Sunday, October 18, 2015

ShriSaraswatiStotram श्रीसरस्वतीस्तोत्रम्


ShriSaraswatiStotram 
ShriSaraswati Stotram is in Sanskrit. It is the praise of Goddess Saraswati. The praise is for obtaining blessings from her to remove false and untrue knowledge and to receive real and true knowledge.
श्रीसरस्वतीस्तोत्रम्
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता 
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता 
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥ १ ॥
आशासु राशी भवङ्गवल्ली 
भासैव दासीकृतदुग्धसिन्धुम् ।
मन्दस्मितैर्निन्दितशारदेन्दुं 
वन्देऽरविन्दासनसुन्दरि त्वाम् ॥ २ ॥
शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे ।
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् ॥ ३ ॥
सरस्वतीं च तां नौमी वागधिष्ठातृदेवताम् ।
देवत्वं प्रतिपद्यन्ते यदनुग्रहतो जनाः ॥ ४ ॥
पातु नो निकषग्रावा मतिहेम्नः सरस्वती ।
प्राज्ञेतरपरिच्छेदं वचसैव करोति या ॥ ५ ॥
शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीं 
वीणापुस्तकधारिणीनभयदां जाड्यान्धकारापहाम् ।
हस्ते स्फटिकमालिकां च दधतीं पद्मासने संस्थितां 
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् ॥ ६ ॥
वीणाधरे विपुलमङ्गलदानशीले 
भक्तार्तिनाशिनि विरञ्चिहरीशवन्द्ये ।
कीर्तिप्रदेऽखिलमनोरथदे महार्हे 
विद्याप्रदायिनि सरस्वति नौमि नित्यम् ॥ ७ ॥
श्वेताब्जपूर्णविमलासनसंस्थिते हे
श्वेताम्बरावृतमनोहरमञ्जुगात्रे ।
उद्यन्मनोज्ञसितपङ्कजमञ्जुलास्ये 
विद्याप्रदायिनि सरस्वति नौमि नित्यम् ॥ ८ ॥
मातस्त्वदीयपदपङ्कजभक्तियुक्ता
ये त्वां भजन्ति निखिलानपरान्विहाय ।
ते निर्जरत्वमिह यान्ति कलेवरेण
भूवह्मिवायुगगनाम्बुविनिर्मितेन ॥ ९ ॥
मोहान्धकारभरिते हृदये मदीये
मातः सदैव कुरु वासमुदारभावे ।
स्वीयाखिलावयवनिर्मलसुप्रभाभिः 
शीघ्रं विनाशय मनोगतमन्धकारम् ॥ १० ॥
ब्रह्मा जगत् सृजति पालयतीन्दिरेशः 
शम्भुर्विनाशयति देवि तव प्रभावैः ।
न स्यात्कृपा यदि तव प्रकटप्रभावे
न स्युः कथञ्चिदपि ते निजकार्यदक्षाः ॥ ११ ॥
लक्ष्मीर्मेधा धरा पुष्टीर्गौरी तुष्टिः प्रभा धृतिः ।
एताभिः पाहि तनुभिरष्टाभिर्मां सरस्वति ॥ १२ ॥
सरस्वत्यै नमो नित्यं भद्रकाल्यै नमो नमः ।
वेदवेदान्तवेदाङ्गविद्यास्थानेभ्य एव च ॥ १३ ॥
सरस्वति महाभागे विद्ये कमललोचने ।
विद्यारुपे विशालाक्षि विद्यां देहि नमोऽस्तु ते ॥ १४ ॥
यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् ।
तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्र्वरी ॥ १५ ॥
॥ इति श्रीसरस्वतीस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
मराठी अर्थ
१) ती कुन्दाचे फुल, चंद्र, बर्फ आणि हार यांच्याप्रमाणे गोरी (पांढरीशुभ्र) आहे; जीने शुभ्र वस्त्र धारण केले आहे जीच्या हातात वीणा आहे,जी पांढर्‍या कमलासनावर बसली आहे, ब्रह्मा, विष्णु व शंकर जीची नेहमी स्तुती करतात, जी सर्व प्रकारचे जडत्व हरण करते ती सरस्वती माझे पालन करो.   
२) हे कमलासनावर बसणार्‍या देवी सरस्वती, सर्व दिशांमध्ये भरुन राहिलेल्या तुझ्या तेजाने क्षीरसमुद्राला तूं दास केले आहेस तर तुझ्या मंद हासण्याने शरद ऋतु मधल्या चंद्राला तिरस्कृत (लज्जीत ) करुन सोडले आहेस. तुला मी नमस्कार करतो.
३) शरदकाली उत्पन्न होणार्‍या कमलासारखे मुख असलेली आणि (भक्तांचे ) सर्व मनोरथ पूर्ण करणारी शारदा सर्व संपत्तीनेयुक्त होऊन माझ्या मुखांत नेहमी निवास करु दे.
४) वाणीच्या अधिष्ठात्री असलेल्या त्या सरस्वतीदेवीला मी नमस्कार करतो. तीच्या कृपेने मनुष्य देवता बनतो.
५) बुद्धिरुपी सोन्याला पारखणारी सरस्वती ही केवळ बोलण्यानेच विद्वान आणि मूर्ख जाणू शकते. ती आमचे सर्वांचे पालन करो.
६) जीचे रुप पांढरे शुभ्र आहे, जी ब्रह्मविचार धारेची परम त्तत्व आहे, जी सर्व व्यापून आहे, जीने हातात वीणा व पुस्तक धरले आहे, जी अभयदात्री आहे, जी मूर्खतारुपी अंधकार नाहीसा करते, जीने
हातात स्फटिकमण्यांची माळ घेतली आहे, जी कमलासनावर विराजमान आहे, जी बुद्धिदात्री आहे, त्या आद्य परमेश्र्वरी सरस्वतीला मी नमस्कार करतो. 
७) हे वीणा धारण करणार्‍या, भरपूर मंगल करणार्‍या, भक्तांना संकटांतून सोडविणार्‍या, ब्रह्मा, विष्णु आणि शंकरांनी वंदिलेल्या तसेच कीर्ति देणारी व भक्तांचे मनोरथ पूर्ण करणार्‍या, पूजनीय आणि विद्या देणार्‍या सरस्वति देवी मी तुला नेहमी नमस्कार करतो.
८) श्वेत कमलांनी भरलेल्या आसनावर विराजणार्‍या, शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या सुंदरी, उमललेल्या सुन्दर शुभ्र कमलासारखे मुख असलेल्या आणि विद्या देणार्‍या सरस्वति मी तुला नेहमी नमस्कार करतो.
९) हे माते ! जो भक्त इतर सर्व देवता सोडून तुझ्या चरणकमलांचीच भावपूर्ण भक्ति नेहमी करतो, तो पृथ्वी, अग्नि, वायु, आकाश आणि जल ह्यांनी बनलेल्या या शरिरासह देवता रुप बनून जातो.
१०) हे उदार बुद्धि असलेल्या माते ! मोहरुपी अंधःकाराने भरलेल्या माझ्या हृदयी नेहमी वास कर आणि आपल्या निर्मळ अंगकांतीने माझा मनांतील अंधःकार नाहीसा कर.
११) हे सरस्वति देवी; ब्रह्मदेव तुझ्या कृपेनेच ह्या जगाची निर्मिती करतात. विष्णु जगाचे पालन करतात. आणि शंकर नाश करतात. तुझ्या कृपेशिवाय हे सर्व करण्यास ते असमर्थ आहेत.    
१२) हे सरस्वति तूं लक्ष्मी, मेधा, धरा, पुष्टि, गौरी, तुष्टि, प्रभा आणि धृति ह्या अष्टरुपांनी तूं माझे रक्षण कर.
१३) सरस्वति तुला नमस्कार करतो. भद्रकाली तुला नमस्कार करतो. तूं वेद, वेदांग आणि विद्यास्थान आहेस.
१४) हे कमलासारखे डोळे असलेल्या, भाग्यशाली, ज्ञानस्वरुपा,ज्ञान देणार्‍या सरस्वति तुला नमस्कार आहे. मला तूं विद्या दे.
१५) हे देवि ! जे अक्षर, पद किंवा मात्रा (तुझी स्तुती करतांना ) राहून गेली असेल त्याबद्दल मला क्षमा कर. हे परमेश्र्वरि माझ्यावर प्रसन्न हो. 
ShriSaraswatiStotram 
श्रीसरस्वतीस्तोत्रम्



Custom Search

No comments: