Thursday, October 15, 2015

Vedokta RatriSuktam अथ वेदोक्तं रात्रिसूक्तं

Vedokta RatriSuktam 
Vedokta RatriSuktam is in Sanskrit. It is the praise of Ratridevi.
अथ वेदोक्तं रात्रिसूक्तं
ॐ रात्रीत्याद्यष्टर्चस्य सूक्तस्य कुशिकः सौभरो रात्रिर्वा भारद्वाजो ऋषिः, रात्रिर्देवता, गायत्री छन्दः, देवीमाहात्म्यपाठे विनियोगः ।
ॐ रात्री व्यख्यदायती पुरुत्रा देव्यक्षभिः ।
विश्वा अधि श्रियोऽधित ॥ १ ॥
ओर्वप्रा अमर्त्यानिवतो देव्युद्वतः ।
ज्योतिषा बाधते तमः ॥ २ ॥
निरु स्वसारमस्कृतोषसं देव्यायती ।
अपेदु हासते तमः ॥ ३ ॥
सा नो अद्य यस्या वयं नि ते यामन्नविक्ष्महि ।
वृक्षे न वसतिं वयः ॥ ४ ॥
नि ग्रामासो अविक्षत नि पद्वन्तो नि पक्षिणः ।
नि श्येनासश्चिदर्थिनः ॥ ५ ॥
यावया वृक्यं वृकं यवय स्तेनमूर्म्ये ।
अथा नः सुतरा भव ॥ ६ ॥
उप मा पेपिशत्तमः कृष्णं व्यक्तमस्थित ।
उष ऋणेव यातय ॥ ७ ॥
उप ते गा इवाकरं वृणीष्व दुहितर्दिवः ।
रात्रि स्तोमं न जिग्युषे ॥ ८ ॥

॥ इति वेदोक्तं रात्रिसूक्तं ॥
मराठी अर्थ
१) सर्वत्र महत्तत्वादि रुपांनी सर्व प्रकाशित करणारी ही रात्री देवी तीने निर्माण केलेल्या विश्र्वांतील सर्व जीवांच्या शुभाशुभ कर्मांना ध्यानपूर्वक बघून त्याप्रमाणे फल देण्यासाठी अनेक विभूति धारण करते.
२) ही देवी अमर आहे. सर्व वस्तुंना जमिनीवर पसरणार्‍या वेलींपासून ते उंच वाढणार्‍या वृक्षांनासुद्धा व्यापून स्थित झाली आहे. ती ज्ञानमयी ज्योतीने जीवांचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा करते.
३) परा चित्शक्तिरुपा रात्रिदेवी आपल्या बहीणीला उषादेवीला प्रकट करुन अविद्यामय अन्धकार सहज नाहीसा करते. तो आपलाआपणच नाहीसा होतो.
४) ही रात्रीदेवी या वेळी माझ्यावर प्रसन्न होवो. जिच्यामुळे आम्ही आपल्या घरांत सुखाने निद्रीस्त होतो. तसेच की जसे रात्रीच्यावेळी पक्षी झाडांवर बनविलेल्या आपल्या घरांत निवांत शयन करतात.
 ५) त्या करुणामय रात्रीदेवीच्या मांडीवर सर्व ग्रामवासी जन, पायाने चालणारे पशु, पंखांनी उडणारे पक्षी, काही कारणाने भ्रमण करणारे यात्रिक असे सर्व सुखाने निद्रा करतात. 
६) हे रात्रिदेवी कृपा करुन वासना आणि पापे ह्यांपासून आम्हाला दूर ठेव. कामरुपी चोराला आमच्यापासून दूर ठेव. आमच्यासाठी कल्याण करणारी आणि मोक्ष देणारी हो.

७) हे उषादेवी सगळीकडे पसरलेला हा अज्ञानरुपी अंधःकार नाहीसा कर. जसेकी ऋणी भक्ताचे ऋण धन देऊन तू त्याला ऋणमुक्त करतेस. याच प्रकारे आम्हाला ज्ञान देऊन आमच्या अज्ञानाला नष्ट कर.
Vedokta RatriSuktam 
अथ वेदोक्तं रात्रिसूक्तं


Custom Search

No comments: