Tuesday, April 24, 2012

Jamdagnyakrutam ShriShiv Stotram


Bhagwan Parashuram

Akshyya tritiya and Parashuram Jayanti 
Akshyya tritiyaa falls on Vaishakha shuddha tritiya. This year it is on 24th April 2012, Tuesday. This is a one of the day from sadetin muhurtha. It means that any new work can be started on this day. Many people purchase gold on this day. However this is a day to donate grains, clothes, money and anything which we like. Chanting of any Mantra is advised to do as many times anybody can chant. The results of such things are like blessings for betterment of the life. Many people donate cold water with the vessel, money, food, gold, umbrella, cow, footwear and clothes in the memory of their forefathers. This brings good fortune to such people. Whatever we do on this day remains permanent and bring good fortune and blessings to us.  
We also celebrate Parshuram Jayanti on this day. Parshuram is the 6th incarnation of God Vishnu. We, chitpan Brahmins have a special importance of God Parshuram in our life. Hence on the occasion of Parashuram Jayanti, I am uploading God Shiv Stotra created by Parashuram. This stotra is to please God Shiva from whom Parashuram received his blessings and Trailokya Vijay Kavacha and many other weapons. Parashuram had taken an oath to kill king Kartaviryarjun who had killed Parashuram’s father, Jamdagni. Further in the oath Parshuram had also said that he would kill all Kshatriyas on the earth 21 times. This was bound to happen as Kshatriyas were become cruel and ill-behaved since they were controlling power, money and kingdom.

अक्षय्यतृतीया 
वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्यतृतीया साजरी करतात. अक्षय्यतृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. हा काही सण नव्हे . या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तर्पण करतात. या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये उत्पन्न होणार्या धान्याचे दान करावे. जोडे, छत्री, गाय, वस्त्रे व सोने यांचे दान तसेच आपणांस अत्यंत प्रिय असेल त्याचे दान करावे. जप जेवढा ज्यास्तीत जास्त करता येईल तेवढा करावा. जे काही केले जाते ते अक्षय्य टिकते. स्वच्छ व थंडगार पाण्याने भरलेल्या कलशाचे पितरांच्या नावाने दान करावे. या दिवशी गौरी उत्सव समाप्त होतो. यामुळे स्त्रिया एकमेकींच्या घरी जाऊन हळद-कुंकू घेतात. अक्षय्यतृतीया बुधवारी व रोहिणी नक्षत्रावर येईल ती अक्षय्यतृतीया अति उत्तम असते. 
परशुराम जयंती याच दिवशी असते म्हणून परशुरामाने केलेले शंकराचे स्तोत्र देत आहे.
जामदग्न्यकृतं श्रीशिवस्तोत्रं 
ईश त्वां स्तोतुमिच्छामि सर्वथा सतोतुमक्षमम् I 
अक्षराक्षरबीजं च किं वा स्तौमि निरीहकम् II १ II 
न योजनां कर्तुमीशो देवेशं स्तौमि मूढधीः I 
वेदा न शक्ता यं स्तोतुं कस्त्वां स्तोतुमिहेश्वरः II २ II 
बुद्धेर्वाग्मनसोः पारं सारात्सारं परात्परम् I 
ज्ञानबुर्द्धेरसाध्यं च सिद्धं सिद्धैर्निषेवितम् II ३ II 
यमाकाशमिवाद्यन्तमध्यहीनं तथाव्ययम् I 
विश्वतन्त्रमतन्त्रं च स्वतन्त्रं तन्त्रबीजकम् II ४ II 
ध्यानासाध्यं दुराराध्यमतिसाध्यं कृपानिधिम् I 
त्राहि मां करुणासिन्धो दीनबन्धोSतिदीनकम् II ५ II 
अद्य मे सफ़लं जन्म जीवितं च सुजीवितम् I 
स्वप्रादृष्टं च भक्तानां पश्यामि चक्षुषाधुना II ६ II 
शक्रादयः सुरगणाः कलया यस्य सम्भवाः I 
चराचराः कलांशेन तं नमामि महेश्वरम् II ७ II 
यं भास्करस्वरूपं च शशिरूपं हुताशनम् I 
जलरूपं वायुरूपं तं नमामि महेश्वरम् II ८ II 
स्त्रीरूपं क्लीबरूपं च पुंरूपं च बिभर्ति यः I 
सर्वाधारं सर्वरूपं तं नमामि महेश्वरम् II ९ II 
देव्या कठोरतपसा यो लब्धो गिरिकन्यया I 
दुर्लभस्तपसां यो हि तं नमामि महेश्वरम् II १० II 
सर्वेषां कल्पवृक्षं च वाञ्छाधिकफ़लप्रदम् I 
आशुतोषं भक्तबन्धुं तं नमामि महेश्वरम् II ११ II 
अनन्तविश्वसृष्टीनां संहर्तारं भयकरम् I 
क्षणेन लीलामात्रेण तं नमामि महेश्वरम् II १२ II 
यः कालः कालकालश्च कालबीजं च कालजः I 
अजः प्रजश्च यः सर्वस्तं नमामि महेश्वरम् II १३ II 
इत्यवमुक्त्वा स भृगुः पपात चरणाम्बुजे I 
आशिषं च ददौ तस्मै सुप्रसन्नो बभूव सः II १४ II 
जामदग्न्यकृतं स्तोत्रं यः पठेद् भक्तिसंयुतः I 
सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोकं स गच्छति II १५ II 
II इति श्री ब्रह्मवैवर्तपुराणे गणपतिखण्डे जामदग्न्यकृतं श्रीशिवस्तोत्रं संपूर्णं II 
जामदग्न्यकृतं श्रीशिवस्तोत्रंचा मराठी अर्थ: 
परशुराम म्हणाले हे ईश्वरा ! मी आपली स्तुति करु इच्छितो परन्तु स्तवन करण्यान्त मी सर्वथा असमर्थ आहे. आपण अक्षर आणि अक्षराचे कारण तसेच इच्छा विरहित आहात. तर मी आपली स्तुती कशी करू? मी मंदबुद्धी आहे, मला शब्दांचा रचना करण्याचे ज्ञान नाही. आणि असे असूनही मी देवेश्वराची स्तुती कराला निघालो आहे! बरे ज्याचे स्तवन करण्याची शक्ती वेदांमध्येही नाही, त्या आपली स्तुती करण्यास कोण समर्थ होईल? अर्थांत कोणीच होणार नाही. आपण मन, बुद्धि, आणि वाणीला अगोचर, सारामध्येही साररूप, परात्पर, ज्ञान आणि बुद्धिला असाध्य, सिद्ध, सिद्धांकडून पूजिलेले, आकाशासारखे आदि, मध्य आणि अंत नसलेले, तसेच अविनाशी, विश्वावर शासन करणारे, तंत्ररहित, स्वतंत्र, तंत्राचे कारण असलेले,ध्यानानेही असाध्य, दुराराध्य, साधन करण्यांत अत्यंत सुगम आणि दयेचे सागर आहात. हे दीनबंधो! मी अती दीन आहे. हे करुणासिंधो! माझे रक्षण करा. आज माझा जन्म सफल आणि जीवन सुजीवन झाले; कारण भक्तगण ज्याना स्वपनामध्येही बघू शकत नाहीत, त्यांना मी यावेळी प्रत्यक्ष बघत आहे. ज्यांच्या कलांपासून इंद्र आणि देवगण आणि चराचर प्राणी उत्पन्न झाले आहेत. त्या महेश्वराना मी नमस्कार करतो. जे सूर्य, चंद्र, अग्नि, जल आणि वायुरुपामध्ये विराजमान आहेत त्या महेश्वराना मी नमस्कार करतो. जे स्त्रीरूप, नपुंसकरूप आणि पुरुषरूप धारण करून जगाचा विस्तार करतात, जे सर्वांचे आधार आणि सर्वरूप आहेत त्या महेश्वराना मी नमस्कार करतो. हिमालयकन्या देवी पार्वतीने कठोर तपस्या करून ज्यांना प्राप्त करून घेतले. दीर्घ तपस्येच्या द्वारेही जे प्राप्त होणे दुर्लभ आहेत त्या महेश्वराना मी नमस्कार करतो. जे सर्वांसाठी कल्पवृक्षासमान आहेत आणि अपेक्षेपेक्षाही अधिक फळ देणारे आहेत, जे लवकर प्रसन्न होतात आणि जे भक्तांचे बंधू आहेत त्या महेश्वराना मी नमस्कार करतो. जे लीलया क्षणांत अनंत विश्वाचा नाश करणारे आहेत, त्या भयंकर रूप धारण करू शकणार्या महेश्वराना मी नमस्कार करतो. जे कालरूप, काळाचे काल, काळाचे कारण आणि काळापासूनच उत्पन्न होणारे आहेत तसेच जे अजन्मा आणि वारंवार जन्म घेणारे आहेत आणि सर्व काही आहेत त्या महेश्वराना मी नमस्कार करतो. असे म्हणून भृगुवंशी परशुराम शंकरांच्या चरण कमलांवर नतमस्तक झाले. हे नारदा! जो भक्तिभावासह या परशुरामाने केलेल्या स्तोत्राचा पाठ करतो तो पापांपासून पूर्ण मुक्त होऊन अंती शिवलोकांत जातो. अशा प्रकारे श्री ब्रह्मवैवर्त पुराणांतील गणपतीखंडांतील हे परशुरामाने केलेले श्री शिवस्तोत्र पुरे झाले. 
Jamdagnyakrutam ShriShiv Stotram 
Custom Search

Sunday, April 22, 2012

Gurucharitra Adhyay 39 गुरुचरित्र अध्याय एकूणचाळीसावा

Gurucharitra Adhyay 39 
Adhyaya 39 is to have santati (issue). Gurucharitra is a pious and holy Grantham (Book) in Marathi. This Grantham consists of stories of Incarnation of God Dattatreya, ShriPad ShriVallabha and Nrushinha Saraswati. God Dattatreya himself is incarnation of God Brahma, God Vishnu and God Shiva. Guruchatria Adhyay 39 is in Marathi. This Adhyay describes how Guru Nrusinha Saraswati helped his lady disciple and blessed her with a daughter and a son. The lady disciple was a sixty year old barren lady. She was very desirous to have an issue. It was next to impossible in her current birth. However by the blessings of Guru (Shri Nrusinha Saraswati) her desire was fulfilled. Gurucharitra is a collection of stories based on the blessings by Guru (Shri Nrusinha Saraswati and Shripad ShriVallabha) to different people, devotees for removing their sorrow, unhappiness and difficulties. Thus there is very importance of Gurucharitra in many people’s life. Many devotees have obtained health, Wealth, happiness and peace in their life by performing parayana of Gurucharitra. Issueless couples are advised to read/listen this adhyay daily to fulfil their desire to have an issue.
 
गुरुचरित्र अध्याय एकूणचाळीसावा 
श्री गणेशायनमः II श्री सरस्वत्यै नमः I श्री गुरुभ्यो नमः I 
सिद्ध म्हणे नामधारका I पुढें अपूर्व वर्तले ऐका I 
साठी वर्षें वांझेसी एका I पुत्र झाला परियेसा II १ II 
आपस्तंब-शाखेसी I ब्राह्मण एक परियेसीं I 
शौनकगोत्र-प्रवरेसी I नाम त्या 'सोमनाथ' II २ II 
'गंगा' नामें त्याची पत्नी I पतिव्रताशिरोमणि I 
वेदशास्त्रें आचरणी I आपण करी परियेसा II ३ II 
वर्षें साठी झालीं तिसी I पुत्र नाहीं तिचे कुशीं I 
वांझ म्हणोनी ख्यातेसी I होती तया गाणगापुरीं II ४ II 
पतिसेवा निरंतर I करी भक्ति पुरस्सर I 
नित्य नेम असे थोर I गुरुदर्शना येत असे II ५ II 
नीरांजन प्रतिदिवसीं I आणोनि करी श्रीगुरूसी I 
येणेंपरी बहुत दिवसीं I वर्तत होती परियेसा II ६ II 
ऐसें असता वर्तमानी I संतुष्ट झाले श्रीगुरूमुनि I 
पृच्छा करिती हांसोनि I तया द्विजस्त्रियेसी II ७ II 
श्रीगुरू म्हणती तियेसी I काय अभीष्ट असे मानसीं I 
आणित्येसी प्रतिदिवसीं I नीरांजन परोपरी II ८ II 
तुझ्या मनींची वासना I सांगे त्वरित विस्तारून I 
सिद्धि पाववील नारायण I गौरीरमण गुरुप्रसादें II ९ II 
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I करी साष्टांगी नमन I 
विनवीतसे करा जोडून I 'अपुत्रस्य लोको नास्ति' II १० II 
पुत्राविणे स्त्रियांसी I पाहों नये मुखासी I 
पापरूपी महादोषी I म्हणती मातें स्वामिया II ११ II 
जिचे पोटीं नाहीं बाळ I तिचा जन्म निर्फळ I 
वाट पाहती उभयकुळ I बेचाळीस पितृलोकीं II १२ II 
पितृ चिंतिती मनांत I म्हणती एखादी सती वंशांत I 
पुत्र व्यालिया आम्हां हित I तो उद्धरील सकळांते II १३ II 
पुत्राविणे जें घर I तें सदा असे अघोर I 
अरण्य नाही त्यासी दूर I 'यथारण्य तथा गृह' II १४ II 
नित्य गंगास्नानासी I आपण जात्यें परियेसीं I 
घेऊनि येती बाळकांसी I समस्त स्त्रिया कवतुकें II १५ II 
कडे घेऊनियां बाळा I खेळविताति स्त्रिया सकळा I 
तैसें नाहीं माझे कपाळा I मंदभाग्य असें देखा II १६ II 
जळो माझें वक्षस्थळ I कडे घ्यावया नाही बाळ I 
जन्मोनियां संसारी निष्फळ I नव्हें पुरुष अथवा सती II १७ II 
पुत्रपौत्र असती जयांसी I परलोक साधे तयांसी I 
अधोगति निपुत्रिकासी I लुप्तपिंड होय स्वामिया II १८ II 
आतां पुरे जन्म मज I साठी वर्षें जाहली सहज I 
आम्हां आतां वर दीजे I पुढे उत्तम जन्म होय II १९ II 
पुत्रवंती व्हावें आपण I अंतःकरण होय पूर्ण I 
ऐसा वर देणें म्हणोन I विनवीतसे तये वेळीं II २० II 
ऐकोनि तियेचे वचन I श्रीगुरू म्हणती हांसोन I 
पुढील जन्म जाणेल कवण I तूंतें स्मरण कैचें सांग II २१ II 
नित्य आरति आम्हांसी I भक्तिपूर्वक भावेंसी I 
करितां जाहलों संतोषी I कन्या-पुत्र होतील तुज II २२ II 
इहजन्मीं तूंतें जाण I कन्या पुत्र सुलक्षण I 
होतील निगुती म्हणोन I श्रीगुरू म्हणती तियेसी II २३ II 
श्रीगुरुवचन ऐकोनि I पालवीं गांठी बांधी ज्ञानी I 
विनवीतसे कर जोडूनि I ऐका स्वामी कृपासिंधु II २४ II 
साठी वर्षें जन्मासी I जाहलीं स्वामी परियेसीं I 
होत नाही विटाळसी I मातें कैचें पुत्र होती II २५ II 
नाना व्रत नाना तीर्थ I हिंडिन्नल्ये पुत्रार्थ I 
अनेक ठायीं अश्वत्थ I पूजा केली स्वामिया II २६ II 
मज म्हणती सकळै जन I करीं वो अश्वत्थ-प्रदक्षिणा I 
तेणें पुरतील मनकामना I होतील पुत्र म्हणोनि II २७ II 
अश्वत्थसेवा बहुतकाळ I करितां माझा जन्म गेला I 
विश्वास म्यां बहु केला I होतील पुत्र म्हणोनि II २८ II 
साठी वर्षें येणेंपरी I कष्ट केले अपरांपरी I 
सेवा करित्यें अद्यापिवरी I अश्वत्थाची प्रदक्षिणा II २९ II 
 पुत्र न होती इह जन्मीं I पुढें होतील ऐसे कामीं I 
सेवा करितसें स्वामी I अश्वत्थाची परियेसा II ३० II 
 आतां स्वामी प्रसन्न होसी I इहजन्मीं पुत्र देसी I 
अन्यथा नोहे बोलासी I तुमच्या स्वामी नरहरी II ३१ II 
स्वामीनीं दिधला मातें वर I माझे मनीं हा निर्धार I 
हास्ये न करी स्वामी गुरु I शकुनगांठी बांधिली म्यां II ३२ II 
पुढील जन्म-काम्यासी I करित्यें सेवा अश्वत्थासी I 
स्वामी आतांचि वर देसी I इहजन्मीं कन्या-पुत्र II ३३ II 
अश्वत्थसेवा बहु दिवस I करितां झाले मज प्रयास I 
काय देईल आम्हांस I अश्वत्थ सेवित्यें मूर्खपणें II ३४ II 
ऐकोनि तियेचें वचन I श्रीगुरु म्हणती हांसोन I 
अश्वत्थसेवा महापुण्य I वृथा नोहे परियेसा II ३५ II 
निंदा न करीं अश्वत्थासी I अनंत पुण्य परियेसीं  I
सेवा करीं वो आम्हांसरसी I तूंतें पुत्र होतील II ३६ II 
आतां आमचे वाक्येंकरी I नित्य जावें संगमातीरी I 
अमरजा वाहे निरंतरी I भीमरथीसमागमांत II ३७ II 
तेथें अश्वत्थ असे गहन I जातों आम्ही अनुष्ठाना I 
सेवा करीं वो एकमनें I आम्हांसहित अश्वत्थाची II ३८ II 
अश्वत्थाचें महिमान I सांगतसें परिपूर्ण I 
अश्वत्थनाम-नारायण I आमुचा वास तेथें असे II ३९ II 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन I विनवीतसे तें अंगना I 
अश्वत्थवृक्षाचें महिमान I स्वामी मातें निरोपावें II ४० II 
कैसी महिमा असे त्यासी I स्वामी सांगावें मजसी I 
स्थिर होईल माझें मानसी I सेवा करीन भक्तीनें II ४१ II 
श्रीगुरु म्हणती तियेसी I अश्वत्थवृक्षासी निंदा करिसी I 
महिमा असे अपार त्यासी I समस्त देव तेथें वसती II ४२ II 
अश्वत्थाचें महिमान I असे ब्रह्माण्डपुराणी निरुपण I 
नारदमुनीस विस्तारोन I ब्रह्मदेवानें सांगितलें II ४३ II 
ब्रह्मकुमर नारदमुनि I नित्य गमन त्रिभुवनीं I 
ब्रह्मयासी पुसोनि I आला ऋषी-आश्रमासी II ४४ II 
नारदातें देखोनि I अर्घ्यपाद्य देवोनि I 
पूजा केली उपचारोनि I पुसते झाले तयेवेळी II ४५ II 
ऋषि म्हणती नारदासी I विनंति एक परियेसीं I 
अश्वत्थमहिमा असे कैसी I विस्तारावें स्वामिया II ४६ II 
ऋषिवचन ऐकोनि I सांगता जाहला नारदमुनि I 
गेलों होतों आजिचे दिनीं I ब्रह्मलोकीं हिंडत II ४७ II 
आपण पुसे स्वभावेंसी I अश्वत्थमहिमा असे कैसी I 
समस्त मानिती तयासी I विष्णुस्वरूप म्हणोनियां II ४८ II 
ऐसा वृक्ष असे जरी I सेवा करणें कवणेपरी I 
 कैसा महिमा सविस्तारीं I निरोपावें स्वामिया II ४९ II 
ब्रह्मा सांगे आम्हांसी I अश्वत्थमुळीं आपण वासी I 
मध्यें वास हृषीकेशी I अग्रीं रुद्र वसे जाणा II ५० II 
शाखापल्लवीं अधिष्ठानीं I दक्षिण शाखे शूलपाणि I 
पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी I आपण उत्तरें वसतसें II ५१ II 
इंद्रादि देव परियेसीं I वसती पूर्वशाखेसी I 
इत्यादि देव अहर्निशी I समस्त शाखेसी वसती जाणा II ५२ II 
गोब्राह्मण समस्त ऋषि I वेदादि यज्ञ परियेसीं I 
समस्त मूळांकुरेसी I असती देखा निरंतर II ५३ II 
समस्त नदीतीर्थें देखा I सप्त-सागर लवणादिका I 
वसती जाणा पूर्व शाखा I ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा II ५४ II 
अ-कारशब्द मूळस्थान I स्कंध शाखा उ-कार जाण I 
फळ पुष्प म-कारवर्ण I अश्वत्थमुख अग्नीकोणीं असे II ५५ II 
एकादश रुद्रादिक I अष्ट वसु आहेत जे का I 
जे स्थानीं त्रैमूर्तिका I समस्त देव तेथें वसती II ५६ II 
ऐसा अश्वत्थनारायण I महिमा वर्णावया शक्त कवण I 
कल्पवृक्ष याचि कारण I ब्रह्मा म्हणे नारदासी II ५७ II 
नारद सांगे ऋषेश्वरांसी I त्रयमूर्ति वास ज्या वृक्षाशीं I 
काय महिमा सांगो त्यासी I भजतां काय सिद्धि नोहे? II ५८ II 
ऐसें ऐकोनि समस्त ऋषि I विनविताति नारदासी I 
आचरावया विधी कैसी I कवणें रीतीनें भजावें II ५९ II 
पूर्वी आम्हीं एके दिवसीं I पुसिले होते आथर्वणासी I 
त्याणें सांगितले आम्हांसी I अश्वत्थसेवा एक रीतीं II ६० II 
 तूं नारद ब्रह्मऋषि I समस्त धर्म ओळखसी I 
 विस्तार करोनि आम्हांसी I विधिपूर्वक निरोपावें II ६१ II 
नारद म्हणे मुनिवरां I त्या व्रताचिया विस्तारा I 
सांगेन ऐका तत्परा I विधान असे ब्रह्मवचनीं II ६२ II 
आषाढ-पौष-चैत्रमासीं I अस्तंगत गुरुशुक्रेसीं I 
चंद्रबळ नसते दिवसीं I करुं नये प्रारंभ II ६३ II 
याव्यतिरिक्त आणिक मासीं I बरवे पाहोनियां दिवसीं I 
प्रारंभ करावा उपवासीं I शुचिर्भूत होऊनि II ६४ II 
 भानुभौमवारेसीं I आतळू नये अश्वत्थासी I 
भृगुवारी संक्रांतिदिवसीं I स्पर्शू नये II ६५ II 
संधीरात्रीं रिक्तातिथीं I पर्वणीसी व्यतीपातीं I 
दुर्दिनादि वैधृतीं I अपराण्हसमयीं स्पर्शूं नये II ६६ II 
अनृत-द्यूतकर्मभेषीं I निंदा-पाखंडवर्जेसी I 
प्रातमौंनी होवोनि हर्षी I आरंभावें परियेसा II ६७ II 
 सचैल स्नान करूनि I निर्मळ वस्त्र नेसोनि I 
वृक्षाखालीं जाऊनि I गोमयलिप्त करावें II ६८ II 
स्वस्तिकादि शंखपद्मेसीं I घालावी रंगमाळा परियेसीं I 
पंचवर्ण चूर्णेसी I भरावें तेथें पद्मांत II ६९ II 
मागुती स्नान करूनि I श्वेत वस्त्र नेसोनि I 
गंगा यमुना कलश दोनी I आणोनि ठेवणें पद्मांवरी II ७० II 
पूजा करावी कलशांसी I पुण्याहवाचनकर्मेसीं I 
संकल्पावें विधींसी I काम्यार्थ आपुलें उच्चारावें II ७१ II 
मग कलश घेवोनि I सात वेळां उदक आणोनि I 
स्नपन करावें जाणोनि I अश्वत्थ वृक्षासी अवधारा II ७२ II 
पुनरपि करूनियां स्नान I मग करावें वृक्षपूजन I 
पुरुषसुक्त म्हणोन I पूजा करावी षोडशोपचारे II ७३ II 
मनीं ध्यावी विष्णुमूर्ति I अष्टभुजा आहेति ख्याती I 
शंख-चक्र-वरद-हस्तीं I अभय-हस्त असे जाणा II ७४ II 
खड्ग-खेटक एके करीं I धनुष्य-बाण सविस्तारीं I 
अष्टभुजी येणेंपरी I ध्यावा विष्णू नारायण II ७५ II 
पितांबर पांघरूण I सदा लक्ष्मी-सन्निधान I 
ऐसी मूर्ति ध्याऊन I पूजा करणें वृक्षासी II ७६ II 
त्रैमूर्तिचें असें स्थान I शिवशक्तीविणे नाहीं जाण I 
समस्तांतें आवाहनोन I षोडशोपचारे पूजावें II ७७ II 
 वस्त्रें अथवा सुतेसीं I वेष्टावे तया वृक्षासी I 
पुनरपि संकल्पेसीं I प्रदक्षिणा कराव्या II ७८ II 
मनसा-वाचा-कर्मणेसीं I भक्तिपूर्वक भावेंसी I 
प्रदक्षिणा कराव्या हर्षी I पुरुषसूक्त म्हणत देखा II ७९ II 
अथवा सहस्रनामेंसीं I कराव्या प्रदक्षिणा हर्षी I 
अथवा कराव्या मौन्येंसीं I त्याचें फळं अमित असे II ८० II 
चाले जैसी स्त्री गर्भिणी I उदककुंभ घेउनी I 
तैसे मंद गतीनी I प्रदक्षिणा कराव्या शुद्धभावें II ८१ II 
पदोपदीं अश्वमेध I पुण्य जोडे फलप्रद I 
प्रदक्षिणासमाप्तमध्य I नमस्कार करावा II ८२ II 
ब्रह्महत्यादि पापांसी I प्रायश्चित्त नाहीं परियेसीं I 
प्रदक्षिणा द्विलक्षांसी I ब्रह्महत्या पाप जाय II ८३ II 
त्रिमूर्ति वसती जया स्थानीं I फल काय सांगू प्रदक्षिणी I 
समस्त पापा होय धुणी I गुरुतल्पादि पाप जाय II ८४ II 
नाना व्याधि हरती दोष I प्रदक्षिणा करितां होय सुरस I 
कोटी ऋण असे ज्यास I परिहरत परियेसा II ८५ II 
जन्म मृत्यु जरा जाती I संसारभय नाश होती I 
ग्रहदोष बाधों न शकती I सहस्र प्रदक्षिणा केलिया II ८६ II 
पुत्रकाम्य असें ज्यासी I त्यातें फल होय भरंवसी I 
मनोवाक्कायकर्मेसी I एकोभावें करावें II ८७ II 
चतुर्विध पुरुषार्थ I देता होय तो अश्वत्थ I 
पुत्रकाम्य होय त्वरित I न करा अनुमान ऋषी हो II ८८ II 
शनिवारीं वृक्ष धरोनि I जपावें मृत्युंजय-मंत्रांनी I 
काळमृत्यु जिंकोनि I राहती नर अवधारा II ८९ II 
त्यासी अपमृत्यु न बाधती I पूर्णायुषी होती निश्चिती I 
शनिग्रह न पीडिती I प्रार्थावें अश्वत्थासी II ९० II 
शनिनाम घेवोनि I उच्चारावें आपुले जीव्हेनी I 
बभ्रू-पिंगळ म्हणोनि I कोणस्थ-कृष्ण म्हणावें II ९१ II 
अंतक-यम-महारौद्री I मंद-शनैश्चर-सौरि I 
जप करावा येणेंपरी I शनिपीडा न होय II ९२ II 
ऐसे दृढ करोनि मना I अश्वत्थ सेवितां होय कामना I 
पुत्रकाम्य तत्क्षणा I होय निरुतें अवधारा II ९३ II 
अमावास्या-गुरुवारेंसी I अश्वत्थछाया-जळेसी I 
स्नान करितां नरासी I ब्रह्महत्या पाप जाय II ९४ II 
अश्वत्थतळीं ब्राह्मणासी I अन्न देतां एकासी I 
कोटि ब्राह्मणां परियेसीं I भोजन दिल्हें फळ असे II ९५ II 
अश्वत्थतळीं बैसोन I एकदां मंत्र जपतां क्षण I 
फळें होतील अनेकगुण I वेदपठण केलियाचें II ९६ II 
नर एखादा अश्वत्थासी I स्थापना करी भक्तीसी I 
आपुले पितृ-बेचाळिसी I स्वर्गी स्थापी परियेसा II ९७ II 
छेदितां अश्वत्थवृक्षासी I महापाप परियेसीं I 
पितृसहित नरकासी I जाय देखा तो नर II ९८ II 
अश्वत्थातळीं बैसोन I होम करितां महायज्ञ I 
अक्षय सुकृत असे जाण I पुत्रकाम्य त्वरित होय II ९९ II 
ऐसा अश्वत्थमहिमा I नारदाप्रति सांगे ब्रह्मा I 
म्हणोनि ऐकती ऋषिस्तोम I त्या नारदापासोनि II १०० II 
नारद म्हणे ऋषेश्वरासी I प्रदक्षिणेच्या दहावे अंशीं I 
हवन करावें विशेषी I आगमोक्त विधानपूर्वक II १०१ II 
हवनाचे दहावे अंशी I ब्राह्मणभोजन करावें हर्षी I 
ब्रह्मचर्य हविष्यान्नेसी I व्रत आपण करावें II १०२ II 
येणेंपरी आचरोन I मग करावें उद्यापन I 
शक्त्यनुसार सौवर्ण I अश्वत्थवृक्ष करावा II १०३ II 
तो द्यावा ब्राह्मणासी I विधिपूर्वक परियेसीं I 
श्वेतधेनु सवत्सेसीं I ब्राह्मनातें दान द्यावी II १०४ II 
वृक्षातळीं तिळराशी I करावी यथानुशक्तीसी I 
श्वेतवस्त्र झांकोनि हर्षी I सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावें II १०५ II 
ऐसें अश्वत्थविधान I सांगे नारद ऋषिजना I 
येणेंपरी आचरोन I सकळाभीष्ट लाधले II १०६ II 
श्रीगुरू म्हणती वांझ सतीसी I अश्वत्थमहिमा आहे ऐसी I 
भावभक्ती असे ज्यासी I त्यातें होय फलश्रुति II १०७ II 
आचार करीं वो येणेंपरी I संशय अंतःकरणी न धरी I 
वृक्ष असे भीमातीरी I जेथें अमरजासंगम II १०८ II 
तेंची आमुचें असें स्थान I सेवा करीं वो एकोमनें I 
होईल तुझी मनकामना I कन्या पुत्र तुझ होतील II १०९ II 
 ऐकोनि श्रीगुरूचें वचन I नमन करी ते अंगना I 
विनवीतसे कर जोडूनि I भावभक्तीकरोनियां II ११० II 
आपण वांझ वर्षें साठी I कैंचे पुत्र आपुले पोटीं I 
वाक्य असे तुमचें शेवटीं I म्हणोनि आपण अंगीकारीन II १११ II 
गुरुवाक्य म्हणजे कामधेनु I ऐसे बोलती वेदपुराण I 
आतां नाहीं अनुमान I करीन सेवा स्वामिया II ११२ II 
चाड नाहीं अश्वत्थासी I निर्धार तुमचे बोलासी I 
सेवा करीन तुमची ऐसी I म्हणोनि चरणी लागली II ११३ II 
ऐसा निरोप घेवोनि I जावोनि वनिता संगमस्थानीं I 
षट्कूलांत न्हाऊनि I सेवा करी अश्वत्थाची II ११४ II 
श्रीगुरूनिरोप जेणेंपरी I तैसी सेवा करी ते नारी I 
येणेंपरी तीन रात्रीं I आराधिलें परियेसा II ११५ II 
श्रीगुरूसहित अश्वत्थासी I पूजा करित तिसरे दिवसी I 
स्वप्न जाहलें तियेसी I सांगेन ऐका एकचित्तें II ११६ II 
स्वप्नामध्यें विप्र एक I येवोनि देतो तिसी भाक I 
काम्य झालें तुझें ऐक I सांगेन एक करीं म्हणे II ११७ II 
जाऊनि गाणगापुरांत I तेथें असे श्रीगुरुनाथ I 
प्रदक्षिणा करीं हो सात I नमन करीं तूं भक्तींसीं II ११८ II 
जें काय देतील तुजसी I भक्षण करीं वो वेगेसीं I 
निर्धार धरुनि मानसीं I त्वरित जावें म्हणे विप्र II ११९ II 
ऐसें देखोनि सुषुप्तींत I सवेंचि झाली ते जागृत I 
कल्पवृक्ष असे अश्वत्थ I कल्पिलें फळ त्वरित होय II १२० II 
सेवा करूनि चवथे दिवशी I आली आपण मठासी I 
प्रदक्षिणा करूनि हर्षी I नमन केलें तये वेळी II १२१ II 
हांसोनिया श्रीगुरूमुनि I फळें देती तिसी दोनी I 
भक्षण करीं वो संतोषोनि I काम्य झालें आतां तुझें II १२२ II 
भोजन करीं वो तूं आतां त्वरित I काम्य होईल तुझें सत्य I 
कन्या-पुत्र दोघे तूंतें I दिल्हे आजि परियेसा II १२३ II 
पारणें करोनि विधीसी I मग भक्षावें या फलांसी I 
दान द्यावें ब्राह्मणांसी I जे काय पूर्वी निरोपिलें II १२४ II 
व्रत संपूर्ण करोनि I केलें दान तें भामिनीं I 
तेचि दिवसी अस्तमानी I झाली आपण विटाळशी II १२५ II 
मौन दिवस तीनवरी I भोजन करी हिरवे खापरीं I 
श्वेत वस्त्र नेसोनि नारी I कवणाकडे न पाहेचि II १२६ II 
 येणेंपरी तिन्हीं निशी I क्रमिल्या नारीनें परियेसीं I 
 सुस्नात होवोनि चवथे दिवशीं I आली श्रीगुरुचे दर्शना II १२७ II 
पतीसमवेत येऊनि I पूजा करि ति एकाग्रमनीं I 
श्रीगुरु म्हणती संतोषोनि I पुत्रवंती व्हावें तुम्ही II १२८ II 
ऐसे नमूनि श्रीगुरूसी I आली आपुल्या मंदिरासी I 
ऋतु दिधला पांचवे दिवसी I म्हणोनि कन्या परियेसा II १२९ II 
येणेंपरी ते नारी I जाहली ऐका गरोदरी I 
ग्राम सकळ विस्मय करी I काय नवल म्हणतसे II १३० II 
म्हणती पहा नवल वर्तलें I वांझेसी गर्भधारण केवीं झालें I 
सोमनाथ विप्र भले I करीतसे आनंद II १३१ II 
सातवे मासीं ओटी भरिती I अक्षय वाणें ओंवाळिती I 
श्रीगुरूसी विनोदावरी प्रीति I वाणें देवविती कौतुकें II १३२ II 
 आठवे मासीं तो ब्राम्हण I करी सीमंतविधान I 
गुरुनिरोपें संतोषोन I देती वाणें ग्रामांत II १३३ II 
अभिनव करिती सकळही जन I म्हणती वांझेसी गर्भधारण I 
पांढरे केश म्हातारपण I वाणें देती कौतुकें II १३४ II 
एक म्हणती श्रीगुरुप्रसाद I श्रीनृसिंहमूर्ति भक्तवरद I 
त्याची सेवा करितां आनंद I लाधे चारी पुरुषार्थ II १३५ II 
त्रैमूर्तीचा अवतार I झाला नृसिंहसरस्वती नर I 
भक्तजनां मनोहर I प्रगटला भूमंडळीं II १३६ II 
ऐसें नानापरी देखा I स्तोत्र करिती गुरुनायका I 
वाणें देत तें बालिका I अत्योल्हास तिच्या मनीं II १३७ II 
वाणें देऊनि समस्तांसी I येऊनि नमी ती श्रीगुरूसी I 
भक्तवत्सल परियेसी I आशीर्वचन देतसे II १३८ II 
 संतोषोनि विप्रवनिता I करी साष्टांग दंडवता I 
नानापरी स्तोत्र करितां I विनवीतसे परियेसा II १३९ II 
जय जया परमपुरुषा I तूंचि ब्रह्मा विष्णुमहेशा I 
तुझें वाक्य जाहलें परीस I सुवर्ण केला माझा देह II १४० II 
तूं तारावया विश्वासी I म्हणोनि भूमीं अवतरलासी I 
त्रैमूर्ति तूंचि होसी I अन्यथा नव्हे स्वामिया II १४१ II 
तुझी स्तुति करावयासी I अशक्य आपुले जिव्हेसी I 
अपार तुझ्या महिमेसी I नाही साम्य कृपासिंधु II १४२ II 
येणेंपरी स्तोत्र करूनि I श्रीगुरुचरण वंदूनि I 
गेली निरोप घेऊनि I आपुले गृहा परियेसा II १४३ II 
ऐसे नवमास क्रमोनि I प्रसूत जाहली शुभदिनीं I 
समस्त ज्योतिषी येवोनि I वर्तविती जातकातें II १४४ II 
ज्योतिषी म्हणती तये वेळीं I होईल कन्या मन निर्मळी I 
अष्टपुत्रा वाढेल कुळी I पुत्रपौत्रीं नांदेल II १४५ II 
येणेंपरी ज्योतिषीं I जातक वर्तविलें परियेसीं I 
सोमनाथ आनंदेसी I दानधर्म करिता जाहला II १४६ II 
दहा दिवस क्रमोनि I सुस्नात झाली तें भामिनी I 
कडिये बाळक घेवोनि I आली श्रीगुरूदर्शनासी II १४७ II 
बाळक आणोनि भक्तींसी I ठेविलें श्रीगुरूचरणापाशीं I 
नमन करी साष्टांगेसी I एकभावेंकरोनियां II १४८ II 
आश्वासोनि श्रीगुरुमूर्ति I उठीं बाळे पुत्रवंती I 
बहुतपरी संतोषविती I प्रेमभावेंकरोनियां II १४९ II 
उठोनि विनवी ती श्रीगुरूसी I पुत्र नाही आमुचे कुशीं I 
सरस्वती आली घरासी I बोल आपुला सांभाळावा II १५० II 
ऐकोनि तियेचें वचन I श्रीगुरू म्हणती हांसोन I 
न करी मनी अनमान I तूंतें पुत्र होईल II १५१ II 
म्हणोनि तिये कुमारीसी I कडिये घेती प्रीतींसीं I 
सांगताति समस्तांसी I तये कन्येचें लक्षण II १५२ II 
पुत्र होतील बहु इसी I होईल आपण शतायुषी I 
पुत्राचे पौत्र नयनेंसीं I पाहील आपण अहेवपपणें II १५३ II 
होईल इसी ज्ञानी पति I त्यातें चारी वेद येती I 
अष्ट ऐश्वर्ये नांदती I प्रख्यात होवोनि भूमंडळी II १५४ II 
आपण होईल पतिव्रता I पुण्यशील धर्मरता I 
इची ख्याति होईल बहुता I समस्त इसी वंदिती II १५५ II 
दक्षिणदेशीं महाराजा I येईल इचे दर्शनकाजा I 
आणिक पुत्र होईल तुज I म्हणोनि श्रीगुरू बोलती II १५६ II 
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति I कन्यालक्षण सांगती I 
विप्रवनिता विनयवृत्तीं I म्हणे पुत्र व्हावा मज II १५७ II 
श्रीगुरू म्हणती तियेसी I पुत्र व्हावा तुज कैसी I 
योग्य पाहिजे वर्षे तीसी I अथवा शतायुषी मूर्ख पैं II १५८ II 
ऐकोनि श्रीगुरुच्या वचना I विनवीतसे ते अंगना I 
योग्य पाहिजे पुत्र आपणा I तयासी पांच पुत्र व्हावे II १५९ II 
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति I वर देते तेणें रीतीं I 
संतोषोनि घरा जाती I महानंद दंपतीसी II १६० II 
पुढें तीसी पुत्र झाला I वेदशास्त्रीं विख्यात भला I 
पांच पुत्र तो लाधला I नामकरणी श्रीगुरूचा II १६१ II 
कन्यालक्षण श्रीगुरूमूर्ती I निरोपिलें होतें जेणें रीती I 
प्रख्यात झाली सरस्वती I महानंद प्रवर्तला II १६२ II 
यज्ञ करी तिचा पति I प्रख्यात नाम 'दीक्षिती' I 
चहूं राष्ट्रीं त्याची ख्याती I म्हणोनि सांगे सिद्धमुनि II १६३ II 
साठी वर्षें वांझेसी I पुत्र जाहला परियेसी I 
सिद्ध म्हणे नामधारकासी I ऐसी कृपा श्रीगुरुची II १६४ II 
निर्धार असे ज्याचे मनीं I त्यासी वर देती तत्क्षणी I 
एकोभावे याकारणी I भक्ति करावी श्रीगुरुची II १६५ II 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर I सांगे गुरुचरित्रविस्तार I 
भजा भजा हो श्रीगुरू I सकळाभीष्ट लाधे तुम्हां II १६६ II 
जो भजेल श्रीगुरूसी I एकोभावे भक्तींसीं I 
त्यासी दैन्य कायसी I जें जें मागेल देईल सत्य II १६७ II 
गुरुभक्ति म्हणजे कामधेनु I अंतःकरणी नको अनुमानु I 
जें जें इच्छीत भक्तजनु I समस्त देईल परियेसा II १६८ II 
इति श्रीगुरूचरीत्रामृते परमकथाकल्पकरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्यासंतानप्राप्ति नाम ऐकोनचत्वारींशत्तमोSध्यायः II 
II श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II 


Gurucharitra Adhyay 39 
गुरुचरित्र अध्याय एकूणचाळीसावा 


Custom Search

Friday, April 6, 2012

Mantratmakam ShriMaruti Stotram मन्त्रात्मकं श्रीमारुतिस्तोत्रं

Mantratmakam ShriMaruti Stotram 

We celebrate Shri Hanuman birth day on Chaitra Pournima every year. This year Chaitra Pournima is on 6th April 2012. I am uploading Mantratmakam ShriMaruti Stotram which is in Sanskrit. It is a very beautiful creation of Shri Vasudevanand Saraswati. Maruti/Hanuman is a great devotee of God Ram. This stotra is called as Mantratmakam because if we write first letter (Sanskrit Devanagari) of each line, it form a hanuman Mantra. This can be translated as “Om namo bhagavat aanjaneyaay mahaabalaaya swaahaa”. 
1 I bow to Vayu (God Wind) putra (son) Hanuman. Hanuman can take a very big form or a small form as per his will. He can remove sorrow and affection. He had removed sorrow of Sita. He had destroyed AshokVan and burnt Lanka. He is a very good orator. I bow to God Hanuman who is messenger of God Ram. (1-2) 
2 He had a tremendous speed and he had defeated God Vayu. He had saved life of Laxman. He is leader of monkeys. He has a very good control over his organs and will. He lives in forests. He is very knowledgeable. He is commander of army of Sugriv. I bow to Anjani putra God Hanuman. (3-4) 
3 He is destroyer of fear of death and birth. He is remover of all troubles. He is very near and dear devotee of God Ram. He is remover of fear from demon, devil and ghost. He also makes us free from fear of Yaksha, Demon, lions and serpents and other poisonous creatures. I bow to that monkey roopa God Hanuman. (5-6) 
4 He has crossed a big ocean in his one leap. He is great and powerful among all. His body is very hard and strong like Vajra (Weapon of God Indra). I bow to great God Hanuman. O! God Hanuman please protects me. (7-7.5) 
5 O! Hanuman you are death of Demons. You bless us/your devotees immediately. Please make me successful and victorious. Please destroy all my enemies. (8-8.5) 
6 The devotee who recites this stotra for the people depending on him becomes victorious. Nobody can defeat him. (9)
Thus here completes Mnatratmakam ShriMaruti Stotram.

मन्त्रात्मकं श्रीमारुतिस्तोत्रं 
ॐ नमो वायुपुत्राय भीमरूपाय धीमते I 
नमस्ते रामदूताय कामरूपाय श्रीमते II १ II 
मोहशोकविनाशाय सीताशोकविनाशिने I 
भग्नाशोकवनायास्तु दग्धलङ्काय वाग्मिने II २ II 
गतिनिर्जितवाताय लक्ष्मण प्राणदाय च I 
वनौकसां वरिष्ठाय वशिने वनवासिने II ३ II 
तत्त्वज्ञान सुधासिन्धुनिमग्नाय महीयसे I 
 आञ्जनेयाय शूराय सुग्रीवसचिवाय ते II ४ II 
जन्ममृत्युभयघ्नाय सर्वक्लेशहराय च I 
नेदिष्ठाय प्रेतभूतपिशाचभयहारिणे II ५ II 
यातनानाशनायास्तु नमो मर्कटरूपिणे I 
यक्षराक्षसशार्दूलसर्पवृश्चिक भीह्रते II ६ II 
महाबलाय वीराय चिरंजीविन उद्धते I 
हारिणे वज्रदेहाय चोल्लङ्घितमहाब्धये II ७ II 
बलिनामग्रगण्याय नमो नः पाहि मारुते I 
लाभदोSसि त्वमेवाशु हनुमन् राक्षसान्तक II ८ II 
यशो जयं च मे देहि शत्रून् नाशय नाशय I 
स्वाश्रितानामभयदं य एवं स्तौति मारुतिम् I 
हानिः कुतो भवेत्तस्य सर्वत्र विजयी भवेत् II ९ II 
II इति श्री ह्रत्पुन्दरिकाधिष्ठितश्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृतं मन्त्रात्मकं श्रीमारुतिस्तोत्रं संपूर्णं II
मन्त्रात्मकं श्रीमारुतिस्तोत्रं मराठी अर्थ: 

दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंती साजरी करतो. या वर्षी आपण हनुमान जयंती ६ एप्रिल २०१२ ला साजरी करत आहोत. सर्व हनुमान भक्तांसाठी परम पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वतींचे मंत्रात्मक मारुती स्तोत्र सादर करीत आहे. 
१-२) मी भयंकर रुप धारण करणार्या बुद्धिमान वायुपुत्र हनुमानाला नमस्कार करतो. जो स्वेच्छेनुसार रूप धारण करण्यास समर्थ आहे, जो मोह आणि शोकाचा नाश करणारा आहे, जो सीतेचा शोक नाहीसा करणारा आहे, अशोकवनाचा विध्वंसक जो लंकेचे भस्म करणारा आहे आणि जो कुशल वक्ता आहे त्या श्रीमान रामदूताला मी नमस्कार करतो. 
३-४) ज्याने आपल्या वेगाने प्रत्यक्ष वायुला हरविले आहे, जो लक्ष्मणाचा प्राणदाता आहे, माकडांमध्ये श्रेष्ठ, जितेंद्रिय, वनामध्ये राहणारा, तत्त्वज्ञानरुपी अमृतसागरांत मग्न असणारा, महान ऐश्वर्यशाली आणि सुग्रीवाच्या सचिवाला त्या शूरवीर अंजनी नंदनाला मी नमस्कार करतो. 
५-६) जो जन्ममृत्यूरुपी भयाचा नाश करणारा, सर्व कष्टांचा नाश करणारा, भगवान श्री रामांचा निकटचा, भूत, प्रेत, पिशाच यांच्या भयाला निवारणारा, पीडेचा नाशक, आणि यक्ष, राक्षस, सिंह, सर्प आणि विंचू याच्या भयापासून रक्षण करणारा, त्या मर्कट रुपी हनुमानाला नमस्कार असो. 
७-७.५) जो महासागराला पार करणारा आहे, अहंकारी लोकांचा गर्व हरण करणारा, चिरंजीवी, बलवानांमध्ये अग्रगण्य, ज्याचे शरीर वज्रासारखे कठीण आहे, त्या महाबली वीरवर हनुमानाला नमस्कार करतो. हे मारुतीराया आमचे रक्षण कर. 
८-८.५) राक्षसांसाठी कालस्वरूप, हनुमाना आपण शीघ्र लाभ देणारे आहात, म्हणून मला यश द्या आणि विजयी करा. तसेच माझ्या शत्रुंचा सर्वथा नाश करा. 
९) जो हनुमान भक्त त्याच्यावर आश्रीत असलेल्या लोकांसाठी अभय देणार्या हनुमानाचे या स्तोत्रा द्वारे स्तवन करतो, तो सर्वत्र विजयी होतो त्याची कशी बरे हानी होईल? अर्थात त्याची हानी होणारच नाही आणि तो यशस्वी आणि विजयी होईल. 
अशा रीतीने श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीनी रचिलेले मन्त्रात्मक श्रीमारुतिस्तोत्र संपूर्ण झाले. 
या स्तोत्राला मन्त्रात्मकं असे म्हंटले आहे कारण परम पूज्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीनी या स्तोत्राच्या रचनेंत 
" ॐ नमो भगवत आंजनेयाय महाबलाय स्वाहा
हा मंत्र गुंफला आहे. स्तोत्राच्या प्रत्येक ओळींतील पहिले अक्षर घेतल्यावर हा मंत्र तयार होतो.  

Mnatratmakam ShriMaruti Stotram 
मन्त्रात्मकं श्रीमारुतिस्तोत्रं Custom Search

Sunday, April 1, 2012

Shri RamChandraShtakam

Shri RamChandraShtakam 

Today we celebrate God Ram’s birthday. It is celebrated on every year on Chaitra Shuddha Navami. This year it is on 1st April 2012. I am uploading God Ram’s ashtakam for all and more particularly for God Ram’s devotees. Shri RamChandraShtakam is a beautiful creation of poet Amardas who was disciple of Ramadas. This stotra is in Sanskrit. He says in this stotra that God Ram should remain in my, in all devotees’ hearts forever. 

श्रीरामचंद्राष्टकं 
चिदाकारो धाता परमसुखदः पावनतनु 
र्मुनिन्द्रैर्योगिन्द्रैर्यतिपति सुरेन्द्रैर्हनुमता 
सदा सेव्यः पूर्णो जनकतनयाङ्गः सुरगुरु 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II १ II 
मुकुन्दो गोविन्दो जनकतनयालालितपदः 
पदं प्राप्ता यस्याधमकुलभवा चापि शबरी I 
गिरातीतोSगम्यो विमलधिषणैर्वेदवचसा 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II २ II 
धराधीशोSधीशः सुरनरवराणां रघुपतिः 
किरीटी केयूरी कनकपिशः शोभितवपुः I 
समासीनः पीठे रविशतनिभे शान्तमनसो I 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ३ II 
वरेण्यः शारण्यः कपिपतिसखश्चान्तविधुरो 
ललाटे काश्मीरो रुचिरगतिभङ्गः शशिमुखः I 
नराकारो रामो यतिपतिनुतः संसृतिहरो I 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ४ II 
विरूपाक्षः काश्यामुपदिशति यन्नाम शिवदं 
सहस्रं यन्नाम्नां पठति गिरिजा प्रत्युषसि वै I 
स्वलोके गायन्तिश्वरविधिमुखा यस्य चरितं I 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ५ II 
परो धीरोSधीरोSसुरकुलभवश्चासुरहरः 
परात्मा सर्वज्ञो नरसुरगणैर्गीतसुयशाः I 
अहल्याशापघ्नः शरकरऋजुः कौशिकसखो I 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ६ II 
हृषीकेशः शौरिर्धरणिधरशायी मधुरिपु 
रुपेन्द्रो वैकुण्ठो गजरिपुहरस्तुष्टमनसा I 
बलिध्वंसी वीरो दशरथसुतो नीतिनिपुणो I 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ७ II 
कविः सौमित्रीड्यः कपटमृगघाती वनचरो 
रणश् लाघी दान्तो धरणिभरहर्ता सुरनुतः I 
अमानी मानज्ञो निखिलजनपूज्यो हृदिशयो I 
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ८ II 
इदं रामस्तोत्रं वरममरदासेन रचित 
मुषःकाले भक्त्या यदि पठति यो भावसहितम् I 
मनुष्यः स क्षिप्रं जनिमृतिभयं तापजनकं
 परित्यज्य श्रेष्ठं रघुपतिपदं याति शिवदम् II ९ II 
 II इति श्रीमद्रामदासपूज्यपादशिष्यश्रीमद्धंसदासशिष्येणामरदासाख्यकविना विरचितं श्रीरामचंद्राष्टकं संपूर्णं II 

श्रीरामचंद्राष्टकं मराठी अर्थ :
१) जे ज्ञानस्वरूप आहेत, जगताचे धारण-पोषण करणारे आहेत, परमसुख देणारे दाते आहेत, ज्यांचे शरीर सर्वाना पवित्र करणारे आहे, मुनींद्र, योगींद्र, यतीश्वर, देवेश्वर, आणि हनुमान ज्यांची नेहमी सेवा करतात, जे पूर्ण आहेत, सीता ज्यांची पत्नी आहे, जे देवतांचे पण गुरु आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
२) जे मुकुंद, गोविंद नावांनी ओळखले जातात, सीतेने ज्यांच्या पायांची सेवा केली आहे, शबरीने ज्यांच्या नावाचे भजन केल्यावर ती परमधामास प्राप्त झाली, जे विमल बुद्धी असणार्यांचे वाणीचे करते आहेत, आणि जे वेदवचनाना पण अगम्य आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
३) जे पृथ्वीचे अधीश्वर आहेत, जे श्रेष्ठ देवतांचे आणि माणसांचे पण स्वामी आहेत, जे रघुकुलाचे नाथ आहेत, ज्यांनी डोक्यावर मुगुट आणि बाहुमध्ये केयूर धारण केले आहे, ज्यांनी सोन्यासारखे पीतवर्ण वस्त्र परिधान केले आहे, ज्यामुळे त्यांचे शरीर शोभित झाले आहे, जे शेकडो सूर्यांच्या तेजा प्रमाणे देदीप्यमान सिंहासनावर बसले आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम शांत हृदय असलेल्या माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
४) जे श्रेष्ठ आहेत, शरण देणारे आहेत, सुग्रीवाचे मित्र आहेत, ज्यांना अंत नाही, ज्यांच्या कपाळावर केशराचा टिळा आहे, ज्यांची चाल अतिसुंदर आहे, मुखारविंद चंद्राप्रमाणे आनंददायी आहे, जे मनुष्य रूपांत असूनही जे राम योग्यांचे ध्येय आहेत, यतीश्वरगण ज्यांची स्तुती करतात, जे जन्म-मृत्यू रुपी संसाराला हरवणारे आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
५) काशीमध्ये भगवान शंकर ज्यांच्या कल्याणप्रद नावाचा उपदेश देतात, पार्वती ज्यांच्या सहस्र नावांचा सकाळी पाठ करते, शिव, ब्रह्मा आदी देवगण आपापल्या लोकी ज्यांच्या दिव्य चरित्राचे गायन करतात, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
६) जे अत्यंत धीर असून अधीर (अविद्या) दूर करणारे आहेत, असुर (सूर्य) कुलांत जन्म असूनही असुरांचा नाश करणारे आहेत, जे परमात्मा आहेत, सर्वज्ञ आहेत, मनुष्य आणि देवगण ज्यांच्या यशाचे गाणे गातात, ज्यांनी अहिल्येच्या शापाचा संहार केला, ज्यांच्या हातांत बाण शोभत आहे, जे सरळ स्वभावाचे आणि विश्वामित्रांचे मित्र आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
७) जे हृषीकेश, शौरि, शेषशायी, मधुसूदन, उपेंद्र, वैकुंठ, आदी नावांनी ओळखले जातांत, ज्यांनी प्रसन्न होऊन गजराज्याच्या शत्रूचा नाश केला, जे बळीला पदच्युत करणारे आहेत, जे वीर आहेत, नीतिनिपुण, लक्ष्मीपति, दशरथनंदन, ते भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
८) जे त्रिकाळदर्शी (कवी) आहेत, लक्ष्मणाचे पूज्य आहेत, ज्यांनी वनांत भ्रमण करतांना मायामृग मारीचाचा वध केला, जे युद्धप्रिय आहेत, जे दान्त (मन आणि इंद्रियांचा दमन करणारे) आहेत, पृथ्वीचा भार हरण करणारे, ज्यांची देवतांनी स्तुती केली आहे, जे स्वतः मान रहित होऊन दुसर्यांना सन्मान देणारे आहेत, सर्व लोकांचे पूज्य आहेत, सर्वांच्या हृदयांत वास करणारे आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत. 
९) जो मनुष्य प्रातःकाळी भक्ती आणि श्रद्धेने अमरदास कवीने रचलेल्या या सुंदर रामस्तोत्राचा पाठ करेल, तो अतिशीघ्र या तापजनक जन्म-मृत्यूरुपी भयांतून मुक्त होऊन श्रेष्ठ आणि कल्याणप्रद रघुनाथांच्या पदाची प्राप्ती करेल. 
अशा रीतीने रामदासांच्या शिष्याने अमरदास कवीने रचिलेले हे श्रीरामचन्द्राष्टक संपूर्ण झाले. Custom Search