Thursday, October 1, 2015

ShriGaneshVarad Stotra श्रीगणेशवरद स्तोत्र


ShriGaneshVarad Stotra 
ShriGaneshVarad Stotra is in Marathi. It is a very pious and beautiful stotra. It is written by Narayan in Shake 1860 Bahudhanya Swansara on Vinayaki Chaturthi on Friday. It is a Bijayukta stotra. Devotee who is in trouble is required to read it for 11 times so that his troubles will be vanished. Devotee who wants money is to recite it for 21 days early in the morning. Such devotees receives blessings from God Ganesh and healthy, wealthy and trouble free and lives a happy life.

श्रीगणेशवरद स्तोत्र
ॐ नमोजी श्रीगणेशा । ॐ नमोजी बुद्धिप्रकाशा ।
ॐ नमोजी गुणेशा । सिद्धिदायका तुज नमो ॥ १ ॥
ॐ नमोजी ॐकारा । ॐ नमोजी चराचरा ।
ॐ नमोजी गणेश्र्वरा । गणपालनत्तपरा तुज नमो ॥ २ ॥  
ॐ नमो वागेश्र्वरी । ॐ नमो ब्रह्मकुमारी ।
ॐ नमो वाचा चारी । सर्चसत्ताधारी तुज नमो ॥ ३ ॥
ॐ नमो सद्गुरु राजा । ॐ नमो अधोक्षजा । 
ॐ नमो कैलासराजा । शंभुदेवा तुज नमो ॥ ४ ॥
ॐ नमो दत्तात्रेया । ॐ नमो अत्रि अनुसूया ।
ॐ नमो स्वामी सखया । रामराया तुज नमो ॥ ५ ॥
ॐ नमो सकल संता । सिद्धसाधु  आणि महंता ।
ॐ नमो प्राणनाथा । श्रीहनुमंता तुज नमो ॥ ६ ॥
ॐ नमो इष्टदेवा । ॐ नमो मोक्षदेवा । 
ॐ नमो कुलदेवा ।  कालदेवा तुज नमो ॥ ७ ॥
ॐ नमो वास्तुदेवा । ॐ नमो ग्रामदेवा ।
ॐ नमो मातृदेवा । पितृदेवा तुज नमो ॥ ८ ॥
श्री अष्टोत्तर शतमाला । करायाची आज्ञा मला ।
देऊनी बुद्धि बालकाला । वरद स्तोत्र घडवावे ॥ ९ ॥
ॐ नमो गणेश्र्वरा । ॐ नमो गतीश्र्वरा ।
ॐ नमो गजवरा । गुणगर्वधरा तुज नमो ॥ १० ॥
ॐ नमो गणेशा । ॐ नमो गणाध्यक्षा ।
ॐ नमो गुरुदृशा । गुरुपुरुषा तुज नमो ॥ ११ ॥ 
ॐ नमो गुणेश्र्वरा । ॐ नमो गानचतुरा ।
ॐ नमो गानपरा । गजरुपधरा तुज नमो ॥ १२ ॥
ॐ नमो गुरुधर्म धुरंधरा । ॐ नमो गुणवत् पोषणकरा ।
ॐ नमो गणपालनतत्परा । गजासुरयोद्धारा तुज नमो ॥ १३ ॥
ॐ नमो गंधर्वसंशयच्छेत्रा । ॐ नमो गुरुमंत्रगुरुतंत्रा ।
ॐ नमो गुह्यप्रवरा । गुरुगर्वहरा तुज नमो ॥ १४ ॥
ॐ नमो गणस्वामिना । ॐ नमो गजानना ।
ॐ नमो गुणसंपन्ना । गानप्राणा तुज नमो ॥ १५ ॥
ॐ नमो गणदुःखप्रणाशना । ॐ नमो गुणवत् शत्रुसूदना ।
ॐ नमो गजध्वना । हे गुणप्राणा तुज नमो ॥ १६ ॥  
ॐ नमो गानज्ञानपरायणा । ॐ नमो देवगौणा ।
ॐ नमो गानध्यान परायणा । गानभूषणा तुज नमो ॥ १७ ॥
ॐ नमो गुरुप्राणा । ॐ नमो गुरुगुणा ।
ॐ नमो गंधर्वभाजना । गणप्रथितनाम्ना तुज नमो ॥ १८ ॥
ॐ नमो गुरुलक्षणसंपन्ना । ॐ नमो गंधर्वदर्पघ्ना ।
ॐ नमो गंधर्व प्रीतिवर्धना । गुरुतत्वार्थदर्शना तुज नमो ॥ १९ ॥
ॐ नमो गुणाराध्या । ॐ नमो गुणाहृद्या ।
ॐ नमो गुरु आद्या । गुण आद्या तुज नमो ॥ २० ॥
ॐ नमो गुरु शास्त्रालया । ॐ नमो गुरुप्रिया ।
ॐ नमो गणप्रिया । गणंजया तुज नमो ॥ २१ ॥
ॐ नमो गंधर्वप्रिया । ॐ नमो गकारबीजनिलया ।
ॐ नमो गुरुश्रिया । गुरुमाया तुज नमो ॥ २२ ॥
ॐ नमो गजमाथा । ॐ नमो गंधर्वसंसेव्या ।
ॐ नमो गंधर्वगानश्रवणप्रणया । गंधर्वस्त्रीभिराराध्या तुज नमो ॥ २३ ॥
ॐ नमो गणनाथा । ॐ नमो गणगर्भस्था ।
ॐ नमो गुणीगीता । गुरुस्तुता तुज नमो ॥ २४ ॥
ॐ नमो गणरक्षणकर्ता । ॐ नमो गणनमस्कृता ।
ॐ नमो गुणवत् गुणचित्तस्था । गुरुदैवता तुज नमो ॥ २५ ॥
ॐ नमो गंधर्व कुलदेवता । ॐ नमो गजदंता ।
ॐ नमो गुरुदैवता । गंधर्वप्रणवस्वांता तुज नमो ॥ २६ ॥
ॐ नमो गजदंता । ॐ नमो गुरुदैवता ।
गंधर्वगीतपरिता । ॐ नमो नमो गानकृता ।
हे गर्जता तुज नमो ॥ २७ ॥
ॐ नमो गणाधीरजा । ॐ नमो देव गजा ।
ॐ नमो गुरुभुजा । देव गजराजा तुज नमो ॥ २८ ॥
ॐ नमो गुरुमूर्ती । ॐ नमो गुणकृती ।
ॐ नमो गजपती । गणवल्लभमूर्ती तुज नमो ॥ २९ ॥
ॐ नमो गणपती । ॐ नमो गुरुकीर्ती ।
ॐ नमो गीर्वाणसंपत्ती । गीर्वाणगण सेविती तुज नमो ॥ ३० ॥  
ॐ नमो गुरुत्राता । ॐ नमो गणाध्याता ।
ॐ नमो गणत्राता । गणगर्वपरिहर्ता तुज नमो ॥ ३१ ॥ 
ॐ नमो गणदेवता । ॐ नमो मानभुवा ।
ॐ नमो गंधर्व । गानसिंधवा तुज नमो ॥ ३२ ॥
ॐ नमो गणश्रेष्ठा । ॐ नमो गुरुश्रेष्ठा ।
ॐ नमो गुणश्रेष्ठा । गणगर्जितसंतुष्टा तुज नमो ॥ ३३ ॥
ॐ नमो गणसौख्यप्रदा । ॐ नमो गुरुमानग्रा ।
ॐ नमो गुणवत् सिद्धिदा । गानविशारदा तुज नमो ॥ ३४ ॥
ॐ नमो गुरुमंत्रफलप्रदा । ॐ नमो गुरुसंसारसुखदा ।
ॐ नमो गुरुसंसारदुःखभिदा । गर्विगर्वनुदा तुज नमो ॥ ३५ ॥
ॐ नमो गंधर्वाभयदा । ॐ नमो गणश्रीदा ।
ॐ नमो गर्जन्नागयुद्धविशारदा । गानविशारदा तुज नमो ॥ ३६ ॥  
ॐ नमो गंधर्व भयहारका । ॐ नमो प्रीतिपालका ।
ॐ नमो गणनायका । गंधर्ववरदायका तुज नमो ॥ ३७ ॥
ॐ नमो गुरुस्त्रीगमने दोषहारका । ॐ नमो गंधर्वसंरक्षका ।
ॐ नमो नमो गुणज्ञा गंधका । गंधर्वप्रणयोत्सुका तुज नमो ॥ ३८ ॥
ॐ नमो गंभीरलोचना । ॐ नमो गंभीर गुणसंपन्ना ।
ॐ नमो गंभीरगति शोभना । देव गजानना तुज नमो ॥ ३९ ॥
हे गणेशस्तोत्र पठण करता । देही नांदे आरोग्यता ।
कार्यसिद्धि होय तत्त्वता । संशय मनी न धरावा ॥ ४० ॥
धनार्थीयाने एकवीस दिन । सुप्रभाती उठोन ।
करिता स्तोत्र पठन । धनप्राप्ती होय त्यासी ॥ ४१ ॥
जो प्रतिदिन त्रिवार पठत । त्यासी पुत्रधनदान्य प्राप्त होत ।
श्रीगणेश पुरवी इच्छित । यदर्थी संशय न धरावा ॥ ४२ ॥
ज्यावरी संकट दुर्धर । तयाने एकादशवेळ स्तोत्र ।
पठता थोर त्याचे भय । तात्काळ निरसेल ॥ ४३ ॥  
त्रंबकराय गणेशभक्त । जनदुःखे कष्टी होत ।
होऊनीया कृपावंत । स्तोत्रबीजयुक्त करविती ॥ ४४ ॥ 
गणेशसुत नारायण । केवळ मूढ अज्ञान ।
त्यास कैसे असे ज्ञान । वरदस्तोत्र करावया ॥ ४५ ॥
कलियुगी नाम वरिष्ठ । साक्ष देती श्रेष्ठ श्रेष्ठ । 
म्हणोनिया स्तोत्र पाठ । संत महंत करिताती ॥ ४६ ॥
हे स्तोत्र केवळ चिंतामणि । नामरत्नांची खाणी । 
स्तोत्र पठोनिया वाणी । साधके शुद्ध करावी ॥ ४७ ॥
स्तोत्र पठणे पुरुषार्थ चारी । साध्य होती घरचे घरी ।
म्हणोनिया याचे वरी । शुद्ध भाव ठेवावा ॥ ४८ ॥
अति सात्त्विक पुण्यवंत । त्यासीच येथे प्रेम उपजत ।
भावे करिती स्तोत्रपाठ । त्यासी गणेश संरक्षी ॥ ४९ ॥
शके अठराशे साठ । बहुधान्य संवत्सर श्रेष्ठ । 
श्रीविनायकी चतुर्थी येत । शुक्रवार दिन भाग्याचा ॥ ५० ॥
येच दिनी हे वरदस्तोत्र । पूर्ण झाले अतिपवित्र । 
वरदहस्ते गजवक्त्र पठणे भक्ता सांभाळी ॥ ५१ ॥
इति श्री गणेशवरदस्तोत्र । श्रवणे होत कर्ण पवित्र । 
विजय होईल सर्वत्र । आणि शांती लाभेल ॥ ५२ ॥
श्रीगजाननार्पणमस्तु ॥

ॐ शांतीः शांतीः शांतीः ॥
हे गणेशवरदस्तोत्र " श्रीगजाजन दर्शन " ह्या पुस्तकांतून घेतलेले आहे. त्यांचे आभार व धन्यवाद.
श्री. ना.ग.देशपांडे (दिघे गुरुजी )यांची ही रचना आहे.
" हे श्री गणेशलोकवासी श्री त्र्यंबकराय महाराज यांच्या कृपाप्रसादाचे फलस्वरुप स्तोत्र गेली अनेक वर्षे श्रीभक्तांचे ऐहिक व पारमार्थिक कल्याण करीत आहे. या स्तोत्राचे भक्तिभावपूर्वक जमतील तेवढे पाठ केल्यास इच्छित प्राप्ती होईल " असे म्हटले आहे.
ShriGaneshVarad Stotra 
श्रीगणेशवरद स्तोत्र



Custom Search

4 comments:

Tuckerjackk said...

Thank you for sharing the article. I find it interesting. I hope to see more articles like this from you. We offer online printer service and demo installation support for info please visit our websiteI am amazed by the way you have explained things in this article. This article is quite interesting and I am looking forward to reading more of your posts. Thanks for sharing this article with us.
TrendMiners
Trending Bees
How To Miners
Jack Tucker
Jack Tucker
TrendMiners
Daily Helps
YaraBook

Vruvri said...

Pls check the wording...
I think it should be "sarvasattadhari"

Illegal house trace passer said...

Thanks for

K.PankajPrakash said...

Thank you