Tulsi Blessed By Bhagwan Hari
Tulasi Vivaha and Tulasi Namashtak Stotra
Tulasi Vivaha means marriage of Tulasi. Tulasi was a gopi in golok. Devi Bhagavati Radha became unpleased with her and she cursed Tulasi. Then God Shrikrishna blessed her and told her that while you are on pruthavi lok because of your Tapasya, God Brahma will bless you and you will marry Shri Hari who is the incarnation of me only. Because of the cursing Tulasi had to take birth on the Pruthavi Lok. It is a custom to celebrate this Tulasi Vivaha i.e. marriage of Tulasi with God Hari (God Vishnu) in the month of Kartik Shukla Paksha. It is celebrated on Kartik Shukla Dwadashi. This year we will be celebrating it on 7th November 2011 on Monday. However there are some other opinions about the day of celebration. Some people say that it can be celebrated on Kartik Shukla Navami (9), Dashmi (10) or Ekadashi (11). Others say that it can be celebrated on any day from Kartik Shukla Ekadashi to Kartik Shukla Pournima. Some others say that it can be celebrated on any tithi (day) in Kartik Shukla Paksha when there is a Nakshatra suitable for marriage. We have to perform Dhyana of Tulasi Devi. We have to assume that Tulasi Bush is Devi Tulasi. Then we have to worship (perform pooja) of Devi Tulasi with Shodoshopacharas i.e. with all required things for the pooja which includes Ghee, Dhoopa, Deep, Sindoor, Chandan, flowers, Naivedya (prasadam) and many other things. Then we have to recite/listen Devi Tulasi Namashtak followed by Aarti and finally the celebration of her marriage with God Vishnu. Afterwards Tulasi Was asked to live on PruthaviLok as a Tulsi Bush. We know Tulasi is very useful and it is a medicine in itself which we use many times for curing diseases. Fala ShrutiI: Our sins get vanished. The person who has no son is blessed with son. Man/Woman who had problem about marriage shortly gets married. Those who are suffering from diseases get well and become healthy and happy. Those who have some type of fear get relief from fear and become strong and happy. Thus by the blessings of Devi Tulasi we become happy, wealthy, and healthy and at the end of our life we rest in peace with God Vishnu in Vaikuntha (Vishnu Lok).
तुळशी विवाह व तुळशी माहात्म्य
तुळशी विवाह
तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून करतात. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिपर्यंत तुलसी विवाह करतात. मुख्यतः द्वादशीस तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे.
विवाहाची वेळ: विवाहाची वेळ ही गोधूळी ( गाई चरुन घरी येण्याची वेळ ) म्हणजे सायंकाळची असते.
विवाहाची तयारी: तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करतात. वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढतात. राधा-दामोदर प्रसनन असें लिहीतात. वृंदावनांतील तुळशींत चिंचा, आवळे ठेवतात. ऊस खोचून ठेवतात. ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे.
वृंदावनाभोवती मांडव घालावा. केळीचे गाभे, आंब्याच्या डहाळ्या, टाळे, फुलांच्या माळा वगैरे लावाव्या. वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी घालावी.
पूजा साहित्य : हळकुंडे, विड्याची पानें, सुपार्या, खोबर्याच्या वाट्या, हळद-कुंकू, इत्यादि पूजा साहित्य. नारळ, पंचा, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, निरनिराळी फळे, लाह्या, बत्तासे आदि.
पूजा विधी
श्रीमन् महागणपतये नमः असा मंत्र म्हणून
तुलसीसहित श्रीगोपालकृष्ण प्रीत्यर्थं विवाहोत्सांगध्यानावहनादि षोडशोपचार पूजनं करिष्ये "
असे म्हणून कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी.
ध्यान करावे व खालील श्र्लोक म्हणावा.
ध्यानाचा श्र्लोक:
शान्ताकारम् भुजगसहयनम् पद्मनाभं सुरेशं ।
विश्र्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकैकनाथम् ।
यानंतर गोपालकृष्ण ताम्हनांत घेऊन तुलसी व गोपालकृष्णाची पूजा करावी. यानंतर खालीलप्रमाणें तुलसीची प्रार्थना करावी.
तुलसीची प्रार्थना
दिव्यरुपधरा देवी दिव्याभरणभूषिता ।
पद्मकल्हारवदना वरामया चतुर्भुजा ॥ १ ॥
शुभाशुभ परित्यागी दिव्यगंधानुलेपना ।
श्यामा विशालवदना नीलकुंचिताभूर्धजा ॥ २ ॥
स्फुरत्कुंडलसंयुक्ता पूर्णचंद्रनिभानना ।
केयुहारविलसद् रत्नमाला विषोज्ज्वला ॥ ३ ॥
हे ध्यनमंत्र म्हणतांना एका भांड्यांत दूध घेऊन तुलसी वृंदावनांत त्याची धार धरुन तीन प्रदक्षिणा घालाव्या.
यानंतर गोविंदा गोविंदा असा त्रिवार नामघोष करावा.
देवपूजेंतील बाळकृष्णाची मूर्ती आणून देवाचे तोंड तुलसी वृंदावनाकडे करावे. जमलेल्यानां अक्षदा वाटाव्यात.
तुलसी व बालकृष्ण यांच्यामध्यें अंतःर्पट धरुन मंगलाष्टके म्हणावीत. विवाहाच्यावेळीं जशी म्हणतात तशी सुरवात व तसा शेवट करावा.
मंगलाष्टके
१) स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्र्वरं सिद]धिदं ॥
बल्लाळो मुरुदं विनायकमहं चिंतामणिं स्थेवरं ॥
लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्र्वरं ओझरं ॥
ग्रामो रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम् ॥
२) लक्ष्मीःकौस्तुभपारिजातकसुरा धन्वंतरिश्र्चंद्रमा ॥
गावःकामदुधाःसुरेश्र्वरगजो रंभादिदेवांगनाः अश्र्वः ।
सप्तमुखो विषं हरिधनुःशंखोऽमृतं चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मंगलम् ॥
३) कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षःस्थले कौस्तुभं ।
नासाग्रे वर मौक्तिकं करतले वेणुःकरे कंकणम् ।
सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठेच मुक्तावली ।
गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम् ॥
४) गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयूमहेंद्रतनया चर्मण्वती वेदिका ।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता च या गंडकी ।
पूर्णाः पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वंतु वो मंगलम् ॥
५) रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं ।
रामेचित्तलयः सदा भवतु मे कुर्यात् सदा मंगलम् ॥
६) कंठे यस्य विराजते हि गरलं शीर्षे च मंदाकिनी ।
वामांके गिरिजाननं कटितटे शार्दूलचर्मांबरम् ।
माया यस्य रुणद्धि विश्र्वमखिलं तस्मै नमः शंभवे ।
संस्थाणुः स्थिर भक्तियोग सुलभः कुर्यात् सदा मंगलम् ॥
७) मोठे दोंद कटीं फणींद्र बरवा भाळीं शशी शोभतो ।
हस्ती अंकुश लड्डु पद्म परशू दंती हिरा झळकतो ।
पायी पैंजण घागरी रुणझुणी प्रेमें बरा नाचतो ।
ऐसा देव गणेश तो वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ॥
८) श्रीवत्सांकित भूषणें तुळशिची आपाद माळा रुळे।
माथां रत्नकिरीट कौस्तुभ गळां सूर्यप्रभे ना तुळे ।
केयुरांगद कुंडले सुरचना चौहस्तकीं आयुधें ।
लक्ष्मीयुक्त मुरारि तो वधुवरां कुर्वन्तु वो मंगलम् ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव
विद्याबलं दाोवबलं तदेव
लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि
सुमुहूर्त सावधान -सावधान
नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षदा टाकून टाळ्या वाजवाव्या. वाद्ये वाजवावी.
पूजा करणाराने एक फुलांची माल गोपालकृष्णाला व दुसरी फुलांची माळ तुलसीला घालावी. नंतर तुलसी व श्रीकृश्णाची आरती करावी. व प्रार्थना करावी.
प्रसीदं मम देवेशी कृपया परया सदा ।
अभिष्ट कार्यसिद्धिंच कुरु मे माधवप्रिये ॥
देवैसह निर्मिता पूर्व अर्चितासि मुनीश्र्वरैः ।
नमो नमस्ते तुलसि पापहरं हरप्रिये ॥
सुवासिनींना तुलसीला हळदकुंकू वाहून ओटी भरावी. दीप लावावा व म्हणावे
अखंड सौभाग्य वृद्धये तुलसी विवाहांगत्वेन ।
राधाकार्तिक दामोदर देवताप्रीत्यर्थ दीपज्वालनं करिष्ये ॥
व उदक सोडून आरती करावी. ब्राह्मणास गंधफूल विडा दक्षिणा द्यावी. लाह्या, बत्तासे, उसाचे कर्वे वगैरे प्रसाद वाटावा.
नंतर कन्यादान विधी म्हणून म्हणावे.
देवीं कनकसंपन्ना कनकाभरणौर्युताम् ।
दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजिगीषया ।
मया संवर्धितां यथाशक्त्यालंकृतां इमां तुलसीं देवीं ।
दामोदराय श्रीधराय वराय तुभ्यमहं संप्रददे ॥
असे यजमानाने म्हणावे. नंतर प्रार्थना करावी.
उत्तिष्ठोतिष्ठ गोविंद उतिष्ठ गरुडध्वज ।
उतिष्ठ कमलाकन्त वासुदेव नमोऽस्तुते ॥
अशा रीतीनें तुळशीविवाह संपन्न करावा.
तुलसीची रोजची उपासना
रोज पाणी घालून नैवेद्य दाखवून तुळसीदल भक्षण करुन म्हणतात
तुळशी श्रीसखी शुभे पापहरिणी पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायण मनःप्रिये ॥
तुळसीला प्रदक्षिणा घालावाव्यात. प्रत्येल पावलागणिक अश्र्वमेघ यज्ञाचे फळ मिळते.
तुलसीचा गायत्री मंत्र
श्रीतूलस्यै विद्महे । विष्णुप्रियायै धीमहि ।
तन्नो अमृता प्रचोदयात् ॥
तुळशीमाला
कार्तिक महिन्यांत तुलशीची माल परिधान करतात.
तुळशीकाष्ठसम्भूते माले कृष्णजनप्रिये ।
बिभर्मिं त्वामहं कण्ठे कुरुमां कृष्णवल्लभम् ॥
अर्थ
हे माले, तू तुळशीकाष्ठची बनलेली असून वैष्णवाना प्रिय आहेस. मी तुला कंठी धारण करतो. मी कृष्णाला प्रिय होईन असे कर.
तुळशीची व्रते
तुळशीपत्र लक्षपूजा (व्रत)
हे एक व्रत आहे. एकलक्ष तुळसीपत्रे वाहुन विष्णुची पूजा करायची. या पूजेंत पहिल्या दिवशी जितकी तुळशीपत्रें वाहीली असतील तितकीच पुढे प्रत्येक दिवशी घेऊन लक्ष संख्या पुरी करावयाची. तुळशीपत्रें स्वच्छ असावीत. किडकी, अस्वच्छ, फाटलेली असू नयेत. जितकी तुलशीदले रोज वाहिली असतील तितक्याच वातीनीं आरती करावी.
तुळशी लक्ष प्रदक्षिणा ( व्रत )
चातुर्मासांत तुळशीला लक्ष प्रदक्षिणा घालण्याचे व्रत असते. रोज प्रदक्षिणा घालून झाल्यावर तुळशीची आराधना करताना खालीलप्रमाणें म्हणतात.
हे तुळशी, तूं श्यामवर्ण, कमललोचन, प्रसन्न, चतुर्भुज, दोन्ही हातांत पद्म व कमल धारण करणारी, दोन हात वरदव अभय मुद्रेत असलेली, किरीट, हार, केयूर, कुंडल अलंकारांनी शोभणारी शुभ्रवस्त्रा व पद्मासनस्था अशी आहेस. तुला मी नमस्कार करतो. तूं मला प्रसन्न होऊन वरदान दे.
ह्यांतील बरीचशी माहीती तुळशी विवाह व तुळशी माहात्म्य या पुस्तकांतून साभार घेतली आहे.
तुलसी नामाष्टक
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी I
पुष्पसारा नन्दिनी च तुलसी कृष्णजीवनी II १ II
एतन्नामाष्टकं चैव स्तोत्रं नामार्थसंयुतम् I
यः पठेत् तां च सम्पूज्य सोSश्वमेधफ़लमं लभेत् II २ II
II इति श्री ब्रह्मवैवर्ते प्रकृतिखण्डे तुलसी नामाष्टकम् देवी तुलसिं समर्पणमस्तु II
तुलसी नामाष्टक
मराठी अर्थ:
वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळस आणि कृष्णजीवनी
ही देवी तुलसीची आठ नावे आहेत. हे देवी तुलसीच्या आठ नावांचे स्तोत्र आहे. जो मनुष्य
तुलसीची पूजा करून या नामाष्टकाचा पाठ करतो त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते.
Tulasi Vivaha and Tulasi Namashtak Stotra
Custom Search
No comments:
Post a Comment