Saturday, June 30, 2012

Gurucharitra Adhyay 20


 This adhyay is in Marathi. This Gurucharitra Adhyay is mainly for the better health of the children. Even if anybody is sick, ill or suffering from any critical disease and if he/she listen this adhyay daily with devotion, concentration he gets cured and becomes happy with sound health. This adhyay describes a story of the blessings of Guru, Shri NarasinhaSaraswati to his devotee mother of a child who was sick and almost lost his life. By the blessings of the Guru the child recovers from bad health and the mother becomes happy. The next adhyay 21 is also further describes how Guru cures the child.

गुरुचरित्र अध्याय विसावा (२०) 
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । 
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरुनि ॥ १ ॥ 
पुसतसे तयावेळीं । माथा ठेवोनि चरणकमळी । 
जय जया सिद्ध-स्तोममौळी । विनंति एक अवधारा ॥ २ ॥ 
स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । 
गौप्यरुपें अमरापुरासी । औदुंबरीं असती म्हणतां ॥ ३ ॥ 
वर देऊनि योगिनींसी । आपण आले प्रकटेसी । 
पुढें तया स्थानीं कैसी । विस्तार झाला तें निरोपावें ॥ ४ ॥ 
वृक्ष सांगसी औदुंबरु । निश्र्चयें म्हणसी कल्पतरु । 
पुढें कवणा झाला वरु । निरोपावें दातारा ॥ ५ ॥ 
शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि । 
सांगतसे विस्तारुनि । औदुबरस्थानमहिमा ॥ ६ ॥ 
सिद्ध म्हणे ऐक बाळा । किती सांगू गुरुची लीळा । 
औदुंबरीं सर्वकाळ । वास आपण असे जाणा ॥ ७ ॥ 
जया नाम कल्पतरु । काय पुससी तयाचा वरु । 
जेथें वास श्रीगुरु । कल्पिलें फळ तेथें होय ॥ ८ ॥ 
अमित झाला तेथें महिमा । सांगावया अशक्य आम्हां । 
एखादा सांगों दृष्टांत तुम्हां । शिष्योत्तमा नामधारका ॥ ९ ॥ 
'शिरोळ' म्हणिजे ग्रामेसी । विप्र एक परियेसीं । 
'गंगाधर' नाम ऐसी । वेदरत होता जाणा ॥ १० ॥ 
त्याची भार्या पतिव्रता । शांत असे सुशीलता । 
तिसी पुत्र होती ते सवेंचि मृत्युता । कष्टतसे येणेंपरी ॥ ११ ॥ 
पांच पुत्र तिसी झाले । सवेंचि पंचत्व पावले । 
अनेक देव आराधिले । नव्हे कवणेपरी स्थिर ॥ १२ ॥ 
दुःख करी ते नारी । व्रतें उपवास अपरांपरी । 
पूर्वकर्म असे थोरी । स्थिर नोहे पुत्र तिसी ॥ १३ ॥ 
रहणी कर्मविपाकेसीं । विचार करिती तिच्या दोषासी । 
पुत्रशोक व्हावयासी। सांगती पातकें तये वेळी ॥ १४ ॥ 
सांगती विप्र विद्वज्जन । पुत्र न वांचती काय कारण । 
पूर्वजन्म-दोषगुण । विस्तार करिती तियेसी ॥ १५ ॥ 
गर्भपात स्त्रियांसी । जे जन करिती तामसी । 
पावती वांझ-जन्मासी । झाले पुत्र मरती जाणे ॥ १६ ॥ 
अश्र्ववध गोवध करी । वांझ होय सदा ज्वरी । 
एकादा परद्रव्य अपहारी । अपुत्री होय तो जाणा ॥ १७ ॥ 
विप्र म्हणती तियेसी । तुझे पूर्वजन्म-दोषी । 
दिसतसे आम्हांसी । सांगू ऐका एकचित्तें ॥ १८ ॥ 
शौनकगोत्री द्‍विजापाशी । रीण घेतलें द्रव्यासी । 
मागतां तुवां न देसी । कष्टला बहुत तो ब्राह्मण ॥ १९ ॥ 
लोभी होता तो ब्राह्मण । द्रव्यसंबंधे दिधला प्राण । 
आत्महत्या केलिया गुणें । तो पिशाच झाला असें ॥ २० ॥ 
 गर्भपात करी तो तुज । जाहल्या मृत्यु करी तो द्‍विज । 
तुझें कर्म असे सहज । आपली जोडी भोगावी ॥ २१ ॥ 
ऐकोनि ब्राह्मणांचे वचन । विप्रवनिता खेदें खिन्न । 
अनुतप्त होऊनि अंतःकरण । द्‍विजचरणां लागली ॥ २२ ॥ 
कर जोडोनि तयेवेळीं । विनवीतसे करुणाबहाळी । 
माथा ठेवूनि चरणकमळीं । पुसतसे तयावेळी ॥ २३ ॥ 
ऐसी पापिणी दुराचारी । बुडाल्यें पापाचे सागरीं । 
स्वामी मातें तारीं तारीं । उपाय सांगणे म्हणतसे ॥ २४ ॥ 
ऐसीं पापें हळाहळी । आपण भक्षिलें चांडाळी । 
औषधी सांगा तुम्ही सकळीं । म्हणोनि सभेसी विनवीतसे ॥ २५ ॥ 
विप्र म्हणती तियेसी । तुवां केली ब्रह्महत्या दोषी । 
अपहारिलें द्रव्यासी । ब्राह्मण पिशाच जाहला असे ॥ २६ ॥ 
जघीं मेला द्‍विजवर । केली नाही क्रियाकर्म-पर । 
त्याचें द्रव्य तुवां सारें । भोगिलें असे जन्मांतरी ॥ २७ ॥ 
त्यासी करणे उद्धारगति । सोळावे कर्म करावे रीतीं । 
द्रव्य द्दावे एकशती । तथा गोत्रद्‍विजासी ॥ २८ ॥ 
तेणे होय तुज बरवें । एकोभावें आचरावें । 
कृष्णातीरी वास करावें । एक मास उपवासी ॥ २९ ॥ 
पंचगंगासंगमेसीं । तीर्थें असती बहुवसी । 
औदुंबरवृक्षासी । आराधावें परियेसा ॥ ३० ॥ 
पापविनाशी करुनि स्नान । वेळ सात औदुंबरस्नपन । 
अभिषेकोनि श्रीगुरुचरण । पुन्हां स्नान काम्यतीर्थी ॥ ३१ ॥ 
विधिपूर्वक श्रीगुरुचरणीं । पूजा करावीं भावोनि । 
येणेपरी भक्तीनें । मास एक आचरावें ॥ ३२ ॥ 
स्थान असे श्रीगुरुचें । नरसिंहसरस्वतीचें । 
तुझे दोष जातील साचे । पुत्र होतील शतायुषी ॥ ३३ ॥ 
मास आचरोनि येणेंपरी । मग ब्राह्मणातें पाचारीं । 
द्रव्य द्दावें शौनकगोत्री । द्‍विजवरासी एक शत ॥ ३४ ॥ 
 त्याचेनि नामें कर्म सकळ । आचरावें मन निर्मळ । 
होतील तुझे कष्ट सफळ । श्रीगुरुनाथ तारील ॥ ३५ ॥ 
गुरुस्मरण करुनि मनीं । तूं पूजा करीं वो गुरुचरणीं । 
तुझे पाप होईल धुणी । ब्राह्मणसमंध परिहरेल ॥ ३६ ॥ 
ऐसें सांगतां द्‍विजवरीं । ऐकोनि सती चिंता करी । 
शतद्रव्य आमुच्या घरीं । कधीं न मिळे परियेसा ॥ ३७ ॥ 
कष्ट करीन आपुले देहीं । उपवासादि पूजा पाहीं । 
मासोपवास एकोभावीं । करीन आपण गुरुसेवा ॥ ३८ ॥ 
येणेंपरी तये नारी । सांगे आपुले निर्धारी । 
ऐकोनियां द्‍विजवरीं । निरोप देती तये वेळीं ॥ ३९ ॥ 
विप्र म्हणती ऐक बाळें । तूतें द्रव्य इतुकें न मिळे । 
सेवा करी वो मननिर्मळें । श्रीगुरुचरणीं तूं आतां ॥ ४० ॥ 
निष्कृति तुझिया पापासी । श्रीगुरु करील परियेंसीं । 
औदुंबरसंनिधेसी । वास असे निरंतर ॥ ४१ ॥ 
तो कृपाळू भक्तांसी । निवारील ब्रह्महत्यादोषासी । 
जितुकें येईल तुझ्या शक्तीसी । द्रव्य वेंची गुरुनिरोपें ॥ ४२ ॥ 
परिसोनि द्‍विजवचन । विप्रवनिता संतोषोन । 
गेली त्वरित ठाकोन । जेथे स्थान श्रीगुरुंचे ॥ ४३ ॥ 
स्नान करुनि संगमासी । पापविनाशी विधीसी । 
सात वेळ स्नपनेसी । करी औदुंबरी प्रदक्षिणा ॥ ४४ ॥ 
काम्यतीर्थी करुनि स्नान । पूजा करुनि श्रीगुरुचरण । 
प्रदक्षिणा करुनि नमन । करीतसे उपवास ॥ ४५ ॥ 
येणेपरी दिवस तीनी । सेवा करितां तें ब्राह्मणी । 
आला विप्र तिच्या स्वप्नी । द्रव्य मागे शत एक ॥ ४६ ॥ 
अद्दापि जरी न देसी । घेईन तुझे प्राणासी । 
पुढें तुझ्या वंशासी । वाढों नेदी अवधारीं ॥ ४७ ॥ 
वायां करिसी तूं सायासी । पुत्र कैचे तुझे वंशी । 
म्हणोनि कोपें मारावयासी । आला पिशाच स्वप्नांत ॥ ४८ ॥ 
भयचकित ते वनिता । औदुंबराआड रिघतां । 
तंव देखिलें श्रीगुरुनाथा । तयापाठी रिघाली ॥ ४९ ॥ 
अभय देवोनि नारीसी । वारिता झाला ब्राह्मणासी । 
पुसती श्रीगुरु तयासी । कां मारिसी स्त्रियेसी ॥ ५० ॥ 
विप्र विनवी श्रीगुरुसी । " जन्मांतरी आपणासी । 
अपहार केला द्रव्यासी । प्राण त्यजिला यास्तव ॥ ५१ ॥ 
स्वामी कृपाळू सर्वांसी । आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी । 
तुम्ही यतीश्र्वर तापसी । पक्षपात करुं नये " ॥ ५२ ॥ 
ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु म्हणती कोपोन । 
"उपद्रव देसी भक्तजना । तूंतें शिक्षा करुं जाण ॥ ५३ ॥ 
आम्ही सांगो जेणें रीतीं । जरी ऐकसी हितार्थी । 
तुज होईल सद्गति । पिशाचत्व परिहरेल ॥ ५४ ॥ 
जें काय देईल विप्रवनिता । तुवां अंगीकारावें सर्वथा । 
जरी न ये तुझ्या चित्ता । जाई आतां येथोन ॥ ५५ ॥ 
राखीन माझिया भक्तांसी । वंशोवंशीं अभिवृद्धीसी । 
पुनरपि जरी पाहूं येसी । शिक्षा करुं " म्हणती गुरु ॥ ५६ ॥ 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विप्र-पिशाच करी नमन । 
"स्वामी तुझे देखिले चरण । उद्धरावें आपणासी ॥ ५७ ॥ 
जेणेपरी आपणासी । होय गति उद्धरावयासी । 
निरोप देसी करुणेसी । अंगिकारुं स्वामिया" ॥ ५८ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । विप्रवनिता भावेसीं । 
करील कर्म दहा दिवशी । गति होईल तूंतें जाणा ॥ ५९ ॥ 
येणेपरी तयासी । निरोप देती स्त्रियेसी । 
जें असेल तुजपाशीं । आचरीं कर्म तया नामी ॥ ६० ॥ 
अष्टतीर्थी स्नान करीं । तया नामें अवधारीं । 
सात दिवस येणेंपरी । स्नपन करीं औदुंबरा ॥ ६१ ॥ 
 ब्रह्महत्या तुझे दोषी । जातील त्वरित भरंवसीं । 
कन्यापुत्र पूर्णायुषी । होतील म्हणती श्रीगुरु ॥ ६२ ॥ 
ऐसें देखोनि जागृती । विप्रवनिता भयचकिती । 
ज्ञानें पाहे श्रीगुरुमूर्ति । न विसंबे मनांत ॥ ६३ ॥ 
श्रीगुरुनिरोपे दहा दिवस । केलें आचरण परियेस । 
ब्रह्महत्या गेला दोष । गति झाली ब्राह्मणासी ॥ ६४ ॥ 
येरे दिवशी स्वप्नांत । प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ । 
नारिकेल दोन देत । भरली ओटी तियेची ॥ ६५ ॥ 
म्हणे पारणें करी वो तूं आतां । पुत्र होतील वेदरता । 
वाढे त्यांची संतति बहुता । चिंता न करीं अहो बाळे ॥ ६६ ॥ 
गुरुनिरोपे आराधन । करिती दंपती मनःपूर्ण । 
प्रकट झाला श्रीगुरुराणा । संपर्क लोह-परिसापरी ॥ ६७ ॥ 
चिंतामणिस्पर्श होतां । लोहपाषाणा कांचनता । 
तैसी ते विप्रवनिता । पापावेगळी त्वरित जाहली ॥ ६८ ॥ 
पुढें तया नारीसी । पुत्रयुग्म सद्वंशीं । 
झाले श्रीगुरुकृपेसीं । एकचित्तें परियेसा ॥ ६९ ॥ 
व्रतबंध करिती ज्येष्ठासी । समारंभ अनंत हर्षी । 
चौलकर्म दुजियासी । करुं पहाती मातापिता ॥ ७० ॥ 
समारंभ करी जननी । चौलकर्म करणें मनीं । 
पुत्रासी जाहलीं वर्षे तीन्ही । अत्योल्हास मानसीं ॥ ७१ ॥ 
समारंभ अतिप्रीतीं । करिती झाली आयती । 
पूर्व दिवसीं मध्यरात्री । आली व्याधि कुमरासी ॥ ७२ ॥ 
व्याधि असती अष्टोत्तर । एकाहूनि एक थोर । 
तयामध्यें जो का तीव्र । धनुर्वात तयासी ॥ ७३ ॥ 
अवयव वांकोनि । दिसे भयानक नयनीं । 
येणेपरी दिवस तीन्ही । कष्टतसे तो बाळ ॥ ७४ ॥ 
तया दिवशीं अस्तमानीं । पंचत्व पावला तत्क्षणी । 
शोक करिती जनक जननी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ७५ ॥ 
आक्रोशोनि भूमीसी । आफळी शिर सत्राणेसी । 
पाषाण घेवोनि उरासी । घात करी ते नारी ॥ ७६ ॥ 
देह टाकी धरणीवरी । निर्जीव होवोनि क्षणभरी । 
आठवी दुःख अपरांपरी । नयनीं वाहे पूर्ण जळ ॥ ७७ ॥ 
प्रेतपुत्रावरी लोळे । आलिंगोनि परिबळें । 
वेष्टोनियां मायाजाळें । प्रलापीतसे ते नारी ॥ ७८ ॥ 
म्हणे ताता पुत्रराया । प्राणरक्षका माझ्या प्रिया । 
मातें केवीं सोडूनियां । जासी कठोर मन करुनि ॥ ७९ ॥ 
कोठें गेलासी खेळावया । स्तनींचे क्षीर जातसे वायां । 
शीघ्र येई गा ठाकोनियां । पुत्रराया परियेसीं ॥ ८० ॥ 
केवीं विसरुं तुझे गुण । माझा तूंचि निधान । 
तुझें गोजिरें बोलणें । केवीं विसरुं पुत्रराया ॥ ८१ ॥ 
तुझे रुपासारखा सुत । केवीं देखों मी निश्र्चित । 
निधान देखत्यें स्वप्नांत । तैसे मज चाळविलें ॥ ८२ ॥ 
पुत्र व्याले पांच आपण । त्यांत तूं एक निधान । 
जघीं झालें गर्भधारण । तैंपासाव संतोष ॥ ८३ ॥ 
डोहळे मज उत्तम होती । कधी नसे मी दुश्र्चिती । 
अत्योल्हास नवमासांतीं । पुत्र होईल म्हणोनि ॥ ८४ ॥ 
श्रीगुरुंनी दिधला मातें वर । पुत्र होईल निर्धार । 
त्याणें मज हर्ष फार । वरद पिंड म्हणोनि ॥ ८५ ॥ 
जघीं तुज प्रसुत जाहल्यें । अनंत सौख्य मीं लाधलें । 
प्राणप्रिया तुज मीं पोसिलें । आमुतें रक्षिसी म्हणोनि ॥ ८६ ॥ 
मज भरंवसा तुझा बहुत । वृद्धाप्याचा पोषक म्हणत । 
आम्हांसी सांडूनि जातां उचित । धर्म नव्हे पुत्रराया ॥ ८७ ॥ 
दुःख झालें मज बहुत । विसरल्यें बाळा तुज देखत । 
 तूं तारक आमुचा सत्य । म्हणोनि विश्र्वास केला जाण ॥ ८८ ॥ 
ऐसें नानापरी देखा । दुःख करी ते बाळिका । 
निवारण करिती सकळ लोक । वायां दुःख तूं कां करिसी ॥ ८९ ॥ 
देवदानवऋषेश्र्वरांसी । होणार न चुके परियेसीं । 
ब्रह्मा लिही ललाटेसी । तेंचि अढळ जाण सत्य ॥ ९० ॥ 
अवतार होताति हरिहर । तेहि न राहाती स्थिर । 
तुम्ही तरी मनुष्य नर । काय अढळ तुम्हांसी ॥ ९१ ॥ 
येणेपरि सांगती जन । आणखी दुःख आठवी मन । 
म्हणे मातें दिधली जाण । स्थिर म्हणोनि दोन्ही फळें ॥ ९२ ॥ 
श्रीगुरु-नरसिंहसरस्वती । भूमंडळीं महाख्याति । 
औदुंबरी सदा वसती । त्यांणीं दिधले मज सुत ॥ ९३ ॥ 
त्याचे बोल केवी मिथ्या । मातें दिधला वर सत्या । 
त्यासी घडो माझी हत्या । पुत्रासवें देईन प्राण ॥ ९४ ॥ 
म्हणोनि आठवी श्रीगुरुसी । देवा मातें गांजिलेंसी । 
विश्र्वास केला मी तुम्हांसी । सत्य वाक्य तुझें म्हणत ॥ ९५ ॥ 
सत्यसंकल्प तूंचि होसी । म्हणोनि होत्यें विश्र्वासीं । 
घात केला गा आम्हांसी । विश्र्वासघातकी केवीं न म्हणो ॥ ९६ ॥ 
त्रयमूर्तीचा अवतारु । तूंचि नरसिंहसरस्वती गुरु । 
ध्रुवा बिभीषणा दिधला वरु । केवीं सत्य म्हणों आतां ॥ ९७ ॥ 
विश्र्वास केला तुझे बोलें । आतां मातें उपेक्षिलें । 
माझ्या मनीं निश्र्चय केला । प्राण देईन तुम्हांवरी ॥ ९८ ॥ 
लोक येती तुझ्या स्थानीं । सेवा करिती निवसोनि । 
औदुंबरीं प्रदक्षिणा करुनि । पुरश्र्चरणें करिताति ॥ ९९ ॥ 
आपण केलें पुरश्र्चरण । फळा आलें मज साधन । 
आतां तुजवर देईन प्राण । काय विश्र्वास तुझ्या स्थानीं ॥ १०० ॥ 
कीर्ति होईल सृष्टींत । आम्हां केला तुवा घात । 
पुढें तुज भजती भक्त । काय भरंवसा तयांसी ॥ १०१ ॥ 
ब्रह्मस्वदोषें पीडोन । दृढ धरिले तुझे चरण । 
अंगीकारोनि मध्यें त्यजणें । कवण धर्म घडतसे ॥ १०२ ॥ 
व्याघ्रातें धेनु भिऊन । जाय आणिकापाशीं ठाकून । 
तोचि माझारी घे तिचा प्राण । तयापरीं झालें आपणासी ॥ १०३ ॥ 
कीं एखादा पूजेसी । जाय देउळा संधीसी । 
तेंचि देऊळ तयासी । मृत्यु होऊनि वर पडे ॥ १०४ ॥ 
तयापरी आपणासी । जाहलें स्वामी परियेसीं । 
माझ्या प्राणसुतासी । न राखिसी देवराया ॥ १०५ ॥ 
येणेंपरी अहोरात्रीं । दुःख करीतसे ते नारी । 
उदय जाहला दिनकरीं । प्रातःकाळीं परियेसा ॥ १०६ ॥ 
द्‍विज ज्ञाते मिळोनी सकळी । येती तये स्त्रियेजवळी । 
वायां दुःख सर्वकाळीं । करिसी मूर्खपणें तूं ॥ १०७ ॥ 
जे जे समयीं होणार गति । ब्रह्मादिकां न चुके ख्याति । 
चला जाऊं गंगेप्रती । प्रेतसंस्कार करुं आतां ॥ १०८ ॥ 
ऐसें वचन ऐकोनि । महा आक्रोश करी मनीं । 
आपणासहित घाला वन्हीं । अथवा नेदी प्रेतासी ॥ १०९ ॥ 
आपणासहित बाळासी । करा पां अग्निप्रवेशी । 
येरवीं नेदीं प्रेतासी । म्हणोनि उरी बांधी बाळा ॥ ११० ॥ 
लोक म्हणती तियेसी । नव्हसी तूं स्त्री, कर्कशी । 
प्रेतासवें प्राण देसी । कवण धर्म सांग आम्हां ॥ १११ ॥ 
नाहीं देखिलें न ऐकों कानीं । पुत्रासवें देती प्राण कोणी । 
वायां बोलसी मूर्खपणीं । आत्महत्या महादोष ॥ ११२ ॥ 
नानापरी तियेसी । बोधिती लोक परियेसीं । 
निश्र्चय तिनें केला ऐसी । प्राण त्यजीन पुत्रासवे ॥ ११३ ॥ 
दिवस गेला दोन प्रहर । प्रेतासी करुं नेदी संस्कार । 
अथवा न ये गंगातीरा । ग्रामीं आकांत वर्तला ॥ ११४ ॥ 
इतुकिया अवसरीं । आला एक ब्रह्मचारी । 
सांगे तिसी सविस्तारीं । आत्मज्ञान तये वेळीं ॥ ११५ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । 
ब्रह्मचारी आला एका । बोधिता झाला ज्ञान तिसी ॥ ११६ ॥ 
बाळ नव्हे तोचि गुरु । आला नरवेषधारु । 
नरसिंहसरस्वती अवतारु । भक्तवत्सल परियेसा ॥ ११७ ॥ 
म्हणोनि सरस्वती गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । 
ऐकतां होय मनोहर । शतायुषी पुरुष होय ॥ ११८ ॥ 
 भक्तिपूर्वक ऐकती जरी । व्याधि नव्हती त्यांचे शरीरीं । 
पूर्णायुषी ते होती अमरी । सत्य माना माझा बोल ॥ ११९ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे ब्रह्मसमंधपरिहारप्रेतजननीशोकनं नाम विंशोsध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Gurucharitra Adhyay 20 
गुरुचरित्र अध्याय विसावा (२०) 


Custom Search

Wednesday, June 20, 2012

Shri Kalbhairav Stotra श्री कालभैरव स्तोत्र


  
Shri Kalbhairav Stotra 

Shri Kalbhairav Stotra is in Sanskrit. Kalbhairav and Yogeshwari temple is at Harihareshwar Taluka Shrivardhan District Raigad, In Maharashtra, India. Many devotees of Kalbhairav and Yogeshwari visit this temple many times during a year. This Stotra is recited by devotees with faith and devotion. Kalbhairav is always happy. He knows Vedas and Shastras. He guides his devotees with his tremendous knowledge. Devotee says “I bow to Digambar (name of Kalbhairav), Kal (name of Kalbhairav), who has held Khatvang (Weapon) his eyes are half closed (as in samadhi) and vibhuti is applied on his forehead. I bow to Kumar (name of Kalbhairav), Batuk (name of Kalbhairav), I bow to kalbhairav who has no worries, who has held Trishul and other weapons in his hands. He is care taker and protector of this universe. He makes his devotees happy. I bow to Kalbhairav who removes difficulties and troubles of his devotees. He is an idol of happiness. He rest in smashan (cemetery). I bow to the master of spirits. I bow to Kalkal (name of Kalbhairav), Ashtamurte. Vetal, Ghosts, Kushmand and Grahas always serve him. I bow to Kalbhairav who is worshiped by God Brahma and others. He lives in Kashi. I bow to Bhairav (name of Kalbhairav) who has a lot of knowledge. 

श्री कालभैरव स्तोत्र 
नमो भैरवदेवाय नित्यायानंद मूर्तये । 
विधिशास्त्रांत मार्गाय वेदशास्त्रार्थ दर्शिने ॥ १ ॥ 
दिगंबराय कालाय नम: खट्वांग धारिणे ॥ 
विभूतिविल सद्भाल नेत्रायार्धेंदुमोलिने ॥ २ ॥ 
कुमारप्रभवे तुभ्यं बटुकाय महात्मने । 
नमोsचिंत्य प्रभावाय त्रिशूलायुधधारिणे ॥ ३ ॥ 
नमः खड्गमहाधार ह्रतत्रैलोक्य भितये । 
पुरितविश्र्व विश्र्वाय विश्र्वपालायते नमः ॥ ४ ॥ 
भुतावासाय भूताय भूतानां पतये नमः । 
अष्टमूर्ते नमस्तुभ्यं कालकालायते नमः ॥ ५ ॥ 
कंकाला याति घोराय क्षेत्रपालाय कामिने । 
कलाकाष्ठादिरुपाय कालाय क्षेत्र वासीने ॥ ६ ॥ 
नमः क्षत्रजित तुभ्यं विराजे ज्ञानशालिने । 
विधानां गुरवे तुभ्यं निधीनांपतये नमः ॥ ७ ॥ 
नमः प्रपंच दोर्दंड दैत्यदर्प विनाशिने । 
निज भक्तजनोद्दाम हर्ष प्रवर दायिने ॥ ८ ॥ 
नमो दंभारिमुख्याय नामैश्र्वर्याष्ट दायिने । 
अनंत दुःख संसार पारावारांत दर्शने ॥ ९ ॥ 
 नमो दंभाय मोहाय द्वेषायोच्चोटकारिणे । 
वशंकराय राजन्य मौलिन्यस्य निजांघ्रये ॥ १० ॥ 
नमो भक्तापदा हंत्रे स्मृतिमात्रार्थ दर्शिने । 
आनंदमूर्तये तुभ्यं स्मशान निलयायते ॥ ११ ॥ 
वेताळभूत कुश्मांड ग्रहसेवा विलासिने । 
दिगंबराय महते पिशाचाकृति शालिने ॥ १२ ॥ 
नमो ब्रह्मादिभिर्वंद्द पदरेणु वरायुषे । 
ब्रह्मादि ग्रास दक्षाय निःफलाय नमो नमः ॥ १३ ॥ 
नमः काशीनिवासाय नमो दंडकवासिने । 
नमोsनंत प्रबोधाय भैरवाय नमो नमः ॥ १४ ॥ 
 श्री कालभैरव स्तोत्र संपूर्णम् ॥ श्री कालभैरवार्पणंsस्तु ॥ 
शुभं भवतु ॥ 

श्री कालभैरव स्तोत्र मराठी अर्थः 

नेहमी आनंदमूर्ती स्वरुप असणार्‍या, विधिशास्त्र आणि वेदशास्त्रार्थ यांचे ज्ञान देणार्‍या भैरवदेवाला माझा नमस्कार असो. दिगंबर, काल, हातांत खट्वांग धरणार्‍या, कपाळावर विभुति शोभणार्‍या आणि ध्यानांत असल्यामुळे डोळे अर्धे मिटलेल्या, कुमारप्रभव, महात्मा बटुकाला, चिंताविरहीत, त्रिशूल आदि हातांत धरलेल्या (भैरवदेवाला) माझा नमस्कार असो. खड्ग धारण केलेल्या, तिन्हीलोकी भीति निर्माण करणार्‍या, विश्र्वाचे रक्षण करणार्‍या आणि विश्र्वाचे पालन करणार्‍याला (भैरवदेवाला) माझा नमस्कार असो. भूतांमध्ये वास करणार्‍या, भूतांचा अधिपती असलेल्या, अष्टमूर्तीला, कालाचाही काल असलेल्याला माझा नमस्कार असो. क्षेत्रपालाला, कलाकाष्ठ आदिरुपी, क्षेत्री वास करणार्‍या कालाला, क्षत्रजीताला, ज्ञानी असून शालीन असलेल्याला, विधानांचा गुरु आणि निधींचा पति तुला माझा नमस्कार असो. स्वभक्तांना प्रपंचांतील दुःख नाहीशी करुन हर्ष देणार्‍याला माझा नमस्कार असो. दंभ आदी शत्रु नष्ट करुन नुसत्या नाम घेण्याने अष्टऐश्र्वर्य देणार्‍या, संसाररुपी अनंत दुःखांतून पार नेऊन अंती दर्शन देणार्‍या (भैरवदेवाला) माझा नमस्कार असो. दंभ, मोह, द्वेष, यांचे उच्चाटन करुन भक्तांच्या आपदा, संकटे नाहीशी करुन आठवण केल्यावर दर्शन देणार्‍या, आनंदमूर्ती आणि स्मशानांत राहणार्‍याला (भैरवदेवाला) माझा नमस्कार असो. वेताळ, भूत, कुश्मांड आणि ग्रह यांच्या कडून सेवा घेण्यांत मग्न, दिगंबर आणि मोठी पिशाचाकृती असलेल्या शालिन (भैरवदेवाला) माझा नमस्कार असो. ब्रह्मा आदिनी वंदिलेल्या, काशिनीवासी, दंडकवासी, प्रबोधि, (भैरवदेवाला) माझा नमस्कार असो. अशा प्रकारे हे कालभैरव स्तोत्र संपूर्ण झाले. कालभैरवाला समर्पित असो. सर्वांचे शुभ होवो. 

Shri Kalbhairav Stotra 
श्री कालभैरव स्तोत्र 


Custom Search

Thursday, June 14, 2012

Shri Yogeshwari Kavacham श्रीयोगेश्र्वरीकवचम्

 

 Shri Yogeshwari Kavacham 
Shri Yogeshwari Kavacham is in Sanskrit. It is from Rudrayamal. It has arisen as Goddess Parvati asked God Shiva about this Kavacham. God Shiva is telling Goddess Parvati that because of this Kavacham God Hari was become victorious in trilokas, God Brahma was able to create the vishwa and I became destroyer (SanharKarta). This Kavacham is the greatest vidya (knowledge), which is always worshiped by Devrushi. Rushi of this Kavacham is Mahadev, chanda is Anushtup, and devata is Yogeshwari. Bijam is Em, Rhim is Shakti and Shrim is kilakam. Nyasa means we have to utter the name and touch the body part and bow. By touching head I bow to Mahadev Rushi. By touching mouth I bow to Anushtup chanda. By touching my chest I bow to Yogeshwari. By touching my right nimble, I bow to Em bijam. By touching my left nimble, I bow to rihm Shakti. By touching my naval, I bow to Shrim Kilakam. It follows with the Dhyanam. Then it is followed by Manas Pooja. Then Kavacham starts wherein Goddess Yogeshwari is being asked to protect each and every part of the body every time calling her by her famous name. These names are Shankari, Narayani, Narasinhi, Ambika, Vindhyvasini, Bhramari, Bhootsanhari, Chandika, Girija, Bhogini, Shumbhini, Shooldharini, Yogini, Kambukanthi, Sundari, Guhyeshwari, Kunjika, Shambhavi, Bhadrakali, Kalika, Shridhari, Bhairavi, Chamunda, Vaishnavi, Varahi, Koumari, Maheshwari, Jayashri, Sarvadya, Jayashri, and Mangala. This Kavacham if recited every day then it becomes very powerful in six months. The devotee becomes victorious at the palace gate, Cemetery, even surrounded by demons and ghosts, enemies, in the prison, or in grief and sorrow, and everywhere. Such devotee becomes rich, famous, religious and spiritual. Any devotee if writes this kavacham on the Boorja (name of the tree) leaf and wears it on his body then by the blessing of Goddess Yogeshwari he becomes rich receives knowledge and son. This is not a word by word or stanza by stanza translation and not a perfect translation. I have tried to translate the great Yogeshwari Kavacham with my little knowledge of Sanskrit.
श्रीयोगेश्र्वरीकवचम् 
श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः । श्री देव्युवाच । 
भगवन् सर्वमाख्यातं मंत्रतंत्रादिकं त्वया । 
योगिन्याः कवचं देव न कुत्रापि प्रकाशितम् ॥ १ ॥ 
श्रोतुमिच्छामि यत्नेन कृपापात्रं तवास्म्यहम् । 
कथयस्व महादेव यद्दहं प्राणवल्लभा ॥ २ ॥ 
ईश्र्वर उवाच । 
श्रृणु देवी महाविद्दां सर्व देवर्षिपूजिताम् । 
यस्याः कटाक्षमात्रेण त्रैलोक्यविजयी हरिः ॥ ३ ॥ 
सृष्टिं वितनुते ब्रह्मा संहर्ताsहं तथैव च । 
यस्याः स्मरणमात्रेण देवाः देवत्वमाप्नुयुः ॥ ४ ॥ 
रहस्यं श्रृणु वक्ष्यामि योगिन्याः प्राणवल्लभे । 
त्रैलोक्यसुंदरं नामं कवचं मंत्रविग्रहम् ॥ ५ ॥ 
श्री योगेश्र्वरीकवचमंत्रस्य महादेव ऋषिः। 
अनुष्टुप् छंदः । श्री योगेश्र्वरी देवता । 
ऐं बीजम् । र्‍हीं शक्तिः । श्रीं कीलकम् । 
श्रीयोगेश्र्वरीप्रसादप्रीत्यर्थे । जपे विनियोगः । 
अथ न्यासः । 
महादेव ऋषये नमः शिरसि । 
अनुष्टुप् छंदसे नमः मुखे । 
श्री योगेश्र्वरी देवतायै नमः ह्रदये । 
ऐं बीजाय नमः दक्षिणस्तने । 
र्‍हीं शक्तये नमः वामस्तने । 
श्रीं कीलकाय नमः नाभौ । 
ऐं अंगुष्ठाभ्यां नमः ह्रदयाय नमः। 
र्‍हीं तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा । 
श्रीं मध्यमाभ्यां नमः शिखायै वषट् । 
ऐं अनामिकाभ्यां नमः कवचाय हुम् । 
र्‍हीं कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौशट् । 
श्रीं करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट् । 
ध्यान 
खड्गं पात्रं च मुसलं लांगलं च बिभर्ति सा । 
आख्याता रक्तचामुंडा देवी योगेश्र्वरीति च ॥ १ ॥ । 
मानसोपचारैः संपूज्य । 
लं पृथिव्यात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः गंधं परिकल्पयामि । 
हं आकाशात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः पुष्पं परिकल्पयामि । 
यं वाय्वात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः धूपं परिकल्पयामि । 
रं तेजात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः दीपं परिकल्पयामि । 
वं अमृतात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः नैवेद्दं परिकल्पयामि । 
सं सर्वात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः तांबुलादि सर्वोपचारान् परिकल्पयामि । 
अथ कवचम् 
शिरो मे शांकरी पातु मूर्ध्नि नारायणी तथा । 
ऐं बीजं भालदेशे च र्‍हीं बीजं दक्षिणनेत्रे ॥ १ ॥ 
श्रीं बीजं वामनेत्रे च दक्षिणश्रोत्रे परास्मृता । 
वामश्रोत्रे नारसिंही नासामूलं च खड्गिनी ॥ २ ॥ 
नासिकां मानिनी पातु मुखं मेsवतु चाम्बिका । 
कपोलौ भूतसंहारी चिबुकं भ्रामरी तथा ॥ ३ ॥ 
 कंण्ठं मे चण्डिका पातु ह्रदयं विंध्यवासिनी । 
उदरे गिरिजा पातु नाभिं मेsवतु भोगिनी ॥ ४ ॥ 
शुंभिनी पृष्ठदेशे तु स्कन्धयोः शूलधारिणी । 
हस्तयोर्योगिनी रक्षेत् कंबुकण्ठी गलं तथा ॥ ५ ॥ 
कट्ट्यां च सुन्दरी रक्षेत् गुह्यं गुह्येश्र्वरी तथा । 
कुंजिका पातु मे मेढ्ं पायुदेशं च शांभवी ॥ ६ ॥ 
भद्रकाली पातु चोरु जान्वो मेsवतु कालिका । 
जंघे पातु महाभीमा गुल्फाववतु शूलिनी ॥ ७ ॥ 
पादयोः श्रीधरी रक्षेत् सर्वांगेsवतु भोगिनी । 
रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि भैरवी ॥ ८ ॥ 
चामुंडा चैव वाराही कौमारी वैष्णवी तथा । 
माहेश्र्वरी च सर्वाद्दा जयश्री मंड्गला तथा ॥ ९ ॥ 
रक्षतुश्र्वायुधैर्दिक्षु मां विदिक्षु यथा तथा । 
इतीदं कवचं दिव्यं षण्मासात् सर्वसिध्दिदम् ॥ १० ॥ 
फलश्रुतिः
स्मरणात्कवचस्यास्य जयः सर्वत्र जायते । 
राजद्वारे स्मशाने च भूतप्रेताभिचारके ॥ ११ ॥ 
बंधने च महादुःखे जपेच्छत्रुसमागमे । 
प्रयोगं चाभिचारं च यो नरः कर्तृमिच्छति ॥ १२ ॥ 
आयुताश्र्च भवेत् सिद्धिः पठनात्कवचस्य तु । 
सर्वत्र लभते कीर्ति श्रीमान भवति धार्मिकः ॥ १३ ॥ 
भूर्जे विलिख्य कवचं गुटिका यस्तु धारयन् । 
मंत्रसिद्धिमवाप्नोति योगेश्र्वर्याः प्रसादतः ॥ १४ ॥ 
पुत्रवान् धनवान् श्रीमान नानाविद्दानिधिर्भवेत । 
अष्टोत्तरशतं जप्त्वा पुरश्र्चरणमस्य वै ॥ १५ ॥ 
सिद्धर्थं सर्वदा कुर्यात् योगिनी प्रीतिभाक् भवेत् । 
ब्रह्मास्त्रादीनि शाम्यन्ति तद्गात्रस्परशनात्ततः ॥ १६ ॥ 
इदं कवचमज्ञात्वा योगिनी भजते नरः । 
शतलक्षं जपित्वाsपि तस्य विद्दा न सिद्धयति ॥ १७ ॥ 
इति श्रीरुद्रयामले बहुरुपाष्टकप्रस्तावे ईश्र्वरपार्वतीसंवादे योगेश्र्वरी कवचं संपूर्णम् ॥ 
श्रीयोगेश्र्वरीकवचंचा मराठी अर्थः 
श्री गणेशाला नमस्कार. श्री सरस्वतीदेवीला नमस्कार. 
देवी म्हणाली 
१-२) हे भगवंता! मंत्र-तंत्रादी सर्व आपण सांगितले, पण कोठेही प्रसिद्ध न झालेल्या योगिनी देवीच्या कवचाबद्दल, आपल्या कृपाप्रसादाने ऐकण्याची माझी ईच्छा आहे. हे महादेवा, हे प्राणवल्लभा ते मला सांगा. 
ईश्र्वर (भगवान शंकर) म्हणाले 
३-५) हे देवी ही महाविद्दा सर्व देव आणि ऋषींकडून पूजली जाते. याच विद्देच्या कटाक्षाने हरि तीन्हीलोकी विजयी झाले. ब्रह्मदेव सृष्टिची निर्मिती करु शकले आणि मी संहार करणारा झालो. हीचेच स्मरण केल्याने देवांना देवत्व प्राप्त झाले. हे प्राणवल्लभे या योगिनी (कवचा)चे रहस्य ऐक. या कवचाचे नाव त्रैलोक्यसुंदर असे आहे. 
श्री योगेश्र्वरी कवच मंत्राचा महादेव हा ऋषी आहे. अनुष्टुप हा छंद आहे. देवता योगेश्र्वरी आहे. ऐं हे बीज आहे. र्‍हीं ही शक्ति आहे. 
श्रीं हे कीलक आहे. श्रीयोगेश्र्वरीचा आशिर्वाद मिळावा म्हणून या जपाचा विनियोग सांगितला आहे. 
अथ न्यास 
डोक्याला स्पर्श करुन महादेव ऋषीनां स्मरणपूर्वक नमस्कार असो. मुखाला स्पर्श करुन अनुष्टुप छंदाला नमस्कार असो. 
ह्रदयाला स्पर्श करुन योगेश्र्वरी देवीला नमस्कार असो. 
उजव्या स्तनाला स्पर्श करुन ऐं बीजाला नमस्कार असो. 
डाव्या स्तनाला स्पर्श करुन र्‍हीं शक्तीला नमस्कार असो. 
नाभीला स्पर्श करुन श्रीं कीलकाला नमस्कार असो. 
ऐं अंगठ्याला नमस्कार असो. ह्रदयाला नमस्कार असो. 
र्‍हीं तर्जनीला नमस्कार असो. डोक्याला अर्पण. 
श्रीं मधल्या बोटाला नमस्कार असो. शेंडीला स्पर्श 
ऐं अनामिकेला नमस्कार असो. कवचाची निर्मिती 
र्‍हीं कनिष्ठिकेला नमस्कार असो. तीनही नेत्रांना स्पर्श 
श्रीं उजव्या हाताच्या तळाला आणि पृष्ठाला नमस्कार. 
अस्त्राची निर्मिती झाली म्हणून टाळी वाजवणे. 
ध्यान 
खड्ग आदी अस्त्रे, पात्र, मुसलधारण केलेल्या व रक्ताळलेली मुडंकी गळ्यांत घातलेली अशी देवी योगेश्र्वरी नावाने प्रसिद्ध आहे. 
मानसोपचार पूजन 
लं या बीजरुपाने पृथिव्यात्मक असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी गंधाची कल्पना करुन गंध अर्पण करतो. 
हं या बीजरुपाने आकाशात्मक असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी फुलाची कल्पना करुन फुल अर्पण करतो. 
यं या बीजरुपाने वाय्वात्मक असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी धूपाची कल्पना करुन धूप अर्पण करतो. 
रं या बीजरुपाने तेजात्मक असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी दीपाची कल्पना करुन दिप अर्पण करतो. 
वं या बीजरुपाने अमृतात्मक असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी नैवेद्दाची कल्पना करुन नैवेद्द अर्पण करतो. 
सं या बीजरुपाने सर्वात्मक असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी तांबुलादि सर्वोपचाराची कल्पना करुन तांबुलादी सर्वोपचार अर्पण करतो. 
योगेश्र्वरी कवच 
१) शांकरी माझ्या मस्तकाचे, नारायणी डोक्याचे, ऐं हे बीज कपाळाचे आणि र्‍हीं हे बीज माझ्या उजव्या डोळ्याचे रक्षण करो. 
२) श्रीं हे बीज डाव्या डोळ्याचे, परास्मृता उजव्या कानाचे, डाव्या कानाचे नारसिंही आणि नाकाच्या मूळाचे खड्गिनी रक्षण करो. 
३-४) मानिनी माझ्या नाकाचे, मुखाचे अंबिका, गालांचे भूतसंहारी, ओठांचे भ्रामरी, माझ्या कंठाचे चण्डिका, ह्रदयाचे विंध्यवासिनी, पोटाचे गिरिजा आणि बेंबीचे भोगिनी रक्षण करो. 
५) शुंभिनी पाठीचे, खांद्द्यांचे शूलधारिणी, हातांचे योगिनी आणि कंबुकण्ठी माझ्या गळ्याचे रक्षण करो. 
६-८) माझ्या कंबरेचे सुंदरी, गुप्तांगाचे गुह्येश्र्वरी, मेंढ्चे कुंजिका आणि शांभवी बर्हीमार्गाचे रक्षण करो. ऊराचे भद्रकाली, गुडघ्यांचे कालिका, महाभीमा जंघेचे आणि गुल्फांचे शूलिनी रक्षण करो. माझ्या पायांचे श्रीधरी, सर्वांगाचे भोगिनी आणि रक्त, मज्जा, मांस, अस्थि, अवयव आणि चरबीचे भैरवी रक्षण करो. 
९-१०) चामुंडा, वाराही, कौमारी, वैष्णवी, माहेश्र्वरी, सर्वाद्दा, जयश्री आणि मंगला सर्व आयुधानीशी माझे सर्व दिशा, उपदिशांकडून रक्षण करोत. असे हे दिव्य कवच सहा महीन्यांत सर्व सिद्धि देणारे आहे. फलश्रुतीः 
११-१३) कवचाचे स्मरण केले तरी सर्वत्र विजय मिळतो. राजद्वारी, स्माशानांत, भूतप्रेतांच्या मध्ये, बंधनांत, अतिदुःखांत, शत्रुनी घेरले असता, या कवचाचा जप केल्यावर विजय मिळतो. ज्या नराला या कवचाचा प्रयोग कराचा असेल तो यशस्वी होतो. या कवचाच्या पठणामुळे निरनिराळ्या सिद्धिंची प्राप्ती होते. सर्वत्र कीर्ति मिळते, संपत्ति मिळते आणि असा माणूस धार्मिक होतो. 
१४- १७) भूर्जपत्रावर लिहून हे कवच धारण केले तर योगेश्र्वरीच्या प्रसादाने मंत्रसिद्धी होते. या कवचाचा एकशे आठवेळा जप केल्यावर असा भक्त पुत्रवान, धनवान, संपत्तिवान, नाना प्रकारच्या विद्दांचा ज्ञानी होतो. हे कवच सिद्ध झाल्यावर योगिनी प्रसन्न होऊन अशा भक्तावर ब्रह्मास्त्राचा काहिही परीणाम होत नाही व त्या त्या अवयवास स्पर्श केल्याने शांत होते. हे कवच न जपता योगिनीची शतलक्ष जपांनी अगर अन्यप्रकारे केलेली भक्ति ही फळदायी होत नाही. 
अशा प्रकारे हे रुद्रयामलामधिल बहुरुपाष्टक प्रस्तावांतील ईश्र्वर-पार्वती संवादांतील योगेश्र्वरी कवच संपूर्ण झाले.
Shri Yogeshwari Kavacham 
 श्रीयोगेश्र्वरीकवचम्

Custom Search

Friday, June 1, 2012

KleshaharNamamrut Stotram क्लेशहरनामामृतस्तोत्रम्


KleshaharNamamrut Stotram 
KleshaharNamamrutam Stotram is in Sanskrit and it is a God Vishnu Stotra. It is from Bhumai Khanda, Padma Purana. King Yayaati has made it available to all the people for making their life happy, peaceful and prosperous. Anybody who recites this stotra daily receives all the above benefits by the blessings of God Vishnu. 
1 God Vishnu removes all the troubles and sufferings of all the people. He is greatest among all, always happy and parmarth tatva. Name of God Vishnu I just like Amrut and it is brought by King Yayaati for the benefit of all people and now people should decide how to drink this Amrut. 
2 Lotus has immerged from the naval (nambhi) of God Vishnu. His eyes are like lotus. He is the backbone of the world and he is Maheshwar. Name of God Vishnu I just like Amrut and it is brought by King Yayaati for the benefit of all people and now people should decide how to drink this Amrut. 
3 God Vishnu removes sins and diseases of his devotees and brings happiness in their life. He destroys demons. Name of God Vishnu I just like Amrut and it is brought by King Yayaati for the benefit of all people and now people should decide how to drink this Amrut. 
4 Yadnya is a form of God Vishnu. Sudarshan Chakra in his hands looks nice. God Vishnu is ocean of holiness. He is always happy. There is no end to his existence. Name of God Vishnu I just like Amrut and it is brought by King Yayaati for the benefit of all people and now people should decide how to drink this Amrut. 
5 Whole worlds reside in his heart. He is very pious. He is famous by the name “Ram”. He is enemy of demon Moor. Name of God Vishnu I just like Amrut and it is brought by King Yayaati for the benefit of all people and now people should decide how to drink this Amrut. 
6 Bhagwan Vishnu is Aaditya. He removes the darkness. He is the moonlight which makes lotus beautiful. Name of God Vishnu I just like Amrut and it is brought by King Yayaati for the benefit of all people and now people should decide how to drink this Amrut. 
7 He has held ‘Nandak’ khadga in his hand. He is famous by the ‘Madhusudan’. He is abode of Laxmi. He is Sagun and greatest among all the Gods. Name of God Vishnu I just like Amrut and it is brought by King Yayaati for the benefit of all people and now people should decide how to drink this Amrut. 
8 This naamaamrut Stotra is very pious and it removes all difficulties. The great devotee of God Vishnu who recites this stotra early in the morning becomes free from the bondage of life and death. 
Thus here completes this KleshaharNamamruta Stotram which is from Bhoomi khanda of Padma Purana.  
क्लेशहरनामामृतस्तोत्रम्
श्रीकेशवं क्लेशहरं वरेण्यमानन्दरूपं परमार्थमेव ।
नामामृतं दोषहरं तु राज्ञा आनीतमत्रैव पिबन्तु लोकाः ॥ १ ॥
श्रीपद्मनाभं कमलेक्षणं च आधाररुपं जगतां महेशम् । 
नामामृतं दोषहरं तु राज्ञा आनीतमत्रैव पिबन्तु लोकाः ॥ २ ॥ 
पापापहं व्याधिविनाशरुपमानन्ददं दानवदादैत्यनाशनम् । 
नामामृतं दोषहरं तु राज्ञा आनीतमत्रैव पिबन्तु लोकाः ॥ ३ ॥ 
यज्ञाङ्गरुपं च रघाङ्गपाणि पुण्याकरं सौख्यमनन्तरुपम् । 
नामामृतं दोषहरं तु राज्ञा आनीतमत्रैव पिबन्तु लोकाः ॥ ४ ॥ 
विश्र्वाधिवासं विमलं विरामं रामाभिधानं रमणं मुरारिम् । 
नामामृतं दोषहरं तु राज्ञा आनीतमत्रैव पिबन्तु लोकाः ॥ ५ ॥ 
आदित्यरुपं तमसां विनाशं चन्द्रप्रकाशं मलपङ्कजानाम् । 
नामामृतं दोषहरं तु राज्ञा आनीतमत्रैव पिबन्तु लोकाः ॥ ६ ॥ 
सखङ्गपाणिं मधुसूदनाख्यं तं श्रीनिवासं सगुणं सुरेशम् । 
नामामृतं दोषहरं तु राज्ञा आनीतमत्रैव पिबन्तु लोकाः ॥ ७ ॥ 
नामामृतं दोषहरं सुपुण्यमधीत्य यो माधवविष्णुभक्तः । 
प्रभातकाले नियतो महात्मा स याति मुक्तिं न हि कारणं च ॥ ८ ॥ 
॥ इति श्रीपद्मपुराणे भूमिखंडे क्लेशहरनामामृतस्तोत्रम् संपूर्णं ॥
क्लेशहरनामामृतस्तोत्रम् मराठी अर्थः 
१) भगवान केशव सर्वांचे क्लेश हरण करणारे, सर्वश्रेष्ठ, आनन्दस्वरुप आणि परमार्थ-तत्व आहेत. त्यांचे नामरुपी अमृत सर्व दोषांचे निराकरण करणारे आहे. महाराज ययातीने या अमृताला या पृथ्वीवर आणून सोपे केले आहे. सर्व लोकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याचे पान करावे. 
२) भगवान विष्णुंच्या नाभिमधुन कमळ प्रगट झाले आहे. त्यांचे नेत्र कमळा सारखे सुंदर आहेत. ते या जगताचे आधारभूत आणि महेश्वर आहेत. त्यांचे नामरुपी अमृत सर्व दोषांचे निराकरण करणारे आहे. महाराज ययातीने या अमृताला या पृथ्वीवर आणून सोपे केले आहे. सर्व लोकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याचे पान करावे. 
 ३) भगवान विष्णु पापांचा आणि व्याधिंचा नाश करुन आनंद देणारे आहेत. ते दानव आणि दैत्यांचा संहार करणारे आहेत. त्यांचे नामरुपी अमृत सर्व दोषांचे निराकरण करणारे आहे. महाराज ययातीने या अमृताला या पृथ्वीवर आणून सोपे केले आहे. सर्व लोकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याचे पान करावे. 
४) यज्ञ हे भगवान विष्णुंचेच रुप आहे. त्यांच्या हातांत सुदर्शनचक्र शोभून दिसत आहे. ते पुण्याचा सागर आणि सुखरुप आहेत. त्यांच्या स्वरुपाचा कधी अंतच होत नाही. त्यांचे नामरुपी अमृत सर्व दोषांचे निराकरण करणारे आहे. महाराज ययातीने या अमृताला या पृथ्वीवर आणून सोपे केले आहे. सर्व लोकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याचे पान करावे. 
५) संपूर्ण विश्र्व त्यांच्या ह्रदयांत निवास करते. ते निर्मळ, सर्वांना आराम देणारे, राम नावाने प्रसिद्ध, सर्वांत रममाण होणारे, मुर दैत्याचे शत्रु आहेत. त्यांचे नामरुपी अमृत सर्व दोषांचे निराकरण करणारे आहे. महाराज ययातीने या अमृताला या पृथ्वीवर आणून सोपे केले आहे. सर्व लोकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याचे पान करावे. 
६) भगवान केशव आदित्यस्वरुप, अन्धकाराचा नाश करणारे, मलरुप कमळांना चंद्रप्रकाशा समान आहेत. त्यांचे नामरुपी अमृत सर्व दोषांचे निराकरण करणारे आहे. महाराज ययातीने या अमृताला या पृथ्वीवर आणून सोपे केले आहे. सर्व लोकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याचे पान करावे. 
७) त्यांच्या हातांत नन्दक नावाचे खड्ग आहे. ते मधुसुदन नावाने प्रसिद्ध आहेत. ते लक्ष्मीचे निवासस्थान आहेत. ते सगुण आणि देवेश्र्वर आहेत. त्यांचे नामरुपी अमृत सर्व दोषांचे निराकरण करणारे आहे. महाराज ययातीने या अमृताला या पृथ्वीवर आणून सोपे केले आहे. सर्व लोकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याचे पान करावे. 
८) हे नामामृतस्तोत्र दोष नाहिसे करणारे आणि उत्तम पुण्य देणारे आहे. त्या लक्ष्मीपति भगवान विष्णुचा जो महान भक्त प्रत्येक दिवशी प्रातःकाळी नियमाने याचा पाठ करतो तो या संसार सागरांतून मुक्त होतो आणि तो परत प्रकृतीच्या आधिन होत नाही. 
 अशाप्रकारे हे श्रीपद्मपुराणांतील भूमिखंडांतेील क्लेशहरनामामृतस्तोत्र पूर्ण झाले. 

KleshaharNamamrut Stotram
क्लेशहरनामामृतस्तोत्रम्

Custom Search