Monday, October 19, 2015

ShriDevi Patha श्रीदेवी पाठ


ShriDevi Patha 
ShriDevi Patha is a prayer of Goddess. ITis in Marathi. Poet is telling the Goddess that I always think about you, see you. I have no knowledge, intelligence, I don't know mantras. I don't know devotion. I don't care about my body. I wish to go to forest in search of you. I am really in puzzle. I wish that your name should be always on my tongue. I should always be among the good company. I should not have selfishness. I have nothing to ask you to bless me other than this.
श्रीदेवी पाठ 
मला बुद्धि ना ज्ञान कांहीच नाही ।
नसे धारणयोग तोही न कांही ।
न भक्ति तशी मंत्रविद्याहि कांही ।
तुझ्यावीण अंबे न जाणेच कांही ॥ १ ॥
शरीरास भोगादि होणार आहे ।
तयाची क्षिती मी कदापि न वाहे । 
देहे धारणा साध्य होवो कशीही ।  
तुझ्यावीण अंबे न जाणेच कांही ॥ २ ॥
तुझ्या कारणे देह दुःखीत झाला ।
बसावें गमे जाउनी काननाला ।
सुचेना मला बुद्धि आणिक कांही । 
न जाणेच अंबे तुझ्यावीण कांही ॥ ३ ॥
मला संगति सज्जनांची असू दे । 
मला स्वार्थचिंता कदापि नसू दे ।
मला दे रति त्वत्पदाची सदाही ।
तुझ्यावीण अंबे न जाणेच कांही ॥ ४ ॥
तुझे नाम वाचे सदा वावरावे ।
स्वरुपी तुझ्या मानसे म्या रमावे ।
नसे मागणे या वरावीण कांही ।
तुझ्यावीण अंबे न जाणेच कांही ॥ ५ ॥  
ShriDevi Patha 
श्रीदेवी पाठ



Custom Search

No comments: