Monday, December 30, 2013

NarmadAshtakam नर्मदाष्टकम्

NarmadAshtakam 

NarmadAshtakam is in Sanskrit. It is a very beautiful creation of p.p. Adi Shankaracharya. It is a praise of Goddess Narmada maiya. From hundreds of years Narmada maiya is helping Rushies, Munies, Yogis and people for their spiritual development. Maiya also provides life to the people on the bank and also to many fishes, crocodiles and other creatures living in the water and to birds also living in the forests. She is not merely a river for the people in India but really she is a mother to us. Many people and devotees of Narmada Maiya perform Parikrama at least ones in their lifetime to have a divine experience of spirituality present on the banks of Narmada Maiya. The parikrama starts just after end of ChaturMas mainly from or after Tripuri Pournima. Many devotees do this parikrama of about 3500K.m. bare footed. This video is dedicated to all such devotees. 

 नर्मदाष्टकम् 

सबिन्दुसिन्धुसुस्खलत् तरङ्ग भङ्गरञ्जितं द्विषत्सुपापजातजातकारिवारिसंयुतम् । 
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे 
 त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ १ ॥ 
त्वदम्बुलीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकं 
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकम् । 
सुमत्स्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ २ ॥ 
महागभीर नीरपूर पापधूत भूतलं 
ध्वनत्ससमस्त पातकारि दारितापदाचलम् । 
जगल्लये महाभये मृकण्डुसुनूहर्म्यदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ३ ॥ 
गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा 
मृकण्डुसूनुशौनका सुरारिसेविसर्वदा । 
पुनर्भवाब्धि जन्मजंभवाब्धि दुःखवर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ४ ॥ 
अलक्षलक्ष किन्नरामरासुरादिपूजितं 
सुलक्षनीर तीरधीर पक्षिलक्षकूजितम् । 
वसिष्ठसिष्ट पिप्पलादि कर्दमादिशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ५ ॥ 
सनत्कुमार नाचिकेत कश्यपादिषट्पदैः 
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः । 
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ६ ॥ 
अलक्षलक्ष लक्षपापलक्ष सायरसायुधं 
ततस्तु जीवजन्तुतन्तु भुक्तिमुक्तिदायकम् । 
विरश्र्चिविष्णुशङ्कर स्वकीय धामवर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ७ ॥ 
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे 
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे । 
दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ८ ॥ 
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा 
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा । 
सुलभ्य देहदुर्लभं महेंशधाम गौरवम् 
पुनर्भवा न वै नरा विलोकयन्ति रौरवम् ॥ ९ ॥ 
॥ इति श्रीमत् आद्यशङ्कराचार्यविरचितं 
नर्मदाष्टकं सम्पूर्णम् ॥ 
नर्मदाष्टकं मराठी अर्थ: 
१) बिंदूपासून सिंधूपर्यंत अखंड तरंगाकार विनटलेल्या आणि दुष्ट प्रवृत्तीमुळे प्राप्त होणार्‍या जन्मपरंपरेचा नाश करणार्‍या जलाने युक्त अशा तुझ्या चरणकमलांना, कालस्वरुप यमदूतांची भीती हरण करुन रक्षण करणार्‍या देवी नर्मदे, मी नमन करतो. 
२) तुझ्या जलामध्ये विहरणार्‍या दीनदुबळ्या मत्स्यांना, कासवांना आणि जलावर भरारी मारणार्‍या चकवा, घडियाल तसेच हंसआदि पक्षांना दिव्यता प्रदान करणार्‍या, कलियुगांतील महादोषांचा परिहार करणार्‍या सकलतीर्थामध्ये वरिष्ठ अशा तुझ्या पदकमलांना, पुष्कळ मासे, कासवे आणि मगरींच्या समुदायांचे, तसेच चक्रवाक पक्ष्यांचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे मी नमन करतो. 
३) महाप्रचंड पुराने भूतलावरील सारी पापे धुऊन काढणार्‍या आणि घनगंभीर नादाने पातकांच्या राशी आणि पर्वतप्राय संकटे यांचा चक्काचूर करणार्‍या तुझ्या चरणांबुजांना, प्रलयकालीन महाभयाच्यावेळी मार्कण्डेयऋषींना आपल्या ठायी आश्रय देणार्‍या देवी नर्मदे मी नमस्कार करतो. 
४) मार्कण्डेय, शौनक, देवेन्द्र ज्यांचे सदैव सेवन करतात, त्या तुझ्या जलाचे नुसते दर्शन होताच माझे भय कुठल्या कुठे पळून गेले. पुनर्जन्म तसेच संसारसागरांतील दुःखांपासून कवचाप्रमाणे रक्षण करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी नमस्कार करतो. 
५) अगणित किन्नर, देव, आणि असुर ज्यांची पूजा करतात आणि ज्यांच्या तीरावरील लक्षावधी पक्षिगण जलाशय निरखीत धीटपणे अखंड कूजन करीत असतात, त्या तुझ्या चरणकमलांना, मुनीश्रेष्ठ वसिष्ठ, पिप्पलाद, कर्दमप्रभृतींचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी वंदन करतो. 
६) सनत्कुमार, नचिकेत, कश्यप, अत्रि नारदादींनी ज्यांना आपल्या अंतःकरणांत साठविले आहे, त्या तुझ्या सूर्य, चंद्र, अन्तिदेव आणि देवरज इंद्र यांच्या सत्कर्मांना विश्र्वांत प्रतिष्ठित करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पादकमलांना मी नमस्कार करतो. 
७) दृष्टादृष्ट लक्षावधी पातकांच्या राशींचा भेद करणार्‍या, तसेच जीवजंतूंना भोग व मोक्ष देणार्‍या, ब्रह्माविष्णुमहेशांना आपापल्या ठायी सुप्रतिष्ठित करणार्‍या देवी नर्मदे तुझ्या चरणांना मी नमस्कार करतो. 
८) भगवान शंकरांच्या जटेतून निघालेल्या तुझ्या तटावरील किरात, सूत, वाडव, पंडित, शट, नट अशा समस्त जनांच्या मुखी अमृतोपम संजीवक असे नर्मदेचेच नांव ऐकू येते. दुस्तर पापतापांचा नाश करुन सकल जीवांचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे, मी तुझ्या चरणकमलांना नमस्कार करतो. 
९) हे नर्मदाष्टक नेहमी त्रिकाळी जे निरंतर पठण करतात त्यांना कधीही दुर्गति प्राप्त होत नाही. तसेच त्यांना मानवी जन्मांतील अतिदुर्लभ आणि गौरव देणारे महेशधाम प्राप्त झाल्याने ते जन्ममृत्युच्या बंधनांतून मुक्त होतात व रौरवादी नरकाचे दर्शनही त्यांना होत नाही. अशा रीतीने परम पूज्य श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी रचिलेले हे नर्मदाष्टक येथे पुरे झाले.
NarmadAshtakam 
नर्मदाष्टकम्


Custom Search
Post a Comment