Saturday, May 22, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 5,  Ovya 112 to 136 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ५ 
ओव्या ११२ ते १३६
मूळ श्लोक
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्यितो योगधारणाम् ॥ १२ ॥
सर्व इंद्रियांचें नियमन करुन, हृदयाच्या ठिकाणीं मनाचा निरोध करुन आणि आपला प्रणवायु मस्तकामध्यें ठेवून योगाचरणामध्यें स्थित होऊन--॥ १२ ॥     
परी हें तरीच घडे । जरी संयमाची अखंडें ।
सर्वद्वारीं कवाडें । कळासती॥ ११२ ॥
११२) परंतु, जर सर्वेंद्रियांच्या दारांत नेहमीं निग्रहाची कवाडें लावलीं, तरच हे घडेल.
तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें ।
जैसें करचरणीं मोडलें । परिचरु न संडी ॥ ११३ ॥
११३) मग ज्याप्रमाणें हातपाय मोंडलेला मनुष्य घर सोडीत नाहीं, त्याप्रमाणें मग स्वभावतःच कोंडलेलें मन अंतःकरणांत स्वरुप राहील.
तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा ।
मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥ ११४ ॥
११४) अर्जुना, तसें चित्त स्थिर झालें असतां मग प्राणवायूचा ॐकार करुन ( प्राणानें ॐकाराचें चिंतन केलें असतां प्राण प्रणवरुप होतो, ) त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गांत मूर्ध्निआकाशापर्यंत आणावा.   
तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें ।
जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबी ॥ ११५ ॥
११५) तेथें मूर्ध्निआकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल, अशा अर्धवट स्थितींत, धारणेच्या जोरावर धरुन ठेवावा, जेथपर्यंत अकार, उकार व मकार या तीन मात्रा अर्धमात्रारुप ॐकार बिंदूमध्यें नाहींशा झाल्या नाहींत.  
तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । 
मग लग्नीं जेवीं ॐकारु । बिंबींचि विलसे ॥ ११६ ॥
११६) तोंपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्निआकाशांत निश्चल करावा., मग अर्धबिंबांत मात्रात्रयाचें ऐक्य झालें असतां ॐकार अर्धमात्रेमध्यें असा शोभतो, ( लयास पावतो ) तसा प्राण मूर्ध्निआकाशांत शोभतो. ( लयास पावतो )   
मूळ श्लोक
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥
१३) ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असतां व माझें स्मरण करीत असतां, जो देहाचा त्याग करुन जातो, तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. 
तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे ।
मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥ ११७ ॥
११७) तेव्हां ॐ हें स्मरण्याचें संपून तेथेंच प्राणवायू संपतो. मग ॐकार स्मरण्याचें राहिलें कीं, जे पूर्ण परब्रह्म तेंच काय तें एक राहातें.  
म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।
जो माझें स्वरुप परम । स्मरतसांता ॥ ११८ ॥
११८) म्हणून प्रणव हें एक ज्याचें नाम आहे व जें एकाक्षर ब्रह्म आहे, तें माझें मुख्य स्वरुप असून, त्या स्वरुपाचें स्मरण करीत असतांना,   
यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें । 
जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥ ११९ ॥
११९) जो अशा स्थितींतच देहाचा त्याग करतो, तो ज्या ( ब्रह्म ) प्राप्तीपलीकडे दुसरी कांहीं एक गोष्ट साध्य करावयाची नाहीं, त्या माझ्या स्वरुपाला निश्चयानें पावतो.   
येथ अर्जुना जरी विपायें । तुझां जीवीं हन ऐसें जाये ।
ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंती ॥ १२० ॥
१२०) येथें अर्जुना, कदाचित् जर तुझ्या मनांत असें वाटेल की, ( अंतकालीं हें स्मरण करावें हें खरें परंतु ) मग अंतकालीं हे स्मरण कशानें होणार ?
इंद्रियां अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया । 
आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥ १२१ ॥
१२१) कारण इंद्रियें आपआपली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसें होऊन, आंतबाहेर मरणाची लक्षणें उघड दिसूं लागल्यावर,  
ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें ।
तेथ काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ॥ १२२ ॥
१२२) मग त्या वेळेस योगसाधनेस कोणी बसावें ? व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा ? आणि कोणत्या अंतःकरणानें ॐकाराचें स्मरण करावें ?
तरि अगा ऐसिया ध्वनी । झणें थारा देशी हो मनी । 
पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ॥ १२३ ॥
१२३) तर बाबा, अशा शंकेला कदाचित तूं मनांत जागा देशील तर अशी शंका मनात आणूं नकोस; कारण माझी जे नेहमींच सेवा करतात, त्या भक्तांच्या मरणकालीं मी त्यांचा सेवक होतो. 
मूळ श्लोक
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४ ॥
१४) पार्था, जो सतत अनन्यचित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो, त्या ( माझ्याशी ) निरंतर शकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे.   
मूळ श्लोक
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्र्तम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ १५ ॥
१५) ( ही ) श्रेष्ठ स्थिति प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर, दुःखाचे आगर असलेल्या व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही.  
जे विषयांसी तीळांजळीं देऊनि । प्रवृत्तीवरी निगड बाऊनि ।
मातें हृदयीं सूनि । भोगिताती ॥ १२४ ॥
१२४) जें विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून ( निरोधून ), मला अंतःकरणांत सांठवून माझ्या स्वरुपाचा अनुभव घेतात;  
परि भोगितया नाराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां ।
तेथ चक्षुरादिकां । कवण पाडू ॥ १२५ ॥
१२५) परंतु मला हृदयांत घालून कितीहि भोग घेतला, तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे, भूक व तहान इत्यादिकांचा त्यांस पत्ता नसतो; तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे ?  
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजसी लिगटले ।
मीचि होऊनि आटले । उपासिती ॥ १२६ ॥
१२६) अशा प्रकारें जे अखंड माझ्याशीं एकरुप होऊन अंतःकरणाने मला चिकटले, ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात.    
तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें ।
मग म्यां जरी पावावें । तरि उपास्ति ते कायसी ॥ १२७ ॥
१२७) ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावें, तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली ? 
पैं रंकु एक आडलेपणें । काकुळतीं अंतीं धांवां गा धांवां म्हणे ।
तरि तयाचिये ग्लानी धांवणें । काय न घडे मज ॥ १२८ ॥
१२८) जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयीं काकुळतीनें मला, देवा, धांवा हो धांवा, असें म्हणाला, तर त्याच्या संकटसमयीं मी धावत नाहीं काय ?    
आणि भक्ताही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा ।
म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥ १२९ ॥
१२९) आणि भक्तांचीहि तीच अवस्था होत असेल तर, मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरितां करावयाचा ? म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊं नकोस.     
तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरला कीं पावावा ।
तो आभारुही जीवा । साहवेचि ना ॥ १३० ॥
१३०) त्यांनी ज्या वेळीं माझी आठवण करावी, त्या वेळेला स्मरण करतांच मीं पावावें, एवढे ओझेंदेखील माझ्या मनाला सहन होत नाही. 
तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाची उत्तीर्णत्वालागीं ।
भक्तांचियां तनुत्यागीं । परिचर्या करी ॥ १३१ ॥
१३१) तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणीं असलेला पाहून, त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरितां मी भक्तांच्या देह पडण्याच्या चेळी त्यांची सेवा चाकरी करतो.  
देहवैफल्याचा वारा । झणें लागेल या सुकुमारा ।
म्हणोनि आत्मबोधाचा पांजिरां । सूयें तयातें ॥ १३२ ॥
१३२) देहान्तसमयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित् माझ्या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजर्‍यांत ठेवतो.     
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हींव ऐसी करीं साउली ।
ऐसेनि नित्यबुद्धि संचली । मी आणी तयातें ॥ १३३ ॥
१३३) शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण, हीच सोपी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजर्‍यावर मी करतों;  अशा तर्‍हेने आत्म्याच्या नित्यतेंविषयीं दृढ झालेली बुद्धि मी त्याला देतो. 
म्हणोनि देहांतीचें सांकडें । माझिया कहींचि न पडे ।
मी आपुलियातें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥ १३४ ॥
१३४) म्हणून मरणाचें संकट माझ्या भक्ताला कधींच पडत नाहीं; माझ्या भक्ताला मी आपल्याकडे कांहीं आयास न पडता आणतो.
वरचील देहाची गंवसणी फेडूनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी ।
शुद्ध वासना निवडुनी । आपणपां मेळवीं ॥ १३५ ॥
१३५) आत्म्यावर असणारी देहरुपी गवसणी काढून टाकून, अहंकाररुपी वरवर असणारी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन, त्या भक्तांचें ( मी ) आपल्याशी ऐक्य करतों,      
आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठाव नाहीं ।    
म्हणऊनि अव्हेरु करितां कांहीं । वियोगु ऐसा न वाटे ॥ १३६ ॥
१३६) आणि भक्तांना तरी देहांत असतांनादेखील विशेषतः देहतादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देह त्याग करतांना त्यांत ( देहाचा) वियोग असा वाटत नाही.  



Custom Search

Shri Dattatreya Stotram श्रीदत्तात्रेय स्तोत्राम्

 

Shri Dattatreya Stotram is in Sanskrit. It is reated by Shri P.P. Vasudevanand Saraswati. This stotra is very pious and good for Shri Dattatreya  Upasana. God Datta bless the devotee who recites this stotra every day.   
Shri Dattatreya Stotram 
श्रीदत्तात्रेय स्तोत्राम्
दत्तात्रेय त्वां  नमामि प्रसीद त्वं सर्वात्मा सर्वकर्ता न वेद ।
कोऽप्यनं ते सर्वदेवाधिदेव ज्ञाताज्ञातान्मेऽपराधान्क्षमस्व ॥ १ ॥
भावार्थ
१) हे दत्तात्रेया ! तुला नमस्कार असो. तूच सर्वांचा अंतर्यामी आहेस. तूच भूत-वर्तमान-भविष्य या तीनही काळांत घडणार्‍या सर्व घटनांचा कर्ता आहेस. देवांच्याही श्रेष्ठ देवा, तुझा पार कुणीही जाणू शकत नाही. माझ्याकडून कळत नकळत घडलेल्या अपराधांची क्षमा कर. 
त्वदुद्भवात्त्वदधीनधीत्वात्त्वमेव मे वंद्य उपास्य आत्मन् ॥
अथापि मौढ्यात्स्मरणं न ते मे कृतं क्षमस्व प्रियकृमन्महात्मन् ॥ २ ॥
२) मी तुझ्यापासूनच उद्भवलेला आणि तुझाच नियम्य आहे. तूच मला पूजनीय आहेस. असे असूनही मी मूर्खपणाने तुझे स्मरणही केले नाही, याबद्दल, हे प्रिय करणारा तू मोठ्या मनाने मला क्षमा कर.
भोगापवर्गप्रदमात्मबंधुं कारुण्यसिन्धुं परिहाय बंधुम् ॥
हिताय चान्यं परिमार्गयन्ति हा मादृशो नष्टदृशो विमूढाः ॥ ३ ॥
३) तुझयासारखा ऐहिक भोगांचा तसेच मोक्षाचाही करुणासागर दाता माझ्या पाठीशी उभा असतांनाही माझ्यासारखे विमूढ आंधळे कल्याणासाठी भलत्याचाच 
अनुनय करतात.
न मत्समो यद्यपि पापकर्ता न त्वत्समोऽथापि हि पापहर्ता ॥
न मत्समोऽन्यो दयनीय आर्य न त्वत्समः क्वापि दयालुवर्य ॥ ४ ॥
४) माझ्यासारखा महापापी जरी अन्य कुणी नसला तरी खरोखर तुझ्यासारखा पाप घालवणाराही कुणी नाहीच. हे परमपुरुषा, माझ्यासारखा दयनीय कुणी नाही आणि तुझ्यासारखा श्रेष्ठ दयाळूहि कुणी नाही. 
अनाथनाथोऽसि सुदीनबन्धुः श्रीशानुकंपामृतपूर्णसिन्धुः ॥
त्वत्पादभक्तिं तव दासदास्यं त्वदीयमंत्रार्थदृढैकनिष्ठाम् ॥ ५ ॥
गुरुस्मृतिं निर्मलबुद्धिमााधिव्याधिक्षयं मे विजयं च देहि ॥
इष्टार्थलब्धिं वरलोकवश्यं धनान्नवृद्धिं हयगोसमृद्धिं ॥ ६ ॥
५-६) हे लक्ष्मीरमणा, तू अनाथांचा नाथ आहेस, दीनांचा बांधव आहेस. दयेच्या अमृताने परिपूर्ण सागर आहेस. ( इथपर्यंत आपले दैन्य, शरणागति आणि अनन्यागतिकता तसेच भगवंताचे दयालुत्व, ऐश्वर्य आणि भक्तवात्सल्य सांगून झाल्यावर आता मागणे मागत आहेत. ) मला तुझ्या पादपद्मी भक्ति, तुझ्या भक्तांची सेवा, तुझ्या मंत्रावर दृढ आणि अनन्य निष्ठा, गुरंचे स्मरण, शुद्ध मती, आधि आणि व्याधींचा नाश, विजय, इष्ट अर्थाचा लाभ, श्रेष्ठ लोकांचे ( स्वर्गादिकांचे ) वर्चस्व, धन आणि अन्न यांची समृद्धी तसेच घोडे-गायी आदि पशू भरपूर मिळू दे. 
पुत्रादिलब्धिं म उदारतां च देहीश मे चास्त्वभयं हि शांतिः ॥
ब्रह्माग्निभूम्यो नम औषधीभ्यो वाचे नमो वाक्पतये च विष्णवे ॥ ७ ॥
७) मला पुत्रपौत्रादि व्हावेत, माझ्यात औदार्य असावे. मला सगळीकडून अभय असावे आणि माझ्या जीवनांत शांति असावी. ब्रह्मदेवाला, अग्निनारायणाला, सरस्वतीला, वाचस्पतीला, विष्णूला ( ह्या तुझ्या स्वरुपांना ) माझा नमस्कार असो.    
शांतास्तु भूर्नः शिवमन्तरिक्षं द्यौश्चाभयं मेऽस्तु दिशः शिवाश्च ॥
आपश्च विद्युत्परिपान्तु देवाः शं सर्वतो नोऽभयमस्तु शांतिः ॥ ८ ॥
८) पृथ्वी आमच्याविषयी शांत असावी, आकाश आम्हाला कल्याणदायी व्हावे, स्वर्गाचे आम्हाला अभय असावे, दिशा मंगलमय असाव्यात. जल. तेज आणि देवता आमचे रक्षण करोत आणि आम्हाला सर्व बाजूंनी कल्याण, अभय आणि शांति लाभावी.    
श्री प.प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं      संपूर्णम् 
Shri Dattatreya Stotram 
श्रीदत्तात्रेय स्तोत्राम् 



Custom Search

Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 26 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २६

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 26 
Doha 149 to 154 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड २६ 
दोहा १४९ ते १५४
दोहा--सखा रामु सिय लखनु जहँ तहॉं मोहि पहुँचाउ ।
नाहिं त चाहत चलन अब प्रान कहउँ सतिभाउ ॥ १४९ ॥
हे सख्या, श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण जेथे आहेत, तेथे मलाही घेऊन चल. नाहीतर मी खरे सांगतो की, माझे प्राण आता जाऊ इच्छितात. ॥ १४९ ॥
पुनि पुनि पूँछत मंत्रिहि राऊ । प्रियतम सुअन सँदेस सुनाऊ ॥
करहि सखा सोइ बेगि उपाऊ । रामु लखनु सिय नयन देखाऊ ॥
राजे वारंवार मंत्र्याला विचारत होते, ' मला प्रियतम पुत्रांची वार्ता सांग. हे मित्रा, श्रीराम, लक्ष्णण आणि सीता हे मला माझ्या डोळ्यांनी पाहता येतील, असा उपाय ताबडतोब कर.' ॥ १ ॥
सचिव धीर धरि कह मृदु बानी । महाराज तुम्ह पंडित ग्यानी ॥
बीर सुधीर धुरंधर देवा । साधु समाजु सदा तुम्ह सेवा ॥
मन घट्ट करुन मंत्री कोमल वाणीने म्हणाला, ' महाराज, तुम्ही पंडित व ज्ञानी आहात. तुम्ही नेहमी सत्संग लाभ घेतला आहे. ॥ २ ॥
जनम मरन सब दुख सुख भोगा । हानि लाभु प्रिय मिलन बियोगा ॥
काल करम बस होहिं गोसाईं । बरबस राति दिवस की नाईं ॥
जन्म-मरण, सुख-दुःखाचे भोग, हानि-लाभ, प्रियजनांचा संयोग-वियोग, हे सर्व काही, हे स्वामी ! काल व कर्म यांच्या अधीन असल्यामुळे रात्र व दिवस यांच्याप्रमाणें अनिवार्यपणे येत असते. ॥ ३ ॥
सुख हरषहिं जड़ दुख बिलखाहीं । दोउ सम धीर धरहिं मन माहीं ॥
धीरज धरहु बिबेकु बिचारी । छाड़िअ सोच सकल हितकारी ॥
मूर्ख लोक सुखात हर्षित होतात व दुःखात रडतात. परंतु धीर पुरुष आपल्या मनामध्ये दोन्ही गोष्टी समान असल्यामुचे मानतात. हे सर्वांचे रक्षक असलेले महाराज ! तुम्ही विवेकपू्र्ण विचार करुन धैर्य धरा आणि शोक सोडून द्या. ॥ ४ ॥
दोहा--प्रथम बासु तमसा भयउ दूसर सुरसरि तीर ।
न्हाइ रहे जलपानु करि सिय समेत दोउ बीर ॥ १५० ॥
श्रीरामांचा पहिला मुल्काम तमसा नदीच्या तटावर झाला. दुसरा गंगा तटावर झाला. सीतेसह दोन्ही बंधू त्यादिवशी स्नान करुन फक्त पाणी पिऊन राहिले. ॥ १५० ॥
केवट कीन्हि बहुत सेवकाई । सो जामिनि सिंगरौर गवॉंई ॥
होत प्रात बट छीरु मगावा । जटा मुकुट निज सीस बनावा ॥
निषादराजाने पुष्कळ सेवा केली. ती रात्र शृंगवरपुरामध्ये घालविली. दुसर्‍या दिवशी सकाळ होताच वडाचा चीक मागविला व श्रीराम व लक्ष्मणाने आपल्या शिरावर जटाजूट तयार केले. ॥ १ ॥
राम सखॉं तब नाव मगाई । प्रिया चढ़ाइ चढे रघुराई ॥
लखन बान धनु धरे बनाई । आपु चढ़े प्रभु आयसु पाई ॥
नंतर श्रीरामचंद्रांचे मित्र निषादराज याने नाव मागवली. प्रथम प्रिय सीतेला नावेत चढवून नंतर श्रीरघुनाथ चढले. लक्ष्मणाने धनुष्य-बाण सज्ज केले व प्रभू श्रीरामांची आज्ञा मिलताच तो नावेत चढला. ॥ २ ॥
बिकल बिलोकि मोहि रघुबीरा । बोले मधुर बचन धरि धीरा ॥
तात प्रनामु तात सन कहेहू । बार बार पद पंकज गहेहू ॥
मी व्याकूळ झालो, हे पाहून श्रीरामांनीं मोठ्या धीराने मधुर शब्दांत म्हटले, ' हे तात, बाबांना माझा प्रणाम सांगावा आणि माझ्यातर्फे वारंवार त्यांचे चरण-कमल धरावे. ॥ ३ ॥
करबि पायँ परि बिनय बहोरी । तात करिअ जनि चिंता मोरी ॥
बन मग मंगल कुसल हमारें । कृपा अनुग्रह पुन्य तुम्हारें ॥
पुन्हां त्यांचे पाय धरुन विनंती करावी की, " बाबा ! तुम्ही माझी काळजी करु नका. तुमच्या कृपेने आणि पुण्याईने वनात व वाटेत आमचे कल्याणच होईल. ॥ ४ ॥ 
छं०--तुम्हरें अनुग्रह तात कानन जात सब सुखु पाइहौं ।
प्रतिपालि आयसु कुसल देखन पाय पुनि फिरि आइहौं ॥
जननीं सकल परितोषि परि परि पायँ करि बिनती घनी ।
तुलसी करेहु सोइ जतनु जेहिं कुसली रहहिं कोसलधनी ॥
तात ! तुमच्या अनुग्रहामुळे मला वनात असताना सर्व प्रकारचे सुख मिळेल. तुमच्या आज्ञेचे व्यवस्थित पालन करुन तुमच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी सुखरुपपणे आम्ही परत येऊ. सर्व मातांचे पाय धरुन त्यांचे समाधान करावे आणि त्यांना विनंती करावी की ( तुलसीदास म्हणतात ) कोसलपती खुशाल राहतील, असा प्रयत्न तुम्ही करीत राहावे. 
सो०--गुर सन कहब सँदेसु बार बार पद पदुम गहि ।
करब सोइ उपदेसु जेहिं न सोच मोहि अवधपति ॥ १५१ ॥
वारंवार चरण-कमल धरुन वसिष्ठ गुरुंना निरोप सांगावा की, अयोध्यपतींनी आमची काळजी करु नये, असाच त्यांना त्यांनी उपदेश करावा. ॥ १५१ ॥
पुरजन परिजन सकल निहोरी । तात सुनाएहु बिनती मोरी ॥ 
सोइ सब भॉंति मोर हितकारी । जातें रह नरनाहु सुखारी ॥
हे तात, सर्व पुरवासीयांना व कुटुंबीयांना विनंती करावी की, ज्याच्या प्रयत्नाने महाराज सुखी होतील, तोच मनुष्य सर्व प्रकारे माझा हितकारी असेल. ॥ १ ॥
कहब सँदेसु भरत के आएँ । नीति न तजिअ राजपदु पाएँ ॥
पालेहु प्रजहि करम मन बानी । सेएहु मातु सकल सम जानी ॥
भरत आल्यावर त्याला माझा निरोप सांगावा की, राजाचे पद मिळाल्यावर नीती सोडू नकोस. कर्म, वचन आणि मन यांनी प्रजेचे पालन कर आणि सर्व मातांना समान मानून त्यांची सेवा कर. ॥ २ ॥
ओर निबाहेहु भायप भाई । करि पितु मातु सुजन सेवकाई ॥
तात भॉंति तेहि राखब राऊ । सोच मोर जेहिं करै न काऊ ॥
आणि हे बंधू, पिता, माता व स्वजनांची सेवा करुन त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम करावे, तसेच राजांनी कधी माझी काळजी करु नये अशा प्रकारे त्यांना सांभाळावे. ॥ ३ ॥
लखन कहे कछु बचन कठोरा । बरजि राम पुनि मोहि निहोरा ॥        
बार बार निज सपथ देवाई । कहबि न तात लखन लरिकाई ॥
लक्ष्मण काहीसे कठोर बोलला, परंतु श्रीरामांनी त्याला आवरुन मला विनंती केली आणि वारंवार स्वतःची शपथ घालून सांगितले की, ' हे तात, लक्ष्मणाचा बालिशपणा तेथे सांगू नका. ' ॥ ४ ॥
दोहा--कहि प्रनामु कछु कहन लिय सिय भइ सिथिल सनेह ।
थकित बचन लोचन सजल पुलक पल्लवित देह ॥ १५२ ॥
सीता प्रणाम करुन काही सांगू लागली. परंतु प्रेमाधिक्यामुळे ती अवघडून गेली. तिची वाणी रुद्ध झाली. डोळ्यांमध्ये पाणी आले आणि शरीर रोमांचित झाले. ॥ १५२ ॥
तेहि अवसर रघुबर रुख पाई । केवट पारहि नाव चलाई ॥
रघुकुलतिलक चले एहि भॉंती । देखउँ ठाढ़ कुलिस धरि छाती ॥
त्यावेळी श्रीरामांचा संकेत मिळताच नावाड्याने पलीकडे जाण्यासाठी नाव सोडली. अशा प्रकारे रघुवंशतिलक श्रीराम निघाले आणि मी छातीवर दगड ठेवून उभ्या उभ्या पाहात राहिलो. ॥ १ ॥
मैं आपन किमि कहौं कलेसू । जिअत फिरेउँ लेइ राम सँदेसू ॥
अस कहि सचिव बचन रहि गयऊ । हानि गलानि सोच बस भयऊ ॥
मी श्रीरामांचा हा निरोप घेऊन जिवंतपणे परत आलो. माझे दुःख मी कसे सांगू ?' असे म्हणत तो झालेल्या हानीच्या क्लेशामुळे व काळजीमुळे तसाच गप्प राहिला. ॥ २ ॥
सूत बचन सुनतहिं नरनाहू । परेउ धरनि उर दारुन दाहू ॥
तलफत बिषम मोह मन मापा । माजा मनहुँ मीन कहुँ व्यापा ॥
सुमंत्राचे बोलणे ऐकताच राजे जमिनीवर कोसळले. त्यांच्या हृदयांत आग भडकली. ते तडफडू लागले, त्यांचे मन भीषण मोहामुळे व्याकूळ झाले. जणू माशाला पहिल्याच पावसाचे पाणी बाधले होते. ॥ ३ ॥
करि बिलाप सब रोवहिं रानी । महा बिपति किमि जाइ बखानी ॥
सुनि बिलाप दुखहू दुखु लागा । धीरजहू कर धीरजु भागा ॥ 
सर्व राण्या आक्रोश करीत रडू लागल्या. त्या महान संकटाचे वर्णन कसे करता येईल ? त्या वेळचा विलाप ऐकून दुःखालाही दुःख झाले आणि धैर्याचे धैर्यही गळून गेले. ॥ ४ ॥
दोहा--भयउ कोलाहलु अवध अति सुनि नृप राउर सोरु ।
बिपुल बिहग बन परेउ निसि मानहु कुलिस कठोरु ॥ १५३ ॥
राजाच्या अंतःपुरातील रडण्याचा आवाज ऐकून अयोध्येमध्ये मोठा कोलाहल माजला. जणू पक्ष्यांच्या विशाल वनात रात्रीच्या वेळी कठोर वीज कोसळली होती. ॥ १५३ ॥
प्रान कंठगत भयउ भुआलू । मनि बिहीन जनु ब्याकुल ब्यालू ॥
इंद्रीं सकल बिकल भइँ भारी । जनु सर सरसिज बनु बिनु बारी ॥
राजाचे प्राण कंठाशी आले. जणू मण्याविना साप मरणासन्न झाला होता. सर्व इंद्रिये फार व्याकूळ झाली. पाण्याविना तलावातील कमळे कोमेजून जावीत तशी. ॥ १ ॥
कौसल्यॉं नृपु दीख मलाना । रबिकुल रबि अँथयउ जियँ जाना ॥
उर धरि धीर राम महतारी । बोली बचन समय अनुसारी ॥ 
राजाला फार दुःखी झाल्याचे पाहून कौसल्येने जाणले की, ' आता सूर्यकुलातील सूर्य अस्ताला चालला आहे.' तेव्हा श्रीरामांची माता कौसल्या ही मन घट्ट करुन प्रसंगानुरुप म्हणाली, ॥ २ ॥
नाथ समुझि मन करिअ बिचारु । राम बियोग पयोधि अपारु ॥
करनधार तुम्ह अवध जहाजू । चढ़ेउ सकल प्रिय पथिक समाजू ॥
' हे नाथ, तुम्ही मनात विचार करा की, श्रीरामांचा वियोग हा अपार समुद्र आहे. अयोध्या ही जहाज आहे आणि तुम्ही त्याचे कर्णधार आहात. सर्व प्रजा, कुटुंबीय व प्रियजन हे जहाजातील प्रवासी आहेत. ॥ ३ ॥
धीरजु धरिअ त पाइअ पारु । नाहिं त बूड़िहि सबु परिवरु ॥
जौं जियँ धरिअ बिनय पिय मोरी । रामु लखनु सिय मिलहिं बहोरी ॥
तुम्ही धीर धराल, तर सर्वजण तरुन जातील. नाहीतर सर्व परिवार बुडून जाईल. हे प्रिय स्वामी, माझी विनंती मान्य कराल, तर श्रीराम, लक्ष्मण, सीता हे परत येऊन भेटतील. ' ॥ ४ ॥
दोहा--प्रिया बचन मृदु सुनत नृपु चितयउ आँखि उघारि ।
तलफत मीन मलीन जनु सींचत सीतल बारि ॥ १५४ ॥
प्रिय पत्नी कौसल्येचे हे मृदु बोलणें ऐकून राजांनी डोळे उघडून पाहिले. जणू तडफडणार्‍या बिचार्‍या मासोळीवर कुणी तरी शितल जल शिंपडले. ॥ १५४ ॥
धरि धीरजु उठि बैठ भुआलू । कहु सुमंत्र कहँ राम कृपालू ॥
कहॉं लखनु कहँ रामु सनेही । कहँ प्रिय पुत्रबधू बैदेही ॥
धीर धरुन राजे उठून बसले आणि म्हणाले, ' सुमंत्रा, कृपाळू श्रीराम कुठे आहे, ते सांग. लक्ष्मण कोठे आहे ? स्नेही राम कोठे आहे आणि माझी लाडकी सून जानकी कोठे आहे ?' ॥ १ ॥
बिलपत राउ बिकल बहु भॉंती । भइ जुग सरिस सिराति न राती ॥
तापस अंध साप सुधि आई । कौसल्यहि सब कथा सुनाई ॥
महाराज व्याकूळ होऊन अनेक प्रकारे विलाप करीत होते. ती रात्र युगाप्रमाणे मोठी वाटत होती. सरता सरत नव्हती. राजांना श्रवणकुमाराचा पिता आंधळा तपस्वी याच्या शापाची आठवण आली. त्यांनी ती सर्व कथा कौसल्येला सांगितली. ॥ २ ॥
भयउ बिकल बरनत इतिहासा । राम रहित धिग जीवन आसा ॥
सो तनु राखि करब मैं काहा । जेहिं न प्रेम पनु मोर निबाहा ॥
त्या घटनेचे वर्णन करता करता राजे व्याकूळ झाले आणि म्हणू लागले की, ' श्रीरामाविना जगण्याच्या आशेचा धिक्कार असो. ज्याने आपल्या प्रेमाचा पण निभावून नेला नाही, ते शरीर ठेवून मी काय करु ? ॥ ३ ॥
हा रघुनंदन प्रान पिरीते । तुम्ह बिनु जिअत बहुत दिन बीते ॥
हा जानकी लखन हा रघुबर । हा पितु हित चित चातक जलधर ॥
हे रघुकुलाला आनंद देणार्‍या माझ्या प्राणप्रिय रामा, तुझ्याविना जगून बरेच दिवस झाले. हे जानकी, लक्ष्मणा, हे रघुवीरा, हे पित्याच्या चित्तरुपी चातकाचे समाधान करणार्‍या मेघांनो, ' ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 25 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २५

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 25 
Doha 143 to 148 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २५ 
दोहा १४३ ते १४८
दोहा--भयउ निषादु बिषादबस देखत सचिव तुरंग ।
बोलि सुसेवक चारि तब दिए सारथी संग ॥ १४३ ॥
मंत्री व घोड्यांची झालेली दशा पाहून निषादराजाला विषाद वाटला. तेव्हा त्याने चार उत्तम सेवक बोलावून सारथ्यासोबत दिले. ॥ १४३ ॥
गुह सारथिहि फिरेउ पहुँचाई । बिरहु बिषादु बरनि नहिं जाई ॥
चले अवध लेइ रथहि निषादा । होहिं छनहिं छन मगन बिषादा ॥
निषादराज गुह सारथी सुमंत्र याला निरोप देऊन परतला. त्याचा विरह व दुःख यांचे वर्णन करणे अशक्य. ते चौघे निषाद-रथ घेऊन अयोध्येकडे निघाले. सुमंत्र व घोडे यांना पाहून तेसुद्धा क्षणोक्षणी विषादामध्ये बुडून जात होते. ॥ १ ॥'
सोच सुमंत्र बिकल दुख दीना । धिग जीवन रघुबीर बिहीना ॥
रहिहि न अंतहुँ अधम सरीरु । जसु न लहेउ बिछुरत रघुबीरु ॥
व्याकूळ व दुःखाने दीन झालेला सुमंत्र विचार करीत होता की, श्रीरघुवीरांच्या विना जिण्याचा धिक्कार असो. शेवटी हे अधम शरीर राहणार तर नाही. आत्ताच श्रीरामांचा वियोग होताच या देहाने नष्ट होऊन कीर्ती संपादन का केली नाही ? ॥ २ ॥
भए अजस अघ भाजन प्राना । कवन हेतु नहिं करत पयाना ॥
अहह मंद मनु अवसर चूका । अजहुँ न हृदय होत दुइ टूका ॥
हे प्राण अपकीर्ती आणि पापाचे भांडे आहेत. आता हे निघून का जात नाहीत ? अरेरे, नीच मनाने चांगली संधी घालविली. अजूनही हृदय दोन तुकडे होऊन फुटुन जात नाही. ॥ ३ ॥
मीजि हाथ सिरु धुनि पछिताई । मनहुँ कृपन धन रासि गवाँई ॥
बिरिद बॉंधि बर बीरु कहाई । चलेउ समर जनु सुभट पराई ॥
सुमंत्र हात चोळत व डोके बडवून घेत पश्चात्ताप करीत होता. जणू एखादा कंजूष माणूस धनाचा खजिना गमावून बसला होता. जणू एखादा वीराचा वेष घातलेला मोठा योद्धा आणि उत्तम शूर म्हणून मानला जात असलेला मनुष्य युद्धातून पळून निघाला होता. ॥ ४ ॥
दोहा--बिप्र बिबेकी बेदबिद संमत साधु सुजाति । 
जिमि धोखें मदपान कर सचिव सोच तेहि भॉंति ॥ १४४ ॥
ज्याप्रमाणे कुणा विेवेकशील, वेदसंपन्न, साधु-संमत वागणार्‍या कुलीन ब्राह्मनाने चुकून मद्य प्यावे आणि पश्चात्ताप करावा, त्याप्रमाणे मंत्री पश्चात्ताप करीत होता. ॥ १४४ ॥
जिमि कुलीन तिय साधु सयानी । पतिदेवता करम मन बानी ॥
रहै करम बस परिहरि नाहू । सचिव हृदयँ तिमि दारुन दाहू ॥ 
ज्याप्रमाणे एखादी कुलीन, सज्जल स्वभावाची, समजूतदार आणि मन, वचन व कर्माने पतीला देव समजणारी पतिव्रता असणार्‍या स्त्रीला दुर्दैवाने पतीला सोडून राहावे लागावे, त्यावेळी तिच्या मनात ज्याप्रमाणे भयानक यातना होतात, त्याप्रमाणे मंत्र्याच्या मनाची अवस्था झाली होती. ॥ १ ॥
लोचन सजल डीठि भइ थोरी । सुनइ न श्रवन बिकल मति भोरी ॥
सूखहिं अधर लागि मुहँ लाटी । जिउ न जाइ उर अवधि कपाटी ॥
डोळ्यांत पाणी भरले होते, दृष्टी मंद झाली होती, कानांना कांहीं ऐकू येत नव्हते, व्याकूळ झालेली बुद्धी भरकटत होती. ओठ सुकले होते, तोंड चिकटले होते. परंतु ही मृत्युची लक्षणें असूनही प्राण जात नव्हते, कारण अंतःकरणाला चौदा वर्षांचा अवधी संपल्यावर भगवंत पुन्हा भेटतील, या आशेचे दार लागले होते. ॥ २ ॥                   
बिबरन भयउ न जाइ निहारी । मारेसि मनहुँ पिता महतारी ॥
हानि गलानि बिपुल मन ब्यापी । जमपुर पंथ सोच जिमि पापी ॥
सुमंत्राचा चेहरा पडला होता. तो पाहावत नव्हता. असे वाटत होते की, त्याच्या हातून जणू आई-वडिलांची हत्या घडली असावी. त्याच्या मनात रामवियोगरुपी हानी झाल्याची मोठी वेदना होती. ज्याप्रमाणे एखादा पापी मनुष्य नरकात जाताना मार्गामध्ये काळजी करीत असतो, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली होती. ॥ ३ ॥
बचनु न आव हृदयँ पछिताई । अवध काह मैं देखब जाई ॥
राम रहित रथ देखिहि जोई । सकुचिहि मोहि बिलोकत सोई ॥
तोंडातून शब्द फुटत नव्हता. मनाला काळजी होती की, अयोध्येस गेल्यावर काय दिसेल ? श्रीराम नसलेला रथ जो कोणी पाहील, तो माझे तोंडही पाहाणार नाही. ॥ ४ ॥
दोहा--धाइ पूँछिहहिं मोहि जब बिकल नगर नर नारि ।
उतरु देब मैं सबहि तब हृदयँ बज्रु बैठारि ॥ १४५ ॥
नगरातील सर्व व्याकूळ स्त्री-पुरुष धावत येऊन मला विचारतील, तेव्हा छातीवर दगड ठेवून सर्वांना उत्तर द्यावे लागेल. ,॥ १४५ ॥
पुछिहहिं दीन दुखित सब माता । कहब काह मैं तिन्हहि बिधाता ॥
पूछिहि जबहिं लखन महतारी । कहिहउँ कवन सँदेस सुखारी ॥
जेव्हा दीन-दुःखी सर्व माता विचारु लागतील, तेव्हा हे विधात्या, मी त्यांना काय उत्तर देऊ ? जेव्हा लक्ष्मणाची माता मला विचारील, तेव्हा मी तिला कोणता सुखदायक निरोप देऊ ? ॥ १ ॥
राम जननि जब आइहि धाई । सुमिरि बच्छु जिमि धेनु लवाई ॥
पूँछत उतरु देब मैं तेही । गे बनु राम लखनु बैदेही ॥
श्रीरामांची माता नुकतीच व्यालेली गाय वासराची आठवण येताच धावत येते त्याप्रमाणे धावत येईल. तिने येऊन विचारल्यावर मला हेच उत्तर द्यावे लागणार की, श्रीराम, लक्ष्मण व सीता वनात निघून गेले. ॥ २ ॥
जोइ पूँछिहि तेहि ऊतरु देबा । जाइ अवध अब यहु सुखु लेबा ॥
पूँछिहि जबहिं राउ दुख दीना । जिवनु जासु रघुनाथ अधीना ॥
जो कोणी विचारील, त्याला हेच उत्तर द्यावे लागणार, अरेरे, अयोध्येस गेल्यावर आता हेच सुख मिळण्याचे माझ्या नशिबी आहे. ज्यांचे जीवन श्रीरघुनाथांच्या दर्शनावर अवलंबून आहे, ते दुःखामुळे दीन झालेले महाराज मला विचारतील, ॥ ३ ॥
देहउँ उतरु कौनु मुहु लाई । आयउँ कुसल कुअँर पहुँचाई ॥
सुनत लखन सिय राम सँदेसू । तृन जिमि तनु परिहरिहि नरेसू ॥
तेव्हा कोणत्या तोंडाने मी उत्तर देऊ की, मी राजकुमारांना सुखरुप पोहोचवून आलो. लक्ष्मण, सीता व श्रीरामांची वार्ता ऐकताच महाराज कस्पटाप्रमाणे आपले शरीर टाकून देतील. ॥ ४ ॥
दोहा--हृदय न बिदरेउ पंक जिमि बिछुरत प्रीतमु नीरु ।
जानत हौं मोहि दीन्ह बिधि यहु जातना सरीरु ॥ १४६ ॥
प्रियतम श्रीरामरुपी जलापासून दूर होताच माझे हृदय चिखला-प्रमाणे विदीर्ण झाले नाही, म्हणून वाटते की, विधात्याने मला हे ' यातना शरीर ' च नरक-यातना भोगण्यासाठी दिले आहे. ' ॥ १४६ ॥
एहि बिधि करत पंथ पछितावा । तमसा तीर तुरत रथु आवा ॥
बिदा किए करि बिनय निषादा । फिरे पायँ परि बिकल बिषादा ॥
सुमंत्र अशा प्रकारे वाटेमध्ये पश्चात्ताप करीत होता, इतक्यात रथ तमसा नदीच्या तीरावर येऊन पोहोचला. मंत्र्याने विनंती करुन सोबत आलेल्या चारी निषादांना परत पाठविले. तेही दुःखाने व्याकूळ होत सुमंत्राच्या पाया पडले. ॥ १ ॥
पैठत नगर सचिव सकुचाई । जनु मारेसि गुर बॉंभन गाई ॥
बैठि बिटप तर दिवसु गवॉंवा । सॉंझ समय तब अवसरु पावा ॥
जणू काही गुरु, ब्राह्मण किंवा गाय यांची हत्या करुन आल्याप्रमाणे नगरात प्रवेश करताना मंत्र्याला संकोच वाटत होता. त्याने दिवसभर एका झाडाखाली बसून घालविला. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा संधि मिळाली. ॥ २ ॥
अवध प्रबेसु कीन्ह अँधिआरें । पैठ भवन रथु राखि दुआरें ॥
जिन्ह जिन्ह समाचार सुनि पाए । भूप द्वार रथु देखन आए ॥
अंधार झाल्यावर त्याने अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि दरवाज्यासमोर रथ उभा करुन तो हळूच महालात गेला. ज्या लोकांना याची वार्ता लागली, ते सर्वजण रथ पाहण्यास राजद्वारी आले. ॥ ३ ॥
रथु पहिचानि बिकल लखि घोरे । गरहिं गात जिमि आतप ओरे ॥
नगर नारि नर ब्याकुल कैसें । निघटत नीर मीनगन जैसें ॥
रथ ओळखून आणि घोडे व्याकुळ झाल्याचे पाहून ज्याप्रमाणे उन्हामध्ये गारा वितळू लागतात, त्याप्रमाणे पाहणार्‍यांचे देह गळून जात होते. जळ आटल्यावर मासे व्याकूळ होतात, तसे नगरातील स्त्री-पुरुष व्याकुळ झाले होते. ॥ ४ ॥
दोहा--सचिव आगमनु सुनत सबु बिकल भयउ रनिवासु ।
भवनु भयंकर लाग तेहि मानहुँ प्रेत निवासु ॥ १४७ ॥
मंत्री एकटाच परत आल्याचे ऐकताच संपूर्ण अंतःपूर व्याकूळ झाले. त्यांना राजमहाल स्मशानाप्रमाणे भयंकर वाटू लागला. ॥ १४७ ॥
अति आरति सब पूँछहिं रानी । उतरु न आव बिकल भइ बानी ॥
सुनइ न श्रवन नयन नहिं सूझा । कहहु कहॉं नृपु तेहि तेहि बूझा ॥ 
अत्यंत आर्त होऊन सर्व राण्या विचारु लागल्या, परंतु सुमंत्राला काही उत्तर देता येईना. त्याची वाणी अडखळली. त्याला कानांनी काही ऐकू येत नव्हते, की डोळ्यांनी दिसत नव्हते. जो कोणी समोर येई त्याला तो विचारी की, महाराज कुठे आहेत ते सांगा.' ॥ १ ॥
दासिन्ह दीख सचिव बिकलाई । कौसल्या गृहँ गईं लवाई ॥
जाइ सुमंत्र दीख कस राजा । अमिअ रहित जनु चंदु बिराजा ॥
तो व्याकूळ झाल्याचे पाहून दासी त्याला कौसल्येच्या महालात घेऊन गेल्या. तेथे महाराज असे बसले होते की, जणू अमृताविना चंद्र तेजोहीन होऊन बसलेला असावा. ॥ २ ॥
आसन सयन बिभूषन हीना । परेउ भूमितल निपट मलीना ॥
लेइ उसासु सोच एहि भॉंती । सुरपुर तें जनु खँसेउ जजाती ॥
राजे आसन, शय्या व आभूषणें सोडून, खूप उदास होऊन जमिनीवर पडले होते. ते उसासे टाकत विचार करीत होते की, जणू ययाती स्वर्गातून पतन झाल्यामुळे काळजी करीत बसला असावा. ॥ ३ ॥
लेत सोच भरि छिनु छिनु छाती । जनु जरि पंख परेउ संपाती ॥
राम राम कह राम सनेही । पुनि कह राम लखन बैदेही ॥
राजे क्षणोक्षणी मनातून काळजी करीत होते, गृध्रराज जटायूचा भाऊ संपाती पंख जळून गेल्यावर जसा पडला होता, तशी राजाची विकल दशा झाली होती. राजे वारंवार ' राम, राम ', ' हे प्रिय राम ' म्हणत होते. नंतर ' हे राम, हे लक्ष्मण व हे जानकी ' असे म्हणू लागत. ॥ ४ ॥
दोहा--देखि सचिवँ जय जीव कहि कीन्हेउ दंड प्रनामु ।
सुनत उठेउ ब्याकुल नृपति कहु सुमंत्र कहँ रामु ॥ १४८ ॥
मंत्र्याने ' जय जीव ' असे म्हणून दंडवत प्रणाम केला. ऐकताच राजाने व्याकूळ होऊन विचारले, ' सुमंत्रा, राम कुठे आहे, ते सांग.' ॥ १४८ ॥
भूप सुमंत्रु लीन्ह उर लाई । बूड़त कछु अधार जनु पाई ॥
सहित सनेह निकट बैठारी । पूँछत राउ नयन भरि बारी ॥
राजांनी सुमंत्राला हृदयाशी कवटाळले. जणू बुडत्याला काठीचा आधार मिळावा. मंत्र्याला प्रेमाने जवळ बसवून व डोळ्यांत अश्रू आणून राजे विचारु लागले. ॥ १ ॥
राम कुसल कहु सखा सनेही । कहँ रघुनाथु लखनु बैदेही ॥
आने फेरि कि बनहि सिधाए । सुनत सचिव लोचन जल छाए ॥              
' हे माझ्या प्रेमळ मित्रा, श्रीरामाची खुशाली सांग, राम, लक्ष्ंमण व सीता कुठे आहेत, ते सांग. त्यांना परत आणलेस की ते वनात निघून गेले ? ' हे ऐकताच मंत्र्याचे नेत्र पाण्याने डबडबले. ॥ २ ॥
सोक बिकल पुनि पूँछ नरेसू । कहु सिय राम लखन संदेसू ॥
राम रुप गुन सील सुभाऊ । सुमिरि सुमिरि उर सोचत राऊ ॥
शोकामुळे व्याकूळ होऊन राजे पुन्हा विचारु लागले, ' सीता, राम व लक्ष्मण यांची वार्ता तर सांग.' श्रीरामांचे रुप, गुण, शील आणि स्वभाव यांची आठवण कर करुन राजे मनात शोक करु लागले. ॥ ३ ॥
 राउ सुनाइ दीन्ह बनबासू । सुनि मन भयउ न हरषु हरॉंसू ॥
सो सुत बिछुरत गए न प्राना । को पापी बड़ मोहि समाना ॥
ते म्हणाले, ' मी श्रीरामाला राजा करण्याचे सांगून वनवास दिला. ते ऐकून रामाच्या मनात हर्ष वा विषाद आला नाही. असा पुत्र सोडून गेल्यावरही माझे प्राण गेले नाहीत; मग माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल ? ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 24 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २४

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 24 
Doha 137 to 142 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २४ 
दोहा १३७ ते १४२
दोहा--नीलकंठ कलकंठ सुक चातक चक्क चकोर ।
भॉंति भॉंति बोलहिं बिहग श्रवन सुखद चित चोर ॥ १३७ ॥                   
मोर, कोकिळ, पोपट, चातक, चक्रवाक, चकोर इत्यादी पक्षी कानांनी सुख देणारे व मन आकर्षित करणारे तर्‍हेतर्‍हेचे बोल बोलत होते. ॥ १३७ ॥
करि केहरि कपि कोल कुरंगा । बिगतबैर बिचरहिं सब संगा ॥
फिरत अहेर राम छबि देखी । होहिं मुदित मृगबृंद बिसेषी ॥
हत्ती, सिंह, वानर, डुक्कर आणि हरीण हे सर्व परस्पर वैरभाव सोडून बरोबरीने वावरत होते. वनात फिरत असताना श्रीरामांचे सौंदर्य पाहून पशूंचे ते कळप विशेष आनंदित होत होते. ॥ १ ॥
बिबुध बिपिन जहँ लगि जग माहीं । देखि रामबनु सकल सिहाहीं ॥
सुरसरि सरसइ दिनकर कन्या । मेकलसुता गोदावरि धन्या ॥
जगात जितकी म्हणून देवांची वने आहेत, ती सर्व श्रीरामचंद्रांचे हे वन समाधान पावत. गंगा, सरस्वती, सूर्यकुमारी यमुना, नर्मदा, गोदावरी इत्यादी धन्य नद्या, ॥ २ ॥
सब सर सिंधु नदीं नद नाना । मंदाकिनि कर करहिं बखाना ॥
उदय अस्त गिरि अरु कैलासू । मंदर मेरु सकल सुरबासू ॥
सर्व तलाव, समुद्र, नद्या आणि अनेक नद हे सर्व मंदाकिनीचे माहात्म्य सांगत होते. उदयाचल, अस्ताचल, कैलास, मंदराचल आणि सुमेरु इत्यादी सर्व जे देवांचे निवासस्थान असलेले पर्वत आहेत, ॥ ३ ॥
सैल हिमाचल आदिक जेते । चित्रकूट जसु गावहिं तेते ॥
बिंधि मुदित मन सुखु न समाई । श्रम बिनु बिपुल बड़ाई पाई ॥
आणि हिमाचल इत्यादी जितके पर्वत आहेत, ते सर्व चित्रकूटाची कीर्ती गाऊ लागले. विंध्याचल मोठा आनंदित होता, त्याच्या मनात आनंद मावत नव्हता, कारण विनासायास त्याला फार मोठे माहात्म्य प्राप्त झाले होते. ॥ ४ ॥
दोहा--चित्रकूट के बिहग मृग बेलि बिटप तृन जाति ।
पुन्य पुंज सब धन्य अस कहहिं देव दिन राति ॥ १३८ ॥
चित्रकूटातील पक्षी, पशू, वेल, वृक्ष, तृणांकुर इत्यादी सर्व जातीचे प्राणी व वनस्पती पुण्याच्या राशी होत व धन्य होत, असे देव रात्रंदिवस म्हणत होते. ॥ १३८ ॥
नयनवंत रघुबरहि बिलोकी । पाइ जनम फल होहिं बिसोकी ॥
परसि चरन रज अचर सुखारी । भए परम पद के अधिकारी ॥
डोळे असणारे जीव श्रीरामचंद्रांना पाहून जन्माचे साफल्य लाभल्यामुळे शोकरहित होत होते. पर्वत, वृक्ष, भूमी, नदी इत्यादी अचर हे भगवंतांच्या चरण-रजाच्या स्पर्शाने सुखी झाले. तसेच ते सर्वच मोक्षाचे अधिकारी बनले. ॥ १ ॥
सो बनु सैलु सुभायँ सुहावन । मंगलमय अति पावन पावन ॥ 
महिमा कहिअ कवनि बिधि तासू । सुखसागर जहँ कीन्ह निवासू ॥
ते वन आणि पर्वत स्वाभाविकपणे सुंदर, मंगलमय आणि अत्यंत पवित्र असणार्‍यांनांही पवित्र बनविणारे होते. जेथे सुख-सागर असलेल्या श्रीरामांनी निवास केला आहे, त्या स्थानांचा महिमा कसा सांगता येईल ? ॥ २ ॥
पय पयोधि तजि अवध बिहाई । जहँ सिय लखनु रामु रहे आई ॥
कहि न सकहिं सुषमा जसि कानन । जौं सत सहस होहिं सहसानन ॥
क्षीरसागर व अयोध्या यांचा त्याग करुन सीता, लक्ष्मण आणि रामचंद्र जेथे येऊन राहिले, त्या वनाची परम शोभा अशी आहे की, हजार मुखांचे लाखो शेष असले, तरी तेही सांगू शकणार नाहीत. ॥ ३ ॥
सो मैं बरनि कहौं बिधि केहीं । डाबर कमठ कि मंदर लेहीं ॥
सेवहिं लखनु करम मन बानी । जाइ न सीलु सनेहु बखानी ॥
मग मी कसा त्याचे वर्णन करु शकेन ? तलावामधील कासव हे मंदराचलाला उचलू शकेल काय ? लक्ष्मण हा मन, वचन आणि कर्माने श्रीरामांची सेवा करीत होता. त्याचा स्वभाव व स्नेह याचे वर्णनच करता येत नाही. ॥ ४ ॥
दोहा--छिनु छिनु लखि सिय राम पद जानि आपु पर नेहु ।
करत न सपनेहुँ लखनु चितु बंधु मातु पितु गेहु ॥ १३९ ॥
क्षणोक्षणी श्रीसीतारामांच्या चरणांच्या दर्शनामुळे आणि स्वतःवर त्यांचा स्नेह असलेला बघून लक्ष्मणाला स्वप्नातहि भाऊ, माता-पिता व घराची आठवण येत नव्हती. ॥ १३९ ॥
राम संग सिय रहति सुखारी । पुर परिजन गृह सुरति बिसारी ॥
छिनु छिनु पिय बिधु बदनु निहारी । प्रमुदित मनहुँ चकोर कुमारी ॥
श्रीरामांबरोबर सीताही अयोध्यापुरी, आप्तजन आणि घर यांची आठवण विसरुन सुखी होती. क्षणोक्षणी पती श्रीरामांचे चंद्रासारखे मुख पाहून चकोरी जशी चंद्रम्याला पाहून प्रसन्न असते तशी ती अतिशय प्रसन्न होत होती. ॥ १ ॥
नाह नेहु नित बढ़त बिलोकी । हरषित रहति दिवस जिमि कोकी ॥
सिय मनु राम चरन अनुरागा । अवध सहस सम बनु प्रिय लागा ॥  
स्वामींचे आपल्यावरील नित्य वाढत जाणारे प्रेम पाहून सीता अशी हर्षित होती की, ज्याप्रमाणे दिवस चकवी असते. सीतेचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त असल्यामुळे तिला वन हे हजारो अयोध्यांसमान प्रिय वाटत होते. ॥ २ ॥
परनकुटी प्रिय प्रियतम संगा । प्रिय परिवारु कुरंग बिहंगा ॥
सासु ससुर सम मुनितिय मुनिबर । असनु अमिअ सम कंद मूल फर ॥
तिला प्रियतम श्रीरामांच्या सोबतीमुळे पर्णकुती आवडत होती. पशु-पक्षी हे प्रिय कुटुमबियांप्रमाणें वाटत होते. मुनींच्या पत्नी या सासूसारख्या, श्रेष्ठ मुनी हे सासर्‍यासारखे वाटत होते आणि कंद-मुळे व फळे यांचा आहार तिला अमृतासारखा आवडत होता. ॥ ३ ॥
नाथ साथ सॉंथरी सुहाई । मयन सयन सय सुखदाई ॥
लोकप होहिं बिलोकत जासू । तेहि कि मोहि सक बिषय बिलासू ॥
तिला स्वामीमसोबत सुंदर कुश-पानांची पथारी ही शेकडो कामदेवांच्या शय्येप्रमाणे सुखकारक वाटत होती. ज्यांच्या कृपाकटाक्षामुळे जीव हे लोकपाल बनतात, त्यांना भोग विलास कधी मोहित करु शकतील काय ? ॥ ४ ॥
दोहा--सुमिरत रामहि तजहिं जन सम बिषय बिलासु ।
रामप्रिया जग जननि सिय कछु न आचरजु तासु ॥ १४० ॥
ज्या श्रीरामचंद्रांचे फक्त स्मरण केल्यामुळे भक्तजन सर्व भोग-विलास कस्पटासमान फेकून देतात, त्या श्रीरामांची प्रिय पत्नी आणि जगाची माता सीता हिच्यासाठी हा भोग-विलासाचा त्याग ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. ॥ १४० ॥
सीय लखन जेहि बिधि सुखु लहहिं । सोइ रघुनाथ करहिं सोइ कहहीं ॥
कहहिं पुरातन कथा कहानी । सुनहिं लखन सिय अति सुखु मानी ॥
सीता व लक्ष्मण यांना सुख मिळावे, म्हणून श्रीरघुनाथ तशाच प्रकारच्या गोष्टी करीत होते. ते त्यांना प्राचीन कथा व गोष्टी सांगत आणि सीता व लक्ष्मण त्या आनंदाने ऐकत. ॥ १ ॥
जब जब रामु अवध सुधि करहीं । तब तब बारि बिलोचन भरहीं ॥
सुमिरि मातु पितु परिजन भाईं । भरत सनेहु सीलु सेवकाई ॥
जेव्हा जेव्हा श्रीरामांना अयोध्येची आठवण येई, तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटत. माता-पिता, कुटुंबीय, बंधू व भरताचे प्रेम, शील आणि सेवाभाव आठवून, ॥ २ ॥
कृपासिंधु प्रभु होहिं दुखारी । धीरजु धरहिं कुसमउ बिचारी ॥
लखि सीय लखनु बिकल होइ जाहीं । जिमि पुरुषहि अनुसर परिछाहीं ॥
कृपासागर श्रीरामचंद्र दुःखी होत, परंतु सद्य वेळ वाईट आहे, असे समजून धीर धरत. श्रीरामांना दुःखी झालेले पाहून सीता व लक्ष्मण हे सुद्धा व्याकूळ होऊन जात. ज्याप्रमाणे मनुष्याचे प्रतिबिंब मनुष्यासारखेच वागते, त्याप्रमाणे, ॥ ३ ॥
प्रिय बंधु गति लखि रघुनंदनु । धीर कृपाल भगत उर चंदनु ॥
लगे कहन कछु कथा पुनीता । सुनि सुखु लहहिं लखनु अरु सीता ॥
मग धीर, कृपाळू आणि भक्तांचे हृदय शांत करण्यासाठी चंदनरुप बनून रघुकुलाला आनंदित करणारे श्रीराम हे प्रिय पत्नी, बंधू लक्ष्मण यांची दशा पाहून काही पवित्र कथा सांगू लागत. त्या ऐकल्याने लक्ष्मण व सीता सुखी होत. ॥ ४ ॥
दोहा--रामु लखन सीता सहित सोहत परन निकेत ।
जिमि बासव बस अमरपुर सची जयंत समेत ॥ १४१ ॥
अमरावतीत इंद्र हे शची व पुत्र जयंतासह राहातात, त्याप्रमाणे लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम पर्णकुटीत शोभून दिसत होते. ॥ १४१ ॥
जोगवहिं प्रभु सिय लखनहि कैसें । पलक बिलोचन गोलक जैसें ॥
सेवहिं लखनु सीय रघुबीरहि । जिमि अबिबेकी पुरुष सरीरहि ॥
ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे प्रभू श्रीराम हे सीता व लक्ष्मण यांची काळजी घेत. तर लक्ष्मण हा सीता व रामचंद्र यांची अशी सेवा करी की, ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य शरीराची सेवा करीत असतो. ॥ १ ॥
एहि बिधि प्रभु बन बसहिं सुखारी । खग मृग सुर तापस हितकारी ॥
कहेउँ राम बन गवनु सुहावा । सुनहु सुमंत्र अवध जिमि आवा ॥
पक्षी, पशू, देवता व तपस्वी यांचे हितकारी असलेले प्रभू अशा प्रकारे सुखाने वनात निवास करीत होते. ( तुलसीदास म्हणतात, ) मी श्रीरामांचे झालेले सुंदर वनगमन सांगितले. आता सुमंत्र अयोध्येमध्ये आला, ती कथा ऐका. ॥ २ ॥
फिरेउ निषादु प्रभुहि पहुँचाई । सचिव सहित रथ देखेसि आई ॥
मंत्री बिकल बिलोकि निषादू । कहि न जाइ जस भयउ बिषादू ॥
प्रभू श्रीरामांना पोहोचवून जेव्हा निषादराजा गुह परतला, तेव्हा आल्यावर त्याला सुमंत्र रथ घेऊन उभा असल्याचे दिसले. मंत्री व्याकूळ झाल्याचे पाहून निषादाला इतके दुःख झाले की, काही सांगता येत नाही. ॥ ३ ॥
राम राम सिय लखन पुकारी । परेउ धरनितल ब्याकुल भारी ॥
देखि दखिन दिसि हय हिहिनाहीं । जनु बिनु पंख बिहग अकुलाहीं ॥
निषाद एकटाच परत आल्याचे पाहून सुमंत्र ' हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा ' असे पुकारत फार व्याकूळ होऊन जमिनीवर पडला. रथाचे घोडे दक्षिण दिशेकडे पाहात खिंकाळत होते. पंख नसलेले पक्षी व्याकूळ होतात, त्याप्रमाणे तेसुद्धा व्याकुळ होते. ॥ ४ ॥
दोहा--नहिं तृन चरहिं न पिअहिं जलु मोचहिं लोचन बारि ।
ब्याकुल भए निषाद सब रघुबर बाजि निहारि ॥ १४२ ॥
ते गवत खात नव्हते, पाणी पीत नव्हते, त्यांच्या डोळ्यांतून फक्त पाणी वाहात होते. श्रीरामांच्या घोड्यांची दशा पाहून सर्व निषाद व्याकूळ झाले. ॥ १४२ ॥
धरि धीरजु तब कहइ निषादू । अब सुमंत्र परिहरहु बिषादू ॥
तुम्ह पंडित परमारथ ग्याता । धरहु धीर लखि बिमुख बिधाता ॥
तेव्हा धीर धरुन निषादराज म्हणू लागला, ' हे सुमंत्र, आता खेद सोडून द्या. तुम्ही विद्वान व परमार्थ जाणणारे आहात. दैव प्रतिकूल आहे, असे समजून स्वतःला सावरा.' ॥ १ ॥
बिबिधि कथा कहि कहि मृदु बानी । रथ बैठारेउ बरबस आनी ॥
सोक सिथिल रथु सकइ न हॉंकी । रघुबर बिरह पीर उर बॉंकी ॥
गोड बोलून तर्‍हेतर्‍हेच्या कथा सांगून निषादाने सुमंत्राला बळेच रथात बसविले. परंतु शोकामुळे त्याच्यामध्ये रथ हाकण्याचे त्राणही उरले नव्हते. त्याच्या मनात श्रीरामांच्या विरहाची मोठी तीव्र वेदना होती. ॥ २ ॥
चरफाराहिं मग चलहिं न घोरे । बन मृग मनहुँ आनि रथ जोरे ॥
अढ़ुकि परहिं फिरि हेरहिं पीछें । राम बियोगि बिकल दुख तीछें ॥
घोडे तडफडत होते. आणि वाटेवर धड चालत नव्हते. असे वाटत होते की, जंगलातले पशू आणून रथाला जोडले असावेत. श्रीरामांच्या विरहामुळे घोडे कधी ठोकर खाऊन पडत होते. कधी वळून मागे पाहात होते. दुःखाने ते फार व्याकूळ झाले होते. ॥ ३ ॥
जो कह रामु लखनु बैदेही । हिंकरि हिंकरि हित हेरहिं तेही ॥
बाजि बिरह गति कहि किमि जाती । बिनु मनि फनिक बिकल जेहि भॉंती ॥
जर कुणी राम, लक्ष्मण किंवा सीता यांचे नाव घेतले तर त्याच्याकडे घोडे खिंकाळून प्रेमाने पाहात होते. घोड्यांची दशा काय वर्णावी ? ते मण्याविना व्याकूळ झालेल्या सापाप्रमाणे झाले होते. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 23 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २३

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 23 
Doha 131 To 136 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २३
दोहा १३१ ते १३६
दोहा—जाहि न चाहिअ कबहुँ कछु तुम्ह सन सहज सनेहु ।
बसहु निरंतर तासु मन सो राउर निज गेहु ॥ १३१ ॥
ज्याला कधीही काहीही नको असते आणि ज्याला तुमच्याविषयी स्वाभाविक प्रेम आहे, तुम्ही त्याच्या मनात निरंतर वास करा. ते तुमचे स्वतःचे घर होय. ‘ ॥ १३१ ॥
एहि बिधि मुनिबर भवन देखाए । बचन सप्रेम राम मन भाए ॥
कह मुनि सुनहु भानुकुलनायक । आश्रम कहउँ समय सुखदायक ॥
अशा प्रकारे मुनिश्रेष्ठ वाल्मीकींनी श्रीरामचंद्रांना घरे दाखविली. त्यांचे प्रेमपूर्ण शब्द ऐकून श्रीरामांच्या मनाला बरे वाटले. नंतर मुनी म्हणाले, ‘ हे सूर्यकुलाचे स्वामी, ऐका. आता मी या प्रसंगी तुम्हांला सुखदायक ठरणारा आश्रम सांगतो. ॥ १ ॥
चित्रकूट गिरि करहु निवासु । तहँ तुम्हार सब भॉंति सुपासू ॥
सैलु सुहावन कानन चारु । करि केहरि मृग बिहग बिहारु ॥
तुम्ही चित्रकूट पर्वतावर निवास करा. तेथे सर्व प्रकारच्या सोयी आहेत आणि सुंदर पर्वत व वन आहे. तो पर्वत हत्ती, सिंह, हरीण व पक्ष्यांचे विहार स्थल आहे. ॥ २ ॥
नदी पुनीत पुरान बखानी । अत्रिप्रिया निज तप बल आनी ॥
सुरसरि धार नाउँ मंदाकिनि । जो सब पातक पोतक डाकिनि ॥
जिची पुराणांमध्ये प्रशंसा केली आहे, ती पवित्र नदी तेथे आहे. अत्री ॠषींची पत्नी अनसूया हिने आपल्या तपोबलाने तिला आणले आहे. ती गंगेचीच धार असून तिला मंदाकिनी असे नाव आहे. ती सर्व पापरुपी बालकांना खाऊन टाकणार्‍या डाकिणी सारखी आहे. ॥ ३ ॥
अत्रि आदि मुनिबर बहु बसहीं । करहिं जोग जप तप तन कसहीं ॥
चलहु सफल श्रम सब कर करहू । राम देहु गौरव गिरिबरहू ॥
अत्री इत्यादी पुष्कळ श्रेष्ठ मुनी तेथे निवास करतात. ते योग, जप आणि तप यांच्याद्वारे आपले शरीर झिजवीत असतात. हे रामा, चला. त्या सर्वांचे परिश्रम सफल करा व पर्वतश्रेष्ठ चित्रकूट पर्वताला गोरव प्राप्त करुन द्या. ॥ ४ ॥
दोहा—चित्रकूट महिमा अमित कही महामुनि गाइ ।
आइ नहाए सरित बर सिय समेत दोउ भाइ ॥ १३२ ॥
महामुनी वाल्मिकींनी चित्रकूट पर्वताचा अपार महिमा वर्णन करुन सांगितला. तेव्हा सीतेसह दोघा भावांनी येऊन श्रेष्ठ नदी मंदाकिनीमध्ये स्नान केले. ॥ १३२ ॥
रघुबर कहेउ लखन भल घाटू । करहु कतहुँ अब ठाहर ठाटू ॥
लखन दीख पय उतर करारा । चहुँ दिसि फिरेउ धनुष जिमि नारा ॥
श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ लक्ष्मणा, फार चांगला घाट आहे. आता येथेच कुठेतरी राहाण्याची व्यवस्था कर. ‘ तेव्हा लक्ष्मणाने पयस्विनी नदीच्या उत्तरेकडील उंच किनारा पाहिला आणि म्हटले, ‘ याच्या चोहीकडे धनुष्यासारखा वळण घेतलेला ओढा आहे. ॥ १ ॥
नदी पनच सर सम दम दाना । सकल कलुष कलि साउज नाना ॥
चित्रकूट जनु अचल अहेरी । चुकइ न घात मार मुठभेरी ॥
मंदाकिनी नदी त्या धनुष्याची प्रत्यंचा आहे आणि शम, दम, दान हे बाण आहेत. कलियुगातील सर्व पापे ही अनेक हींस्र पशू आहेत. चित्रकूट हा जणू स्थिर शिकारी आहे. त्याचा नेम कधी चुकत नाही. तो समोरासमोर मारतो. ॥ २ ॥
अस कहि लखन ठाउँ देखरावा । थलु बिलोकि रघुबर सुखु पावा ॥
रमेउ राम मनु देवन्हु जाना । चले सहित सुर थपति प्रधाना ॥
असे म्हणून लक्ष्मणाने ते स्थान दाखविले. ते स्थान पाहून श्रीरामांना बरे वाटले. जेव्हा देवांना कळले की, येथे श्रीरामांचे मन रमले आहे, तेव्हा ते देवांचा मुख्य स्थापत्य विशारद विश्वकर्मा याला बरोबर घेऊन तेथे आले. ॥ ३ ॥
कोल किरात बेष सब आए । रचे परन तृन सदन सुहाए ॥
बरनि न जाहिं मंजु दुइ साला । एक ललित लघु एक बिसाला ॥
सर्व देव कोल व भिल्लांच्या रुपाने आले आणि त्यांनी दिव्य पानांनी व गवतांनी सुंदर घरे बनविली. दोन सुंदर कुटी बनविल्या. त्यांचे वर्णन करणे शक्य नाही. त्यांमध्ये एक फार सुंदर अशी कुटी होतीआणि दुसरी मोठी. ॥ ४ ॥
दोहा--लखन जानकी सहित प्रभु राजत रुचिर निकेत ।
सोह मदनु मुनि बेष जनु रितुराज समेत ॥ १३३ ॥
लक्ष्मण आणि जानकीसह प्रभू रामचंद्र सुंदर गवत-पानांच्या घरांमध्ये शोभून दिसत होते. जणू कामदेवच मुनीचा वेष धारण करुन पत्नी रती व वसंत ऋतूसह शोभत होता. ॥ १३३ ॥
मासपरारायण सतरावा विश्राम
अमर नाग किंनर दिसिपाला । चित्रकूट आए तेहि काला ॥
राम प्रनामु कीन्ह सब काहू । मुदित देव लहि लोचन लाहू ॥
त्यावेळी देव, नाग, किन्नर आणि दिक्पाल हे चित्रकूटावर आले आणि श्रीरामांनी त्यांना प्रणाम केला. डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे देव आनंदित झाले. ॥ १ ॥
बरषि सुमन कह देव समाजू । नाथ सनाथ भए हम आजू ॥
करि बिनती दुख दुसह सुनाए । हरषित निज निज सदन सिधाए ॥
फुले उधळीत देवांनी म्हटले, ' हे नाथ, आज तुमच्या दर्शनाने आम्ही सनाथ झालो. ' त्यानंतर त्यांनी आपली असह्य दुःखे सांगितली आणि दुःखाचा नाश करण्याचे आश्वासन श्रीरामांच्याकडून मिळवून आनंदाने ते आपापल्या स्थानी निघून गेले. ॥ २ ॥
चित्रकूट रघुनंदनु छाए । समाचार सुनि सुनि मुनि आए ॥
आवत देखि मुदित मुनिबृंदा । कीन्ह दंडवत रघुकुलचंदा ॥
श्रीरघुनाथ हे चित्रकूटावर राहात आहेत, ही वार्ता ऐकून पुष्कळसे मुनी आले. रघुकुलाचे चंद्र असलेल्या श्रीरामांनी आनंदित झालेल्या मुनि-मंडळींना येत असल्याचे पाहून दंडवत प्रणाम केला. ॥ ३ ॥
मुनि रघुबरहि लाइ उर लेहिं । सुफल होन हित आसिष देहीं ॥
सिय सौमित्रि राम छबि देखहिं । साधन सकल सफल करि लेखहिं ॥
मुनिगणांनी श्रीरामांना हृदयाशी धरले आणि यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. सीता, लक्ष्मण आणि श्रीराम यांचे लावण्य त्यांनी पाहिले व आपल्या सर्व साधनांचे साफल्य झाले, असे त्यांना वाटले. ॥ ४ ॥
दोहा--जथाजोग सनमानि प्रभु बिदा किए मुनिबृंद ।
करहिं जोग जप जाग तप निज आश्रमन्हि सुछंद ॥ १३४ ॥
प्रभू श्रीरामांनी मुनी मंडळींचा यथायोग्य सन्मान करुन त्यांना निरोप दिला. श्रीराम आल्यामुळे ते सर्व आपापल्या आश्रमांमध्ये आता निर्धास्तपणे योग, जप, यज्ञ व तप करु लागले. ॥ १३४ ॥            
यह सुधि कोल किरातन्ह पाई । हरषे जनु नव निधि घर आई ॥
कंद मूल फल भरि भरि दोना । चले रंक जनु लूटन सोना ॥
श्रीरामांच्या आगमनाची वार्ता जेव्हा कोल व भिल्ल या लोकांना मिळाली, तेव्हा ते असे आनंदित झाले की, जणू नव निधी त्यांच्या घरी आले.ते द्रोणांमध्ये कंद, मुळे व फळे भरभरुन घेऊन निघाले. जणू दरिद्री लोक सोने लुटायला निघाले होते. ॥ १ ॥
तिन्ह महँ जिन्ह देखे दोउ भ्राता । अपर तिन्हहि पूँछहिं मगु जाता ॥
कहत सुनत रघुबीर निकाई । आइ सबन्हि देखे रघुराई ॥
त्यांपैकी ज्यांनी दोघा भावांना पूर्वी पाहिले होते, त्यांना इतर लोक वाटेत जाताना त्यांच्याबद्दल विचारत होते. अशा प्रकारे श्रीरामांचे सौंदर्य सांगत-ऐकत सर्वांनी येऊन श्रीरामांचे दर्शन घेतले. ॥ २ ॥
करहिं जोहारु भेंट धरि आगे । प्रभुहि बिलोकहिं अति अनुरागे ॥
चित्र लिखे जनु जहँ तहँ ठाढ़े । पुलक सरीर नयन जल बाढ़े ॥
भेटी समोर ठेवून त्यांनी जोहार केला आणि अत्यंत प्रमाने ते प्रभूंना पाहात राहिले. ते मुग्ध होऊन चित्राप्रमाणे उभे होते. त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्रांतून प्रेमाश्रूंची धार लागली होती. ॥ ३ ॥
राम सनेह मगन सब जाने । कहि प्रिय बचन सकल सनमाने ॥
प्रभुहि जोहारि बहोरि बहोरी । बचन बिनीत कहहिं कर जोरी ॥
श्रीरामांनी त्यांना प्रेममग्न होतांना पाहून त्यांच्याशी गोड बोलत त्यांचा यथोचित सन्मान केला. ते वारंवार श्रीरामांना जोहार करीत हात जोडून म्हणाले, ॥ ४ ॥  
दोहा--अब हम नाथ सनाथ सब भए देखि प्रभु पाय ।
भाग हमारें आगमनु राउर कोसलराय ॥ १३५ ॥
हे प्रभू, तुमच्या चरणांचे दर्शन लाभल्यामुळे आता आम्ही सनाथ झालो. हे कोसलराज आमचे मोठे भाग्य म्हणून तुमचे शुभगमन येथे झाले. ॥ १३५ ॥
धन्य भूमि बन पंथ पहारा । जहँ जहँ नाथ पाउ तुम्ह धारा ॥
धन्य बिहग मृग काननचारी । सफल जनम भए तुम्हहि निहारी ॥
हे नाथ तुमचे चरण जेथे पडले, ते पृथ्वी, वन, मार्ग आणि पर्वत धन्य होत. तुम्हांला पाहून ज्यांचा जन्म सफल झाला, ते वनात फितणारे पक्षी व पशू धन्य होत. ॥ १ ॥
हम सब धन्य सहित परिवारा । दीख दरसु भरि नयन तुम्हारा ॥
कीन्ह बासु भल ठाउँ बिचारी । इहॉं सकल रितु रहब सुखारी ॥
डोळे भरुन तुमचे दर्शन घेणारे आम्ही सर्व आपल्या परिवारासह धन्य झालो आहोत. तुम्ही विचारपूर्वक मोठ्या चांगल्या ठिकाणी निवास केला आहे. येथे सर्व ऋतूंमध्ये तुम्ही सुखाने राहाल. ॥ २ ॥
हम सब भॉंति करब सेवकाई । करि केहरि अहि बाघ बराई ॥
बन बेहड़ गिरि कंदर खोहा । सब हमार प्रभु पग पग जोहा ॥
आम्ही सर्वप्रकारे हत्ती, सिंह, सर्प व वाघ यांच्यापासून रक्षण करुन सेवा करु. हे प्रभो, येथील घनदाट वने, पर्वत, गुहा आणि दर्‍या यांची आम्हांला खडान् खडा माहिती आहे. ॥ ३ ॥
तहँ तहँ तुम्हहि अहेर खेलाउब । सर निरझर जलठाउँ देखाउब ॥
हम सेवक परिवार समेता । नाथ न सकुचब आयसु देता ॥
आम्ही त्या स्थानी तुम्हांला शिकार खेळवू आणि तलाव, झरे आणि जलाशय दाखवू, आम्ही आमच्या कुटुंबासह तुमचे सेवक आहोत. म्हणून हे नाथ, आम्हांला आज्ञा देण्यांत संकोच करु नका. ' ॥ ४ ॥
दोहा--बेद बचन मुनि मन अगम ते प्रभु करुना ऐन ।
बचन किरातन्ह के सुनत जिमि पितु बालक बैन ॥ १३६ ॥
जे वेदांच्या वचनांना व मुनींच्या मनाला अगम्य आहेत, ते करुणाधाम श्रीराम भिल्लांचे बोलणे ऐकत होते, ज्याप्रमाणे पिता आपल्या बालकांचे वचन कौतुकाने ऐकतो. ॥ १३६ ॥
रामहि केवल प्रेमु पिआरा । जानि लेउ जो जाननिहारा ॥
राम सकल बनचर तब तोषे । कहि मृदु बचन प्रेम परिपोषे ॥
श्रीरामचंद्र फक्त प्रेमाचे भुकेले आहेत. ज्याला जाणायचे असेल त्याने जाणून घ्यावे. मग श्रीरामचंद्रांनी प्रेमपूर्ण मृदू वचन बोलून त्या वनात वावरणार्‍या सर्व लोकांना संतुष्ट केले. ॥ १ ॥
बिदा किए सिर नाइ सिधाए । प्रभु गुन कहत सुनत घर आए ॥
एहि बिधि सिय समेत दोउ भाई । बसहिं बिपिन सुर मुनि सुखदाई ॥
नंतर त्यांना निरोप दिला. ते सर्व मस्तक नमवून निघाले आणि प्रभूंचे गुण सांगत-ऐकत घरी आले. अशा प्रकारे देव व मुनी यांना सुख देणारे दोघे बंधू सीतेसह वनात निवास करु लागले ॥ २ ॥
जब तें आइ रहे रघुनायकु । तब तें भयउ बनु मंगलदायकु ॥
फूलहिं फलहिं बिटप बिधि नाना । मंजु बलित बर बेलि बिताना ॥
श्रीरघुनाथ वनात येऊन राहिले, तेव्हापासून वन मंगलदायक झाले. अनेक प्रकारचे वृक्ष फुलत होते व फळत होते. त्यांना बिलगलेल्या वेलींचे मंडप तयार झाले होते. ॥ ३ ॥
सुरतरु सरिस सुभायँ सुहाए । मनहुँ बिबुध बन परिहरि आए ॥
गुंज मंजुतर मधुकर श्रेनी । त्रिबिध बयारि बहइ सुख देनी ॥
ते कल्पवृक्षाप्रमाणे स्वाभाविकपणे सुंदर होते, जणू ते देवांचे नंदनवन सोडून तेथे आले होते. भ्रमरांच्या पंक्ती फारच सुरेख गुंजारव करीत होत्या. आणि तेथे सुखदायक शीतल, मंद, सुगंधित हवा वाहात होती. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 22 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २२

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 22 
Doha 125 and 130 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २२ 
दोहा १२५ आणि १३०

दोहा—तात बचन पुनि मातु हित भाइ  भरत अस राउ ।

मो कहुँ दरस तुमहार प्रभु सबु मम पुन्य प्रभाउ ॥ १२५ ॥

आणि म्हटले, ‘ हे प्रभो, पित्याच्या आज्ञेचे पालन, मातेचे हित आणि भरतासारख्या प्रेमळ व धर्मात्मा भावाने राजा होणे आणि तुमचे दर्शन घडणे या सर्व गोष्टी माझ्या पुण्याच्या प्रभावामुळे घडल्या आहेत. ॥ १२५ ॥

देखि पाय मुनिराय तुम्हारे । भए सुकृत सब सुफल हमारे ॥

अब जहँ राउर आयसु होई । मुनि उदबेगु न पावै कोई ॥

हे मुनिराज, तुमच्या चरणांचे दर्शन झाल्याने आज आमचे सर्व पुण्य सफल झाले. आता आपण जेथे कोणत्याही मुनीला त्रास होणार नाही, ॥ १ ॥

मुनि तापस जिन्ह तें दुखु लहहीं । ते नरेस बिनु पावक दहहीं ॥

मंगल मूल बिप्र परितोषू । दहइ कोटि कुल भूसुर रोषू ॥

कारण ज्यांच्यामुळे मुनी व तपस्वी यांना त्रास होतो, ते राजे अग्नीशिवायच आपल्या दुष्ट कर्मामुळे जळून भस्म होतात. ब्राह्मणांचा संतोष हा सर्व मांगल्याचे मूळ आहे आणि ब्राह्मणांचा क्रोध कोट्यावधी कुलांना भस्म करुन टाकतो. ॥ २ ॥

अस जियँ जानि कहिअ सोइ ठाऊँ । सिय सौमित्रि सहित जहँ जाऊँ ॥

तहँ रचि रुचिर परन तृन साला । बास करौं कछु काल कृपाला ॥

असा विचार करुन असे स्थान सांगा की, मी, लक्ष्मण व सीता यांचेसह तेथे राहू शकेन. तेथे सुंदर पाने व गवताची कुटी बनवून हे दयाळू ! काही दिवस आम्ही तेथे राहू शकू.’ ॥ ३ ॥

सहज सरल सुनि रघुबर बानी । साधु साधु बोले मुनि ग्यानी ॥

कस न कहहु अस रघुकुलकेतू । तुम्ह पालक संतत श्रुति सेतू ॥

श्रीरामांची सहज सरळ वाणी ऐकून ज्ञानी मुनी वाल्मीकी म्हणाले, ‘ धन्य, धन्य, हे रघुकुलाचे ध्वजस्वरुप, तुम्ही असे का बरे म्हणणार नाही ? तुम्ही सदैव वेदांच्या मर्यादेचे पालन करता. ॥ ४ ॥

छं०—श्रुति सेतु पालक राम तुम्ह जगदीस माया जानकी ।

जो सृजति जगु पालति हरति रुख पाइ कृपानिधान की ॥

जो सहससीसु अहीसु महिधरु लखनु सचराचर धनी ।

सुर काज धरि नरराज तनु चले दलन खल निसिचर अनी ॥

हे राम, तुम्ही वेदांच्या मरयादेचे रक्षक असणारे जगदीश्वर आहात व तुमची स्वरुपभूत माया सीता आहे. जी कृपेचे भांडार असलेली सीतादेवी तुमचा कल पाहून जगाचे सृजन, पालन व संहार करते. जो हजार मस्तकांचा सर्पांचा स्वामी आणि शिरावर पृथ्वीला धारण करणारा आहे, तोच चराचराचा स्वामी शेष, हा लक्ष्मण आहे, देवांचे कार्य करण्यासाठी राजाचे शरीर धारण करुन दुष्ट राक्षसांच्या सेनेचा नाश करण्यासाठी तुम्ही निघाला आहात.

सो०—राम सरुप तुम्हार बचन अगोचर बुद्धिपर ।

अबिगत अकथ अपार नेति नेति नित निगम कहु ॥ १२६ ॥

हे राम, तुमचे स्वरुप वाणीला अगोचर , बुद्धीच्या पलीकडे, अव्यक्त, अकथनीय आणि अपार आहे. वेद नित्य ‘ नेति नेति ‘ म्हणून त्याचे वर्णन करतात. ॥ १२६ ॥ 

जगु पेखन तुम्ह देखनिहारे । बिधि हरि संभु नचावनिहारे ॥

तेउ न जानहिं मरमु तुम्हारा । औरु तुम्हहि को जाननिहारा ॥

हे राम, जगत हे दृश्य आहे आणि तुम्ही त्याचे द्रष्टे आहात. तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांनाही नाचविणारे आहात. ते सुद्धा तुमचे रहस्य जाणत नाहीत. तर दुसरा कोण तुम्हांला जाणणारा आहे ? ॥ १ ॥

सोइ जानइ जेहि देहु जनाई । जानत तुम्हहि तुम्हइ  होइ जाई ॥

तुम्हरिहि कृपॉं तुम्हहि रघुनंदन । जानहिं भगत भगत उर चंदन ॥

तोच तुम्हांला जाणतो की, ज्याला तुम्ही जाणवून देता आणि जाणताच तो तुमचे स्वरुप बनून जातो. हे रघुनंदन, हे भक्तांचे हृदय शीतल करणार्‍या चंदना, तुमच्या कृपेमुळेच भक्त तुम्हांला जाणू शकतात. ॥ २ ॥

चिदानंदमय देह तुम्हारी । बिगत बिकार जान अधिकारी ॥

नर तनु धरेहु संत सुर काजा । कहहु करहु जस प्राकृत राजा ॥

तुमचा देह चिदानंदमय आहे, तो प्रकृतिजन्य पंचमहाभूतांनी बनलेला व कर्मबंधनयुक्त त्रिदेहविशिष्ट मायिक नव्हे. शिवाय तो उत्पत्ति-नाश, वृद्धि-क्षय इत्यादी सर्व विकारांनी रहित आहे. हे रहस्य अधिकारी पुरुषच जाणतात. तुम्ही देव आणि संतांच्या कार्यासाठी दिव्य नर-शरीर धातण केले आहे आणि प्राकृत राजांप्रमाणे बोलत व वागत आहात. ॥ ३ ॥

राम देखि सुनि चरित तुम्हारे । जड़ मोहहिं बुध होहिं सुखारे ॥

तुम्ह जो कहहु करहु सबु सॉंचा । जस काछिअ तस चाहिअ नाचा ॥

हे राम, तुमचे चरित्र पाहून व ऐकून मूर्ख लोकांना मोह पडतो व ज्ञानीजन सुखी होतात. तुम्ही जे बोलता व करता , ते सर्व सत्यच असते. कारण जसे सोंग घ्यावे, तसेच नाचायलाही हवे ना ! ॥ ४ ॥

दोहा—पूँछेहु मोहि कि रहौं कहँ मैं पूँछत सकुचाउँ ।

जहँ न होहु तहँ देहु कहि तुम्हहि देखावौं ठाउँ ॥ १२७ ॥

तुम्ही मला विचारले की, ‘ मी कुठे राहू ?’ परंतु मला हे विचारतांना संकोच वाटतो की, जिथे तुम्ही नाही आहात, ते स्थान तरी सांगा. मग मी तुम्हांला राहणयासाठी स्थान दाखवितो. ‘ ॥ १२७ ॥

सुनि मुनि बचन प्रेम रस साने । सकुचि राम मन महुँ मुसुकाने ॥

बालमीकि हँसि कहहिं बहोरी । बानी मधुर अमिअ रस बोरी ॥

मुनींचे हे प्रेमरसाने भरलेले शब्द ऐकून श्रीरामांनी रहस्य उघड होईल, म्हणून संकोचाने स्मितहास्य केले. वाल्मीकी हसून अमृतेसाने ओथंबलेल्या मधुर वाणीने म्हणाले, ॥ १ ॥

सुनहु राम अब कहउँ निकेता । जहॉं बसहु सय लखन समेता ॥

जिन्ह के श्रवन समुद्र समाना । कथा तुम्हारि सुभग सरि नाना ॥

हे प्रभो ! ऐका. आता मी सांगतो, तेथे तुम्ही सीता व लक्ष्मण यांच्यासह निवास करा. ज्यांचे समुद्राप्रमाणे कान तुमच्या सुंदर कथारुपी अनेक सुंदर नद्यांनी--॥ २ ॥

भरहिं निरंतर होहिं न पूरे । तिन्ह के हिय तुम्ह कहुँ गृह रूरे ॥

लोचन चातक जिन्ह करि राखे । रहहिं दरस जलधर अभिलाषे ॥

निरंतर भरत असतात, तरीही पूर्णपणे तृप्त होत नाहीत, ज्यांची हृदये ही सुंदर घरेआहेत आणि ज्यांनी आपले नेत्र चातक बनविले आहेत; जे तुमच्या दर्शनरुपी मेघासाठी सदा आसुसलेले असतात. ॥ ३ ॥

निदरहिं सरित सिंधु सर भारी । रूप बिंदु जल होहिं सुखारी ॥

तिन्ह कें हृदय सदन सुखदायक । बसहु बंधु सिय सह रघुनायक ॥

तसेच जे मोठमोठ्या नद्या, समुद्र, सरोवर यांना तुच्छ मानून तुमच्या सौंदर्यरुपी मेघाच्या एका थेंबाने सुखी होतात, हे रघुनाथ, त्या लोकांच्या हृदयरुपी सुखदायक भवनांमध्ये तुम्ही, लक्ष्मण व सीतेसह निवास करा. ॥ ४ ॥

दोहा—जसु तुम्हार मानस बिमल हंसिनि जीहा जासु ।

मुकताहल गुन गन चुनइ राम बसहु हियँ तासु ॥ १२८ ॥

तुमच्या कीर्तिरुपी निर्मल मानस सरोवरामध्ये ज्याची जीभ ही हंसी बनून तुमच्या गुणसमूरुपी मोत्यांचे सेवन करते, हे राम, तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. ॥ १२८ ॥

प्रभु प्रसाद सुचि सुभग सुबासा । सादर जासु लहइ नित नासा ॥

तुम्हहि निबेदित भोजन करहीं । प्रभु प्रसाद पट भूषन धरहीं ॥

ज्यांची नासिका हे प्रभू ! तुमच्या पवित्र व सुगंधित पुष्पादी सुंदर प्रसाद नित्य आदराने ग्रहण करते आणि जे तुम्हांला अर्पण करुन भोजन करतात, तसेच तुमचा प्रसाद समजुन वस्त्राभूषणे धारण करतात. ॥ १ ॥

सीस नवहिं सुर गुरु द्विज देखी । प्रीति सहित करि बिनय बिसेषी ॥

कर नित करहिं राम पद पूजा । राम भरोस हृदयँ नहिं दूजा ॥

ज्यांचे मस्तक देव, गुरु आणि ब्राह्मण यांना पाहून नम्रतेने व प्रेमाने वाकले, ज्यांचे हात नित्य हे श्रीराम, तुमच्या चरणांची पूजा करतात आणि ज्यांच्या हृदयात हे श्रीराम, तुमचाच भरवसा आहे, दुसरा नाही. ॥ २ ॥

चरन राम तीरथ चलि जाहीं । राम बसहु तिन्ह के मन माहीं ॥

मंत्रराजु नित जपहिं तुम्हारा । पूजहिं तुम्हहि सहित परिवारा ॥

तसेच ज्यांचे चरण श्रीराम, तुमच्या तीर्थांकडे ओढले जातात, हे राम, तुम्ही त्यांच्या मनामध्ये निवास करा. जे नित्य तुमचा मंत्रराज जपतात आणि परिवारासह तुमची पूजा करतात. ॥ ३ ॥

तरपन होम करहिं बिधि नाना । बिप्र जेवॉंइ देहिं बहु दाना ॥

तुम्ह तें अधिक गुरहि जियँ जानी । सकल भाएँ सेवहिं सनमानी ॥

ते अनेक प्रकारचे तर्पण व हवन करतात आणि ब्राह्मणांना भोजन घालून पुष्कळ दानें देतात. तसेच जे गुरुंना मनात तुमच्याहून अधिक मोठा मानून सर्वभावाने सन्मान करुन त्यांची सेवा करतात. ॥ ४ ॥

दोहा—सबु करि मागहिं एक फलु राम चरन रति होउ ।

तिन्ह कें मन मंदिर बसहु सिय रघुनंदन दोउ ॥ १२९ ॥

आणि ही सर्व कर्मे करुन या सर्वांचे फल म्हणून हेच मागतात की, श्रीरामांच्या चरणी आमचे प्रेम राहो. त्या लोकांच्या मन-मंदिरांत सीता व रघुकुलाला आनंदित करणारे तुम्ही दोघे निवास करा. ॥ १२९ ॥

काम कोह मद मान न मोहा । लोभ न छोभ न राग न द्रोहा ॥

जिन्ह कें कपट दंभ नहिं माया । तिन्ह कें हृदय बसहु रघुराया ॥

ज्यांना काम, क्रोध, मद, अभिमान आणि मोह नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, प्रीति-द्वेष नाही आणि कपट, दंभ व मायाही नाही, हे रघुराज, तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा.

सब के प्रिय सब के हितकारी । दुख सुख सरिस प्रसंसा गारी ॥

कहहिं सत्य प्रिय बचन बिचारी । जागत सोवन सरन तुम्हारी ॥

जे सर्वांचे प्रिय आहेत आणि सर्वांचे हित करणारे आहेत, ज्यांना दुःख, सुख व प्रशंसा आणि निंदा हे सर्व समान वाटते, जे विचारपूर्वक सत्य व प्रिय बोलतात आणि जे जागेपणी व झोपेत तुम्हांलाच शरण आलेले असतात, ॥ २ ॥

तुम्हहि छाड़ि गति दूसरि नाहीं । राम बसहु तिन्ह के मन माहीं ॥

जननी सम जानहिं परनारी । धनु पराव बिष तें बिष भारी ॥

तुम्हांला सोडून ज्यांना दुसरा कोणताही आश्रय नाही, हे रामा, तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. जे परस्त्रीला मातेसमान मानतात आणि परक्याचे धन ज्यांना विषापेक्षाही भयंकर विष वाटते, ॥ ३ ॥

जे हरषहिं पर संपति देखी । दुखित होहिं पर बिपति बिसेषी ॥

जिन्हहि राम तुम्ह प्रानपिआरे । तिन्ह के मन सुभ सदन तुम्हारे ॥

ज्यांना दुसर्‍याची संपत्ती पाहून आनंद वाटतो आणि दुसर्‍याची विपत्ती पाहून ज्यांना विशेष करुन दुःख होते आणि हे राम, ज्यांना तुम्ही प्राणासमान प्रिय आहात, त्यांचे मन तुम्हांला राहण्याजोगे पवित्र भवन आहे. ॥ ४ ॥

दोहा—स्वामि सखा पितु मातु गुर जिन्ह के सब तुम्ह तात ।

मन मंदिर तिन्ह कें बसहु सीय सहित दोउ भ्रात ॥ १३० ॥

हे तात, ज्यांचे स्वामी, सखा, पिता, माता आणि गुरु तुम्हीच आहात, त्यांच्या मनरुपी मंदिरात सीतेसह तुम्ही दोघे बंधू निवास करा. ॥ १३० ॥

अवगुन तजि सब के गुन गहहीं । बिप्र धेनु हित संकट सहहीं ॥

नीति निपुन जिन्ह कइ जग लीका । घर तुम्हार तिन्ह कर मनु नीका ॥

जे लोक अवगुण सोडून सर्वांचे गुण ग्रहण करतात, ब्राह्मण आणि गाय यांच्यासाठी संकटे सोसतात, नीतिनैपुण्याबद्दल जे जगात प्रमाण मानले जातात, त्यांचे सुंदर मन तुमचे घर होय. ॥ १ ॥

गुन तुम्हार समुझइ निज दोसा । जेहि सब भॉंति तुम्हार भरोसा ॥

राम भगत प्रिय लागहिं जेही । तेहि उर बसहु सहित बैदेही ॥

जो गुण हे तुमचे आणि अवगुण हे आपले, असे समजतो, ज्याला सर्व प्रकारे तुमचाच आधार वाटतो आणि रामभक्त ज्याला प्रिय आहेत, त्याच्या हृदयांत तुम्ही सीतेसह निवास करा. ॥ २ ॥

जाति पॉंति धनु धरमु बड़ाई । प्रिय परिवार सदन सुखदाई ॥

सब तजि तुम्हहि रहइ उर लाई । तेहि के हृदयँ रहहु रघुराई ॥

जात-पात, धन, धर्म, मोठेपणा, आवडता परिवार आणि सुख देणारे घर हे सर्व सोडून जो तुम्हांला हृदयात धारण करतो, हे रघुनाथ, तुम्ही त्याच्या हृदयात राहा. ॥ ३ ॥

सरगु नरकु अपबरगु समाना । जहँ तहँ देख धरें धनु बाना ॥

करम बचन मन राउर चेरा । राम करहु तेहि कें उर डेरा ॥

ज्याच्या दृष्टीने स्वर्ग, नरक व मोक्ष हे समान आहेत;

 कारण ज्याला जिकडे-तिकडे धनुष्यबाण धारण केलेले

 तुम्हीच दिसता आणि जो कर्म, वचन व मन यांच्याद्वारे

 सर्वस्वी तुमचा दास आहे, हे राम, तुम्ही त्याच्या हृदयात

 वास करा. ॥ ४ ॥



Custom Search