें वोळखावा ॥ ९ ॥
९) ऊसामधला फक्त रस तेवढा घेऊन चोथा टाकतात. तसाच दृश्य विश्र्वांतील परमात्मा तेवढा ओळखावा व बाकी दृश्य विश्र्व (टाकून) सोडून द्यावे.   
रस नासिवंत पातळ । आत्मा शाश्वत निश्र्चळ ।
रस अपूर्ण आत्मा केवळ । परिपूर्ण जाणावा ॥ १० ॥
१०) आत्मा रस आहे अशी कल्पना केली. पण रस पातळ व नाशिवंत आहे. यामुळें तो अपूर्ण आहे. तर आत्मा निश्र्चळ व शाश्वत आहे. म्हणून आत्मा परिपूर्ण आहे हे ओळखावे. 
आत्म्यासारिखें येक असावें । मां तें दृष्टांतासि द्यावें ।
दृष्टांतमिसें समजावें । कैसें तरी ॥ ११ ॥
११) या दृश्यामधें कोठचीही वस्तु आत्म्यासारखी नाही, तसेअसते तर त्यावरुन आत्मा कसा आहे हे सांगता आलें असते. म्हणुन रसाच्य दृष्टांताच्यायोगे आत्मा कसा तें समजून घ्यावे.  
ऐसी आत्मस्थिती संचली । तेथे माया कैसी जाली ।
जैसी आकाशीं वाहिली । झुळुक वायोची ॥ १२ ॥
१२) निव्वळ आत्मस्वरुप सगळीकडे भरुन राहीले असतां त्यामधे माया कशी निर्माण झाली. तर आकाशांत वार्‍याची एखादी झुळुक यावी तशी शुद्ध आत्मस्थितीमधें स्फुरणानें माया उत्पन्न झाली. 
वायोपासूनि तेज जाालें । तेजापासूनि आप निपजलें ।
आपापासूनि आकारलें । भूमंडळ ॥ १३ ॥ 
१३) वायूपासून अग्नि, अग्निपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी तयार झाली.   
भूमंडळापासूनि उत्पत्ती । जीव नेणों जाले किती ।
परंतु ब्रह्म आदिअंती । व्यापूनि आहे ॥ १४ ॥
१४) पृथ्वीपासून जीवसृष्टि निर्माण झाली. जीव अगणित निर्माण झाले.  परंतु सर्वाच्या आधी व शेवटी ब्रह्म मात्र व्यापून राहीले आहे. 
जें जें कांहीं निर्माण जालें । तें तें अवघेंचि नासलें ।
परी मूळीं ब्रह्म तें संचलें । जैसें तैसें ॥ १५ ॥
१५) जें जें निर्माण झालें तें तें सर्व नाश पावलें. परंतु मूळ ब्रह्म मात्र  जसेच्या तसेच राहीले. 
घटापूर्वीं आकाश असे । घटामधें आकाश भासे ।
घट फुटतां न नासे । आकाश जैसें ॥ १६ ॥
१६) एक घट तयार होण्याआधी आकाश असते. घट तयार झाल्यावरसुद्धा त्याच्या पोकळींत आकाश असते. घट फुटला तरी आकाश जसेच्या तसेंच राहते. 
तैसें परब्रह्म केवळ । अचळ आणी अढळ ।
मधें होता जाता सकळ । सचराचर ॥ १७ ॥
१७) तसेच परब्रह्म हे अचळ व अढळ आहे. त्याच्यामधेंच हें चराचर विश्र्व तयार होते व नाश पावते.  
जें जें कांहीं निर्माण जालें । तें तें आधींच ब्रह्में व्यापिलें ।
सर्व नाशतां उरलें । अविनाश ब्रह्म ॥ १८ ॥
१८) जें जें निर्माण झाले त्याला परब्रह्माने व्यापून टाकले तरी सर्व नाश पावल्यावरसुद्धा अविनाशी ब्रह्म शिल्लक राहीले. 
ऐसें ब्रह्म अविनाश । तेंचि सेविती ज्ञाते पुरुष ।
तत्वनिर्शनें आपणास । आपण लाभे ॥ १९ ॥
१९) असें जें कधीही नाश न पावणारे ब्रह्म आहे त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय करतात. आणि दृश्याचा पूर्ण निरास केला कीं मग आपल्या खरा " मी " चा लाभ आपल्याला होतो.  
तत्वें तत्व मेळविलें । त्यास देह हें नाम ठेविलें ।
तें जाणते पुरुषीं शोधिलें । तत्वें तत्व ॥ २० ॥
२०) तत्वाला तत्व मिळून जो आकार तयार होतो त्याला देह म्हणतात. जाणते व विचारी लोक एका तत्वाचा आधार घेऊन इतर तत्वें शोधून काढतात.  
तत्वझाडा निशेष होतां । तेथें निमाली देहअहंता ।
निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता । विवेकें जाली ॥ २१ ॥
२१) विनाशी तत्वें एकदा विरली म्हणजे मी देहच आहे ही भावना पण नाहींशी होते. अशा पद्धतीनें निर्गुण ब्रह्माशी विवेकानें जीवाला ऐक्य प्राप्त होते.  
विवेकें देहाकडे पाहिलें । तों तत्वें तत्व वोसरलें ।
आपण कांहीं नाहीं आलें । प्रत्ययासी ॥ २२ ॥
२२) विवेकानें जर देहाचा शोध तर एका विनाशी तत्वानें दुसरें विनाशी तत्व मावळतें व मी हा देहबुद्धिचा नाही असा अनुभव येतो. 
आपला आपण शोध घेतां । आपली तों माईक वार्ता ।
तत्वांतीं उरलें तत्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३ ॥
२३) आपण आपला शोध घेणें सुरु केले तर आपण भ्रमात्मक आहोंत हें समजते. अशारीतीनें तत्वांचा निरास झाला कीं खरें निर्गुण ब्रह्मच उरते. 
आपणाविण निर्गुण ब्रह्म । हेंचि निवेदनाचें वर्म । 
तत्वसरिसा गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४ ॥
२४) देह अहंता किंवा खोटा मी हा भ्रम जाऊन जें उरतें तें निर्गुण ब्रह्म होय. हेंच आत्मसमर्पणाचें वर्म समजावे. कारण विनाशीं तत्वें विरली कीं मी-तूं हा द्वैताचा भ्रम पण नाहींसा होतो.   
मी पाहातां आडळेना । निर्गुण ब्रह्म तें चळेना ।
आपण तेंचि परी कळेना । सद्गुरुविण ॥ २५ ॥
२५) " मी " म्हणून वावरणार्‍या अहंकाराचा शोध केला तर तो सांपडत नाही. निर्गुण ब्रह्मच अगदीं जसेंच्या तसें राहतें. पण आपण अगदी तेंच आहोंत हें सद्गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय कळत नाही.
सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघोन गेलें ।
पुढें सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६ ॥
२६) या सर्व विश्र्वामधें तत्व कोणतें व भ्रम कोणता याचा शोध घेतला म्हणजे जें भ्रमरुप व खोटें असतें तें नाहीसें होते मग खरे तत्व जें ब्रह्म  सर्व व्यापून असते तेवढेंच उरते.  
आधीं ब्रह्म निरोपिलें । तेंचि सकळांमध्यें व्यापलें ।
सकळ आवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७ ॥   
२७) आरं भी ब्रह्माचें वर्णन केलें. तेंच सर्व विश्र्वास व्यापून आहे हेहीं सांगितलें. तें विश्र्वही नाहींसे झालें की जें उरतें तें निव्वळ ब्रह्म होय.   
होतां विवेकें संव्हार । तेथें निवडे सारासार । 
आपला आपणासि विचार । ठांई पडे ॥ २८ ॥
२८) विवेकानें जगाचा शोध घेऊं लागलें कीं दृश्याचा निरास होतो. त्यामधून टिकणारे कोणते व तात्पुरतें कोणते याची आपोआप निवड होते. मग आपण खरें कोण याचा बोध आपल्या ठिकाणीं आपल्याला होतो.
आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण ।
मीपण गेलियां निर्गुण । आत्मा स्वयें ॥ २९ ॥
२९) आपल्याच कल्पनेनें आपण आपला मीपणा निर्माण केलेला असतो. विवेकानें त्याचा शोध केला तर तो उरत नाही. हा काल्पनिक मीपणा गेला की जो शुद्ध " मी " उरतो तेंच निर्गुण आत्मस्वरुप होय.
जालियां तत्वाचें निर्शन । निर्गुण आत्मा तोचि आपण ।
कां दाखवावें मीपण । तत्वनिर्शनाउपरी ॥ ३० ॥
३०) विनाशीं तत्वें विवेकानें नाहींशी केली कीं निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो. विनाशीं तत्वें ओसरल्यावर देहाचा मी पणा वेगळेपणानें दाखवितां येणें शक्य नसतें. 
तत्वांमध्यें मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें ।
सोहंभावें प्रत्यया आलें । आत्मनिवेदन ॥ ३१ ॥
३१) तत्वें आणि मीपणा दोन्ही विनाशी व दृश्य असल्यानें तत्वांचा निरास झाला कीं मीपण त्याच बरोबर जाते. मग निर्गुण आत्मा तेवढा शिल्लक राहतो. त्यावेळीं " सोहं म्हणजे मी तोच आहे " अशा आत्मनिवेदनाचा अनुभव येतो.       
आत्मनिवेदन होतां । देवाभक्तांसी ऐक्यता ।
साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाला ॥ ३२ ॥
३२) हें आत्मनिवेदन घडलें म्हणजे देव आणि भक्त एकरुप होऊन जातात. वेगळेपणा दूर सारुन भक्त देवाशी एकरुप होतो. 
निर्गुणासी नाहीं जन्ममरण । निर्गुणासी नाहीं पापपुण्य ।
निर्गुणीं अनन्य होतां आपण । मुक्त जाला ॥ ३३ ॥
३३) निर्गुण स्वरुपाला जन्ममरण नाही. पाप पुण्य नाही. जो निर्गुणाशीं समरस होतो तो मुक्त होतो.
तत्वीं वेटाळून घेतला । प्राणी संशयें गुंडाळला ।
आपणासी आपण भुलला । कोहं म्हणे ॥ ३४ ॥
३४) जीव विनाशीं तत्वांनीं वेढून असतो. त्यामुळें तो संशयाच्या चक्रांत अडकतो. मग स्वतःच स्वस्वरुप विसरतो. आणि कोहं म्हणजे मी कोण आहे असें विचारु लागतो.    
तत्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेक पाहातां म्हणे सोहं ।
अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५ ॥
३५) जीव जोपर्यंत तत्वांमध्यें गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे असें विचारतो. विवेकानें शोध घेऊन तत्वांमध्यें निरसन झालें कीं " मी तोच आहे " असा जीवाला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरुपाशी एकरुप होऊन मी व तूं हा भेद उडाला कीं अहं सोहं भूनिका उरत नाही. 
याउपरी उर्वरित । तेंचि स्वरुप संत ।
देहीं असोनि देहातीत । जाणिजे ऐसा ॥ ३६ ॥
३६) अशा रीतीनें सर्व अवस्थांच्या पलीकडे जेम निव्वळ स्वरुप असतें तें संत बनून राहतात. देहांत दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा असा तो असतो. हें ओळखावें. 
संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंचि बोलावें लागे ।
आम्हासी हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्ष्मां करावें ॥ ३७ ॥
३७) साधकाची संशयवृत्ती एकदम नाहीशीं होत नाही. म्हणून पुनःपुनः तेंच तें सांगावें लागतें. हा विषय सांगण्यासाठी मी असें केले म्हणून श्रोत्यांनी मला क्षमा करावी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायोद्भवनाम समास तिसरा ॥ 
Samas Tisara Mayodbhav  Nirupan
समास तिसरा मायोद्भव निरुपण 


Custom Search

Friday, July 28, 2017

Samas Dusara Brahmapavan Nirupan समास दुसरा ब्रह्मपावन निरुपण


Dashak Sahava Samas Dusara Brahmapavan Nirupan 
Samas Dusara Brahmapavan Nirupan. It is in Marathi. If we think spirituality then we come to know that what we see is not permanent. There is an end to everything what we see. Hence it is not real or permanent. However what we don’t see our soul is permanent and real. The soul has no end. When soul leaves our body we are called as dead. In this Samas how we can get knowledge of that permanent thing which is called as Brhma, is told.
समास दुसरा ब्रह्मपावन निरुपण
श्रीराम ॥
ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायोज्यप्राप्ती होय जेणें ।
नाना मतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १ ॥
१) ज्या उपदेशानें सायोज्य मुक्ति मिळते. त्याची लक्षणें आतां ऐका.  याबाबतींत निरनिराळ्या मतांतरांचे ज्ञान उपयोगी पडत नाही.
ब्रह्मज्ञानेंविण उपदेश । तो म्हणो नये विशेष ।
धान्येंविण जैसें भूंस । खातां नये ॥ २ ॥
२) धान्याशिवाय असलेला भूसा जसा खात नाहीत, तसाच ब्रह्मज्ञानाशिवाय असलेला उपदेश विशेष समजूं नये.  
नाना काबाड बडविलें । नातरी तक्रचि गुसळिलें ।
अथवा धुणचि सेविलें । सावकास ॥ ३ ॥
३) रसरहित कडबा कुटला, किंवा लोणी काढलेले ताक घुसळीलें, किंवा तांदुळाचे धुवण प्यावें, 
नाना साली भक्षिल्या । अथवा चोईट्या चोखिल्या ।
खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैश्या ॥ ४ ॥
४) किंवा नाना फळांच्या साली खाल्या, किंवा रस नसलेल्या बाठी चोखल्या, किंवा खोबरें नसलेल्या करंट्या खाल्या तर नुसतेंच श्रम होऊन तें वायां जातात.  
तैसें ब्रह्मज्ञानेंविण । नाना उपदेशाचा सिण । 
सार सांडून असार कोण । शाहाणा सेवी ॥ ५ ॥
५) तसेच ब्रह्मज्ञानाशिवाय असलेला उपदेश ऐकणे म्हणजे नुसता शिणच सार नसलेला असार कोण शहाणा सेवन करील?  कोणीच करणार नाही. 
आतां ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरुपण । 
सुचित करावें अंतःकर्ण । श्रोतेजनीं ॥ ६ ॥ 
६) आतां ब्रह्म जें गुणातीत आहे. त्याचें वर्णन श्रोत्यांनी शुद्ध अंतःकरणाने ऐकावे. 
सकळ सृष्टीची रचना । ते हे पंचभूतिक जाणा ।
परंतु हे तगेना । सर्वकाळ ॥ ७ ॥
७) सगळें विश्र्व हें पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. पण हे सर्व फार काळ टिकत नाही.
आदि अंती ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।
येर पंचभूतिक जाण । नासिवंत ॥ ८ ॥
८) हें विश्र्व निर्माण होण्या आधी व नंतर गुणातीत ब्रह्म जसेंच्या तसेंच राहाते. इतर जें कांहीं आहे तें नाशवंत समजावें.  
येर्‍हवीं हें पाहातां भूतें । देव कैसें म्हणावें त्यातें ।
भूत म्हणतां मनुष्यातें । विषाद वाटे ॥ ९ ॥
९) साध्या मानवी दृष्टीनें पाहीलें तर विश्र्व हे झालेले (भूत) आहे. ते बदलते म्हणून त्याला देव म्हणता येत नाही. भूत म्हणून हांक मारली तर मनुष्याला वाईट वाटते. 
मां तो जगज्जनक परमात्मा । त्यास आणि भूतउपमा ।
ज्याची कळेना महिमां । ब्रह्मादिकांसी ॥ १० ॥
१०) मग तो परमात्मा की ज्याचा महिमा ब्रह्मासिकांनाही कळला नाही त्या थोर जगज्जनकाला भूत म्हणणे अगदींच कांहींतरी वाटते. 
भूतां ऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष ।
याकारणें माहापुरुष । सर्व जाणती ॥ ११ ॥
११) या जगाचा नियंता ईश्र्वर पंचमहाभूतांसारखा आहे असें म्हणणे फार सदोष आहे. ब्रह्मज्ञानी महापुरुष हें सगळें बरोबर जाणतात.
पृथ्वी आप तेज वायो आकाश । यां सबाह्य जगदीश ।
पंचभूतांसी आहे नाश । आत्मा अविनाशरुपी ॥ १२ ॥   
१२) पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या पंचमहाभूतांना परमात्मा आंतून बाहेरुन व्यापून आहे. पंचमहाभूतांना नाश आहे. आत्मा मात्र अविनाशी आहे.   
जें जें रुप आणी नाम । तो तो आवघाचि भ्रम ।
नामरुपातीत वर्म । अनुभवें जाणावें ॥ १३ ॥
१३) जें जें रुप व नांव आहे तो सगळा भ्रमच आहे. नामरुपाच्या पलीकडे असलेले जें वर्म परमात्मास्वरुप आहे तें जाणावें. 
पंचभूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।
अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐारिसें सें ॥ १४ ॥
१४) पांच महाभूतें व तीन गुण या आठांनी प्रकृती बनते. याच अष्टधा प्रकृतीस दृश्य असेही दुसरे नाव आहे.  
तें हे दृश्य नासिवंत । ऐसें वेद श्रुति बोलत । 
निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥
१५) वेद व श्रुती म्हणतात जें दृश्य आहे ते नाशिवंत आहे. पण निर्गुण ब्रह्म ते शाश्वत आहे. हें ज्ञानी जाणतात. 
जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें जाळितां जळेना ।     
कालवितां कालवेना । आपेंकरुनी ॥ १६ ॥
१६) तें ब्रह्म शस्त्राने तोडता येत नाही. तें अग्नींने जळू शकत नाही. तें पाण्यांत कालविता येत नाही. 
जें वायोचेनि उडेना । जें पडेना झडेना ।
जें घडेना ना दडेना । परब्रह्म जें ॥ १७ ॥
१७) तें वार्‍यानें उडविता येत नाही, तें पडत नाहीं कां झडत नाहीं. तें घडविता येत नाही कीं जे लपत नाही असे ते परब्रह्म आहे.
ज्यासी वर्णचि नसे । जें सर्वाहूनि अनारिसे ।
परंतु असताचि असे । सर्वकाळ ॥ १८ ॥ 
१८) त्याला कोणताही रंग नाही. तें सर्व वस्तूंहून वेगळे आहे. पण तें सर्वत्र नेहमी सर्व काळ भरुन राहीलेले आहे. 
दिसेना तरी काये जालें । परंतु तें सर्वत्र संचलें ।
सूक्ष्मचि कोंदातलें । जेथें तेथें ॥ १९ ॥
१९) तें दिसत नाहीं म्हणून काय झाले. ते सर्वत्र भरुन राहीलेले आहे. तें सूक्ष्मत्वानें जेंथें तेथें व्यापलेलें आहे. 
दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें ।
परंतु गुज तें जाणावें । गोप्य आहे ॥ २० ॥
२०) जें दिसेल तें पाहायचे व ते खरें मानायचे अशी आपल्या दृष्टीला सवय झाली आहे. परंतु जेम रहस्य असतें तें नेहमी गुप्त असते.  
प्रगट तें जाणावें असार । आणी गुप्त तें जाणावें सार ।
गुरुमुखें हा विचार उमजों लागे ॥ २१ ॥
२१) जें इंद्रियांना दिसते व जें उघड आहे तें असार म्हणजे खोटे समजावे. जें गुप्त असतें, सूक्ष्म असते, तें खरें असतें हें सद्गुरुच्या उपदेशाने समजु लागते. 
जें उमजेना तें उमजावें । जें दिसेना तें पाहावें ।
जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥ २२ ॥
२२) आपल्या विचाराने जें उमजत नाहीं तें उमजुन घ्यावें. जें दिसत नाही तेम पहाण्याचा यत्न करावा. जें कळत नाही तें जाणुन घ्यावे. हें सर्व सद्गुरु उपदेश आठवून आपल्या विचारानें जाणून घ्यावे. 
गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें । 
कानडेंचि अभ्यासावें । सावकास॥ २३ ॥
२३) जें गुप्त आहे तें स्वतः प्रगट करुन घ्यावें. जें असाध्य आहे, कष्टसाध्य आहे तें आत्मस्वरुप साध्य करुन घ्यावें. जें अवघड आहे त्याचा चिकाटीनें सतत अभ्यास करावा. 
वेद विरंची आणि शेष । जेथें सिणले निशेष ।
तेंचि साधावें विशेष । परब्रह्न तें ॥ २४ ॥
२४) वेद, ब्रह्मदेव व शेष ज्या ब्रह्माचे वर्णन करतांना थकले, तें परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करुन साधून घ्यावें.  
तरी तें कोणेपरी साधावें । तेंचि बोलिलें स्वभावें ।
अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥ २५ ॥
२५) परंतु तें परब्रह्म कसें अनुभवावें, तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो. अध्यात्मश्रवणानें तें परब्रह्म प्राप्त करुन घ्यावें. 
पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे ।
वर्णवेक्त ऐसें नव्हे । अव्यक्त तें ॥ २६ ॥
२६) तें पृथ्वी नाहीं, तें आप नाही, तेज व वायुसुद्धा नाही. तें रंगाचे नाही. तसेच तें व्यक्त नाहीं ते अव्यक्त आहे.
तयास म्हणावें देव । वरकड लोकांचा स्वभाव ।
जितुके गाव तितुके देव । जनाकारणें ॥ २७ ॥
२७) जें व्यक्त असते त्याला लोक देव म्हणतात. हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणुन सामान्य अज्ञानी लोकांची जितकी गांवे तितके देव असतात.
ऐसा देवाचा निश्र्चय जाला । देव निर्गुण प्रत्यया आला ।
आतां आपणचि आपला । शोध घ्यावा ॥ २८ ॥
२८) अशा प्रकारें खरा देव कोणता हें निश्र्चितपणें कळलें, देव निर्गुण आहे असा अनुभव आला मग आपल्या अंतर्यामी आपला आपण शोध घ्यावा.  
माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळांचि तो ।
मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ॥ २९ ॥
२९) माझे शरीर असें आपण सर्व म्हणतो. याचा अर्थ मी देहाहून वेगळा आहे. माझे मन ही जाणीव आपल्याला असते. याचाच अर्थ मी देहही नाही व मी मनही नाही.   
पाहातां देहाचा विचार । अवघा तत्वांचा विस्तार ।
तत्वें तत्व झाडितां सार । आत्माच उरें ॥ ३० ॥  
३०) आपण देहाचा विचार केला तर तो पंचमहाभूतांचा बनला आहे. तत्वामध्यें तत्व मिसळीत गेल्यास अखेर साररुप अविनाशी आत्मा तेवढा उरतो.       
आपणासी ठावचि नाहीं । येथें पाहाणें नलगे कांहीं । 
तत्वें ठांईचा ठांई । विभागून गेलीं ॥ ३१ ॥
३१) देहबुद्धीचे ज्ञान असलेला मी कोठे राहतो हें शोधू लागलें तर त्याला स्थानच नाही असे लक्षांत येते. मग त्याला पाहाण्याचे कांहींच कारण उरत नाही. पांच महाभूतें ज्यांनी देह बनला आहे ती आपापल्या ठिकाणी विभागून नाहीशीं होतात.  
बांधली आहे तों गांठोडी । जो कोणी विचारें सोडी ।
विचार पाहातां ही गांठोडी । आडळेना ॥ ३२ ॥
३२) आपलें शरीर म्हनजें पंचमहाभूतें एकत्र बांधून तयार झालेले एक गाठोडे आहे. जर कोणीं विचारचे साधनाने सोडूं लागला तर तें गांठोडेच सांपडत नाहीसें होते.  
तत्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहातां विचार ।
येक आत्मा निरंतर । आपण नाहीं ॥ ३३ ॥
३३) आपलें शरीर हें पंचमहाभूतांचे गांठोडे आहे. विचारानें याचे विवरण करतगेलें तर मी म्हणून जो वावरतो तो उरतच नाही. तर अविनाशी असा आत्माच उरतो. 
आपणासी ठावचि नाहीं । जन्ममृत्यु कैंचें काई ।
पाहातां वस्तुचा ठांई । पापपुण्य नसे ॥ ३४ ॥
३४) जेथें मी पणाला जागाच उरत नाहीं तेथें जन्म कोणाचा व मृत्यु कोणाचा ? आणि जी परमात्मा वस्तु आहे तीला पापपुण्याचा स्पर्शही होत नाही.   
पापपुण्य येमयातना । हे निर्गुणीं तों असेना ।
आपण तोचि तरी जन्ममरणाचा । ठव कैंचा ॥ ३५ ॥
३५) पापपुण्य व यमयातना यांचा निर्गुणाशीं कांहींच संबंध नाही. आपला खरा मी निर्गुण आहे. त्यामुळें त्याच्या ठिकाणी जन्ममरणाला स्थान नाही. 
देहेबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला । 
देहातीत होतां पावला । मोक्षपद ॥ ३६ ॥
३६) मी देहच आहे या दृढ भावनेनें जीव बांधलेला असतो. विवेक केल्यानें तो त्या बंधनांतून मुक्त होतो. देहबुद्धि सुटुन तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदास पोहोंचतो. 
जालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण येक ।
परंतु हा विवेक । पाहिला पाहावा ॥ ३७ ॥
३७) निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात् अनुभव येणें म्हणजे जन्माचें सार्थक होय. परंतु हा अनुभव येण्याचा पुनः पुनः विवेक करावा लागतो.
जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहातां दृश्य वोसरे ।
स्वरुपानुसंधानें तरे । प्राणीमात्र ॥ ३८ ॥
३८) झोपेंतून जागें झाल्यावर स्वप्न जसें आपोआप विरतें तसें सारखा विवेक केल्यानें दृश्य ओसरुं लागते.  
आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें ।
आत्मनिवेदन जाणावें । याचे नांव ॥ ३९ ॥
३९) आपण स्वतःला स्वस्वरुपांत लीन करावें. विवेकाच्या अभ्यासानें आपण स्वस्वरुपाहून वेगळें उरुंच नये. स्वस्वरुपांत लीन होण्याच्या या अवस्थेला आत्मनिवेदन असें म्हणतात.  
आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन ।
पुढें आत्मनिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४० ॥
४०) प्रथम अध्यात्मश्रवण करावें. मग श्रीसद्गुरुच्या चरणांची सेवा करावी. पुढें सद्गुरुंच्या कृपाप्रसादानें आत्मनिवेदन साधतें. 
आत्मनिवेदन उपरी । निखळ वस्तु निरंतरी ।
आपण आत्मा अंतरीं । बोध जाला ॥ ४१ ॥
४१) आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शाश्वत आत्मवस्तु तेवढी उरतें. आणि मी म्हणजेच आत्मा असें ज्ञान होते. 
त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि जाला । संसारखेद तो उडाला ।
देहो प्रारब्धीं टाकिला । सावकास ॥ ४२ ॥
४२) त्या आत्मज्ञानानें जीव ब्रह्मरुप होतो. त्याचें संसारांतील दुःख नाहीसें होते. नंतर देह प्रारब्धावर सोडून तो  स्वस्थ राहतो. 
यासी म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । 
परब्रह्मीं आभिन्न । भक्तचि जाला ॥ ४३ ॥
४३) याला आत्मज्ञान म्हनतात. त्यामुळें समाधान मिळतें. जीव परब्रह्मामधें विलीन होऊन एकरुप होतो. तो खरा भक्त होतो.  
आतां होणार तें होयेना कां । आणि जाणार तें जायेना कां ।
तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्याची ॥ ४४ ॥
४४) आतां जे होणार असेल तें होऊन दे. जें जायचे असेल तें जाऊं दे. अशी मनाची निश्र्चित अवस्था होते. सर्व शंका मीटतात. जन्ममरणाची भिती निघून जाते. 
संसारी पुंडावें चुकलें । देवा भक्ता ऐक्य जालें ।
मुख्य देवास वोळखिलें । सत्संगेंकरुनी ॥ ४५ ॥
४५) संतांच्या संगतीचा लाभ झाला म्हणजे मुख्य देवाची ओळख होते. ती झाली की देव व भक्त एकरुप होतात. मग संसारांतील ओढाताण संपतें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मपावननाम समास दुसरा ॥
Samas Dusara Brahmapavan Nirupan 
समास दुसरा ब्रह्मपावन निरुपण


Custom Search

Thursday, July 27, 2017

Renuka Kavacham रेणुका कवचं


Renuka Kavacham 
Renuka Kavacham is in Sanskrit. It is from Damar Tantra. It is to be recited for the protection. Devotees of Goddess Renuka recite it daily with faith, devotion and concentration. Goddess Renuka fulfils their desires.
रेणुका कवचं
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीरेणुकायै नमः । 
श्रीदेव्युवाच 
भगवान ब्रूहि कवचं भुक्तिमुक्तिप्रदायकम् ।
त्रैलोक्यामोहनं नाम कृपाया मे जगद्गुरो ॥ १ ॥
ईश्र्वर उवाच ।
श्रृणु देवी वरारोहे कवचं ब्रह्मरुपिणी ।
ब्रह्मेशप्रमुखाधीशनारायणमुखाच्युतम् ॥ २ ॥ 
कवचं रेणुकादेव्या यः पठेत्प्रयतो नरः ।
यच्छ्रुत्वा पठनाद्ब्रह्मा सृष्टिकर्ताभवत्प्रभुः ॥ ३ ॥
कृष्णो दूर्वादलश्यामो देवकीगर्भसंभवः ।
हृत्पद्मे रेणुकां ध्यात्वा ऋद्धिसिद्धिफलप्रदाम् ॥ ४ ॥
सर्वश्यामा भवंत्येता जनार्दनविभूतयः ।
एवं देवगणाः सर्वे सवैंश्र्वर्यमवाप्नुयुः ॥ ५ ॥
शिष्याय गुरुभक्ताय साधकाय प्रकाशयेत् ॥ ६ ॥
यो ददात्यन्यशिष्याय शठाय पशुरुपिणे ।
पंचत्वं जायते तस्य अथवा वातुलो भवेत् ॥ ७ ॥
कवच स्यास्य सुभगे योगी रुद्र ऋषिः स्वयम् ।
विराट्छंदो निगदितं देवता रेणुका परा ।
धर्मार्थकाममोक्षेषु विनियोग उदाहृतः ॥ ८ ॥
क्लीं क्लीं क्लीं मे शिरः पातु भालं नेत्रयुगं तथा ।
रेणुका नेत्रयुगुलं क्लीं क्लीं नासापुटद्वयम् ॥ ९ ॥
राममाता च मे पातु सजिह्वं मुखमेव च ।
भुजयुग्मं तथा पातु क्लीं क्लीं मे त्र्यक्षरात्मिका ॥ १० ॥
कंठं च चुबंकं चैव रक्षेन्मे जगदंबिका ।
स्वाहावतु ब्रह्मरंध्रं महापुरनवासिनी ॥ ११ ॥  
क्लीं क्लीं मे रेणुका पश्र्चाद्रक्षेन्मे पादमेव च ।
क्लीं क्लीं मे हृदयं पातु क्लीं क्लीं मे पार्श्र्वमेव च ॥ १२ ॥
क्लीं क्लीं मे नाभिकमलं क्लीं क्लीं मे पृष्ठमेव च ।
क्लीं क्लीं द्विठांतमुदरमूरु युग्माक्षरी पुनः ॥ १३ ॥
रेणुका चैव मे गुह्यं स्वाहांतो मनुनायकः ॥ १४ ॥
जंघे सप्ताक्षरी पायात्पादौ मे षोडशाक्षरी ।
क्लीं क्लीं मे रेणुका पश्र्चाद्रेणुका पदमेव च ॥ १५ ॥
क्लीं क्लीं मे द्विफडंतेच स्वाहेति परीकीर्तिता ।
एकाक्षरी महाविद्या सर्वांगं मे सदावतु ॥ १६ ॥
प्राच्यां रक्षतु मां देवी आग्नेयां मातृका तथा ।
रेणुका दक्षिणे रक्षेद्राममाता च नैर्ऋते ॥ १७ ॥ 
विरोधिनी प्रतीच्यां मे वायव्यां जगदंबिका ।
उग्रा रक्षेदुदीच्यां च ईशान्यां सा प्रभावती ॥ १८ ॥
दीप्ता रक्षेत्त्वधोभागे नीला चैवोर्ध्वदेशिके ।
पुत्रमित्रकलात्रादीन्देवी रक्षतु सर्वदा ॥ १९ ॥
इति ते कथितं देवी सर्वमंत्रौघविग्रहम् ।
त्रैलोक्यमोहनं नाम कवचं ब्रह्मरुपिणि ॥ २० ॥
ब्रह्मेशप्रमुखाधीशनारायणमुखाच्च्युतम् ।
कवचं रेणुकादेव्या यः पठेत्प्रयतो नरः ॥ २१ ॥
स सर्वसिद्धिमाप्नोति सत्यमेव न संशयः ।
गाने तु तुंबुरुः साक्षाद्दाने वै वासवो यथा ॥ २२ ॥
दत्तात्रेयसमो ज्ञाने गंगेव मलनाशकः ।
कामदेवसमो रुपे वायुतुल्यः पराक्रमे ॥ २३ ॥
स भवेत्साधकश्रेष्ठः सत्यं सत्यं मयोदितम् ।
न हन्यते गतिस्तस्य वायोरिव नभस्तले ॥ २४ ॥
शतमष्टोत्तरं चास्य पुरश्र्चर्याविधिः स्मृतः ।
हवनं तद्दशांशेन कृत्वा तत्साधयेध्द्रुवम् ॥ २५ ॥
यदि चेत्सिद्धकवचः शिवतुल्यो भवेत्स्वयम् ।
पठनाद्धारणात्सर्वा पृथ्वी काशीपुरीसमा ॥ २६ ॥
यत्र कुत्र विपन्नोपि वाराणस्यां मृतो भवेत् ।
न मंत्रो नौषधं तस्यय नाकालमरणं तथा ॥ २७ ॥
भवत्येव महेशानि कवचे दि संस्थिते ।
अश्र्वमेघसहस्त्राणि वाजपेयशतानि च ॥ २८ ॥
महादानानि यान्येव प्रादक्षिण्यं भुवस्तथा ।
कलां नार्हंति तान्येव सकृदुच्चारणादतः ॥ २९ ॥
पुष्पांजलि रेणुकायै मूलेनैव सदार्पयेत् । 
शतवर्षसहस्त्रायाः पूजायाः फलमाप्नुयात् ।
लिखित्वा भूर्जपत्रे तु बघ्नीयात्सर्वकार्यके ॥ ३० ॥
इदं कवचमज्ञात्वा यो भजेद्रेणुकां शिवाम् ।
शतलक्षं प्रजप्तोपि न मंत्रः सिद्धिदायकः ॥ ३१ ॥
इति श्रीडामरतंत्रे ईश्र्वरपार्वती संवादे रेणुकाकवचं संपूर्णम् ॥
Renuka Kavacham
रेणुका कवचं


Custom Search

Wednesday, July 26, 2017

Samas Pahila Dev Shodhan समास पहिला देवशोधन


Dashak Sahava Samas Pahila Dev Shodhan 
Samas Pahila Dev Shodhan. It is in Marathi. We leave in a village or city, to have our staying there happily; we have to meet the head of the village or city. Then our leaving there will be trouble free. Just like that while leaving in this world, we must know who have created us. We must try to please him, and then only we will be happy in our life. The God who has created us must be found out and remembered. Our body is nor our real identity. There is something beyond that which is our real identity, and that is God. To find out him we must have a Sadguru, to lead us on that path. This is all is described in here.
समास पहिला देवशोधन
श्रीराम ॥
चित्त सुचीत करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।
सावध होऊन बैसावें । निमिष्य येक ॥ १ ॥
१) प्रथम मन एकाग्र करावे. या समासांत जें सांगितलें आहे तें अंतरी ठेवावे. क्षणभर सावध होऊन बसावे. सांगितलेले ऐकावे. 
कोणी येके ग्रामीं अथवा देसीं । राहाणें आहे आपणासी ।
न भेटता तेथिल प्रभूसी । सौख्य कैचें ॥ २ ॥
२) एखाद्या गांवांत किंवा देशांत आपल्याला राहायचे असेल तर तेथील प्रमुखास भेटले तर आपल्याला त्रास न होता सुख लाभते. 
म्हणौन ज्यास जेथें राहाणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें ।
म्हणिजे होणें श्र्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३ ॥
३) म्हणून ज्याला जेथें रहाणें असेल तेथील वरिष्ठाची भेट घ्यावी. म्हणजे तेथे आपले राहाणें सुखकर होते.
प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता । 
आपुले महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४ ॥
४) वरिष्ठाची भेट घेतली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला कोणी किंमत देत नाही. आपले कांहीं महत्व राहात नाही.
म्हणौन रायापासून रंक । कोणी येक तरी नायेक ।
त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५ ॥
५) म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी वरिष्ठ असेल त्याला भेटणें योग्य असते असे विचारी माणसे ओळखतात.
त्यास न भेटता त्याचे नगरीं । राहातां धरितील बेगारी । 
तेथें न करितां चोरी । आंगीं लागे ॥ ६ ॥
६) वरिष्ठाला न भेटता तेथें राहीले तर फुकट काम करुन घेण्यासाठी बिगारी म्हणून धरुन नेतात. चोरी न करतां आपल्यावर चोरीचा आळ आणतात.  
या कारणें जो शाहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा ।
ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७ ॥
७) यासाठीं शहाण्यानें तेथील वरिष्ठास भेटावे. असे केले नाहीं तर प्रपंचांत त्याला निरनिराळे त्रास भोगावें लागतात.
ग्रामीं थोर ग्रामधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती ।
देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८ ॥
८) गांवामध्यें ग्रामधिपती वरिष्ठ असतो. त्याच्याहून वरिष्ठ देशाधिपती असतो. तर राजा देशाधिपतीहून वरिष्ठ असतो. 
राष्ट्रांचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो माहाराजा । 
माहाराजाचाहि राजा । तो चक्रवती ॥ ९ ॥
९) राष्ट्राचा वरिष्ठ तो राजा, पुष्कळ राष्ट्रांचा वरिष्ठ तो महाराजा अशा बर्‍याच महाराजांचा वरिष्ठ तो चक्रवर्ति असतो. 
येक नरपति येक गजपती । येक हयपति येक भूपती ।
सकळांमध्यें चक्रवती । थोर राजा ॥ १० ॥
१०) कोणी नरपति, तर कोणी गजपति तर कोणी हयपति असतो. कोणी भूपति असतो या सर्वांहून चक्रवर्ति हा श्रेष्ठ राजा असतो. 
असो ऐसियां समस्तां । येक ब्रह्मा निर्माणकर्ता  ।
त्याब्रह्मयासहि निर्मिता । कोण आहे ॥ ११ ॥
११) असो. या सर्वांना ब्रह्मदेव निर्माण करतो. पण ब्रह्मदेवाचा निर्माता कोण?
ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसी निर्मिता तोचि थोर ।
तो वोळखावा परमेश्र्वर । नाना येत्नें ॥ १२ ॥
१२) ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो परमेश्र्वर. त्याला नाना प्रयत्न करुन ओळखावें.  
तो देव ठाईं पडेना । तरी येमयातना चुकेना ।
ब्रह्मांडनायेक चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३ ॥
१३) तो देव जर ओळखला नाही तर यमयातना चुकत नाहीत. ब्रह्मांडनायक परमेश्र्वरास ओळखता येत नाही हें कांहीं बरे नव्हे.  
जेणें संसारीं घातलें । आवघें ब्रह्मांड निर्माण केलें ।
त्यासी नाहीं वोळखिलें । तोचि पतित ॥ १४ ॥
१४) ज्या परमात्म्याने आपल्याला संसारांत घातलें, ज्यानें संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले. त्याला जो ओळखत नाही तो खरोखर पतितच असतो.  
म्हणोनि देव वोळखावा । जन्म सार्थकचि करावा ।
न कळे तरी सत्संग धरावा । म्हणिजे कळे ॥ १५ ॥  
१५) म्हणून खर्‍या देवास ओळखावे. म्हणजे जन्म सार्थकीं लागेल. कळत नसला तरी सत्संग धरीला म्हणजे कळेल.  
जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत ।
जो शाश्र्वत आणि अशाश्र्वत । निवाडा करी ॥ १६ ॥
१६) ज्याला भगवंत म्हणजे कोण याचे ज्ञान असते, त्याला संत म्हणतात.  शाश्वत व अशाश्वताची तो बरोबर निवड करतो.
चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । 
तोचि जाणिजे माहानुभाव । संत साधु ॥ १७ ॥
१७) खरा देव कधी बदलत नाही व आपल्या ठिकाणावरुन भ्रष्ट होत नाही असा विश्र्वास ज्याच्या अंतर्यामी असतो, तो महान साचात्कारी संत किंवा साधु असतो. 
जो जनामधें वागे । परि जनावेगळी गोष्टी सांगे ।
ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधु ॥ १८ ॥
१८) तो देहानें लोकांत वावरतो. परंतु तो लोकांना माहीत नसलेल्या स्वस्वरुपाबद्दल सांगतो. ज्याच्या अंतर्यामी आत्मज्ञान नेहमी जागृत असते. तोच खरा साधु होय. 
जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासीच म्हणावें ज्ञान ।
त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९ ॥
१९) परमात्मा हा निर्गुण आहे हेच खरे ज्ञान होय. इतर सर्व कांहीं अज्ञानच समजावे.
पोंट भराव्याकारणें । नाना विद्या अभ्यास करणें ।
त्यासी ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २० ॥
२०) पोट भरण्यासाठी ज्या निरनिराळ्या विद्या आपण शिकतो त्याला ज्ञान म्हणतात पण ते खरे ज्ञान नाही त्याने जीवनाचे सार्थक होत नाही.  
देव वोळखावा येक । तेंचि ज्ञान तें सार्थक । 
येर आवघेंचि निरार्थक । पोट विद्या ॥ २१ ॥
२१) एका देवाचा अनुभव करुन घ्यावा. तेच खरें ज्ञान, त्यानेंच जीवनाचे सार्थक होते. बाकीच्या विद्या पोट भरण्यासाठीं, त्या विद्यांनी, त्याच्या ज्ञानाने सार्थक होत नाही.   
जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें ।
पुढें अवघेंचि वेर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२ ॥
२२) जन्मभर पोटसाठींच सर्व केले. देह सांभाळला. परंतु पुढे अतंकाळी सर्व फुकटच जाते.   
येवं पोट भराव्याची विद्या । तयेसी म्हणो नये सद्विद्या ।
सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३ ॥
२३) पोट भरण्याच्या विद्यांना आत्मविद्या म्हणू नये. सर्व व्यापक आत्मवस्तु ज्या अनुभवाने तत्काळ प्राप्त होते तें खरें ज्ञान होय.
ऐसें जयापासीं ज्ञान । तोचि जाणावा सज्जन ।
तयापासीं समाधान । पुसिलें पाहिजे ॥ २४ ॥
२४) परमात्मवस्तुचे ज्ञान ज्याच्याजवळ तो सज्जन म्हणून जाणावा. समाधान मिळविण्याचा मार्ग त्याला विचारावा. 
अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचे सांपडेल ज्ञान ।
करंट्यास करंट्याचें दर्शन । होतां भाग्य कैंचे ॥ २५ ॥
२५) एक अज्ञानी दुसर्‍या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याला ज्ञान कसें मिळणार? दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले भाग्य कसे उजळेल?
रोग्यापासीं रोगी गेला । तेथें कैंचें आरोग्य त्याला ।
निर्बळापासीं निर्बळाला । पाठी कैंची ॥ २६ ॥
२६) एक रोगी दुसर्‍या रोग्याजवळ गेला तर त्याला आरोग्य कसे मिळणार? दुबळ्या माणसाजवळ दुसर्‍या दुबळ्याकडून संरक्षण कसें मिळणार? 
पिशाच्यापासीं पिशाच्य गेलें । तेथें कोण सार्थक जालें ।
उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणु ॥ २७ ॥
२७) एक पिशाच्च दुसर्‍या पिशाच्चापाशी गेले तर त्याची त्या योनींतून कशी सुटका होईल? उन्मत्त माणसाकडून दुसर्‍या उन्मत्ताची समजुत कशी होईल? 
भिकार्‍यापासीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापासीं दीक्षा । 
उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥ २८ ॥
२८) भिकार्‍याजवळ भिक मागितली, दीक्षाहीनाजवळ दीक्षा दे म्हणून दीक्ष मागितलीा, किंवा कृष्णपक्षांत चांदण्यांच प्रकाश कसा मिळेल?   
अबद्धापासीं गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबुद्ध ।
बद्धास भेटता बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९ ॥
२९) एका स्वैराचारी माणसाकडे दुसरा स्वैराचारी गेला तर तो कांहीं सदाचारी होत नाही. तसेच एका प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो सिद्ध पुरुष कसा होणार?
देहापासीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही ।
म्हणौनि ज्ञात्यावांचून नाहीं । ज्ञानमार्ग ॥ ३० ॥
३०) त्याचप्रमाणें एका देहबुद्धीच्या माणसाकडे दुसरा देहबुद्धीचा माणुस गेला तर तो विदेही होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुषावाचुन आत्मज्ञानाचा मार्ग सांपडत नाही.  
याकारणें ज्ञाता पाहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा ।
सारासार विचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१ ॥
३१) या कारणानें आत्मज्ञानी माणुस शोधुन काढावा व त्याच्याकडून अनुग्रह घ्यावा. त्याच्या मार्गदर्शनाने सारासार विचारानें मोक्ष मिळतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवशोधननाम समास पहिला॥
Samas Pahila Dev Shodhan
समास पहिला देवशोधन


Custom Search