Monday, May 30, 2011

Shri Dattateya VajraKavacha Stotram 2 Of 4

Shri Dattateya VajraKavacha Stotram
This VajraKavacha Stotram is in Sanskrit. This is told to Goddess Parvati by God Shiva for the benefit of the people/devotees of God Dattatreya. I am uploading this Dattateya VajraKavacha Stotram in four parts as it is very long. However every part is important. Hence the devotee of God Dattatreya has to listen and recite all four parts to receive all the benefits described in the last i.e. 4th part (Falashruti).
Part 2
Dhyaanam

Dhyaanam i.e. How God Dattatreya looks. Please remember that this Dhyaanam is told by God Dattatreya himself to Dalaadana Muni. Hence it is also important to recite or hear this 2nd part with concentration, devotion and faith in mind.
God Dattatreya is sat, chit and anand rupi (filled with sat, chit and anand). He knows everything and he is head among all the renowned yogis. He takes is bath in the holy water of Bhagirathi (Ganga) river in holy city of Kashi (Banaras). In Kolhapur he performs Sandhya and Japa. In Mahur he accepts Bhiksha (food). He takes rest on hills of Sanhyadri.
His color is blue. His body is like Moon. He is lustrous. His hairs are soft and smooth. His eyes are filled with kindness and are white, pupils are blue. His smile is very attractive. He is always found engaged in spreading knowledge and removing the difficulties, sorrow and all sorts of hurdles from the life of his devotees. This is the description of God Dattatreya in short. Rest can be seen in this video and at the time of reciting this kavacha can be visualized by the devotee himself.
At the end of this Part 2, the devotee is being asked to perform pooja of shri God Dattatreya and then recite the Mantra “Om Dram” hundred and eight times (108).
श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रम् चा भाग २
अथ ध्यानं II
जगदंकुरकंदाय सच्चिदानंदमूर्तये I
दत्तात्रेयाय योगींद्रचन्द्राय परमात्मने II १ II
अथ ध्यानं II
१) श्री दत्तात्रेय हे जगदरुपी अंकुराचे किंवा वृक्षाचे कंद अर्थात् मूळ आहेत. ते सत् , चित् व आनंदरुपी आहेत. ते योगीश्रेष्टान् मध्ये चंद्रासारखे शीतल प्रकाशदायी आहेत. ते आत्मस्वरूपी आहेत. त्यांना मी नमस्कार करतो.
कदा योगी कदा भोगी कदा नग्नः पिशाचवत् I
दत्तात्रेयो हरिः साक्षाद्भुक्तीमुक्तीप्रदायकः II २ II
२) श्री दत्तात्रेय हे एखाद्या वेळी योगी, एखाद्या वेळी भोगी, एखाद्या वेळी दिगंबर, तर एखाद्या वेळी पिशाच्चाप्रमाणे भासतात. हे श्री दत्तात्रेय साक्षात् हरि म्हणजे भक्तांचे दु;ख हरण करणारे श्री विष्णुच आहेत. हे भुक्ती व मुक्ती देणारे आहेत.
वाराणसीपुरस्नायी कोल्हापुरजपादरः I
माहुरीपुरभिक्षाशी सह्यशायी दिगंबरः II ३ II
इंद्रनीलसामाकारःचंद्रकांतीसमद्दुतिः I
वैडूर्यसदृशस्फूर्तिःचलत्किंचिज्जटाधरः II ४ II
३-४) श्री दत्तात्रेय काशी क्षेत्रांतील भागीरथी नदींत स्नान करतात. कोल्हापुरांत संध्याजपादि करतात. माहुरक्षेत्रांत भिक्षा मागून भूक शांत करतात व संह्याद्री पर्वतावर विश्रांती घेतात. त्यांचा वर्ण इंद्रनील मण्याप्रमाणे आहे. त्यांची अंगकांती चंद्राप्रमाणे शीतल व मोहक आहे. त्यांचे तेज वैडूर्यरत्नाप्रमाणे सर्वत्र पसरणारे आहे. त्यांचा जटाभार किंचित सैलसर, चंचल व हलणारा आहे.
स्निग्धधावल्ययुक्ताक्षोSत्यंतनील कनीनिकः I
भ्रूवक्षःश्मश्रुनीलांकः शशांकसदृशाननः II ५ II
हासनिर्जितनीहारः कंठनिर्जितकंबुकः I
मांसलांसो दीर्घबाहुः पाणिर्निर्जितपल्लवाः II ६ II
५-६) त्यांचे डोळे शुभ्र व स्नेहाळ आहेत व त्यांतील बाहुल्या निळ्या आहेत. त्यांच्या भिवया, छाती, दाढी व मिश्यांचे केस किंचित् निळसर आहेत. तर मुख चंद्राप्रमाणे आकर्षक आहे. त्यांच्या हास्याने कमळांना जिंकले आहे. त्यांचे खांदे पुष्ट व भरीव आहेत. हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. करतळ हे पल्लवाहून कोवळे किंवा नाजूक आहेत.
विशालपीनवक्षाश्यच ताम्रपाणिर्दलोदरः I
पृथुलश्रोणिललितो विशालजघनस्थलः II ७ II
रंभास्तंभोपमानोरुर्जानुपूर्वैकजंघकः I
गूढगुल्फः कूर्मपृष्टो लसत्पादोपरिस्थलः II ८ II
रक्तारविंदसदृशरमणीयपदाधरः I
चर्माम्बरधरो योगी स्मर्तृगामी क्षणे क्षणे II ९ II
७ ते ९) श्री दत्तात्रेयांची छाती रुंद व पुष्ट आहे. तळहात तांबूस आहेत. त्यांचा उदरभाग पाकळीप्रमाणे पातळ आहे. त्यांचा कटिभाग रुंद व सुंदर आहे. जंघा भरीव व मोठ्या आहेत. त्यांच्या मांड्या केळीच्या बुंध्याप्रमाणे गोल व वर्तुळाकार आहेत. त्यांचे गुढघे व पोटऱ्या स्पष्ट दिसतात. मात्र त्यांचे घोटे मांसल असल्याने स्पष्ट दिसत नाहीत. त्यांची पाठ कासवाच्या पाठीसारखी थोडी फुगीर आहे. त्यांचे तळपाय व ओठ तांबड्या कमलाप्रमाणे लाल आहेत. ते हरीण-व्याघ्रादी प्राण्यांची कातडी वस्त्राप्रमाणे वापरतात. ते योगनाथ अर्थात योगीश्रेष्ट आहेत. ते त्यांची आठवण केल्यावर लगेच धावून येतात. 
ज्ञानोपदेशनिरतो विपद्धरणदीक्षितः I
सिद्धासनसमासीन ऋजुकायो हसन्मुखः II १० II
१०) श्री दत्तात्रेय ज्ञानोपदेश देण्यांत रमलेले, भक्तांची संकटे हरणं करण्याची दीक्षा घेतलेले, सिद्धासनांत सदा बसणारे, देह सरळ ठेवणारे, मंद हास्य करणारे व हसऱ्या चेहऱ्याचे असे आहेत.
वामहस्तेन वरदो दक्षिणेनाभयंकरः I
बालोन्मत्तपिशाचीभिः क्वचिद्दुक्तः परीक्षितः II ११ II
त्यागी भोगी महायोगी नित्यानंदो निरंजनः I
सर्वरुपी सर्वदाता सर्वगः सर्वकामदः II १२ II
११-१२) श्री दत्तात्रेय डाव्या हाताने वर देतात. उजव्या हाताने अभय देतात. श्री दत्तात्रेयांसारख्या महापुरुषांच्या भोवती लहान मुले, उनाड-उन्मत्त मुले व पिशाचवृत्तीची माणसे किंवा भुते क्वचित् प्रसंगी वेढा देवून असतात. श्री दत्तात्रेयांची दृष्टी चौकस, सावध व परीक्षा करणारी असते. श्री दत्तत्रेया हे विरक्त ( त्यागी ) आहेत. भोगासक्तही आहेत आणि महान योगीही आहेत. ते सदैव आत्मानंदांत असतात. ते निर्लेप म्हणजे दोषरहित आहेत. ते सर्व स्वरूपी, सर्व देणारे, सर्वत्र गमनशील व भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत.
भस्मोद्धूलितसर्वांगो महापातकनाशनः I
भुक्तिप्रदो मुक्तिदाता जीवन्मुक्तो न संशयः II १३ II
१३) श्री दत्तात्रेय हे सर्व शरीराला नेहमी भस्म लावतात. ते मोठमोठ्या पातकांचा नाश करतात. भोगेच्छूना भोग देतात व मुमुक्षूंना मोक्ष देऊन मुक्त करतात. ते स्वतः जीवनमुक्त आहेत ह्यांत काही संशय नाही.
एवं ध्यात्वाSनन्यचित्तो मद्वज्रकवचं पठेत् I
मामेव पश्यन्सर्वत्र स मया सह संचरेत् II १४ II
१४) माझे ( श्री दत्तात्रेयांचे ) हे रूप ध्यानात आणून हे वज्रकवच पठण करावे व मला अर्थात श्री दत्तात्रेयांना सर्वत्र पाहावे व मला मनांत ठेवून सर्वत्र खुशाल फिरावे.
दिगंबरं भस्मसुगंधलेपनं I
चक्रं त्रिशूलं गरुडम् गदायुधं I
पद्मासनं योगिमुनीन्द्र वंदितं i
दत्तेति नामस्मरेण नित्यं II १५ II
१५) पूर्वादि दिशा हे ज्यांचे वस्त्र आहे म्हणजे जे दिगंबर आहेत, ज्यांच्या देहावर सुगंधी भस्माचा लेप आहे, ज्यांच्या हातात चक्र, त्रिशूल व गदा आहे, ज्यांच्या जवळ गरुड आहे, जे नेहमी पद्मासनांत बसतात, किंवा ज्यांचे आसन कमळाचे आहे आणि योगिवर्य व मुनिवर्य ज्यांना नेहमी वंदन करतात अशा श्री दत्तात्रेयांचे नामस्मरण करीत नित्य असावे.
अथ पंचोपचारैः संपूज्य,
ओम द्रां इति १०८ वारं जपेत् I
यानंतर पंचोपचारांनी गंध, अक्षदा, फुले, धूप व नैवेद्यांनी श्री दत्तात्रेयांचे पूजन करून ओम द्रां असा १०८ वेळा जप करावा.
Shri Dattateya VajraKavacha Stotram 2 Of 4
Custom Search

Tuesday, May 17, 2011

Shri Dattateya VajraKavacha Stotram 1 Of 4


Shri Dattateya VajraKavacha Stotram
This VajraKavacha Stotram is in Sanskrit. This is told to Goddess Parvati by God Shiva for the benefit of the people/devotees of God Dattatreya. I am uploading this Dattateya VajraKavacha Stotram in four parts as it is very long. However every part is important. Hence the devotee of God Dattatreya has to listen and recite all four parts to receive all the benefits described in the last i.e. 4th part (Falashruti).
Part 1
This part describes why it was told, how it created, how God Shiva told to Goddess Parvati and why earlier it was told by God Dattatreya himself to Daladan Muni. The chanda and the Karanyasa and Hrudayadi nyasa are appearing at the end of this 1st part.
Rushies asked Ved Vyasa rushi, how in this Kali Yuga we can get success in Dharma, Artha, Kama and Moksha easily. Ved Vyasa told them that he is telling them the discussion in between God Shiva and Goddess Parvati which describes the easiest way for the people to be free from all sort of troubles, sorrow and difficulties arising in their life in this Kali Yuga. Goddess Parvati asks God Shiva to take her to the earth (BhooMandala) to see how people live their. Then this Dattatreya VajraKavacha was told to Goddess Parvati by God Shiva; which was earlier told to Daladana Muni by God Dattatreya himself.
Daladana Muni knew that God Dattatreya gives Darshan to his devotees whenever his devotee remembers him with full devotion. Hence to see if it is right, Daladana Muni remembers God Dattatreya and immediately God Dattatreya appears before the Muni. Daladana Muni asks for apology from God Dattatreya by worshiping him. God Datttatreya asked him what Muni wants as blessings? Daladana Muni asked God Dattatreya to give him whatever is in his mind. Hence God Dattatreya has given/told him this VajaraKavacha.


II श्री दत्तात्रेय वज्रकवच II
II श्री गणेशाय नमः II
श्री दत्तात्रेयाय नमः II ऋषय ऊचुः II
कथं संकल्पसिद्धिः स्याद्वेवव्यास कलौ युगे I
धर्मार्थकाममोक्षाणां साधनं किमुदाहृतं II १ II
१) ऋषिगण व्यासऋषींना म्हणाले की, हे महर्षी ! या कलीयुगांत आपल्या इच्छित गोष्टींची सफलता कशाने होते? तसेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळविण्याचे सुलभ साधन कोणते आहे? 
शृण्वन्तु ऋषयः सर्वे शीघ्रं संकल्पसाधनं I
सकृदुच्चारमात्रेण भोगमोक्षप्रदायकं II २ II
२) वेदव्यासऋषि म्हणाले, हे ऋषिनों ऐका संकल्पसिद्धि ताबडतोप करणारे व एकदाचा उच्चार केल्याने भोग-मोक्ष देणारे असे साधन सांगतो. 
गौरीशृंगे हिमवतः कल्पवृक्षोपशोभितं I 
दीप्तेदिव्यमहारत्नहेममंडपमध्यगं II 3 II
रत्नसिंहासनासीनं प्रसन्नं परमेश्वरं II
मंदस्मितमुखांभोजं शंकरं प्राह पार्वती II ४  II
३-४) हिमालयांतील गौरीनावाच्या शिखरावर दिव्यरत्नमय सुवर्णमंडपामध्ये रत्नमय सिंहासनावर बसलेल्या प्रसन्नमुख व मंद हास्य करणाऱ्या परमेश्वर श्री शंकरांना श्रीपार्वतीने पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला
श्री देव्युवाच II
देवदेव महादेव लोकशंकर शंकर I
मंत्रजालानि सर्वाणि यंत्रजालानि कृत्स्नशः II ५ II
तंत्रजालान्यनेकानि मया त्वत्तः श्रुतानि वै I
इदानीमं द्रष्टुमिच्छामि विशेषेण महीतलं II ६ II
५-६) श्रीपार्वतीदेवीने असे विचारले की, हे परमेश्वरा ! हे महादेवा ! हे लोकहित करणाऱ्या श्रीशंकरा ! सर्व प्रकारची मंत्र-यंत्र व तंत्र मी आपल्याकडून ऐकली. आता मी ते भूमंडळ पाहू ईच्छिते.
इत्युदीरितमाकर्ण्य पार्वत्या परमेश्वरः I
करेणामृज्य सन्तोषात्पार्वतीं प्रत्यभाषत II ७ II
मयेदानीं त्वया सार्धं वृषमारुह्य गम्यते I
इत्युक्त्वा वृषमारुह्य पार्वत्या सह शंकरः II ८ II
ययौ भूमंडलं द्रष्टुं गौर्याः चित्राणि दर्शयन् I
क्वचित विंध्याचलप्रान्ते महारण्ये सुदुर्गमे II ९ II
७ ते ९) श्रीपार्वतीचे असे भाषण ऐकून संतुष्ट झालेल्या श्रीशंकराने हाताने श्रीपार्वती देवीला शाबासकी दिली व ते तिला असे म्हणाले की, बरे, तर मग चला, आत्ताच आपण दोघे नंदीवर बसून निघू. असे म्हणून श्रीपार्वतीसह नंदीवर आरूढ होऊन श्रीमहादेव पृथ्वीवर आले व श्री पार्वतीला अनेक चित्रविचित्र भूप्रदेश दाखवीत दाखवीत विंध्यपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अत्यंत दुर्गम अशा महाअरण्यांत आले.
तत्र व्याहर्तुमायांतं भिल्लंपरशुधारिणं I
वर्ध्यमानं महाव्याघ्रं नखदंष्ट्राभिरावृतं II १० II
१०) तेथे त्यांनी सहज विहारासाठी आलेल्या व कुऱहाड हातात घेतलेल्या अशा उंच्या-पुऱ्या शरीराच्या भिल्लास पाहिले. तेथेच त्यांना एक मोठा वाघ दिसला. त्याची नखे व दाढा अत्यंत भयप्रद होत्या.
अतीव चित्रचारित्र्यं वज्रकाय समायुतं I
अप्रयन्तमनायासमखिन्नं सुखमास्थितं II ११ II
पलायन्तं मृगं पश्चादव्याघ्रो भीत्या पलायितः I
एतदाश्चर्यमालोक्य पार्वती प्राह शंकरं II १२ II
११-१२) तेथेच एक मजबूत शरीराचा मृग आरामांत बसलेला व खुशींत असलेला व ताज्या दमाचा व नाचत-बागडत असलेला पार्वतीला दिसला. विशेष म्हणजे त्या हरिणाला पाहून एक मोठा वाघ भिऊन पळत सुटला होता. हे आश्चर्यकारक दृश्य पाहून श्रीपार्वती देवीने श्री शंकरना पुढीलप्रमाणे विचारले.
श्री पार्वत्युवाच II
किमाश्चर्यं किमाश्चर्यमग्रे शंभो निरीक्ष्यतां I
इत्युक्तः स ततः शंभुर्दृष्ट्वा प्राह पुराणवित् II १३ II
१३) श्रीपार्वतीदेवी श्रीशंकरांना असे म्हणाली की, हे महादेवा जरा इकडे बघा तरी ! काय आश्चर्य आहे ! तेव्हा तिकडे पाहून श्री महादेवांनी पूर्व इतिहास जाणून पार्वतीला तो पुढील प्रमाणे कथन केला.
श्री शंकर उवाच II
गौरी वक्ष्यामि ते चित्रमवाड्मानसगोचरं II
अदृष्ट पूर्वं अस्माभिः नास्ति किंचिन्न न कुत्रचित् II १४ II
१४) श्रीशिवशंकर असे म्हणाले की, हे पार्वती ! मन-वाणीला अगोचर असे आम्ही न पाहिलेले असे काहीही कोठेही नाही.
मया सम्यक समासेन वक्ष्यते शृणु पार्वति I
अयं दूरश्रवा नाम भिल्ल परम धार्मिकः II १५ II
१५) मी तुला थोडक्यांत जे चांगले आहे ते सांगतो. ते तू श्रवण कर. हा दूरश्रवा नावाचा भिल्ल आहे. तो अत्यंत धर्मा चरणी आहे.
समित्कुशप्रसूनानि कंदमूल फलादिकं I
प्रत्यहं विपिनं गत्वा समादाय प्रयासतः II १६ II
प्रिये पूर्वं मुनींद्रेभ्यः प्रयच्छति न वांछति I
ते अपि तस्मिन्नपि दयां कुर्वते सर्व मौनिनः II १७ II
१६-१७) हा दररोज अरण्यांत जाऊन, मोठ्या प्रयत्नाने समिधा, दर्भ, फुले, कंदमुळे व फळे इत्यादि आणून येथील मुनिवर्याना देत असे व त्याच्या मोबदल्यांत कशाचीही इच्छा करीत नसे. मुनिवर्यमात्र त्याच्यावर कृपादृष्टी करीत असत.
दलादनो महायोगी वसन्नेव निजाश्रमे I
कदाचित स्मरत सिद्धं दत्तात्रेयं दिगम्बरं II १८ II
१८) एकदा दलादन नावाच्या महायोगी ऋषींनी आपल्या आश्रमांत बसल्या बसल्याच सिद्ध व दिगंबर अशा श्री दत्तात्रेयांचे स्मरण केले.
दत्तात्रेयः स्मर्तृगामी चेतिहासं परीक्षितुं I
तत्क्षणात सोSपी योगीन्द्रो दत्तात्रेय उपस्थितः II १९ II
१९) श्री दत्तात्रेय हे स्मरण करताच त्यांचे स्मरण करणाराकडे लगेच येतात, या ऐकीव इतिहासाची परीक्षा पाहण्या साठी दलादन ऋषींनी हे स्मरण केले होते. त्याचक्षणी ते योगीराज श्रीदत्तात्रेय तेथे प्रगट झाले.
तद दृष्टवाSSश्चर्यतोषाभ्यां दलादन महामुनिः I
संपूजाग्रे निषीदन्तं दत्तात्रेमुवाच तं II २० II
मयोपहूतः संप्राप्तो दत्तात्रेय महामुने I
स्मर्तुगामी त्वमित्येतत किंवदन्ती परीक्षितुं II २१ II
मयाद्य संस्मृतोSसि त्वमपराधं क्षमस्व मे I
दत्तात्रेयो मुनिं प्राह मम प्रकृतिरिदृशी II २२ II
२० ते २२) ते पाहून आश्चर्याने व आनंदाने श्रीदलादन ऋषींनी श्रीदत्तात्रेयांना आपल्यासमोर आसनावर बसवून त्यांचे पूजन केले व त्यांना असे म्हणाले की, हे प्रभो दत्तात्रेया ! आपण स्मर्तृगामी आहात, हे जे सर्वत्र प्रसिद्ध आहे, त्याची परीक्षा घेण्यासाठी मी आपले स्मरण केले. या माझ्या अपराधाबद्दल मी आपली क्षमा मागतो. तेव्हा श्री दत्तात्रेय त्या मुनींना म्हणाले की, अरे माझा स्वभावच स्मर्तृगामी असा आहे.
अभक्त्या वा सुभक्त्या वा यः स्मरेन्मामनन्यधीः I
तदानीं तमुपागत्य ददामि तदभीप्सितं II २३ II
दत्तात्रेयो मुनिं प्राह दलादन मुनीश्वरं I
यदिष्टं तत् वृणीष्व त्वं यत प्राप्तोSहं त्वया स्मृतः II २४ II
दत्तात्रेयं मुनिः प्राह मया किमपि नोच्यते I
त्वच्चित्ते यत्स्थीतं तन्मे प्रयच्छ मुनिपुंगव II २५ II
२३ ते २५) अभक्तीने वा सद्भक्तीने जो माझे अनन्य भावाने स्मरण करेल, त्याच्याकडे मी त्याचक्षणी जाऊन त्याचे ईच्छीत त्यास देतो. त्यासाठी हे दलादन मुनी आपल्याला जे इष्ट असेल ते आपण मागा. कारण तुम्ही स्मरण केल्याने मी आलो आहे. त्यावर दलादन मुनी श्री दत्तात्रेयांना असे म्हणाले की, मला काहीही मागावयाचे नाही. आपल्या मनांत जे असेल ते आपण मला द्यावे.
श्री दत्तात्रेय उवाच II
ममास्ति वज्रकवचं गृहाणेत्यवदन्मुनिं I
तथेत्यंगीकृतवते दलादन मुनये मुनिः II २६ II
स्ववज्रकवचं प्राह ऋषिच्छन्दः पुरःसरं I
न्यासं ध्यानं फलं तत्र प्रयोजनमशेषतः II २७ II
२६-२७) हे ऐकताच श्री दत्तात्रेय त्यांना असे म्हणाले की, माझे एक कवच आहे. त्याला वज्रकवच असे म्हणतात. ते तू, घ्यावेस. असे म्हणताच, बरे आहे, असे म्हणून श्रीदलादन मुनींनी त्यांना होकार दिला. लगेचच मुनिवर्य श्री दत्तात्रेयांनी ऋषि, छन्द, न्यास, ध्यान, फल व प्रयोजन यांसह स्वतःचे वज्रकवच त्यांना सांगितले. 
अस्य श्रीदत्तात्रेयवज्रकवचस्तोत्रमंत्रस्य II किरातरुपी महारुद्र ऋषिः II
अनुष्टुप् छन्दः II श्री दत्तात्रेयो देवता II
द्रां बीजं II आं शक्तिः II क्रौं कीलकम् II
ओम आं आत्मने नमः II ओम द्रीं मनसे नमः II
ओम आं द्रीं श्रीं सौः II
ओम क्लां क्लीं क्लुं क्लैम् क्लौं क्लः II
श्रीदत्तात्रेयप्रसादसिध्यर्थे जपे विनियोगः II
या श्रीदत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र मंत्राचा किरातरूपी (महाभिल्ल रूपी) महारुद्र ऋषि आहे. छन्द अनुष्टुप् आहे.
श्री दत्तात्रेय देवता आहे. द्रां हे बीज आहे. आं ही शक्ती व क्रौं हे कीलक आहे. ओम आत्मने नमः म्हणजे आत्मतत्वाला नमस्कार असो. ओम द्रीं मनसे नमः म्हणजे मनस्तत्वाला नमस्कार असो.
ओम आं द्रीं श्रीं सौः II
ओम क्लां क्लीं क्लुं क्लैम् क्लौं क्लः II
श्री दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे वज्रकवच म्हणावे.
अथ करन्यासः II
ओम द्रां अंगुष्ठाभ्यां नमः II ओम द्रीं तर्जनीभ्यां नमः II
ओम द्रूं मध्यमाभ्यां नमः II ओम द्रें अनामिकाभ्यां नमः II
ओम द्रौं कनिष्ठिकाभ्यां नमः II ओम द्रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः II
आता पुढीलप्रमाणे दोन्ही हातांनी दोन्ही हातांचे न्यास करावेत. ओम द्रां असे म्हणून दोन अंगठ्यांना तर्जनीने म्हणजे पहिल्या बोटाने स्पर्श करून नमस्कार करावा. ओम द्रीं असे म्हणून
दोन तर्जनींना अंगठ्याने स्पर्श करून
नमस्कार करावा. ओम द्रूं असे म्हणून दोन्ही मधल्या बोटांना अंगठ्याने स्पर्श करून
नमस्कार करावा. ओम द्रें असे म्हणून अनामिकांना म्हणजे तिसऱ्या बोटांना व ओम द्रौं असे म्हणून दोन्ही करंगळ्यांना अंगठ्याने स्पर्शपूर्वक नमस्कार करावा. ओम द्रः असे म्हणून दोन्ही तळहात एकमेकावर फिरवून स्पर्श करून नमस्कार करावा.
अथ हृदयादि न्यासः II
ओम द्रां हृदयाय नमः II ओम द्रीं शिरसे स्वाहा II
ओम द्रूं शिखायै वषट् II ओम द्रैं कवचाय हुं II
ओम द्रौं नेत्रत्रयाय वौषट् II ओम द्रः अस्त्राय फट् II
ओम भूर्भुवःस्वरोमिति दिग्बंधः II
आता पुढील प्रमाणे हृदय इत्यादि शरीराच्या भागांचे न्यास करावेत. ओम द्रां हृदयाय नमः असे म्हणून हृदयाला उजवा हात लाऊन नमस्कार करावा. ओम द्रीं शिरसे स्वाहा डोक्याला हात लाऊन नमस्कार करावा. ओम द्रूं शिखायै वषट् असे म्हणून शेंडीला हात लाऊन नमस्कार करावा. ओम द्रें कवचाय हुं असे म्हणून दोन्ही हात शरीराकडे वळवून व फिरवून नमस्कार करावा. ओम द्रौं नेत्रत्रयाय वौषट् असे म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीने उजव्या डोळ्याला व अनामिकेने डाव्या डोळ्याला व मध्यमेने आज्ञाचक्राला स्पर्श करून नमस्कार करावा. ओम द्रः अस्त्राय फट् असे म्हणून उजव्या हाताने चुटक्या वाजवत डोक्याभोवती हात फिरवून डाव्या हातावर टाळी वाजवावी. ओम भूर्भुवःस्वरोम् असे म्हणून दश दिशांना अक्षता टाकून व नमस्कार करून दिग्बंधन करावे.
हे मराठी भाषांतर कै. ब्रह्मश्री पंडित आत्मारामशास्त्री जेरे यांनी केलेले आहे.

Shri Dattateya VajraKavacha Stotram 1 Of 4

Custom Search