DurgNashan Stotra
DurgNashan Stotra is in Sanskrit. It is from Brahmavaivart Purana-Prakruti Khanda (66=7-26). It is Durga Stuti by ShriKrishna.
दुर्गनाशन स्तोत्र
श्रीकृष्ण उवाच
त्वमेव सर्वजननी मूलप्रकृतिरीश्र्वरी ।
त्वमेवाद्या सृष्टिविधौ स्वेच्छया त्रिगुणात्मिका ॥ १ ॥
कार्यार्थे सगुणा त्वं च वस्तुतो निर्गुणा स्वयम् ।
परब्रह्मस्वरुपा त्वं सत्या नित्या सनातनी ॥ २ ॥
तेजःस्वरुपा परमा भक्तानुग्रहविग्रहा ।
सर्वस्वरुपा सर्वेशा सर्वाधारा परात्परा ॥ ३ ॥
सर्वबीजस्वरुपा च सर्वपूज्या निराश्रया ।
सर्वज्ञा सर्वतोभद्रा सर्वमङ्गलमङ्गला ॥ ४ ॥
सर्वबुद्धिस्वरुपा च सर्वशक्तिस्वरुपिणी ।
सर्वज्ञानप्रदा देवी सर्वज्ञा सर्वभाविनी ॥ ५ ॥
त्वं स्वाहा देवदाने च पितृदाने स्वधा स्वयम् ।
दक्षिणा सर्वदाने च सर्वशक्तिस्वरुपिणी ॥ ६ ॥
निद्रा त्वं च दया त्वं च तृष्णा त्वं चात्मनः प्रिया ।
क्षुत्क्षान्तिः शान्तिरीशा च कान्तिः सृष्टिश्र्च शाश्र्वती ॥ ७ ॥
श्रद्धा पुष्टिश्र्च तन्द्रा च लज्जा शोभा दया तथा ।
सतां सम्पत्स्वरुपा च विपत्तिरसतामिह ॥ ८ ॥
प्रीतिरुपा पुण्यवतां पापिनां कलहाङ्कुरा ।
शश्र्वत्कर्ममयी शक्तिः सर्वदा सर्वजीविनाम् ॥ ९ ॥
देवेभ्यः स्वपदोदात्री धातुर्धात्री कृपामयी ।
हिताय सर्वदेवानां सर्वासुरविनाशिनी ॥ १० ॥
योगनिद्रा योगरुपा योगदात्री च योगिनाम् ।
सिद्धिस्वरुपा सिद्धानां सिद्धिदा सिद्धयोगिनी ॥ ११ ॥
ब्रह्माणी माहेश्र्वरी च विष्णुमाया च वैष्णवी ।
भद्रदा भद्रकाली च सर्वलोकभयङ्करी ॥ १२ ॥
ग्रामे ग्रामे ग्रामदेवी गृहदेवी गृहे गृहे ।
सतां कीर्तिः प्रतिष्ठा च निन्दा त्वमसतां सदा ॥ १३ ॥
महायुद्धे महामारी दुष्टसंहाररुपिणी ।
रक्षास्वरुपा शिष्टानां मातेव हितकारिणी ॥ १४ ॥
वन्द्या पूज्या स्तुता त्वं च ब्रह्मादिनां च सर्वदा ।
ब्राह्मण्यरुपा विप्राणां तपस्या च तपस्विनाम् ॥ १५ ॥
विद्या विद्यावतां त्वं च बुद्धिर्बुद्धिमतां सताम् ।
मेधास्मृतिस्वरुपा च प्रतिभा प्रतिभावताम् ॥ १६ ॥
राज्ञां प्रतापरुपा च विशां वाणिज्यरुपिणी ।
सृष्टौ सृष्टिस्वरुपा त्वं रक्षारुपा च पालने ॥ १७ ॥
तथान्ते त्वं महामारी विश्वस्य विश्र्वपूजिते ।
कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्र्च मोहिनी ॥ १८ ॥
दुरत्यया मे माया त्वं यया सम्मोहितं जगत् ।
यया मुग्धो हि विद्नांश्र्च मोक्षमार्ग न पश्यति ॥ १९ ॥
इत्यात्मना कृतं स्तोत्रं दुर्गाया दुर्गनाशनम् ।
पूजाकाले पठेद्यो हि सिद्धिर्भवति वाञ्छिता ॥ २० ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे प्रकृतिखंडे (६६/७-२६) श्रीकृष्ण कथिते दुर्गनाशन स्तोत्रम् संपूर्णम् ॥
॥ श्रीदुर्गादेवीमर्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले
१) देवि, तूं सर्वांची माता व मूलप्रकृति ईश्र्वरी आहेस. तूं सृष्टीच्या कार्यांत आद्यशक्ति आहेस. तुझ्याच इच्छेने तूं त्रिगुणात्मक बनली आहेस.
२) कार्याच्या आवशकतेनुसार तूं सगुण रुप धारण करतेस. वास्तविक तू निर्गुण आहेस. तूं सत्य, नित्य व सनातन अशी परब्रह्मस्वरुप व परम तेजस्वी आहेस.
३-५) भक्तांवर कृपा करण्यासाठी दिव्य शरीर तूं धारण करतेस. तूं सर्वस्वरुपा, सर्वेश्र्वरी, सर्वांचा आधार, परात्परा, सर्वबीजस्वरुपा, सर्वांना पूज्य, निराश्रीतांना आश्रय देणारी, सर्व ज्ञानी, सर्वतोभद्रा, सर्व मङ्गलमङ्गला, सर्वबुद्धिस्वरुपा, सर्वशक्तिरुपिणी, सर्वज्ञान देणारी, सर्व जाणणारी आणि सर्वांना उत्पन्न करणारी आहेस.
६-८) देवतांना हविष्य दान करण्यासाठी तूंच स्वाहा देवता आहेस. तसेच पितरांसाठी श्राद्ध अर्पण करण्यासाठी तूंच स्वधा देवता आहेस. सर्वप्रकारच्या दानयज्ञामध्ये दक्षिणा देवता तूंच आहेस. तूंच निद्रा, दया आणि मनाला प्रिय वाटणारी तृष्णा आहेस. क्षुधा, क्षमा, शान्ति, ईश्र्वरी, कान्ति तसेच शाश्र्वती सृष्टिपण तूंच आहेस. श्रद्धा, पुष्टि, तन्द्रा, लज्जा, शोभा व दया तूंच आहेस. सत्पुरुषांसाठी सम्पत्ति व दुष्टांसाठी विपत्ति तूंच आहेस.
९-१०) पुण्यवानांसाठी प्रेमरुप, पापी लोकांसाठी कलहरुपी अङ्कूर, सर्व जीवांसाठी कर्ममय शक्तिही तूंच आहेस. देवतांना त्यांचे पद देणारी व धाता (ब्रह्माचे) पोषण करणारी दयामय धात्री तूंच आहेस. सर्व देवतांच्यासाठी असूरांचा नाश करणारी तूंच आहेस.
११-१२) योगनिद्रा तूंच, योग तुझेच स्वरुप, योग्यांना योग देणारी व सिद्धांची सिद्धि तूंच आहेस. तूं सिद्धि देणारी व सिद्धयोगिनी आहेस. ब्रह्माणी, माहेश्र्वरी, विष्णुमाया, वैष्णवी, तसेच भद्रदायिनी भद्रकाली तूंच आहेस. तूंच सर्व लोकांसाठी भय उत्पन्न करतेस.
१३-१४) गावागावांत ग्रामदेवी व घराघरांत गृहदेवी तूंच आहेस. तूं सत्पुरुषांची कीर्ति व प्रतिष्ठा आहेस. दुष्टांची नेहमी होणारी निंदापण तुझेच स्वरुप आहे. महायुद्धामध्ये दुष्टांचा नाश करणारी महामारी व सत्पुरुषांसाठी मातेप्रमाणे हितकरणारी व त्यांचे रक्षण करणारी आहेस.
१५-१६) ब्रह्मा आणि देवता नेहमी तुझी पूजा, वंदना व स्तुति करतात. ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व व तपस्वी लोकांची तपस्या तूंच आहेस. विद्वानांची विद्या, बुद्धिवंतांची बुद्धि, सत्पुरुषांची मेधा आणि स्मृति तसेच प्रतिभावानांची प्रतिभा पण तुझेच रुप आहे.
१७-१९) राजांचा प्रताप व वैश्यांचे वाणिज्य तूंच आहेस. हे विश्र्वपूजिते, सृष्टिकाली सृष्टिरुपिणी, पालनकाली रक्षण करणारी तसेच संहारकाली विश्र्वाचा नाश करणारी महामारीरुपिणी तूंच आहेस. तूंच कालरात्रि, महारात्रि तसेच मोहिनी , मोहरात्रि आहेस. तूं माझी दुर्लङ्घ्य माया आहेस. जीने सर्व जगाला मोहित केले आहे. तीने मोहित झालेल्या विद्वान पुरुषालासुद्धा मोक्षमार्ग दिसत नाही.
२०) या दुर्गामातेच्या दुर्गम स्तोत्राचे पठण पूजा करतांना जो करतो त्याला इच्छित सिद्धि प्राप्त होते.
अशा रीतीने हे श्रीकृष्णांनी गायीलेले हे दुर्गम स्तोत्र पूर्ण झाले.
DurgNashan Stotra
दुर्गनाशन स्तोत्र
Custom Search
No comments:
Post a Comment