Shree Navanath Bhaktisar adhyay 4 is in Marathi. Here I am trying to give a very short description of this adhyay. Machchhindra decides to visit Hingala Goddess. Her temple was in a very furious forest and there was a door which was protected by the AshtaBhairavas. Who were very powerful fighters and won Yamadharma also. They asked why Machchhindra want to visit the Goddess temple. Unless he tells them how he had lived his life until now and which are his sins and good things he had done till then, they will not allow entering. Machchhindra told them that he was incarnation of God and had taken birth for shake of God’s work his life spent until then was the responsibility of Gods. Any sins committed or any good things if were done then it was the responsibility was of God. However Ashtabhairavasa were not allowing to enter through the gate and started the war which ultimately won by Machchhindra. AshtaBhairavasa used many weapons and astras using Mantras that interesting description is better to read from the Adhyays in original for understanding and satisfying. Then billion Chamundas came to fight with Machchhindra. These Chamundas were also very powerful and strong however they were also defeated. Goddess Bhagavati came to know all about this and was very surprised as AshtaBhairavas and Chamundas were defeated. She searched in her mind for who was Machchhindra and came to know that he was incarnation of God Kavi Narayan and take birth for Gods work and was a vasuputra. She approached to the gate and welcomed Machchhindra who bowed to her. Goddess told him to free AshtaBhairavas which Mchchhindra did. Then Goddess asked him to prove his Vidya. Machchhindra used VayuAstra Fanidaivat and chanted mantras and throw vibhuti on a big mountain. Mountain started revolving speedily on the serpent’s head without losing any rock, tree or soil on it. Then he placed the mountain on his place unaffected as per Goddess will. Goddess was very much pleased and took him to her place where Machchhindra stayed for three days. Goddess blessed him with two weapons one of which was dividing Sparshastra. Then bowing to Goddess he proceeded to the way of BaraMalhar. In the next adhyay the description will follow what happened there as written by Malu son of Dhundi from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ ) भाग २/२
वासवशक्ति अतिदारुण । तियेचें पुढें झाले मोहन ।
तेणें महंता गेली पळून । वासवशक्तीची सर्वस्वें ॥ ९१ ॥
नागास्त्राचे पडिपाडीं । खगेंदास्त्र घाली उडी ।
सकळ नागाची जुपडी । दाढेखाली रगडी तें ॥ ९२ ॥
यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ । यास्तव अस्त्र उरों नेदी केवळ ।
शांति वरुण वाचे सफळ । आशीर्वचन नाथातें ॥ ९३ ॥
यावरी रुद्रास्त्र उरों नेदी केवळ । तयापुढें धाडिलें कार्तिकेयास्त्र बाळ ।
येतांचि सर्व अंग झाले शीतळ । कोप शांताब्धींत बुडाला ॥ ९४ ॥
दानवास्त्रा नाहीं मिती । त्याची मच्छिंद्राचें देवास्त्र करी शांती ।
सकळ त्यातें पाहूनि जाती । अंतरिक्षस्थानीं आपुल्या ॥ ९५ ॥
यावरी काळास्त्र गहन । तेणे संजीवनी अस्त्र पुढें पाहून ।
मागोमागें पाश घेऊन । निर्लज्जपणें पळताती ॥ ९६ ॥
ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती । करुनि पावली सकळ शांति ।
यावरी जें अस्त्र उरलें नववे मिती । तयाची ख्याती परिसावी ॥ ९७ ॥
तें वातास्त्र अर्कप्रचंड । प्रवेश करितां भैरवपिंड ।
तेणें विकळ झालें अष्टधेंड । चलनवलन विसरले ॥ ९८ ॥
प्रथम वासव शक्ति प्रगट होतां । दणाणा उठला ब्रह्मांडीं समस्तां ।
तो प्रळयनाद अंबा ऐकता । परिचारिका धाडीतसे ॥ ९९ ॥
त्या परिचारिका एकएकाकिनी । कोटी चामुंडा लावण्यखाणी ।
शंखिनी डंखिनी योगिनी । जळदेवता पातल्या ॥ १०० ॥
चंडा रंडा मुंडा कुंडा । मंडा वंडा आणि वितंडा ।
ऐशा वर्णिल्या किती तोंडा । अष्टराष्ट्री धांविन्नला ॥ १०१ ॥
परी पूर्वी पांचसाती । समाचारा आल्या असती ।
त्यानीं पाहुनि प्रळयगती । सकळ समुदाय तो आणिला ॥ १०२ ॥
त्याही चामुंडा तीव्र थोर । शस्त्रास्त्रीं करिती मार ।
परी तो सुभट मच्छिंद्र । निवारीत अस्त्राने ॥ १०३ ॥
असो वातास्त्रआकर्षणीं । अष्टभैरव गेले क्षीण होऊनी ।
प्राण विकळ देह धरणीं । निचेष्टित पडियेले ॥ १०४ ॥
यावरी एक क्षणीं चामुंडाभार । तयांचा कैसा झाला विचार ।
भुलीक मोहनास्त्र । कामशरीं योजिलें ॥ १०५ ॥
तंव तें अस्त्र प्राबल्यवंत । सर्वांच्या संचरले देहीं गुप्त ।
तेंणें क्षणैक होऊन मूर्छित । पिशाचासमान भ्रमताती ॥ १०६ ॥
कोणी वाद्यें घेऊनि नाचती । कोणी उगीच टाळ्या पिटिती ।
कोणी खगीं तंद्री लाविती । कोणी हंसती गदगदां ॥ १०७ ॥
कोणी म्हणती विमान आलें । कोणी उभ्याच डोलती डोले ।
कोणी धांवती महीं पाउलें । पळतां उलथोनि पडताती ॥ १०८ ॥
कोणी उगेचि स्फुंदोनि रडती । कोणी गोंधळी गायन करिती ।
कोणी रानोरान भ्रमती । आई बया म्हणोनि ॥ १०९ ॥
कोणी लोळती धुळींत । कोणी मृत्तिका उधळीत ।
कोणी उदो उदो म्हणत । कोणी रडतां पडताती ॥ ११० ॥
कोणी निचेष्टित पडतां धरणीं । मक्षिका गोंगाट करिती वदनी ।
कोणी उग्याच शिव्या देऊनी । विवाद करिताती नेपुरें ॥ १११ ॥
कोणी भेटती दाटती प्रेमे । कोणी काष्ठांचे उभवूनी सप्रेमें ।
नाना खेळ स्त्रिया उगमें । पुरुषनांवीं होताती ॥ ११२ ॥
कोणी फेडूनि नेसतें वसन । वृक्षा नेसविती गुंडाळून ।
कोणी कवळूनि करीं पाषाण । स्तनपान करिती त्या ॥ ११३ ॥
कोणी काढूनि चोळी चिंधोटी । त्याची नेसती लंगोटी ।
अंगा चर्चूनि भस्मचिमुटी । भोपळा नरोटी कवळूनियां ॥ ११४ ॥
कोणी ऊर्ध्व करोनि हस्त । अलख म्हणोनि भिक्षा मागत ।
कोणी शृंगार काढूनि निश्र्चित । पाषाणांतें लेवविलें ॥ ११५ ॥
ऐसा होता चमत्कार । त्यांत काय करी नाथ मच्छिंद्र ।
विद्यागौरवी प्रहर । तयामाजी संचरवीं ॥ ११६ ॥
तें अस्त्र चपळ सबळवंत । वसनें आसडूनि त्वरित ।
नेऊनियां गगनपंथे । अंबरातें मिरविलीं ॥ ११७ ॥
मग त्या सकळ नग्न होऊनी । नृत्य करिती सकळ अवनीं ।
त्याही सकळ आणि मच्छिंद्रमुनी । मायास्त्रातें जल्पतसे ॥ ११८ ॥
तेणेंकरुनि अपार पुरुष । सर्वभूषणीं महादक्ष ।
निर्मूनियां नाथ प्रत्यक्ष । समोर संचार करवीतसे ॥ ११९ ॥
ऐसी करुनि दृढ राहटी । स्मरणास्त्र जल्पलें होटी ।
तेणेंकरुनि सर्व गोरटी । देहाप्रती पातल्या ॥ १२० ॥
देहस्मरणीं होतां स्थित । आपण आपणाकडे पहात ।
तो नग्नशरीरी केश मुक्त । परम लज्जित मग त्या झाल्या ॥ १२१ ॥
भोवतें पाहती दृष्टी करुनी । तों अपार पुरुष देखिले नयनीं ।
तेणें फारच लज्जित होऊनी । पळती सैराट नग्नचि ॥ १२२ ॥
तों पळतपळत सहज नयनीं । भैरव पाहिले अनवस्थान ।
कंठी उरलासे प्राण । रुधिर अवनीं सांडतसे ॥ १२३ ॥
आणिक पाहिलें नेत्रश्र्वेतीं । मग पळूनि गेल्या जेथें भगवती ।
अंबिका पाहूनि नग्न समस्ती । आश्र्चर्य चित्तीं करीतसे ॥ १२४ ॥
म्हणे कां वो ऐसे केलें । कोणी तुम्हांतें नागविलें ।
येरी म्हणती सुकृत संपले । म्हणूनि अवस्था हे झाली ॥ १२५ ॥
माय वो माय जोगी आला । कोणीकडोनि जाणों आम्ही त्याला ।
तेणे करुनि अवस्था आम्हांला । प्राण घेतला भैरवांचा ॥ १२६ ॥
आतां जननी काय उरलें । तुम्ही स्वस्थान सोडा वहिलें ।
नातरी दशा पूर्ण पावाल । आम्हां दिसतें जननीये ॥ १२७ ॥
भैरवांसारिखे वीर धुरंधर । तयांचा प्राण कंठावर ।
उरला असे बरावा विचार । आम्हांलागीं दिसेना ॥ १२८ ॥
तो जोगी नव्हे मायाजननी । सुप्त प्रसवला दुसरा तरणी ।
पूर्वभयाची आतां मांडणी । जगामाजी मिरवेना ॥ १२९ ॥
की एकादश प्रळयरुद्र । एकच शरीरीं मिरवले भद्र ।
देवदानव नक्षत्र चंद्र । आम्हां वाटलें ग्रासितो ॥ १३० ॥
कीं माये प्रळयविजेच्या स्थानास । आजीच आली धरुनि यास ।
आप तेज मही वायु आकाश । ग्रासील ऐसें वाटतसे ॥ १३१ ॥
तरी आतां वेगीं माये । या स्थानातें आंचवावे ।
कोणे प्रकारें वांचवावें । जीवित्व आपुलें जननीये ॥ १३२ ॥
ऐसें बोलूनी भयभीत । कंपायमान बावर्या होत ।
कोणी बोलतां चांचरा घेत । आला आला म्हणोनि ॥ १३३ ॥
ऐसी दीक्षामाय भवानी । पाहूनि आश्र्चर्य करी मनीं ।
मग स्वचित्तांत पाहे शोधूनी । कोण कोणाचा कोणता ॥ १३४ ॥
तंव तो महाराज कविनारायण । उपरिचर वसूच प्रियनंदन ।
मच्छिंद्रनामें अवतार धरुन । जगामाजीं मिरवला ॥ १३५ ॥
ऐसें आणूनी स्वचित्तांत । मग सकळांलागी वसनें देत ।
पुढें घालूनि अबला समस्त । बाहेर आली जगत्त्रयजननी ॥ १३६ ॥
मग मच्छिंद्रापाशीं येऊनि त्वरित । बहु प्रेमानें हृदयीं धरीत ।ढूनि
तेंणें पाहूनि जगन्मातेते । चरणावरी लोटला ॥ १३७ ॥
मग घेऊनि अंकी मच्छिंद्रनाथ । म्हणे बा प्रताप केला बहुत ।
तरी भैरव प्राणरहित । झाले सावध करीं त्यांसी ॥ १३८ ॥
ऐसें ऐकोनि अंबिका वाणी । प्रसन्न झाली चित्तभवानी ।
मग अस्त्रविद्या वाताकर्षणीं । काढुनि घेतली ते समयीं ॥ १३९ ॥
जैसे दुग्धामाजी तोय । काढुनि घेत हंस समयीं ।
तेवीं वाताकर्षण अस्त्र सदयी । काढूनि घेत तो नाथ ॥ १४० ॥
कीं पंचाक्षरी कौशलेप्रती । मही मांदुसे काढूनि घेती ।
तन्न्यायें विद्याशक्ती । काढूनि घेत तो नाथ ॥ १४१ ॥
किंवा स्वबुद्धिविचक्षण । कार्य असतां परस्वाधीन ।
तें युक्तिप्रयुक्तीं घेती करुन । प्राज्ञ बळें आपुलालें ॥ १४२ ॥
असो ऐसे दृष्टांत बोलें । येरीकडे भैरव सावध झाले ।
चलनवलन सर्व संचरलें । जैसे तैसें शरीर ॥ १४३ ॥
मग झाल्या विचक्षणीं । दिशा पाहती दृष्टीकरुनी ।
तों जगन्माता अंकी घेऊनि । मच्छिंद्रातें बैसली ॥ १४४ ॥
मग ते अष्ट भैरव वीर । येते झाले अंबिकेसमोर ।
म्हणती अंबे प्रताप थोर । मच्छिंद्रानें पै केला ॥ १४५ ॥
आम्ही याची युद्धमांडणी । घेऊं सकळ परीक्षाकडसणी ।
मग नागपत्रअश्र्वत्थाहुनी । कथा वदले अंबेतें ॥ १४६ ॥
नागअश्र्वत्थाहूनि ऐकतां गोष्टी । माता म्हणे हा धन्य धूर्जटी ।
मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टीं । प्रताप कांही दावीं कां ॥ १४७ ॥
जैसे पयामाजी तोय । शोषूनि घेत हंस पय ।
तेवीं आतां युद्धसंदेह । काढूनि दावीं चक्षूतें ॥ १४८ ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । कैसी दावूं कोणत्या अर्थ ।
माता म्हणे हा पर्वत । आकाशातें मिरवीं कीं ॥ १४९ ॥
मिरवेल परी जेथील तेथ । पुन्हां ठेवी मूर्तिमंत ।
ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ । करीं कवळी भस्मातें ॥ १५० ॥
मग वायुअस्त्र फणिदैवत । मंत्रजल्पें केले युक्त ।
पर्वतीं फेकितां भस्म होत । उदयवातचि जो झाला ॥ १५१ ॥
यात मौळीं कद्रुनंदन । पर्वत मौळी शीघ्र वाहून ।
वातचक्रीं करी भ्रमण । चंडरथासमान कीं ॥ १५२ ॥
त्यातें उलधावया शक्ती । अंबा पाहे आपुल्या चित्तीं ।
परी शेषमौळींची पर्वतमाती । दृढ असे ढळेना ॥ १५३ ॥
मग मनीं म्हणे हा धन्य नाथ । जेणे ऐक्य केला पर्वत वात ।
शत्रु समरीं ऐक्य चित्त । मिरविलाही हें धन्य ॥ १५४ ॥
पर्वत पूर्ण वातावरी । तो वात मिरवी घेऊनि शिरीं ।
जैसा मत्स्यकोदरीं । येवोनिया दडाला ॥ १५५ ॥
कीं व्याघ्रअजानांदवटी । नांदविले एका पेटीं ।
कीं उरग उरगारी सांगती गोष्टी । प्रेमभावें मिरवूनियां ॥ १५६ ॥
तन्न्याये मच्छिंद्रें केले । धन्य सद्विद्येचें धाम रचिलें ।
मग कुरवाळूनि म्हणे वहिलें । पर्वतातें उतरी कां ॥१५७ ॥
मग मच्छिंद्रे वात आकर्षून । ठायींच्या ठायीं नग उतरुन ।
ठेवूनि अंबेचे समाधान । सद्विद्येनें पैं केलें ॥ १५८ ॥
यावरी नाथ आणि भगवती । गेले अंबिकास्थानाप्रती ।
तेथें राहूनि तीन रात्री । पुसूनियां चालिले ॥ १५९ ॥
मग अंबा प्रसन्न होऊन । अस्त्रे दिधलीं त्यातें दोन ।
स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न । प्रसादातें निवेदिलें ॥ १६० ॥
असो ऐसा प्रसाद घेऊन । निघता झाला मातेसी नमून ।
बारामल्हारांचा मार्ग धरुन । जाता झाला तो नाथ ॥ १६१ ॥
पुढें बारामल्हारांचें कथन । श्रोतियां सांगे धुंडीनंदन ।
नरहरि मालू नामाभिधान । जगामाजीं मिरवे तो ॥ १६२ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । चतुर्थोध्याय गोड हा ॥ १६३ ॥
श्रीक्रुष्णार्पणमस्तु ॥ श्रीनवनाथभक्तिसार चतुर्थोध्याय संपूर्ण ॥
Shree Navanath Bhaktisar adhyay 4

श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ )
Custom Search
No comments:
Post a Comment