Wednesday, July 25, 2018

Shri Dattatreya Namaskarashtak श्रीदत्तात्रेय नमस्काराष्टक


Shri Dattatreya Namaskarashtak 
Shri Dattatreya Namaskarashtak is in Marathi. It is very beautiful creation and mainly praises Guru. It is an appreciation of Guru who has done many good things for disciple.
श्रीदत्तात्रेय नमस्काराष्टक
ज्याच्या कृपेचा मज लाभ झाला । 
जन्मान्तरीचा गुरुराज आला ।
श्रीदत्त ऐसा मज बोध केला । 
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ १ ॥
अखंड माझ्या हृदयांत आहे । 
सबाह्यदेहीं परिपूर्ण पाहे ।
टाकूनि मजसी नाहींच गेला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ २ ॥
स्वरुप माझे मज दाखविले ।
देहीच माझे मज हीत केले ।
ऐसा जयाने उपकार केला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ३ ॥ 
संसारव्याळे मज डंकियेलें ।
परमार्थ बोधे विष उतरिले ।
माझ्यावरी हा उपकार केला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ४ ॥
शुकादिकांला सुख प्राप्त झाले ।
तसेंच तू रे मजलागि दिलें ।
माता पिता तूं बंधूहि मजला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ५ ॥  
निजात्मरंगे मज रंगविलें ।
स्वानंदलेणें मज लेववीले ।
बोधोनि ऐसा परिपूर्ण केला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ६ ॥
सुखात्मडोही मज बूडविलें ।
घेवूनि हस्तें सुख दाखवीले ।
विवेक पूर्ता भवताप गेला ।
विसरु कसा मी गुरुपादुकाला ।
नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ७ ॥
नमस्काराष्टक संपूर्ण ॥
Shri Dattatreya Namaskarashtak
श्रीदत्तात्रेय नमस्काराष्टक


Custom Search

2 comments:

uday u bhide said...

कृपया या नमस्कार अष्टकाचे आठवे पद द्यावे

uday u bhide said...

माझ्या आठवणी प्रमाणे या पदाच्या शेवटच्या दोन ओळी *प्रपंच परमार्थ कृतार्थ केला, श्री ज्ञानसागर श्री अवधूत झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, नमस्कार माझा श्री दत्तात्रयाला* अश्या होत्या पण या पदाच्या सुरुवातीच्या दोन ओळी सांगण्याची विनंती आहे