Monday, July 11, 2016

SansarPavanNam Shankar Kavacham संसारपावन नाम शंकरकवच


SansarPavanNam Shankar Kavacham 
SansarPavanNam Shankar Kavacham is in Sanskrit. It is from BrahmaVaivart Purana. This Kavacham is told to Banasur by God Shiva himself. It is to be recited for 5 Lakh times for devotee to be blessed by God Shiva.
संसारपावन नाम शंकरकवच 
ॐ नमो महादेवाय
बाणासुर उवाच
महेश्र्वर महाभाग कवचं यत् प्रकाशितम् ।
संसारपावन नाम कृपया कथय प्रभो ॥ १ ॥
महेश्र्वर उवाच
श्रृणु वक्ष्यामि हे वत्स ! कवचं परमाद्भुतम् ।
अहं तुभ्यं प्रदास्यामि गोपनीयं सुदुर्लभम् ॥ २ ॥
पुरा दुर्वाससे दत्तं त्रैलोक्यविजयाय च ।
ममैवेदं च कवचं भक्त्या यो धारयेत् सुधीः ॥ ३ ॥  
जेतुं शक्नोति त्रैलोक्यं भगवानिव लीलया ॥ ४ ॥
संसारपावनस्यास्य कवचस्य प्रजापतिः ।
ऋषिश्छन्दश्र्च गायत्री देवोऽहं च महेश्र्वरः ।
धर्मार्थकाममोक्षेषु विनियोगः प्रकीर्तितः ॥ ५ ॥
पञ्चलक्षजपेनैव सिद्धिदं कवचं भवेत् ॥ ६ ॥
यो भवेत् सिद्धकवचो मम तुल्यो भवेद् भुवि ।
तेजसा सिद्धियोगेन तपसा विक्रमेण च ॥ ७ ॥
शम्भुर्मे मस्तकं पातु मुखं पातु महेश्र्वरः ।
दन्तपंक्तिं च नीलकण्ठोऽप्यधरोष्ठं हरः स्वयम् ॥ ८ ॥
कण्ठं पातु चन्द्रचूडः स्कन्धौ वृषभवाहनः ।
वक्षःस्थलं नीलकण्ठः पातु पृष्ठं दिगम्बरः ॥ ९ ॥
सर्वाङ्गं पातु विश्र्वेशः सर्वदिक्षु च सर्वदा ।
स्वप्ने जागरणे चैव स्थाणुमें पातु संततम् ॥ १० ॥
इति ते कथितं बाण कवचं परमाद्भुतम् ।
यस्मै कस्मै न दातव्यं गोपनीयं प्रयत्नतः ॥ ११ ॥
यत् फलं सर्वतीर्थानां स्नानेन लभते नरः ।
तत् फलं लभते नूनं कवचस्यैव धारणात् ॥ १२ ॥
इदं कवचमज्ञात्वा भजेन्मां यः सुमन्दधीः ।
शतलक्षप्रजप्तोऽपि न मन्त्रः सिद्धिदायकः ॥ १३ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे संसारपावनं नाम शंकरकवचं संपूर्णम् ॥
॥ श्री शंकरार्पणमस्तु ॥    
मराठी अर्थ
बाणासुर म्हणाला, सच्चिदानन्दस्वरुप श्रीमहादेवानां नमस्कार असो.
१) प्रभो ! महेश्र्वरा आपण मला संसारपावन कवच मला सांगावे.
महेश्र्वर म्हणाले,
२-४) मुला, ऐक या अतिशय अद्भुत कवचाचे मी तुझ्यासाठी वर्णन करतो. ते जरी अत्यंत दुर्लभ आणि गोपनीय आहे तरी ते मी तुला सांगतो. पूर्वी त्रैलोक्य विजयासाठी मी हे दुर्वासांना दिले होते. जो बुद्धिमान पुरुष हे कवच भक्तिभावाने धारण करतो, तो भगवंताप्रमाणेच सहज तीन्ही लोकांवर विजय मिळवितो.
५-७) या संसारपावन कवचाचे ऋषि प्रजापति हे आहेत. छन्द गायत्री असून देवता मी म्हणजे महेश्र्वर आहे.  धर्म, अर्थ, काम व मोक्षसाठी याचा विनियोग आहे. या कवचाचा ५ लक्ष जप केल्यावर हे सिद्धदायक होते. जो या कवचाला सिद्ध करतो, तो सिद्धियोगाने तेजस्वी व तपस्येने, बल-पराक्रमाने माझ्यासारखा विजयी होतो.  
८) शम्भु माझ्या डोक्याचे आणि महेश्र्वर माझ्या मुखाचे रक्षण करो. नीलकण्ठ दंत्तपंक्तिचे आणि स्वतः हर माझ्या अधरोष्टाचे रक्षण करो.
९) चन्द्रचूड कण्ठाचे आणि वृषभवाहन दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. नीलकण्ठ छातीचे व दिगम्बर पाठीचे पालन करो. 
१०) विश्र्वेश नेहमी सर्व दिशांकडून माझ्या संपूर्ण शरिराचे रक्षण करो. झोपल्यावर व जागेपणी स्थाणुदेव माझे रक्षण करो.
११) बाणा, ह्याप्रकारे मी तुझ्यासाठी या अत्यंत अद्भुत कवचाचे वर्णन केले. ऐर्‍यागैर्‍याला ह्याचा उपदेश करु नये. मात्र हे गुप्त ठेवले पाहीजे. हे कवच धारण केले असतां सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्यावर जे फळ मिळते तसेच फळ मिळते. मन्दबुद्धि माणुस या कवचाला न जाणता माझी उपासना करतो, त्याला लाखों जप केल्यावरही मंत्र सिद्ध होत नाही.

अशाप्रकारे श्रीब्रह्मवैवर्त पुराणांतील हे संसारपावन नावाचे शिवकवच पू्र्ण झाले. 
SansarPavanNam Shankar Kavacham संसारपावन नाम शंकरकवच 


Custom Search
Post a Comment