Friday, July 29, 2016

Shri MuralidharGopalashtakam श्रीमुरलीधरगोपालाष्टकम्


Shri MuralidharGopalashtakam 
Shri MuralidharGopalashtakam is in Sanskrit. It is created by P.P. Shri VasudevanandSaraswati. It is a God ShriKrishna stotra. God Shrikrishan is also called as Murlidhar. He holds Murali (flute) on his lips. He is also called as Gopal. Gopal means who protects cows and take them to the meadows for feeding.
श्रीमुरलीधरगोपालाष्टकम्
नमामि गोपिकाकान्तं द्विभुजं मुरलीधरम् ।
शोणाधरं गिरिधरं भक्तदुःखहरं हरिम् ॥ १ ॥
सतोयमेघद्युतिगर्वहारिस्फुरद्युतिः स्मर्तृभयापहारि ।
कृष्णाय भूम्ने कमलावराय नमोऽस्तु तस्मै मुरलीधराय ॥ २ ॥
यो भूमिभारव्यपनुत्तयेऽत्र ब्रह्मादिदेवार्थित एव पुत्रः ।
बभूव भुव्यानकदुन्दुभेर्यो नमोऽस्तु तस्मै मुरलीधराय ॥ ३ ॥ 
अपाययत्स्तन्यमिषाद्विषं या तस्यै ददौ मात्रुचितां गतिं यः ।
कारुण्यसिंधुर्निहितासुराय नमोऽस्तु तस्मै मुरलीधराय ॥ ४ ॥
गाश्चारयन्गोपकुमारयुक्तः सुरद्विषोऽहन्निजकार्यसक्तः ।
भक्तप्रियो यो दिविषद्वराय नमोऽस्तु तस्मै मुरलीधराय ॥ ५ ॥ 
यद्वेणुशब्दश्रवणेन सद्यो ह्यचेतनं चेतनतां परं च ।
तथान्यभावं प्रगतं पराय नमोऽस्तु तस्मै मुरलीधराय ॥ ६ ॥ 
व्याजेन भर्तृत्वमितं विवर्णं त्यक्त्वा सती दग्धतनुर्बभूव ।
वेणुर्यदोष्ठामृतभाक्पराय नमोऽस्तु तस्मै मुरलीधराय ॥ ७ ॥
गोपालाय नमस्तुभ्यमपराधान्क्षमस्व मे ।
कृपां कुरु दयासिन्धो सर्वान्कामान्प्रपूरय ॥ ८ ॥
॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्रीमुरलीधरगोपालाष्टकम् संपूर्णम् ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥  
Shri MuralidharGopalashtakam श्रीमुरलीधरगोपालाष्टकम्


Custom Search

Sunday, July 24, 2016

LalitaPanchak Stotra (Marathi) ललितापंचक स्तोत्र


LalitaPanchak Stotra 
LalitaPanchak Stotra is in Marathi. It is not known who has done it in Marathi based on original Sanskrit Lalita Panchakam created by P.P.Adi Shankaracharya. Any Lalita Devi Strotra or Lalita SahasraNam is a best remedy for curing Heart disease. Thanks to him whose has converted it in Marathi.
ललितापंचक स्तोत्र 
स्मरे सकाळी ललितेच्या मी कमलासम वदना ।
विशाल मोती चमके नाकी अरुण वर्ण अधरा ।
कुंडल मणि ते रमते कानी नयने भिडती ज्या ।
सुंदर भाली तिलक कस्तुरी मंदस्मित ते मुखा ॥ १ ॥
भजे सकाळी ललितेच्या मी कर कल्पलताला ।
झळक जेथे अंगठी, भरले कर पल्लवा ।
बाहू शोभती माणिक आणि सुवर्ण वलयामुळे ।
पुंड्रक धनु करी पुष्पबाण ते अंकुशही जथे ॥ २ ॥
नमे सकाळी ललितेच्या मी कमलरुप चरणा ।
भक्त कामना पुरवुनी जे हो भवसागर नौका ।
ब्रह्मादिक जे सुर नायकही पूज्य मानिती ज्याला ।
ध्वज अंकुश ही पद्मचक्र ती अमित लांछने ज्याला ॥ ३ ॥
स्तवे सकाळी परमहितैषी, याच भवानी ललितेला ।
महती वर्णिली वेदांनी मिती करुणामय निर्मला ।
विद्येश्र्वरी परी अगम्य राही मन वाणी वेदा ।
विधीनिर्मिती स्थिती विलयासी मूळ कारणीभूता ॥ ४ ॥
कमला किंवा महेश्र्वरी वा अथवा कामेश्र्वरी ।
जगज्जननी वा त्रिपुरसुंदरी तसेच श्री शांभवी ।
परा शक्ती वा वाणी देवी अशा रितीने हे ललिते ।
आवाहन मी करीत सकाळी तुजसी पुण्य नामे ॥ ५ ॥
सुभगदायी आनंदमयी हे स्तोत्र पंचश्र्लोकी ।
म्हणुनी प्रभाती जो नर प्रार्थी ललिता मातेशी ।
प्रसन्न होवून त्वरीत तया ती दे विद्या लक्ष्मी ।
अनंत किर्ती तशीच होई विमल सुखा वृद्धी ॥ ६ ॥
हे स्तोत्र श्री प.पू. आदि शंकराचार्यांच्या ललितापंचक या मूळ संस्कृत स्तोत्रावर आधारीत ज्याने केले त्यास धन्यवाद व त्याचे आभार मानून भाविकांसाठी येथे प्रस्तुत केले आहे. 
LalitaPanchak Stotra 
ललितापंचक स्तोत्र 


Custom Search

Friday, July 22, 2016

Anasuya Stotram अनसूया स्तोत्र


Anasuya Stotram 
Anasuya Stotram is in Sanskrit. It is created by P. P. Vasudevanand Saraswati. These are 14 pious names of mother of God Dattatreya. It is said in the stotra, that whosoever recites these names at least one time in the day receives bhukti and mukti. That is all his desires are fulfilled and at the end get moksha also.
अनसूया स्तोत्र
पतिव्रताशिरोरत्नभूता सुंदरविग्रहा ।
सुचरित्रा दिव्यतेजा सर्वलोकनमस्कृता ॥ १ ॥
विष्णुप्रपौत्री कपौत्री सती कर्दमपुत्रिका ।
देवहूतिसमुत्पन्ना सुमुखी कपिलस्वसा ॥ २ ॥
अत्रिपत्नी महाभागा दयाक्षान्त्यादिभूषिता ।
अनसूया वेदगेया निजधर्मजिताऽखिला ॥ ३ ॥ 
श्रीदत्तात्रेयजननी चंद्रमाता मनस्विनी ।
दर्वासोजनयित्रिशा जगत्संकटवारिणी ॥ ४ ॥
चतुर्विंशतिनामानि मंगलानि पराणि च ।
पावन्यान्यसूयाया दत्तमातुः पठेन्नरः ॥ ५ ॥
त्रिकालमेककालं वा श्रद्धाभक्तिसमन्वितः ।
तस्य धर्मे रुचिर्दत्ते भक्तिर्मुक्ति क्रमाद्भवेत् ॥ ६ ॥
॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं अनसूयास्तोत्रं संपूर्णम् ॥
स्वैर मराठी अर्थ

सर्व पतिव्रतामध्ये शिरोभागी शोभणारी, सुंदर दिसणारी, सुचरित, दिव्य तेजस्वी, सर्व लोकांनी नमस्कृत, श्रीविष्णुंची प्रपौत्री, कर्दम ऋषिंची मुलगी, सुंदर मुखकमल असलेली, अत्रिऋषिंची पत्नी, महान, दया,शांती आदिनी शोभणारी, अनसूया, वेदांमध्ये गायिली गेलेली, स्वधर्मानुचरण करणारी, श्रीदत्तात्रेयांची जननी, चंद्राची माता व दुर्वास ऋषिंची जननी व जगावरील संकटाचा नाश करणारी अशा या दत्तमाताअनसूयेच्या पवित्र चौदा नावांचा जो तीन्हीकाळी अथवा एककाळी श्रद्धा व भक्तिभावाने पाठ करतो, त्याची भक्ती फलदायी व क्रमाने त्यास मोक्षप्राप्त होतो. 
 Anasuya Stotram 
अनसूया स्तोत्र    
  

Custom Search

Thursday, July 21, 2016

Shri Venkatesh Stotram श्रीवेंकटेशस्तोत्रम्


Shri Venkatesh Stotram 
Shri Venkatesh Stotram is in Sanskrit. It is a very beautiful creation of Shri Vasudevanand Saraswati. It is a praise of God Venkatesh.
श्रीवेंकटेशस्तोत्रम् 
व्येमित्यव्ययमाख्यातं मुनिभिः पापवाचकम् ।
कटतेर्नाशनार्थत्वात्पापहा वेंकटेश्वरः ॥ १ ॥  
यो भक्तरक्षणार्थाय विष्णुर्वैकुंठवास्ययं ।
शेषाचले महालक्ष्म्या सह तिष्ठति वेंकटः ॥ २ ॥
चतुर्बाहुरुदारांगो निजलांछनलांछितः ।
वेंकटेश इति ख्यातो देवः पद्मावतीप्रियः ॥ ३ ॥
शेषाचलं महोत्तुगं सर्वसंपत्समन्वितम् ।
वैकुंठकल्पमकरोच्छ्रीनिवासः स नोऽवतु ॥ ४ ॥
यद्दर्शनार्थमखिला ऋषियोगिसुरादयः ।
आयांति परया भक्त्या सपत्नीकाश्च सानुगाः ॥ ५ ॥
विशेषादाश्विने मासे महोत्सवदिदृक्षवः ।
भक्तानुकंपी भगवान्वेंकटेशः स नोऽवतु ॥ ६ ॥
स त्वं मां पाहि देवेश लक्ष्मीश गरुडध्वज ।
सर्वापत्तिविनाशाय प्रसन्नो भव सर्वदा ॥ ७ ॥
प्रसीद लक्ष्मीरमण प्रसीद प्रसीद शेषाद्रिशय प्रसीद ।
दारिद्र्यदुःखौघभयं हरंतं तं वेंकटेशं शरणं प्रपद्ये ॥ ८ ॥
॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचितं श्रीवेंकटेशस्तोत्रं सम्पूर्णम्  ॥
मराठी अर्थ
१)  मुनिजनांनी ( वेदशास्त्रादिसंपन्न अशा ) ' व्येम् ' हे अव्यय पापवाचक आहे असे म्हटले आहे.  व ' कटति ' हे क्रियापद नाशन म्हणजे नाश करणे हा अर्थ सांगणारे आहे. त्यामुळे श्रीवेंकटेश्र्वर हा पातकांचा नाश करणारा आहे.
२) जो वैकुंण्ठलोकांत राहणारा श्रीविष्णु आहे तोच हा श्रीविष्णु भक्त रक्षण करण्यासाठी श्रीमहालक्ष्मीसह शेषाचल पर्वतावर उभा आहे.
३) जो प्रशस्त शरीराचा, चार हातांचा, श्रीवत्सचिन्ह धारण करणारा आणि पद्मावतीचा पती आहे, तो हा वेंकटेश या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे. 
४) ज्या श्रीनिवासाने म्हणजे श्रीलक्ष्मीपतीने अतिशय उत्तुंग किंवा उंच अशा शेषाचलास म्हणजे शेष नावाच्या पर्वतास सर्वैश्र्वर्यसंपन्न अशा वैकुंठाप्रमाणे श्रेष्ठ, सुंदर व रमणीय केले आहे. तो आम्हा सर्वांचे रक्षण करो.
५-६) ज्याच्या दर्शनासाठी सर्व देव, सर्व योगी व सर्व ऋषी आपल्या अनुयायांसह किंवा सेवकांसह आपल्या स्त्रियांना घेऊन आश्विन महिन्यांतील येथील विशेष सोहळा पाहण्यासाठी येतात, तो भक्तांविषयी अत्यंत कृपाळू, दयाळू व षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीवेंकटेश आमचे रक्षण करो. 
७) हे देवश्रेष्ठा श्रीवेंकटेशा ! हे लक्ष्मीपते ! हे श्रीगरुडवाहना ! तू माझे रक्षण कर. आमच्यावरील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी तू नेहमी प्रसन्नचित्त रहा. 
८) हे श्रीलक्ष्मीपते ! श्रीवेंकटेशप्रभो ! हे शेषाचलविहारा ! आम्हाला प्रसन्न व्हा. दारिद्र्य व दुःखे यांच्या प्रवाहाला छिन्न-विछिन्न करणार्‍या त्या श्रीवेंकटेशाला मी शरण आलो आहे.

अशा रीतीनें श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीनी रचिलेले   श्रीवेंकटेश स्तोत्र संपूर्ण झाले.  
Shri Venkatesh Stotram 
श्रीवेंकटेशस्तोत्रम्


Custom Search

Tuesday, July 19, 2016

Shri GuruPaduka Mahatmya श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं


Shri GuruPaduka Mahatmya
Shri GuruPaduka Mahatmya is in Sanskrit. It is told by God Shiva to Goddess Parvati in Kularnav tantra. How Guru’s Paduka are powerful and how darshan of Guru Paduka is important, is told by God Shiva.
श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं
श्रीदेव्युवाच
कुलेश श्रोतुमिच्छामि पादुका भक्तिलक्षणम् ।
आचारमपि देवेश वद मे करुणानिधे ॥ १ ॥
ईश्वर उवाच
श्रृणु देवि प्रवक्ष्यामि यन्मां त्वं परिपृच्छसि ।
तस्य श्रवणमात्रेण भक्तिराशु प्रजायते ॥ २ ॥
वाग्भवा मूलवलये सूत्राद्याः कवलीकृताः ।
एवं कुलार्णवे ज्ञानं पादुकायां प्रतिष्ठितम् ॥ ३ ॥
कोटिकोटिमहादानात् कोटिकोटिमहाव्रतात् ।
कोटिकोटिमहायज्ञात् परा श्रीपादुकास्मृतिः ॥ ४ ॥
कोटिकोटिमंत्रजापात् कोटितीर्थावगाहनात् ।
कोटिदेवार्चनाद्देवि परा श्रीपादुकास्मृतिः ॥ ५ ॥
महारोगे महोत्पाते महादोषे महाभये ।
महापदि महापापे स्मृता रक्षति पादुका ॥ ६ ॥  
दुराचारे दुरालापे दुःसंगे दुष्प्रतिग्रहे ।
दुराहारे च दुर्बुद्धौ स्मृता रक्षति पादुका ॥ ७ ॥
तेनाधीतं स्मृतं ज्ञातम् इष्टं दत्तंच पूजितम् ।
जिव्हाग्रे वर्तते यस्य सदा श्रीपादुकास्मृतिः ॥ ८ ॥
सकृत् श्रीपादुकां देवि यो वा जपति भक्तितः ।
स सर्वपापरहितः प्राप्नोति परमां गतिम् ॥ ९ ॥
शुचिर्वाप्यशुचिर्वापि भक्त्या स्मरति पादुकाम् ।
अनायासेन धर्मार्थकाममोक्षान् लभेत सः ॥ १० ॥
श्रीनाथचरणांभोजं यस्यां दिशि विराजते ।
तस्यां दिशि नमस्कुर्यात्  भक्त्या प्रतिदिनं प्रिये ॥ ११ ॥
न पादुकापरो मंत्रो न देवः श्रीगुरोः परः ।
न हि शास्त्रात् परं ज्ञानं न पुण्यं कुलपूजनात् ॥ १२ ॥
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः परम् ।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ॥ १३ ॥
गुरुमूलाः क्रियाः सर्वा लोकेऽस्मिन् कुलनायिके ।
तस्मात् सेव्यो गुरुर्नित्यं सिद्ध्यर्थं भक्तिसंयुतैः ॥ १४ ॥
॥ इति श्रीईश्र्वरपार्वती संवादे कुलार्णवतंत्रे श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं संपूर्णम् ॥
मराठी अर्थ
देवी पार्वती म्हणाली,
हे कुलेशा ! हे दयाळु महादेवा !! गुरुपादुकांच्याबद्दल साधकांच्या मनांत भक्तिभाव व आचार कसा असावा ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. तरी आपण ते मला सांगावे.
महादेव म्हणाले,
हे देवी ! तूं मला जो प्रष्ण विचारलास त्यासंबंधी मी सांगतो ते ऐक. त्याच्या केवळ श्रवणाने अंतःकरणांत भक्ति उत्पन्न होते. वेदांमध्ये ज्याप्रमाणें सर्व सूत्रे आली आहेत. त्याप्रमाणेच कुलार्णवतंत्रामध्ये पादुकांविषयीचे सर्व ज्ञान सांठविलेले आहे. कोटिकोटि महादानांपेक्षा, कोटिकोटि महाव्रतांपेक्षा व कोटिकोटि महायज्ञांपेक्षा श्रीगुरुपादुकांचे स्मरण श्रेष्ठ आहे. 
मोठे मोठे रोग, उत्पात, दोष, भय, पाप व महाभयानक आपत्ती यांच्यापासून श्रीसद्गुरुंच्या पादुकांचे नुसते स्मरण केले तरी संरक्षण होते. 
तसेच दुष्टाचार, दुष्कीर्ती, दुःसंगती, दुष्टखाद्य आणि दुष्टबुद्धी यांपासून श्रीगुरुपादुकांचे नित्य स्मरण करणार्‍या साधकाचे रक्षण होते. 
ज्या साधकाच्या जीभेवर श्रीगुरुपादुकांचे सतत स्मरण तरळत असते अर्थात् जो साधक वाणीने श्रीगुरुपादुकांचे स्मरण करीत असतो त्याने सर्व वेदांचे अध्ययन केले, स्मृती अभ्यासल्या, सर्व देवांचे पूजन केले, सर्व काही पाहिले, यच्चयावत सर्व कांही दिले आणि समस्त जाणले असे म्हणावयास काहीही हरकत नाही, असे निश्र्चित समज. 
भक्तिभावाने एक वेळा जरी श्रीगुरुपादुकांचे स्मरण केले तरी सर्व पातकांचा नाश होऊन साधकाला श्रेष्ठ गती मिळते. शुची किंवा अशुची अशा कोणत्याही अवस्थेंत श्रीगुरुपादुकांचे साधकाने स्मरण केल्यास धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती त्याला अगदी अनायासाने होते.
श्रीगुरुचरणकमल ज्या दिशेला आहेत त्या दिशेला दररोज भक्तीने नमस्कार करावा. 
हे पार्वती ! श्रीगुरुपादुकांच्या स्मरणापेक्षा श्रेष्ठ मंत्र नाही. श्रीगुरुंपेक्षा श्रेष्ठ देव नाही. शास्त्रापेक्षा म्हणजे गुरु हेच शास्त्र व त्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान नाही. आणि कुलपूजनाइतके  म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या पूजनाइतके श्रेष्ठ पुण्य नाही. श्रीगुरुमूर्तीचे ध्यान हे ध्यानांत म्हणजे ध्येयवस्तूमध्ये श्रेष्ठ आहे. कारण ते सर्व ध्यानाचे मूळ आहेत किंवा तेच सर्व ध्यानाच्या मुळाशी आहेत. श्रीगुरुवचन हे सर्व मंत्रांहून श्रेष्ठ आहे, कारण त्यांचा कोणताही शब्द किंवा वाक्य हे मंत्रस्वरुप असून तेच सर्व मंत्रांचे मूळ आहे. आणि मोक्षप्राप्तीच्या मुळाशी गुरुकृपाच अर्थात् शक्तिपातपूर्वक केलेला शाक्तिसंचारच कारणीभूत आहे. 

हे कुलनायिके ! सर्व क्रियांचे मूळ श्रीगुरुच आहेत म्हणजे या जगांत श्रीगुरुंवाचून दुसरे काहीच नाही. यासाठी भक्तियुक्त अंतःकरणाने सिद्धिसाठी अर्थात् स्वसंवेद्य आत्मस्वरुपाच्या प्राप्तीसाठी श्रीगुरुंचीच सेवा करावी.  
Shri GuruPaduka Mahatmya 
श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं


Custom Search

Monday, July 18, 2016

ShriGuruStotra श्रीगुरुस्तोत्र


ShriGuruStotra 
ShriGuruStotra is in Marathi. It is a very beautiful creation of Shri Vasudevanand Saraswati. This is called as a panchak stotra, since it has mainly 5 stanzas of praise of Guru.
श्रीगुरुस्तोत्र
भावें नमूं श्रीगुरुच्या पदासी ।
जे आपदासी हरि दे पदांसी ।
दासीपरी श्री नमि ज्या पदांसी ।
यासी भजे तो नमितों पदांसी ॥ १ ॥
सततविनतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य ।
सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यासी सभ्य ।
समद विमद होती यत्प्रसादे न हो ती ।
कुगति सुगति देती त्या पदा हे विनंती ॥ २ ॥
गुरुपदा विपदापहरा सदा ।
अभयदा भयदामयदारदा ।
हृतवदान्यमदा तव दास्य दे ।
अमददा गदहा न कुदास्य दे ॥ ३ ॥
नमस्ते भवारे नमस्ते शतारे ।
नमस्तेऽघवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे ।
नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे ।
नमस्तेऽरिवैरे समस्तेष्टसत्रे ॥ ४ ॥
गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी ।
गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी ।
सतत विनत होतां वारि जें आपदांसी ।
सतत विनत होऊं आम्हीं ही त्या पदांसी ॥ ५ ॥
भावें पठति जे लोक हें गुरुस्तोत्रपंचक ।
तयां होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें ॥ ६ ॥
॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचितं श्रीगुरुस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरुर्पणमस्तु ॥
ShriGuruStotra 
श्रीगुरुस्तोत्र


Custom Search

Saturday, July 16, 2016

Bajarang Ban बजरंग बाण


Bajarang Ban 
Bajarang Ban is in Hindi. It is a beautiful creation of Gosai Tulsidas. It is God Hanuman praise. All the great virtues and deeds of God Hanuman are described. Then Tulsidas requesting God Hanuman not to do any delay and help in fulfilling his wishes.
बजरंग बाण 
दोहा: निश्चय प्रेम प्रतीत ते, विनय करें सनमान ।
तेहि के कारज सकल शुभ, सिद्ध करें हनुमान ॥
बजरंग बाण
जय हनुमन्त सन्त हितकारी ।
सुन लिजै प्रभु अरज हमारी ॥ १ ॥
जन के काज विलम्ब न कीजे ।
आतुर दौरि महा सुख दीजे ॥ २ ॥
जैसे कूदि सिन्धु महि पारा ।
सुरसा बदन पैठी विस्तारा ॥ ३ ॥
आगे जाई लंकिनी रोका ।
मारेहु लात गई सुर लोका ॥ ४ ॥
जाय बिभीषण को सुख दीन्हा ।
सीता निरखि परम पद लीन्हा ॥ ५ ॥
बाग उजारि सिन्धु महँ बोरा ।
अति आतुर यम कातर तोरा ॥ ६ ॥
अक्षय कुमार को मार संहारा ।
लूम लपेट लंक को जारा ॥ ७ ॥
लाह समान लंक जरि गई ।
जय जय ध्वनि सुरपुर में भई ॥ ८ ॥
अब विलम्ब केहि कारन स्वामी ।
कृपा करहु उर अन्तर्यामी ॥ ९ ॥
जय जय लक्ष्मण प्राण के दाता ।
आतुर होय दुख करसु निपाता ॥ १० ॥
जै गिरिधर जै जै सुख सागर ।
सुर समूह समरथ भट नागर ॥ ११ ॥
ओं हनु हनु हनु हनुमन्त हठीले ।
बैरिहिं मारु वज्र की कीले ॥ १२ ॥
गदा बज्र लै बैरिहि मारो ।
महाराज प्रभु दास उबारो ॥ १३ ॥
ऊँकार हुँकार प्रभु धावो ।
बज्र गदा हनु विलम्ब न लावो ॥ १४ ॥
ओं हृीं हृीं हृीं हनुमान कपीशा ।
ओं हुँ हुँ हुँ हनु उर शीशा ॥ १५ ॥
सत्य होहु हरि शपथ पाय के ।
राम दूत धरु मारु धाय के ॥ १६ ॥
जय जय जय हनुमन्त अगाधा ।
दुःख पावत जन केहि अपराधा ॥ १७ ॥
पूजा जप तप नेम अचारा ।
नहीं जानत हों दास तुम्हारा ॥ १८ ॥
वन उपवन मग, गिरि गृह माँही ।
तुम्हरे बल हम डरपत नाहीं ॥ १९ ॥
पाँय परौं कर जोरि मनावौ ।
यहि अवसर अब केहि गोहरावौ ॥ २० ॥
जय अन्जनि कुमार बलवन्ता । 
शंकर सुवन वीर हनुमन्ता ॥ २१ ॥
बदन कराल काल कुल घालक ।
राम सहाय सदा प्रति पालक ॥ २२ ॥
भूत प्रेत पिशाच निशाचर ।
अग्नि बैताल काल मारी मर ॥ २३ ॥
इन्हें मारु तोहि शपथ राम की ।
राखु नाथ मर्याद नाम की ॥ २४ ॥
जनक सुता हरिदास कहावो । 
ताकी शपथ विलम्ब न लावो ॥ २५ ॥
जै जै जै धुनि होत अकाशा ।
सुमिरत होत दुसह दुख नाशा ॥ २६ ॥
चरण शरण कर जोरि मनावौं ।
यहि अवसर अब केहि गोहरावौं ॥ २७ ॥
उठु उठु चलु तोहि राम दोहाई ।
पांय परौं कर जोरि मनाई ॥ २८ ॥
ओं चं चं चं चं चपल चलंता ।          
ओं हनु हनु हनु हनु हनुमन्ता ॥ २९ ॥
ओं हँ हँ हांक देत कपि चंचल ।
ओं सं सं सहमि पराने खल दल ॥ ३० ॥
अपने जन को तुरत उबारो ।
सुमिरत होय आनन्द हमारो ॥ ३१ ॥
यह बजरंग बाण जेहि मारे ।
ताहि कहौ फिर कौन उबारे ॥ ३२ ॥
पाठ करैं बजरंग बाण की ।
हनुमत रक्षा करैं प्राण की ॥ ३३ ॥
यह बजरंग बाण जो जापै ।
ताते भूत प्रेत सब कांपै ॥ ३४ ॥
धूप देव अरु जपै हमेशा ।
ताके तन नहिं रहै कलेशा ॥ ३५ ॥
दोहा: प्रेम प्रतीतहि कपि भजै, सदा धरै उर ध्यान ।
तेहि के कारज सकल शुभ, सिद्ध करै हनुमान ॥
॥ इति श्री गोसाई तुलसीदासकृत श्री हनुमंत बजरंग बाण संपूर्णम् ॥
॥ श्रीहनुमंतार्पणमस्तु ॥
Bajarang Ban 
बजरंग बाण 


Custom Search

Thursday, July 14, 2016

Shri DattaBavani श्रीदत्तबावनी


Shri DattaBavani 
Shri DattaBavani is in Gujarathi. Rangavadhoot Swami was a great devotee of God Datta This stotra is a beautiful creation of Shri Rangavadhoot Swami. It is in short a Gurucharitra. It is a very pious stotra. Many God Datta devotees recite this stotra every day.
श्रीदत्तबावनी
१ जय योगीश्र्वर दत्तदयाळ ! तुज एक जगमां प्रतिपाळ ॥
२ अत्र्यनसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्र्चित ॥
३ ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारण हार ॥
४ अंतर्यामी सत्चित्सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख ॥
५ झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांति कमण्डल कर सोहाय ॥
६ क्यांय चतुर्भूज षड्भुज सार अनंतबाहु तू निर्धार ॥
७ आव्यो शरणे बाळ अजाण; ऊठ दिगंबर चाल्या प्राण ॥
८ सुणी अर्जुन केरो साद, रिझ्यो पूर्वे तू साक्षात ॥
९ दिधी ऋद्धि सिद्धि अपार, अंते मुकित महापद सार ॥
१० कीधोआजे केम विलंब, तुजविण मुजने ना आलंब ॥
११ विष्णुशर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्राद्धमां देखी प्रेम ॥
१२ जंभदैत्यथी त्रास्या देव, कीधी म्हेर ते त्यां ततखेव ॥
१३ विस्तारी माया दितिसुत इंन्द्र करे हणाव्यो तुर्त ॥
१४ एवी लीला कइं कइं सर्व किधी वर्णवे को ते शर्व ॥
१५ दोड्यो आयु सुतने काम कीधो एने ते निष्काम ॥
१६ बोध्या यदुने परशुराम साध्यदेव प्रल्हाद अकाम ॥
१७ एवी तारी कृपा अगाध ! केम सूणे ना मारो साद ? ॥    
१८ दोड अंत ना देख अनंत ! मा कर अधवच शिशुनो अंत ! ॥
१९ जोई द्विजस्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तु निःसंदेह ॥
२० स्मर्तृगामी कलितार कृपाळ ! तार्यो धोबी छेक गमार ॥
२१ पेट पीडथी तार्यो विप्र ब्राह्मणशेठ उगार्यो क्षिप्र ॥
२२ करे केम ना मारो व्हार जो आणी गम एकज वार ॥
२३ शुष्क काष्ठने आण्यां पत्र ! थयो केम उदासीन अत्र ? ॥
२४  जर्जर वंध्या केरां स्वप्न, कर्या सफळ तें सुतना कृत्स्न ॥
२५ करी दूर ब्राह्मणनो कोढ, कीधा पूरण एना कोड ॥
२६ वंध्या भेंस दूझवी देव हर्युं दारिद्र्य तें ततखेव ॥
२७ झालर खाईं रिझयो एम, दीधो सुवर्ण घट सप्रेम ॥
२८ ब्राह्मण स्त्रीनो मृत भरथार, कीधो सजीवन ते निर्धार ! ॥
२९ पिशाच पीडा कीधी दूर, विप्रपुत्र ऊठाड्यो शूर ॥
३० हरी विप्र मद अंत्यज हाथ, रक्ष्यो भक्ति त्रिविक्रम तात ! ॥
३१ निमेष मात्रें तंतुक एक प्होंचाड्यो श्री शैले देख ! ॥
३२ एकी साथे आठ स्वरुप धरी देव बहुरुप अरुप ॥
३३ संतोष्या निज भक्त सुजात, आपी परचाओ साक्षात् ॥
३४ यवनराजनी टाळी पीड, जातपातनी तने न चीड ॥
३५ रामकृष्णरुपें तें एम कीधी लीलाओ कंइ तेम ॥
३६ तार्या पथ्यर गणिका व्याध ! पशुपंखीपण तुजने साध ! ॥
३७ अधम ओधारण तारुं नाम गातां सरे न शां शां काम ? ॥
३८ आधि व्याधि उपाधि सर्व ! टळे स्मरणमात्रथी शर्व ॥
३९ मूठ चोट ना लागे जाण, पामे नर स्मरणे निर्वाण ॥
४० डाकण शाकण भेंसासुर, भूत पिशाचो जंद असुर ॥
४१ नासे मूठी दईने तूर्त, दत्त धुन सांभळता मूर्त ॥
४२ करी धुप गाए जे एम दत्तबावनी आ सप्रेम ॥
४३ सुधरे तेना बंने लोक, रहे न तेने क्यांये शोक ! ॥
४४ दासी सिद्धि तेनी थाय, दुःख दारिद्र्य तेनां जाय ॥
४५ बावन गुरुवारे नित नेम, करे पाठ बावन सप्रेम ॥ 
४६ यथावकाशे नित्य नियम तेने कदी न दंडे यम ॥  
४७ अनेक रुपे एज अभंग भजतां नडे न माया रंग ॥
४८ सहस्त्र नामे नामी एक, दत्तदिगंबर असंग छेक ! ॥
४९ वंदु तुजने वारंवार; वेद श्र्वास तारा निर्धार ॥
५० थाके वर्णवतां ज्यां शेष, कोण रांक हुं बहुकृत वेष ॥
५१ अनुभवतृप्तिनो उद्गार, सुणी हंसे ते खाशे मार ॥
५२ तपसी तत्त्वमसि ए देव बोलो जय जय श्रीगुरुदेवपूर ॥ 
Shri DattaBavani 
श्रीदत्तबावनी


Custom Search

Tuesday, July 12, 2016

DurgNashan Stotra दुर्गनाशन स्तोत्र


DurgNashan Stotra 
DurgNashan Stotra is in Sanskrit. It is from Brahmavaivart Purana-Prakruti Khanda (66=7-26). It is Durga Stuti by ShriKrishna.
दुर्गनाशन स्तोत्र
श्रीकृष्ण उवाच 
त्वमेव सर्वजननी मूलप्रकृतिरीश्र्वरी ।
त्वमेवाद्या सृष्टिविधौ स्वेच्छया त्रिगुणात्मिका ॥ १ ॥
कार्यार्थे सगुणा त्वं च वस्तुतो निर्गुणा स्वयम् ।
परब्रह्मस्वरुपा त्वं सत्या नित्या सनातनी ॥ २ ॥
तेजःस्वरुपा परमा भक्तानुग्रहविग्रहा ।
सर्वस्वरुपा सर्वेशा सर्वाधारा परात्परा ॥ ३ ॥
सर्वबीजस्वरुपा च सर्वपूज्या निराश्रया ।
सर्वज्ञा सर्वतोभद्रा सर्वमङ्गलमङ्गला ॥ ४ ॥
सर्वबुद्धिस्वरुपा च सर्वशक्तिस्वरुपिणी ।
सर्वज्ञानप्रदा देवी सर्वज्ञा सर्वभाविनी ॥ ५ ॥
त्वं स्वाहा देवदाने च पितृदाने स्वधा स्वयम् । 
दक्षिणा सर्वदाने च सर्वशक्तिस्वरुपिणी ॥ ६ ॥
निद्रा त्वं च दया त्वं च तृष्णा त्वं चात्मनः प्रिया ।
क्षुत्क्षान्तिः शान्तिरीशा च कान्तिः सृष्टिश्र्च शाश्र्वती ॥ ७ ॥
श्रद्धा पुष्टिश्र्च तन्द्रा च लज्जा शोभा दया तथा ।
सतां सम्पत्स्वरुपा च विपत्तिरसतामिह ॥ ८ ॥
प्रीतिरुपा पुण्यवतां पापिनां कलहाङ्कुरा ।
शश्र्वत्कर्ममयी शक्तिः सर्वदा सर्वजीविनाम् ॥ ९ ॥
देवेभ्यः स्वपदोदात्री धातुर्धात्री कृपामयी ।
हिताय सर्वदेवानां सर्वासुरविनाशिनी ॥ १० ॥
योगनिद्रा योगरुपा योगदात्री च योगिनाम् ।
सिद्धिस्वरुपा सिद्धानां सिद्धिदा सिद्धयोगिनी ॥ ११ ॥
ब्रह्माणी माहेश्र्वरी च विष्णुमाया च वैष्णवी ।
भद्रदा भद्रकाली च सर्वलोकभयङ्करी ॥ १२ ॥
ग्रामे ग्रामे ग्रामदेवी गृहदेवी गृहे गृहे  ।
सतां कीर्तिः प्रतिष्ठा च निन्दा त्वमसतां सदा ॥ १३ ॥
महायुद्धे महामारी दुष्टसंहाररुपिणी ।
रक्षास्वरुपा शिष्टानां मातेव हितकारिणी ॥ १४ ॥
वन्द्या पूज्या स्तुता त्वं च ब्रह्मादिनां च सर्वदा ।
ब्राह्मण्यरुपा विप्राणां तपस्या च तपस्विनाम् ॥ १५ ॥
विद्या विद्यावतां त्वं च बुद्धिर्बुद्धिमतां सताम् ।
मेधास्मृतिस्वरुपा च प्रतिभा प्रतिभावताम् ॥ १६ ॥
राज्ञां प्रतापरुपा च विशां वाणिज्यरुपिणी ।
सृष्टौ सृष्टिस्वरुपा त्वं रक्षारुपा च पालने ॥ १७ ॥
तथान्ते त्वं महामारी विश्वस्य विश्र्वपूजिते ।
कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्र्च मोहिनी ॥ १८ ॥
दुरत्यया मे माया त्वं यया सम्मोहितं जगत् ।
यया मुग्धो हि विद्नांश्र्च मोक्षमार्ग न पश्यति ॥ १९ ॥
इत्यात्मना कृतं स्तोत्रं दुर्गाया दुर्गनाशनम् ।
पूजाकाले पठेद्यो हि सिद्धिर्भवति वाञ्छिता ॥ २० ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे प्रकृतिखंडे (६६/७-२६) श्रीकृष्ण कथिते दुर्गनाशन स्तोत्रम् संपूर्णम् ॥
॥ श्रीदुर्गादेवीमर्पणमस्तु ॥ 
मराठी अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले
१) देवि, तूं सर्वांची माता व मूलप्रकृति ईश्र्वरी आहेस. तूं सृष्टीच्या कार्यांत आद्यशक्ति आहेस. तुझ्याच इच्छेने तूं त्रिगुणात्मक बनली आहेस.
२) कार्याच्या आवशकतेनुसार तूं सगुण रुप धारण करतेस. वास्तविक तू निर्गुण आहेस. तूं सत्य, नित्य व सनातन अशी परब्रह्मस्वरुप व परम तेजस्वी आहेस.
३-५) भक्तांवर कृपा करण्यासाठी दिव्य शरीर तूं धारण करतेस. तूं सर्वस्वरुपा, सर्वेश्र्वरी, सर्वांचा आधार, परात्परा, सर्वबीजस्वरुपा, सर्वांना पूज्य, निराश्रीतांना आश्रय देणारी, सर्व ज्ञानी, सर्वतोभद्रा, सर्व मङ्गलमङ्गला, सर्वबुद्धिस्वरुपा, सर्वशक्तिरुपिणी, सर्वज्ञान देणारी, सर्व जाणणारी आणि सर्वांना उत्पन्न करणारी आहेस.
६-८) देवतांना हविष्य दान करण्यासाठी तूंच स्वाहा देवता आहेस. तसेच पितरांसाठी श्राद्ध अर्पण करण्यासाठी तूंच स्वधा देवता आहेस. सर्वप्रकारच्या दानयज्ञामध्ये दक्षिणा देवता तूंच आहेस. तूंच निद्रा, दया आणि मनाला प्रिय वाटणारी तृष्णा आहेस. क्षुधा, क्षमा, शान्ति, ईश्र्वरी, कान्ति तसेच शाश्र्वती सृष्टिपण तूंच आहेस. श्रद्धा, पुष्टि, तन्द्रा, लज्जा, शोभा व दया तूंच आहेस. सत्पुरुषांसाठी सम्पत्ति व दुष्टांसाठी विपत्ति तूंच आहेस.  
९-१०) पुण्यवानांसाठी प्रेमरुप, पापी लोकांसाठी कलहरुपी अङ्कूर, सर्व जीवांसाठी कर्ममय शक्तिही तूंच आहेस. देवतांना त्यांचे पद देणारी व धाता (ब्रह्माचे) पोषण करणारी दयामय धात्री तूंच आहेस. सर्व देवतांच्यासाठी असूरांचा नाश करणारी तूंच आहेस.
११-१२) योगनिद्रा तूंच, योग तुझेच स्वरुप, योग्यांना योग देणारी व सिद्धांची सिद्धि तूंच आहेस. तूं सिद्धि देणारी व सिद्धयोगिनी आहेस. ब्रह्माणी, माहेश्र्वरी, विष्णुमाया, वैष्णवी, तसेच भद्रदायिनी भद्रकाली तूंच आहेस. तूंच सर्व लोकांसाठी भय उत्पन्न करतेस.  
१३-१४) गावागावांत ग्रामदेवी व घराघरांत गृहदेवी तूंच आहेस. तूं सत्पुरुषांची कीर्ति व प्रतिष्ठा आहेस. दुष्टांची नेहमी होणारी निंदापण तुझेच स्वरुप आहे. महायुद्धामध्ये दुष्टांचा नाश करणारी महामारी व सत्पुरुषांसाठी मातेप्रमाणे हितकरणारी व त्यांचे रक्षण करणारी आहेस. 
१५-१६) ब्रह्मा आणि देवता नेहमी तुझी पूजा, वंदना व स्तुति करतात. ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व व तपस्वी लोकांची तपस्या तूंच आहेस. विद्वानांची विद्या, बुद्धिवंतांची बुद्धि, सत्पुरुषांची मेधा आणि स्मृति तसेच प्रतिभावानांची प्रतिभा पण तुझेच रुप आहे.  
१७-१९) राजांचा प्रताप व वैश्यांचे वाणिज्य तूंच आहेस. हे विश्र्वपूजिते, सृष्टिकाली सृष्टिरुपिणी, पालनकाली रक्षण करणारी तसेच संहारकाली विश्र्वाचा नाश करणारी महामारीरुपिणी तूंच आहेस. तूंच कालरात्रि, महारात्रि तसेच मोहिनी , मोहरात्रि आहेस. तूं माझी दुर्लङ्घ्य माया आहेस. जीने सर्व जगाला मोहित केले आहे. तीने मोहित झालेल्या विद्वान पुरुषालासुद्धा मोक्षमार्ग दिसत नाही.  
२०) या दुर्गामातेच्या दुर्गम स्तोत्राचे पठण पूजा करतांना जो करतो त्याला इच्छित सिद्धि प्राप्त होते. 
अशा रीतीने हे श्रीकृष्णांनी गायीलेले हे दुर्गम स्तोत्र पूर्ण झाले.
DurgNashan Stotra 
दुर्गनाशन स्तोत्र


Custom Search

Monday, July 11, 2016

SansarPavanNam Shankar Kavacham संसारपावन नाम शंकरकवच


SansarPavanNam Shankar Kavacham 
SansarPavanNam Shankar Kavacham is in Sanskrit. It is from BrahmaVaivart Purana. This Kavacham is told to Banasur by God Shiva himself. It is to be recited for 5 Lakh times for devotee to be blessed by God Shiva.
संसारपावन नाम शंकरकवच 
ॐ नमो महादेवाय
बाणासुर उवाच
महेश्र्वर महाभाग कवचं यत् प्रकाशितम् ।
संसारपावन नाम कृपया कथय प्रभो ॥ १ ॥
महेश्र्वर उवाच
श्रृणु वक्ष्यामि हे वत्स ! कवचं परमाद्भुतम् ।
अहं तुभ्यं प्रदास्यामि गोपनीयं सुदुर्लभम् ॥ २ ॥
पुरा दुर्वाससे दत्तं त्रैलोक्यविजयाय च ।
ममैवेदं च कवचं भक्त्या यो धारयेत् सुधीः ॥ ३ ॥  
जेतुं शक्नोति त्रैलोक्यं भगवानिव लीलया ॥ ४ ॥
संसारपावनस्यास्य कवचस्य प्रजापतिः ।
ऋषिश्छन्दश्र्च गायत्री देवोऽहं च महेश्र्वरः ।
धर्मार्थकाममोक्षेषु विनियोगः प्रकीर्तितः ॥ ५ ॥
पञ्चलक्षजपेनैव सिद्धिदं कवचं भवेत् ॥ ६ ॥
यो भवेत् सिद्धकवचो मम तुल्यो भवेद् भुवि ।
तेजसा सिद्धियोगेन तपसा विक्रमेण च ॥ ७ ॥
शम्भुर्मे मस्तकं पातु मुखं पातु महेश्र्वरः ।
दन्तपंक्तिं च नीलकण्ठोऽप्यधरोष्ठं हरः स्वयम् ॥ ८ ॥
कण्ठं पातु चन्द्रचूडः स्कन्धौ वृषभवाहनः ।
वक्षःस्थलं नीलकण्ठः पातु पृष्ठं दिगम्बरः ॥ ९ ॥
सर्वाङ्गं पातु विश्र्वेशः सर्वदिक्षु च सर्वदा ।
स्वप्ने जागरणे चैव स्थाणुमें पातु संततम् ॥ १० ॥
इति ते कथितं बाण कवचं परमाद्भुतम् ।
यस्मै कस्मै न दातव्यं गोपनीयं प्रयत्नतः ॥ ११ ॥
यत् फलं सर्वतीर्थानां स्नानेन लभते नरः ।
तत् फलं लभते नूनं कवचस्यैव धारणात् ॥ १२ ॥
इदं कवचमज्ञात्वा भजेन्मां यः सुमन्दधीः ।
शतलक्षप्रजप्तोऽपि न मन्त्रः सिद्धिदायकः ॥ १३ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे संसारपावनं नाम शंकरकवचं संपूर्णम् ॥
॥ श्री शंकरार्पणमस्तु ॥    
मराठी अर्थ
बाणासुर म्हणाला, सच्चिदानन्दस्वरुप श्रीमहादेवानां नमस्कार असो.
१) प्रभो ! महेश्र्वरा आपण मला संसारपावन कवच मला सांगावे.
महेश्र्वर म्हणाले,
२-४) मुला, ऐक या अतिशय अद्भुत कवचाचे मी तुझ्यासाठी वर्णन करतो. ते जरी अत्यंत दुर्लभ आणि गोपनीय आहे तरी ते मी तुला सांगतो. पूर्वी त्रैलोक्य विजयासाठी मी हे दुर्वासांना दिले होते. जो बुद्धिमान पुरुष हे कवच भक्तिभावाने धारण करतो, तो भगवंताप्रमाणेच सहज तीन्ही लोकांवर विजय मिळवितो.
५-७) या संसारपावन कवचाचे ऋषि प्रजापति हे आहेत. छन्द गायत्री असून देवता मी म्हणजे महेश्र्वर आहे.  धर्म, अर्थ, काम व मोक्षसाठी याचा विनियोग आहे. या कवचाचा ५ लक्ष जप केल्यावर हे सिद्धदायक होते. जो या कवचाला सिद्ध करतो, तो सिद्धियोगाने तेजस्वी व तपस्येने, बल-पराक्रमाने माझ्यासारखा विजयी होतो.  
८) शम्भु माझ्या डोक्याचे आणि महेश्र्वर माझ्या मुखाचे रक्षण करो. नीलकण्ठ दंत्तपंक्तिचे आणि स्वतः हर माझ्या अधरोष्टाचे रक्षण करो.
९) चन्द्रचूड कण्ठाचे आणि वृषभवाहन दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. नीलकण्ठ छातीचे व दिगम्बर पाठीचे पालन करो. 
१०) विश्र्वेश नेहमी सर्व दिशांकडून माझ्या संपूर्ण शरिराचे रक्षण करो. झोपल्यावर व जागेपणी स्थाणुदेव माझे रक्षण करो.
११) बाणा, ह्याप्रकारे मी तुझ्यासाठी या अत्यंत अद्भुत कवचाचे वर्णन केले. ऐर्‍यागैर्‍याला ह्याचा उपदेश करु नये. मात्र हे गुप्त ठेवले पाहीजे. हे कवच धारण केले असतां सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्यावर जे फळ मिळते तसेच फळ मिळते. मन्दबुद्धि माणुस या कवचाला न जाणता माझी उपासना करतो, त्याला लाखों जप केल्यावरही मंत्र सिद्ध होत नाही.

अशाप्रकारे श्रीब्रह्मवैवर्त पुराणांतील हे संसारपावन नावाचे शिवकवच पू्र्ण झाले. 
SansarPavanNam Shankar Kavacham संसारपावन नाम शंकरकवच 


Custom Search