Wednesday, November 2, 2011

IndraKrut Mahalakshmi Poojanam

IndraKrut Mahalakshmi Poojanam 

This is Mahalakshmi Poojanam performed by Devaraj Indra. This is in Sanskrit. It is from shri Devi Bhagwatam. God Brahma advised God Indra to perform Mahalakshmi Poojanam. It is a systematic worship of Mahalakshmi. As advised by God Brahma, God Indra performed it. He also chanted Mantra of the Goddess for ten lakha times. Goddess Mahalakshmi was pleased and she stood in front of God Indra and blessed him by fulfilling his desires. 

इन्द्रकृत श्रीमहालक्ष्मि पूजनं

संपूज्य ब्रह्मवाक्येन चोपचाराणि षोडश I 
ददौ भक्त्या विधानेन प्रत्येकं मंत्रपूर्वकं I
 प्रशस्यानि प्रकृष्टानि वराणि दुर्लभानि च II १ II
 अमूल्य रत्नसारं च निर्मितं विश्व कर्मणा I
 आसनं च विचित्रं च महालक्ष्मि प्रगृह्यताम् II २ II
 शुद्धं गङ्गोदकमिदं सर्ववन्दितमिप्सितम् I
 पापेघ्मवन्हिरूपं च गृह्यतां कमलालये II ३ II 
 पुष्पचन्दनदुर्वादिसंयुतं जाह्नवीजलं I
 शङ्खगर्भस्थितं शुद्धं गृह्यतां पद्मवासिनी II ४ II
 सुगन्धिपुष्पतैलं च सुगन्धामलकिफ़लम् I
 देहसौन्दर्यबीजं च गृह्यतां श्रीहरेः प्रिये II ५ II
 वृक्षनिर्यासरूपं च गन्धद्रव्यादिसंयुतम् I 
श्रीकृष्णकान्ते धूपं च पवित्रं प्रतिगृह्यताम् II ६ II
 मलयाचलसम्भूतं वृक्षसारं मनोहरम् I
 सुगन्धयुक्तं सुखदं चन्दनं देवि गृह्यताम् II ७ II
 जगच्चक्षुःस्वरूपं च ध्वान्तप्रध्वंसकारणम् I
 प्रदीपं शुद्धरूपं च गृह्यतां परमेश्वरि II ८ II
 नानोपहाररूपं च नाना रस समन्वितम् I
 नानास्वादुकरं चैव नैवेद्यं प्रतिगृह्यताम् II ९ II
 अन्नं ब्रह्मस्वरूपं च प्राणरक्षणकारणम् I
 तुष्टिदं पुष्टिदं चैव देव्यन्नं प्रतिगृह्यताम् II १० II
 शाल्यक्षतसुपक्वं च शर्करागव्यसंयुतम् I
 स्वादुयुक्तं महालक्ष्मि परमान्नं प्रगृह्यताम् II ११ II
 शर्करागव्यपक्वं च सुस्वादु सुमनोहरम् I
 मया निवेदितं लक्ष्मि स्वस्तिकं प्रतिगृह्यताम् II १२ II
 नानाविधानि रम्याणि पक्वानि च फ़लानि च I
 स्वादुयुक्तानि कमले गृह्यतां फ़लदानि च II १३ II
 सुरभिस्तनसम्भूतं सुस्वादु सुमनोहरम् I
 मर्त्यामृतं सुगव्यं च गृह्यतामच्युतप्रिये II १४ II
 सुस्वादुरससंयुक्तमिक्षुवृक्षसमुद्भवम् I
 अग्निपक्वमतिस्वादु गुडं च प्रतिगृह्यताम् II १५ II
 यवगोधूमशस्यानां चूर्णरेणुसमुद्भवम् I
 सुपक्वं गुडगव्याक्तं मिष्टान्नं देवि गृह्यताम् II १६ II
 शस्यचूर्णोद्भवं पक्वं स्वस्तिकादि समन्वितम् I
 मया निवेदितं देवि पिष्टकं प्रतिगृह्यताम् II १७ II
 पार्थिवो वृक्षभेदश्च विविधद्रव्यकारणम् I
 सुस्वादुरससंयुक्तं ईक्षुश्च प्रतिगृह्यताम् II १८ II
 शीतवायुप्रदं चैव दाहे च सुखदं परम् I
 कमले गृह्यतां चेदं व्यजनं श्वेतचामरम् II १९ II
 ताम्बूलं च वरं रम्यं कर्पूरादिसुवासितम् I
 जिह्वाजाडयच्छेदकरं ताम्बूलं देवि गृह्यताम् II २० II
 सुवासितं शीतलं च पिपासानाशकारणम् I
 जगज्जीवनरूपं च जीवनं देवि गृह्यताम् II २१ II
 देहसौन्दर्यबीजं च सदा शोभाविवर्धनम् I
 कार्पासजं च कृमिजं वसनं देवि गृह्यताम् II २२ II
 रत्नस्वर्णविकारं च देहभूषाविवर्धनम् I
 शोभाधानं श्रीकरं च भूषणं प्रतिगृह्यताम् II २३ II
 नानाकुसुमनिर्माणं बहुशोभाप्रदं परम् I
 सुरभूपप्रियं शुद्धं माल्यं देवि प्रगृह्यताम् II २४ II
 पुण्यतीर्थोदकं चैव विशुद्धं शुद्धिदं सदा I
 गृह्यतां कृष्णकान्ते त्वं रम्यमाचमनियकम् II २५ II
 रत्नसारादिनिर्माणं पुष्पचन्दनसंयुतम् I
 रत्नभूषणभूषाढयं सुतल्पं देवि गृह्यताम् II २६ II
 यद्यद् द्रव्यमपूर्वं च पृथिव्यामपि दुर्लभम् I 
देवभूषार्हभोग्यं च तद्द्रव्यं देवि गृह्यताम् II २७ II
 द्रव्याण्येतानि दत्त्वा च भूतेन देवपुन्गवः I 
 मूलं जजाप भक्त्या च दशलक्षं विधानतः II २८ II
 जपेन दशलक्षेण मंत्र सिद्धिर्बभूव ह I
 मंत्रश्च ब्रह्मणा दत्तः कल्पवृक्षश्च सर्वतः II २९ II 
लक्ष्मीर्माया कामवाणी डेन्ता कमलवासिनी I
 वैदिको मंत्रराजोSयं प्रसिद्धः स्वाहयाSन्वितः II ३० II
 कुबेरोSनेन मंत्रेण परमैश्वर्यमाप्तवान् I
 राजराजेश्वरो दक्षः सावर्णिर्मनुरेव च II ३१ II 
मंगलोSनेन मंत्रेण सप्तद्वीपेSवनीपतिः I
 प्रियव्रतोत्तानपादौ केदारो नृप एव च II ३२ II 
एते सिद्धाश्च राजेंद्रा मंत्रेणानेन नारद I
 सिद्धे मंत्रे महालक्ष्मी: शक्राय दर्शनं ददौ II ३३ II
 रत्नेंद्रसारनिर्माणविमानस्था वरप्रदा I 
सप्तद्वीपवतीं पृथ्वीं छादयंती त्विषा च सा II ३४ II
 श्वेतचंपकवर्णाभा रत्नभूषणभूषिता I 
ईषदास्यप्रसन्नास्या भक्तानुग्रहकातरा II ३५ II
 बिभ्रती रत्नमालां च कोटिचंद्रसमप्रभाम् I 
दृष्ट्वा जगत्प्रसूं शांतां तुष्टावैतां पुरन्दरः I 
 पुलकांचितसर्वांगः साश्रुनेत्रः कृतांजलिः II ३६ II
 II इति श्री इन्द्रकृत श्रीमहालक्ष्मि पूजनं श्री महालाक्ष्मिर्पणमस्तु II


इंद्रकृत महालक्ष्मी पूजनं मराठी अर्थ :

महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे देवराज इंद्राने अत्यंत व पुष्कळ गुणांनी युक्त अशा भगवती महालक्ष्मीची षोडशोपचारे पूजा केली. विधीपूर्वक प्रत्येक वस्तू मत्रांसहित महालक्ष्मीला समर्पित केली. अनेक प्रकारच्या आवश्यक वस्तू योग्य प्रमाणात अर्पण केल्या. आसन: भगवती महालक्ष्मी जे अमूल्य रत्नांनी प्रत्यक्ष विश्वकर्म्यानी असे विचित्र आसन मी आपणास देत आहे त्यावर आपण बसावे. 
पाद्य पूजन: हे कमलालये, हे गंगाजल आपल्या पायांवर अर्पण करत आहे, याचा स्वीकार करावा. सर्व लोक हे गंगाजल हवे असते व ते स्वतःच्या डोक्यावर शिंपडतात, पापरूपी ईन्धन जाळणारा अग्नीच हे गंगाजल आहे. अर्घ्य: हे पद्मवासिनि ! शंखामध्ये फूल, चंदन, दुर्वा आदी आणि गंगाजल असे हे शुद्ध अर्घ्य स्वीकारावे. 
सुगंधी पदार्थ : श्रीहरीप्रिये ! हे उत्तम सुगंधित फुलांपासून बनविलेले सुगंधी तेल आणि शरीराची सुंदरता वाढविणारे आमली फळ या स्नानोपयोगी वस्तूंचा स्वीकार करावा. 
धूप: हे श्रीकृष्णकांते ! पवित्र वृक्षांचा रस सुखकर अशा गोंदामध्ये परिवर्तीत झाला आहे. त्यामध्ये सुगंधी द्रव्य मिसळलेली आहेत, अशा पवित्र धुपाचा स्वीकार करावा. 
चंदन: देवी ! हे मनोहर चंदन मलयगिरिवर उत्पन्न झाले आहे, हे जणू चंदन वृक्षाचे सारच आहे व सुगंधी आणि सुखदायक आहे. या चंदनाचा स्वीकार करावा. 
 दीप: हे परमेश्वरी ! जो जगताला डोळ्यान सारखा आहे आणि ज्याच्या समोर अंधःकार टिकत नाही, असा शुद्धस्वरूप प्रज्वलित दीप आपण स्वीकारावा.
 नैवेद्य: देवी ! हा नाना प्रकारचा खाण्यास योग्य नैवेद्य, नाना प्रकारच्या रसांनी पूर्ण तसेच विविध स्वादाने युक्त आहे. याचा स्वीकार करावा. 
 अन्न: देवी ! अन्नाला ब्रह्मस्वरूप मानले आहे. प्राणाची सुरक्षितता यावर अवलंबून आहे, शरीरास तुष्टी व पुष्टी देणे हा याचा सहज स्वाभाविक गुण आहे. आपण याचा स्वीकार करावा. 
खीर: महालक्ष्मी ! हे उत्तम पक्वान्न साखर व तूप याने बनविलेले आहे, तसेच विशिष्ट प्रकारच्या तांदूळा पासून बनविलेले आहे, या खिरीचा स्वीकार करावा. 
स्वस्तिक नांवाचे मिष्टांन्न: हे लक्ष्मी ! साखर व तूप यापासून हे अत्यंत मनोहर स्वादिष्ट स्वस्तिक नांवाचे मिष्टांन्न बनविले आहे. याचा नैवेद्य म्हणून स्वीकार करावा. 
फळ: हे कमले ! येथे उत्तम प्रकारची पिकलेली स्वादिष्ट फळे, जी मनोवाञ्छित फ़ले देतात त्यांचा स्वीकार करावा. 
दूध: हे अच्युतप्रिये : सुरभी गाईच्या स्तनांतून काढलेले आणि मृत्यूलोकांसाठी अमृतस्वरूप असलेले हे सुस्वादु दूध स्वीकारावे. 
गूळ: ऊसाच्या गोड रसापासून व तो अग्नीवर तापवून बनविलेला हा गूळ आपण स्वीकारावा.
मिष्टान्न : हे देवी ! ज्वारी, गहू यांच्या पिठांपासून बनविलेले व गूळ व तुपासह अग्नीवर भाजून बनविलेले हे मिष्टान्न आपण स्वीकारावे. 
पीठ: देवी ! धान्यांच्या पिठांचे हे स्वस्तिक इत्यादी चिन्हांनी युक्त असे हे मिश्र पीठ मी भक्तिपूर्वक अर्पिलेले आपण स्वीकारावे. 
ईख : देवी ! ईख भूतलावावरील एक विशिष्ट वृक्ष आहे, ज्यापासून गूळ आदी पदार्थ बनवितात. म्हणून हा मधुर रसाने भरलेला ईख आपण स्वीकारावा. 
व्यंजन: हे कमले ! थंड वारा देणारा असा स्वच्छ चंवर उष्णकाळी अत्यंत सुखदायी आहे, तो ग्रहण करावा. 
ताम्बूल: हे देवी ! हा उत्तम विडा कापूर आदी सुगंधित पदार्थांनी सुवासित व जिभेला स्फूर्ती देणारा आहे याचा आपण स्वीकार करावा. 
जल: हे देवी ! तहान भागविणारे हे अत्यंत शीतल, सुवासित आणि संपूर्ण जगतासाठी जीवनस्वरूप असलेले हे जल आपण स्वीकारावे. 
माला : हे देवी ! विविध ऋतूमधील फुलांनी सुगंधित फुलांची माला जी शोभा वाढविणारी आहे, देवराजाला पण प्रिय त्या पवित्र माळेचा आपण स्वीकार करावा. 
आचमन : हे कृष्णकांते ! हे पवित्र जल, स्वतः शुद्ध व इतरांना शुद्ध करणारे आहे, याचा आपण आचमन म्हणून स्वीकार करावा. 
शय्या: हे देवी ! हि अमूल्य रत्नांनी बनविलेली सुंदर शय्या वस्त्र व आभूशणांनी बनविलेली आहे. फुले व चंदनाने सजविलेली आहे. हिचा आपण स्वीकार करावा. 
अपूर्व द्रव्य: हे देवी ! इतकेच नाही तर पृथ्वीवर जितके पण शरीराला सजविणारे अपूर्व द्रव्य, रत्न आणि दागिने आणि देवराज इंद्राला पण योग्य आहेत त्या सर्व दुर्लभ वस्तू आपल्याला समर्पित केल्या आहेत त्याचा स्वीकार करावा. 
 हे नारद ! देवराज इन्द्राने या सूत्ररूप मंत्राने भगवती महालक्ष्मीला उपर्युक्त द्रव्य समर्पण केल्यानंतर भक्तिपूर्वक विधिसहित महालक्ष्मीच्या मूल मंत्राचे दहा लाखाचे जप अनुष्ठान केले, ज्याच्या फलस्वरूप देवराजांना मंत्र सिद्धी प्राप्त झाली. हा मंत्र सर्वांसाठी कल्पवृक्षासमान आहे. ब्रह्मदेवांच्या कृपेने त्यांना हा त्यांना ( देवराज इंद्रांना) प्राप्त झाला. पूर्वेला श्रीबीज ( श्रीं ), मायाबीज ( ह्रीं ), कामबीज ( क्लीं ) आणि वाणीबीज ( ऐं ) ह्यांचा वापर करून नंतर "कमलवासिनी" हा शब्द व शेवटी ' डेञ ' विभक्ति लावून नंतर " स्वाहा " शब्द जोडल्यावर ( श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा ) हे या मंत्राचे स्वरूप आहे. 
कुबेराने याच मंत्राने भगवती महालक्ष्मीची आराधना करून परम ऐश्वर्य मिळविले. याच मंत्राने दक्षसावर्णि मनुला राजाधिराज पदवी मिळाली तसेच मंगळाला सात द्वीपांचे राज्य मिळाले. हे नारदा ! प्रियव्रत, उत्तानपाद तसेच राजा केदार या सिद्धपुरुषांना राजेंद्र म्हणून घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. हा मंत्र सिद्ध झाल्यावर भगवती महालक्ष्मीने इंद्राला दर्शन दिले. त्यावेळी ती वरदायिनी सर्वोत्तम रत्नांनी बनविलेल्या विमानावर विराजमान झाली होती, आणि आपल्या प्रभेने सप्तद्वीपवती पृथ्वीला आच्छादित करत होती. तिची अंगकांती पांढर्या शुभ्र चंपक पुष्पा प्रमाणे होती. रत्नमय दागिने तिची शोभा वाढवीत होते. तिच्या चेहर्यावर मंद स्मित होते आणि ती भक्तांवर कृपा करण्यासाठी अत्यंत आतुर झाली होती. तिच्या गळ्यांत रत्नांचा हार शोभत होता. असंख्य चंद्राप्रमाणे तिची प्रभा होती. अशा शांतस्वरूप जगदंबा भगवती महालक्ष्मीला पाहून देवराज इंद्र तिची स्तुती करू लागला. देवराजाचे सर्वांग पुलकित झाले होते. डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि हात नमस्कार करत बद्ध झाले होते. ब्रह्मदेवाने सांगितलेले वैदिक स्तोत्र आठवत होते ते आठवून देवराज इंद्र भगवती महालक्ष्मीची स्तुती करू लागला. अशा रीतीने देवराज इंद्राने केलेले हे महालक्ष्मी पूजन महालक्ष्मीला अर्पण करूया.
IndraKrut Mahalakshmi Poojanam


No comments: