Monday, April 22, 2013

Shree Annapurna Stotram श्रीअन्नपूर्णास्तोत्रम्Shree Annapurna Stotram 

Shree Annapurna Stotram is in Sanskrit. It is a very beautiful creation of Param Poojya Vasudevanand Saraswati. He has written more than 400 Stotras in Sanskrit. He had said that these Stotras are got written by him by the God or Goddesses. While writing any stotra the beautiful words appear in front of his eyes and then he just writes these words. This is a God’s gift. He was a great devotee of God Dattatreya. O Devi! Mate Ambike! You are beautiful. You make us prosperous. Endri and other Goddesses are representing your small amsha (degree). These are because of you. You, along with other goddesses make us fearless. Please protect the devotees who pray you with “Hrim” bij mantra. O mother you are our only caretaker. We bow you. You are always present. All devotees pray you with bij mantra “Shrim”. You are also present in “Clim” bij. O Swamini of God Shiva please make our heart as your bode. You are always alert for protecting your devotees. Shesha Nag who is having thousand mouths was not able to describe your all virtues; you protect us in our difficulties. You give us moksha. There is nobody who can praise you. O Adimaye! Gods always bow to your feet. O Aperne! You look at us and immediately our false knowledge vanishes and we receive the true knowledge. It is like the rising Sun destroying blackness by spreading the light. O Vardayini (giver of blessings)! God Shiva likes you very much. Devotees become sinless immediately when you see them. O Mother! Devotees become free from bondage of death and life as such there is no rebirth for them. O mother! You are remover of our worries and obstacles from our life. You are beyond the minds of Gods. It means that even Gods can’t think about your greatness by their mind. Then how O ShankarPranPriye! I, who had a very less knowledge, can praise your greatness. O Tejswini mate! You are praised by Vedas. You take me as a dog standing at your door steps. I am a victim of good and bad thoughts which make me suspicious and deceived me. O mother! I being a child when rest in your laps receives everything desired. O mother you give the knowledge of “Oneness (with you)” (adwaita) and remove the false knowledge of “you and me” (dwait). O Mother! Who can protest us other than you? O mother! You are the goddess of letters and words. You give knowledge to your devotees. You make them free from greed. You make them happy. Please bless me with your darshan in my meditation. O Mother! Gods also come to you when they are troubled by their greed and bad desires. Then they become happy by your blessings. O Mother! Make me free from greed and other bad desires. O Mother! You are always happy and you have a tremendous power. You are BrahmaSwarupini. You are an ocean of kindness. You are tejswini and sidhirupini. You are Goddess Laxmi. However we praise you it is always less. O protector and care taker of all of us! You are really a mother of all of us. You shower me by blessings. You bless me forever. There is no need to tell you that mother always protects her child. O holy mother! Even though this child of you is mad, slow, restless, cunning and make not liked by you but approached you with some expectations’, do not neglect him. It is not good to neglect your child. O mother! Devotee may not ask anything from you out of fear in his mind. But you know what he want, please bless him and fulfill his desires. Also he hungry to receive true knowledge hence remove his false knowledge by your blessings.


श्रीअन्नपूर्णास्तोत्रम् 
श्रीदेवि र्शनीयेऽशा द्याद्या अंबिके तव । 
व्ये दत्ताभये ताभिर् र्‍हीं बीजेन तानव ॥ १ ॥ 
त्ये मात्रे नमस्तेऽस्तु श्रीगाये पूर्णसंविदे । 
स मे योगिनि स्वांते क्लींमयेऽर्णेश्र्वरेश्र्वरि ॥ २ ॥ 
क्षे सस्त्रवक्त्रस्ते वेत्ति कलान्गुणान् । 
देत् कोरिःष्टदे सर्वान् मोक्षसंदात्रि ते गुणान् ॥ ३ ॥ 
धूताद्ये कृपया पाहि गवत् पूज्य पादुके । 
मः पूष्ण इवाविद्या तापर्णे तवेक्षणात् ॥ ४ ॥ 
तिता ध्दृतास्ते हि रदे शंकरप्रिये । 
याजन्महराचेत्ते तिष्ठेद्धि थमावृतिः ॥ ५ ॥ 
स्ते चित्तार्तिहे वेत्ता मान्येऽमऽ मनोतिगे । 
म ज्ञानं कियत्प्राज्ञि हे शंभुप्राणवल्लभे ॥ ६ ॥ 
सद्वेनुते द्वास्थश्र्ववद्गय मामुमे । 
भ्रमप्रदार्थवादाऽयेरिप्राया ञ्चितोस्मि तेः ॥ ७ ॥ 
 मर्त्योर्भो इहांबाया अंके संल्लभतेर्थितम् । 
क्षिता कः च मे ह्यार्ये तेर्भो भेद दर्शिनि ॥ ८ ॥ 
वासना मुक्तिकृद्देवि पूर्णविज्ञानदायिनि । 
सुखदे नित्यमांगल्येऽर्णेशे ध्यामुपाविश ॥ ९ ॥ 
देवा अर्दितशांत्यर्थलं तेवैत्वदीरिताः । 
वासनागंधो मे मास्तु मानादेरार्तिदोत्र यः ॥ १० ॥ 
नंदिनी लिनी ब्राह्मी भिक्षाभाग्यविवर्धिनी । 
याब्धिरोजस्विनीड्या क्ष्मीस्त्वं सिद्धिरुपिणी ॥ ११ ॥ 
त्येऽस्यंऽबा कृपांभोभिषिञ्चात्रघ्यधिपालके । 
क्ष्यो बालः स्वको मात्रा त्वतोर्थ ब्रवीमि ते ॥ १२ ॥ 
स्वल्पज्ञोऽपि शठोऽदांतो मंदो वाभिमतोऽपि वा । 
तीव्रमाशापरो वायं चोपेक्षां शिवेर्हति ॥ १३ ॥ 
भिया नचोक्तवांन्शब्दान्देवेड्ये देहि कांक्षितम् । 
क्षुच्छांत्यै ज्ञानभिक्षात्रं हितज्ञे हि तमर्पय ॥ १४ ॥ 
कृपयाऽस्तमितया देहि ते रणे रतिम् । 
पोदे सादरं याचे हितं मे पारदे कुरु ॥ १५ ॥ 
स्तवे तेह्यशक्तं मां स्वान्ते शर्वप्रिये स्मर । 
र्ये वरः स एवार्थो हार्दज्ञेऽतिथिवल्लभे ॥ १६ ॥ 
इति प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम् ॥ 

अन्नपूर्णास्तोत्र मराठी अर्थः 
हे अन्नपूर्णास्तोत्र प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) यांनी रचिलेले आहे. प्रतिभा आणि विद्वता यांचा अभूतपूर्व आविष्कार या स्तोत्रांत दिसून येतो. श्री स्वामी म्हणत असत की मला शब्द समोर दिसतात आणि ते शब्द मी जसेच्या तसे उतरवून काढतो. 
 अर्थः १) हे देवी अंबिकामाते, तू अत्यंत दर्शनीय, सौंदर्यवान आहेस. तू समृद्धीदात्री आहेस. ऐंद्री आदि देवता म्हणजे तुझेच अंश आहेत. त्या सर्व अंशमय देवतांसह तू आम्हाला अभयदान देतेस. 'र्‍हीं ' या बीजमंत्राने तुला नमन करणार्‍या, तुझी स्तुति करणार्‍या भक्तांचे तू संरक्षण कर. 
२) हे माते, तूच आमचे शेवटचे आश्रयस्थान आहेस. तुला आमचे प्रणाम असोत. हे योगिनी तू अखंड चैत्यरुपिणी आहेस. सर्व जण तुझी 'श्रीं' या बीजमंत्राने स्तुति करतात. तू 'क्लीं' बीजमय आहेस. हे महेश्र्वरस्वामिनी तू आमच्या अंत:करणांत येऊन रहा. 
३) सदासर्वदा भक्तकल्याणासाठी जागृत राहणार्‍या हे दक्षपुत्री अन्नपूर्णामाते, हजार मुखांचा शेषनागसुद्धा तुझ्या गुणांचे वर्णन करु शकत नाही. तू आमचे संकटांपासून रक्षण करतेस. आम्हाला मोक्षरुपी दान देतेस. हे माते तुझ्या गुणांचे वर्णन कोण करु शकेल? (तर हे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही असे तुझे अनंत गुण आहेत.) 
४) हे परमपावन आदिमाये, सर्व देव तुझ्या चरणांना पूजनीय मानतात. हे अपर्णे पार्वतीमाते, तुझ्या केवळ दृष्टीक्षेपानेच, जसा सूर्यापुढे अंधकार नाहीसा होतो, तसे आमचे अज्ञान नाहीसे होते. 
५) हे वरदायिनी, तू भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेस. तुझ्या केवळ दृष्टीक्षेपानेच पतितांचा उद्धार होतो. हे माते तुझ्या कृपेने भक्तांची जन्ममृत्युच्या फेर्‍यांतून मुक्तता होते. मग पुनर्जन्म कसा होणार. 
६) हे चिंता, क्लेश हरण करणार्‍या प्रज्ञावती, आदरणीय देवते, तू देवांच्याही मनशक्ती पलीकडे आहेस. तर मग शंकरप्राणप्रिये माझे अल्प ज्ञान तुला जाणण्यास कसे समर्थ असेल? 
७) हे वेदांनी स्तुति केलेल्या तेजस्विनी देवते, तू मला तुझ्या द्वारी उभा असलेला कुत्राच समज. माझ्या मनांत भ्रम उत्पन्न करणारे, शत्रुवत वाटणारे जे अर्थवाद (स्तुतिपर आणि/किंवा निंदापर वाक्ये) आहेत. त्यांनी माझी फसवणूक केली आहे. 
८) हे माते, या मर्त्यलोकांतील हे तुझे बालक तुझ्या मांडीवर पहुडले की त्याला पाहिजे ते मिळवते. हे श्रेष्ठमाते तुझ्या चरणी नम्र झालेल्यांना तू द्वैत-अद्वैतज्ञान तू देतेस. माते तुझ्याशिवाय कोण आमचे रक्षण करु शकेल? 
९) हे अक्षरवर्णस्वामिनी तू भक्तांना संपूर्ण ज्ञान देतेस. त्यांची वासनांपासून मुक्तता करतेस. त्यांना सर्व प्रकारचे सुख देतेस. हे नित्यमंगलमाते माझ्या ध्यानांत तू प्रकट हो. 
१०) देवसुद्धा त्यांना त्रस्त करणार्‍या पीडांची शांती करुन घेण्यासाठी तुझ्याकडे आले म्हणजे तुझ्या प्रेरणेने सुखी होतात. हे माते, अहंकार आदि वासनागंधाचा मला त्रास न होवो. 
११) हे माते, तू आनंददायिनी, शक्तीनी आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मस्वरुपिणी आहेस. तू दयेचा सागर आहेस. तुझी स्तुति करावी तेवढी कमीच आहे. तू अत्यंत तेजस्विनी आणि सर्व सिद्धींचेरुप असलेली प्रत्यक्ष लक्ष्मी आहेस. १२) हे सर्वसंरक्षणदात्री, तू खरोखर सर्वांची माता आहेस. तू आपल्या कृपारुपी जलाने या बालकाला (मला) स्नान घाल. या बालकावर सतत कृपेचा वर्षाव कर. आईने बालकाचे रक्षण करावे हे तत्व मी तुला कसे सांगू? (ते तुला माहितच आहे.) 
१३) हे परमपावन माते, हा तुझा बाळ जरी बुद्धिहीन, लबाड, असंयमी, मंद व तुला आवडणारा असला/नसला तरी तुझ्याकडे अत्यंत आशेने आलेला असल्याने त्याची तू उपेक्षा करणे योग्य नाही. (तू त्याची उपेक्षा करु नकोस.) 
१४) हे देवपूजिते माते, केवळ कसे सांगावे या भीतीने भक्त जरी काही न बोलला तरी त्याला पाहिजे आहे ते दे. हे भक्तांचे हित जाणणार्‍या माते, त्याची भूक भागावी म्हणून त्याला ज्ञानरुपी भिक्षान्न दे. 
१५) हे माते, तुझ्या कधीच न मावळणार्‍या कृपेने तू मला तुझ्या चरणांची निरंतर भक्ती दे. हे तपःसामर्थ्य देणार्‍या माते, तू सर्व दुःखांचा अंत करणारी आहेस. मी अत्यंत आदराने तुझ्याकडे याचना करतो की माझ्यासाठी जे जे हितकर आहे ते ते सारे तू कर. 
१६) हे माते तू शिवप्रिया आहेस. तुला अतिथी अत्यंत प्रिय असतात. तू सर्वांचे मन जाणतेस. खरे म्हणजे तुझी स्तुति करण्यास मी अत्यंत असमर्थ आहे. जो वर मागणे योग्य आहे तोच वर मी तुझ्याकडे मागतो आहे. अशारीतीने प.पू. वासुदेवानंदसरस्वती विरचित हे अन्नपूर्णास्तोत्र संपूर्ण झाले.
स्तोत्राची अधिक विस्मयकारक माहितीः 
हे स्तोत्र एकंदर सोळा श्र्लोकांचे आहे. 
त्यातील प्रत्येक श्लोकांतील पहिले अक्षर घेतले तर तयार होणार्‍या वाक्यांत श्री टेंब्येस्वामीनी आपले नांव गुंफले आहे. तयार होणारे वाक्य खालील प्रमाणेः 
॥ श्रीभगवतअवधूतपदकमलभ्रमर वासुदेवानंद सरस्वतीभिक्षुकृत स्तव ॥ 
अशा प्रकारे आपले नांव गुंफले आहे. 
प्रत्येक श्लोकांतील चवथे अक्षर घेतले तर, 
दत्तात्रेयो हरिः कृष्ण उन्मत्तानंददायकः । 
मुनिदिगंबरो बालः पिशाचो ज्ञानसागरः ॥ 
असा मंत्रयुक्त श्लोक तयार होतो. 
प्रत्येक श्लोकांतील नववे अक्षर घेतले तर, 
ऐं र्‍हीं श्रीं क्लीं नमो भगवति माहेश्र्वरि अन्नपूर्णे, ममाभिलषितमनन्देहि देहि स्वाहा । 
(मम अभिलषितं अनंते देहि देहि स्वाहा ।) असा श्री अन्नपूर्णादेवीचा बीजयुक्त मंत्र तयार होतो. 
प्रत्येक श्लोकांतील बारावे अक्षर घेतले तर, 
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे । 
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ 
असा मंत्रयुक्त श्लोक तयार होतो. 
अशा प्रकारच्या स्तोत्राला 'मंत्रगर्भस्तोत्र' असे म्हणतात. 
या स्तोत्राचा पाठ केल्याने स्तोत्रांतर्गत सर्व मंत्रांचा अभिनव पद्धतीने आपोआप पाठ होऊन अन्नपूर्णादेवीची कृपा होते. 
या स्तोत्राचा मराठी अर्थ आणि वरील माहिती "शक्तिस्तोत्रे" या श्री काशिनाथ दत्तात्रेय समुद्र यांच्या पुस्तकांतून साभार घेतली आहे.
Shree Annapurna Stotram 
श्रीअन्नपूर्णास्तोत्रम्
Custom Search

GuruCharitra Adhyay 7 श्रीगुरुचरित्र अध्याय सातवा (७)GuruCharitra Adhyay 7
Gurucharitra Adhyay 7 is in Marathi. Mahatmya of Gokarna Mahabaleshwar is described partly in Adhyay 6 which is continued in this Seventh Adhyay. Mitrasen was a king in God Surya Vansha (Association of many families). He was from Eshwaku kula (Name of Family). The king killed a demon which was troubling people. However the demon before dying asked his brother to take revenge. So brother of the demon appeared as a servant in the king’s kitchen who served flesh of man to Rushies and Munies on the day of Pitru Shradha of kings’ pitrues. Hence Rushies cursed the king that he will become a demon. As it was no fault of king, queen requested Rushies to forgive the king. On her request Rushies told the king that you will have to live a life of demon for 12years. While living like a demon his name was Kalmashpad. Kalmashpad killed a Brahmin and again was cursed by the wife of a Brahmin that after 12 years when Kalmashpad will became a king again; he will be dead when he will touch his wife. Mitrasen again became king after 12years. He had killed a Brahmin which is a big sin and even if tried to cleared it of by visiting many pious places, donating food, water, money and many other things. That sin was not cleared off. He was advised to visit Gokarna Mahabaleshwar Goutam Rushi. Goutam Rushi told a story of a lady who had committed many sins. All sins of the lady who visited Gokarna Mahabaleshwar and unknowingly performed a pooja of God Shiva linga were cleared. Accordingly Mitrasen visited Gokarna Mahabaleshwar and performed pooja, made many donations in the name of God Shiva and his big sin of killing a Brahmin was cleared.    


श्रीगुरुचरित्र अध्याय सातवा (७)


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णीचा महिमा आम्हांसी ।
विस्तार करावा कृपेसी । पूर्वी कवणा वर जाहला ॥ १ ॥
समस्त तीर्थे सोडुनी । श्रीपाद गेले किंकारणी ।
पूर्वी आराधना केली कवणी । पुराण कथा सांग मज ॥ २ ॥
ज्यावरी असेल गुरुची प्रीति । तीर्थ महिमा ऐकणे चित्ती ।
वांछा होतसे  ज्ञानज्योती । कृपामूर्ति सिद्धराया ॥ ३ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी ।
सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते ऐकावे ॥ ४ ॥
पूर्वयुगान्तरी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसीं ।
प्रतापवंत क्षत्रियवंशी । सर्वधर्मरत देखा ॥ ५ ॥
राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण ।
बलाढ्य शूर महाभिज्ञ । नित्योद्दोगी दयानिधि ॥ ६ ॥
असतां राजा एके दिवशीं । विनोदें निघाला पारधीसी ।
प्रवेश जाहला अरण्यासी । वास सिंह-शार्दूलां ॥ ७ ॥
निर्मनुष्य अरण्यांत । राजा पारधी खेळत ।
भेटला तेथे दैत्य अद्भुत । ज्वाळाकार भयानक ॥ ८ ॥
राजा देखोनि तयासी । शरजाळ वर्षे कोपेसी ।
मूर्छना येऊनि धरणीसी । पडिला दैत्य तये वेळीं ॥ ९ ॥
दैत्य वधितां तये वेळीं । होता त्याचा बंधु जवळी ।
आक्रंदतसे प्रबळी । बंधुशोकें करोनियां ॥ १० ॥
प्राण त्यजितां निशाचरु । बंधूसी म्हणे येरु ।
तूं जरी होसील सहोदरु । सूड माझा घ्यावा ॥ ११ ॥
ऐसें बोलुनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी ।
अनेक माया तयापाशीं । नररुप धरिलें तया वेळीं ॥ १२ ॥
रुप धरुनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचें ।
सेवक जाहला राजयाचा । अतिनम्रत्वें बोलोनियां ॥ १३ ॥
सेवा करी नानापरी । जैसे स्वामीचें मनोहरी ।
ऐसें क्वचित् दिवसवरी । वनांतरीं राजा होता ॥ १४ ॥
समस्त मृग मारुनि । दुष्ट जीव छेदोनि ।
राजा आला परतोनि । आपुले नगरा परियेसा ॥ १५ ॥
ऐसे क्रमितां एके दिवशी । पितृश्राद्ध आलें परियेसीं ।
आमंत्रण सांगे त्या ऋषींसी । वसिष्ठादि मुनिवरां ॥ १६ ॥
ते दिनी नियमें स्वयंपाक । करवी राजा सविवेक ।
कपटी होता जो सेवक । तया स्थानीं ठेविला ॥ १७ ॥
राजा म्हणे त्यासी । पाकस्थानीं तू वससी ।
जें जें मागतील माणवसीं । सर्व आणूनि त्वां द्यावें ॥ १८ ॥
अंगीकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख ।
कापट्यभावें करवी पाक । केली शाक तया वेळीं ॥ १९ ॥
ठाय घालितां ऋषेश्र्वरांसी । पहिलेंच वाढिलें नरमांसासी ।
पाहतांचि कोपला वसिष्ठ ऋषि । दिधला शाप तये वेळीं ॥ २० ॥
वसिष्ठ म्हणे रायास । नरमांस वाढिलें आम्हांस ।
त्वरित हो गा ब्रह्मराक्षस । म्हणोनि कोपे तयावेळीं ॥ २१ ॥
शाप देतांचि तयेवेळीं । राजा कोपला अति प्रबळी ।
अपराध नसतां आम्हांजवळी । वायां शापिलेति कां ॥ २२ ॥
नेणें मांसपाक कवणें केला । माझा निरोप नाहीं झाला ।
वृथा आमुतें शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥ २३ ॥
उदक घेऊनि अंजुळीं । शापावया सिद्ध झाला तये काळी ।
तंव राजस्त्री येऊनि जवळी । वर्जिती जाहली पतीसी ॥ २४ ॥
पतीसी म्हणे ते नारी । गुरुसी शापितां दोष भारी । 
वंदूनि त्याचे चरण धरीं । तेणें तरशील भवसागर ॥ २५ ॥
' मदयंती ' सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण ।
अंजुळीं उदक होतें जाण । पाडिलेम आपुले चरणावरी ॥ २६ ॥
शाप देता कल्मषपाणी । पडलें राजयाचे चरणीं ।
' कल्माषपाद ' नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥ २७ ॥
पतिव्रता राजमहिषी । लागली वसिष्ठचरणांसी । 
उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय कीजे ॥ २८ ॥
करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि ।
वर्षें बारा क्रमोनि । पुनरपि राजा होईल ॥ २९ ॥
उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले ठायासी ।
ब्रह्मराक्षस राजा परियेसीं । होउनी गेला वनांतरा ॥ ३० ॥
निर्मनुष्य अरण्यांत । राक्षस राहिला प्रख्यात ।
भक्षण करी अनेक जंत । पशुपक्षिमनुष्यादिकरुन ॥ ३१ ॥
ऐसें क्रमितां तये वनीं । मार्गस्थ दंपत्यें दोनी ।
ब्राह्मणजाती मार्ग क्रमूनि । देखिला राक्षस भयासुर ॥ ३२ ॥
येऊनि धरिलें ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी ।
घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री जाय समागमे ॥ ३३ ॥
अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसाचरणी ।
राखे मजला अहेवपणीं । प्राणेश्र्वरासी सोडी पां ॥ ३४ ॥
न भक्षी माझा पति । माझी प्राणेश्र्वरी प्रीति ।
माते भक्षीं गा सुखवृत्तीं । वल्लभातें सोडी पां ॥ ३५ ॥ 
पतीविणें राहती नारी । जन्म वृथा दगडापरी । 
पहिलें मातें स्वीकारी । प्राण राखे पतीचा ॥ ३६ ॥
अति लावण्य पूर्ववयेसीं । वेदशास्त्र-पारगासी । 
याचा प्राण तूं रक्षिसी । जगदूरक्षिलें पुण्य तुज ॥ ३७ ॥
कृपा करी गा आम्हांवरी । होईन तुझी कन्याकुमारी ।
मज पुत्र होतील जरी । नाम ठेवीन तुझेचि ॥ ३८॥
ऐसे नानापरी देखा । विप्रस्री करी महादुःखा ।
बोल न मानितां राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥ ३९ ॥
पतीसि भक्षिले देखोनि । शाप दिधला ते ब्रह्मणीं ।
म्हणे राक्षसा ऐक कानीं । शाप माझा एकचित्ते ॥ ४० ॥ 
तूं राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी ।
पुढें-मागुतीं राजा होसी । द्वादश वर्षे क्रमोनियां ॥ ४१ ॥
परी रमतां तुवां स्रियेसवें । प्राण जाईल स्वभावें ।
आम्हां अनाथा भक्षिसी दुष्ट भावें । दुरात्मया तूं राक्षसा ॥ ४२ ॥
शाप देऊनि तये वेळीं । पतीच्या अस्थि मिळवूनि सकळी ।
काष्ठें घालूनियां प्रबळी । अग्निप्रवेश केला तिणें ॥ ४३ ॥
ऐसें असतां राजा देखा । क्रमिली तेथ बारा वर्षां ।
पुनरपि राजा होऊनि ऐका । आला आपुले नगरासी ॥ ४४ ॥
विप्रस्रियेचे शापवचन । स्रियेसी सांगे ते खूण ।
रतिसंगति करितांक्षण । मृत्यु असे आपणासी ॥ ४५ ॥
ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण ।
मन करूनि निर्वाण । त्यजूं प्राण म्हणतसे ॥ ४६ ॥
मदयंती म्हणे रायासी । संतान नाहीं तुम्हांसी ।
आतां कष्टला बारा वर्षी । प्रारब्ध आपुले न चुकेचि ॥ ४७ ॥
ऐकोनि सतीचे वचन । शोक दाटला अतिगहन ।
बाष्पें निघती लोचनीं । केवी करु म्हणतसे ॥ ४८ ॥
मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविता झाला परियेसीं ।
ब्रह्महत्या घडली आपणासीं । विमोचन होय कवणेपरीं ॥ ४९ ॥
मंत्री वृद्ध पुरोहित । रायासी म्हणती ऐक मात ।
तीर्थे आचरावीं समस्त । तेणे पुनीत होशील ॥ ५० ॥
ऐसा करोनि विचारु । राजा निघे तीर्थ आचरूं ।
सकळ तीर्थ परिकरु । विधिपूर्वक करीतसे ॥ ५१ ॥
जे जे तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण ।
यज्ञादि कर्म, ब्राह्मण- । जना अन्नदान करीतसे ॥ ५२ ॥
ऐसी नाना तीर्थे करीत । ब्रह्महत्या सवे असे येत ।
अघोररुपें असे दिसत । नवचे कवणेपरी देखा ॥ ५३ ॥
कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभितरीं ।
हिंडत पातला मिथिलापुरीं । चिंताक्रांत होऊनियां ॥ ५४ ॥ 
नगरा-बाह्य प्रदेशीं । श्रमोनि राजा परियेसीं ।
चिंतीतसे मानसीं । वृक्षच्छाये बैसोनियां ॥ ५५ ॥
तंव ऋषेश्र्वरांसमवेत । जैसा रुद्र प्रकाशित ।
गौतम-ऋषेश्र्वर ख्यात । अवचित तेथें पातला ॥ ५६ ॥
देखोनि राजा गौतमासी । चरणीं लोळे संतोषी ।
नमन करी अति हर्षी । भक्तिभावें करोनियां ॥ ५७ ॥
आश्र्वासूनि तये वेळीं । गौतम पुसे करुणा-बहाळी ।
क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृतांत ॥ ५८ ॥
काय झाले तुझे राज्य । अरण्यवासी कवण काज ।
चिंताव्याकुळ मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥ ५९ ॥
ऐकोनि ऋषेश्र्वराचे वचन । राजा सांगे विस्तारोन ।
शाप जाहला ब्राह्मणवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥ ६० ॥
प्रायश्र्चितादि सकळिक । यज्ञादि सर्व धर्मादिक । 
समस्त तीर्थे क्षेत्रें सुखे । आचरली आपण देखा ॥ ६१ ॥
शमन न होय माझा दोष । सवेंचि येतसे अघोर वेष ।
व्रते आचरलों कोटिश । न वचे दोष परियेसा ॥ ६२ ॥
आजि माझा सफळ जन्म । दर्शन झालें तुझे चरण ।
होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणीं लागला ॥ ६३ ॥
ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण ।
भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥ ६४ ॥
तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषीं ।
महापातक संहारासी । गोकर्ण-म्हणिजे स्थान असे ॥ ६५ ॥
स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी ।
ईश्र्वर तेथे सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥ ६६ ॥
जैसे कैलासीचें शिखर । अथवा मूर्धिमंदर ।
निश्र्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥ ६७ ॥
रात्रि असतां अंधकारोनि । उजेड नव्हे त्या अग्नी ।
चंद्रोदये नव्हे निर्वाणी । तयाभास्करावांचून ॥ ६८ ॥
तैसे समस्त तीर्थानें । पापें न जाती त्याचे गुणें ।
सूर्योदयी तम हरणे । तैसे गोकर्णदर्शनमात्रें होय ॥ ६९ ॥
सहस्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असतील या शरीरीं ।
प्रवेश होतां गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥ ७० ॥ 
इंद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका ।
तप केले हो सकळिका । काम्यसिद्धि व्हावया गति ॥ ७१ ॥
भक्तिपूर्वक तया स्थानीं । जप व्रत करिती जाण । 
फळ होय लक्षगुण । ऐसे पुण्यक्षेत्र असे ॥ ७२ ॥
जेथे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवगण सकळिकां ।
साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगूं ॥ ७३ ॥
जाणा तो साक्षात ईश्र्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर ।
प्रतिष्ठा करी विघ्नेश्र्वर । विष्णुनिरोपें विनयार्थ ॥ ७४ ॥
समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्रीं वास करिती ।
ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्र्वेदेव मरुद्गण ॥ ७५ ॥
सूर्य-चंद्र-वसु आदिक । ' पूर्वद्वारीं ' राहिले ऐक ।
प्रीतिकरें भक्तिपूर्वक । वसताति तये स्थानीं ॥ ७६ ॥
अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पित्र ।
' दक्षिणद्वारीं ' वास करित । अति संतोषें राहिले असती ॥ ७७ ॥
वरुणादिसहित गगा सकळें । ' पश्र्चिमद्वारीं ' वास जाहले ।
प्रीतिकरीं चंद्रमौळे । वास केला परियेसा ॥ ७८ ॥
कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी । 
' उत्तरद्वारीं ' वास त्रिकाळीं । पूजा करिती महाबळेश्र्वराची ॥ ७९ ॥
चित्ररथादि विश्र्वावसु । चित्रसेन गंधर्व सुरसु ।
पूजा करिती महेशु । सदा वसोनि तये ठायीं ॥ ८० ॥
घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका ।
नित्य नृत्य करिती सुखा । महाबळेश्र्वरा सन्मुख ॥ ८१ ॥
वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्र्वामित्र महातापसी ।
भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथें ॥ ८२ ॥
ऋतु अंगिरस ब्रह्मऋषि । आचार करिती महातापसी ।
महाबळेश्र्वराचे भक्तिसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥ ८३ ॥
मरीची नारद अत्रिऋषि । दक्षादि सकल ब्रह्म-मुनि परियेसीं ।
सनदादिक तापसी । उपनिषदाचें उपासिती ॥ ८४ ॥
अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्र्वर अजिनधारण ।
दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथें वसती ॥ ८५ ॥
त्वगस्थिमात्रशरीरेसीं । अनुष्ठिती महातापसी ।
पूजा करिती भक्तिसीं । चंद्रमौळीची परियेसा ॥ ८६ ॥
गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव ।
विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥ ८७ ॥
गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक ।
पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजे तया स्थानीं ॥ ८८ ॥
नाना श्रृंगार करुनि आपण । अनेक भूषणे विराजमान ।
सूर्यसंकाश विमान । वाहने येती देवगण ॥ ८९ ॥
स्तोत्रगायनें करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका ।
पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्र्वरलिंगापाशी ॥ ९० ॥
जे जे इच्छिती मनकामना । पावे त्वरित निर्धारे जाणा ।
समान नाही क्षेत्र गोकर्णा । या ब्रह्मांडगोलकांत ॥ ९१ ॥
अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार ।
अग्निदेव कंदर्प येर । वर लाधले तया ठायीं ॥ ९२ ॥
शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळीं ।
मणिनागातें गरुड न गिळी । महाबळेश्र्वरदर्शने ॥ ९३ ॥
रावणादि राक्षसकुळ । कुंभकर्ण येर सकळ ।
वर लाधले केवळ । बिभीषण पूजीतसे ॥ ९४ ॥
ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ ।
गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥ ९५ ॥
लिंग स्थापिती आपुले नामी । असंख्यात नामोनामीं ।
वर लाधले होते कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥ ९६ ॥
ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका ।
आपुले नामी लिंग ऐका । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥ ९७ ॥
धर्मक्षेत्रपाळादि । दुर्गादिदेवशक्तिवृंदी ।
लिंग स्थापिती आपुले आदी । तया गोकर्णक्षेत्रांत ॥ ९८ ॥
गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्यात जाण ।
पदिपदी असती निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम्य ॥ ९९ ॥
सांगो किती त्याची खूण । असंख्यात तीर्थे जाण ।
पाषाण समस्त लिंग सगुण । तीर्थ जाण समस्त उदकें ॥ १०० ॥
कृतायुगीं महाबळेश्र्वर श्र्वेत । त्रेतायुगी दिसे लोहित ।
द्वापारी रुप पीत । कलियुगी कृष्णवर्ण जाणा ॥ १०१ ॥
सप्त खोलीवेन । उभे असे लिंग आपण ।
कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्मरुपानें ॥ १०२ ॥
पश्र्चिम समुद्रतीरेसी । गोकर्ण-तीर्थ उत्तमेसी ।
ब्रह्महत्यादि पाप नाशी । काय आश्र्चर्य परियेसा ॥ १०३ ॥
ब्रह्महत्यादि पंच महापापें । परद्वारादि दुष्ट पापें ।
दुःशील दुराचारी पापें । जाती गोकर्ण-महाबळेश्र्वर दर्शने ॥ १०४ ॥
दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधिती ।
अंती होय त्यांसी गति । गोकर्णलिंगदर्शनमात्रें ॥ १०५ ॥
तया स्थानी पुण्यदिवशीं । जे अर्चिती भक्तीसी ।
तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥ १०६ ॥
एखादे समयीं गोकर्णासी । जाय भक्तीनें मानुषी ।
पूजा करितां सदाशिवासी । ब्रह्म-पद तो पावें जाणा ॥ १०७ ॥
आदित्य-सोम-बुधवारीं । अमावास्यादि पर्वांभीतरी ।
स्नान करुनि समुद्रीं । दानधर्म करावा ॥ १०८ ॥
शिवपूजा व्रत होम हवन । जप ब्राह्मणसंतर्पण ।
किंचित् करितां अनंत पुण्य । म्हणे गौतम रायासी ॥ १०९ ॥
व्यतीपातादि पर्वणीसी । सूर्यसंक्रांतीचे दिवशीं ।
महाप्रदोष त्रयोदशीसी । पूजितां पुण्य अगम्य ॥ ११० ॥
काय सांगू त्याची महिमा । वर लाधलें अखिल कामा ।
ईश्र्वर भोळा अनंत महिमा । पुन्यमार्गे तुष्टतसे ॥ १११ ॥
असितपक्ष माघामासी । शिवरात्रि चतुर्दशीं ।
बिल्वपत्र वाहिल्यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥ ११२ ॥
ऐसे अनुपम्य स्थान असतां । नवजाती मूर्ख ऐकतां ।
शिवतिर्थी असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥ ११३ ॥
उपोषणादि जागरण । लिंग संनिध गोकर्ण । 
स्वर्गासि जावया सोपान- । पद्धति असे परियेसा ॥ ११४ ॥
ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जन जाती यात्रेसी ।
चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधे लोक अवधारीं ॥ ११५ ॥
स्नान करुनि समस्त तीर्थीं । महाबळेश्र्वरलिंगार्थी ।
पूजा करावी भक्त्यर्थीं । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥ ११६ ॥
ऐशापरि गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी-गौतमा ।
राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला तये वेळीं ॥ ११७ ॥
राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान-महिमा निरोपिलासी ।
पूर्वी कवण कवणासी । साक्षी झाली असेल कीं ॥ ११८ ॥
विस्तारुनि आम्हांसी । सांगा स्वामी करुणेसीं ।
म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्तीकरुनियां ॥ ११९ ॥
म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी । 
जाणों आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥ १२० ॥
गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टांत विचित्र । 
आले होते तेथे जनमात्र । यात्रारुपे करोनियां ॥ १२१ ॥
माध्यानकाळीं आम्ही तेथे । बैसलो होतों वृक्षच्छायेते ।
दुरोनि देखिलें चांडाळीतें । वृद्ध अंध महारोगी ॥ १२२ ॥
शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरीं ।
कृमि पडले असती अघोरी । पूय शोणित दुर्गंध ॥ १२३ ॥
कुक्षरोगी गंडमाळा । कफ दाटला असे गळां ।
दंतहीन अतिविव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥ १२४ ॥
चंडसूर्य किरणाकरितां । प्राण जाय कंठगता ।
शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥ १२५ ॥
विधवा आपण केशवपनीं । दिसे जैशी मुख-मरणी ।
क्षणक्षणा पडे धरणीं । प्राणत्याग करुं पाहे ॥ १२६ ॥
ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी ।
देह टाकिला धरणीसी । त्यजूं पाहे प्राण आपुला ॥ १२७ ॥
प्राण त्यजितां तये वेळीं । विमान उतरले तत्काळीं ।
शिवदूत अतुर्बळी । त्रिशूळ खट्वांग धरुनि हाती ॥ १२८ ॥
टंकायुधें चंद्र भाळी । चंद्रासारखी कांति केवळी ।
किरीटकुंडलें मिरवे कपोलीं । चतुर्वर्ग येणेपरी ॥ १२९ ॥
विमानी सूर्यासारिखें तेज । अतिविचित्र दिसे विराज ।
आले चांडाळिये काज । अपूर्व वर्तले तये वेळीं ॥ १३० ॥
आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण कार्यासी ।
दूत म्हणती आम्हांसी । आलो चांडाळीस न्यावया ॥ १३१ ॥
ऐकोनि दूतांचे वचन । विस्मित झालें आमुचे मन ।
पुनरपि केला त्यांसी प्रश्र्न । ऐक राया एकचित्ते ॥ १३२ ॥
ऐशी चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसीं ।
नेऊनियां श्र्वानासी । सिंहासनीं काय योग्य ॥ १३३ ॥
आजन्मादारभ्य इसी । पापें पापसंग्रहासी । 
ऐशी पापीण दुर्वृत्तीसी । केवीं न्याल शिवलोका ॥ १३४ ॥
नाहीं इसी शिवज्ञान । न करी तपसाधन ।
दया सत्य कदा नेणे । इतें कैसे नेतां तुम्ही ॥ १३५ ॥
पशुमांस-आहार अहर्निशी । सदा करी जीवहिंसी ।
ऐशी कुष्ठी पापिणीसी । केवीं नेतां स्वर्गभुवना ॥ १३६ ॥
अथवा कधीं शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन ।
नाही केले शिवस्मरण । इतें कैसे नेतां तुम्ही ॥ १३७ ॥ 
शिवरात्रीं उपोषण । नाही केले दान आपण ।
केले नाही देखिले यज्ञ । इयेसी कैसें न्याल तुम्ही ॥ १३८ ॥
न करी स्नान सर्वकाळीं । नेणे तीर्थ कवणे वेळी । 
अथवा व्रतादि सकळीं । केले नाहीं महापापी हे ॥ १३९ ॥
सर्वांगी कुष्ठ पूय शोणित । दुर्गंधी वास असे बहुत ।
ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानीं बैसवाल ॥ १४० ॥
अर्जन जन्मांतरीचें म्हणा । कुष्ठ सर्वांग हेचि खुणा ।
कृमि निघती मुखांतून । पूर्वार्जित केवीं होईल ॥ १४१ ॥
ऐशी पापिणी दुराचारी । योग्य नव्हे सचराचरी । 
केवी नेतां कैलासपुरी । केवी विमानी बैसवाल ॥ १४२ ॥
गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिलें दूतांसी ।
त्यांणी सांगितला आम्हांसी । आद्यंत चांडाळणीचा ॥ १४३ ॥
ऐके गौतम ऋषेश्र्वरा । या चांडाळीचे पूर्वापरा ।
सांगो तुम्हां सविस्तरा । आश्र्चर्य असे परियेसा ॥ १४४ ॥
पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकुळीं जाहली कन्या ।
' सौमिनी ' नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥ १४५ ॥
अतिसुंदर रुप इसी । उपवर जाहली पितृगृहेसी ।
न मिळे वर तियेसरसी । चिंता करिती मातापिता ॥ १४६ ॥
न मिळे सुंदर वर तिसी । उन्नत जाहली दहा वरुषी ।
मिळवूनि एक द्विजासी । गृह्योक्तेसी दिधली कन्या ॥ १४७ ॥
विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी । 
क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥ १४८ ॥
वर्ततां असे पुढे देखा । तिचे पतीस झालें दुःखा ।
पंचत्व पावला तात्काळिका । विधिवशेंकरुनियां ॥ १४९ ॥
ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरी आणितां ।
पतीचे दुःखकरीं बहुता । खेद करी ते नारी ॥ १५० ॥
अतिसुंदर पूर्ववयेसी । मदें व्यापिलें प्रतिदिवसीं ।
चंचळ होय मानसीं । परपुरुषांते देखोनि ॥ १५१ ॥
गुप्तरुपें क्वचित्काळी । जारकर्म करिती जाहली । 
प्रगट जाहले केवळी । गौप्य नोहे पातकासी ॥ १५२ ॥
आपण विधवा असे नारी । विशेषरुप अतिसुंदरी ।
पूर्ववयसा प्राय भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥ १५३ ॥
ऐसे तिचे पातकासी । प्रकट जाहले सर्वांसी ।
वाळीत केले तयांसी । मातापिताबंधुवर्गादिकां ॥ १५४ ॥
माता पिता बंधुजन । त्यजिले तिसी विसर्जोन ।
प्रायश्र्चित घेऊनि आपण । शुद्ध झाले परियेसा ॥ १५५ ॥
शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी ।
प्रगटरुप अहर्निशी । रमूं लागली नगरांत ॥ १५६ ॥
तया नगरीं एक वाणी । रुपें होता अतिलावण्यी ।
पूर्ववयसी देखोनि । झाली त्याची कुलस्री ॥ १५७ ॥
तया शूद्राचे घरी । वर्तत होती ते नारी ।
ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥ १५८ ॥
स्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया ।
राजानो ब्रह्मदंडेन । यततो भोगसंग्रहांत ॥ १५९ ॥
स्रिया नासती कामत्वे । ब्राह्मण नासती हीनसेवे । 
राज्य जाय द्विजक्षोभें । यति नासे विषयसेवनें ॥ १६० ॥
शूद्रासवें अहर्निशी । रमत होती अतिहर्षी ।
पुत्र जाहला तियेसी । तया शूद्राघरीं असतां ॥ १६१ ॥
नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसीं ।
होऊनि तया शूद्रा महिषी । होती पापिणी दुराचारी ॥ १६२ ॥
वर्ततां ऐसे एके दिवसीं । उन्मत्त होवोनि परियेसीं ।
छेदिलें वांसरुं आहारासी । मेष म्हणोनि पापिणीनें ॥ १६३ ॥
छेदोनि वत्स परियेसीं । पाक केला विनयेसीं ।
शिर ठेविलें शिंकेसी । एके दिवसीं भक्षावया ॥ १६४ ॥
आपण भ्रमित मद्यपानीं । जागृत जाहली अस्तमानीं ।
वांसरुं पाहतसे भुवनीं । धेनू दोहावयालागीं ॥ १६५ ॥
वत्सस्थानीं असे मेष । अमित जाहली अतिक्लेश ।
घरांत पाहातसे शिरास । व्यक्त दिसे वांसराचे ॥ १६६ ॥
अनुतप्त होवोनि तया वेळी । ' शिव शिव ' म्हणे चंद्रमौळी ।
अज्ञाने ऐशी पापें घडलीं । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥ १६७ ॥
तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी ।
पति कोपेल म्हणोनि परियेसीं । अस्थिचर्म निक्षेपिलें ॥ १६८ ॥
जाऊनि सांगे शेजारी लोकां । व्याघ्रे भक्षिले वत्सासी ऐका ।
रोदन करी समस्तांपुढे देखा । पतीपुढे येणेपरी ॥ १६९ ॥
ऐसी कितीक दिवसवरी । नांदत होती शूद्राघरीं ।
पंचत्व पावली ती नारी । नेली दूतीं यमपुरासी ॥ १७० ॥
घातलें तिसी नरकांत । भोग भोगी अतिदुःखित ।
पुनरपि चांडाळीजात । उपजली ते नारी ऐका ॥ १७१ ॥
जाहली उपजतांचि आंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी । 
मातापिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहें ॥ १७२ ॥
उच्छिष्ट अन्न मांसपिंड । चारताति तिसी अखंड ।
बाळपणी ऐसी विघड । पोसिती तिसी अवधारा ॥ १७३ ॥
ऐसे असतां वर्तमानीं । सर्वांगी झाली कुष्वर्णी ।
पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥ १७४ ॥
सर्वांग कुष्ठव्रणे पीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात ।  
याचूनि आपुले उदर भरित । रक्षण करी देह आपुला ॥ १७५ ॥
येणेपरि बहुत काळीं । वर्तत होती चांडाळी ।
क्षुधें पीडित सर्वकाळीं । आपण आंधळी कुष्ठदेही ॥ १७६ ॥
न मिळे तिसी वस्रान्न । दुःख करी आतिगहन । 
ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टें ॥ १७७ ॥
भक्षावया मागें महाजनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी ।
कधी न भरे उदर तिसी । दुःख अहर्निशी करीतसे ॥ १७८ ॥
व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी ।
दुर्गंधी ते महादोषी । सर्वागीं कुष्ठ गळतसे ॥ १७९ ॥
ऐसे वर्ततां माघमासीं । लोक निघाले यात्रेसी ।
महास्थान गोकर्णासी । कलत्रपुत्रसहित देखा ॥ १८० ॥
शिवरात्रीचे यात्रेसी । येती लोक देशोदेशीं । 
चतुर्वर्ण असमसहासी । हर्षे येती परियेसा ॥ १८१ ॥
देशोदेशींचे राजे देखा । हस्तीरथसहित ऐका ।
येती समस्त भूमंडलिका । महाबळेश्र्वरलिंगदर्शनासी ॥ १८२ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती यात्रेसी विनोद ।
समारंभ करिती आनंद । अमित लोक परियेसा ॥ १८३ ॥
किती हांसती गायन करिती । धांवती नृत्य करीत येती ।
शिवस्मरण गर्जती । यात्राप्रसंगे जाती देखा ॥ १८४ ॥
ऐसे महाजनांसमवेत । चांडाळी गेली याचित ।
सवे भिक्षुक बहुत । तयांसमागमें जातसे ॥ १८५ ॥
येणेपरी गोकर्णासी । चांडाळी पातली सायासी ।
करावलंबे महाजनांसी । भिक्षा मागे करुणावचनें ॥ १८६ ॥
लोक चालती मार्गांत । शयन करुनि आक्रंदत ।
करावलंबे असे मागत । महाजन लोकांसी ॥ १८७ ॥
पूर्वजन्माची पापी आपण । पीडितसें याचि कारण ।
भिक्षा घाला क्षुधानिवारण । म्हणोनि मागे सकळिकांसी ॥ १८८ ॥
नेणे कधी वस्र प्रावरण । धुळींत लोळतसे पापिण ।
क्षुधाक्रांत होतसे मरण । धर्म करा हो सकळिक ॥ १८९ ॥
सर्वांग कुष्ठरुजा गळत । वस्रावीणें बाधे शीत ।
अक्ष नाही क्षुधाक्रांत । धर्म करा सकळिक हो ॥ १९० ॥
चिरोपवासें क्षुधा बहुत । जठराग्नि असे संदीप्त ।
धर्म करा असे म्हणत । पडली असे मार्गांतु ॥ १९१ ॥
पूर्वी जन्मशतांतरी । नाही केले पुण्य येरीं ।
याचिकारणे पीडतसे भारी । धर्म करा सकळिक ॥ १९२ ॥
येणेपरी मार्गांत । चांडाळी असे याचित ।
ते दिनीं शिवरात्रि असे व्रत । कोणी न घाली भिक्षा तिसी ॥ १९३ ॥
पूजेसि जाती सकळ जन । त्यांते मागतसे आक्रंदोन ।
एक म्हणती हांसोनि । उपवास आजि अन्न कैचें ॥ १९४ ॥
हातीं होती बिल्वमंजरी । ते घातली तिचे करीं ।
हुंगोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥ १९५ ॥
कोपोन टाके ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी ।
रात्री असतां अंधकारीं । अलभ्य पूजा घडली तिसी ॥ १९६ ॥
कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी ।
पूजा पावली ते शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकीं ॥ १९७ ॥
इतुके पुण्य घडले इसी । प्रयत्न न करितां परियेसीं ।
तुष्टला तो ईश्र्वर हर्षी । भवार्णवा कडे केले ॥ १९८ ॥
येणेपरि चांडाळीसी । उपास घडला परियेसी ।
तेथूनि उठे दुसरे दिवशी । भिक्षा मागावयासी ॥ १९९ ॥
पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त जाहली उपवासे ।
चालू न शके मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥ २०० ॥
सूर्यरश्मींकरुनि तिसी । दुःख होय असमसहासीं ।
पूर्वार्जित कर्मे ऐसीं । दूत म्हणती गौतमाते ॥ २०१ ॥ 
ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षासमीपत । 
त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनि आलों इसी न्यावया ॥ २०२ ॥
पुण्य केले इणे आजी । उपवास शिवतिथीकाजी ।
बिल्वपत्रे ईश्र्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥ २०३ ॥
त्या पुण्येकरुनि इचे । पाप गेलें शतजन्मींचे । 
ईश्र्वरासी प्रेम इयेचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥ २०४ ॥
ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपिती अमृत ।
दिव्यदेह केले त्वरित । घेऊनि गेले शिवलोका ॥ २०५ ॥
ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारुन ।
राजयासि म्हणतसे सगुण । त्वरित जाई गोकर्णासी ॥ २०६ ॥
जातांचि तुझी पापें जाती । इह सौख्य परत्र साधती ।
संशय न धरी तूं चित्ती । म्हणोनि निरोपिलें रायासी ॥ २०७ ॥
ऐकोनि गौतमाचे वचन । राजा मनीं संतोषोन ।
पावला त्वरित गोकर्ण । पापावेगळा जाहला जाणा ॥ २०८ ॥
ऐसें पुण्यपावन स्थान । म्हणोनि श्रीपाद राहिले आपण ।
सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥ २०९ ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
श्रोते करुनि निर्धार । एकचित्तें परियेसा ॥ २१० ॥
 ॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

GuruCharitra Adhyay 7 

श्रीगुरुचरित्र अध्याय सातवा (७)

Custom Search

Thursday, April 18, 2013

GuruCharitra Adhyay 8 श्रीगुरुचरित्र अध्याय आठवा (८)

GuruCharitra Adhyay 8
Gurucharitra Adhyay 8 is in Marathi. Mahatmya of ShaniPradosha Vrata is described in this Adhyay. Pradosha is the day on which God Shiva Pooja is performed. This day comes on every Trayodashi in Krishna and Shukla Paksha of the Chandra mas (Month). Such pooja is performed in the evening/night and if it is a Saturday then pooja is very special and God Shiva’s blessings to the devotees are immediately fulfilling their wishes/desires making them happy, healthy and prosperous.
In this 8th Adhyay Guru Shripad Yati is tailing this ShaniPradosha Vrata to Ambika. She had many Vrtas (Religious performances) for having a putra sansati.  All her efforts were in vain and the only son she had was not educated nor have any knowledge to earn to feed himself and his mother. Thus scolded by the villagers, the son told her mother that he is going to Ganga River for suicide. As such mother also accompanied him and while at Ganga River they saw Guru Shripad Yati. Then lady told him that they are going to finish their life and asked him to pray for them. Guru Shripad Yati told them that suicide is a sin. Further getting know all the facts from Ambika, he described the ShaniPradosha Vrata to her. This Vrata is from Skanda Purana. It is performed by Goulan (lady living in Gokul) and she became mother of God Krishna.  Goulan had seen this vrata performed by king Chandrasen who was a great devotee of God Shiva. God Shiva had blessed him and given him a jewel. The jewel was very lustrous and was fulfilling the wishes, desires of the owner.  It was very precious and anything like metal or stone becomes Gold within the vicinity of the Jewel. Other kings, who came to know about this jewel, were desirous of owning it. They thought of a war against Chandrasen, if he refused to hand over the jewel to them or sell it. The day when other kings came for war was ShaniPradosh day. Hence King Chandrasen went for performing God Shiva pooja without thinking anything but God Shiva Pooja only. This Pooja was seen by Goulans and their children. After returning, children thought of performing the pooja. One of the children was very serious in performing the pooja and was blessed by God Shiva that his mother would became a mother of God as she had seen the king Chandrasen performing ShaniPradosh Vrata. Hence if Ambika wants to become a mother of a son like Guru Shripad Yati then after performing the ShaniPradosha Vrata by the blessings of God Shiva her wish will be fulfilled. This is short meaning of this Adhyay 8.

श्रीगुरुचरित्र अध्याय आठवा (८)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा निरोपिलासी ।
श्रीगुरु राहिले किती दिवसीं । वर्तलें पुढें काय सांग ॥ १ ॥
तूं गुरुमूर्ति कृपासिंधु । माझे मनीं लागला वेधु ।
चरित्र ऐकतां महानंदु । अत्योल्हास होतसे ॥ २ ॥
परिसोनि शिष्याचें वचन । संतोषे सिद्ध अतिगहन ।
सांगता जाहला विस्तारुन । श्रोते तुम्ही अवधारा ॥ ३ ॥
गोकर्णक्षेत्रीं श्रीपाद यति । राहिले वर्षे तीन गुप्तीं ।
तेथोनि श्रीगिरिपर्वता येती । लोकानुग्रहासी ॥ ४ ॥
जयाचें चरणदर्शन करितां जाण । समस्त तीर्थांसमान ।
' चरणं पवित्रं विततं पुराणं ' । वेदश्रुति बोलती ॥ ५ ॥
समस्त तीर्थे गुरुचरणीं । तो कां हिंडे तीर्थभुवनीं ।
लोकानुग्रह करणें म्हणोनि । जाती आपण परियेसा ॥ ६ ॥
मास चारी क्रमोनि तेथें । आले निवृत्तिसंगमातें ।
दर्शन द्यावया भक्तलोकांतें । पातले तया कुरवपुरा ॥ ७ ॥
कुरवपुर महाक्षेत्र । कृष्णा-गंगा वाहे तीर ।
महिमा सांगतां असे अपार । भूमंडळांत दुर्लभ ॥ ८ ॥
तेथील महिमा सांगतां विस्तार होईल बहु कथा ।
पुढें असे अखिल चरित । सांगेन ऐक एकचित्ते ॥ ९ ॥
श्रीपाद राहिले कुरवपुरीं । ख्याति जाहली भूमीवरी ।
प्रगट महिमा अपरांपरी । सांगतां विस्तार असे देखा ॥ १० ॥
जे जन भजती भक्तीसीं । सौख्य पावती अप्रयासीं ।
लक्ष्मी-कन्या-पुत्रेंसी । जें जें चिंतिलें पावती ॥ ११ ॥
समस्त महिमा सांगावयासी । विस्तार होईल बहुवसीं ।
नामधारका परियेसीं । सांगेन किंचित् तुज आतां ॥ १२ ॥
पुढें अवतार व्हावया गति । सांगेन ऐका एकचित्तीं ।
श्रीपाद कुरवपुरीं असती । कार्यकारण पुढें असे ॥ १३ ॥
अवतार व्हावया कारण । सांगेन त्याचें पूर्वकथन ।
वेदशास्रसंपन्न । ब्राह्मण होता तया ग्रामीं ॥ १४ ॥
त्याची भार्या होती एक । नाम तियेचें ' अंबिका ' । 
सुशील आचार पतिसेवका । महापुण्यसती देखा ॥ १५ ॥
तितें पुत्र होऊनि मरती । पूर्वकर्मफळ-अर्जितीं ।
अनेक तीर्थव्रत-आचरतीं । तिणें केलीं परियेसा ॥ १६ ॥
ऐसे असता होणार गति । पुत्र जाहला मंदमति ।
माता स्नेह करी प्रीतीं । अपूर्व आपणासी म्हणोनि ॥ १७ ॥
वर्धतां मातापित्याघरीं । विप्रात्मज वाढला अति प्रीतिकरीं ।
व्रतबंध करिती कुळाचारीं । वेदाभ्यासीं घालावया ॥ १८ ॥
विद्या न ये तया कुमरा । मंदमति अज्ञान बहिरा । 
चिंता वाढे त्या द्विजवरा । म्हणे पुत्र मंदमति ॥ १९ ॥
अनेक देव आराधोनि । पुत्र लाधलों कष्टोनि ।
प्राचीन कर्म न सुटे म्हणोनि । चिंता करी अहोरात्र ॥ २० ॥
अनेकपरी शिकवी त्यासी । ताडण करी बहुवसीं ।
दुःख होय त्या जननीसी । वर्जी आपुले पतीतें ॥ २१ ॥
पतीसी म्हणे ते नारी । पुत्र नाही आमुचे घरीं ।
कष्टेंकरुनि नानापरी । पोशिले एका बाळकासी ॥ २२ ॥ 
विद्या न ये वेद त्यासी । वायां मारुनि कां कष्टसी ।
प्राचीन कर्म असे त्यासी । मूर्ख होऊनि उपजावें ॥ २३ ॥
आता जरी तुम्ही यासी । ताडन कराल अहर्निशीं ।
प्राण त्यजीन हा भरवंसीं । म्हणोनि बोले पतीसी ॥ २४ ॥
स्रियेचे वचन ऐकोनि । विप्र राहिला निश्र्चिंत मनीं ।
ऐसा काळ क्रमोनि । होते तया ग्रामांत ॥ २५ ॥
वर्तता पुढें तया स्थानीं । विप्र पडला असमाधानीं ।
दैववशेंकरुनि । पंचत्व पावला परियेसा ॥ २६ ॥
पुत्रासहित ते नारी । होती तेथें कुरवपुरीं ।
याचूनि आपुलें उदर भरी । जीवित्व करी येणेंपरी ॥ २७ ॥
विप्रस्रियेचा कुमर देखा । विवाहायोग्य जाहला निका ।
निंदा करिती सकळ लोक । मतिहीन म्हणोनियां ॥ २८ ॥
कन्या न देती त्यासी कोणी । समस्त करिती दूषणी ।
म्हणती शुष्क वाहें कां पाणी । उदर भरी येणें विधीं ॥ २९ ॥
समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी । " दगडापरी जन्मलासी ।
लांछन आणिलें वंशासी । अरे मूर्खा कुलनाशका ॥ ३० ॥
तुझ्या पितयाचा आचार । ख्याति असे चारी राष्ट्र । 
जाणे वेद धर्म शास्त्र । त्याचे पोटीं तूं जन्मलासी ॥ ३१ ॥
बोल आणिला तूं पितयासी । घातले पितृव्य अधोगतीसी ।
भिक्षा मागोनि उदर भरिसी । लाज नये कैसी तुज ॥ ३२ ॥
जन्मोनि तूं संसारीं । काय करावें पशुत्वापरी ।
अथवा गंगाप्रवेश करी । जन्मोनि वायां " म्हनती लोक ॥ ३३ ॥
ऐसें ऐकोनि ब्रह्मचारी । दुःख करी नानापरी ।
मातेसि म्हणतसे अवसरीं । प्राण त्यजीन आपुला ॥ ३४ ॥
निंदा करिती सकळ मज । असोनि देह कवण काज । 
पोसूं न शकें माते तुज । जाईन अरण्यवासासी ॥ ३५ ॥
ऐकोनि पुत्राचे वचन । माता करी अति चिंतन ।
शोक करी अतिगहन । प्रलापितसे ते नारी ॥ ३६ ॥
माता सुत दुःख करीत । गेलीं गंगाप्रवाहांत ।
तेथें देखिले जगद्भरित । श्रीपाद यति स्नान करितां ॥ ३७ ॥
जाऊनि दोघें लागती चरणी । विनविती कर जोडुनि ।
वासना असे आमुचे मनीं । प्राण त्यजूं गंगेंत ॥ ३८ ॥
निरोप द्यावा जी आम्हांसी । सद्गति व्हावया कारणासी ।
आत्महत्या महादोषी । म्हणोनि विनवितों कृपासिंधु ॥ ३९ ॥
ऐकोनि विप्रस्रियेचें वचन । पुसती श्रीपाद कृपा करुन ।
काय संकटीं तुमचें मन । त्यजिणें प्राण कवण्या गुणें ॥ ४० ॥

विप्रस्री तये वेळां । सांगती जाहली दुःखा सकळा ।
म्हणे स्वामी भक्तवत्सला । तारावें आम्हां बाळकांसी ॥ ४१ ॥ 
पुत्राविणें कष्टलें भारी । अनेक तीर्थे पादचारी ।
केलीं व्रतें पूजा जरी । सकळही देव आराधिले ॥ ४२ ॥
व्रतें उपवास सांगूं किती । करितें झाले अपरिमिति । 
झाला पुत्र हा दुर्मति । निंदा करिती सकळ जन ॥ ४३ ॥
वेदशास्त्रसंपन्न । पति माझा ब्राह्मण ।
त्याचे पोटीं जन्मला हा हीन । मंदमति दुरात्मा ॥ ४४ ॥
कृपा करीं गा श्रीपाद यति । जन्मोजन्मी ऐसी गति ।
पुत्र न व्हावा मंदमति । ऐसा पदार्थ सांगा मज ॥ ४५ ॥
कृपासागर दैन्यहरण । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
शरणागता करावया रक्षण । आलासि स्वामी कृपासिंधु ॥ ४६ ॥
जन्मोनियां संसारीं । कष्ट केले नानापरी ।
न देखेंचि सौख्यकुसरी । व्याले पुत्र न राहती ॥ ४७ ॥
वांचोनियां हा एक सुत । शेळीच्या गळां स्तन लोंबत ।
वृथा जन्म जाहला म्हणत । विनवीतसे श्रीगुरुसी ॥ ४८ ॥
देवा आतां ऐसे करणे । पुढील जन्मीं मनुष्यपणें ।
पूज्यमान पुत्र पावणें । जसा तूं पूज्य जगत्रयासी ॥ ४९ ॥
सकळ लोक त्यासि वंदिती । ऐसा पुत्र होणार गति ।
उपाव सांगा श्रीगुरु यति । म्हणोनि चरणीं लागली ॥ ५० ॥        
श्रमातें उद्धारगति । नव्हे मागुती पुनरावृत्ति ।
पितरां सकळां स्वर्गप्राप्ति । लाधे ऐसें निरोपावें ॥ ५१ ॥
वासना असे माझ्या मनीं । पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी । 
बाळपणींच पाहेन नयनीं । पूज्यमान समस्तांसी ॥ ५२ ॥
श्रीपाद ऐकोनि तिचें वचन । सांगती भक्ति कृपा करुन ।
करीं वो ईश्र्वरआराधन । पुत्र होईल श्रीहरीऐसा ॥ ५३ ॥
गौळणीचे घरी देखा । कृष्ण उपजला जो कारणिका ।
व्रत केलें गौळणीं ऐका । ईश्र्वराची आराधना ॥ ५४ ॥
तैसा आराधीं तूं ईश्र्वर । पुत्र पावसी हा निर्धार ।
तुझ्या मनीं आशा भार । लाधसी म्हणती श्रीपाद यति ॥ ५५ ॥
विप्रस्री म्हणे तया वेळीं । व्रत कैसे केले ते गौळी ।
कैसा पूजिला चंद्रमौळी । विस्तारावें मजप्रति ॥ ५६ ॥
तैसेच व्रत करीन आपण । म्हणोनि लागतसे चरणा ।
कृपामूर्ति श्रीगुरुराणा । सांगता झाला तया वेळीं ॥ ५७ ॥
म्हणती श्रीपाद तियेसी । ईश्र्वर पूजीं वो तूं प्रदोषीं ।
मंदवारीं विशेषीं । पूजा करी भक्तिने ॥ ५८ ॥
पूजा देखिली गौळणीं । विस्तार असे स्कंदपुराणीं ।
सांगेन कथा ऐक सगुणी । म्हणती श्रीगुरु तियेसी ॥ ५९ ॥
ऐकोन श्रीगुरुचे वचना । संतोषली विप्रांगना ।
जाऊनि लागे श्रीगुरुचरणा । विनवीतसे तये वेळीं ॥ ६० ॥ 
विप्रस्री म्हणे स्वामियासी । अभिनव मातें निरोपिलेंसी ।
देखतां पूजा प्रदोषीं । पुत्र झाला कृष्णऐसा ॥ ६१ ॥ 
आपण केलिया पूजा जरी । फळ पावेन निर्धारीं ।
पूर्वी झालें कवणेपरी । विस्तारावे मज दातारा ॥ ६२ ॥
श्रीगुरु सांगती तियेसी । सांगेन ऐक एकचित्तेसीं ।
' उज्जनी ' नाम नगरीसी । जाहलें विचित्र परियेसा ॥ ६३ ॥
तया नगरीं ' चंद्रसेन ' । राजा होता धर्मज्ञ ।
त्याचा सखा असे प्राण । ' मणिभद्र ' म्हणोनि परियेसा ॥ ६४ ॥
सदा ईश्र्वरभक्ति करी । नानापरी पूजी अपारी ।
भोळा-देव प्रसन्न करी । दिधला चिंतामणि एक ॥ ६५ ॥
कोटिसूर्याचा प्रकाश । माणिक शोभे महासुरस ।
कंठी घाली सदा हर्ष । तया मणिभद्र सेनसख्यासी ॥ ६६ ॥
तया मण्याचे लक्षण । सुवर्ण होती लोह पाषाण ।
तेज फांके ज्यावरी जाण । कनक होय परियेसा ॥ ६७ ॥
जें जें चिंतीत मानसीं । तें तें पावे स्मरणेसीं ।
ऐशी ख्याति माणकासी । समस्त राजे कांक्षा करिती ॥ ६८ ॥
इष्टत्वे मागती कित्येक । मागों पाठविती तें माणिक ।
बलात्कारे घ्यावया देख । राजे वांछिती परियेसा ॥ ६९ ॥
म्हणती क्रय करुनि देखा । माणिक द्यावें आपणां ऐका ।
जरी न देसी स्वाभाविका । युद्धालागी येऊ म्हणती ॥ ७० ॥
राजे समस्त मिळोनि । पातले नगरा त्या उज्जनी ।
अपार सैन्य मिळवूनि क्षोणी । वेष्टिलें तया नगरासी ॥ ७१ ॥
ते दिनी शनिवार त्रयोदशी । राजा बैसला पूजेसी ।
शंका न धरी मानसीं । एकचित्तें पूजीतसे ॥ ७२ ॥
महाकाळेश्र्वरलिंगासी । पूजा करी राजा हर्षी । 
गौळिणी-कुमरें पहावयासी । आली तया शिवालया ॥ ७३ ॥
पूजा पाहूनि शिवाची । मुलें म्हणती गवळणींचीं ।
खेळूं चला आम्हीं ऐसेंचि । लिंग करुनि पूजूं आतां ॥ ७४ ॥
विनोदेकरुनि । आली आपुले गृहासंनिधानीं ।
एकवटोनि पाषाणीं । कल्पिलें तेथे शिवालय ॥ ७५ ॥
पाषाण एक करुनि लिंग । पूजा करिती बाळकें चांग ।
नानापरीची पत्री साङग । कल्पिती तेथें पूजेसी ॥ ७६ ॥
षोडशोपचारे पूजा कल्पिती । उदक नैवेद्य समर्पिती ।
ऐसे कौतुके खेळती । ते गोपकुमारक ॥ ७७ ॥
गोपिका स्रिया येउनि । पुत्रांतें नेती बोलावुनी ।
भोजन करावे म्हणोनि । गेलीं सकळ बाळकें ॥ ७८ ॥
त्यांतील एक गोपीसूनु । न जाय भुवना लिंग सोडून ।
त्याची माता जवळी येऊन । मारी आपुले पुत्रासी ॥ ७९ ॥
म्हणे कुमारा भोजनासी । चाल घरा जाहली निशी ।
कांही केलिया न वचे परियेसी । तो गोपीकुमारक ॥ ८० ॥
कोपेकरुनि ते गौळणी । मोडी पूजा-खेळ आंगणी ।
पाषाण दूरी टाकुनी । गेली आपुले मंदिरासी ॥ ८१ ॥
पूजा मोडितां बाळक । प्रलाप करीतसे तो अनेक ।
मूर्च्छा येऊनि क्षणएक । पडिला भूमी अवधारा ॥ ८२ ॥
लय लावूनि लिंगस्थानीं । प्राण त्यजूं पाहे निर्वाणी ।
प्रसन्न झाला तो शूलपाणी । तया गोपीसुताला ॥ ८३ ॥
शिवालय रत्नखचित । सूर्यतेजें जैसे शोभित । 
लिंग दिसे रत्नखचित । जागृत झाला तो बाळक ॥ ८४ ॥
निजरुप धरुनि गौरीरमण । उठवी बाळका करीं धरुन ।
वर माग म्हणे मी प्रसन्न । जें वांछिसी तें देईन ॥ ८५ ॥  
बाळकें विनविले ईश्र्वरासी । कोप न करावा मातेसी ।
पूजा मोडिली प्रदोषी । क्षमा करणें म्हणतसे ॥ ८६ ॥
ईश्र्वर भोळा-चक्रवर्ती । वर दिधला बहुतप्रीतीं ।
" प्रदोषसमयीं पूजा देखती । गौळणी होय देवजननी ॥ ८७ ॥
तिच्या पोटीं होईल सुत । तोचि विष्णुअवतार विख्यात ।
न करी पूजा वहिली म्हणत । पोषील आपुले पुत्रापरी ॥ ८८ ॥
जें जें मनीं तूं इच्छिसी । पावेल वेगी धरी मानसीं ।
अखिल सौख्य तुझिया वंशी । पुत्रपौत्रीं नांदाल ॥ ८९ ॥
प्रसन्न होवोनि गिरिजापती । गेले लिंगालयीं गुप्ती ।
शिवालय राहिलें रत्नखचिती । गौळियाघरी तयाचपरी ॥ ९० ॥ 
कोटिसूर्याचा प्रकाश । शिवालय दिसे सुरस ।
लोक म्हणती काय प्रकाश । उदय झाला दिनकरा ॥ ९१ ॥
आले होते परराष्ट्र-राजे । विस्मय करिती महाचोजें ।
द्वेष सांडूनि बोलती वोजे । भेटो म्हणती रायासी ॥ ९२ ॥
पहा हो पवित्र नगरांत । सूर्य झाला असे उदित । 
राजा असेल पुण्यवंत । ऐसियांसी काय विरोध ॥ ९३ ॥
म्हणोनि पाठविती सेवकासी । भेटूं म्हणती प्रीतीसीं । 
राजा बोलावी तयांसी । आपुलें गृहीं नगरांत ॥ ९४ ॥
इतुके होतां तें अवसरीं । राजा पुसतो प्रीतीकरी । 
रात्रि असतां अंधकारी । उदय जाहला केवीं सूर्य ॥ ९५ ॥
राजे चंद्रसेनासहित । पाहावया येती कवतुकार्थ ।
दिसे विचित्र रत्नखचित । शिवालय अनुपम्य ॥ ९६ ॥
तेणेचि परी गौळ्याचे सदन । विराजमान अतिगहन ।
पुसता झाला राजा आपण । तया गौळियाकुमारकासी ॥ ९७ ॥ 
सांगितला सर्व वृत्तांत । संतोष करिती राजे समस्त ।
गौळियां राजा तूं होई म्हणत । देती नानादेशसंपदा ॥ ९८ ॥
निघोनि गेले राजे सकळ । राहिला चंद्रसेन निर्मळ ।
शनिप्रदोष पूजा फळ । भय कैचे तया नरा ॥ ९९ ॥
गौळिकुमर जाय घरा । मातेसी सांगे सविस्तरा ।
" येईल पुढें तुझ्या उदरा । नारायण अवतरोनि ॥ १०० ॥
ऐसा ईश्र्वरे दिधला वर । संशय न धरीं निर्धार ।
प्रसन्न जाहला कर्पूरगौर । देखिली पूजा प्रदोषींची ॥ १०१ ॥
मोडिलीस प्रदोषपूजा म्हणोनि । म्यां मागितलें त्या शूलपाणी ।
क्षमा करुनि घेतलें " म्हणोनि । सांगे वृत्तांत मातेसी ॥ १०२ ॥
ऐसा ईश्र्वर प्रसन्न झाला । प्रदोषपूजा ऐसे फळ ।
श्रीपाद सांगती तये वेळा । तया विप्रस्रियेसी ॥ १०३ ॥
तुझे मनी असेल जरी । होईल पुत्र मजसरी ।
संशय सांडूनि निर्धारीं । शनिप्रदोषीं पूजी शंभु ॥ १०४ ॥
ऐसे म्हणोनि श्रीपादरावो । चक्रवर्ती-भोळा देवो ।
विप्रस्रियेचा पाहोनि भावो । प्रसन्न होत तया वेळीं ॥ १०५ ॥
बोलावूनि तिचे कुमारकासी । हस्त ठेविती मस्तकेसी ।
ज्ञान जाहलें तत्काळेसी । त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ ॥ १०६  ॥
वेदशास्त्रादि तर्क-भाषा । म्हणता झाला अतिप्रकाशा । 
विस्मय झाला असमसहासा । विप्र म्हणती अति आश्र्चर्य ॥ १०७ ॥
विस्मय करोनि विप्रवनिता । म्हणे ईश्र्वर निश्र्चित ।
कार्याकारण अवतार होत । आला नरदेह धरोनि ॥ १०८ ॥
पूर्वजन्मीचें पुण्यार्जित । जोडलें हें निश्र्चित । 
जो भेटला श्रीगुरुनाथ  । म्हणोनि नमिलें क्षणक्षणां ॥ १०९ ॥
म्हणे ईश्र्वर तूंचि होसी । पूजा करीन मी तुज प्रदोषीं ।
मिथ्या नव्हे तुझिया वाक्यासी । पुत्र व्हावा तुजऐसा ॥ ११० ॥
ऐसा निश्र्चय करोनि । पूजा करी ती नित्य येऊनि । 
प्रदोषपूजा अतिगहनी । करी श्रीपादरायासी ॥ १११ ॥
पुत्र झाला तिचा महाज्ञानी । वेदशास्त्रसंपन्नी । 
पूज्य जाहला अति गहनी । सर्वांहूनि अधिकता ॥ ११२ ॥
विवाह झाला मग तयासी । पुत्रपौत्रीं नांदे हर्षी । 
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । ऐसे होय अवधारा ॥ ११३ ॥
ऐसा श्रीगुरु कृपावंत । भक्तजना असे रक्षित ।
ऐक शिष्या एकचित्त । नामधारका श्रीमंता ॥ ११४ ॥ 
नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध वेस्तारेसीं ।
परियेसा समस्त भक्त हर्षी । म्हणे सरस्वती-गंगाधरु ॥ ११५ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शनिप्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्यायः ॥ श्रीनरसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

GuruCharitra Adhyay 8 

श्रीगुरुचरित्र अध्याय आठवा (८)

Custom Search