Gurucharitra Adhyay 37
Gurucharitra Adhyay 37 is in Marathi. This Adhyay describes many things such as the importance of devpooja, Manaspooja, Vaishvadev and so on. Name of this Adhyay is Karma-MargNirupanam. Gurucharitra Adhyay 37 Part 1 and 2 and 3 are only for Text purpose. Adhyay 37 is full in video.
श्रीगुरुचरित्र अध्याय ३७ भाग १/३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें कथा वर्तली कैसी ।
श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । काय निरुपिलें त्यानंतर ॥ १ ॥
ऐक म्हणे नामधारका सगुण । श्रीगुरु अवतार-नारायण ।
जाणे सर्व आचारखूण । सांगतसे कृपेसीं ॥ २ ॥
त्रिमूर्तीचा अवतार ज्यासी । आचार सांगता काय प्रयासी ।
ज्ञान देउनी पतितासी । वेद म्हणविले कवणेपरी ॥ ३ ॥
ऐसा गुरुमूर्ति दातारु । भक्तजना कल्पतरु ।
सांगता झाला आचारु । कृपा करोनि विप्रासी ॥ ४ ॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । गृहीं रक्षावें कारणासी ।
अग्निमंथनकाष्ठासी । संपादावें कृष्णमार्जार ॥ ५ ॥
श्रीखंड, दिव्य मणि, घृत । तिळ, कृष्णाजिन, छागबस्त ।
इतुकी असावी पवित्र । दुरितें बाधा करुं न शकती ॥ ६ ॥
शुकपक्षी सारसासी । पोसावें घरी परियेसीं ।
समस्तपापविनाशी । धेनु असावी आपुले घरी ॥ ७ ॥
देवपूजेचें विधान । सांगेन ऐका एकोमन ।
गृह बरवें संमार्जून । देवगृह अर्चावें ॥ ८ ॥
हिरण्य-रौप्य-ताम्रेसीं । अथवा मृत्तिकापात्रेंसीं ।
संमार्जन करावें विधीसीं । निषिद्ध पात्रें सांगेन ॥ ९ ॥
कांस्यपात्र कन्याहस्ती । नोवरी अथवा शूद्रजातीं ।
न करावें वस्त्र धरोनि वामहस्तीं । दक्षिणहस्तें सारवावें ॥ १० ॥
प्रारंभ करावा नैऋत्यकोनीं । रात्रीं न करावें उदक घेउनी ।
अगत्य करणें घडे मनीं । भस्मेंकरोनि सारवावें ॥ ११ ॥
रंगमाळिका घालोनि । निर्मळ असावें देवताभुवनीं ।
मग शुभासनीं बैसोनि । देवपूजा करावी ॥ १२ ॥
जैसी संध्या ब्राह्मणासी । देवपूजा करावी तैसी ।
त्रिकळ करावें अर्चनासी । एकचित्तें मनोभावें ॥ १३ ॥
त्रिकाल न घडे ज्यासी । प्रातःकाळी करावी हर्षीं ।
तेंही न साधे परियेसीं । माध्याह्नकाळीं करावें ॥ १४ ॥
सायंकाळी मंत्रेसी । पुष्पें वहावीं भक्तीसीं ।
ऐसें न साधे जयासी । भोजनकाळी करावें ॥ १५ ॥
देवपूजा न करी नर । पावें त्वरित यमपुर ।
नरक भोगी निरंतर । ऐक ब्राह्मणा एकचित्तें ॥ १६ ॥
विप्रकुळीं जन्म जयासी । पूजा न करितां जेवी हर्षीं ।
तोचि होय यमग्रासी । वैश्र्वदेव न करी नर ॥ १७ ॥
देवपूजा करावयासी । विधानें सहा परियेसीं ।
' उदक नारायण ' स्वरुपेसीं । पूजिता तृप्ति जगन्नाथा ॥ १८ ॥
दुसरा प्रकार सांगेन ऐका । ' अग्निपूजा ' अधिका ।
' मानसपूजा ' अतिविशेषा । एकचित्तें परियेसा ॥ १९ ॥
' सूर्यपूजा ' करितां जाण । संतुष्ट होय नारायण ।
सामान्यपक्ष ' स्थंडिली ' जाण । ' प्रतिमापूजा ' स्वल्पबुद्धि ॥ २० ॥
ज्ञाता असेल बुद्धिमंत । यज्ञपुरुष पूजा तुम्ही त्वरित ।
स्वर्गापवर्ग पूजा देत । यज्ञपुरुषपूजा मुख्य जाण ॥ २१ ॥
अथवा पूजावें धेनूसी । ब्राह्मण पूजावे अतिविशेषीं ।
गुरुपूजा मनोमानसीं । प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ति ॥ २२ ॥
गुरु त्रैमूर्ति म्हणोनि । बोलती समस्त श्रुतिवचनीं ।
सकळाभीष्टें तयापासूनि । पाविजे चारी पुरुषार्थ ॥ २३ ॥
कलिप्रवेश होतां नर । न करिती अंतःकरण स्थिर ।
उत्पत्ति केली शार्ङ्गधरें । समस्त लोक उद्धरावया ॥ २४ ॥
शालिग्राम चक्रांकितेंसी । प्रकाश केला हृषीकेशीं ।
तीर्थ घेतां परियेसीं समस्त लोक पापें नासतीं ॥ २५ ॥
निरोप घेऊनि श्रीगुरुचे । पूजन करावें प्रतिमेचें ।
वेदोक्तमंत्रें देवाचे । विधिपूर्वक अर्चावें ॥ २६ ॥
स्त्रीजनादि-शूद्रांसी । न म्हणावें वेदमंत्रासी ।
आगमोक्तमार्गेसीं । गुरुनिरोपें करावें ॥ २७ ॥
श्रीगुरुचे निरोपानें । पूजा करी काष्ठ पाषाण ।
तेचि होती देव जाण । प्रसन्न होय परियेसा ॥ २८ ॥
शुचि आसनीं बैसोनि । करावें प्राणायाम तीनि ।
' येभ्योमाता ' म्हणोनि । चेतवावा परमात्मा ॥ २९ ॥
प्रणव मंत्रोनि द्वादश । उदकें प्रोक्षावें आपुले शीर्ष ।
संकल्प करोनि अंगन्यास । कलश पूजा करावी ॥ ३० ॥
देवा दक्षिण-भागेसीं । कलश ठेवावा परियेसीं ।
पूजा करोनि भक्तीसीं । शंख-पूजा करावी ॥ ३१ ॥
निर्माल्य काढोनि विनयेसीं । टाकावें नैर्ऋत्यदिशीं ।
धूत वस्त्र अंथरा हर्षी । दीप प्रज्वलित करावा ॥ ३२ ॥
स्मरावें मनीं श्रीगुरुसी । मनोवाक्कायकर्मेसीं ।
अर्चन करावें पीठासी । विधिपूर्वक अवधारा ॥ ३३ ॥
चारी द्वारें पूजोनि । दिशा पूजाव्या अर्चूनि ।
' शांताकार ' करा ध्यानीं । मग आवाहनावें मंत्रोक्त ॥ ३४ ॥
' सहस्त्रशीषे 'ति आवाहनोन । ' पुरुषएवेदें ' करा आसन ।
' एतावानस्य ' म्हणोन । पाद्य द्यावें आवधारा ॥ ३५ ॥
मंत्र म्हणोनि ' त्रिपादूर्ध्व ' ऐसा । अर्घ्य द्यावें परियेसा ।
' तस्माद्विराळ ' म्हणा ऐसा । देवासी आचमन समर्पावें ॥ ३६ ॥
' यत्पुरुषेण '-मंत्रेसीं । स्नपन करावें देवासी ।
पंचामृतादि विधीसीं । स्नपन-पूजा करावी ॥ ३७ ॥
पुरुषसूक्तादि रुद्रेसी । श्रुतिमार्गे करोनि न्यासासी ।
स्नपन करावें परियेसीं । एकचित्तें अवधारा ॥ ३८ ॥
स्नपन करुनि देवासी । बैसवावें शुभासनेसी ।
' तंयज्ञमि 'ति मंत्रेसीं । वस्त्रें द्यावी परियेसा ॥ ३९ ॥
' तस्माद्यज्ञात् ' मंत्रेसीं । यज्ञोपवीत द्ययावें देवासी ।
' येरे ' मंत्रे गंधाक्षतेसीं । वहावें अनन्यभक्तीनें ॥ ४० ॥
' तस्मादश्र्वा अजायंत ' । ऐसा तुम्ही मंत्र म्हणत ।
पुष्पें वहावीं एकचित्त । मनःपूर्वक देवासी ॥ ४१ ॥
पुष्पें वहावयाचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
आपण पेरिलीं कुसुमें सगुण । उत्तम पक्ष परियेसा ॥ ४२ ॥
पुष्पें असतीं अरण्यांत । मध्यम प्रकार असे वाहतां ।
क्रय करुनि विकत घेतां । सामान्य पक्ष पुष्पें जाणा ॥ ४३ ॥
उत्तम न मिळतां घ्यावीं विकत । उत्तम पक्ष पुष्पें श्र्वेत ।
रक्त मध्यम, अधम पीत । कृष्णचित्र अधमाधम ॥ ४४ ॥
शिळीं पुष्पें देख । सच्छिद्र अथवा कृमिभक्षक ।
भूमीवरी पडलें ऐक । पुष्प त्यजावें देवासी ॥ ४५ ॥
शिळें नव्हतें द्रव्य जाण । बिल्वपत्र तुळसीपर्ण ।
सहस्त्रपत्र-कमळें जाण । सदा ग्राह्य देवांसी ॥ ४६ ॥
शतपत्रें-बकुल-चंपकासी । पाटलें कमलें-पुन्नागेसीं ।
मल्लिका-जाती-करवीरेसीं । कल्हारपुष्पें अर्पावीं ॥ ४७ ॥
विष्णुपूजा करावयासी । वर्जावीं पुष्पें तुम्ही ऐसीं ।
धत्तुर अर्क करवीरेसीं । रक्त पुष्पें वर्जावी ॥ ४८ ॥
गिरिकर्णिका-निर्गुडेसीं । सेवगा-कपित्थ-करंजेसी ।
अमलपत्र-कुष्मांडेसीं । पुष्पें विष्णूसी वर्जावी ॥ ४९ ॥
हीं वाहिल्या होय दोषी । सांगेन ऐका समस्त ऋषि ।
पूजा करितां विष्णूसी । त्यजावी याचिकारणें ॥ ५० ॥
अर्कपुष्प वाहिल्यासी । विनाश होय आपणासी ।
धत्तूरपुष्पें प्रज्ञा नाशी । कोविदारें दरिद्रता ॥ ५१ ॥
गिरिकर्णिकापुष्पे वाहतां । कुलक्षय होय त्वरिता ।
कंटकारीपुष्पें वाहतां । शोक होय परियेसा ॥ ५२ ॥
कुंदपुष्पें होय दुःख । शाल्मलीपुष्पें रोग ऐक ।
याकारणें करुनि विवेक । पुष्पें वहावी विष्णूसी ॥ ५३ ॥
वर्जा पुष्पें ईश्र्वरासी । सांगेन नांवे परियेसीं ।
कपित्थ-केतकी-शशांकेसी । श्यामपुष्पें वर्जावी ॥ ५४ ॥
कृष्ण पिंगळ करंज देखा । धातकी निंबादि पंचका ।
बकुल दाडिंब केतका । माधवीपुष्पें वर्जावीं ॥ ५५ ॥
चूत कुंद यूथिका जाती । रक्त-पुष्पें वर्जावी निरुती ।
ईश्र्वरार्चनें दोष घडती । श्र्वेतपुष्पें मुख्य देखा ॥ ५६ ॥
पूजा करितां गणेशासी । वर्ज करा तुम्ही तुलसी ।
वर्ज करावें दूर्वेसी । दुर्गा शक्तिदेवीते ॥ ५७ ॥
येणें विधीं पुष्पें वाहतां । काम्य होय तुम्हां त्वरिता ।
चतुर्विध पुरुषार्था । होय तुम्हां अवधारा ॥ ५८ ॥
' यत्पुरुषं ' मंत्रेसी । सुगंध धूपावें परिमळेसी ।
' ब्राह्मणोस्ये ' ति मंत्रेसीं । एकारति करावी ॥ ५९ ॥
' चंद्रमानमनसो ' -मंत्रेसी । नैवेद्य द्यावा परिकरेसीं ।
तांबूल देतां मंत्रासी । ' नाभ्याआसी ' म्हणावें ॥ ६० ॥
सुवर्णपुष्प नीरांजन । ' सप्तास्येति ' मंत्रेकरुन ।
' वेदाहमे ' ति मंत्रेकरुन । पुष्पांजली अर्पावी ॥ ६१ ॥
' धातापुरस्तात् ' मंत्रेसीं । नमस्कारावें देवासी ।
अतिसन्मुख पृष्ठदेशीं । गर्भगृहीं करुं नये ॥ ६२ ॥
नमस्काराचें विधान । सांगेन ऐका विद्वज्जन ।
अपसव्य देवा प्रदक्षिणा । करुनि नमन करावें ॥ ६३ ॥
आपला गुरु माता पिता । सन्मुख जावें बाहेरुनि येतां ।
अथवा उत्तम द्विज देखतां । सन्मुख जावोनि वंदावें ॥ ६४ ॥
सभा असेल द्विजवरांची । नमस्कार करा तुम्ही एकचि ।
देवतार्चनीं तैसेंचि । नमस्कार पावे समस्तां ॥ ६५ ॥
माता-पिता-श्रीगुरुसी । नमस्कार करावें ऐसी ।
उभय हस्तें कर्णा स्पर्शी । एकोभावें वंदावें ॥ ६६ ॥
सव्य पादावरी देखा । सव्य हस्त स्पर्शोनि निका ।
वामहस्त वामपादावरी देखा । धरुनि नमस्कार करावा ॥ ६७ ॥
गुरुस्थानांची नांवें । सांगेन ऐका एकोभावें ।
विचारोनियां बरवें । नमस्कारावें येणें विधी ॥ ६८ ॥
माता-पिता-गुरु-धाता । भयहर्ता-अन्नदाता ।
व्रतबंध केल्या पुरोहिता । सहपत्नी ते गुरुस्थानीं ॥ ६९ ॥
ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता । सापत्न असेल जे माता ।
वय अधिक इष्टमैत्रा । नमस्कारावें तयांसी ॥ ७० ॥
निषिद्ध स्थानें नमावयासी । सांगेन ऐका तुम्हांसी ।
वय उणें असेल ज्यासी । नमूं नये विद्वज्जनीं ॥ ७१ ॥
अग्नि समिधा पुष्पें कुश । धरिला असेल अक्षता कलश ।
स्वहस्तीं परहस्तीं असतां दोष । उभयतां असे नमस्कारितां ॥ ७२ ॥
जप अथवा होम करितां । दूर देखिला द्विज येतां ।
स्नान करितां जळीं असतां । नमस्कार करुं नये ॥ ७३ ॥
एखादा विप्र असे धांवत । नेणता अथवा धनगर्वित ।
क्रोधवंत, मंगलस्नात । नमन करितां दोष घडे ॥ ७४ ॥
एकहस्तें ब्राह्मणासी । नमूं नये परियेसी ।
प्रेतनरु मूर्ख जनांसी । करुं नये नमस्कार ॥ ७५ ॥
गीतवाद्यनृत्येसीं । संतुष्टवावे देवासी ।
प्रार्थना करावी भक्तीसी । मग अर्चावें सनकादिकां ॥ ७६ ॥
पूजा अर्पूनि देवासी । हस्त ठेवूनि पीठेसी ।
उत्तरपूजा करा हर्षी । मग करावें उद्वासन ॥ ७७ ॥
पूजा अर्पूनि देवासी । हस्त ठेवूनि पीठेसी ।
उत्तरपूजा करा हर्षी । मग करावें उद्वासन ॥ ७७ ॥
ऐसेपरी देवपूजा । करावी भक्तीनें ऐक द्विजा ।
अन्न-संस्कार व्हावया काजा । वैश्र्वदेव करावा ॥ ७८ ॥
अग्न्यलंकार करुनि । अन्न अग्निकुंडीं दाखवूनि ।
घृतसंमिश्र करुनि । पांच भाग करावे ॥ ७९ ॥
एक भागाच्या सहा आहुति । दुसरा बळिहरणीं योजिती ।
अग्रदान तिसरा करिती । चौथ्या भागें पितृयज्ञ ॥ ८० ॥
मनुष्ययज्ञ पांचवेसीं । वैश्र्वदेव करावा मंत्रेसी ।
अन्न नाहीं ज्या दिवशीं । तंदुलांनीं करावा ॥ ८१ ॥
वैश्र्वदेवसमयासी । अतिथि आलिया घरासी ।
चोर चांडाल होय हर्षीं । पूजा करावी मनोभावें ॥ ८२ ॥
यम सांगे आपुले दूतासी । " वैश्र्वदेव न-करित्या नरासी ।
अतिथि आलिया घरासी । अन्न न घाली जो नर ॥ ८३ ॥
त्यातें आणावें आम्हापाशीं, । पूजा करिती जे विधीसीं ।
जाऊं नको तयांपाशीं । विष्णुआज्ञा आम्हां असे " ॥ ८४ ॥
मातापिताघातकीयासी । शुनि-श्र्वपच-चांडालासी ।
अतिथि आलिया घरासी । अन्न द्यावें परियेसा ॥ ८५ ॥
न विचारावें गोत्रकुळा । अन्न घालावें तात्काळा ।
विमुख झालिया वर्षें सोळा । पितर न येती घरासी ॥ ८६ ॥
प्रवासी असेल आपण जरी । औषधि-घृत-दधि-क्षीरीं ।
कंद-मूळें-फळें तरी । देवयज्ञ करावा ॥ ८७ ॥
अन्नाविणें अग्रदान । करुं नये साधुजनें ।
पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणें चांद्रायण आचरावें ॥ ८८ ॥
न होतां वैश्र्वदेव आपुल्या घरीं । भिक्षेसी आला नर जरी ।
भिक्षा घलितां पाप दूरी । वैश्र्वदेवफल असे ॥ ८९ ॥
बळिहरण घालोनि काढी आपण । त्याणें करावें चांद्रायण ।
आपण काढितां दोष जाण । आणिका करीं काढवावें ॥ ९० ॥
Gurucharitra Adhyay 37
गुरुचरित्र अध्याय ३७
Custom Search
4 comments:
Shree gurucharitr adhyay 37 va 1/3 bhaag ahet ...paratu me atta je vachan kele te fakt 90 ovya ahet ...shevat "shree guruchartramrute paramkatha kalptaru " ha nahi ahe tr baki che bhaag mala kase vachayla miltil ?
श्रीगुरुचरित्र अध्यायांची माझ्या या ब्लॉगची लिंक देत आहे. या लिंकवर सर्व अध्याय मिळतील. ३७व्या अध्यायाचे सर्व भागांच्या लिंकसुद्धा या लिंकवर मिळतील. धन्यवाद.
http://ioustotra.blogspot.com/p/gurucharitra-adhyay-links-httpioustotra.html
Gurucharitra wachtana "pariyesa" ha word sarkha yeto. Tyache meaning sangu shakta ka aapan?
Pariyesa/Pariyesi cha arth "Aika" asa asava. Ha shabd filler mhanun vaparla gela aahe, jar aapan tyacha shabdshaha arth lavayla gelo tar to lagat nahi, karan pratyek shlokat to veglya sandarbhane yeto. Jase "Tuka mhane" he vapartat tasach ha shabd, aika ya arthane vaparla asava.
Post a Comment