Sunday, October 4, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 4 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ ) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 4 
 Shree Navanath Bhaktisar adhyay 4 is in Marathi. Here I am trying to give a very short description of this adhyay. Machchhindra decides to visit Hingala Goddess. Her temple was in a very furious forest and there was a door which was protected by the AshtaBhairavas. Who were very powerful fighters and won Yamadharma also. They asked why Machchhindra want to visit the Goddess temple. Unless he tells them how he had lived his life until now and which are his sins and good things he had done till then, they will not allow entering. Machchhindra told them that he was incarnation of God and had taken birth for shake of God’s work his life spent until then was the responsibility of Gods. Any sins committed or any good things if were done then it was the responsibility was of God. However Ashtabhairavasa were not allowing to enter through the gate and started the war which ultimately won by Machchhindra. AshtaBhairavasa used many weapons and astras using Mantras that interesting description is better to read from the Adhyays in original for understanding and satisfying. Then billion Chamundas came to fight with Machchhindra. These Chamundas were also very powerful and strong however they were also defeated. Goddess Bhagavati came to know all about this and was very surprised as AshtaBhairavas and Chamundas were defeated. She searched in her mind for who was Machchhindra and came to know that he was incarnation of God Kavi Narayan and take birth for Gods work and was a vasuputra. She approached to the gate and welcomed Machchhindra who bowed to her. Goddess told him to free AshtaBhairavas which Mchchhindra did. Then Goddess asked him to prove his Vidya. Machchhindra used VayuAstra Fanidaivat and chanted mantras and throw vibhuti on a big mountain. Mountain started revolving speedily on the serpent’s head without losing any rock, tree or soil on it. Then he placed the mountain on his place unaffected as per Goddess will. Goddess was very much pleased and took him to her place where Machchhindra stayed for three days. Goddess blessed him with two weapons one of which was dividing Sparshastra. Then bowing to Goddess he proceeded to the way of BaraMalhar. In the next adhyay the description will follow what happened there as written by Malu son of Dhundi from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥ 
जयजयाजी करुणानिधे । आगमअगोचर विशाळबुद्धे ।
सकळमुनिमानस हृदयवृंदे । उद्यान वाटे आनंदाचे ॥ १ ॥
हे योगिमानसरजनी । पंढरीशा मूळपीठणी ।
पुंडलिकाचे आराध्य स्वामिणी । उभी अससी विटेवरी ॥ २ ॥
सौम्य दिससी परी नीटक । बहुत ठक चित्तचालक ।
भक्तमानसभावहारक । छिनाल सुकृत उरों नेदीं ॥ ३ ॥
पहा कैसी बकासमान । नासाग्रभागीं दृष्टी देऊन ।
कोणी म्हणेल गरीबावाण । चांगुलपण मिरवीतसे ॥ ४ ॥
परी ही अंतरीची खुण । नरहरि मालू एकचि जाणे । 
भक्तीविषयीं लंपट वासना । मनामाजी हुटहुटी ॥ ५ ॥
सुकर्म हृदया घालूनि हात । युक्तिप्रयुक्ती काढूनि घेत ।
पुढें पुढें होऊनि कार्यार्थ । आपुले त्या संपादी ॥ ६ ॥
पहा दामाजीचें दायधन । गटकन गिळिलें अभिलाषून ।
कंगालवृत्ती सोंग धरुन । देव महार झाला असे ॥ ७ ॥
नरहरि सबळ सुवर्णकर्म । तयाच्या विषयीं वरिला काम ।
भांडावें तों जन्मोजन्म । शिवमौळी राहातसे ॥ ८ ॥
कुब्जादादुला वांकुडातिकुडा । नाहीं म्हणे तिला झाला पुंडा ।
वृदां पुरुषही जाडा । स्मशानवस्ती केलीसे ॥ ९ ॥
ठकवोनि मारिला काळयवन । सोळा सहस्त्र दादुला होऊन ।
शेवटीं न पावे समाधान । ब्रह्मस्थिती वरिलीसे ॥ १० ॥
चक्षुगोचर होत जें जें । तें मागूं शके अति निर्ल्लज्जें ।
सुदामाचें पृथुक खाजे । कोरडें न म्हणे सहसाही ॥ ११ ॥
काय वरिला मृत्यु दुकाळानें । द्रौपदीची खाय भाजीपानें ।
हात वोडवूनि लाजिरवाणें । मिटक्या मारुनि भक्षीतसे ॥ १२ ॥
शबरीचीं बोरें उच्छिष्ट पाहून । न म्हणे भक्षी मन लावून ।
चोखियाचा पदार्थ गोड पाहून । र्‍हदासहित सारीतसे ॥ १३ ॥
नामा बाळ ठकवूनि त्वरित । नैवेद्य भक्षित हातोहात ।
तस्मात् किती दुर्गुणांत । सद्गुणांतें आणावे ॥ १४ ॥
असो ऐसे परम ठकणी । येऊनि बैसली ग्रंथश्रेणी ।
मम चित्तातें समूळ घेऊनि । पायांपासीं ठेवीतसे ॥ १५ ॥
असो तिचे वरदेंकरुन । श्रोते ऐका आतां कथन ।
श्रीमच्छिंद्र योगी पूर्ण । हिंगळाकारणीं संचरला ॥ १६ ॥
मागिल अध्यायीं कथन । मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन । 
शेवटीं प्रीति विनटून । हिंगळाख्यस्थाना पावले ॥ १७ ॥
ती ज्वाळामुखी भगवती । महाप्रदीप्त आदिशक्ति ।
तेथें जाऊनि द्वाराप्रती । मच्छिंद्रनाथ पोचलें ॥ १८ ॥
तंव तें द्वार पाहतां क्षितीं । उंच बाहु सार्धशत । 
औरस चौरस षडशत । विराजलेसें द्वार तें ॥ १९ ॥
तें द्वारीं प्रचंड । अष्टाभैरव महाधेंड । 
त्यांनीं नाथपंथ पाहुनि वितंड । चित्तांत कामना उदेली ॥ २० ॥
नागपत्रअश्र्वत्थठायीं । मच्छिंद्रनाथ हा गोसावी ।
नेमाचरणीं विद्याप्रवाहीं । प्रसन्न केलें देवातें ॥ २१ ॥
तरी शाबरीविद्याकवित । येणें केलें वरदस्थित ।
तपीं तें प्रांजळ कायस्थ । केवीं झालें तें पाहूं ॥ २२ ॥
ऐसा काम धरुनि पोटीं । युद्धरीतीच्या सुखालोटीं ।
अष्टही भैरव एकथाटीं । प्रत्यक्ष झालें द्वारातें ॥ २३ ॥
अंगें नेमूनि संन्यासरुपा । देहपंकजा दावूनि तद्रुपा ।
म्हणती महाराजा योगदीपा । कोठें जासी तें सांग ॥ २४ ॥
येरु म्हणे शक्तिदर्शन । घेणें उदेलें अंतःकरण । 
तरी तुम्ही आहांत संन्यासधाम । तुम्हां जाणें आहे कां ॥ २५ ॥ तंव ते म्हणती जोगिया ऐक । आम्ही येथेंचि स्थायिक ।
भोगवतीकाजा वरदायक । द्वारपाळ म्हणवितों ॥ २६ ॥
तरी येथें कामनास्थित । दर्शनार्थ कोणी येत ।
तरी पापपुण्य पुसोनि त्याप्रत । मार्गापरी योजितसों ॥ २७ ॥
अगा पुमांसा प्राणी शब्दरचनें । दिसून येतां चित्तकामनें ।
त्या प्रसादूनि अंबादर्शनें । सिद्ध करितो महाराजा ॥ २८ ॥
आणि पापकलह अर्थ धूर्जटी । आमुतें दिसूनी येता दृष्टी ।
त्यासी मागें परतवूनि राहटी । तो पुरुष दर्शनासी मिरवेना ॥ २९ ॥
तस्मात् वागोत्तराचे देठी । प्रसाद मिरवला हो शेवटीं ।
तरी त्वत्कामना उदेली पोटीं । अंबा दर्शनीं मिरवावें ॥ ३० ॥
   
तरी महाराजा योगद्रुमा । पापपुण्यांचा झाडा आम्हां ।
दर्शवोनि दर्शन कामा । स्वस्थ करीं रतिसुखा ॥ ३१ ॥
अंतरी आला अर्थकंदर्प । येथें करितां कांही लोप ।
तरी संचार करितां द्वारमाप । मध्यें अटक महाराजा ॥ ३२ ॥
द्वार सांकडे होते अतिसान । गुंते करितां अनृत भाषण ।
मग त्यातें मागें ओढून । पूर्ण शिक्षा दावितों ॥ ३३ ॥
तस्मात् तुमची कर्मराहटी । झाली जैसी महींपाठीं ।
तींतें दर्शवूनि वाग्दिवटीं । दर्शनातें दर्शिजे ॥ ३४ ॥
येरु म्हणे द्वारस्थ बापा । आम्ही नेणों पुण्यपापा ।
कर्मसुकर्म अर्थकंदर्पा । ईश्र्वरी अर्थी केले असे ॥ ३५ ॥
जैसेया लहराभास । उभय नातळे त्या सुखास । 
हर्ष दरारा सावधपणास । ठायीं ठायीं मुरतसे ॥ ३६ ॥
तो नौका सरितातोयी जात । दों थडीं रुख दिसती पळत ।
दों थडींचा बा एक साक्षिवंत । रुखा पळ नेणेचि ॥ ३७ ॥
कीं तो व्यक्त बहू घटक्षितीं । अंतरदिवटा बहु गभस्ती ।
परी त्याची सदा दीप्ती । नयनीं मिरवे महाराजा ॥ ३८ ॥
तुटूनि नीतिपुण्यदुमा । आम्ही नेणों पाउली उगमा ।
तंव ते म्हणती नरेंद्रोत्तमा । बोल बोलसी हे काय ॥ ३९ ॥
जगीं जन्मोदय देह धरिल्या पोटीं । कर्माकर्म उभे राहटी ।
मिरवले हे प्रपंचहाटीं । पदार्थसवें हे दोन्ही ॥ ४० ॥
तरी बा तयाच्या गृहकपाटीं । ना तळपे ना मिरवे शक्ती ।
तरी आतां लोपूनि कर्माप्रती । अर्थ तुझा सरेना ॥ ४१ ॥
जैसें वेचिल्यावांचूनि धन । ना तळे कदा हाटींचे कण ।
तरी कर्माकर्म जल्पल्याविण । अर्थ तुझा सरेना ॥ ४२ ॥
तरी प्रांजळवचनप्रवाहीं । कासरिता मिरविल्याही ।
तेणें दर्शनें अंबापायीं । संगमातें मिरवेल ॥ ४३ ॥
नातरी गौण धरुनि पोटीं । वदतां अर्थ न लाधे जेठी ।
प्रांजळ वद कीं शेवटीं । फिरुनि जाशील माघारा ॥ ४४ ॥
तुवां प्रांजळ वदल्याविण । करुं न देऊं तुझें गमन ।
बहुचावटी जल्पल्यान । शिक्षा पावसी येथें तूं ॥ ४५ ॥
ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ । म्हणे शासनीं उदेला आदित्यसुत ।
तेथें तुमची शक्ति अद्भुत । केवीं वर्णूं मशक हो ॥ ४६ ॥
जो महाप्रलय भद्ररुद्र । जो ग्रासूनि बैसला मुखचंद्र ।
तेथें तुमची कथा महींद्र । काय असे मशक हो ॥ ४७ ॥
ऐसी ऐकतां मच्छिंद्रगोष्टी । परम क्रोधाची झाली दाटी ।
मग ते अष्टभैरव थाटी । एकदांचि उठावले ॥ ४८ ॥
जैसें अपार विधानथाटी । अबळां सांडूनि उबलाकोटी ।
प्रदीप्त होऊनि सांगे गोष्टी । महाखगीं जाऊनियां ॥ ४९ ॥
तन्न्यायें अष्टभैरव । मांडिते झाले युद्धपर्व ।
कोणी त्रिशूळ परशु गांडीव । टणत्कारिलें ते समयीं ॥ ५० ॥
तो परजोनि असिलता । मुद्गलगुरु ज्या परमकठिणता ।
अंकुश बरची मांडू अस्ता । चक्रें चालती उद्देशें ॥ ५१ ॥
गदा दारुकायंत्र अचाट । भाले गुप्ती कुठार बोथट ।
ऐशीं शस्त्रें तीव्र अचाट । करीं कवळूनि उठावले ॥ ५२ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । भस्मझोळीं वोपिला हस्त ।
जय जय श्रीगुरुराजदत्त । म्हणूनि भस्म करीं कवळूनि ॥ ५३ ॥
दाही दिशा मंत्रगौरव । विभूती चर्चूनि आपुला भाव । 
म्हणे मित्रावरुणदेव । सिद्ध असोत मम काजा ॥ ५४ ॥
अश्र्विनी वरुण अग्नि वात । धरामरादि वज्रनाथ । 
गण गंधर्व तरंगिणीवत् । सिद्ध असोत आम्हांतें ॥ ५५ ॥ 
बुद्धिसिद्धि योगी अपार । ब्रह्मांडांत नांदणार । 
त्या सर्वांतें नमस्कार । साह्य असोत आमुतें ॥ ५६ ॥
ऐसी जल्पूनि मंत्रशक्ती । प्रेरिता दृढ झाली विभूती । 
युद्धसमारंभ क्षितीं । आमंत्रिलें सर्वासी ॥ ५७ ॥
मग वज्रपंजर प्रयोगभूती । धरास्त्रें नेमूनि शक्रदैवतीं ।
मंत्रप्रयोग सबळशक्ती । भाळीं विभूती चर्चीतसे ॥ ५८ ॥ 
तेणें शरीर वज्राहून । ते समयीं झाले अतिकठिण ।
मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण । कार्य साधा आपुलें ॥ ५९ ॥
यावयातें कराल आळदुजस । तरी मातृपितृशपथेस ।
गुरु धिक्कारुनि निर्बळ यश । मुखा काळें कराल कीं ॥ ६० ॥
मग जिणें संदेहरुपी । मिरविणें येथे मम कंदर्पी ।
उडी सांडूनि कोरडे कूपीं । प्राण त्यजावा हें बरेंच ॥ ६१ ॥
ऐसी ऐकतां वज्रवाणी । पेटला सबळ जेवीं अग्नी ।
मग शस्त्रें शिखा नाथविधानीं । कवळूं पाहती ग्रासावया ॥ ६२ ॥
जे अष्टभैरव भद्रकाळ । शस्त्रें सोडिती उतावेळ ।
म्हणे येथें यांचा काळ । चिताभस्मीं मेळवा ॥ ६३ ॥
मग नाथशरीरा लक्षूनि अष्ट । शस्त्रें प्रेरिती प्रहार अनिष्ट ।
त्रिशूळ फरश ते नीट । दणाणीत अंगातें ॥ ६४ ॥
अंकुश परज गूर्ज मुद्गर । मांडू गदा भालचक्र । 
गुंफी खंजीर बरची असिल । सबळ प्रहारें भेदिती ॥ ६५ ॥
परी तो शस्त्रें मच्छिंद्रनाथ । तृणप्राय सकळ मानीत ।
शस्त्रवृष्टी घन वर्षत । मच्छिंद्र पर्वत झालासे ॥ ६६ ॥
ऐसें होतां ते अवसरीं । निर्विघ्न दिसती ते शस्त्र । 
मग परम कोपें गांडीवास्त्र । सज्ज करिते पैं झाले ॥ ६७ ॥
एकीं निर्मिला वातशर । दुजीं निर्मिला कामास्त्र तीव्र । 
तिजे निर्मिले वासव अस्त्र । महाशक्ती आगळी ते ॥ ६८ ॥
चौथीं योजिले नागास्त्रबंधन । जे महातक्षकाहूनि दारुण ।
पांचवें ब्रह्मास्त्र प्रवीण । शापादपि विराजे ॥ ६९ ॥
सहावें रुद्रास्त्र प्रळयकाळ । कीं भक्षूं पाहे ब्रह्मांड सकळ ।
सातवें दानवास्त्र सबळ । असंख्य राक्षस मिरवती ॥ ७० ॥
आठवें कृतांतास्त्र कठिण । प्रेरितां पावती मृत्यु काळ नाम । 
प्रचंड हस्तपाश कवळून । असंख्य स्थितीं मिरविती ॥ ७१ ॥
ऐसे योजूनि शरार्णव । मांडिते झाले प्रळयपर्व ।
शस्त्रासी मंत्रगौरव । दैवताशक्ती आराधिल्या ॥ ७२ ॥
ऐसे योजूनि गांडीवा गुणी । प्रेरिते झाले अष्टही क्षणीं ।
मग ते अस्त्र भ्रमतां गगनीं । प्रळयकाळ वोढवला ॥ ७३ ॥
वातास्त्राची प्रळयगती । महापर्वत स्वर्गपंथी ।
वायुचक्रीं भ्रमण करिती । अर्की कार्पास जेउता ॥ ७४ ॥
कामास्त्र परम कठिण । उर्वशीचें चांगुलपण ।
अन्य दारा करवीत गमन । मच्छिंद्रजती ये कृती ॥ ७५ ॥
त्याही परम सुंदर खाणी । पाहतां काममूर्छनीं ।
देच दानव मानव ध्यानीं । जपी तपी लागती ॥ ७६ ॥
वासवशक्ती अतिप्रौढी । तेज प्रवेशतां पडे ब्रह्मांडीं ।
मित्रता पाहूनि घालणें उडी । उरली नाहीं मागुतीं ॥ ७७ ॥
ती शक्ती होता प्रगट । शब्द करी कडकडाट ।
तेणें उचलूं पाहे ब्रह्मांडपीठ । धराकंप दाटला ॥ ७८ ॥
शेष दचकला आपुले मनीं । उंचावीतसे ग्रीवा मूर्धनी ।
कूर्म पृष्टा सरसावूनी । भयें कांपे चळचळां ॥ ७९ ॥
वराह उंचावोनि दंत । म्हणे धरा होती रसा व्यक्त ।
दिग्गज भयभीतचित्त । सैरा धांवती दशदिशां ॥ ८० ॥
अस्त्रें नोहे प्रळय अचाट । कीं प्रळयरुद्राचा हळहळाट ।
विमानयानीं पाहे सुभट । त्या पळतां समजेना ॥ ८१ ॥
तेज पाहतां सत्य अद्भुत । गंधर्व झाले मूर्छागत ।
तार तारांगण होत । चंद्र लपवी मुखातें ॥ ८२ ॥
सूर्य वरुणा करी दाटी । म्हणे राहें खगापोटीं ।
वेगीं प्रळय जेठी । जगामाजी मिरवला ॥ ८३ ॥
शिव झाला भयातुर । रक्षा कपाटें गिरिकंदर । 
ऐसा प्रळय होतां अपार । ठायीं ठायीं पडताती ॥ ८४ ॥
त्यांत नागास्त्र विषवल्लीसरणी । प्रगटतां विषाची प्रेरणी ।
अघटित तेथें जाहली करणी । आली विषाची मूर्छना ॥ ८५ ॥
होतां जलशापादिक । त्यांत प्रवेशला रुद्रास्त्र पावक ।
तो क्षणें जाळूं पाहें सकळिक । ग्रासीन म्हणे ब्रह्मांड ॥ ८६ ॥
त्यातें साह्यार्थ दानवास्त्र झालें । भयानक बहुधा रक्षक धांवले ।
तैशांत काळास्त्र परम शिरलें । प्राण हरुं लोकांचा ॥ ८७ ॥
ऐसी प्रळयाची होतां मांडणी । मच्छिंद्र देखतां नयनीं ।
मग नव अस्त्रशक्तिमंत्र जपूनी । विभूतीतें सोडीतसे ॥ ८८ ॥
तेणें अस्त्रविचक्षणीं । कैसे ऐका प्रतापखाणी ।
वातअस्त्राचे पुढे जाऊनी । पर्वतास्त्र विराजलें ॥ ८९ ॥
यावरी कामास्त्रापुढें जाऊनी । संचरले अस्त्र विरक्त धडपडूनी ।
तेणें कामास्त्र बापुडें होऊनी । पाठी देऊनि पळतसे ॥ ९० ॥

Shree Navanath Bhaktisar adhyay 4 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौथा ( ४ ) 



Custom Search

No comments: