Shri Venkatesh Stotram
Shri Venkatesh Stotram is in Sanskrit. It is a very beautiful creation of Shri Vasudevanand Saraswati. It is a praise of God Venkatesh.
श्रीवेंकटेशस्तोत्रम्
व्येमित्यव्ययमाख्यातं मुनिभिः पापवाचकम् ।
कटतेर्नाशनार्थत्वात्पापहा वेंकटेश्वरः ॥ १ ॥
यो भक्तरक्षणार्थाय विष्णुर्वैकुंठवास्ययं ।
शेषाचले महालक्ष्म्या सह तिष्ठति वेंकटः ॥ २ ॥
चतुर्बाहुरुदारांगो निजलांछनलांछितः ।
वेंकटेश इति ख्यातो देवः पद्मावतीप्रियः ॥ ३ ॥
शेषाचलं महोत्तुगं सर्वसंपत्समन्वितम् ।
वैकुंठकल्पमकरोच्छ्रीनिवासः स नोऽवतु ॥ ४ ॥
यद्दर्शनार्थमखिला ऋषियोगिसुरादयः ।
आयांति परया भक्त्या सपत्नीकाश्च सानुगाः ॥ ५ ॥
विशेषादाश्विने मासे महोत्सवदिदृक्षवः ।
भक्तानुकंपी भगवान्वेंकटेशः स नोऽवतु ॥ ६ ॥
स त्वं मां पाहि देवेश लक्ष्मीश गरुडध्वज ।
सर्वापत्तिविनाशाय प्रसन्नो भव सर्वदा ॥ ७ ॥
प्रसीद लक्ष्मीरमण प्रसीद प्रसीद शेषाद्रिशय प्रसीद ।
दारिद्र्यदुःखौघभयं हरंतं तं वेंकटेशं शरणं प्रपद्ये ॥ ८ ॥
॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचितं श्रीवेंकटेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
मराठी अर्थ१) मुनिजनांनी ( वेदशास्त्रादिसंपन्न अशा ) ' व्येम् ' हे अव्यय पापवाचक आहे असे म्हटले आहे. व ' कटति ' हे क्रियापद नाशन म्हणजे नाश करणे हा अर्थ सांगणारे आहे. त्यामुळे श्रीवेंकटेश्र्वर हा पातकांचा नाश करणारा आहे.
२) जो वैकुंण्ठलोकांत राहणारा श्रीविष्णु आहे तोच हा श्रीविष्णु भक्त रक्षण करण्यासाठी श्रीमहालक्ष्मीसह शेषाचल पर्वतावर उभा आहे.
३) जो प्रशस्त शरीराचा, चार हातांचा, श्रीवत्सचिन्ह धारण करणारा आणि पद्मावतीचा पती आहे, तो हा वेंकटेश या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे.
४) ज्या श्रीनिवासाने म्हणजे श्रीलक्ष्मीपतीने अतिशय उत्तुंग किंवा उंच अशा शेषाचलास म्हणजे शेष नावाच्या पर्वतास सर्वैश्र्वर्यसंपन्न अशा वैकुंठाप्रमाणे श्रेष्ठ, सुंदर व रमणीय केले आहे. तो आम्हा सर्वांचे रक्षण करो.
५-६) ज्याच्या दर्शनासाठी सर्व देव, सर्व योगी व सर्व ऋषी आपल्या अनुयायांसह किंवा सेवकांसह आपल्या स्त्रियांना घेऊन आश्विन महिन्यांतील येथील विशेष सोहळा पाहण्यासाठी येतात, तो भक्तांविषयी अत्यंत कृपाळू, दयाळू व षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीवेंकटेश आमचे रक्षण करो.
७) हे देवश्रेष्ठा श्रीवेंकटेशा ! हे लक्ष्मीपते ! हे श्रीगरुडवाहना ! तू माझे रक्षण कर. आमच्यावरील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी तू नेहमी प्रसन्नचित्त रहा.
८) हे श्रीलक्ष्मीपते ! श्रीवेंकटेशप्रभो ! हे शेषाचलविहारा ! आम्हाला प्रसन्न व्हा. दारिद्र्य व दुःखे यांच्या प्रवाहाला छिन्न-विछिन्न करणार्या त्या श्रीवेंकटेशाला मी शरण आलो आहे.
अशा रीतीनें श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीनी रचिलेले श्रीवेंकटेश स्तोत्र संपूर्ण झाले.
Shri Venkatesh Stotram
श्रीवेंकटेशस्तोत्रम्
Custom Search
No comments:
Post a Comment