Friday, December 5, 2014

ShriDevi Mahatmya श्रीदेवीमहात्म्य


ShriDevi Mahatmya 
 ShriDevi Mahatmya is in Marathi. It is a very Pious and Holy Grantha. This Grantha is a translation of original Sanskrit ShriDurgaSaptashati, which is from Markandeya Purana. The translation is nicely done by shri Ram Baba vernekar who was from a renouned Aginihotri Brahmin family. He was very wise and learned and his knowledge of Sanskrit was beyond normal man's capacity. He has also written a grantha on Tulasi Mahatmya. 
 ShriDevi Mahatmya is in sixteen Adhayays. 
 1 to 13 Adhyays are the Goddess Durga's charitra of her three main avataras. 
Followed by Pradhanik Rahasya, Vaikrutik Rahasya and Moorthi Rahasya. 
With the blessings of Goddess Durga and best wishes of Devotees of Goddess like you; I have decided to upload all sixteen adhyayas of Shridevi Mahahatmya on every Tuseday and Friday. 
ShriDurgaSaptashati Patha 
 The patha is to be performed in a single day in following manner. 
 • Take a bath to clean and purify your body. 
 • Perform worship/pooja of the God to purify your mind. 
 • Bow to the God and elderly people in your family   
 • Starting day and time of reading must be good. 
 • Reading place must be the clean and decoarted with rangoli etc. 
 • If you are reading it for specific purpose, then say it and tell it to Godess DurgaDevi before starting reading. 
 • Reader needs to be facing towards East or North while reading ShriDurgaSaptashati. 
 • Devotee needs to keep picture of Goddess Jagadamba in front of him/her. 
 • Holy lamp to be kept burning by using ghee.
Reading Order
 Reading should be in following order 
  Ddevya kavcha, Argala Stotram, Kilak 
 Vedokta Ratri Suktam, Tantrokta Ratri Suktam, 
 ShriDevi Atharvshirsham, 
 NavarnMantra Japa Chanting, 
 Saptashati Nyas, 
Adhyay 1 to 13, 
Vedokta Ratri Suktam, 
Tantrokta Ratri Suktam, 
Pradhanik Rahasya, 
Vaikrutik Rahasya, 
 Moorti Rahasya, 
kshama Prarthana, 
Devyaparadhakshamapana Stotra.
श्रीदेवीमहात्म्य
श्रीदेवीमहात्म्य म्हणजेच संस्कृतमधिल श्रीदुर्गासप्तशती. मूळ संस्कृत ग्रंथाचे प्रासादीक ओवीबद्ध भाषांतर केलेला हा मराठींतील ग्रंथ आहे. तो रामबाबा वेर्णेकर ह्या अग्निहोत्री विद्वान ब्राह्मण गृहस्थांनी करुन ठेवल्याने आपल्याला याचे पाठ करता येतात. एकंदर हे सर्व सोळा अध्याय आहेत. पहिला अध्याय हा श्रीमहाकालीचा अवतार व मधु-कैटभ या दैत्यांचा संहार. दुसरा, तीसरा व चौथा हे अध्याय श्रीमहालश्र्मीचे व महिषासुराचा संहार आणि पांच ते तेरा अध्याय हे श्रीमहासरस्वतीचे धूम्रलोचन, चण्ड-मुंण्ड, रक्तबीज, नीशुंभ आणि शुंभ यांचे वध त्यानंतर पुढील तीन अध्याय ह्यांत प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्तिरहस्य यांचे आहेत.     श्रीदुर्गादेवीच्या शुभाशिर्वादाने व आपल्यासारख्या देवी भक्तांच्या सदीच्छेने दर मंगळवारी व शुक्रवारी हे सर्व श्रीदेवीमहात्म्याचे सोळा अध्याय मी माझ्या चँनेलवर देणार आहे.  
सप्तशती पाठासाठी बरेचसे नियम व तांत्रिक अंगे आहेत. परंतु मराठीमधिल श्रीदेवीमहात्म्याचा पाठ करण्यासाठी तसे काही नाही. त्यामुळे आपण रोज पूर्ण पाठ केला पाहिजे व त्याचे ठराविक नियम पाळले पाहीजेत याचे बंधन नाही. तसे श्री रामबाबा वेर्णेकरांनी देवीमहात्म्य या त्यांच्या मराठी भाषांतरीत अध्याय १५ पंधरामध्यें सांगितले आहे. 
असे असूनही ज्या देवी भक्तांना नियम पाळून पाठ करावयाचा असल्यास त्यासंबंधी माहिती देत आहे. 
पाठासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे, मिठाई,अष्टगंध, हीना अत्तर, रांगोळी, तीन पाट, नारळ, देवीला अर्पण करण्यासाठी विडा, नविन वस्त्र, 
पाठाची पूर्वतयारी: पाठाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. अंघोळ करून संध्यादि व देवांची पूजा करावी. देवाला व घरांतील वडिलधार्‍यांना नमस्कार करावा. पाठाला बसण्याची जागा स्वच्छ करून, रांगोळी घालून तीन पाट अगर आसने मांडावीत. दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे. हे आसन देवीसाठी असते. आपण वाचत असलेले देवीमहात्म्य आपल्याजवळ बसून देवीसुद्धा ऐकत असते.  वाचणार्‍याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे. आपल्या समोर चौरंगावर श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी अगर श्रीमहासरस्वतीची प्रतिमा ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर श्रीदेवीमहात्म्याची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे. तूपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे. वाचनाची जागा स्वच्छ व मन प्रसन्न ठेवणारी असावी. पाठ कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरवात करावी. वाचन मोठ्यानेच करावे मनांत करू नये. पाठ चालू असताना फोन/मोबाईल बंद ठेवावा. कोठच्याही प्रकारचे बोलणे पाठ चालू असताना करू नये. वाचन सुरु असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. वाचनांत एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे. 
श्रीदुर्गासप्तशती 
श्रीदुर्गासप्तशती हा आपला एक प्राचीन ग्रंथ आहे. सांप्रत कलीयुगामध्ये चण्डी व विनायक म्हणजे श्रीदुर्गादेवी व श्रीगणेश यांची उपासना शीघ्र फलदायी होते असे एक संस्कृत वचन आहे. (कलौचण्डी विनायकौ). 
श्रीदुर्गासत्पशती हा ग्रंथ मार्कंडेय पुरांणातील आहे. मार्कंडेय ऋषीनी हे देवीमाहात्म्य संस्कृतमध्ये ७०० सातशे श्र्लोकांत सांगितले आहे. हे सातशे श्र्लोक असल्याने ह्या ग्रंथाचे नांव सप्तशती असे आहे. उपासना पद्धतीमध्ये ह्याचे पाठ करणे, नवार्ण मंत्र जप व हवन ह्या मुख्य गोष्टी आहेत. या ग्रंथाचे एकंदर १३ तेरा अध्याय आहेत. या तेरा अध्यायांत श्रीदेवीच्या महत्वाच्या तीन अवतारांचे संक्षीप्त वर्णन आहे. 
पहिल्या अध्यायांत श्रीमहाकाली अवतार 
दोन, तीन व चार या अध्यायांत श्रीमहालक्ष्मी आणि
पांच ते तेरा या नऊ अध्यायांत श्रीमहासरस्वती या 
तीन अवतारांच्या युद्धाचे व त्यांनी संहार केलेल्या राक्षसांचे वर्णन आहे. आपण पाठ करतांना देवी अवतारांची उत्पत्ती व त्यांचे कार्य एवढीच माहिती वाचतो म्हणजेच देवीचे अर्ध चरित्र वाचतो म्हणून पाठाच्या अंती देव्यपराधक्षमापन स्तोत्र म्हणण्याचा प्रघात आहे. कांही उपासक आपल्याकडून कांही चुका होतील म्हणून पाठ करण्यास घाबरतात. वरील स्तोत्र म्हंटल्याने पाठ करतांना कांही चुका झाल्यास देवी आपल्याला क्षमा करते  
श्रीदुर्गादेवीची उपासना म्हणजे सप्तशतीचे पाठ करणे ही उपास्य देवतेला व उपासकाला म्हणजेच देवीला व भक्ताला आवडणारी अशी व भक्ताला सर्व संकटांतून मुक्त करणारी, अभिष्ट, इच्छित गोष्टींची प्राप्ती लवकर करुन देणारी अशी उपासना आहे. अर्थातच हे सप्तशतीचे पाठ करातांना काहीं नियम, आवश्यक तंत्रे सांभाळावी लागतात. तसे केल्यास अपेक्षित फळ लवकर मिळते असा बर्‍याच उपासकांचा अनुभव आहे. 
सर्व सामान्यपणे श्रीदुर्गासप्तशतीचा पाठ एका दिवसांत खालिलप्रमाणे करतात.  
श्रीदुर्गासप्तशतीपाठाचे वाचन:
देव्याः कवच, अर्गला स्तोत्रम्, कीलक, 
वेदोक्त रात्रिसूक्त
तन्त्रोक्त रात्रिसूक्त
श्रीदेवी अथर्वशीर्ष
नवार्णमंत्र जप.
सप्तशतीन्यास
नंतर अध्याय १ ते १३. 
वेदोक्त रात्रिसूक्त
तन्त्रोक्त रात्रिसूक्त
प्राधानिक रहस्य
वैकृतिकरहस्य
मूर्तिरहस्य
क्षमाप्रार्थना, देव्यपराधक्षमापन स्तोत्र
अशा प्रकारे पाठ करावा. वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे. काहीतरी खावे. दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री भूमीवर शयन करावे. ब्रह्मचर्याचे पालन पाठ चालू असताना करावे. पाठ झाल्यावर होमहवन करावे. अनुष्ठान म्हणून ब्राह्मण, कुमारिका, सुवासिनींना भोजन-दक्षिणा द्यावी. फलश्रुती
पाठ केल्यामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यांपासून मुक्तता, रोगापासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे, पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरुप्राप्ती, जीवनांत शांती आणि अंती मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात. 
देवीने सांगितलेले महत्व 
या पाठाचे महत्व व फलश्रुती स्वतः देवीने बाराव्या अध्यायांत ऋषींना सांगितली आहे. खरतर हा संपूर्ण बारावा अध्याय हा स्वतः देवीने सांगितला असून बहुतांश यांत फलश्रुती आहे. त्यांतील कांही संस्कृतमधिल निवडक श्र्लोक खालिलप्रमाणे आहेत.
सर्वं ममैतन्माहात्म्यं मम सन्निधिकारकम् ।
पशुपुष्पार्घ्यधूपैश्च गन्धदीपैस्तथोत्तमैः ॥ १२/२०॥
विप्राणां भोजनैर्होमैः प्रोक्षणीयैरहर्निशम् ।
अन्यैश्च विविधैर्भोगैः प्रदानैतवत्सरेण या ॥ २१ ॥
प्रीतिर्मे क्रियते सास्मिन् सकृत्सुचरिते श्रुते ।
श्रुतं हरति पापानि तथाऽऽरोग्यं प्रयच्छति ॥ १२/२२ ॥ मराठी अर्थः
देवी म्हणते हे माझे माहात्म्य माझी समिपता मिळवून देणारे आहे. पशु, पुष्प, अर्घ्य, धूप, गंध, दीप आदि उत्कृष्ट साहित्याने माझी पूजा करणे, (कुमारिका, सुवासिनी,) ब्राह्मणांना भोजन देणे, होमहवन करणे, प्रोक्षण, अभिषेक करणे, निरनिराळ्या प्रकारचे भोग, नैवेद्यादि अर्पण करणे, दाने देणे, याप्रकारे वर्षभर माझी उपासना केली असता मला जसा आनंद होतो तसाच आनंद या माझ्या चरित्राची एकदा आठवण केल्यानेही मला होतो. हे स्मरण भक्तांची सर्व पापें हरण करणारे व त्यांना आरोग्य देणारे आहे.

अशा रीतीने श्रीदुर्गासप्तशती हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनांत आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा आहे. अशा या श्रीदुर्गासप्तशती ग्रंथाच्या पाठाने देवीभक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनांत सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच श्रीजगदंबेच्या चरणी प्रार्थना.


ShriDevi Mahatmya 
 श्रीदेवीमहात्म्य


Custom Search
Post a Comment