Saturday, December 10, 2011

Guruchatria Adhyay 14 श्री गुरुचरित्र अध्याय १४ वा

ShriPad ShriVallabha and Shri Nrusinha Sarawati

Guruchatria Adhyay 14 

Guruchatria Adhyay 14 is in Marathi. This Adhyay describes how Guru Nrusinha Sarswati helped his disciple Sayandeo from a dreadful condition. Sayandeo had been called by the king. The king is very cruel. Whenever the king calls any person, people knew that that person would be killed. As such Sayandeo was going to meet his death. Hence he approached his Guru Nrusinha Saraswati and requested him to bless his family and Guru-Bhakti will continue in his family even after his death. He also told Guru that he (Sayandeo) is going to meet his death as he has been called by the king. Guru Nrusinha Saraswati assured him that king will not kill him. On the contrary king will honor him and give him many gifts. Further he assured him that he himself (Guru Nrusinha Saraswati) will wait there, till he (Sayandeo) returns back after visiting King. Sayandeo went to the palace where he had been called by the king. King was very furious and angry. He went inside to bring the weapon to kill Sayandeo. But after going in the room king fell asleep and dreamed that some body is beating him. He woke up and found himself paining very badly as such he came back to Sayandeo and asked to forgive him. He (king) gave Sayandeo money, clothes and many valuables. As such everything went as Guru Nrusinha Saraswati had told Sayandeo. This Adhyay 14 is always read by the devotees for removing any dreadful difficulty. Many have been successfully tackled dreadful difficulty in their life and found happiness and peace by reading this Adhyay to a specified number of times. 

श्रीगुरुचरित्र अध्याय १४ 
श्री गणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I श्रीगुरुभ्यो नमः I
नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I
प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II 
जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I 
पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I 
पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II 
ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I 
गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II 
ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I 
तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II 
गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I 
पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II 
तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I 
भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II 
ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव विप्र करी नमन I 
माथा ठेवून चरणी I न्यासिता झाला पुनःपुन्हा II ८ II 
जय जया जगद्गुरू I त्रयमूर्तींचा अवतारू I 
अविद्यामाया दिससी नरु I वेदां अगोचर तुझी महिमा II ९ II 
विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी I 
धरिला वेष तूं मानुषी I भक्तजन तारावया II १० II 
तुझी महिमा वर्णावयासी I शक्ति कैंची आम्हांसी I 
मागेन एक आता तुम्हांसी I तें कृपा करणे गुरुमूर्ति II ११ II 
माझे वंशपारंपरी I भक्ति द्यावी निर्धारी I 
इहे सौख्य पुत्रपौत्री I उपरी द्यावी सद्गति II १२ II 
ऐसी विनंति करुनी I पुनरपि विनवी करुणावचनी I 
सेवा करितो द्वारयवनी I महाशूरक्रुर असे II १३ II 
प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी I घात करितो जीवेसी I 
याचि कारणे आम्हांसी I बोलावीतसे मज आजि II १४ II 
जातां तया जवळी आपण I निश्चये घेईल माझा प्राण I 
भेटी जाहली तुमचे चरण I मरण कैचे आपणासी II १५ II 
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I अभयंकर आपुले हाती I 
विप्रमस्तकी ठेविती I चिंता न करी म्हणोनिया II १६ II 
भय सांडूनि तुवां जावे I क्रुर यवना भेटावे I 
संतोषोनि प्रियभावे I पुनरपि पाठवील आम्हांपाशी II १७ II 
जंववरी तू परतोनि येसी I असो आम्ही भरंवसी I 
तुवां आलिया संतोषी I जाऊ आम्हीं येथोनि II १८ II 
निजभक्त आमुचा तू होसी I पारंपर-वंशोवंशी I 
अखिलाभीष्ट तू पावसी I वाढेल संतति तुझी बहुत II १९ II 
तुझे वंशपारंपरी I सुखे नांदती पुत्रपौत्री I 
अखंड लक्ष्मी तयां घरी I निरोगी होती शतायुषी II २० II 
ऐसा वर लाधोन I निघे सायंदेव ब्राह्मण I 
जेथे होता तो यवन I गेला त्वरित तयाजवळी II २१ II 
कालांतक यम जैसा I यवन दुष्ट परियेसा I 
ब्राह्मणाते पाहतां कैसा I ज्वालारूप होता जाहला II २२ II 
विमुख होऊनि गृहांत I गेला यवन कोपत I 
विप्र जाहला भयचकित I मनीं श्रीगुरूसी ध्यातसे II २३ II 
कोप आलिया ओळंबयासी I केवी स्पर्शे अग्नीसी I 
श्रीगुरूकृपा होय ज्यासी I काय करील क्रुर दुष्ट II २४ II 
गरुडाचिया पिलीयांसी I सर्प तो कवणेपरी ग्रासी I 
तैसे तया ब्राह्मणासी I असे कृपा श्रीगुरुची II २५ II 
कां एखादे सिंहासी I ऐरावत केवीं ग्रासी I 
श्रीगुरुकृपा होय ज्यासी I कलिकाळाचे भय नाही II २६ II 
ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I त्यासी कैंचे भय दारुण I 
काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करी II २७ II 
ज्यासि नांही मृत्यूचे भय I त्यासी यवन असे तो काय I 
श्रीगुरुकृपा ज्यासी होय I यमाचे मुख्य भय नाही II २८ II 
ऐसेपरी तो यवन I अन्तःपुरांत जाऊन I 
सुषुप्ति केली भ्रमित होऊन I शरीरस्मरण त्यासी नाही II २९ II 
हृदयज्वाळा होय त्यासी I जागृत होवोनि परियेसी I 
प्राणांतक व्यथेसी I कष्टतसे तये वेळी II ३० II 
स्मरण असे नसे कांही I म्हणे शस्त्रे मारितो घाई I 
छेदन करितो अवेव पाही I विप्र एक आपणासी II ३१ II 
स्मरण जाहले तये वेळी I धांवत गेला ब्राह्मणाजवळी I 
लोळतसे चरणकमळी I म्हणे स्वामी तूंचि माझा II ३२ II 
येथे पाचारिले कवणी I जावे त्वरित परतोनि I 
वस्त्रे भूषणे देवोनि I निरोप दे तो तये वेळी II ३३ II 
संतोषोनि द्विजवर I आला ग्रामा वेगवत्र I 
गंगातीरी असे वासर I श्रीगुरुचे चरणदर्शना II ३४ II 
देखोनिया श्रीगुरूसी I नमन करी तो भावेसी I
स्तोत्र करी बहुवसी I सांगे वृत्तांत आद्यंत II ३५ II 
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I तया द्विजा आश्वासिती I 
दक्षिण देशा जाऊ म्हणती I स्थान-स्थान तीर्थयात्रे II ३६ II 
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I 
न विसंबे आतां तुमचे चरण I आपण येईन समागमे II ३७ II 
तुमचे चरणाविणे देखा I राहो न शके क्षण एका I 
संसारसागर तारका I तूंचि देखा कृपासिंधु II ३८ II 
उद्धरावया सगरांसी I गंगा आणिली भूमीसी I 
तैसे स्वामी आम्हासी I दर्शन दिधले आपुले II ३९ II 
भक्तवत्सल तुझी ख्याति I आम्हा सोडणे काय नीति I 
सवे येऊ निश्चिती I म्हणोनि चरणी लागला II ४० II 
येणेपरी श्रीगुरूसी I विनवी विप्र भावेसी I 
संतोषोनि विनयेसी I श्रीगुरू म्हणती तये वेळी II ४१ II 
कारण असे आम्हा जाणे I तीर्थे असती दक्षिणे I 
पुनरपि तुम्हां दर्शन देणे I संवत्सरी पंचदशी II ४२ II 
आम्ही तुमचे गांवासमीपत I वास करू हे निश्चित I 
कलत्र पुत्र इष्ट भ्रात I मिळोनी भेटा तुम्ही आम्हां II ४३ II 
न करा चिंता असाल सुखे I सकळ अरिष्टे गेली दुःखे I 
म्हणोनि हस्त ठेविती मस्तके I भाक देती तये वेळी II ४४ II 
ऐसेपरी संतोषोनि I श्रीगुरू निघाले तेथोनि I 
जेथे असे आरोग्यभवानी I वैजनाथ महाक्षेत्र II ४५ II 
समस्त शिष्यांसमवेत I श्रीगुरू आले तीर्थे पहात I 
प्रख्यात असे वैजनाथ I तेथे राहिले गुप्तरूपे II ४६ II 
नामधारक विनवी सिद्धासी I काय कारण गुप्त व्हावयासी I 
होते शिष्य बहुवसी I त्यांसी कोठे ठेविले II ४७ II 
गंगाधराचा नंदनु I सांगे गुरुचरित्र कामधेनु I 
सिद्धमुनि विस्तारून I सांगे नामकरणीस II ४८ II 
पुढील कथेचा विस्तारू I सांगता विचित्र अपारु I 
मन करूनि एकाग्रु I ऐका श्रोते सकळिक हो II ४९ II
इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II

Guruchatria Adhyay 14




Custom Search

Thursday, December 8, 2011

Guruchatria Adhyay 4

Anusuya and God Dattatreya 

Guruchatria Adhyay 4

Guruchatria Adhyay 4 is in Marathi. This Adhyay describes the avatar or birth of God Dattatreya. God Dattatreya is incarnation of God Vishnu, God Shiva and God Brahma. Atri Rushi and his wife Anusuya are father and mother of God Dattatreya. Anusuya was pativrata (very pious Lady). God Indra was afraid of her, thinking that she may displace him capture kingdom of Gods. She was just like a God. Hence Indra approached God Vishnu,God Shiva and God Brahma informing them that he is afraid of pativrata Anusuya. She may challenge king of the God's kingdom. Hence three Gods Brahma, Vishnu and Shiva thought that they have to visit Arti Rushy's house and see how far Anusuya is pious and what her powers are. These three Gods came to Atri rushy's house as athiti midafternoon when Anusuya was alone and rushy was out for meditation. Athiti is treated like a god when he comes to the house in the afternoon. Hence Anusuya welcome them and serve them food but athiti asked her to serve them food without wearing clothes. Anusuya took name of the husband and proceed to serve them food as they desired. However when she came with the food and she found that the athities were became children. Being hungry three children were crying, she feed them and then these three gods became her children and their names were Durvas, Chandra and Dattatreya. In short this is story of a very pious lady Anusuya and God Dattatreya. 

श्री गुरुचरित्र अध्याय ४ चौथा 
श्रीदत्त-जन्म 
श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्री गुरुभ्यो नमः II 
ऐशी शिष्याची विनंती I ऐकोन सिद्ध काय बोलती I 
साधु-साधु तुझी भक्ति I प्रीति पावो गुरुचरणीं II १ II 
ऐक शिष्यचूडामणी I धन्य धन्य तुझी वाणी I 
आठवतसे तुझिया प्रश्नीं I आदि-मध्य-अवसानक II २ II 
प्रश्न केला बरवा निका I सांगेन तुज विवेका I 
अत्रिऋषीच्या पूर्वका I सृष्टीउत्पत्तीपासोनि II ३ II 
पूर्वी सृष्टि नव्हती कांही I जलमय होतें सर्वांठायीं I 
'आपोनारायण ' म्हणोनि पाहीं I वेद बोलती याचिकारणें II ४ II 
आपोनारायण आपण I सर्वां ठायीं वास पूर्ण I 
बुद्धि संभवे प्रपंचगुण I अंड निर्मिलें हिरण्यवर्ण II ५ II 
तेंचि ब्रह्मांड नाम जाहलें I रजोगुणें ब्रह्मयासि निर्मिलें I 
'हिरण्यगर्भ' नाम पावलें I देवतावर्ष एक होतें II ६ II 
तेंचि ब्रह्मांड देखा I फुटोनि शकलें झालीं द्वैका I 
एक आकाश एक भूमिका I होऊनि ठेलीं शकलें दोनी II ७ II 
ब्रह्मा तेथें उपजोन I रचिलीं चवदाही भुवनें I 
दाही दिशा मनस वचन I काळकामक्रोधादि सकळ II ८ II 
पुढें सृष्टि रचावयासी I सप्त पुत्र उपजवी मानसीं I 
नामें सांगेन परियेसीं I सातै जण ब्रह्मपुत्र II ९ II 
मरीचि अत्रि आंगिरस I पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ I 
सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ I सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण II १० II 
सप्त पुत्रांमधील 'अत्रि' I तेथूनि पीठ गुरुसंतति I 
सांगेन ऐक एकचित्तीं I सौभाग्यवंता नामधारका II ११ II 
अत्रिऋषीची भार्या I नाम तिचें 'अनसूया ' I 
पतिव्रताशिरोमणिया I जगदंबा तेचि जाण II १२ II 
तिचें सौंदर्यलक्षण I वर्णूं शके ऐसा कोण I 
जिचा पुत्र चंद्र आपण I तिचें रूप केवीं सांगों II १३ II 
पतिसेवा करी बहुत I समस्त सुरवर भयाभीत I 
स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित I म्हणोनि चिंतिती मानसीं II १४ II 
इंद्रादि सुरवर मिळूनि I त्रिमूर्तीपाशीं जाऊनि I 
विनविताति प्रकाशोनि I आचार अत्रिऋषीचा II १५ II 
इंद्र म्हणतसे स्वामियां I पतिव्रता स्त्री अनसूया I 
आचार तिचा अगम्य I काय सांगों विस्तारोनि II १६ II 
पतिसेवा करी भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मेसीं I 
अतिथीपूजा महाहर्षी I विमुख नव्हे कवणे काळीं II १७ II 
तिचा आचार देखोनि I सूर्य भीतसे गगनीं I 
उष्ण तिसी लागे म्हणोनि I मंद मंद तपतसे II १८ II 
अग्नि झाला अति भीत I शीतळ असे वर्तत I 
वायु झाला भयचकित I मंद मंद वर्ततसे II १९ II 
भूमि आपण भिऊनि देखा I नम्र जाहली तिचिया पादुका I 
शाप देईल म्हणोनि ऐका I समस्त आम्ही भीतसों II २० II 
नेणों घेईल कवण स्थान I कवण देवाचें हिरोन I 
एखादिया वर देतांचि क्षण I तोही आमुतें मारुं शके II २१ II 
त्यासि करावा उपावो I तूं जगदात्मा देवरावो I 
जाईल आमुचा स्वर्गठावो I म्हणोनि तुम्हां सांगो आलों II २२ II 
न कराल जरी उपाव यासी I सेवा करूं आम्ही तिसी I 
तिच्या द्वारी अहर्निशीं I राहूं चित्त धरुनि II २३ II 
ऐसें ऐकोनि त्रयमूर्ति I महाक्रोधें कापती I 
चला जाऊं कैसी सती I पतिव्रता म्हणताति II २४ II 
व्रतभंग करूनि तिसी I ठेवूनि येऊं भूमीसी I 
अथवा वैवस्वतालयासी I पाठवूं म्हणोनि निघाले II २५ II 
वास पाहावया सतीचें I त्रयमूर्ति वेष धरिती भिक्षुकाचे I 
आश्रमा आले अत्रीचे I अभ्यागत होऊनि II २६ II 
ऋषि करावया गेला अनुष्ठान I मागें आले त्रयमूर्ति आपण I 
अनसूयेसी आश्र्वासून I अतिथि आपण आलों म्हणती II २७ II 
क्षुधेंकरुनि बहुत पीडोन I आलों आम्ही ब्राम्हण I 
त्वरित द्दावें सती अन्न I अथवा जाऊं आणिका ठायां II २८ II 
सदा तुमच्या आश्रमांत I संतर्पण अभ्यागत I 
ऐकिली आम्ही कीर्ति विख्यात I म्हणोनि आलों अनसूये II २९ II 
इच्छाभोजनदान तुम्ही I देतां म्हणोनि ऐकों आम्ही I 
ठाकोनि आलों याचि कामीं I इच्छाभोजन मागावया II ३० II 
इतुकें ऐकोनि अनसूया I नमन केलें अतिविनया I 
बैसकार करूनियां I क्षालन केलें चरण त्यांचे II ३१ II 
अर्घ्य पाद्य देऊनि त्यांसी I गंधाक्षतापुष्पेसीं I 
सवेंचि म्हणतसे हर्षी I आरोगण सारिजे II ३२ II 
अतिथि म्हणती तये वेळी I करोनि आलों आपण आंघोळी I 
ऋषि येतील बहुतां वेळीं I त्वरित आम्हांसी भोजन द्यावें II ३३ II 
वास पाहोनि अतिथींतें I काय केलें पतिव्रतें I 
ठाय घातले त्वरितें I केला तेथें बैसकार II ३४ II 
बैसवोनियां पाटावरी I घृतेसीं पात्राभिधार करी I 
घेवोनि आली अनसूया नारी I शाक पाक तये वेळीं II ३५ II 
तिसी म्हणती अवो नारी I आम्ही अतिथि आलों दूरी I 
देखोनि तुझें रूप सुंदरी I अभीष्ट मानसीं आणिक वसे II ३६ II 
नग्न होऊनि आम्हांसी I अन्न वाढावें परियेसीं I 
अथवा काय निरोप देसी I आम्ही जाऊं नाहीं तरी II ३७ II 
ऐकोनि अतिथींचे वचन I अनसूया करी चिंतन I 
आले विप्र पहावया मन I पुरुष कारणिक होतील II ३८ II 
पतिव्रताशिरोमणी I विचार करी अंतःकरणीं I 
अतिथि विमुख, तपोहानि I पतिनिरोप केवी उल्लंघूं II ३९ II 
माझें मन असे निर्मळ I काय करील मन्मथ खळ I 
पतीचें असे जरी तपफळ I तारील मज म्हणतसे II ४० II 
ऐसें विचारूनि मानसीं I तथास्तु म्हणे तयासी I 
भोजन करा स्वचित्तेंसी I वाढीन नग्न म्हणतसे II ४१ II 
पाकस्थाना जाऊनि आपण I चिंतन करी पतीचे चरण I 
वस्त्रें फेडूनि झाली नग्न I म्हणे अतिथि बाळें माझीं II ४२ II 
नग्न होऊनि सती देखा I घेऊनि आली अन्नोदका I 
तंव तेचि जाहलीं बाळकां I ठायांपुढें लोळतीं II ४३ II 
बाळकें देखोनि अनसूया I भयचकित होऊनियां I 
पुनरपि वस्त्रें नेसूनियां I आली तयां बाळकांपाशीं II ४४ II 
रोदन करिताति तिन्ही बाळें I अनसूया राहवी वेळोवेळें I 
क्षुधार्त झालीं केवळें I म्हणोनि कडे घेतलें II ४५ II 
कडे घेवोनि बाळकांसी I स्तनपान देतसे हर्षी I 
एका सोडोनी एकासी I निवारण करीं क्षुधेचें II ४६ II 
पाहें पां नवल काय घडलें I त्रयमूर्तीचे बाळक झाले I 
स्तनपानमात्रें क्षुधा गेली I तपफळ ऐसें पतिव्रतेचें II ४७ II 
ज्याचे उदरी चवदा भुवने I सप्त समुद्र वडवान्न I 
त्याची क्षुधा निवारण I पतिव्रतास्तनपानमात्रें II ४८ II 
चतुर्मुख ब्रह्मयासी I सृष्टि रचणें अहर्निशी I 
त्याची क्षुधा स्तनपानेसीं I केवीं झाली निवारण II ४९ II 
भाळाक्ष कर्पूरगौर I पंचवक्त्र काळाग्निरुद्र I 
स्तनपान करवी अनसूयासुंदर I तपस्वी हो अत्रि ऐसा II ५० II 
अनसूया ऐशी अत्रीची रमणी I न होती मागें ऐकिली कवणीं I 
त्रयमूर्तीची झाली जननी I ख्याति झाली त्रिवभूनी II ५१ II 
कडे घेवोनि बाळकांसी I खेळवीतसे तिघांसी I 
घालूनि बाळकां पाळणेसीं I पर्यंदे गाई तये वेळीं II ५२ II 
पर्यंदे गाय नानापरी I उपनिषदार्थ अतिकुसरीं I 
अतिउल्हासें सप्त स्वरीं I संबोखीतसे त्रिमूर्तीसी II ५३ II 
इतुकें होतां तये वेळीं I माध्यान्हकाळीं अतिथिवेळीं I 
अत्रिऋषि मन निर्मळीं I आले आपुले आश्रमा II ५४ II 
घरांत आला अवलोकित I तंव देखिली अनसूया गात I 
कैंची बाळें ऐसें म्हणत I पुसतसे तयेवेळीं II ५५ II 
तिणें सांगितला वृत्तांत I ऋषि ज्ञानें असे पहात I 
त्रिमूर्ति हेचि म्हणत I नमस्कार करीतसे II ५६ II 
नमस्कारितां अत्रि देखा I संतोष विष्णु-पिनायका I 
आनंद झाला चतुर्मुखा I प्रसन्न झाले तये वेळीं II ५७ II 
बाळें राहिली पाळणेंसी I निजमूर्ति ठेले सन्मुखेंसी I 
साधु-साधु अत्रिऋषि I अनसूया पतिव्रता II ५८ II 
तुष्टलों तुझिये भक्तीसी I वर माग जे इच्छिसी I 
अत्रि म्हणतसे सतीसी I जें वांछिसी तें माग आतां II ५९ II 
अनसूया म्हणे अत्रीसी I प्राणेश्वरु तूंचि होसी I 
देव पातले तुमचे भक्तीसी I पुत्र मागा तुम्ही आतां II ६० II 
तिघे बाळक आमच्या घरीं I राहावे आमुच्या पुत्रांपरी I 
हेंचि मागणें निर्धारीं I त्रिमूर्ति असावे एकरूप II ६१ II 
ऐसें वचन ऐकोनि I वर दिधला मूर्ती तिन्हीं I 
राहतीं बाळकें म्हणोनि I आपण गेले निजालयासी II ६२ II 
त्रिमूर्ति राहिले तिचे घरी I अनसूया पोशी बाळकांपरी I 
नामें ठेविलीं प्रीतिकरीं I त्रिवर्गाचीं परियेसा II ६३ II 
ब्रह्मामूर्ति 'चंद्र' झाला I विष्णुमूर्ति 'दत्त' केवळा I 
ईश्वरातें 'दुर्वास' नाम ठेविलें I तिघे पुत्र अनसूयेचे II ६४ II 
दुर्वास आणि चंद्र देखा I उभे राहूनि माताभिमुखा I 
निरोप मागती कवतुका I जाऊं तपा निजस्थाना II ६५ II 
दुर्वास म्हणे अहो जननी I आम्ही ऋषि अनुष्ठानी I 
जाऊं तीर्थे-आचरणीं I म्हणोनि निरोप घेतला II ६६ II 
चंद्र म्हणे अवो माते I निरोप द्यावा आम्हां त्वरितें I 
चंद्रमंडळीं वास आमुतें I नित्य दर्शन तुम्हांचरणीं II ६७ II 
तिसरा दत्त विष्णुमूर्ति I असेल तुम्हांतें धरोनि चित्तीं I 
त्रिमूर्ति निश्र्चित म्हणोनि सांगती I हें मनीं धरावें तुम्हीं II ६८ II 
त्रयमूर्ति तोचि जाण दत्त I ' सर्वं विष्णुमयं जगत् ' I 
राहील धरोनि तुमचें चित्त I श्रीविष्णुमूर्ति दत्तात्रेय II ६९ II 
त्रयमूर्ति ऐक्य होऊन I दत्तात्रेय राहिला आपण I 
दुर्वास चंद्र निरोप घेऊन I गेले स्थाना आपुलाले II ७० II 
अनसूयेच्या घरीं देखा I त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका I 
नाम दत्तात्रेय ऐका I मूळपीठ श्रीगुरूचें II ७१ II 
ऐसेपरी सिद्ध देखा I सांगे कथा नामधारका I 
संतोषेंकरूनि प्रश्र्न ऐका I पुसतसे सिद्धासी II ७२ II 
जय जया सिद्ध योगीश्वरा I भक्तजनाच्या मनोहरा I 
तारक संसारसागरा I ज्ञानमूर्ति कृपासिंधु II ७३ II 
तुझेनि प्रसादें मज I ज्ञान उपजलें, सतीकाज I 
तारक आमुचा योगिराज I विनंति माझी परियेसा II ७४ II 
दत्तात्रेयाचा अवतारू I सांगितला पूर्वापारू I 
पुढें मागुती अवतार जाहले गुरु I कवणेपरी निरोपावे II ७५ II 
विस्तारुनि बाळकासी I सांगावें स्वामी प्रीतीसीं I 
श्रीगुरूमूर्ति अवतार जाहले कैसी I अनुक्रमें निरोपावें II ७६ II 
म्हणे सरस्वती गंगाधरू I पुढील कथेचा विस्तारू I 
ऐकतां होय मनोहरु I सकळाभीष्टे साधती II ७७ II 
II इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने 
सिद्धनामधारकसंवादे त्रैमूर्ति-अवतारकथनंनाम चतुर्थोSध्यायः II 
II श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II 


Guruchatria Adhyay 4 





Custom Search

Tuesday, December 6, 2011

GuruCharitra Avataranika

GuruCharitra Avataranika 

Gurucharitra is a pious and holy Grantham (Book) in Marathi. This Grantham consists of stories of Incarnation of God Dattatreya, ShriPad ShriVallabha and Nrushinha Saraswati. God Dattatreya himself is incarnation of God Brahma, God Vishnu and God Shiva. Gurucharitra is a collection of stories based on the blessings by Guru (Shri Nrusinha Saraswati and Shripad ShriVallabha) to different people, devotees for removing their sorrow, unhappiness and difficulties. There are 52 adhyayas (Chapters) in Gurucharitra grantham. 52nd adhyay lists all earlier 51 adhyayas main points. It is called as Avataranika. One can remember all 51 adhyayas by reading/listening the main points from 52nd adhyay. This Video is of adhyay no. 52 that is Avataranika. Many God Dattatreya devotees do parayana (read) of the Gurucharitra in seven days which is called as saptaha. There are many devotees, who read Gurucharitra in seven days so that they can complete it on the day of Datta Jayanti (Birth anniversary of God Dattatreya). This year Datta Jayanti is on 10th December 2011. So devotees will start reading Gurucharitra from 3rd December 2011 and will complete it on 10th December 2011. Avataranika describes the procedure of reading Gurucharitra which will be helpful to the devotees who don’t know the procedure of reading Gurucharitra. One who has a holy, kind heart can read Gurucharitra always at any time. He will become happy anywhere. For those devotees who want to complete it in seven days there is a procedure as under. 
• Take a bath to clean and purify your body. 
• Perform worship/pooja of the God to purify your mind. 
• Bow to the God and elderly people in your family. 
• Starting day and time of reading must be good. 
• Reading place must be the same for all seven days. 
• If you are reading it for specific purpose, then say it and tell it to God Dattatreya before starting reading. 
• Reader needs to be facing towards East or North while reading Gurucharitra. 
• Devotee needs to keep picture of God Dattatreya in front of him. 
• Holy lamp to be kept burning by using ghee. 
• Day One: Read adhyay from 1st to 7th 
• Day Two: Read adhyay from 8th to 18th 
• Day Three: Read adhyay from 19th to 28th 
• Day Four: Read adhyay from 29th to 34th 
• Day Five: Read adhyay from 35th to 37th 
• Day Six: Read adhyay from 38th to 43rd 
• Day Seven: Read adhyay from 44th to 52nd. 
Thus in short I have tried to write and explain main points of adhyay 52nd which is called as Avataranika.
   
श्रीगुरुचरित्र अध्याय ५२ अवतरणिका 
श्रीगणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I 
श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविन्दाभ्यां नमः I 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः I 
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः I I ॐ I I 
श्रोते व्हावे सावधान I श्रीगुरुचरित्राध्याय एकावन्न I 
ऐकोनि नामधारकाचे मन I ब्रह्मानंदी निमग्न पै I I १ I I 
सेवूनि गुरूचरित्रामृत I नामधारक तटस्थ होत I 
अंगी धर्म-पुलकांकित I रोमांचही ऊठती I I २ I I 
कंठ झाला सद्गदित I गात्रे झाली संकपित I 
विवर्ण भासे लोकांत I नेत्री वहाती प्रेमधारा I I ३ I I 
समाधिसुखे न बोले I देह अणुमात्र न हाले I 
सात्विक अष्टभाव उदेले I नामधारक-शिष्याचे I I ४ I I 
देखोनि सिद्ध सुखावती I समाधि लागली यासी म्हणती I 
सावध करावा मागुती I लोकोपकाराकारणे I I ५ I I 
म्हणोनि हस्ते कुरवाळिती I प्रेमभावे आलिंगिती I 
देहावरी ये ये म्हणती I ऐक बाळा शिष्योत्तमा I I ६ I I 
तू तरलासि भवसागरी I रहासी ऐसा समाधिस्थ जरी I 
ज्ञान राहील तुझ्या उदरी I लोक तरती कैसे मग I I ७ I I 
याकारणे अंतःकरणी I धृढता असावी श्रीगुरुचरणी I 
बाह्य देहाची रहाटणी I शास्त्राधारे करावी I I ८ I I 
तुवां विचारिले म्हणोनि I आम्हां आठवली अमृताची वाणी I 
तापत्रयाते करी हानि I ऐशी अनुपम्या प्रगटली I I ९ I I 
तुजमुळे आम्हां आठवले I तुवां आम्हां बरवे केले I 
त्वांही एकाग्रत्वे ऐकिले I आता हेंच विस्तारी I I १० I I 
नामधारका ऐशियापरी I सिद्ध सांगती परोपरी I 
मग तो नेत्रोन्मीलन करी I कर जोडोनि उभा ठाके I I ११ I I 
म्हणे कृपेचे तारू I तूंचि या विश्वास आधारू I 
भवसागर पैलपारु I तूंचि करिसी श्रीगुरुराया I I १२ I I 
ऐसे नामधारक विनवीत I सिद्धाचे चरणी लागत I 
म्हणे श्रीगुरूचरित्रामृत I अवतरणिका मज सांगा I I १३ I I 
या श्रीगुरूचरित्रामृती I अमृताहूनि परामामृती I 
भक्तजनांची मनोवृत्ति I बुडी देवोनि स्थिरावली I I १४ I I 
मी अतृप्त आहे अजूनि I हेचि कथा पुनः सुचवोनि I 
अक्षयामृत पाजूनि I आनंदसागरी मज ठेवा I I १५ I I 
बहु औषधींचे सार काढोन I त्रैलोक्यचिंतामणी रसायण I 
संग्रह करिती विचक्षणे I तैसे सार मज सांगा I I १६ I I 
ऐकोनि शिष्याची प्रार्थना I आनंद सिद्धाचिया मना I 
म्हणती बाळका तुझी वासना I अखंड राहो श्रीगुरूचरित्री I I १७ I I 
श्रीगुरूचरित्राची ऐका I सांगेन आतां अवतरणिका I 
प्रथमपासूनि सारांश निका I एकवन्नाध्यायपर्यंत I I १८ I I 
प्रथमाध्यायी मंगलाचरण I मुख्य देवतांचे असे स्मरण I 
श्रीगुरूमूर्तीचे दर्शन I भक्ताप्रती जाहले I I १९ I I 
द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती I चारी युगांचे भाव कथिता I 
श्रीगुरुसेवा दीपकाप्रती I घडली ऐसे कथियेले I I २० I I 
नामधारका अमरजासंगमा I श्रीगुरू नेती आपुले धामा I 
अंबरीष दुर्वास यांचा महिमा I तृतीयाध्यायी कथियेला I I २१ I I 
चतुर्थाध्यायी अनसूयेप्रती I छळावया त्रैमूर्ति येती I 
परी तियेचे पुत्र होती I स्तनपान करिती आंनदे I I २२ I I 
पंचमी श्रीदत्तात्रेय धरी I स्वये अवतार पीठापुरी I 
' श्रीपाद-श्रीवल्लभ ' नामधारी I तीर्थयात्रेसी निघाले I I २३ I I 
सहाव्यांत लिंग घेऊनि I रावण जातां गोकर्णी I 
विघ्नेश्वरे विघ्न करूनि I स्थापना केली त्याची I I २४ I I 
गोकर्णमहिमा असंख्यात I रायाप्रती गौतम सांगत I 
चांडाळी उद्धरिली अकस्मात I सातव्या अध्यायी वर्णिती I I २५ I I 
माता पुत्र जीव देत होतीं I तयांप्रती गुरु कथा सांगती I 
शनिप्रदोष व्रत देती I ज्ञानी करिती अष्टमीं I I २६ I I 
नवमाध्यायीं रजकाप्रती I कृपाळू गुरु राज्य देती I 
दर्शन देऊं म्हणती पुढती I गुप्त झाले मग तेथें I I २७ I I 
तस्करीं मारिला भक्त ब्राह्मण I तस्करां वधिती श्रीगुरु येऊन I 
ब्राह्मणाला प्राणदान I देती दशमाध्यायांत I I २८ I I 
" माधव " ब्राह्मण करंजपुरीं I " अंबा " नामें त्याची नारी I 
'नरसिंह-सरस्वती ' तिचे उदरीं I एकादशीं अवतरले I I २९ I I 
द्वादशाध्यायी मातेप्रति I ज्ञान कथूनि पुत्र देती I 
काशीक्षेत्रीं सन्यास घेती I यात्रा करिती उत्तरेची I I ३० I I 
माता-पित्यांतें करंजपुरी I भेटोनि येती गोदातीरीं I 
कुक्षिव्यथेच्या विप्रावरी I कृपा करिती त्रयोदशीं I I ३१ I I 
क्रूर यवनाचें करूनि शासन I सायंदेवास वरदान I 
देती श्रीगुरु कृपा करून I चौदाविया अध्यायीं I I ३२ I I 
पंचदशीं श्रीगुरूमूर्ति I तीर्थे सांगती शिष्यांप्रती I 
यात्रे दवडूनि गुप्त होती I वैजनाथी श्रीगुरू I I ३३ I I 
षोडशीं ब्राह्मणा गुरुभक्ति I कथूनि दिधली ज्ञानशक्ति I 
श्रीगुरू आले भिल्लवडीप्रती I भुवनेश्वरी-संनिध I I ३४ I I 
भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण I जिव्हा छेदोनि करी अर्पण I 
त्यास श्रीगुरुंनीं विद्या देऊन I धन्य केला सप्तदशीं I I ३५ I I 
घेवडा उपटूनि दरिद्रियाचा I कुंभ दिधला हेमाचा I 
वर्णिला प्रताप श्रीगुरूचा I अष्टादशाध्यायांत I I ३६ I I 
औदुम्बराचें करूनि वर्णन I योगिनींस देऊनि वरदान I 
गाणगापुरास आपण I एकुणविंशीं श्रीगुरू गेले I I ३७ I I 
स्त्रियेचा समंध दवडून I पुत्र दिधले तिजला दोन I 
एक मरतां कथिती ज्ञान I सिद्धरुपें विसाव्यांत I I ३८ I I 
तेचि कथा एकविंशीं I प्रेत आणिलें औदुम्बरापाशीं I 
श्रीगुरू येऊनि तेथे निशीं I पुत्र उठविती कृपाळू I I ३९ I I 
भिक्षा दरिद्र्या घरी घेती I त्याची वंध्या महिषी होती I 
तीस करून दुग्धवती I बेविसाव्यांत वर दिधला I I ४० I I 
तेविसाव्यांत श्रीगुरूस I राजा नेई गाणगापुरास I 
तेथे उद्धरती राक्षस I त्रिविक्रम करी गुरुनिंदा I I ४१ I I 
भेटो जाती त्रिविक्रमा I दाविती विश्वरूपमहिमा I 
विप्र लागे गुरुपादपद्मा I चोविसाव्यांत वर देती I I ४२ I I 
म्लेन्च्छापुढें वेद म्हणती I विप्र ते त्रिविक्रमा छळती I 
त्याला घेऊनि सांगातीं I गुरूपाशी आला पंचविशीं I I ४३ I I 
सव्विसाव्यांत तया ब्राह्मणा I श्रीगुरू सांगती वेदरचना I 
त्यागा म्हणती वादकल्पना I परी ते उन्मत्त नायकती I I ४४ I I 
सत्ताविशीं आणूनि पतिता I विप्रासीं वेदवाद करितां I 
कुंठित करोनि शापग्रस्ता I ब्रह्मराक्षस त्यां केलें I I ४५ I I 
अष्टाविंशीं तया पतिता I धर्माधर्म सांगोनि कथा I 
पुनरपि देऊनि पतितावस्था I गृहाप्रती दवडिला I I ४६ I I 
एकोनत्रिंशीं भस्मप्रभाव I त्रिविक्रमा कथिती गुरुराव I 
राक्षसा उद्धरी वामदेव I हा इतिहास तयांतचि I I ४७ I I 
त्रिंशाध्यायीं पति मरतां I तयाची स्त्री करी बहु आकांता I 
तीस श्रीगुरू नाना कथा I कथूनि शांतवूं पहाती I I ४८ I I 
एकतिसाव्यांत तेचि कथा I पतिव्रतेचे धर्म सांगतां I 
सद्गमनप्रकार बोधिता I तें स्त्रियेतें जग्दगुरू I I ४९ I I 
सहगमनीं निघतां सती I श्रीगुरूस झाली नमस्कारिती I 
आशीर्वाद देवोनि तिचा पति I बत्तिसाव्यांत उठविला I I ५० I I 
तेत्तिसाव्यांत रुद्राक्षधारण I कथा कुक्कुट-मर्कट दोघेजण I 
वैश्य-वेश्येचें कथन I करिती रायातें पराशर I I ५१ I I 
रुद्राध्यायमहिमा वर्णन I चौतिसाव्यांत निरुपण I 
राजपुत्र केला संजीवन I नारद भेटले रायातें I I ५२ I I 
पंचत्रिन्शत्प्रसंगांत I कचदेवयानी कथा वर्तत I 
आणिक सोमवारव्रत I सीमंतिनीच्या प्रसंगें I I ५३ I I 
छत्तिसीं ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा I स्त्रियेनें नेलें परान्नभोजना I 
कंटाळूनि धरिती श्रीगुरूचरणा I त्याला कर्ममार्ग सांगती I I ५४ I I 
सप्तत्रिंशीं नाना धर्म I विप्रा सांगोनि ब्रह्मकर्म I 
प्रसन्न होऊनि वर उत्तम I देती श्रीगुरु तयातें I I ५५ I I 
अष्टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण I तिघांपुरतें शिजवी अन्न I 
जेविले बहु ब्राह्मण I आणि गांवचे शूद्रादि I I ५६ I I 
सोमनाथाची गंगा युवती I साठ वर्षांची वंध्या होती I 
तीस दिधली पुत्रसंतति I एकुणचाळिसावे अध्यायीं I I ५७ I I 
नरहरीकरवीं शुष्ककाष्ठा I अर्चवूनि दवडिलें त्याच्या कुष्ठा I 
शबरकथा शिष्य-वरिष्ठां I चाळिसाव्यांत सांगती I I ५८ I I 
एकेचाळिशीं सायंदेवा I हस्ते घेती श्रीगुरू सेवा I 
ईश्वर पार्वतीसंवाद बरवा I काशीयात्रा निरुपण I I ५९ I I 
पुत्रकलत्रेसीं सायंदेव I येऊनि करिती श्रीगुरूस्तव I 
त्याला कथिती यात्राभाव I वरही देती एकेचाळिसीं I I ६० I I 
बेचाळिसीं अनंतव्रत I धर्मराया कृष्ण सांगत I 
तेचि कथा सायंदेवाप्रत I सांगोनि व्रत करविती I I ६१ I I 
त्रेचाळिसीं तंतुकार भक्तासी I श्रीपर्वत दावूनि क्षणेंसीं I 
शिवरात्रि-पुण्यकथा त्यासी I विमर्षण राजाची कथियेली I I ६२ I I 
चव्वेचाळिसीं कुष्ठी ब्राह्मण I आला तुळजापुराहून I 
त्याला करवूनि संगमी स्नान I कुष्ठ नासूनि ज्ञान देती I I ६३ I I 
कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास I श्रीगुरू भेटती नरहरी कवीस I 
आपुला शिष्य करिती त्यास I पंचेचाळिसावे अध्यायी I I ६४ I I 
शेचाळिसीं दिवाळी सण I गुरूसी आमंत्रिती सात जण I 
तितुकी रूपे धरुनि आपण I गेले, मठिंही राहिले I I ६५ I I 
सत्तेचाळिसीं शूद्रशेतीं I त्याचा जोंधळा कापूनि टाकिती I 
शतगुणे पिकवूनि पुढती I आनंदविलें तयातें I I ६६ I I 
अठ्ठेचाळिसीं श्रीगुरूमूर्ति I अमरजासंगममाहात्म्य कथिती I 
स्नान करवूनि दवडिती I कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचें I I ६७ I I 
ईश्वरपार्वती संवाद शुद्ध I मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध I 
नामधारका सांगे सिद्ध I एकूणपन्नासावे अध्यायीं I I ६८ I I 
म्लेंच्छाचा स्फोटक दवडिती I भक्तीस्तव त्याचे नगरा जाती I 
पुढे श्रीपर्वतीं भेटों म्हणती I पन्नासावे अध्यायीं I I ६९ I I 
एकावन्नांत गुरुमूर्ति I देखोनियां क्षितीं पापप्रवृत्त्ति I 
उपद्रवितील नानायाती I म्हणोनि गुप्तरूपें रहावे I I ७० I I 
ऐसा करूनि निर्धार I शिष्यांसी सांगती गुरुवर I 
आजि आम्ही जाउं पर्वतावर I मल्लिकार्जुनयात्रेसी I I ७१ I I 
ऐसें ऐकूनि भक्तजन I मनीं होती अति उद्विग्न I 
शोक करिती आक्रंदोन I श्रीगुरूचरणीं लोळती I I ७२ I I 
इतुकें पाहूनि गुरुमूर्ति I वरदहस्तें तया कुरवाळिती I 
मद्भजनीं धरा आसक्ति I मठधामी राहोनियां I I ७३ I I 
ऐसें बोधूनि शिष्यांसी I गुरु गेले कर्दळीवनासी I 
नाविकमुखें सांगूनि गोष्टीसी I निजानंदीं निमग्न होती I I ७४ I I 
ऐसें अपार श्रीगुरूचरित्र I अनंत कथा परम पवित्र I 
त्यांतील एकावन्न अध्याय मात्र I प्रस्तुत कथिले तुजलागीं I I ७५ I I 
सिद्ध म्हणे नामधारका I तुज कथिली अवतरणिका I 
श्रीगुरू गेले वाटती लोकां I परी गुरु गुप्त असती गाणगापुरीं I I ७६ I I 
कलियुगीं अधर्म वृद्धि पावले I म्हणोनि श्रीगुरू गुप्त झाले I 
भक्तजनांला जैसे पहिले I तैसेच भेटती अद्दापि I I ७७ I I 
हे अवतरणिका सिद्ध माला I श्रीगुरू भेटती जपे त्याला I 
जैसा भावार्थ असे आपुला I तैसी कार्ये संपादिती I I ७८ I I 
नामधारका तूं शिष्य भला I अवतरणिकेचा प्रश्न केला I 
म्हणोनि इतिहाससारांशाला I पुनः वदलों सत्शिष्या I I ७९ I I 
पूर्वी ऐकिलें असेल कानीं I त्यांतें तात्काळ येईल ध्यानीं I 
इतरां इच्छा होईल मनीं I श्रीगुरूचरित्रश्रवणाची I I ८० I I 
ऐसी अवतरणिका जाण I तुज कथिली कथांची खूण I 
इचें सतत करितां स्मरण I कथा अनुक्रमें स्मरतसे I I ८१ I I 
ऐसें वदे सिद्धमुनि I नामधारक लागे चरणीं I 
विनवीतसे कर जोडोनि I तुझे वचनें सर्वसिद्धि I I ८२ I I 
आता असे विनवणी I श्रीगुरू-सप्ताहपारायणी I 
किती वाचावे प्रतिदिनीं I हें मज सांगा श्रीगुरुराया I I ८३ I I 
सिद्ध म्हणती नामधारका I तुवां प्रश्न केला निका I 
परोपकार होईल लोकां I तुझ्या प्रश्नेंकरोनियां I I ८४ I I 
अन्तःकरण असतां पवित्र I सदाकाळ वाचावें गुरुचरित्र I 
सौख्य होय इहपरत्र I दुसरा प्रकार सांगेन I I ८५ I I 
सप्ताह वाचावयाची पद्धती I तुज सांगों यथास्थिती I 
शुचिर्भूत होवोनि शास्त्ररीतीं I सप्ताह करितां बहु पुण्य I I ८६ I I 
दिनशुद्धि बरवी पाहून I आवश्यक स्नानसंध्या करून I 
पुस्तक वाचावयाचें स्थान I रंगवल्लादि शोभा करावी I I ८७ I I 
देशकालादि संकल्प करून I पुस्तकरुपी श्रीगुरुचें पूजन I 
यथोपचारेंकरून I ब्राह्मणासही पूजावें I I ८८ I I 
प्रथम दिवसापासोन I बसावया असावें एक स्थान I 
अततत्वार्थ भाषणी धरावे मौन I कामादि नियम राखावे I I ८९ I I 
दीप असावे शोभायमान I देव-ब्राह्मणा-वडिलां वंदून I 
पूर्वोत्तर मुख करून I वाचनीं आरंभ करावा I I ९० I I 
सप्त संख्या अध्याय प्रथम दिनीं I अष्टादश द्वितीय दिनीं I 
अष्टाविंशति तृतीय दिनीं I चतुर्थ दिवशीं चौतीस पैं I I ९१ I I 
सदतीसपर्यंत पांचवे दिनीं I त्रेचाळीसवरी सहावे दिनीं I 
सप्तमीं एकावन्न वाचोनि I अवतरणिका वाचावी I I ९२ I I 
नित्य पाठ होतां पूर्ण I करावें उत्तरांग-पूजन I 
श्रीगुरुतें नमस्कारून I उपहार कांहीं करावा I I ९३ I I 
याप्रकारें करावें सप्त दिन I रात्रीं करावें भूमिशयन I 
सारांश शास्त्राधारेंकरून I शुचिर्भूत असावें I I ९४ I I 
एवं होतां सप्त दिन I ब्राह्मणसुवासिनी-भोजन I 
यथाशक्त्या दक्षिणा देऊन I सर्व संतुष्ट करावे I I ९५ I I 
ऐसें सप्ताह-अनुष्ठान I करीतां होय श्रीगुरूदर्शन I 
भूतप्रेतादि-बाधा निरसन I होवोनि, सौख्य होतसे I I ९६ I I 
ऐसें सिद्धाचें वचन ऐकोनि I नामधारक लागे चरणीं I 
म्हणे बाळाची आळी पुरवोनि I कृतकृत्य केलें गुरुराया I I ९७ I I 
श्रोते म्हणती वंदूनि पायीं I श्रीगुरू केली बहु नवलाई I 
बाळका अमृत पाजी आई I तैसें आम्हां पाजिलें I I ९८ I I 
प्रति अध्याय एक ओंवी I ओंविली रत्नमाळा बरवी I 
मनाचे कंठीं घालितां, पदवी I सर्वार्थाची पाववीत I I ९९ I I 
सिद्धाचें वचन रत्नखाणी I त्यांतूनि नामधारक रत्नें आणी I 
एकावन्न भरोनि रांजणीं I भक्त-याचकां तोषविलें I I १०० I I 
किंवा सिद्ध हा कल्पतरू I नामाधारकें पसरिला करू I 
यांइच्छा करोनि परोपकारु I भक्तांकरितां बहु केला I I १०१ I I 
किंवा सिद्धमुनि बलाहक I नामधारक शिष्य चातक I 
मुख पसरोनि, बिंदू एक I मागतां, अपार वर्षला I I १०२ I I 
तेणें भक्तां अभक्तां फुकाचा I सकळां लाभ झाला अमृताचा I 
हृदयकोश खळजनांचा I पाषाणसमही पाझरे I I १०३ I I 
श्रीगुरुरायाचे धरुं चरण I सिद्धमुनीतें करूं वंदन I 
नामधारका करूं नमन I ऐसें करीं नारायणा I I १०४ I I 
श्रीगुरुरूपी नारायणा I विश्वंभरा दीनोद्धारणा I 
आपण आपली दावूनि खुणा I गुरुशिष्यरूपें क्रीडसी I I १०५ I I 
I I इति श्रीगुरूचरित्रामृते, परमकथाकल्पतरौ, श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
एकपंचाशदध्यायसारे अवतरणिका नाम द्विपंचाशत्तमोSध्यायः I I 
श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु I I श्रीगुरुदेवदत्त I I 

GuruCharitra Avataranika



Custom Search

Monday, December 5, 2011

Shri Gurucharitra Mahatmya श्रीगुरुचरित्र महात्म्य

Shri Gurucharitra Mahatmya 


 Gurucharitra is a pious and holy Grantham (Book) in Marathi. This Grantham consists of total 52 chapters. This is written by Saraswati Gangadhar. It has arisen from the conversation between Guru Siddha and disciple Namadharak. Many Gurudev Datta devotees perform parayana (read it in seven days) many times during the year. Concentration, devotion and faith on this Grantham results in removing all difficulties, sorrow, poverty and bless devotees with peace, happiness and all sorts of wealth after performing the parayana. 
 The parayana is to be performed in seven days in following manner. 
Take a bath to clean and purify your body. 
Perform worship/pooja of the God to purify your mind. 
Bow to the God and elderly people in your family. 
Starting day and time of reading must be good. 
Reading place must be the same for all seven days.
If you are reading it for specific purpose, then say it and tell it to God Dattatreya before starting reading. 
Reader needs to be facing towards East or North while reading Gurucharitra. 
Devotee needs to keep picture of God Dattatreya in front of him. 
Holy lamp to be kept burning by using ghee. 
Day One: Read adhyay from 1st to 7th 
Day Two: Read adhyay from 8th to 18th 
Day Three: Read adhyay from 19th to 28th 
Day Four: Read adhyay from 29th to 34th 
Day Five: Read adhyay from 35th to 37th 
Day Six: Read adhyay from 38th to 43rd 
Day Seven: Read adhyay from 44th to 52nd. Sometimes the parayana of all 52 adhyayas is not possible; hence devotees perform parayana of a particular adhyaya for a specific reason as advised by Guru. 
Following Adhyayas are read for specific reasons.
Adhyaya 1 for getting a sadguru. 
Adhyaya 2 to receive blessing from Guru. 
Adhyaya 4 this adhyaya is God Dattatreya birth day adhyaya. 
Adhyaya 13 is for removing disease and obtaining good health. 
Adhyaya 14 is for removing all difficulties from life.
Adhyaya 18 is for removing poverty and acquiring wealth. 
Adhyaya 20 and 21 is for the good health of children.
Adhyaya 39 is to have santati (issue). 
Thus there is very importance of Gurucharitra in everybody’s life. Many devotees have obtained health, Wealth, happiness and peace in their life by performing parayana of Gurucharitra. 


श्रीगुरुचरित्र महात्म्य 


श्रीगुरुचरित्र हा एक अतिशय प्रासादिक असा मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ श्रीगुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे करत असतात. पारायण करणाराची श्रीगुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि विश्वास त्याच्यावरील सर्व संकटांचा नाश करून त्याला सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख तर देतेच पण त्याची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते. गुरुचरित्र हे शिष्य नामधारक व गुरु सिद्ध यांच्या संवादाचे भक्तिपूर्ण प्रकटीकरण आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे. 
गुरुचरित्राचे अध्याय: गुरुचरित्राचे एकंदर बावन्न अध्याय आहेत. 
पारायणाच्या पद्धती: पारायण हे सामान्य भक्त सात दिवसांचे करतात. तरी एक दिवसाचे किंवा तीन दिवसांचे पारायण करणारेहि काही भक्त आहेत. शुभ दिवशी, शुभ वेळी पारायण सुरु करावे. दत्तजयंतीच्या आधी दत्त जन्मापर्यंत पारायणासाठी दिवस शुद्धी बघण्याची आवशकता नसते. या वर्षी असे पारायण ३ डिसेंबर २०११ला सुरु करून १०डिसेंबर २०११ ला दत्तजयंतीच्या दिवशी पुरे करता येईल. 
पारायणासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे, अष्टगंध, हीना अत्तर, रांगोळी, तीन पाट, नारळ पारायणाची पूर्वतयारी: पारायणाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. आंघोळ करून संध्यादि व देवांची पूजा करावी. देवाला व घरांतील वडिलधार्‍यांना नमस्कार करावा. पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून, रांगोळी घालून तीन पाट अगर आसने मांडावीत. दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे. वाचणार्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे. आपल्या समोर चौरंगावर श्री गुरुदेव दत्तांची तजबीर ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर गुरुचरित्राची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे.तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे. सातही दिवस वाचनाची जागा एकच असावी. पारायण कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरवात करावी. वाचन मोठ्यानेच करावे मनांत करू नये. पारायण चालू असताना फोन/मोबाईल बंद ठेवावा. कोठच्याही प्रकारचे बोलणे पारायण चालू असताना करू नये. वाचन सुरु असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. वाचनांत एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे. काही विशिष्ट परिस्थितींत एकेका अध्यायाचे पारायण करण्याचीही प्रथा आहे.
प्रत्येक दिवशी अध्यायांचे वाचन:
पहिल्या दिवशी: १ ते  ७ अध्याय 
दुसर्या दिवशी:   ८ ते १८ अध्याय
तिसर्या दिवशी: १९ ते २८ अध्याय 
चौथ्या दिवशी: २९ ते ३४ अध्याय 
पाचव्या दिवशी: ३५ ते ३७ अध्याय 
सहाव्या दिवशी: ३८ ते ४३ अध्याय 
सातव्या दिवशी: ४४ ते ५२ अध्याय 
अशा प्रकारे सात दिवसांचे पारायण करावे. प्रत्येक दिवशी वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे. काहीतरी खावे. दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री भूमीवर शयन करावे. ब्रह्मचर्याचे पालन पारायण चालू असताना करावे. सात दिवस पारायण झाल्यावर अनुष्ठान म्हणून ब्राह्मण सुवासिनीला भोजन-दक्षिणा द्यावी. जेवणांत पुरणपोळी व घेवड्याची भाजी अवश्य करावी. अशा रीतीने पारायण पुरे करावे. 
अध्यायांचे महत्व: संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे अशक्य असेल तेव्हां आपल्या अडचणीनुसार फक्त विशिष्ट अध्यायाचेच पारायण करण्याचीही प्रथा आहे. 
अध्याय १ : सद्गुरू प्राप्तीसाठी वाचावा. 
अध्याय २: श्रीगुरुकृपा व्हावी म्हणून वाचावा. 
अध्याय ४: श्रीदत्त जन्माचा अध्याय. 
अध्याय १३: उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी व रोग मुक्तीसाठी वाचावा. 
अध्याय १४: प्रापंचिक अडीअडचणी दूर व्हाव्यांत म्हणून वाचावा. 
अध्याय १८: दारिद्र्य दूर व्हावे म्हणून वाचावा. 
अध्याय २० व २१ : संततीच्या आरोग्यासाठी म्हणून वाचावा. 
अध्याय ३९ : संतती प्राप्तीसाठी म्हणून वाचावा. 
अध्याय ३९ चे पारायण करण्याआधी श्लोक म्हणावा. 
नमस्ते योगिराजेंद्र दत्तात्रेयदयानिधे I 
षष्ठीवर्ष वयस्कायाः वंध्यायाः पुत्रदानवान् II 
तद्वन्मेयि कृपाकृत्वा श्रीशंभक्तं चिरायुषं I 
देहि मे तनयं दत्त त्वामहं शरणागतः II 
श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती टेंबे स्वामीमहाराज यांनी श्रीगुरूचरित्रावर संस्कृतमध्ये द्विसाहस्री, श्रीगुरुसंहिता हे ग्रंथ आणि त्रिशति गुरुचरित्र काव्य लिहिले आहेत. त्यांनी मराठीमध्ये सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. 
पारायणाचे लाभ: गुरुचरित्र पारायणामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यांपासून मुक्तता, रोगापासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे,पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरुप्राप्ती, जीवनांत शांती आणि अंती मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात. 
अशा रीतीने श्रीगुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनांत आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा आहे. अशा या श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने दत्तभक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनांत सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना.


गुरुचरित्र पारायण (Links)
गुरुचरित्र सर्व अध्याय लिखीत गुरुचरित्र आरतीसह  
फक्त Audio Links खालिलप्रमाणे
दिवस पहिला अध्याय १ ते ७
दिवस दुसरा   अध्याय ८ ते १८
दिवस तिसरा  अध्याय १९ ते २८
दिवस चौथा    अध्याय २९ ते ३४ 
दिवस पांचवा  अध्याय ३५ ते ३७
दिवस सहावा  अध्याय ३८ ते ४३
दिवस सातवा  अध्याय ४४ ते ५२
Shri Gurucharitra Mahatmya




Custom Search