Sunday, July 24, 2016

LalitaPanchak Stotra (Marathi) ललितापंचक स्तोत्र


LalitaPanchak Stotra 
LalitaPanchak Stotra is in Marathi. It is not known who has done it in Marathi based on original Sanskrit Lalita Panchakam created by P.P.Adi Shankaracharya. Any Lalita Devi Strotra or Lalita SahasraNam is a best remedy for curing Heart disease. Thanks to him whose has converted it in Marathi.
ललितापंचक स्तोत्र 
स्मरे सकाळी ललितेच्या मी कमलासम वदना ।
विशाल मोती चमके नाकी अरुण वर्ण अधरा ।
कुंडल मणि ते रमते कानी नयने भिडती ज्या ।
सुंदर भाली तिलक कस्तुरी मंदस्मित ते मुखा ॥ १ ॥
भजे सकाळी ललितेच्या मी कर कल्पलताला ।
झळक जेथे अंगठी, भरले कर पल्लवा ।
बाहू शोभती माणिक आणि सुवर्ण वलयामुळे ।
पुंड्रक धनु करी पुष्पबाण ते अंकुशही जथे ॥ २ ॥
नमे सकाळी ललितेच्या मी कमलरुप चरणा ।
भक्त कामना पुरवुनी जे हो भवसागर नौका ।
ब्रह्मादिक जे सुर नायकही पूज्य मानिती ज्याला ।
ध्वज अंकुश ही पद्मचक्र ती अमित लांछने ज्याला ॥ ३ ॥
स्तवे सकाळी परमहितैषी, याच भवानी ललितेला ।
महती वर्णिली वेदांनी मिती करुणामय निर्मला ।
विद्येश्र्वरी परी अगम्य राही मन वाणी वेदा ।
विधीनिर्मिती स्थिती विलयासी मूळ कारणीभूता ॥ ४ ॥
कमला किंवा महेश्र्वरी वा अथवा कामेश्र्वरी ।
जगज्जननी वा त्रिपुरसुंदरी तसेच श्री शांभवी ।
परा शक्ती वा वाणी देवी अशा रितीने हे ललिते ।
आवाहन मी करीत सकाळी तुजसी पुण्य नामे ॥ ५ ॥
सुभगदायी आनंदमयी हे स्तोत्र पंचश्र्लोकी ।
म्हणुनी प्रभाती जो नर प्रार्थी ललिता मातेशी ।
प्रसन्न होवून त्वरीत तया ती दे विद्या लक्ष्मी ।
अनंत किर्ती तशीच होई विमल सुखा वृद्धी ॥ ६ ॥
हे स्तोत्र श्री प.पू. आदि शंकराचार्यांच्या ललितापंचक या मूळ संस्कृत स्तोत्रावर आधारीत ज्याने केले त्यास धन्यवाद व त्याचे आभार मानून भाविकांसाठी येथे प्रस्तुत केले आहे. 
LalitaPanchak Stotra 
ललितापंचक स्तोत्र 


Custom Search

No comments: