Friday, October 16, 2015

Shri Devyathrvshirsham श्रीदेव्यथर्वशीर्षम्


Shri Devyathrvshirsham 
Shri Devyathrvshirsham is in Sanskrit. Gods came to Goddess an\d asked her who was she ? Goddess answered their question. She is telling that she is Brahma swarupini. Prakruti and Purusha evolved from her. She is shoonya and not shoonya. She is aanand and not aanand. She is vidnyan and not vidnyan. She is Veda and not Veda. After hearing all and realizing it all Gods started to praise Goddess. This is in short however there is much more in actual atharvashirsha.
श्रीदेव्यथर्वशीर्षम्
ॐ सर्वे वै देवा देवीमुपतस्थुः कासि त्वं महादेवीति ॥ १ ॥
साब्रवीत--- अहं ब्रह्मस्वरुपिणी । 
मत्तः प्रकृतिपुरुषात्मकं जगत् । शून्यं चाशून्यं च ॥ २ ॥
अहमानन्दानन्दौ । अहं विज्ञानाविज्ञाने ।
अहं ब्रह्माब्रह्मणी वेदितव्ये । अहं पञ्चभूतान्यपञ्चभूतानि ।
अहमखिलं जगत् ॥ ३ ॥
वेदोऽहमवेदोऽहम् । विद्याहमविद्याहम् ।
अजाहमनजाहम् । अधश्चोर्ध्वं च तिर्यक्चाहम् ॥ ४ ॥
अहं रुद्रेभिर्वसुभिश्चरामि । अहमादित्यैरुत विश्वदेवैः ।
अहं  मित्रावरुणावुभौ बिभर्मि । अहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ॥ ५ ॥
अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधामि । 
अहं विष्णुमुरुक्रंमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि ॥ ६ ॥
अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते ।
अहं राष्ट्री सङ्गमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् ।
अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे ।
य एवं वेद । स दैवीं सम्पदमाप्नोति ॥ ७ ॥
ते देवा अब्रुवन् ---
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥ ८ ॥
तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम् । 
दुर्गां देवीं शरणं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयित्रै ते नमः ॥ ९ ॥
देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरुपाः पशवो वदन्ति ।
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुप सुष्टुतैतु ॥ १० ॥
कालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैश्र्णवीं स्कन्दमातरम् ।
सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ॥ ११ ॥
महालक्ष्म्यै व विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि ।
तन्नो देवी प्रचोदयात् ॥ १२ ॥
अदितिर्ह्यजनिष्ट दक्ष या दुहिता तव ।
तां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः ॥ १३ ॥
कामो योनिः कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्रः ।
पुनर्गुह्य सकला मायया च पुरुच्यैषा विश्वमातादिविद्योम् ॥ १४ ॥
एषाऽऽत्मशक्तिः । एषा विश्वमोहिनी ।
पाशाङ्कुशधनुर्बाणधरा । एषा श्रीमहाविद्या ।
य एवं वेद स शोकं तरति ॥ १५ ॥
नमस्ते अस्तु भगवति मातरस्मान् पाहि सर्वतः ॥ १६ ॥
सैषाष्टौ वसवः । सैषैकादश रुद्राः । सैषा द्वादशादित्याः ।
सैषा विश्वेदेवाः सोमपा असोमपाश्च ।
सैषा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाचा यक्षाः सिद्धाः ।
सैषा सत्वरजतमांसि । सैषा ब्रह्मविष्णुरुद्ररुपिणी ।
सैषा प्रजापतिन्द्रमनवः । सैषा ग्रहनक्षत्रज्योतींषि  । 
कलाकाष्ठादिकालरुपिणी । तामहं प्रणौमि नित्यम् ॥
पापापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिप्रदायिनीम् ।
अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवाम् ॥ १७ ॥
वियदीकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम् ।
अर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम् ॥ १८ ॥
एवमेकाक्षरं ब्रह्म यतयः शुद्धचेतसः ।
ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः ॥ १९ ॥
वाङ्माया ब्रह्मसूस्तस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम् ।
सूर्योऽवामश्रोत्रबिन्दुसंयुक्तष्टात्तृतीयकः ।
नारायणेन सम्मिश्रो वायुश्चाधरयुक् ततः ।
विच्चे नवार्णकोऽर्णः स्यान्महदानन्ददायकः ॥ २० ॥
हृत्पुण्डरीकमध्यस्थां प्रातःसूर्यसमप्रभाम् ।         
पाशाङ्कुशधरां सौम्यां वरदाभयहस्तकाम् ।
त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुधां भजे ॥ २१ ॥
नमामि त्वां महादेवीं महाभयविनाशिनीम् ।
महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरुपिणीम्  ॥ २२ ॥
यस्याः स्वरुपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया ॥
यस्या अन्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता ॥
यस्या लक्ष्यं नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्ष्या ॥
यस्या जननं नोपलभ्यते तस्मादुच्यते अजा ॥ 
एकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका ॥
एकैव विश्वरुपिणी तस्मादुच्यते नैका ॥
अत एवोच्यते अज्ञेयानन्तालक्ष्याजैका नैकेति ॥ २३ ॥
मन्त्राणां मातृका देवी शब्दार्चां नां ज्ञानरुपिणी ।
ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी ।
यस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता ॥ २४ ॥
तां दुर्गां दुर्गमां देवीं दुराचारविघातिनीम् ।
नमामि भवभीतोऽहं संसारार्णवतारिणीम् ॥ २५ ॥
इदमथर्वशीर्षं योऽधीते स पञ्चाथर्वशीर्षजपफलमाप्नोति ।
इदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्चां स्थापयति ---शतलक्षं प्रजपत्वापि 

सोऽर्चासिद्धिं न विन्दति ।
शतमष्टोत्तरं चास्य पुरश्चर्याविधिः स्मृतः ।
दशवारं पठेद् यस्तु सद्यः पापैः प्रमुच्यते ।
महादुर्गाणि तरति महादेव्याः प्रसादतः ॥ २६ ॥
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।
सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति ।
निशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति ।
नूतनायां प्रतिमायां जप्त्वा देवतासांनिध्यं भवति ।
प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति ।
भौमाश्विन्यां महादेवीसंनिधौ जप्त्वा महामृत्युं तरति ।
स महामृत्युं तरति ।

य एवं वेद । इत्युपनिषत् ॥
मराठी अर्थ
१) सर्व देव देवीजवळ गेले आणि त्यानी मोठ्या नम्रतेने विचारले हे महादेवि ! तूं कोण आहेस?
२) देविने सांगितले मी ब्रह्मस्वरुप आहे. माझ्यापासूनच प्रकृति-पुरुषात्मक सद्रुप आणि असद्रुप जग निर्माण झाले आहे.
३) मी आनन्द आणि अनानंद (आनंद नाही असे) स्वरुप आहे. 
जाणण्यासारखे ब्रह्म आणि अब्रह्म मी आहे. मी पंचभूतात्मक आहे आणि पंचभूतात्मक पण नाही. 
४) मी वेद आहे आणि मी अवेद पण आहे.  मी विद्या आहे आणि अविद्या पण आहे. मी प्रकृति आहे आणि प्रकृतिपासून वेगळी पण आहे. मी वर-खाली, आजु-बाजुलापण मीच आहे. 
५) मी रुद्र आणि वसु यांच्या रुपाने संचार करते. मी आदित्य आणि विश्वदेवांच्या रुपाने फिरत असते. मी मित्र (सूर्य) आणि वरुण; इंद्र व अग्नि आणि दोन्ही अश्विनीकुमार यांचे भरण-पोषण करते.
६) मी सोम, त्वष्टा, पूषा आणि भग धारण करते. त्रैलोक्याला व्यापून टाकणार्‍या पाऊले टाकणार्‍या विष्णु, ब्रह्मदेव व प्रजापति यांना मीच धारण करते.
७) देवांना उत्तम हवी पोहोचविणारी व सोमरस अर्पित यजमानास हविद्रव्यानेयुक्त धन धारण मीच करते. मी सर्व जगाची ईश्र्वरी, भक्तांना धन देणारी, ब्रह्मरुप व पूजायोग्य देवांमध्ये मुख्य आहे. मी आत्मस्वरुप आधारीत आकाशादि निर्माण करते. माझे ठिकाण आत्मस्वरुपाला धारण करणार्‍या बुद्धिवृत्तमध्ये आहे. जो या प्रकारे जाणतो तोच दैवी संपत्तीचा लाभ घेऊ शकतो.
८) तेव्हा ते देव म्हणाले, देवीला नमस्कार आहे. मोठ्यामोठ्यांना कर्तव्य प्रवृत्त करणार्‍याा कल्याण करणार्‍या देवीला नमस्कार आहे. गुणसाम्य अवस्थारुपीणी मंगलमयी देवीला नमस्कार. नियमयुक्त होऊन आम्ही तीला नमस्कार करतो.
९) त्या अग्निस्वरुप वर्णाच्या, ज्ञानाने उजळणार्‍या, दीप्तीमती व कर्मफल प्राप्तीसाठी सेवा केल्या जाणार्‍या दुर्गादेवीला आम्ही शरण आलो आहोत. आसुरांचा नाश करणार्‍या देवी तुला नमस्कार आहे.
१०) प्राणरुप देवांनी ज्या प्रकाशमान वैखरीस उत्पन्न केले तीने निरनिराळे प्राणी बोलतात. ती कामधेनुतुल्य, आनन्ददायक आणि अन्न व बळ देणारी वाग्रुपिणी भगवती उत्तम स्तुतीने संतुष्ट होऊन आमच्याजवळ येवो.
११) कालाचा नाश करणार्‍या कालरात्रीला, वेदांनी स्तविलेल्या वैष्णवीला,स्कन्दमातेला, सरस्वतीला, अदितीला, दक्षकन्येला, पापनाशिनी कल्याणकारी भगवतीला आम्ही नमस्कार करतो.
१२) आम्ही महालक्ष्मीला जाणतो आणि त्या सर्वशक्तिरुपिणीचेच ध्यान करतो. ती देवी आम्हाला ज्ञान व ध्यानास प्रवृत्त करो.
१३) हे दक्ष ! आपली कन्या अदिति ती प्रसूत होऊन तीचे अमर कल्याणमय देव उत्पन्न झाले.
१४) काम (क वर्ण), योनि (ए), कमला (ई), वज्रपाणि-इंद्र (ल), गुहा (हृीं), ह-स वर्ण, मातरिश्वा- वायु (क), अभ्र ( ह), इन्द्र (ल),पुनः गुहा (हृीं), स-क-ल- वर्ण आणि माया (हृीं) - ही सर्वात्मिका जगन्मातेची मूळविद्या आहे आणि ती ब्रह्मरुपिणी आहे.
शिवशक्त्यभेदरुपा, ब्रह्म-विष्णु-शिवात्मिका, सरस्वति-लक्ष्मी-गौरीरुपा, अशुद्धमिश्र-शुद्धोपासनात्मिका, समरसीभूत-शिवशक्त्यात्मक ब्रह्मस्वरुपाचे निर्विकल्प ज्ञान देणारी सर्वतत्वात्मिका महात्रिपुरसुन्दरी- असा या मंत्राचा भावार्थ आहे. हा मंत्र सर्व मंत्रांचा मुकुटमणि आहे. आणि मंत्रशास्त्रांत पंचदशी इत्यादि श्रीविद्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्याचे सहा प्रकारचे अर्थ --भावार्थ, वाच्यार्थ, सम्प्रदायार्थ, लौकिकार्थ, रहस्यार्थ आणि तत्त्वार्थ असे अर्थ ' नित्यषोडशिकार्णव ' ग्रंथांत सांगितलेले आहेत.
त्याचप्रमाणे ' वरिवस्यारहस्य ' या ग्रंथांत व श्रुतिमध्येही अनेक प्रकारे अर्थ सांगितले गेले आहेत. या मंत्राचे महत्व व गोपनीयता राखली गेली आहे.
१५) ही परमात्म्याची शक्ति आहे. ही विश्र्वमोहिनी आहे. पाश अंकुश,धनुष्य आणि बाण धारण करणारी आहे. ही महाविद्या आहे. जो हे जाणतो तो दुःखाच्या पलिकडे जातो. 
१६) भगवती तुला नमस्कार आहे. माते सर्व प्रकारे तूं आमची रक्षा कर.
१७) मंत्रद्रष्टे ऋषि म्हणतात की हेच ते अष्टवसु आहेत. हेच ते एकादश रुद्र आहेत. हेच ते द्वादश
आदित्य आहेत. हेच ते सोमपान करणारे व सोमपान न करणारे विश्र्वेदेव आहेत. हेच ते यातुधान ( एक प्रकारचे राक्षस ), असुर, राक्षस,पिशाच, यक्ष आणि सिद्ध आहेत. हेच सत्व, रज व तम आहे. हेच ते ब्रह्म, विष्णु व रुद्ररुप आहे. हेच प्रजापति, इन्द्र व मनु आहे. हेच ते ग्रह, नक्षत्र व तारे आहे. हीच कला- काष्ठादि कालरुपिणी आहे. त्या पाप नाशिनी, भोग-मोक्ष देणार्‍या, अन्त नसलेल्या, विजय देणार्‍या,निर्दोष, शरण्य जाण्यास योग्य, कल्याण व मंगल करणार्‍या देवीला आम्ही नेहमी नमस्कार करतो.  
१८-१९) वियत् --आकाश (ह) तसेच ' ई ' काराने युक्त, वीतिहोत्र--अग्नि ( र )--सहित, अर्धचंद्र ( ँ ) ने अलंकृत जे देवीचे बीज आहे ते सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. या प्रकारे एकाक्षर ब्रह्म ( हृीं ) -चा असे यति ध्यान करतात की ज्यांचे चित्त शुद्ध आहे. ' हृीं ' निरतिशय आनन्दपूर्ण आणिज्ञानाचा सागर आहे. हा मन्त्र देवीप्रणव मानला जातो.
ॐ काराप्रमाणेच हा प्रणव व्यापक अर्थाने भरलेला आहे. थोडक्यांत ह्याचा अर्थ इच्छा-ज्ञान-क्रियाधार, अद्वैत, अखण्ड, सच्चिदानन्द, समरसीभूत, शिवशक्तिस्फुरण आहे. 
२०) हे चित्स्वरुपिणी महासरस्वती ! हे सद्रूपिणी महालक्ष्मी ! हे आनन्दरुपिणी महाकाली ! ब्रह्मविद्या मिळावी म्हणून आम्ही सगळे तुझे ध्यान करतो. हे महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती- स्वरुपिणी चण्डिके ! तुला नमस्कार आहे. अविद्यारुपी दोराची घट्ट गाठरुपी ग्रंथी उघडून मला मुक्त कर.
२१) हृदयामध्ये रहाणारी, उगवत्या सूर्याप्रमाणे प्रभावशाली, पाश व अंकुश धारण करणारी, मनोहर रुपिणी, वरद व अभयमुद्रा धारण करणारे हात असलेली, तीन नेत्र असणारी, लालरंगाचे वस्त्र परिधान केलेली, आणि कामधेनुप्रमाणे भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणार्‍या देवीला मी भजतो.
२२) महाभयाचा नाश करणारी, महासंकट (शांत) हरण करणारी, आणि करुणेची साक्षात मूर्ती असलेल्या महादेवी मी तुला नमस्कार करतो.
२३) जिचे स्वरुप ब्रह्मादिक जाणू शकत नाहीत म्हणून तीला अज्ञेया म्हणतात. जिला अन्त नाही म्हणून तीला अनन्ता म्हणतात. जीचे लक्ष्य दिसत नाही म्हणून तीला अलक्ष्या म्हणतात. जीचा जन्म समजत नाही म्हणून तीला अजा म्हणतात. जी एकटीच सर्वत्र आहे म्हणून तीला एका म्हणतात.जी एकटीच विश्र्वरुपाने सजली आहे  म्हणून तीला नैका म्हणतात. म्हणून ती अज्ञेया, अनन्ता, अलक्ष्या, अजा, एका आणि नैका म्हटली जाते.
२४) सर्व मंत्रामध्ये ' मातृका ' -मूलाक्षररुपाने राहणारी, शब्दांमध्ये ज्ञान ( अर्थ ) रुपाने राहणारी, ज्ञानामध्ये चिन्मयातीता, शून्यामध्ये शून्यसाक्षिणी तसेच जीच्या सारखे दुसरे काहीही श्रेष्ठ नाही ती दुर्गा नावाने प्रसिद्ध आहे.
२५) त्या दुर्विज्ञेय, दुराचारनाशक, आणि संसारसागरांतून तारणार्‍या दुर्गादेवीला संसारांत भयभीत झालेला मी नमस्कार करतो.
२६) जो ह्या अथर्वशीर्षाचे अध्ययन करतो, त्याला पाचही अथर्वशीर्षांच्या जपाचे फल मिळते. या अथर्वशीर्षाला न जाणता जो प्रतिमास्थापन करतो त्याला कित्येक लाख जप करुनही सिद्धि प्राप्त होत नाही.
१०८ वेळा जप ही ह्याची पुरश्चरण पद्धती आहे. जो हे दहा वेळा म्हणतो तो त्याच क्षणी पापमुक्त होतो. महादेवीच्या कृपाशिर्वादाने मोठ्या घनघोर संकटांतना पार करतो.
२७) ह्या अथर्वशिर्षाचे सायंकाळी पठण करणार्‍याची दिवसभरांत केलेली सर्व पापे नष्ट होतात. सकाळी पठण करणार्‍याची रात्री केलेली सर्व पापे नष्ट होतात. दोन्हीवेळी पठण करणारा निष्पाप होतो. 
मध्यरात्री तुरीय संध्येच्यावेळी जप केल्याने वाक्-सिद्धि मिळते. नवीन प्रतिमेवर पठण केल्यास देवता सान्निध्य मिळते. प्राणप्रतिष्ठा समयी पठण केल्यास प्राणप्रतिष्ठा होते. भौमाश्विनी (अमृतसिद्धि) योगावर महादेवीच्या जवळ पठण केल्यास महामृत्युतून तारण होते.  जो हे जाणतो तो महामृत्युतुन तरुन जातो. या प्रकारे ही अविद्यानाशिनी ब्रह्मविद्या आहे.
Shri Devyathrvshirsham 
श्रीदेव्यथर्वशीर्षम्



Custom Search

No comments: