Tuesday, July 19, 2016

Shri GuruPaduka Mahatmya श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं


Shri GuruPaduka Mahatmya
Shri GuruPaduka Mahatmya is in Sanskrit. It is told by God Shiva to Goddess Parvati in Kularnav tantra. How Guru’s Paduka are powerful and how darshan of Guru Paduka is important, is told by God Shiva.
श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं
श्रीदेव्युवाच
कुलेश श्रोतुमिच्छामि पादुका भक्तिलक्षणम् ।
आचारमपि देवेश वद मे करुणानिधे ॥ १ ॥
ईश्वर उवाच
श्रृणु देवि प्रवक्ष्यामि यन्मां त्वं परिपृच्छसि ।
तस्य श्रवणमात्रेण भक्तिराशु प्रजायते ॥ २ ॥
वाग्भवा मूलवलये सूत्राद्याः कवलीकृताः ।
एवं कुलार्णवे ज्ञानं पादुकायां प्रतिष्ठितम् ॥ ३ ॥
कोटिकोटिमहादानात् कोटिकोटिमहाव्रतात् ।
कोटिकोटिमहायज्ञात् परा श्रीपादुकास्मृतिः ॥ ४ ॥
कोटिकोटिमंत्रजापात् कोटितीर्थावगाहनात् ।
कोटिदेवार्चनाद्देवि परा श्रीपादुकास्मृतिः ॥ ५ ॥
महारोगे महोत्पाते महादोषे महाभये ।
महापदि महापापे स्मृता रक्षति पादुका ॥ ६ ॥  
दुराचारे दुरालापे दुःसंगे दुष्प्रतिग्रहे ।
दुराहारे च दुर्बुद्धौ स्मृता रक्षति पादुका ॥ ७ ॥
तेनाधीतं स्मृतं ज्ञातम् इष्टं दत्तंच पूजितम् ।
जिव्हाग्रे वर्तते यस्य सदा श्रीपादुकास्मृतिः ॥ ८ ॥
सकृत् श्रीपादुकां देवि यो वा जपति भक्तितः ।
स सर्वपापरहितः प्राप्नोति परमां गतिम् ॥ ९ ॥
शुचिर्वाप्यशुचिर्वापि भक्त्या स्मरति पादुकाम् ।
अनायासेन धर्मार्थकाममोक्षान् लभेत सः ॥ १० ॥
श्रीनाथचरणांभोजं यस्यां दिशि विराजते ।
तस्यां दिशि नमस्कुर्यात्  भक्त्या प्रतिदिनं प्रिये ॥ ११ ॥
न पादुकापरो मंत्रो न देवः श्रीगुरोः परः ।
न हि शास्त्रात् परं ज्ञानं न पुण्यं कुलपूजनात् ॥ १२ ॥
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः परम् ।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ॥ १३ ॥
गुरुमूलाः क्रियाः सर्वा लोकेऽस्मिन् कुलनायिके ।
तस्मात् सेव्यो गुरुर्नित्यं सिद्ध्यर्थं भक्तिसंयुतैः ॥ १४ ॥
॥ इति श्रीईश्र्वरपार्वती संवादे कुलार्णवतंत्रे श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं संपूर्णम् ॥
मराठी अर्थ
देवी पार्वती म्हणाली,
हे कुलेशा ! हे दयाळु महादेवा !! गुरुपादुकांच्याबद्दल साधकांच्या मनांत भक्तिभाव व आचार कसा असावा ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. तरी आपण ते मला सांगावे.
महादेव म्हणाले,
हे देवी ! तूं मला जो प्रष्ण विचारलास त्यासंबंधी मी सांगतो ते ऐक. त्याच्या केवळ श्रवणाने अंतःकरणांत भक्ति उत्पन्न होते. वेदांमध्ये ज्याप्रमाणें सर्व सूत्रे आली आहेत. त्याप्रमाणेच कुलार्णवतंत्रामध्ये पादुकांविषयीचे सर्व ज्ञान सांठविलेले आहे. कोटिकोटि महादानांपेक्षा, कोटिकोटि महाव्रतांपेक्षा व कोटिकोटि महायज्ञांपेक्षा श्रीगुरुपादुकांचे स्मरण श्रेष्ठ आहे. 
मोठे मोठे रोग, उत्पात, दोष, भय, पाप व महाभयानक आपत्ती यांच्यापासून श्रीसद्गुरुंच्या पादुकांचे नुसते स्मरण केले तरी संरक्षण होते. 
तसेच दुष्टाचार, दुष्कीर्ती, दुःसंगती, दुष्टखाद्य आणि दुष्टबुद्धी यांपासून श्रीगुरुपादुकांचे नित्य स्मरण करणार्‍या साधकाचे रक्षण होते. 
ज्या साधकाच्या जीभेवर श्रीगुरुपादुकांचे सतत स्मरण तरळत असते अर्थात् जो साधक वाणीने श्रीगुरुपादुकांचे स्मरण करीत असतो त्याने सर्व वेदांचे अध्ययन केले, स्मृती अभ्यासल्या, सर्व देवांचे पूजन केले, सर्व काही पाहिले, यच्चयावत सर्व कांही दिले आणि समस्त जाणले असे म्हणावयास काहीही हरकत नाही, असे निश्र्चित समज. 
भक्तिभावाने एक वेळा जरी श्रीगुरुपादुकांचे स्मरण केले तरी सर्व पातकांचा नाश होऊन साधकाला श्रेष्ठ गती मिळते. शुची किंवा अशुची अशा कोणत्याही अवस्थेंत श्रीगुरुपादुकांचे साधकाने स्मरण केल्यास धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती त्याला अगदी अनायासाने होते.
श्रीगुरुचरणकमल ज्या दिशेला आहेत त्या दिशेला दररोज भक्तीने नमस्कार करावा. 
हे पार्वती ! श्रीगुरुपादुकांच्या स्मरणापेक्षा श्रेष्ठ मंत्र नाही. श्रीगुरुंपेक्षा श्रेष्ठ देव नाही. शास्त्रापेक्षा म्हणजे गुरु हेच शास्त्र व त्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान नाही. आणि कुलपूजनाइतके  म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या पूजनाइतके श्रेष्ठ पुण्य नाही. श्रीगुरुमूर्तीचे ध्यान हे ध्यानांत म्हणजे ध्येयवस्तूमध्ये श्रेष्ठ आहे. कारण ते सर्व ध्यानाचे मूळ आहेत किंवा तेच सर्व ध्यानाच्या मुळाशी आहेत. श्रीगुरुवचन हे सर्व मंत्रांहून श्रेष्ठ आहे, कारण त्यांचा कोणताही शब्द किंवा वाक्य हे मंत्रस्वरुप असून तेच सर्व मंत्रांचे मूळ आहे. आणि मोक्षप्राप्तीच्या मुळाशी गुरुकृपाच अर्थात् शक्तिपातपूर्वक केलेला शाक्तिसंचारच कारणीभूत आहे. 

हे कुलनायिके ! सर्व क्रियांचे मूळ श्रीगुरुच आहेत म्हणजे या जगांत श्रीगुरुंवाचून दुसरे काहीच नाही. यासाठी भक्तियुक्त अंतःकरणाने सिद्धिसाठी अर्थात् स्वसंवेद्य आत्मस्वरुपाच्या प्राप्तीसाठी श्रीगुरुंचीच सेवा करावी.  
Shri GuruPaduka Mahatmya 
श्रीगुरुपादुका महात्म्य स्तोत्रं


Custom Search

No comments: