Shri RamChandraShtakam
Today we celebrate God Ram’s birthday. It is celebrated on every year on Chaitra Shuddha Navami. This year it is on 1st April 2012. I am uploading God Ram’s ashtakam for all and more particularly for God Ram’s devotees. Shri RamChandraShtakam is a beautiful creation of poet Amardas who was disciple of Ramadas. This stotra is in Sanskrit. He says in this stotra that God Ram should remain in my, in all devotees’ hearts forever.
श्रीरामचंद्राष्टकं
चिदाकारो धाता परमसुखदः पावनतनु
र्मुनिन्द्रैर्योगिन्द्रैर्यतिपति सुरेन्द्रैर्हनुमता
सदा सेव्यः पूर्णो जनकतनयाङ्गः सुरगुरु
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II १ II
मुकुन्दो गोविन्दो जनकतनयालालितपदः
पदं प्राप्ता यस्याधमकुलभवा चापि शबरी I
गिरातीतोSगम्यो विमलधिषणैर्वेदवचसा
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II २ II
धराधीशोSधीशः सुरनरवराणां रघुपतिः
किरीटी केयूरी कनकपिशः शोभितवपुः I
समासीनः पीठे रविशतनिभे शान्तमनसो I
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ३ II
वरेण्यः शारण्यः कपिपतिसखश्चान्तविधुरो
ललाटे काश्मीरो रुचिरगतिभङ्गः शशिमुखः I
नराकारो रामो यतिपतिनुतः संसृतिहरो I
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ४ II
विरूपाक्षः काश्यामुपदिशति यन्नाम शिवदं
सहस्रं यन्नाम्नां पठति गिरिजा प्रत्युषसि वै I
स्वलोके गायन्तिश्वरविधिमुखा यस्य चरितं I
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ५ II
परो धीरोSधीरोSसुरकुलभवश्चासुरहरः
परात्मा सर्वज्ञो नरसुरगणैर्गीतसुयशाः I
अहल्याशापघ्नः शरकरऋजुः कौशिकसखो I
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ६ II
हृषीकेशः शौरिर्धरणिधरशायी मधुरिपु
रुपेन्द्रो वैकुण्ठो गजरिपुहरस्तुष्टमनसा I
बलिध्वंसी वीरो दशरथसुतो नीतिनिपुणो I
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ७ II
कविः सौमित्रीड्यः कपटमृगघाती वनचरो
रणश् लाघी दान्तो धरणिभरहर्ता सुरनुतः I
अमानी मानज्ञो निखिलजनपूज्यो हृदिशयो I
रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् II ८ II
इदं रामस्तोत्रं वरममरदासेन रचित
मुषःकाले भक्त्या यदि पठति यो भावसहितम् I
मनुष्यः स क्षिप्रं जनिमृतिभयं तापजनकं
परित्यज्य श्रेष्ठं रघुपतिपदं याति शिवदम् II ९ II
II इति श्रीमद्रामदासपूज्यपादशिष्यश्रीमद्धंसदासशिष्येणामरदासाख्यकविना
विरचितं श्रीरामचंद्राष्टकं संपूर्णं II
१) जे ज्ञानस्वरूप आहेत, जगताचे धारण-पोषण करणारे आहेत, परमसुख देणारे
दाते आहेत, ज्यांचे शरीर सर्वाना पवित्र करणारे आहे, मुनींद्र, योगींद्र, यतीश्वर,
देवेश्वर, आणि हनुमान ज्यांची नेहमी सेवा करतात, जे पूर्ण आहेत, सीता ज्यांची
पत्नी आहे, जे देवतांचे पण गुरु आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत
नेहमी वास करोत.
२) जे मुकुंद, गोविंद नावांनी ओळखले जातात, सीतेने ज्यांच्या पायांची सेवा केली आहे,
शबरीने ज्यांच्या नावाचे भजन केल्यावर ती परमधामास प्राप्त झाली, जे विमल बुद्धी
असणार्यांचे वाणीचे करते आहेत, आणि जे वेदवचनाना पण अगम्य आहेत, ते लक्ष्मीपती भगवान
श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत.
३) जे पृथ्वीचे अधीश्वर आहेत, जे श्रेष्ठ देवतांचे आणि माणसांचे पण स्वामी आहेत, जे
रघुकुलाचे नाथ आहेत, ज्यांनी डोक्यावर मुगुट आणि बाहुमध्ये केयूर धारण केले आहे,
ज्यांनी सोन्यासारखे पीतवर्ण वस्त्र परिधान केले आहे, ज्यामुळे त्यांचे शरीर शोभित झाले आहे,
जे शेकडो सूर्यांच्या तेजा प्रमाणे देदीप्यमान सिंहासनावर बसले आहेत, ते लक्ष्मीपती भगवान
श्रीराम शांत हृदय असलेल्या माझ्या चित्तांत नेहमी वास करोत.
४) जे श्रेष्ठ आहेत, शरण देणारे आहेत, सुग्रीवाचे मित्र आहेत, ज्यांना अंत नाही, ज्यांच्या
कपाळावर केशराचा टिळा आहे, ज्यांची चाल अतिसुंदर आहे, मुखारविंद चंद्राप्रमाणे आनंददायी
आहे, जे मनुष्य रूपांत असूनही जे राम योग्यांचे ध्येय आहेत, यतीश्वरगण ज्यांची स्तुती करतात,
जे जन्म-मृत्यू रुपी संसाराला हरवणारे आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत
नेहमी वास करोत.
५) काशीमध्ये भगवान शंकर ज्यांच्या कल्याणप्रद नावाचा उपदेश देतात, पार्वती ज्यांच्या सहस्र
नावांचा सकाळी पाठ करते, शिव, ब्रह्मा आदी देवगण आपापल्या लोकी ज्यांच्या दिव्य चरित्राचे
गायन करतात, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत.
६) जे अत्यंत धीर असून अधीर (अविद्या) दूर करणारे आहेत, असुर (सूर्य) कुलांत जन्म असूनही
असुरांचा नाश करणारे आहेत, जे परमात्मा आहेत, सर्वज्ञ आहेत, मनुष्य आणि देवगण ज्यांच्या
यशाचे गाणे गातात, ज्यांनी अहिल्येच्या शापाचा संहार केला, ज्यांच्या हातांत बाण शोभत आहे,
जे सरळ स्वभावाचे आणि विश्वामित्रांचे मित्र आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तांत
नेहमी वास करोत.
७) जे हृषीकेश, शौरि, शेषशायी, मधुसूदन, उपेंद्र, वैकुंठ, आदी नावांनी ओळखले जातांत, ज्यांनी प्रसन्न
होऊन गजराज्याच्या शत्रूचा नाश केला, जे बळीला पदच्युत करणारे आहेत, जे वीर आहेत, नीतिनिपुण,
लक्ष्मीपति, दशरथनंदन, ते भगवान श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत.
८) जे त्रिकाळदर्शी (कवी) आहेत, लक्ष्मणाचे पूज्य आहेत, ज्यांनी वनांत भ्रमण करतांना मायामृग
मारीचाचा वध केला, जे युद्धप्रिय आहेत, जे दान्त (मन आणि इंद्रियांचा दमन करणारे) आहेत, पृथ्वीचा
भार हरण करणारे, ज्यांची देवतांनी स्तुती केली आहे, जे स्वतः मान रहित होऊन दुसर्यांना सन्मान
देणारे आहेत, सर्व लोकांचे पूज्य आहेत, सर्वांच्या हृदयांत वास करणारे आहेत, ते लक्ष्मीपती भगवान
श्रीराम माझ्या चित्तांत नेहमी वास करोत.
९) जो मनुष्य प्रातःकाळी भक्ती आणि श्रद्धेने अमरदास कवीने रचलेल्या या सुंदर रामस्तोत्राचा पाठ
करेल, तो अतिशीघ्र या तापजनक जन्म-मृत्यूरुपी भयांतून मुक्त होऊन श्रेष्ठ आणि कल्याणप्रद
रघुनाथांच्या पदाची प्राप्ती करेल.
अशा रीतीने रामदासांच्या शिष्याने अमरदास कवीने रचिलेले हे श्रीरामचन्द्राष्टक संपूर्ण झाले.
Custom Search
No comments:
Post a Comment